





Mukesh Ambani On Entertainment Revolution: भारताला मीडिया आणि मनोरंजन क्षेत्राचं आंतरराष्ट्रीय केंद्रबिंदू होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही असं रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी म्हटलं आहे. आपला कंटेंट, लोकसंख्या आणि तंत्रज्ञानाच्या आधेर भारत लवकरच या क्षेत्रात मक्तेदारी करेल असंही ते म्हणाले आहेत. मुकेश अंबानी मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेंशन सेंटरमध्ये आयोजित वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट (WAVES) 2025 मध्ये बोलत होते. पुढील दशकापर्यंत भारतीय मीडिया आणि मनोरंजन क्षेत्र चारपटींनी वाढ नोंदवेल असा विश्वास त्यांनी बोलून दाखवला आहे. म्हणजेच 100 अरब डॉलरपेक्षा मोठा आकडा गाठू शकतो. सध्या मार्केट 28 अरब डॉलर्सचं आहे.
मुकेश अंबानी यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलं. मोदीजींच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली भारत एक आघाडीचा डिजिटल राष्ट्र बनला आहे. कथा सांगण्याची शैली आणि डिजिटल तंत्रज्ञान यांच्या संगमामुळे भारताच्या मनोरंजन आणि सांस्कृतिक प्रभाव जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचत आहे. एआय आणि इमर्सिव्ह तंत्रज्ञानाच्या सहाय्याने कथा पूर्वीपेक्षा अधिक आकर्षक बनवू शकतात. तसंच ते विविध भाषा, देश आणि संस्कृतींमधील प्रेक्षकांपर्यंत लवकरात लवकर पोहोचू शकतात. मला विश्वास आहे की भारतातील अति-प्रतिभावान तरुण जागतिक मनोरंजन क्षेत्रावर राज्य करतील.
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उल्लेख करत ते म्हणालेकी, “AI आता मनोरंजनासाठी ते करत आहे, जे 100 वर्षांपूर्वी सायलेंट कॅमेराने केलं होतं. तेदेखील लाखपटीने उत्तम असेल. जगातील लोक मागील 5 हजार वर्षांपासून गोष्टी ऐकत आहे. कंटेंट आणि लोकसंख्येनंतर भारताची तिसरी ताकद तंत्रज्ञान आहे. भारतात 1.2 बिलियन मोबाईल फोन युजर्स आहेत. याचा अर्थ 1.2 बिलियन स्क्रीन आहेत, ज्यांचा उपयोग मनोरंजनासाठी केला जाऊ शकतो. जिओने हाय-स्पीड इंटरनेट डेटा परवडणारा बनवून भारतातील डिजिटल आणि मनोरंजन क्रांतीचा पाया रचला आहे. 5G वर बांधलेली आमची जागतिक दर्जाची डिजिटल पायाभूत सुविधा लवकरच 6G पर्यंत वाढवली जाईल.”
मुकेश अंबानी पुढे म्हणाले की, “आम्ही जागतिक स्तरावर मनोरंजन क्षेत्रातील दिग्गजांची बरोबरी करण्याच्या आणि त्यांच्या पुढे जाण्याच्या महत्त्वाकांक्षेने जियोहॉटची सुरुवात केली आहे. हे भारत आणि परदेशातील सर्वोत्तम प्रतिभांना एक व्यासपीठ उभारत आहे. आम्ही प्रेक्षकांच्या संख्येचे रेकॉर्ड तोडले आहेत, आयपी स्ट्रीमिंगमध्ये क्रांती घडवली आहे आणि इमर्सिव्ह, बहुभाषिक, इंटरअॅक्टिव्ह क्रीडा दृश्यांचे जागतिक मानक देखील बदलले आहेत. आणि ही फक्त सुरुवात आहे. डिस्नेसोबत जिओची भागीदारी डिजिटल स्टोरी-टेलिंगमध्ये एका नवीन युगाची सुरुवात आहे.”
त्यांनी सांगितलं की, “वेव्ह्स इनोव्हेशन, संस्कृति आणि सहयोगाचा आंतरराष्ट्रीय केंद्रबिंदू होण्यास तयार आहे. आपला 5 हजारांहून अधिक वर्षाचा इतिहास आहे. आपल्याकडे गोष्टी, कथांचा मोठा खजिना आहे. रामायण आणि महाभारतापासून आपल्याकडे डझनभर भाषांमध्ये लोककथा आणि क्लासिक्स आहेत. यामध्ये मूल्य, बंधूता, शौर्य, प्रेम आणि सुंदरता आहे जे जगभरातील लोकांच्या मनाला स्पर्श करतात. कोणताही देश भारताच्या कथा सांगण्याच्या ताकदीला स्पर्धा देऊ शखत नाही”.
पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत ते म्हणाले की, “आम्ही सर्व पीडित कुटुबांप्रती संवेदना व्यक्त करतो. इतक्या कठीण काळातही पंतप्रधानांनी येथे येणं देशासाठी संदेश आहे. मोदीजी शांतता, न्याय आणि माणुसकीच्या शत्रूंविरोधातील या लढाईत तुम्हाला 145 कोटी भारतीयाचं समर्थन आहे. भारताचा विजय निश्चित आहे”.

एक आई आपल्या लहान मुलाला घेऊन रस्त्याकडेने जात होती. तेव्हा एका भरधाव कारने आईला उडवलं आहे. हा सगळा घटनाक्रम कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
Source link

Monsoon 2025 : उत्तरेकडील राज्यांपासून ते अगदी दक्षिण भारतापर्यंत कमीजास्त प्रमाणात उकाडा नागरिकांच्या अडचणी वाढवत आहे. काही भागांमध्येतर, पारा 44 अंशांपर्यंत पोहोचल्यानं ही होरपळ कधी थांबणार? हाच प्रश्न अनेकांनी उपस्थित करण्यास सुरुवात केली आहे. याचं उत्तर हवामान विभागाच्या नुकत्याच करण्यात आलेल्या निरीक्षणातून समोर आलं असून, मान्सूनच्या रुपात ही आनंदवार्ता लवकरच दार ठोठावणार असल्याची वातावरणनिर्मिती होताना दिसत आहे.
हवामान अभ्यासकांच्या निरीक्षणानुसार यंदा वेळेआधीच मान्सून निकोबार बेटांवर दाखल होणार आहे. अंदमान आणि निकोबार बेटांवर मागील काही दिवसांपासून ढगांच्या हालचाली वेगानं सुरू असून वाऱ्याच्या वेगातही सातत्यपूर्ण बदल पाहायला मिळत असल्यानं यंदा मान्सून वेळेआधीच दाखल होणार असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
अंदमान आणि निरोबार बेटांवर दाखल होणाऱ्या मोसमी वाऱ्यांच्या धर्तीवर देशातील मान्सूनचं प्रमाण आणि त्याचा वेग याविषयीचे अंदाज वर्तवण्यात येतात. सहसा मे महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये मोसमी पावसाच्या आगमनाची अपेक्षा असते. यावेळी मात्र जणू तो सर्वांचीच विनवणी ऐकत आठवडाभर आधीच दाखल होणार असल्याची चिन्हं आहेत. अगदी तारखेचाच विषय म्हणावा तर, यंदा 10 मे पर्यंत मोसमी पाऊस अंदमान निकोबार इथं दाखल होऊ शकतो.
नैऋत्य मोसमी वाऱ्यांची चर्चा असतानाच दक्षिण- पश्चिम मोसमी वारे देशात 15 मे च्या जवळपास दाखल होऊन ऑक्टोबरच्या अखेरपर्यंत काढता पाय घेतात. या वाऱ्यांच्या प्रभावामुळं देशात सर्वाधिक पर्जन्यमानाचा कालावधी पाहायला मिळतो. तर, ऑक्टोबरनंतर थेट डिसेंबरपर्यंत ईशान्य मोसमी वाऱ्यांमुळं देशात पावसाची सुरुवात होते.
मे महिन्याच्या अखेरीस हवामानात अचानक बदल होतात. जसे की, ढगाळ वातावरण, विजा चमकणे आणि जोरदार वारे वाहणे हा बदल पू्र्वमोसमी पावसाची चाहूल देणारा असतो.


