Friday, June 26, 2026
Home Blog Page 32

लोकाभिमुख नेतृत्वाचा वाढदिवस : आयु. विकास वसंतराव काकडे यांना साहस Times तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

0
लोकाभिमुख नेतृत्वाचा वाढदिवस : आयु. विकास वसंतराव काकडे यांना साहस Times तर्फे वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

फलटण : फलटण नगर परिषद फलटणचे नगरसेवक आयु. विकास वसंतराव काकडे( सर ) यांचा वाढदिवस आज उत्साहपूर्ण वातावरणात साजरा होत असून, यानिमित्त साहस Times तर्फे त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करण्यात येत आहेत.
शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करत नागरिकांच्या मनात आपले वेगळे स्थान निर्माण करणारे विकास काकडे (सर) हे प्रामाणिक, कार्यक्षम आणि सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून ओळखले जातात. “कामातून विश्वास” या तत्त्वावर कार्य करणाऱ्या त्यांच्या नेतृत्वामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल दृढ विश्वास निर्माण झाला आहे.
फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित मालोजीराजे शेती विद्यालय व ज्युनिअर कॉलेज येथे उपमुख्याध्यापक म्हणून कार्य करताना त्यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनात मूल्यसंस्कार, शिस्त आणि सामाजिक जाणीव रुजवण्याचे मोलाचे कार्य केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक विद्यार्थी आज विविध क्षेत्रात यशस्वी ठरत समाजात सकारात्मक योगदान देत आहेत.
समाजकारणाशी घट्ट नाते जपत विकास काकडे (सर) यांनी विविध सामाजिक उपक्रमांद्वारे नागरिकांमध्ये एकात्मता निर्माण केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, भगवान गौतम बुद्ध जयंती तसेच छत्रपती संभाजी महाराज जयंती यांसारख्या कार्यक्रमांचे यशस्वी आयोजन करून त्यांनी सामाजिक सलोखा आणि बंधुभाव दृढ केला. विशेषतः फलटण शहरात बुद्ध जयंती मिरवणुकीची परंपरा सुरू करण्यामध्ये त्यांचा मोलाचा सहभाग राहिला आहे.
प्रभाग क्रमांक १२ मधील शिक्षण, रस्ते, स्वच्छता, आरोग्य आणि युवकांसाठी सुविधा यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर त्यांनी सातत्याने लक्ष केंद्रित केले आहे. सर्व समाजघटकांशी स्नेहाने वागणारे, संयमी व विनम्र व्यक्तिमत्त्व म्हणून ते नागरिकांमध्ये लोकप्रिय आहेत. शिक्षक, युवक, महिला आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी ते नेहमीच तत्पर असतात.
त्यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभागातील नागरिक, मित्रपरिवार, सहकारी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. आगामी काळातही त्यांच्या कार्याला अधिक बळ मिळून त्यांनी फलटणच्या विकासासाठी नवे मानदंड प्रस्थापित करावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
साहस Times तर्फे आयु. विकास वसंतराव काकडे यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! 

धक्कादायक! रुग्णालयानं केली मृतदेहांची अदलाबदल, सातारा सिव्हिलमधील हलगर्जीपणा चव्हाट्यावर

0


Satara News :  साताऱ्यातील सिव्हिल रुग्णालयातील हलगर्जीपणा चव्हाट्यावर आला आहे. मृत्यूनंतरही माणसाला सन्मान मिळत नाही, अशी संतापजनक आणि अस्वस्थ करणारी घटना समोर आली आहे. वाई तालुक्यातील सोनगरवाडी येथील 26 वर्षीय आनंद ओव्हाळ आणि आरळे येथील 51 वर्षीय सुरेश खोमणे या दोघांचाही उपचारादरम्यान मृत्यू झाला. पण त्यानंतर जे घडलं, ते अक्षरशः अंगावर शहारे आणणारं आहे. रुग्णालय प्रशासनाने नातेवाईकांना चेहरा न दाखवता मृतदेह ताब्यात दिले. मात्र कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मृतदेहांची थेट अदलाबदल झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मृतदेहांची थेट अदलाबदल

कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे मृतदेहांची थेट अदलाबदल झाली आहे. इतकंच नव्हे, तर एका कुटुंबाने चुकीच्या मृतदेहावर अंत्यसंस्कारही उरकले. चिता पेटल्यानंतर हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मग पेटती चिता विझवण्याची वेळ नातेवाईकांवर आली. या घटनेमुळे कुटुंबीयांचा संताप अनावर झाला असून, रुग्णालय प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सिव्हिल हॉस्पिटलमध्ये गोंधळ निर्माण झाल्याने पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरु आहे. मात्र, मृत्यूनंतरही माणसाला सन्मान मिळणार नाही का? असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे.

रुग्णालय प्रशासनाने आम्हाला बॉडी दाखवण्यास नकार दिला, नातेवाईकांचा आरोप

या सर्व घटनेमध्ये रुग्णालय प्रशासनाने आम्हाला बॉडी उघडून दाखवण्यास नकार दिला. आम्ही ती बॉडी घेऊन वाईला गेलो आणि तिथे गेल्यावर आम्हाला कळलं की हे आमचे बॉडी नाही.आमचा सरळ आरोप आहे या रुग्णालयातील लोकांनी लोकांनी आमच्या बॉडीचा मर्डर केला आहे. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे असे नातेवाईक म्हणाले. सातारा जिल्हा रुग्णालयात सामान्य रुग्णाला न्याय मिळत नाही. आतापर्यंत ही दुसरी घटना आहे. बेजबाबदार पद्धतीने वरिष्ठ अधिकारी आणि या रुग्णालयाचे कर्मचारी काम करत आहे. पोलीस जिल्हा चलचित्रकांना वाचवण्याचं काम करतात का असा आमचा  सवाल आहे. जिल्हा शल्य चिकित्सकांनी जो भोंगळ कारभार केला आहे त्यानंतर आम्ही सिविल सर्जन हटाव हे ही आमची मागणी आहे. पहिली घटना घडली होती त्यामध्ये नातेवाईकांनी स्वतः आम्हाला चुकून दुसऱ्याची बॉडी घेऊन गेल्याचे घेऊन दिले होते. आत्ताची दुर्दैवी घटना घडली आहे त्यामध्ये पोस्टमार्टम करताना बॉडी वैद्यकीय अधिकाऱ्यांचे ताब्यात असते. त्यानंतर पोलिसांच्या ताब्यात बॉडी दिली जाते. त्यानंतर पोलीस नातेवाईकांच्या ताब्यात बॉडी देतात आणि सही घेतात. आमच्या रजिस्टर नुसार नातेवाईकांच्या सह्या आहेत. परंतु आम्ही या प्रकरणांमध्ये पोस्टमार्टम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश दिले आहेत. तिथं काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आम्ही चेहरा दाखवला असेल तर आपण घेतले आहे असे सांगत आहे.

आणखी वाचा



Source link

सातारा प्रकरणावरून महायुतीत तणाव; तुषार दोशी सक्तीच्या रजेवर, शिंदे गटाचा दबाव यशस्वी?

0
सातारा प्रकरणावरून महायुतीत तणाव; तुषार दोशी सक्तीच्या रजेवर, शिंदे गटाचा दबाव यशस्वी?


सातारा प्रतिनिधी :- सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान घडलेल्या कथित पोलिसी हस्तक्षेपाच्या प्रकरणाने राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडवली होती. या घटनेवरून महायुतीतील शिवसेना (शिंदे गट) आणि भाजप यांच्यातील तणाव उघडपणे समोर आला.
या निवडणुकीत भाजपने पोलिसांचा वापर करून सत्ता हस्तगत केल्याचा गंभीर आरोप शिवसेना आणि इतर मित्रपक्षांकडून करण्यात आला. या घटनेविरोधात शिवसेनेच्या मंत्र्यांनी आणि आमदारांनी विधिमंडळात आक्रमक भूमिका घेतली.
शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सभागृहात सांगितले की, पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने पकडून ओढले. या आरोपानंतर विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या निलंबनाचे निर्देश दिले.
दरम्यान, शिवसेनेच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन करत घोषणाबाजी केली. या घडामोडींमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नाराज झाले होते. त्यांनी ही नाराजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर व्यक्त केली.
मात्र, एकनाथ शिंदे यांनीही ठाम भूमिका घेत संबंधित घटनेत भाजप आमदार जयकुमार गोरे आणि पोलीस अधीक्षक दोशी यांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी स्पष्ट केले की, अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी कठोर निर्णय घेणे गरजेचे आहे.
शिंदे गटाची आक्रमक भूमिका
अधिवेशनादरम्यान आणि त्यानंतरही शिंदे गटाने या मुद्द्यावर आपली भूमिका कायम ठेवली. “जर मंत्र्यांनाच पोलिसांकडून धक्काबुक्की सहन करावी लागत असेल, तर सत्तेत राहण्याचा काय उपयोग?” असा संतप्त सवाल मंत्र्यांनी शिंदे यांच्यासमोर उपस्थित केला.
यानंतर शिंदे आणि फडणवीस यांच्यात उच्चस्तरीय बैठक झाली. शिंदे यांनी आपल्या गटातील नाराजी स्पष्ट शब्दांत मांडत पोलिसांवर कारवाईची मागणी केली.
मुख्यमंत्र्यांची सावध भूमिका
मुख्यमंत्री फडणवीस यांनी या प्रकरणात तातडीने निर्णय घेण्याऐवजी चौकशी करूनच पुढील कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले. त्यामुळे निलंबनाचा निर्णय तत्काळ घेण्यात आला नाही.
मात्र, वाढता तणाव आणि महायुतीतील मतभेद लक्षात घेता, परिस्थिती नियंत्रणात आणणे आवश्यक झाले होते.
तुषार दोशी सक्तीच्या रजेवर
शेवटी, प्रकरण चिघळू नये आणि सत्ताधारी मित्रपक्षाची नाराजी दूर व्हावी यासाठी पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना चौकशी पूर्ण होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयामागे केवळ प्रशासनिक कारणे नसून, महायुतीतील समन्वय राखण्याचा राजकीय हेतूही असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
महायुतीसमोर समन्वयाचे आव्हान
या संपूर्ण प्रकरणामुळे महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांमध्ये समन्वय राखणे हे आगामी काळात मोठे आव्हान ठरणार आहे.
साताऱ्याच्या घटनेने एक गोष्ट स्पष्ट केली—सत्तेत असतानाही अंतर्गत संघर्ष टाळणे महायुतीसाठी तितकेच महत्त्वाचे आहे जितके विरोधकांना सामोरे जाणे.

“रक्तदान हेच श्रेष्ठ दान” : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ व्या जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवाभावी उपक्रम

0
“रक्तदान हेच श्रेष्ठ दान” : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ व्या जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवाभावी उपक्रम

“रक्तदान हेच श्रेष्ठ दान” : डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा १३५ व्या जयंतीनिमित्त फलटणमध्ये सेवाभावी उपक्रम


फलटण : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त फलटण शहरात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. “रक्तदान हेच श्रेष्ठ दान” या उदात्त संदेशातून हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समिती 2026, फलटण यांच्या वतीने बुधवार, १ एप्रिल २०२६ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ या वेळेत हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. कार्यक्रमाचे ठिकाण डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती भवन (समाज मंदिर), मंगळवार पेठ, फलटण येथे निश्चित करण्यात आले आहे.
समाजातील गरजू रुग्णांना मदत करण्याच्या उद्देशाने आयोजित या रक्तदान शिबिरात युवक-युवती तसेच सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
भिमजयंतीच्या निमित्ताने सेवा, समता आणि बंधुतेचा संदेश देणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरणार आहे.

भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण नूतन कार्यकारिणी निवड : अध्यक्षपदी भीमराव लोंढे तर सरचिटणीसपदी केशव ठोंबरे

0
भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण नूतन कार्यकारिणी निवड : अध्यक्षपदी भीमराव लोंढे तर सरचिटणीसपदी केशव ठोंबरे

भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण नूतन कार्यकारिणी निवड : अध्यक्षपदी भीमराव लोंढे तर सरचिटणीसपदी केशव ठोंबरे


फलटण : भारतीय बौद्ध महासभा, सातारा जिल्हा (पूर्व) यांच्या वतीने भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुका कार्यकारिणीची निवड प्रक्रिया उत्साहात व यशस्वीरीत्या पार पडली.या निवडीत अध्यक्षपदी आयु. भीमराव लोंढे, सरचिटणीसपदी आयु. केशव ठोंबरे तर कोषाध्यक्षपदी आयु. राजकुमार रणवरे यांची निवड करण्यात आली.

नवीन कार्यकारिणीचे स्वागत भारतीय बौद्ध महासभा शाखा फलटण तालुक्याचे माजी अध्यक्ष आयु. महावीर भालेराव, माजी कोषाध्यक्ष आयु. विठ्ठल निकाळजे तसेच माजी प्रचार व पर्यटन उपाध्यक्ष आयु. रामचंद्र मोरे यांनी पुष्पगुच्छ देऊन केले. त्यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा देत संघटनेचे कार्य अधिक गतिमान व प्रभावी करण्याचे आवाहन केले.

या प्रसंगी राज्याचे संघटक, पुणे व सातारा प्रभारी तसेच समता सैनिक दलाचे असिस्टंट स्टाफ ऑफिसर आयु. दादासाहेब भोसले यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी बुद्ध, धम्म आणि संघ या त्रिरत्नाचा स्वीकार करून कार्य करण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, संघटनेचे काम करताना समता, बंधुता व करुणा या धम्ममूल्यांचा आधार घेतल्यास समाज परिवर्तनाची चळवळ अधिक बळकट होईल. तसेच केंद्र व राज्य पातळीवरील सूचना व आदेशांचे काटेकोर पालन करत संस्थेच्या प्रोटोकॉलनुसार जबाबदाऱ्या पार पाडणे ही प्रत्येक पदाधिकाऱ्याची नैतिक जबाबदारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेवटी म्हणाले की, तालुका कार्यकारणी मध्ये आजही निवडकच लोक दिसत आहेत. तरी सर्व तालुक्यातील गावांमधील व्यक्तींनाही तालुका कार्यकारणी मध्ये समाविष्ट करण्याच्या हेतूने सातारा जिल्हा पूर्व व नूतन कार्यकारिणीने जास्तीत जास्त सर्व समावेशक प्रतिनिधी घेऊन कार्यकारिणीचा समतोल साधण्याचा प्रयत्न करावा.

यावेळी सातारा जिल्हा (पूर्व) चे कार्यालयीन सचिव आयु. धनसिंग सोनवणे यांनी मार्गदर्शन करताना धम्म चळवळीला सामाजिक व शैक्षणिक परिवर्तनाशी जोडण्याचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांनी समता, न्याय आणि विवेकाधिष्ठित विचार यांचा प्रसार करण्यासाठी भारतीय बौद्ध महासभेच्या माध्यमातून अधिक संघटितपणे काम करण्याचे आवाहन केले. तसेच वंचित बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी सामाजिक आणि राजकीय स्तरावर सक्रिय सहभाग नोंदविण्याची गरज त्यांनी व्यक्त केली. सातारा येथील भीमाई स्मारक लवकर पूर्ण व्हावे यासाठी संघटनेने पुढाकार घ्यावा, असा प्रस्तावही त्यांनी मांडला.

यावेळी माजी अध्यक्ष आयु. शिवाजी सावंत यांनी नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा देताना धम्म चळवळ अधिक गतिमान करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी एकजुटीने व निःस्वार्थ भावनेने कार्य करावे, असे सांगितले. आपापसातील मतभेद विसरून प्रत्यक्ष कामावर भर देत सर्वांना सोबत घेऊन पुढे जाणे हीच खरी संघटनशक्ती असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष आयु. नानासाहेब मोहिते यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात नवीन कार्यकारिणीला शुभेच्छा देत, “भारतीय बौद्ध महासभा ही आपली मातृसंस्था आहे, याची जाणीव ठेवून संघटनेच्या ध्येय-धोरणांनुसार कार्य करणे आवश्यक आहे,” असे सांगितले. त्यांनी माजी कार्यकारिणीच्या कार्याचेही कौतुक करत नवीन पदाधिकाऱ्यांनी त्या कार्याला अधिक गती द्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी तालुका शाखेचे नूतन कोषाध्यक्ष आयु राजकुमार रणवरे म्हणाले, आपण सर्वांनी ही खूप मोठी जबाबदारी आमच्यावर सोपवलेली आहे ती जबाबदारी समर्थपणे आम्ही पार पाडण्याचा प्रयत्न करू. यामध्ये सर्वांना सोबत घेऊन काम करण्याचा आमचा मनोदय आहे. जास्तीत जास्त धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यावर आम्ही विशेष भर देऊ.

यावेळी बोलताना नूतन अध्यक्ष आयुब भीमराव लोंढे म्हणाले, भारतीय बौद्ध महासभा ही आपली मातृसंस्था आहे आणि या संस्थेच्या तालुका शाखेचे अध्यक्ष पद मला मिळाले आहे ही एक मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे तालुका भर धम्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने सर्वांना सोबत घेऊन नूतन कार्यकारणीचा विश्वास आत्मसात करून चांगलं काम उभं करण्याचा प्रयत्न केला जाईल. त्यासाठी वरिष्ठांचे मार्गदर्शन व सहकार्य याची आम्ही अपेक्षा करतो. धम्म चळवळ ही कोण आहे एकट्याच्या नव्हे तर सर्वांच्या सहकार्याने पुढे जाऊ शकते. त्यामुळे आपण सर्वांनी नवीन कार्यकारणीला सहकार्य करावे. एवढीच माफक अपेक्षा मी करतो. आणि सातारा जिल्हा पूर्व च्या वतीने आमच्यावर जो विश्वास दाखवला आहे त्याबद्दल आम्ही आपले कृतज्ञ आहोत.

नवीन कार्यकारणीची उद्घोषणा भारतीय बौद्ध महासभा सातारा जिल्हा पूर्वचे संस्कार सचिव आयु. सोमीनाथ घोरपडे यांनी केली.

नवीन कार्यकारिणीत संस्कार उपाध्यक्षपदी दादासो दाजी कांबळे, प्रचार व पर्यटन उपाध्यक्षपदी अरविंद निकाळजे, समता सैनिक दल संरक्षण उपाध्यक्षपदी आयु. दीपक सपकाळ, हिशोब तपासणीसपदी संपत माने, कार्यालयीन सचिवपदी प्रदीप जगताप, संस्कार सचिवपदी सचिन मोहिते व धीरज मोरे, प्रचार व पर्यटन सचिवपदी आयु. विजय जनार्दन लोंढे व सागर गोविंद काकडे, समता सैनिक दल संरक्षण सचिवपदी आयु. सुनील कांबळे व आयु. अनिकेत कांबळे, तसेच संघटकपदी आयु. सचिन रोकडे यांची निवड करण्यात आली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक राज्याचे ऑडिटर अरुण गायकवाड यांनी केले. या कार्यक्रमास ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या आयुनि कांताबाई काकडे, वंचित बहुजन आघाडीच्या सातारा जिल्हा महिला आघाडीच्या प्रमुख आयुनि चित्रताई गायकवाड, स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते व धम्मबंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर वर्धमान महावीर यांच्या 2624 व्या जयंतीनिमित्त सर्व बांधवाना मंगलमय हार्दिक शुभेच्छा!!!

0
जैन धर्माचे 24 वे तीर्थंकर वर्धमान महावीर यांच्या 2624 व्या जयंतीनिमित्त सर्व बांधवाना मंगलमय हार्दिक शुभेच्छा!!!

ईश्वर नाकारणाऱ्या धर्मात ‘देव’ आला कुठून? – जैन आचरणातील गूढ विरोधाभास

भारतीय धार्मिक परंपरांमध्ये जैन धर्म हा एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आणि तत्त्वज्ञानदृष्ट्या परिपक्व मानला जातो. कारण बहुतेक धर्म जिथे सर्वशक्तिमान, सृष्टीचा निर्माता आणि नियंता असलेल्या ईश्वरावर आधारित आहेत, तिथे जैन तत्त्वज्ञान स्पष्टपणे या संकल्पनेला नाकारते.

महावीर यांनी मांडलेल्या तत्त्वज्ञानानुसार विश्व अनादी आणि अनंत आहे. त्याला कोणताही निर्माता नाही. प्रत्येक जीव स्वतःच्या कर्मांचा कर्ता आहे आणि त्याचे परिणामही त्यालाच भोगावे लागतात. या चौकटीत ईश्वरासाठी कोणतीही जागा राहत नाही.ना सृष्टीकर्ता, ना नियंता, ना कृपादाता पण इथेच एक महत्त्वाचा प्रश्न उभा राहतो: जर जैन धर्म ईश्वर नाकारतो, तर जैन मंदिरांमध्ये ‘देव’ कोण आहेत? आणि त्यांची पूजा का केली जाते?

जैन तत्त्वज्ञानात “देव” ही संज्ञा पारंपरिक अर्थाने ईश्वरासाठी नसून, ‘तीर्थंकर’ किंवा ‘अरिहंत’ यांच्यासाठी वापरली जाते. हे ते व्यक्तिमत्त्व आहेत ज्यांनी आत्मज्ञान प्राप्त केले, कर्मबंधनातून मुक्तता साधली आणि मोक्ष प्राप्त केला. त्यामुळे ते पूजनीय आहेत पण ते कृपादाता किंवा नियंते नाहीत. ते केवळ आदर्श आहेत, मार्गदर्शक आहेत: “असे व्हा” असे सांगणारे. तत्त्वज्ञानाच्या पातळीवर ही भूमिका अत्यंत सुसंगत आणि तर्काधिष्ठित आहे. मात्र, प्रत्यक्ष धार्मिक आचरणाकडे पाहिले, तर वेगळीच चित्र दिसते.

आज अनेक जैन मंदिरांमध्ये भक्त आरती करतात, अभिषेक करतात, नवस बोलतात आणि आपल्या इच्छा व्यक्त करतात. व्यवसायात यश, आरोग्य, संकटातून सुटका यासाठी तीर्थंकरांना साकडे घातले जाते. म्हणजेच, जिथे तत्त्वज्ञान सांगते की “कोणीही तुमचे नशीब बदलू शकत नाही,” तिथे आचरण मात्र सांगते की “देव माझे नशीब बदलेल.”
हा केवळ विसंगतीचा मुद्दा नाही, तर तत्त्वज्ञान आणि आचरण यांच्यातील ताण स्पष्ट करणारा नमुना आहे.
हा विरोधाभास का निर्माण होतो?
या प्रश्नाचे उत्तर मानवी मानसिकतेत आणि सामाजिक रचनेत दडलेले आहे.

१. मानसिक गरज आणि असुरक्षितता
माणूस स्वभावतः अनिश्चिततेपासून घाबरतो. जीवनातील अनपेक्षित घटना, दुःख, अपयश यांना सामोरे जाताना त्याला एखाद्या उच्च शक्तीचा आधार हवा असतो. स्वतःच्या कृतींची पूर्ण जबाबदारी स्वीकारणे कठीण वाटते. त्यामुळे “देव” ही कल्पना मानसिक आधार बनते आणि जेव्हा तत्त्वज्ञान ती नाकारते.
२. परंपरेचा प्रभाव
भारतीय समाजात पूजा, विधी, कर्मकांड यांची परंपरा अत्यंत खोलवर रुजलेली आहे. कोणताही धर्म या सांस्कृतिक पायाभूत रचनेपासून पूर्णपणे वेगळा राहू शकत नाही. त्यामुळे जैन धर्मातही हळूहळू पूजाविधी आणि देवतासदृश आचरण विकसित झाले.
३. संस्थात्मक आणि आर्थिक रचना
मंदिरे, उत्सव, पूजाविधी यांभोवती एक सामाजिक आणि आर्थिक व्यवस्था तयार होते. ही व्यवस्था टिकवण्यासाठी “देव” ही संकल्पना प्रभावी ठरते. ती लोकांना आकर्षित करते, जोडून ठेवते आणि धार्मिक व्यवहारांना गती देते.
४. ऐतिहासिक रूपांतरण
हा प्रकार केवळ जैन धर्मापुरता मर्यादित नाही. गौतम बुद्ध यांनीही ईश्वर संकल्पनेला महत्त्व दिले नाही, पण पुढे त्यांच्या अनुयायांनी त्यांनाच देवत्व दिले. म्हणजेच, कालांतराने तत्त्वज्ञानाचे लोकधर्मात रूपांतर होताना भावनिक आणि प्रतीकात्मक घटक वाढतात.
तत्त्वज्ञान विरुद्ध आचरण : एक सार्वत्रिक संघर्ष
या विश्लेषणातून एक मूलभूत सत्य समोर येते: धर्म कितीही तर्कसंगत असला, तरी तो शेवटी मानवी भावनांच्या, भीतीच्या आणि सामाजिक गरजांच्या प्रभावाखाली बदलतो.
तत्त्वज्ञान “स्वावलंबन” शिकवते, पण आचरण “आश्रय” शोधते.
तत्त्वज्ञान “जबाबदारी” देतं, पण मन “सुटका” शोधतं.
नास्तिक दृष्टीकोनातून निष्कर्ष
या संपूर्ण प्रक्रियेचा नास्तिक दृष्टीकोनातून विचार केला, तर एक स्पष्ट निष्कर्ष समोर येतो:
“देव” ही कोणतीही वस्तुनिष्ठ सत्यता नसून, ती मानवी मनाची निर्मिती आहे. भीती, असुरक्षितता आणि परंपरेतून घडलेली एक संकल्पना.
जैन धर्माने ईश्वर नाकारला, पण अनुयायांनी पुन्हा “देव” निर्माण केला. हे दाखवते की देव हा बाह्य वास्तव नसून, मानवी गरजांचा प्रतिबिंब आहे.
म्हणूनच, नास्तिक भूमिका असे सांगते: देव नसतो. ना भूतकाळात, ना वर्तमानात, ना भविष्यात.
माणूस स्वतःच्या बुद्धीने, विवेकाने आणि कृतीनेच आपले आयुष्य घडवतो.आणि जेव्हा तो ही जबाबदारी पूर्णपणे स्वीकारतो, तेव्हाच तो खऱ्या अर्थाने मुक्त होतो.

आयु.सोमीनाथ घोरपडे, संस्कार सचिव
भारतीय बौध्द महासभा, सातारा जिल्हा (पूर्व)
मोबाईल नं. 9284658690

नातीच्या आगमनाचे अनोख्या पद्धतीने स्वागत : आजोबांचा ‘अनित्या’च्या नावे एक लाख रुपयांची ठेव

0
नातीच्या आगमनाचे अनोख्या पद्धतीने स्वागत : आजोबांचा ‘अनित्या’च्या नावे एक लाख रुपयांची ठेव

नातीच्या आगमनाचे अनोख्या पद्धतीने स्वागत : आजोबांचा ‘अनित्या’च्या नावे एक लाख रुपयांची ठेव करण्याचा धम्माधिष्ठित क्रांतिकारी निर्णय


फलटण : घरात लेकराचं आगमन म्हणजे केवळ आनंदाचा क्षण नसतो, तर तो धम्म, करुणा आणि समतेच्या मूल्यांना नव्याने उजाळा देणारा मंगल प्रसंग असतो. अशीच धम्ममय अनुभूती भारतीय बौद्ध महासभा फलटण तालुका शाखेचे माजी कोषाध्यक्ष आयु. विठ्ठल निकाळजे यांच्या कुटुंबात अनुभवायला मिळाली. त्यांचे सुपुत्र आयु. विजय व स्नुषा आयु. रजनी यांना कन्यारत्न प्राप्त झाले असून, या चिमुकलीचे ‘अनित्या’ असे नामकरण करत बौद्ध धम्मपरंपरेनुसार अत्यंत हर्षोल्हासात व पुष्पवृष्टीत तिचे स्वागत करण्यात आले.

या सोहळ्याला बौद्धाचार्य आयु. महावीर भालेराव यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या हस्ते बुद्धपूजा व धम्मविधी पार पडत, त्रिशरण-पंचशीलाच्या साक्षीने वातावरण धम्ममय झाले. हा सोहळा केवळ स्वागताचा नव्हे, तर समता, करुणा आणि प्रज्ञेच्या मूल्यांचा जागर करणारा ठरला.

या प्रसंगी समता सैनिक दलाचे असिस्टंट ऑफिसर, राज्य संघटक व सातारा-पुणे जिल्हा प्रभारी आयु. दादासाहेब भोसले, सातारा जिल्हा पूर्वचे संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे, तसेच आयु. बाबासाहेब जगताप, आयु. रामचंद्र मोरे, आयु. बजरंग गायकवाड, आयु. आनंद जगताप, ऍड. चंद्रशेखर मोरे यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.

आपल्या मनोगतात बौद्धाचार्य महावीर भालेराव यांनी धम्मातील समतेचा मूलभूत विचार स्पष्ट करत सांगितले की, “धम्मामध्ये स्त्री-पुरुष असा कोणताही भेद नाही. प्रत्येक जीवाला समान मान देणारा धम्मच खऱ्या अर्थाने मानवतेचा मार्ग दाखवतो. निकाळजे परिवाराने भीम कन्येचे स्वागत करून या समतेच्या विचाराला कृतीत उतरवले आहे.”

संस्कार सचिव सोमीनाथ घोरपडे यांनी मुलीच्या जीवनप्रवासातील त्याग, समर्पण आणि संघर्ष यांचे प्रभावी चित्रण करत सांगितले की, “तथागत गौतम बुद्धांच्या माता महामाया पासून ते महाउपासिका मीराताई आंबेडकरांपर्यंत स्त्रियांनी समाज परिवर्तनात मोलाची भूमिका बजावली आहे. मुलगी ही करुणा, धैर्य आणि कर्तृत्वाची जिवंत साक्ष आहे. तिच्या स्वागताचा हा सोहळा म्हणजे धम्ममूल्यांचा सन्मान आहे.”

यावेळी आयु. दादासाहेब भोसले यांनी धम्माच्या प्रज्ञा आणि दूरदृष्टीचा दाखला देत मुलीच्या भविष्यासाठी आर्थिक नियोजनाचे महत्त्व अधोरेखित केले. त्यांच्या या मार्गदर्शनाचा स्वीकार करत आयु. विठ्ठल निकाळजे यांनी आपल्या नाती ‘अनित्या’च्या नावाने एक लाख रुपयांची ठेव करण्याची घोषणा केली. हा निर्णय केवळ आर्थिक नव्हे, तर धम्माच्या ‘प्रज्ञा व करुणा’ या तत्त्वांवर आधारलेला क्रांतिकारी उपक्रम ठरला.

आयु. बाबासाहेब जगताप यांनी मुलगी ही केवळ एका कुटुंबाची नव्हे, तर तीन कुटुंबांना जोडणारी सशक्त कडी असल्याचे सांगत, तिच्या माध्यमातून बुद्ध, धम्म आणि संघाचे विचार अधिक व्यापक होतील, असा विश्वास व्यक्त केला.

या सर्व मनोगतांनंतर आयु. विठ्ठल निकाळजे यांनी कृतज्ञता व्यक्त करत सांगितले की, “धम्माच्या विचारांनी प्रेरित होऊनच आम्ही हा सोहळा साजरा केला आहे. आमच्या नातीचे आयुष्य समतेच्या, करुणेच्या आणि प्रज्ञेच्या मार्गावर सुखी, समाधानी व कर्तृत्ववान व्हावे, हीच आमची मनापासून इच्छा आहे.”

कार्यक्रमाच्या शेवटी बौद्धाचार्य आयु. महावीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सरणतंय घेऊन या धम्ममय आणि प्रेरणादायी सोहळ्याची सांगता करण्यात आली. यावेळी विजय निकाळजे, रजनी निकाळजे, अजय निकाळजे, साळूताई निकाळजे, प्रशांत काकडे, अरविंद काकडे, शोभा काकडे, काजल काकडे, राजू झेंडे, रितेश झेंडे, रेश्मा झेंडे, साक्षी झेंडे, प्रांजली झेंडे, निलम बनसोडे, सागर भोसले, रेश्मा भोसले, वैभव मोरे, प्रथमेश अहिवळे, प्रथमेश काकडे उपस्थित होते.

शिखर शिंगणापूर यात्रा: इतिहास, परंपरा आणि भक्तीचा अद्वितीय सोहळा

0
शिखर शिंगणापूर यात्रा: इतिहास, परंपरा आणि भक्तीचा अद्वितीय सोहळा


फलटण प्रतिनिधी :- महाराष्ट्रातील शिखर शिंगणापूर हे सातारा जिल्ह्यातील माण (दहिवडी) तालुक्यात वसलेले एक ऐतिहासिक आणि धार्मिक स्थळ आहे. सातारा व सोलापूर जिल्ह्यांच्या सीमेवर असलेले हे गाव शंभू महादेव मंदिरामुळे विशेष प्रसिद्ध आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे हे खाजगी देवस्थान मानले जाते. इतिहासात नमूद केल्याप्रमाणे, दोन्ही छत्रपतींनी मंदिराला दान देऊन त्याची देखभाल केली होती.
सह्याद्रीच्या कुशीत वसलेले पवित्र स्थान
दहिवडी पासून सुमारे २० किमी अंतरावर आणि फलटण च्या आग्नेयेस वसलेले शिखर शिंगणापूर सह्याद्री पर्वतरांगांमध्ये आहे. शंभू महादेव डोंगरावर वसलेले हे मंदिर समुद्रसपाटीपासून सुमारे १,०५० मीटर उंचीवर आहे. मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठी सुमारे ४०० पायऱ्या चढाव्या लागतात, ज्यामुळे भाविकांना आध्यात्मिक अनुभवासोबत निसर्गसौंदर्याचाही आनंद मिळतो.
मंदिराची वैशिष्ट्ये
मंदिराच्या गाभाऱ्यात दोन शिवलिंगे असून ती शिव-पार्वतीचे प्रतीक मानली जातात. मंदिरात मोठ्या घंटा आहेत, त्यापैकी एक ब्रिटिशकालीन असल्याचे सांगितले जाते. मंदिराचे शिखर सूक्ष्म नक्षीकामाने सजलेले असून स्थापत्यकलेचा उत्कृष्ट नमुना आहे. परिसरात दीपमाळा असून पश्चिमेकडे अमृतेश्वराचे हेमाडपंथी मंदिर आहे.
ऐतिहासिक वारसा
शिखर शिंगणापूर हे यादव वंशातील सिंघणदेव महाराजांनी वसवले असल्याची परंपरा आहे. मालोजीराजे भोसले यांनी इ.स. १६०० मध्ये ‘पुष्करतीर्थ’ (सध्याचे शिवतीर्थ) बांधले. पुढे शाहू महाराज यांनी १७३५ मध्ये मंदिराचे पुनर्बांधकाम केले. मंदिराचा १९७८ मध्ये जीर्णोद्धार करण्यात आला.
चैत्र यात्रा आणि विवाह सोहळा
शिखर शिंगणापूरची प्रसिद्ध यात्रा गुढी पाडवा पासून चैत्र पौर्णिमा पर्यंत भरते. चैत्र शुद्ध अष्टमीला शंकर-पार्वती विवाह सोहळा हा यात्रेचा मुख्य आकर्षण असतो. यासाठी ५५० फूट लांबीचे पागोटे विणले जाते आणि ते महादेव व अमृतेश्वर मंदिरांच्या कळसांना बांधले जाते. मध्यरात्री मंगलाष्टकांच्या गजरात हा विवाह सोहळा पार पडतो.
मुंगी घाट कावड सोहळा – भक्तीची पराकाष्ठा
चैत्र शुद्ध द्वादशीला मुंगी घाटातून कावड आणण्याची परंपरा विशेष प्रसिद्ध आहे. सर्वात मोठी कावड ‘भुत्या तेल्याची’ मानली जाते. कठीण घाट चढताना भक्त “माहाद्या धाव” अशी हाक देत महादेवाला साद घालतात. कोणताही दोर न वापरता मानवी साखळीच्या सहाय्याने कावड वर नेली जाते. शेवटी पवित्र कऱ्हा संगमाचे पाणी अर्पण करून महादेवाचा अभिषेक केला जातो आणि यात्रेची सांगता होते.
निसर्ग, श्रद्धा आणि परंपरेचा संगम
शिखर शिंगणापूर हे केवळ धार्मिक स्थळ नसून निसर्गरम्य आणि शांत वातावरणामुळेही प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रासह दक्षिण भारतातून हजारो भाविक येथे दरवर्षी भेट देतात.

शिवसेनेशी पंगा महागात पडला, तुषार दोशी सक्तीच्या रजेवर, शिंदेंनी फडणवीसांना काय सांगितलं? वाचा

0


Satara ZP Election Rada Shivsena: सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवेळी भाजपकडून पोलिसी बळाचा वापर करुन सत्ता हस्तगत करण्यात आल्याचे प्रकरण चांगलेच गाजले होते. या घटनेविरोधात शिवसेनेच्या मंत्री आणि आमदारांनी अधिवेशनात आक्रमक भूमिका घेत साताऱ्याचे पोलीस अधीक्षक तुषार दोशी (Tushar Doshi) यांच्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली होती. शंभुराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी सभागृहात 10 पोलिसांनी आपल्याला कशाप्रकारे हातापायाला आणि कमरेला पकडून खेचले, याचा वृत्तांत सभागृहात सांगितला होता. यानंतर विधानपरिषदेच्या उपसभापति नीलम गोऱ्हे (Neelam Gorhe) यांनी थेट तुषार दोशी यांच्या निलंबनाचे निर्देश दिले होते. तसेच शिवसेनेच्या आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर बसून तुषारी दोशी यांच्याविरोधात घोषणाबाजी केली होती. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रचंड नाराज झाले होते. त्यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडे ही नाराजी बोलून दाखवली होती. मात्र, एकनाथ शिंदे यांनीही खमकी भूमिका घेत जयकुमार गोरे आणि तुषार दोशी यांच्या कृतीवर नेमकेपणाने बोट ठेवले होते. (Maharashtra Politics)

सातारा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या दिवशी जे काही घडलं ते शंभूराज देसाई यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावर घालत यावर तातडीने पक्ष म्हणून महायुतीत हे पुन्हा होऊ नये यासाठी कठोर भूमिका घेण्यात यावी, असे सांगितले होते. सभागृहात शिवसेनेने रणनीती ठरवत सातारा पोलीस अधीक्षकांना या सगळ्या गोंधळानंतर निलंबनाची निर्देश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सभागृहात दिले. त्यावर भाजपकडून नाराजी व्यक्त करण्यात आली. सभागृहात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हा विषय गंभीर असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सगळा प्रकार मांडला. मात्र मुख्यमंत्र्यांनी यावर चौकशी करूनच निर्णय घेतला जाईल असं सांगत निलंबनाची कुठलीही कारवाई होणार नाही हे एकप्रकारे स्पष्ट केले होते.

मुख्यमंत्र्यांची ही भूमिका पाहून पुन्हा एकदा एकनाथ शिंदें सोबत शिंदेंच्या मंत्र्यांची बैठक पार पडली. जर पोलिसांवर कारवाई होत नसेल आणि पोलिसांकडून मंत्र्यांना धक्काबुक्की केली जात असेल तर मंत्री म्हणून राहून काय फायदा? असा नाराजीचा सूर मंत्र्यांनी एकनाथ शिंदे यांच्यासमोर व्यक्त केला होता. या सगळ्यानंतर त्याच रात्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. एकनाथ शिंदे यांनी आपल्या मंत्र्यांची नाराजी देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर बोलून दाखवली. जर असंच होत राहिलं तर सत्ताधारी नेते आणि मंत्री यांच्यावर अशीच पोलिसांची दडपशाही राहील. त्यामुळे यावर निर्णय घ्यावा आणि कारवाई करावी, अशी बाजू एकनाथ शिंदेंकडून मांडण्यात आली. शेवटच्या दिवशी तरी हा निर्णय सभापती देतील, अशी अपेक्षा शिवसेनेला होती. मात्र, सभापतींनी कायदेशीर सल्ला घेऊन निर्णय दिला जाईल, असं म्हणत निर्णय राखून ठेवला होता.

Shivsena Shinde Camp: तुषार दोशींवर कारवाई कशी झाली, सक्तीच्या रजेवर कसे गेले?
 
 अधिवेशन संपल्यानंतर एकनाथ शिंदे, शंभूराज देसाई, दादा भुसे यांनी मुख्यमंत्र्यांच्या दालनात जाऊन पुन्हा एकदा आपली नाराजी बोलून दाखवली होती. त्यावर नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी “लोकप्रतिनिधीचा मान सन्मान ठेवला जाईल”,असा निर्णय तीन-चार दिवसात घेतला जाईल, असं त्यांना सांगितले. शिंदे शिवसेनेची नाराजी मात्र अधिवेशनानंतर सुद्धा कायम राहिली आणि विरोधकांनी सुद्धा सत्ताधारी महायुतीतील नाराजी नाट्यावर बोलायला सुरुवात केली.

हा वाद पुन्हा वाढू नये यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांमध्ये फोनवर चर्चा झाली. मात्र, हा वाद शांत करण्यासाठी आणि आपल्या सत्ताधारी मित्र पक्षाची नाराजी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री ज्यांच्याकडे गृह खात आहे त्यांना यावर तातडीने निर्णय घेणे आवश्यक होते.

कारण सातारा जिल्हा परिषद निवडणुकीवरून शिंदे शिवसेनेची खदखद वारंवार बाहेर येत होती. शिवाय आपल्या सत्ताधारी मित्रपक्षाकडून जबरदस्तीने पोलीस दबावाचा वापर करून भाजपने सत्ता स्थापन केल्याचा आरोप होत होता. फक्त शिवसेनाच नाही तर दुसरा सत्ताधारी पक्ष असलेल्या राष्ट्रवादीकडून सुद्धा आरोप केला जात होता. या विरोधात मोर्चा काढण्याचे नियोजन सुद्धा करण्यात आले होते. त्यामुळे भाजप पक्षाची प्रतिमा मलिन झाली. या सगळ्याचा विचार करता पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना चौकशी होईपर्यंत सक्तीच्या रजेवर पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. अध्यक्ष उपाध्यक्षांच्या निवडीनंतर सभापती व इतर निवडीमध्ये महायुती म्हणून दोन्ही पक्षांची साथ मिळावी आणि पुन्हा गोंधळ होऊ नये यासाठी सुद्धा भाजपकडून ही खेळी केल्याचे बोलले जात आहे.

आणखी वाचा

साध्या वेषातील 10 -10 पोलीस मला ओढत होते, मला जखम झाली; शंभुराज देसाईंनी सगळं सांगितलं, व्हीप तोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

आणखी वाचा



Source link

साताऱ्याच्या तासवडे MIDCतील केमिकल फॅक्ट्रीत स्फोट; काचा फुटल्या, दहा किलोमीटरचा परिसर हादरला

0


Satara Chemical Factory Blast : सातारा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. साताऱ्यातील तासवडे एमआयडीसीत केमिकल कंपनीत (Chemical Factory Blast) प्रचंड स्फोट झाल्याची घटना घडली आहे. हा स्फोट इतका भीषण होता कि या स्फोटानं दहा किलोमीटरचा परिसर हादरला. तर यात इमारतींच्या काचा देखील फुटल्याची माहिती आहे. स्फोट (Factory Blast)नेमका कशामुळे झाला याची माहिती अजून मिळाली नाही. मात्र स्फोट एवढा मोठा होता कि त्याने सर्वत्र भीतीचे वातावरण निर्माण झाला आहे. या स्फोटानंतर आग लागल्याची घटनाही घडली आहे.

Satara Chemical Factory Blast : स्फोटानंतर आगीच्या ज्वाला आणि परिसरात काळ्या धुराचे लोट

मिळालेल्या माहितीनुसार, घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्नीशामक दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. सध्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे कार्य सुरु आहे. अद्याप कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी कंपनीचं मोठं नुकसान झाल्याचा अंदाज आहे. कंपनीत मोठ्या प्रमाणात केमिकल असल्याने आगीने अधिक पेट धरला. सध्या हे केमिकल नेमकं कोणतं, स्फोट होण्यामागील नेमकं कारण काय? या सगळ्याचा पोलीस तपास करत आहे. स्फोटानंतर आगीनं रौद्रधारण केलं. त्यांनतर परिसरात आगीच्या ज्वाला आणि काळ्या धुराचे लोट आकाशात दिसत होते. हा आवाज ऐकून स्थानिक नागरिक घराबाहेर धावले. सुरुवातीला भूकंपाचा धक्का बसला की काय, अशी भीती अनेकांच्या मनात निर्माण झाली होती. अशातच आता तपासाअंती या अपघाताचे कारण समजू शकणार आहे.

Parner News : पारनेरच्या सुपा घाणेगाव येथील कंपनीला भीषण आग

पारनेर तालुक्यातील सुपा घाणेगाव येथील कंपनीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. सुपा औद्योगिक वसाहतीतील कंपनीला हि आग लागली आहे. व्यंकटेश पॉली असे या कंपनीचे नाव असून प्लास्टिकची ही कंपनी असल्याची माहिती आहे. सध्या अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाले असून आग विझविण्याचे काम सुरू आहे. कोणतीही जीवितहानी नसून आग कशामुळे लागली या संदर्भात स्पष्टता नाही. सध्या आग विझवण्याचे काम सुरु आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा



Source link