


Suspense Thriller Movies on Netflix : तुम्हाला सस्पेन्स थ्रिलर चित्रपट पाहायला आवडत असतील तर नेटफ्लिक्सवरील काही चित्रपट नक्की पाहायला हवे. यातील सस्पेन्स पाहून तुमचं डोकं चक्रावेल. या वीकेंडला ओटीटीवर काय पाहावं, असा विचार करत असाल तर यातील काही सिनेमे नक्की पाहा. वाचा नेटफ्लिक्सवरील टॉप १० सस्पेन्स थ्रिलर चित्रपटांची यादी.
हंसल मेहता दिग्दर्शित या चित्रपटात करीना कपूर खानची मुख्य भूमिका आहे. यात करीना एका १० वर्षांच्या मुलाच्या हत्येचा गूढ उकलण्याचा प्रयत्न करते. शेवटी जे सत्य समोर येतं, ते पाहून तुमचं डोकं चक्रावेल.
सुजॉय घोष दिग्दर्शित या चित्रपटात करीना कपूर, जयदीप अहलावत व विजय वर्मा हे कलाकार आहेत. या चित्रपटातील सस्पेन्स तुम्हाला शेवटपर्यंत खिळवून ठेवतो.
1995 साली आलेला हा हॉलीवूड क्लासिक थ्रिलर चित्रपट चुकवू नका. यातील शॉकिंग क्लायमॅक्स समजायला कदाचित तुम्हाला दुसऱ्यांदा चित्रपट पाहावा लागेल. या चित्रपटाचा लेखक व अभिनेत्याला ऑस्कर पुरस्कार देण्यात आला होता.
विशाल भारद्वाज दिग्दर्शित या सिनेमाची कथा इरफान खानसाठी लिहिण्यात आली होती. इरफानच्या निधनानंतर कथेत बदल करून तब्बूला मुख्य भूमिकेत घेण्यात आलं होतं. रॉ एजंट व देशभक्तीपर हा चित्रपट एकदा तरी नक्की पाहायला हवा.
या अंडररेटेड ब्रिटिश थ्रिलर सिनेमात मैत्री, गुन्हेगारी या गोष्टी पाहायला मिळतात. दोन मित्रांकडून एक चूक होते, ज्यामुळे त्यांचं आयुष्य बदलतं.
स्टीफन किंगच्या कथेवर आधारित या चित्रपटातील शॉकिंग सस्पेन्स पाहून तुम्ही थक्क व्हाल. यात एक पती पत्नीला मारायचा कट रचतो, पण नंतर भीती व पश्चातापामुळे जे घडलं ते पाहून तुम्ही चक्रावून जाल.
राजकुमार राव, हुमा कुरेशी व राधिका आप्टेचा हा सस्पेन्स थ्रिलर चित्रपट चुकवू नका. या ब्लॅख कॉमेडीत ऑफिस ड्रामा, मर्डर मिस्ट्रीदेखील आहे.
अॅडम सँडलर व जेनिफर अॅनिस्टन स्टारर या मर्डर मिस्ट्रीत सस्पेन्स व ह्युमर दोन्ही आहे. तुम्हाला मिस्ट्री थ्रिलर व कॉमेडी पाहायची असेल तर हा चित्रपट नक्की पाहा.
आरुषी तलवार हत्याकांडने देशभरात खळबळ उडाली होती. मेघना गुलजारचा ‘तलवार’ चित्रपट त्या घटनेवर आधारित आहे. यात इरफान खानची मुख्य भूमिका आहे. यातील सस्पेन्स पाहून तुमचं डोकं चक्रावेल.
हा हॉलीवूड मिस्ट्री थ्रिलर चित्रपट नक्की पाहा. डेविड फिंचरचा हा चित्रपट एका अशा महिलेची कथा आहे जी बेपत्ता होते आणि संशय तिच्या पतीवर येतो. पण जेव्हा सत्य समोर येतं, ते पाहून तुम्ही हादरून जाल. सगळे चित्रपट नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहेत.

Richest Toll Plaza In India : भारतातील महामार्गावरून प्रवास करताना आपल्याला टोल प्लाझाला पैसे द्यावे लागतात. तुम्हाला देशातील सर्वाधिक पैसे कमावणाऱ्या टोल नाक्याचे नाव माहितीये का? 364 घरं असलेले गाव जिथे 1761 लोकसंख्या आहे, अशा या छोट्याश्या गावातील टोल प्लाझा मालामाल आहे. देशातील सर्वाधिक कमाई करणारा टोल प्लाझा म्हणून तो अव्वल स्थानी आला आहे. या टोल प्लाझा आहे कर्जन, ज्याचं वार्षिक उत्पन्न हे सुमारे 500 कोटींच्या घरात आहे. हा टोल प्लाझा गुजरातमधील वडोदरा जिल्ह्यातील भरथानामधील आहे. विशेष म्हणजे हा टोल प्लाझा सलग चार वर्षांपासून 400 कोटींपेक्षा अधिक कमाई करत आहे. हा प्लाझा राष्ट्रीय महामार्ग-48 (National Highway No. 48) वर आहे जो सध्या दिल्ली आणि मुंबई दरम्यानचा मुख्य आणि एकमेव महामार्ग असून ते चेन्नईपर्यंत जातो. त्याशिवाय हा मार्ग उत्तर, पश्चिम आणि दक्षिणेकडील राज्यांना जोडतो. (gujrats karjan 364 houses in the village 1761 population indias richest toll plaza earns the highest in the country Gk in marathi)
हा महामार्ग तामिळनाडू आणि हरियाणा या ऑटोमोबाईल केंद्रांनादेखील जोडते. हे गुजरातमधील औद्योगिक शहरं आणि दहेज बंदराचे प्रवेशद्वार असून उत्तरेकडील त्याचा एक भाग दिल्ली-गुडगाव एक्स्प्रेसवे आणि दिल्ली-जयपूर महामार्ग म्हणून ओळखला जातो. पश्चिमेकडील दुसरा भाग अहमदाबाद-मुंबई महामार्ग म्हणून ओळखला जातो. कर्जन टोल प्लाझा वडोदरा आणि मुंबई दरम्यानच्या औद्योगिक रस्त्यावर असून गुजरात हे भारतातील एक प्रमुख रासायनिक आणि पेट्रोकेमिकल उत्पादन केंद्र आहे.
बहुतेक युनिट्स मध्य आणि दक्षिण गुजरातमध्ये आहेत. इथे पोहोचण्याचा मार्ग करंजनमधून जातो. यामुळे आणि दहेज बंदरातून होणाऱ्या मालवाहतुकीमुळे, प्लाझाला भेट देणारी सुमारे 65% वाहने व्यावसायिक असतात. यामध्ये कंटेनर, ट्रक आणि टँकर इत्यादींचा समावेश असणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) च्या वतीने प्रकाश अॅस्फाल्टिंग्ज अँड टोल हायवेज (PATH) इंडिया लिमिटेड या प्लाझाचे व्यवस्थापन करत असतात.
प्लाझाचे ऑपरेशन्स मॅनेजर रंगेश मिश्रा म्हणाले, ‘प्रवाशांसाठी, हा फक्त एक टोल प्लाझा आहे. मात्र आमच्यासाठी, तो उत्तर-दक्षिण वाहतूक सुरळीत ठेवण्याबद्दल महत्त्वाचा आहे.’ हा टोल प्लाझा 2009 मध्ये बांधण्यात आला असून गुजराती कारखाने मुंबई बंदरांवर त्यांचा माल वाहून नेण्यासाठी त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून ते चांगले काम करत आहे. गुजरातच्या रस्ते आणि इमारती विभागाचे सचिव पी आर पटेलिया म्हणाले की, औद्योगिक वाहतुकीव्यतिरिक्त, कर्जन प्रवासी वाहनांकडूनही टोल वसूल करत आहेत.
13 वर्षांपूर्वी तत्कालीन माजी खासदार विठ्ठल राडाडिया यांनी एका टोल प्लाझाच्या कर्मचाऱ्याशी झालेल्या वादात पिस्तूल रोखली होती. तेव्हा 13 वर्षांपूर्वी कर्जन टोल प्लाझा प्रसिद्धीच्या झोतात आला होता. या प्लाझावर तीन शिफ्टमध्ये 24 तास कर्मचारी काम करतात. चार व्यवस्थापकांच्या नेतृत्वाखाली 190 कर्मचारी आहेत. यापैकी सुमारे 80 कर्मचारी टोल वसूल करण्यात व्यस्त असतात. त्याचप्रमाणे, चालकांना मदत करण्यासाठी लेनमध्ये 33 कर्मचारी तैनात असतात. आयटीमध्ये पाच कर्मचारी काम करतात. बाकीचे लोक साफसफाई आणि देखभालीचे काम पाहतात.
इतके वर्दळ असूनही, या टोल नाक्यावर कधीही वाहतूक कोंडी होत नाही. या ठिकाणाहून वारंवार ये-जा करणारे वाहतूकदार प्रीतेश शाह म्हणाले की, प्लाझाच्या दोन्ही बाजूला 11 टोल लेन आहेत आणि FASTag सुरळीतपणे काम करते. त्यामुळे वाट पाहण्याची गरज नाही. एनएचएआयच्या फास्टॅग पायलट प्रकल्पासाठी कर्जन हे चाचणी स्थळ होते. येथे हिरवा कंदील मिळाल्यानंतर, राष्ट्रीय स्तरावर FASTag लाँच करण्यात आला. एनएचएआयचे माजी महाव्यवस्थापक आणि प्रकल्प संचालक एसपी शर्मा म्हणाले, “हा बराच काळ आमच्या स्टार टोल प्लाझांपैकी एक आहे. 2017 मध्ये, या प्लाझावर दररोज टोल वसूल 1 कोटी रुपयांपेक्षा जास्त झाला होता.

लोकांनी मुस्लिम आणि काश्मीर नागरिकांच्या विरोधात जाऊ नये अशी आमची इच्छा असल्याचं आवाहन हिमांशी नरवाल यांनी केलं आहे. पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात त्यांचे पती नौदल अधिकारी लेफ्टनंट विजय नरवाल शहीद झाले. विजय नरवाल आणि हिमांशी नरवाल पहलगाम येथे हनिमूनसाठी गेले होते. नरवाल यांचं बालपण जिथे गेलं त्या करनाल येथे आयोजित रक्तदान शिबिरात त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यादरम्यान त्यांची आई आणि पत्नी हिमांशी यांना अश्रू अनावर झाले.
“आम्हाला शांतता आणि न्याय हवा आहे. ज्यांनी त्यांच्यासोबत चुकीचं केलं आहे, त्यांना शिक्षा व्हायला हवी,” अशी मागणी हिमांशी नरवाल यांनी केली आहे. 22 एप्रिलला दहशतवादी झाला त्याच्या एक आठवडा आधीच दोघांचं लग्न झालं होतं. लग्नानंतर दोघेही पहलगाम येथे हनिमून साजरा करण्यासाठी गेले असताना, दहशतवाद्यांनी विजय नरवाल यांना गोळी घालून ठार केलं.
विजय नरवाल यांची बहीण सृष्टीने यावेळी रक्तदान शिबिरात सहभागी झालेल्यांचे आभार मानले. ती म्हणाली, “रक्तदान करण्यासाठी इतका मोठा प्रवास करुन येथे पोहोचलेल्या प्रत्येकाचे मी आभार मानते. आम्हाला अनेकांचे मेसेजही येत आहेत. लोक उत्साहाने या रक्तदान शिबिरात सहभागी झाले आहेत. सरकारनेही खूप काही केलं आहे”. करनाल येथील स्वयंसेवी संस्था नॅशनल इंटिग्रेटेड फोरम ऑफ आर्टिस्ट अँड अॅक्टिव्हिस्ट्सने (NIFAA) या रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं.
“ज्याने कोणी पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला केला आहे, त्याला सोडणार नाही. आम्ही हल्ल्यासाठी जबाबदार प्रत्येकाला शोधून काढू आणि ठार करु. 26 लोकांना ठार करुन आपण जिंकलो असं समजू नका. तुम्हाला प्रत्येकाला उत्तर देण्यासाठी भाग पाडलं जाईल,” असं अमित शाह यांनी आसामच्या बोडो समुदायाचे नेते उपेंद्र नाथ ब्रह्मा यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्याच्या आणि त्यांच्या नावावर एका रस्त्याला नाव देण्याच्या पार्श्वभूमीवर आयोजित कार्यक्रमात म्हटलं.
“प्रत्येकाला निवडून निवडून उत्तर दिलं जाईल. हे नरेंद्र मोदींचं सरकार आहे. कोणालाही सोडलं जाणार नाही. देशाच्या प्रत्येक इंचावरून दहशतवादाचे उच्चाटन करण्याचा आमचा निर्धार असून, तो पूर्ण होईल,” असंही ते म्हणाले आहेत.


IPL 2025 Rohit Sharma Record for Mumbai Indians: मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सविरूद्ध सामन्यात प्रथम फलंदाजी करताना २१७ धावा केल्या आहेत. या सामन्यात रोहित शर्मा आणि रायन रिकल्टन यांनी वादळी सुरूवात करत पहिल्या विकेटसाठी ११७ धावांची भागीदारी केली. रोहित शर्माने राजस्थानविरूद्ध अर्धशतक झळकावत मोठा विक्रम आपल्या नावे केला आहे. रोहितने अशी कामगिरी केली आहे जी आजवर मुंबई इंडियन्ससाठी कोणताच खेळाडू करू शकला नाही.
रोहित शर्माची आयपीएल २०२५ मध्ये सुरूवात चांगली झाली नाही. पण चेन्नई सुपर किंग्सविरूद्ध सामन्यात अर्धशतकी खेळी करत रोहितने आपला फॉर्म परत मिळवला. जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्सविरुद्ध रोहित शर्माने ५३ धावांची खेळी केली. रोहितने फक्त ३१ चेंडूत अर्धशतक झळकावले आणि हे त्याचे या हंगामातील तिसरे अर्धशतक आहे.
राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात रोहित शर्माने ३५ चेंडूत ५३ धावा केल्या. रोहितने ९ चौकारांसह ही खेळी केली होती. यासह, त्याने टी-२० क्रिकेटमध्ये मुंबई इंडियन्ससाठी ६ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. मुंबईसाठी ६ हजार धावांचा टप्पा गाठणारा रोहित शर्मा पहिलाच फलंदाज ठरला आहे. त्याने आतापर्यंत मुंबई इंडियन्ससाठी एकूण २३१ टी-२० सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने ६०१७ धावा केल्या आहेत. यामध्ये दोन शतकं आणि ३८ अर्धशतकांचा समावेश आहे.
रोहित शर्माला पहिल्या पाच सामन्यांमध्ये एकही अर्धशतक करता आले नाही परंतु गेल्या चार सामन्यांमध्ये या खेळाडूने तीन अर्धशतकं झळकावली आहेत. यादरम्यान रोहित शर्माने ७६*, ७०, १२, ५३ धावांच्या खेळी केल्या आहेत. राजस्थानविरुद्ध रोहित शर्माची सुरुवात संथ होती पण एकदा तो मैदानावर सेट झाला आणि त्याने त्याचे फटके खेळायला सुरुवात केली.
रोहित शर्माला पहिल्या पाच सामन्यांमध्ये एकही अर्धशतक करता आले नाही परंतु गेल्या चार सामन्यांमध्ये या खेळाडूने तीन अर्धशतकं झळकावली आहेत. यादरम्यान रोहित शर्माने ७६*, ७०, १२, ५३ धावांच्या खेळी केल्या आहेत. राजस्थानविरुद्ध रोहित शर्माची सुरुवात संथ होती पण एकदा तो मैदानावर सेट झाला आणि त्याने त्याचे फटके खेळायला सुरुवात केली. रोहितने जोफ्रा आर्चर आणि तीक्ष्णाविरुद्ध आक्रमक खेळी केली आणि सलामीवीर रायन रिकेल्टनबरोबर पहिल्या विकेटसाठी ११६ धावांची भागीदारी केली.


दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यानंतर पाकिस्तानला धडा शिकवण्याची मागणी देशभरातून करण्यात येत आहे. तसंच पाकिस्तानमधून बांगलादेश या राष्ट्राची निर्मित झाली त्याप्रमाणे पाकिस्तानचे अजून तुकडे करा अशी मागणी जोर धरू लागली आहे. पाहुयात यासंदर्भातला आमचा हा रिपोर्ट.
Source link

नेहमीच जेतेपदाच्या शर्यतीत असणारा संघ, चेपॉकचा बालेकिल्ला अभेद्य राखणारा संघ या सगळ्या गोष्टी यंदाच्या हंगामात धुळीस मिळाल्या. महेंद्रसिंग धोनीचा संघ असलेल्या चेन्नई सुपर किंग्सची अवस्था गलितगात्र अशी झाली आहे. कोणीही यावं आणि हरवून जावं अशी त्यांची गत झाली आहे. बुधवारी पंजाबविरुद्धच्या लढतीत पराभूत होताच चेन्नई सुपर किंग्सचं आव्हान संपुष्टात आलं. स्पर्धा महिनाभर बाकी असतानाच चेन्नईने गाशा गुंडाळला आहे.
चेन्नई सुपर किंग्सवर इतकी नामुष्की का ओढवली? बाकी संघांच्या तुलनेत चेन्नईचं चाक गाळात का रुतलं याचा घेतलेला आढावा.
टी२० क्रिकेटमध्ये पॉवरप्लेची सहा षटकं ही तुफान फटकेबाजीसाठीचा परवाना मानला जातो. ३० गज वर्तुळाच्या बाहेर केवळ दोनच क्षेत्ररक्षक ठेवण्याची मुभा क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाकडे असल्याने फलंदाजांना हात मोकळे करण्याची संधी मिळते. बाकी संघ पॉवरप्लेच्या षटकांमध्ये किमान ७० आणि जास्तीत जास्त ९० ते १०० धावा करण्याचा संघांचा कल आहे. या सहा षटकात जास्तीत जास्त धावा केल्या तर नंतरच्या षटकात धावगती मंदावली तर फार नुकसान होत नाही. पॉवरप्लेमध्ये भरपूर धावा करून मोठ्या धावसंख्येचा पाया रचण्याचं संघांचं धोरण असतं. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना पॉवरप्लेचा उपयोग करून घेणं आवश्यक असतं. चेन्नईला ना प्रथम फलंदाजी करताना ना धावांचा पाठलाग करताना पॉवरप्लेचा उपयोग करून घेता आलेला नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने १७ वर्षानंतर पहिल्यांदाच चेन्नईत चेन्नईला नमवण्याची किमया केली. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरुद्ध १९७ धावांचा पाठलाग करताना चेन्नईने पॉवरप्लेमध्ये केवळ ३० धावा केल्या आणि तीन विकेट्स गमावल्या. राजस्थानविरुद्ध चेन्नईला पॉवरप्लेमध्ये केवळ ४२ धावाच करता आल्या. दिल्लीविरुद्धही चेन्नईला पॉवरप्ले कामगिरी सुधारता आली नाही. चेन्नईने ४६ धावाच केल्या आणि ३ विकेट्सही गमावल्या.
फलंदाजीला अनुकूल खेळपट्ट्या, फलंदाजांना धार्जिणे नियम, दणकट आकाराच्या बॅट्स यामुळे आयपीएलमध्ये संघ १८०चा टप्पा सातत्याने ओलांडताना दिसत आहेत. दोनशे धावा करूनही त्या पुरेशा होत नाहीयेत. असं असताना चेन्नईला १८०पल्याडचं लक्ष्य गाठताच येत नाहीये. १७५-१८०चा टप्पा ओलांडला की चेन्नईविरुद्ध विजय पक्का असं समीकरण झालं आहे. मोठं लक्ष्य गाठण्यासाठी चांगली सलामी मिळणं, भागीदाऱ्या होत राहणं, हाणामारीच्या षटकात फिनिशर मिळणं आवश्यक असतं. चेन्नई सगळ्या आघाड्यांवर सपशेल अपयशी ठरलं.
महेंद्रसिंग धोनी हा आधुनिक क्रिकेटमधल्या सर्वोत्तम फिनिशरपैकी एक मानला जातो. मात्र यंदाच्या हंगामात चेन्नईला फिनिशर धोनीची उणीव भासते आहे. धोनी ४३ वर्षांचा आहे. गुडघ्याच्या दुखापतींनी त्याला सतावलं आहे. २० षटकं विकेटकीपिंग केल्यानंतरही पुन्हा फलंदाजी करणं धोनीसाठी कठीण आहे. चेन्नईचे प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग यांनीही याला दुजोरा दिला. १० षटकांमध्ये जास्त धोनी फलंदाजी करू शकत नाही. दुखापतींनी त्याच्या हालचालींवर मर्यादा आणल्या आहेत. त्यामुळे तो लवकर फलंदाजीला येत नाही असं खुद्द फ्लेमिंग यांनीच सांगितलं. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूविरूद्धच्या लढतीत धोनी नवव्या क्रमांकावर फलंदाजीला आल्याने प्रचंड टीका झाली होती. संघाला गरज असताना धोनी फलंदाजीला येत नसेल तर मग तो का खेळतोय असा सवाल चाहत्यांनी केला. चाळिशीपल्याड गेलेल्या धोनीने निवृत्त व्हावं असाही सूर उमटत आहे. सहाव्या-सातव्या क्रमांकावर फलंदाजीला येत सामना जिंकून देण्याचं कठीण काम धोनी वर्षानुवर्ष करत आहे पण यंदा मात्र त्याला सामने फिनिश करता येत नाहीयेत. ११, ६, ४, २६, १, २७, ३०, १६, ३०*, 0 अशी धोनीची कामगिरी आहे. चेन्नई संघासाठी ब्रँड धोनी महत्त्वाचा आहे. ऋतुराज गायकवाड कर्णधार असला तरी बाकी बाबतीत महेंद्रसिंग धोनीच केंद्रस्थानी दिसतो. चेन्नईने धोनीपल्याडचा विचार केलेलाच दिसत नाही. कर्णधार, यष्टीरक्षक आणि फलंदाज म्हणून धोनी संघात नसताना संघाचं प्रारुप काय असेल याचा अभाव चेन्नईच्या नियोजनात जाणवतो आहे.
टी२० क्रिकेट हा वेगवान आणि युवा खेळाडूंचा फॉरमॅट. या समजाला छेद देत चेन्नईने तिशी-पस्तिशीपल्याडचे खेळाडू घेऊन जेतेपदं पटकावली आहेत. अनुभवी खेळाडूंच्या फौजेला डॅडी आर्मी असं म्हटलं गेलं. ठराविक वय ओलांडल्यानंतर रिफ्लेक्सेस कमी होतात. प्रचंड उकाडा आणि आर्द्र वातावरणात खेळताना शरीर साथ देत नाही. दुखापतींच्या कुरबुरी सुरू असतात. अशावेळी संघातले बहुतांश खेळाडू तिशीपलीकडचे असणं अडचणीचं ठरू शकतं. डॅडी आर्मी खेळवणं फारसं लाभदायक ठरत नसल्याचं लक्षात आल्यावर चेन्नईने अचानक लहान वयाच्या खेळाडूंना संधी द्यायला सुरुवात केली. ३५प्लस हे प्रमाण झालेल्या चेन्नईने २०वर्षीय शाईक रशीदला पदार्पणाची संधी दिली. कर्णधार ऋतुराज गायकवाड दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेल्यानंतर चेन्नईने १७वर्षीय आयुष म्हात्रेला ताफ्यात समाविष्ट केलं आणि संधी दिली. दक्षिण आफ्रिकेचा २१वर्षीय युवा फलंदाज डेवाल्ड ब्रेव्हिसला संघात घेतलं आणि संधी दिली. सलग अनेक सामने गमावल्यानंतर चेन्नईने डोमेस्टिक क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या २३वर्षीय अंशुल कंबोजला संघात घेतलं. वय, अनुभव आणि कर्तृत्व या तिन्ही पातळ्यांवर लहान असणाऱ्या खेळाडूंकडून थेट जिंकून देण्याची अपेक्षा करण्याची चूक चेन्नईने केली. या सर्वच युवा मंडळींसाठी आयपीएलचं व्यासपीठ नवीन आहे. त्यांना इथे स्थिरावून बहरायला वेळ लागेल. अचानक युवा खेळाडूंना संधी देण्याऐवजी चेन्नईने टप्प्याटप्प्याने याआधीच त्यांना संघात समाविष्ट करायला हवं होतं. अंतिम संघाचं समीकरण पक्कं झाल्यावर चेन्नईचा संघ त्यात सतत बदल करत नाही. पण यंदा कुठल्याच खेळाडूला चांगली कामगिरी करता येत नसल्याने चेन्नईने तब्बल २१ खेळाडूंना रिंगणात उतरवलं पण तरीही त्यांचं नशीब बदललं नाही.
चेन्नईच्या चेपॉकची खेळपट्टी ही संथ, धीमी म्हणून ओळखली जाते. या खेळपट्टीवर भारंभार धावा होत नाहीत. फिरकीवर भर देऊन मधल्या षटकांमध्ये धावांना वेसण घालत विकेट्स पटकवायच्या हे चेन्नईचं धोरण असतं. यंदा मात्र चेन्नई संघव्यवस्थापनाला खेळपट्टीचा अंदाजच आलेला नाही. प्रतिस्पर्धी संघांनी चेपॉकच्या खेळपट्टीचा अचूक अभ्यास करून आक्रमण केलं. मधल्या षटकांमध्ये सामना चेन्नईच्या बाजूने झुकणार नाही याची आखणी प्रतिस्पर्धी संघांनी घेतली. बंगळुरूने २००८ नंतर पहिल्यांदाच चेपॉकवर सामना जिंकला. हैदराबादने पहिल्यांदाच चेपॉकवर विजय मिळवला. संथ, धीम्या खेळपट्टीचं बूमरँग चेन्नईवरच उलटलं.
फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक सगळ्याच आघाड्यांवर कोणीच समाधानकारक कामगिरी करू शकलेलं नाही. गेल्या हंगामात ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉनवे ही सलामीची जोडी यशस्वी झाली होती. यंदा चेन्नईने कॉनवेला वगळून रचीन रवींद्रला सलामीला आणलं. रचीन आणि ऋतुराज दोघेही धावांसाठी झगडताना दिसले. उशिराने कॉनवेला संधी देण्यात आली पण तोही प्रभाव पाडू शकला नाही. महाराष्ट्राच्या राहुल त्रिपाठीकडून चेन्नईला खूप अपेक्षा होत्या पण तो न्याय देऊ शकला नाही. दीपक हुड्डा आणि विजय शंकर या अनुभवी खेळाडूंनीही निराशा केल्याने चेन्नईला चांगली धावसंख्या उभारणं किंवा मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करणं दोन्ही अवघड झालं. गोलंदाजीत एका सामन्यानंतर नॅथन एलिसला बाजूला करण्यात आलं. सॅम करन आणि जेमी ओव्हर्टन दोघेही ना धावा रोखू शकले ना विकेट्स काढू शकले. मथिशा पथिराणाचा सामना कसा करायचा याचं तंत्र आता प्रतिस्पर्धी फलंदाजांनी शोधून काढल्यामुळे तोही निष्प्रभ वाटू लागला. मोठ्या उत्साहाने चेन्नईने लिलावात रवीचंद्रन अश्विनला ताफ्यात समाविष्ट केलं. कारकिर्दीच्या सुरुवातीच्या टप्प्यात चेन्नईचा हुकूमी एक्का असणारा अश्विन तशी कामगिरी करू शकला नाही. मुकेश चौधरीला संधी मिळाली तेव्हा फलंदाजांनी त्याच्या गोलंदाजांच्या ठिकऱ्या उडवला. नूर अहमदचा अपवाद वगळता चेन्नईसाठी गोलंदाजी हा कच्चा दुवा ठरला. क्षेत्ररक्षणात चेन्नईने हाराकिरी केली. झेल सोडणं, रनआऊट सोडणं, धावा वाचवणं या कशातही चेन्नई व्यावसायिक संघासारखी कामगिरी करू शकलं नाही. सगळे खेळाडू एकाच वेळी आऊट ऑफ फॉर्म जाण्याची ही पहिलीच वेळ असावी.

Pakistan Viral video : पाकिस्तानला स्वत:च्या घरात सुरू असलेलं गृहयुद्ध आवरता येत नाही. मात्र, तरीही पाकिस्तानी नेत्यांकडून भारताला पोकळ धमक्या देणं सुरूच आहे. अशातच आता सोशल मीडियावर पाकिस्तानमधील आर्मी आणि तिथल्या पोलिसांमधल्या वादाचा एक व्हिडिओ तुफान व्हायरल झाला आहे. त्यात पोलीस अधिकारी पाक आर्मीला धमकी देताना दिसत आहेत. नेमकं व्हायरल व्हिडीओमध्ये काय आहे? पाहूयात सविस्तर
पाकिस्तान आर्मी, पोलिसांमधल्या वादाचा व्हिडिओ समोर
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानमध्ये युद्ध होणार अशी चिन्ह सध्या दिसत आहेत. पाकिस्तानकडून अनेक धमक्या देखील येत आहेत. अशातच आता पाकिस्तान आर्मी आणि पाकिस्तान जिल्हा पोलिसांमधल्या वादाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत पाकिस्तानमधील एक पोलीस अधिकारी थेट पाकिस्तानी आर्मीलाच धमकी देताना दिसतो आहे.
पहलगाममध्ये झालेल्या हल्ल्यानंतर भारत प्रत्युत्तर देणार म्हणून पाकिस्तान चांगलाच घाबरला आहे. मात्र, तरीही पाकिस्तानी नेते आपल्या तोंडाला आवर घालायला तयार नसून वारंवार भारताला धमकी देत आहेत. मात्र, दुसरीकडे त्यांचीच आर्मी आणि पोलीस पाकड्यांना आरसा दाखवत आहेत. कारण पाकिस्तानमधली परिस्थिती एवढी बिकट झालीय की छोट्या-छोट्या गोष्टीवरुन पाकिस्तानी आर्मी आणि पोलिसांमध्येच झडप झाल्याचं पाहायला मिळत आहे. पाकिस्तानच्या मारवत पोलिसांनी थेट पाकिस्तानी आर्मीलाच धमकी दिली आहे.
#BREAKING: Major face-off between Pakistan Army and Pakistani Police breaks out at Laki Marwat of Khyber Pakhtunkhwa. Pashtun Police abuses and taunts Pak Army officers.
“Dimag Kharab Hai. Udhar Kashmir Bejo. Idhar Kya Kar Rahe Ho. Aapka General Bhi Aa Jaye Phir Bhi kuch Nahi… pic.twitter.com/SmOETRdJPX
— Aditya Raj Kaul (@AdityaRajKaul) April 30, 2025
भारतला धमकी देणारे पाकडे आपआपसात भिडले
भारतानं दिलेल्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान पोलीस दल आणि आर्मी चांगलीच बिथरली आहे. तसेच दुसरीकडे बलुचिस्तानने देखील पाकवर हल्ले सुरूच ठेवले आहेत. त्यामुळे पाकिस्तानी आर्मी आणि पोलिसांमध्ये वाद वाढल्याचं निवृत्त कर्नल सूर्यकांत चाफेकर यांनी म्हटलं आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओनंतर पाकिस्तानी पोलिसांनी पाकिस्तानी आर्मीच्या विरोधात बंड पुकारल्याचं दिसत आहे. आर्मीचा मेजर काय करणार, त्याच्यासारख्याला नोकरीला ठेवतो अशी धमकी एक पोलीस अधिकारी देतांना दिसत आहे. या व्हिडिओनंतर पाकिस्तानमध्ये गृहयुद्ध सारखी परिस्थिती निर्माण झाल्याचं चित्र आहे. त्यामुळे भारताला धमकी देणाऱ्या पाकिस्तानची सुरक्षा व्यवस्थाच वाऱ्यावर असल्याचं पाहायला मिळत आहे.