Friday, July 17, 2026
Home Blog Page 322

Trending News Live Updates: पुण्यात हॉर्न वाजवला म्हणून फ्रीस्टाईल हाणामारी; भारतीय सैन्याने पाकिस्तानवर खरंच गोळीबार केला का? माकडानं पळवला दीड लाखांचा आयफोन

0
Trending News Live Updates: पुण्यात हॉर्न वाजवला म्हणून फ्रीस्टाईल हाणामारी; भारतीय सैन्याने पाकिस्तानवर खरंच गोळीबार केला का? माकडानं पळवला दीड लाखांचा आयफोन



Today’s Viral Trending News Highlight’s : आपल्या आसपास अनेक घडामोडी घडत असतात ज्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर रोज व्हायरल होत असतात. हे व्हिडीओ व फोटो नेटकरी सोशल मीडियाद्वारे शेअर करत असतात. यामध्ये कधी सकारात्मक संदेश देणारे व्हि़डीओ असतात तर कधी एखाद्या मजेशीर घटनेचे व्हिडिओ असतात. काही व्हिडिओ पोट धरुन हसवणारे असतात तर डोळ्यात पाणी आणणारे असतात. अनेकदा अपघात किंवा भांडणाचे व्हिडीओही मोठ्या प्रमाणावर व्हायरल होतात. सोशल मीडियावर हे व्हिडिओ सतत चर्चेत असतात. आज सोशल मीडियावर चर्चेत असलेले व्हायरल व्हिडीओ पाहा एका क्लिकवर….



Source link

pakistan closes karachi lahore airspace amid war situation amid pahalgam terror attack

0
pakistan closes karachi lahore airspace amid war situation amid pahalgam terror attack


Pahalgam Terror Attack Update: पहलगाम हल्ल्याच्या घटनेनंतर भारत व पाकिस्तानमधले संबंध चिघळले आहेत. दोन्ही बाजूंनी एकमेकांना चोख प्रत्युत्तर देण्याची विधानं होत आहेत. पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा सहभाग असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर भारतानं त्यावर तीव्र निषेध नोंदवला आहे. तसेच, आता पाकिस्तानला अद्दल घडवणार असल्याची विधानं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापासून सर्वच केंद्रीय मंत्र्यांनी केल्यानंतर युद्धाची शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर तिकडे पाकिस्तानमध्ये मात्र वेगळ्याच हालचाली सुरू झाल्याचं दिसून येत आहे.

पाकिस्तानच्या आजी-माजी राष्ट्रप्रमुखांसह अनेक नेतेमंडळी व लष्करी अधिकाऱ्यांनी भारताला सडेतोड उत्तर देण्याची विधानं केली असताना दुसरीकडे काही नेत्यांकडून तणाव निवळण्यासंदर्भातही आवाहनं केली जात आहेत. अमेरिकेनंही दोन वेळा मध्यस्थी करून दोन्ही देशांना तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करण्याचं आवाहन केलं आहे. या पार्श्वभूमीवर येत्या काही दिवसांत नेमकं काय घडणार? याकडे अवघ्या जगाचं लक्ष लागलेलं असताना पाकिस्ताननं अचानक कराची व लाहौरची हवाई हद्द बंद केली आहे.

फक्त चार तास सुरक्षेचा प्रश्न?

इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तान सरकारनं कराची व लाहौरची हवाई हद्द संपूर्ण मे महिन्यात रोज पहाटे ४ ते सकाळी ८ वाजेपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आल्याचा दावा काही स्थानिक माध्यमांनी केला आहे. मात्र, दिवसाच्या नेमक्या त्याच वेळी आणि फक्त चार तासांसाठीच सुरक्षेचा मुद्दा कसा असू शकतो? असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

पहलगाम हल्ल्यानंतर भारतानं लागू केलेले निर्बंध व कारवाईच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्ताननंदेखील प्रत्युत्तरासाठी सज्ज असल्याचा दावा केला आहे. त्यामुळे दोन्ही देशांमधील संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. दुसरीकडे सीमाभागात पाकिस्तानकडून पहलगाम हल्ल्यापासून रोज शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं जात आहे. पण आर्थिक संकट आणि सिंधू जल करार रद्द झाल्यामुळे पाण्याचं दुर्भिक्ष्य अशा दुहेरी विवंचनेत सापडलेला पाकिस्तान युद्धासाठी खरंच सज्ज आहे का? यावर आता चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा

दरम्यान, कराची व लाहौरच्या हवाई हद्दी चार तासांसाठी बंद ठेवल्यामुळे प्रवासी विमान वाहतुकीवर फार मोठा परिणाम होणार नाही, असा दावा पाकिस्तानच्या हवाई उड्डाण विभागाकडून करण्यात आला आहे. या काळात सर्व प्रवासी विमाने पर्यायी हवाई मार्गाने वळवण्यात येतील, असं नमूद करण्यात आलं आहे.



Source link

पतीच्या दाढीला कंटाळून दिराबरोबर पळाली महिला; म्हणे, ‘…तर मला घटस्फोट नको पण मी दिरासोबतच राहीन’

0
पतीच्या दाढीला कंटाळून दिराबरोबर पळाली महिला; म्हणे, ‘…तर मला घटस्फोट नको पण मी दिरासोबतच राहीन’


Uttar Pradesh News: उत्तर प्रदेशमधील मेरठमध्ये एक अत्यंत विचित्र घटना घडली आहे. येथील एका व्यक्तीने मी दाढी करण्यास नकार दिल्याने माझी पत्नी मला सोडून गेली आहे, असा दावा केलाय. विशेष म्हणजे या व्यक्तीने केलेल्या दाव्यानुसार त्याची पत्नी त्याच्याच भावाबरोबर म्हणजेच दिराबरोबर पळून गेली आहे. माझा भाऊ दाढी ठेवत नाही त्यामुळे ती त्याच्याबरोबर पळून गेली, असं या व्यक्तीने म्हटलं असून आता या महिलेला दिराबरोबरच संपूर्ण आयुष्य राहायचं असल्याचीही माहिती समोर येत आहे.

सात महिन्यांपूर्वी झालेला निकाह

सात महिन्यांपूर्वी मोहम्मद सागीर नावाच्या तरुणाने अर्शी नावाच्या महिलेशी निकाह केला. निकाहदरम्यान सागीरने व्हाइट कुर्ता आणि पायजमा परिधान केला होता तर अर्शीने हिरव्या रंगाचा सूट आणि सोन्याचे दागिने घातलेले. सागीरने निकाह असल्याने दाढीही काढली होती. मात्र दाढी वाढल्यानंतर पत्नी आपल्याला सोडून जाईल याचा अंदाजही त्याला त्यावेळी नव्हता. दोघांमध्ये दाढीवरुन कथित वाद झाल्याचं सांगितलं जात आहे.

दाढीवरुन वाद

लग्नानंतर काही दिवसांमध्येच अर्शीने सागीरच्या दाढीसंदर्भात आक्षेप नोंदवण्यास सुरुवात केली. आर्शीने सागीरला दाढी काढून टाकण्यास सांगितलं. मात्र सागीरला त्याची दाढी फार प्रिय असल्याने त्याने या मागणीला अनेकदा नकार दिला. दाढीच्या मुद्द्यावरुन वारंवार या पती-पत्नीमध्ये खटके उडू लागले. अनेकदा या भांडणाचा आवाज अगदी घराबाहेरपर्यंत यायचा. 

पत्नीचा दावा काय?

दिराबरोबर पळून गेलेल्या महिलेने आपण तो दाढी करत नसल्याने पळून गेलेलो नाही असं सांगितलं आहे. माझा पती लैंगिकदृष्ट्या कमजोर असल्याने मी त्याला सोडून पळाल्याचं महिलेने म्हटलं आहे.

दिरावर जडला जीव

याच कालावधीमध्ये अर्शीचा जीव तिचा दीर साबीरवर जडला. साबीर हा भावाच्या अगदी विरुद्ध होता. त्याला क्लिन शेव्ह ठेवायला आवडायचं. अर्शी आणि साबीरमधील जवळीक वाढत गेली आणि फेब्रुवारीमध्ये दोघे घर सोडून पळून गेले. अर्शी आणि साबीर एकमेकांसोबत पळून गेल्याचा सागीरचा आरोप आहे. 

दोघे माझी सुपारी देणार होते

सागीरने अर्शीला शोधण्याचा फार प्रयत्न केला. नंतर त्याने बराच दिवस ती परत येईल या आशेत गालवले. मात्र तीन महिन्यानंतरही त्याला पत्नीचा काहीच पत्ता न लागल्याने त्याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. “अर्शी माझ्या दाढीबद्दल सतत तक्रार करायची. तिने कौटुंबिक दबावाखाली माझ्याशी लग्न केलं. ती माझ्या छोट्या भावासोबत घर सोडून पळून गेली. त्यांच्यातील प्रेमळ बोलण्याच्या रेकॉर्डींग माझ्याकडे आहेत. या संवादामध्ये ते दोघे मला अन्नातून विष देण्याबद्दल किंवा माझी सुपरी देण्याबद्दल बोलत आहेत. मला बाजूला काढल्यास त्यांच्या लग्नाचा मार्ग मोकळा झाला असता,” असं सागीर म्हणाला आहे.

…तर मला घटस्फोट नको पण मी दिराबरोबरच राहीन

बुधवारी अर्शी तिच्या आईच्या घरी दाखल झाली. तिने आपल्याला सागीरबरोबर संसार करायचा नाही असं सांगितलं आहे. अर्शीने माझं लग्न शाबीरबरोबर लावून द्या अशी मागणी केली आहे. दाढीवरुन कोणताच वाद नव्हता. सागीर हा लैंगिकदृष्या सक्षम नसल्याचा दावा अर्शीने केला आहे. या आरोपामुळे दुखावलेल्या सागीरने पोलिसांसमोरच अर्शीला घटस्फोट दिला. अर्शीने सागीरकडून पोटगी म्हणून दिलेले पाच लाख परत करण्याची मागणी केली आहे. “त्याने अडीच लाख रुपये परत केले तर मी त्याला सोडून देईन आणि शाबीरबरोबर लग्न करेन. तो पैसे परत करणार नसेल तर मला घटस्फोट नको आहे. मी माझ्या दिराबरोबर आयुष्य लावेन,” असं अर्शीने म्हटलं आहे.





Source link

‘यूपीएससी’ परीक्षेचे स्वरुप बदला… अन्यथा फक्त ‘कोचिंगवाल्यां’चेच करियर होत राहील!

0
‘यूपीएससी’ परीक्षेचे स्वरुप बदला… अन्यथा फक्त ‘कोचिंगवाल्यां’चेच करियर होत राहील!



need of change in upsc exam youth waste time in upsc coaching classes ‘यूपीएससी’ परीक्षेचे स्वरुप बदला… अन्यथा फक्त ‘कोचिंगवाल्यां’चेच करियर होत राहील!



Source link

Palghar police force ranked first again in maharashtra, based on 100-day evaluation under the seven-point program

0
Palghar police force ranked first again in maharashtra, based on 100-day evaluation under the seven-point program



Palghar police force ranked first again in maharashtra, based on 100-day evaluation under the seven-point program | पालघर पोलीस दल राज्यात पुन्हा प्रथम, सात कलमी कार्यक्रमांतर्गत १०० दिवसांचे मूल्यमापन



Source link

prime minister shri narendra Modi inaugurates waves 2025 zws 70

0
prime minister shri narendra Modi inaugurates waves 2025 zws 70



prime minister shri narendra Modi inaugurates waves 2025 zws 70 | सर्जनशीलतेला साद; देशाच्या अर्थव्यवस्थेत रचनात्मकतेचा मोठा वाटा, ‘व्हेव्ह्ज’च्या उद्घाटन सोहळ्यात पंतप्रधानांना विश्वास



Source link

debate between insiders and outsiders in the film industry Actor Shah Rukh Khan’s opinion zws 70

0
debate between insiders and outsiders in the film industry Actor Shah Rukh Khan’s opinion zws 70



debate between insiders and outsiders in the film industry Actor Shah Rukh Khan’s opinion zws 70 | आतले आणि बाहेरचे हा वादच न पटणारा; अभिनेता शाहरूख खान याचे मत



Source link

maharashtra government decided to provide appropriate compensation to the heirs of sanitation workers zws 70

0
maharashtra government decided to provide appropriate compensation to the heirs of sanitation workers zws 70



maharashtra government decided to provide appropriate compensation to the heirs of sanitation workers zws 70 | सफाई कामगारांना अखेर न्याय; मृतांच्या वारसांना दुप्पट नुकसानभरपाई



Source link

More than three lakh houses vacant in Mumbai liases foras Annual report released zws 70

0
More than three lakh houses vacant in Mumbai liases foras Annual report released zws 70



More than three lakh houses vacant in Mumbai liases foras Annual report released zws 70 | मुंबईत तीन लाखांहून अधिक घरे रिक्त! ‘लायसेस फोरास’चा वार्षिक अहवाल जाहीर



Source link

Preparation for admission: Diploma courses after 12th प्रवेशाची तयारी : बारावीनंतर पदविका अभ्यासक्रम

0
Preparation for admission: Diploma courses after 12th प्रवेशाची तयारी : बारावीनंतर पदविका अभ्यासक्रम


सर्वसाधारणपणे पदविका अभ्यासक्रमासाठी दहावीनंतर प्रवेश मिळतो, मात्र असे काही पदविका कोर्सेस आहेत ज्यामध्ये फक्त बारावीनंतरच प्रवेश मिळतो आणि तोसुद्धा कोणतीही वेगळी प्रवेश परीक्षा न देता बारावीच्या बोर्डाच्या मार्कांआधारे. अशा पदविका अभ्यासक्रमांची माहिती करून घेऊया.

डिप्लोमा इन हॉटेल मॅनेजमेंट

बारावीनंतर हॉटेल मॅनेजमेंट क्षेत्रात करीअर करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना बारावीनंतर दोन मार्ग उपलब्ध आहेत. एक म्हणजे हॉटेल मॅनेजमेंट पदवी, ज्यासाठी बारावीनंतर देशपातळीवरील किंवा महाराष्ट्राची सीईटी परीक्षा द्यावी लागते आणि दुसरा मार्ग म्हणजे बोर्डाच्या मार्कांआधारे तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम. आर्ट्स, कॉमर्स , सायन्स किंवा व्होकेशनल यापैकी कोणत्याहीशाखेतून बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या पदविका कोर्ससाठी प्रवेश मिळतो. महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालयांमध्ये हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतात. या क्षेत्रात स्वयंरोजगार करण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांना हॉटेल मॅनेजमेंट डिप्लोमा पर्यंत शिक्षणही पुरसे ठरते.

सरफेस कोटिंग टेक्नॉलॉजी

कार, स्कूटर पासून रेफ्रीजरेटर पर्यंत कोणतीही वस्तू आकर्षक व चकचकीत करून ग्राहकांना मोहित करण्याचं काम सरफेस कोटिंग करतं. सरफेस कोटिंग चा उपयोग वस्तूंच्या पृष्ठभागाचे संरक्षण करणे , पृष्ठभाग गंजप्रतिबंधक बनवणे / उष्णता प्रतिबंधक बनवणे इ. विविध गोष्टींसाठी केला जातो. बारावीनंतर या विषयात तीन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम उपलब्ध आहे. संपूर्ण महाराष्ट्रात फक्त पुण्यातील डेक्कन एज्युकेशन संस्थेमध्ये हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. बारावी विज्ञान शाखेतून फिजिक्स, केमिस्ट्री व मॅथेमॅटीक्स या विषयांमध्ये किमान ३५ गुण मिळवून बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या संधीचा लाभ घेता येतो. हा तीन वर्षांचा कोर्स सॅन्डविच स्वरुपाचा असून यामध्ये दुसऱ्या वर्षात चार महिने व तिसऱ्या वर्षात चार महिने इंडस्ट्री मध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव घ्यावा लागतो. या काळात इंडस्ट्री स्टायपेंडही देते. हा अभ्यासक्रम शिकवण्यासाठी इंडस्ट्रीतील अनुभवी व्यक्ती असतात आणि या कोर्स ची फी सुद्धा अत्यंत माफक आहे. थिअरी बरोबरच आठ महिन्यांचा प्रत्यक्ष कामाचा अनुभव पदरी असल्याने हा कोर्स पूर्ण केल्यानंतर नामांकित कंपन्यांमध्ये रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध होतात त्याचबरोबरीने विद्यार्थ्यांना इंजिनीअरिंग डिग्री च्या कोणत्याही शाखेत थेट दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळतो व विद्यार्थी पुढे तीनच वर्षांत इंजिनीअरिंग डिग्री पूर्ण करतात. हा कोर्स पूर्ण करुन थोडा अनुभव गाठीशी बांधल्यावर विद्यार्थ्यांना उद्याोजकतेच्या संधीही उपलब्ध होतात. मुलींनाही या कोर्सला प्रवेश घेता येतो आणि त्याही या क्षेत्रात उत्तम करीअर करु शकतात. महाराष्ट्रातील पहिल्या औद्याोगिक पेंट बनवणाऱ्या कंपनीच्या मालक प्रतिभा भांबुरकर यांनीही याच कोर्स मधून आपले करीअर घडवले आहे.

डिप्लोमा इन फार्मसी

करोना महामारीच्या काळात जगभरात ज्या उद्याोगाची सर्वात जास्त भरभराट झाली तो उद्याोग म्हणजे फार्मसी अर्थात औषध निर्माण उद्याोग. ज्या उद्याोगात मंदी कधीच येत नाही त्या फार्मसी क्षेत्रात जाण्यासाठी बारावीनंतर दोन मार्ग उपलब्ध आहेत. एक म्हणजे फार्मसी पदवी, ज्यासाठी बारावीनंतर महाराष्ट्राची सीईटी परीक्षा द्यावी लागते आणि दुसरा मार्ग म्हणजे बोर्डाच्या मार्कांआधारे दोन वर्षांचा पदविका अभ्यासक्रम. विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना या कोर्ससाठी बारावीच्या मार्कांच्या आधारे प्रवेश मिळतो. महाराष्ट्रातील अनेक महाविद्यालयांमध्ये हा अभ्यासक्रम उपलब्ध आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना फार्मसी पदवीच्या दुसऱ्या वर्षात प्रवेश घेता येतो. हा पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर विद्यार्थ्यांना स्वत:चे मेडिकल शॉप सुरु करता येते किंवा हॉस्पिटलच्या फार्मसी मध्ये नोकरी मिळू शकते. औषध कंपन्यांच्या मार्केटिंग व विक्री विभागातही या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या चांगल्या संधी मिळू शकतात.

बारावीनंतरच्या या तिन्ही पदविका अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया बारावीच्या निकालानंतर थोड्याच दिवसात सुरू होईल. यासाठीची जाहिरात http://www.dtemaharashtra.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध होईल. अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची बारावीच्या बोर्डाच्या मार्कांआधारे मेरीट लिस्ट तयार केली जाते. व नंतर प्रवेशासाठी कॅप राऊंड होतात.

त्यानंतर विद्यार्थ्यांचे मार्क आणि त्यांनी दिलेले महाविद्यालयांचे विकल्प यांची सांगड घालून अंतिम प्रवेश निश्चित केला जातो.

vkvelankar@gmail.com



Source link