
Sushmita Sen Heath Update: अभिनेत्री सुष्मिता सेनला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यानंतर ती सोशल मीडियावर लाईव्ह आली आणि तिने चाहत्यांना प्रकृतीविषयी माहिती दिली आहे.
Source link

Sushmita Sen Heath Update: अभिनेत्री सुष्मिता सेनला रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. त्यानंतर ती सोशल मीडियावर लाईव्ह आली आणि तिने चाहत्यांना प्रकृतीविषयी माहिती दिली आहे.
Source link
सातारा : पुढारी वृत्तसेवा : निर्लज्जपणाची हद्द झाली. प्रत्येक वेळी काही नसलं की, राजघराण्यावर बोलायचं. ज्या घराण्यामुळे तुमचा पक्ष उभा आहे त्यांच्याविषयी बोलताना थोडी तरी लाज राखा, असा टोला खा. उदयनराजे भोसले यांनी खासदार संजय राऊतांना लगावला. राहिला प्रश्न आमचा आदर, अनादर करण्याचा. तर कोणाचा घास नाही, असेही उदयनराजेंनी टीकाकरांना ठणकावले.
उदयनराजे भोसले म्हणाले की, “विकृत स्वभावामुळे खासदार संजय राऊतांकडून राजघराण्यावर वारंवार टीका केली जाते आहे. या विकृतीत वाढ होताना सध्या दिसत आहे. राजघराण्यावर बोलताना मोजून मापून समजून वक्तव्य केलं पाहिजे. असे व्यक्तव्य करणाऱ्यांना मी ओळखत नाही आणि त्यांना महत्त्वही देत नाही.”
संजय राऊत यांची विकृती इथपर्यंत पोहोचली की, त्यांनी यापूर्वी छत्रपतींचे वंशज असल्याचे पुरावे आम्हाला मागितले हाेते. सत्तेत राहण्यासाठी या विकृतीचे लोक बरळतात. त्यांची विधानं राजकीय स्वार्थासाठीची असतात, असेही उदयनराजे या वेळी म्हणाले.
हेही वाचा :

Rang Maza Vegla latest update: कार्तिकला साक्षीच्या मृत्यू प्रकरणी जबाबदार ठरवत १४ वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. संपूर्ण कुटुंबासाठी हा मोठा धक्का आहे.

Beautiful Rani Song: ‘ब्युटीफुल राणी’ या गाण्याने प्रेक्षकांची मने जिंकली असून, सोशल मीडियावर देखील या गाण्याला उदंड प्रतिसाद मिळत आहे.
सातारा ; पुढारी वृत्तसेवा आमच्या घराण्याचे पुरावे मागणाऱ्यांना आमच्या घराण्यावर बोलण्याचा अधिकार नाही असे आमदार शिवेंद्रराजे यांनी ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांना फटकारले.
काल (शुक्रवार) साताऱ्यातील पदाधिकारी मेळाव्यात खासदार संजय राऊत यांनी आ. शिवेंद्रराजे आणि छत्रपती घराण्यावर टीका केली होती. ज्या भाजप मध्ये तुम्ही आहात त्यांना छत्रपती घरण्याबद्दल आदर नसल्याचे सांगत हे राजे अनाजी पंतांचे चेले झाले आहेत. पूर्वी छत्रपती पेशव्यांना नेमत होते. आता पंत नेमणुका करायला लागले आहेत अशी खोचक टीका केली होती. त्याला आ.शिवेंद्रराजे भोसले यांनी सडेतोड उत्तर दिले आहे.
छत्रपती घराण्याबद्दल जर आदर होता तर संभाजीराजे यांना खासदारकीचे तिकीट का दिले नाही असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. .खा संजय पवार यांना तिकीट देवून जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. आमच्या घराण्याचे आम्हाला पुरावे मागणाऱ्या व्यक्तीला आमच्या घराण्यावर बोलण्याचा अधिकार नसल्याची टीका आ. शिवेंद्रराजे यांनी केली आहे.
हेही वाचा :

देशमुखांच्या ‘समृद्धी’ बंगल्यात अरुंधतीची हळद पार पडणार असून, यावेळी सगळेच जल्लोष करताना दिसणार आहे. विद्या ताई, आप्पा, यश, अनघा, गौरी, विशाखा सगळेच अरुंधतीच्या हळदीमध्ये सामील होणार आहेत. मात्र, या आनंदाच्या सोहळ्यात कांचन देशमुख सहभागी होणार नाहीये. कांचन देशमुख ही अरुंधती माजी सासू अर्थात अनिरुद्धची आई आहे. घटस्फोटानंतरही अरुंधतीने देशमुखांच्या घरातच राहावे आणि इथल्या सगळ्या गोष्टी सांभाळाव्यात अशी कांचनची इच्छा होती. मात्र, आता अरुंधती या घरातून दुसऱ्या घरी लग्न करून जाणार, या विचाराने त्या अस्वस्थ झाल्या आहेत.
सातारा : पुढारी वृत्तसेवा : शिवसेनेचे नाव, चिन्हं गेल्यामुळे शिवसेना संपली असणारे काहीजण म्हणतायत. पण आज शिवसेना रस्त्यावर पहातोय. हजारोंच्या संख्येने लोक रस्त्यावर उतरतायत. शिवसेनेची गर्जना करत गद्दारांच्या नावाने ठणठणा बोंबा मारत आहेत. खोकेवाल्या ४० आमदारांच्या बाजूने कागदावर निर्णय दिला पण निवडणूक आयोग या शिवसेनेचे काय करणार? हा महाराष्ट्र गद्दारांना गाडल्याशिवाय राहणार नाही, असे ठणकावत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गट व निवडणूक आयोगावर हल्लाबोल केला.
साताऱ्यातील शाहू कला मंदिरात झालेल्या शिवगर्जना मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे प्रवक्ते लक्ष्मण हाके, माजी आमदार बाबूराव माने, जिल्हाध्यक्ष सचिन मोहिते, जिल्हाध्यक्ष हर्षल कदम, हणमंत चवरे, अमोल आवळे उपस्थित होते.
खा. संजय राऊत म्हणाले, मी कुणाच्या बापाला घाबरत नाही. गर्दी, भक्ती, ऊर्जा, अग्निकुंड असलेल्या शिवसेनेचे आयोग काय करणार? ही शिवसेना शिंदे-मिंद्यांना कशी मिळणार? सकाळी आयोगाला कुठं शिवी दिली ते विसरलो. मी खरोखर शिवी दिली का? ज्याची जशी लायकी तशी भाषा वापरायची असते. तुमची शिव्या खायची लायकी असेल तर आम्हाला उत्तम शिव्या येतात. मी माफीबिफी मागणार नाही. ‘पन्नास खोके एकदम ओके,’ ही देशाची लोकप्रिय शिवी आहे. खा. राहूल गांधी यांच्याबरोबर जम्मू काश्मीरला गेलो. त्यांच्यासोबत चालत असताना किमान १० ठिकाणी या घोषणा ऐकायला मिळाल्या. राहूल गांधी यांनीही हे सांगितलं. या बेईमानांची अपकिर्ती देशाच्या सीमेपर्यंत पोहोचली असून त्यांनी महाराष्ट्र बदनाम करून टाकला.
खा. राऊत पुढे म्हणाले, क्रांती काय असते हे स्वातंत्र्यलढ्यापासून ते संयुक्त महाराष्ट्र आंदोलनाच्या लढ्यात या ऐतिहासिक सातारा जिल्ह्याने दाखवून दिलं आहे. बलाढ्य कंपनी सरकारविरोधात समांतर सरकार चालवणारा हा जिल्हा आहे. अजिंक्यतारा किल्ल्यासारखीच शिवसेनेची अवस्था झाली आहे. अजिक्यताराने अनेक गद्दार पाहिले. असंख्य घाव या किल्ल्याने पाठीवर आणि पोटावरही झेलले.
यावेळी शिवसेनेचे प्रवक्ते लक्ष्मण हाके, माजी आमदार बाबूराव माने, जिल्हाध्यक्ष सचिन मोहिते व पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली. यावेळी जिल्हाध्यक्ष हर्षल कदम, हणमंत चवरे, अमोल आवळे, संभाजी जगताप, संजय भोसले आदि पदाधिकारी उपस्थित होते.
खा. राऊत म्हणाले, ते पाटणचं कोण? पापाचं पितर कोण रे? शंभू की चंबू? अरे शिवसेना नसती तर तुमच्या घराण्याला मंत्रिपद मिळालं असतं का? ३७ वर्षांनी तुम्हाला मंत्रिपद मिळालं. बाळासाहेब देसाई हे मोठं नाव राज्याच्या राजकारणात होवून गेलं. त्यांनी राज्याचे नेतृत्व केलं. शिवसेनेच्या स्थापनेपासून बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत बाळासाहेब देसाई होते. मराठी माणसाचा स्वाभिमान वाढावा यासाठी शिवसेनेला त्यांनी त्यावेळी ताकद दिली. बाळासाहेब देसाई, वसंतराव पाटील, यशवंतराव चव्हाण अशा या भागातील नेत्यांनी शिवसेनेला साथ दिली; पण ही कालची कार्टी महाराष्ट्राच्या पाठीत खंजीर खुपसत आहेत. शिवसेना संपवायला तुमचे बाप आले पाहिजेत.
खा. राऊत म्हणाले, सातारच्या आमदारांविषयी पदाधिकारी सांगत होते. सातारचे भाजपचे आमदार कधी झाले हिंदुत्ववादी? तुम्ही छत्रपतींचे वंशज आहात याचा आम्हाला आदर आहे. पण तुम्ही ज्या पक्षात आहात त्या पक्षाला अजिबात अभिमान व आदर नाही. छत्रपती पेशव्यांना नेमत होते आता पंत नेमणुका करायला लागले हे महाराष्ट्राला मान्य नाही. ही स्वाभिमानाची गादी आहे. श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराजांनी त्याग केला. त्यांच्या सर्व वंशजांनी भाजपशी तडजोड केली, अशी टीका त्यांनी केली.

‘पठाण’ या चित्रपटाचं शुक्रवारचं बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर आलं आहे. बॉक्स ऑफिस कलेक्शननुसार आता ‘पठाण’ चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने एकूण ५११.७५ कोटींची कमाई केली आहे. तर, इतर भाषांमध्ये ५२९.४४ कोटींची कमाई झाली आहे. या चित्रपटाने वर्ल्डवाईडमध्ये १०२९ कोटींचा टप्पा गाठला आहे. जगभरातील चाहते ‘पठाण’वर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. शाहरुख खान, जॉन अब्राहम आणि दीपिका पदुकोण स्टारर हा चित्रपट रिलीजच्या महिनाभरानंतर अजूनही कोटींच्या आकड्यात कमाई करत आहे.

Sanskrutik Kala Darpan 2023: यंदा या सोहळ्याचे २५वे वर्ष आहे. या रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्ताने कला क्षेत्रातील २५ ‘बाप माणसांचा’ यावेळी सर्वश्रेष्ठ ‘कलागौरव पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला.
Source link
