Thursday, June 25, 2026
Home Blog Page 3169

Aai Kuthe Kay Karte: अरुंधतीच्या लग्नासाठी आलेल्या गौरीला आजी कांचनची तंबी! म्हणाल्या…

0
Aai Kuthe Kay Karte: अरुंधतीच्या लग्नासाठी आलेल्या गौरीला आजी कांचनची तंबी! म्हणाल्या…


Aai Kuthe Kay Karte Latest Update: अरुंधतीच्या लग्नाच्या निमित्ताने गौरी मालिकेत परतणार आहे. नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोत गौरीची झलक पाहायला मिळाली आहे.



Source link

Mrs Chatterjee Vs Norway: राणी मुखर्जीच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर बघून तुमच्या डोळ्यांतही येईल पाणी! पहा Video

0
Mrs Chatterjee Vs Norway: राणी मुखर्जीच्या नव्या चित्रपटाचा ट्रेलर बघून तुमच्या डोळ्यांतही येईल पाणी! पहा Video


Mrs Chatterjee Vs Norway trailer: अभिनेत्री राणी मुखर्जी लवकरच ‘मिसेस चॅटर्जी व्हर्सेस नॉर्वे’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे.



Source link

Udayanraje Bhosale Song : कार्यकर्त्यांचा आग्रह, उदयनराजेंनी गायलं तेरे बिना जिया जाए नाsss

0



<p>Udayanraje Bhosale Song : कार्यकर्त्यांचा आग्रह, उदयनराजेंनी गायलं तेरे बिना जिया जाए नाsss</p>



Source link

Udayanraje Bhosale Birthday Special : उदयनराजेंच्या वाढदिवसानिमित्त 2 लाख वह्यांचे वाटप

0



<p>Udayanraje Bhosale Birthday Special : उदयनराजेंच्या वाढदिवसानिमित्त 2 लाख वह्यांचे वाटप</p>



Source link

Nayanthara : ‘लेडी सुपरस्टार’ नयनताराने घेतला मोठा निर्णय! चाहत्यांना बसला धक्का

0
Nayanthara : ‘लेडी सुपरस्टार’ नयनताराने घेतला मोठा निर्णय! चाहत्यांना बसला धक्का



Nayanthara : नयनतारा लवकरच शाहरुख खानच्या ‘जवान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मात्र, यादरम्यानच आता नयनतारा अभिनय सोडणार असल्याचे बोलले जात आहे.



Source link

Selfiee Review: अक्षय, इमरानचा ‘सेल्फी’ हिट होणार की फ्लॉप? पहा नेटकरी काय म्हणतात…

0
Selfiee Review: अक्षय, इमरानचा ‘सेल्फी’ हिट होणार की फ्लॉप? पहा नेटकरी काय म्हणतात…


Selfiee Twitter Review: ‘सेल्फी’ प्रदर्शित होताच आता हा चित्रपट ट्विटरवर ट्रेंड होऊ लागला आहे. ट्रेलर पाहिल्यानंतरच या चित्रपटाकडून प्रेक्षकांना फार अपेक्षा होत्या. मात्र….



Source link

Akshay Kumar: अक्षय कुमार अखेर कॅनडाचं नागरिकत्व सोडणार? काय म्हणाला वाचा…

0
Akshay Kumar: अक्षय कुमार अखेर कॅनडाचं नागरिकत्व सोडणार? काय म्हणाला वाचा…


एका प्रसिद्ध वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत अक्षय म्हणाला की, जेव्हा लोक त्याच्या कॅनेडियन नागरिकत्व स्वीकारण्यामागचे कारण न जाणून घेता, त्याला नावं ठेवतात तेव्हा त्याला वाईट वाटते. अक्षय म्हणाला, ‘भारत माझ्यासाठी सर्वस्व आहे… मी जे काही कमावले आहे, जे काही मिळवले आहे ते मला येथून मिळाले आहे. आणि मी भाग्यवान आहे की मला परत देण्याचीही संधी मिळाली आहे. जेव्हा लोक काहीही नकळत काहीही बोलतात, तेव्हा खूप वाईट वाटते.’



Source link

Prashant Damle: क्षण अभिमानाचा! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रशांत दामलेंचा सन्मान! पाहा व्हिडीओ..

0
Prashant Damle: क्षण अभिमानाचा! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रशांत दामलेंचा सन्मान! पाहा व्हिडीओ..


‘आमच्यासाठी अभिमानाचा क्षण आहे. खूप खूप शुभेच्छा प्रशांत’, असं कॅप्शन देत कविता मेढेकर यांनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओ चाहते देखील भरभरून कमेंट्स करत आहे. चाहत्यांनी प्रशांत दामले यांचं कौतुक करत त्यांना शुभेच्छा देत आहेत. ‘हार्दिक अभिनंदन प्रशांत सर…. महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे’, असे एका चाहत्याने म्हटले आहे. तर, ‘अभिनंदन प्रशांत दामले प्रत्येक मराठी माणसाला याचा अभिमान आहे’, असे एकाने म्हटले आहे.



Source link

Netflix : आनंदाची बातमी! नेटफ्लिक्स झालं आणखी स्वस्त! पहा काय आहेत नवे दर…

0
Netflix : आनंदाची बातमी! नेटफ्लिक्स झालं आणखी स्वस्त! पहा काय आहेत नवे दर…


नेटफ्लिक्सने येमेन, इराक, ट्युनिशिया, जॉर्डन, पॅलेस्टाईन, लिबिया, अल्जेरिया, लेबनॉन, इराक, सुदान यांसारख्या मध्य पूर्व देशांमध्ये नेटफ्लिक्स प्लॅन स्वस्त केले आहेत. या देशांमध्ये, नेटफ्लिक्सचा मूळ प्लॅन ७.९९ डॉलर्स म्हणजेच जवळपास ६६१ रुपयांना होता., ज्याची किंमत आता ३ डॉलर म्हणजेच २४८ रुपये इतकी करण्यात आली आहे. म्हणजेच या रिचार्ज प्लॅनमध्ये तब्बल ४०० रुपयांची कपात करण्यात आली आहे. तर, प्रीमियम प्लॅनमध्ये देखील दर कमी झाले आहेत. प्रीमियम प्लॅन ११.९९ डॉलरवरून ९.९९ डॉलरपर्यंत कमी करण्यात आली आहे.



Source link

डाळिंबात फुलला गांजा; कर्जमुक्तीच्या नादात वाजला बॅंडबाजा | पुढारी

0









सातारा; विठ्ठल हेंद्रे :  माण तालुक्यातील एका शेतकर्‍याने कर्जमुक्तीसाठी अजब प्रकार केला. त्याने चक्क डाळिंबाच्या बागेत गांजा फुलवला. या अजब फंड्याने त्याच्या हाती बेड्या पडल्या. कर्जमुक्तीच्या नादात उचललेल्या चुकीच्या पावलामुळे त्याचा अक्षरश: बेंडबाजा वाजला. कुंडलिक खांडेकर (रा. खडकी, ता. माण) या शेतकर्‍याचा सुमारे 1 कोटी रुपये किमतीचा 422 किलो गांजा पकडण्यात आला. दुष्काळी भागात अमली पदार्थाची शेती व संपूर्ण जिल्ह्यात विक्री ही चिंतेची बाब निर्माण झाली आहे. नशा करणार्‍यांमध्ये युवकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याचेही वास्तव आहे. या सर्व बाबी समोर ठेवून पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना अमली पदार्थ कारवाईच्या सूचना केल्या आहेत. तसेच अमली पदार्थाची शेती व विक्रीबाबत माहिती देण्याचे आवाहनही पोलिसांनी केले असून माहिती देणार्‍यांचे नाव गोपनीय ठेवले जाणार आहे.

दरम्यान, सातारा जिल्हा पोलिस दलाने जिल्ह्यात वाढत चाललेल्या अमली पदार्थांवर ‘वॉच’ ठेवत त्याचा पर्दाफाश करण्याचा धडाकाच सुरू केला आहे. एकाच आठवड्यात रेकॉर्डब्रेक कारवाई करत दीड कोटी रुपये किमतीचा गांजा व अफू हे अमली पदार्थ जप्त केले.

कुंडलिक खांडेकर यांनी गांजाची शेती करताना खरबदारी घेतली होती. त्यासाठी डाळिंबाची बाग बाजूला होती व डाळिंबाच्या बाजूला मका होता. मका काढल्यानंतर मात्र गांजाची शेती ओपनवर आली. हीच बाब पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी छापा टाकला. दोन वर्षांपूर्वी खांडेकर यांनी ऊसतोडीसाठी मुकादमाला सुमारे 12 लाख रुपये कर्ज काढून दिले होते. मात्र, मुकादमाने फसवले. अशातच काही जणांकडून लाखो हातउसणेही घेतले होते. एकीकडे बँक व दुसरीकडे उसणे घेतलेल्यांकडून पैशांची होत असलेली मागणी, या सर्वांतून सुटण्यासाठी त्यांनी गांजाची शेती करण्याचा निर्णय घेतला.

डोक्यात नोटीस; पण हातात पडल्या बेड्या

बेकायदा दारू विक्री, जुगार खेळल्यानंतर पोलिस नोटीस देतात आणि सोडून देतात, ही बाब खांडेकर यांना माहिती होती. आपण गांजा शेती केल्यानंतरही पोलिस नोटीस देतील, असे त्यांना वाटले. मात्र, पोलिस नोटीस न देता अटकेच्या कामाला लागल्यावर त्यांची चुळबुळ वाढली. ‘कशाला वाढवताय साहेब, द्या की नोटीस अन् करा की मोकळे’, असे ते पोलिसांना बोलू लागले. पोलिसांनी पण आश्चर्य व्यक्त केल्यानंतर नोटीस कोणी सांगितले? असे विचारताच त्यांनी स्पष्टीकरण दिले. यावर पोलिसांनी दारू विक्री, मटका, जुगार कारवाई ही गांजा कारवाईपेक्षा कशी बेलेबल व नॉनबेलेबल आहे हे कायदेशीर कसे गंभीर आहे, हे सांगितले. पोलिसांनी कायदेशीर माहिती देताच खांडेकर यांनी डोक्याला हात लावला.











Source link