Thursday, July 16, 2026
Home Blog Page 315

married teacher filed Scheduled Castes atrocities act case on husband and in laws over 7 year caste abuse assault harassment

0
married teacher filed Scheduled Castes atrocities act case on husband and in laws over 7 year caste abuse assault harassment



married teacher filed Scheduled Castes atrocities act case on husband and in laws over 7 year caste abuse assault harassment | डोंबिवलीत शिक्षिकेला जातीवाचक बोलून छळ करणाऱ्या पती, सासू-सासऱ्यांवर गुन्हा दाखल



Source link

भारत-पाकिस्तानमध्ये होतो 1000,00,00,000 चा ‘सीक्रेट व्यापार’; पहलगाम हल्ल्यानंतर…

0
भारत-पाकिस्तानमध्ये होतो 1000,00,00,000 चा ‘सीक्रेट व्यापार’; पहलगाम हल्ल्यानंतर…


India-Pakistan Secret Trading : काही दिवसांपूर्वी जम्मू-काश्मीरमधल्या पहलगाम परिसरात झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधले संबंध पुन्हा एकदा तणावपूर्ण झाले आहेत. दोन्ही देशांनी एकमेकांविरोधात काही कठोर पावलं उचलली आहेत. जसे की व्यापार बंद करणे, हवाई मार्ग बंद करणे, व्हिजा रद्द करणे आणि पाण्याचा करार थांबवणे. भारत-पाकिस्तानंमध्ये व्यापार खूप कमी प्रमाणात होतो पण असा दावा करण्यात येत आहे. तर दोन्ही देशांमध्ये सीक्रेट व्यापार होतो आणि हा जवळपास 10 अब्ज डॉलरचा हा व्यापार होतो.

अल जजीराच्या रिपोर्ट्सनुसार, भारत-पाकिस्तानमध्ये असलेले व्यापारी संबंध हे नेहमीच तनावपूर्ण होते. 2019 मध्ये दोन्ही देशांमधील व्यापार हा जवळपास बंद झाला. पण प्रश्न हा आहे की या दोन्ही देशांमध्ये किती व्यापार व्हायचा आणि सीमा सील केल्यानंतर दोन्ही देशांमध्ये होणाऱ्या व्यापारावर कसा परिणाम होणार. 

भारत-पाकिस्तान व्यापाराचा इतिहास

भारत आणि पाकिस्तान यांच्यात 1947 पासून व्यापार सुरू आहे. तर 1996 मध्ये भारताने पाकिस्तानला ‘मोस्ट फेवर्ड नेशन’ (MFN) हा दर्जा दिला आणि त्यानंतर व्यापार वाढला होता.व्यापारात वाढ झाली पण दोन्ही देशांमधील तनावामुळे व्यापार जास्त वाढू शकला नाही. तर 2017-2018 मध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये 2.41 अब्ज डॉलरचा व्यापार झाला आणि 2016-2017 मध्ये 2.27 अब्ज डॉलरचा व्यापार केला. 

पण 2019 मधल्या पुलवामा हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानचा MFN दर्जा काढून घेतला. त्यानंतर दोन्ही देशांमधील व्यवहार मोठ्या प्रमाणात कमी झाले. 2018 मध्ये ते 2024 मध्ये दोन्ही देशांमध्ये 2.41 अब्ज डॉलरचा व्यापारावरून कमी होऊन 1.2 अब्ज डॉलरवर गेला. पाकिस्तानची भारताला होणारी निर्यात 2019 मध्ये 547.5 मिलियन डॉलरवरून कमी होईल 2024 मध्ये फक्त 480,000 डॉलर झाली. 

भारताच्या वाणिज्य मंत्रालयानुसार, एप्रिल 2024 ते जानेवारी 2025 पर्यंत भारताची पाकिस्ताला निर्यात ही 447.7 मिलिय डॉलर होती. या दरम्यान, पाकिस्तानची भारताला असलेली निर्णात ही फक्त 420,000 डॉलर होती. भारतातून पाकिस्तानला औषधं, पेट्रोलियम, प्लास्टिक, रबर, रसायन, रंग, भाज्या, मसाले, चहा, कॉफी आणि धान्याची निर्यात होते. पाकिस्तानातून भारतात तांबं, काचेचं सामान, रसायणं, सल्फर, फळं, सुका मेवा इत्यादी गोष्टी निर्यात होतात. 

सीक्रेट व्यापार कसा होतो?

GTRI चे संस्थापक अजय श्रीवास्तव यांनी सांगितलं की भारतीय सामान हा दुबई, सिंगापूर, कोलंबो सारख्या ठिकाणी पाठवला जातो. तिथे हा सामान ड्यूटी-फ्री गोदामात ठेवण्यात येतो. त्यानंतर कागदपत्र आणि लेबल बदलून हा सामान नव्या लेबलसोबत पाकिस्तानमध्ये पाठवले जातात. श्रीवास्तव यांचं म्हणणं ाहे की अशा पद्धतीनं व्यापारी हे पैसे कमावतात. 

या व्यापाराला थांबवता येईल का?

तज्ज्ञांचं म्हणणं आहे की हा अप्रत्यक्षपणे व्यापार थांबवणं फार कठीण आहे. कारण हे सगळं तिसऱ्या देशात खासगी कंपन्यांमार्फत केलं जातं, सरकारची थेट भूमिका यात नसते. पण पाकिस्ताननं भारतासोबत तिसऱ्या देशातून होणारे व्यापारांवर बंदी आणली आहे. दोन्ही देशाचे 

इतिहास काय सांगतो?

1965, 1971 आणि 2019 मध्ये युद्धानंतरही काही काळानंतर व्यापार पुन्हा सुरू झाला. याचा अर्थ त्यांचं म्हणणं आहे की तणाव कमी झाल्यावर तिसऱ्या देशातून व्यापार परत सुरू होण्याची शक्यता नेहमीच असते.





Source link

भारतात दहशतवादी हल्ले करणाऱ्या पाकिस्तानात बलोच आर्मीचा अटॅक, सरकारी कार्यालये जाळली, महामार्ग रोखला

0
भारतात दहशतवादी हल्ले करणाऱ्या पाकिस्तानात बलोच आर्मीचा अटॅक, सरकारी कार्यालये जाळली, महामार्ग रोखला


भारतात दहशतवाद पसरवणाऱ्या पाकिस्तानची स्वतःच्या अंतर्गत संघर्षामुळे वाईट अवस्था झाली आहे. नुकतेच जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पाकिस्तानचा संबंध समोर आला होता. पण ते स्वत: अंतर्गत संघर्षाने त्रस्त आहेत. सिंधमध्ये पाणी वाटपासाठी हाहाकार माजला असून स्थानिकांनी महामार्ग रोखून धरले आहेत. दरम्यान, बलुचिस्तानमधील कलात येथे एक हल्ला झाला आहे. क्वेटा-कराची महामार्ग मोठ्या संख्येने बंदुकधारींनी रोखून धरला. एवढेच नव्हे तर घटनास्थळावरून जाणाऱ्या वाहनांचेही नुकसान झाले.



Source link

‘आयपीएल’वर खुलेआम अनधिकृत जुगार! कुणाचा आशीर्वाद?

0
‘आयपीएल’वर खुलेआम अनधिकृत जुगार! कुणाचा आशीर्वाद?



चंद्रपूर: ‘आयपीएल’ क्रिकेटवर जुगाराचा अनधिकृत व्यवसाय जिल्ह्यात खुलेआम सुरू आहे. येथील बुकी गोव्यात गेले असा बनाव सुरुवातीला करण्यात आला. मात्र, सर्व बुकी चंद्रपुरातील हॉटेलात बसून खुलेआम जुगार खेळत आहेत. बुकींचा गोवा दर्शनाचा बनाव असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. या बेटिंगचा म्होरक्या प्रदीप गंगमवार याच्या nice7777.fun या ‘ॲप’वर कोट्यवधींची उलाढाल होत आहे. काही दिवसांपूर्वी शहरातील व्यंकटेश हॉटेल येथे तीन बुकींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली होती. त्यांचे भ्रमणध्वनी तपासले व विविध बँकखाते तपासले असता ३० कोटींपेक्षा अधिकची उलाढाल दिसून आली आहे.

‘आयपीएल’ क्रिकेट मॅच सुरू झाल्यापासून जिल्ह्यात राजुरा वगळता कुठेही कारवाई झाली नाही. त्यामुळे क्रिकेट बुकींचे ‘सेटिंग’ झाले अशी चर्चा सुरू झाली आहे. बुकींपैकीच एक म्होरक्या प्रदीप गंगमवार हा सध्या हॉटेलात बसून यंत्रणा चालवत आहे. गंगमवार या बुकीच्या मागे खाकीतील अधिकाऱ्यांचे संरक्षण आहे. त्यामुळे गंगमवार याला कोण संरक्षण देत आहे अशीही चर्चा सुरू झाली आहे. गंगमवार याने या कामात सुरुवातीला काही युवकांना गुंतवले होते. मात्र, यावर्षी शहरातील काही युवतींनाही गुंतवल्याची चर्चा आहे.

आयपीएल सुरू होण्याआधी चंद्रपुरातील व्यंकटेश हॉटेलमध्ये छापा टाकून पोलिसांनी अविनाश हांडे, पारस उराडे, राकेश कोंडावार या तीन बुकींवर कारवाई केली. त्यांचे बँक खाते गोठवले. मात्र, प्रत्यक्ष आयपीएल सुरू झाल्यानंतर पोलिसांच्या हाती बुकी लागले नाहीत. अपवाद फक्त राजुऱ्याचा. सुरुवातीला बुकींना गोव्यात जाण्याचा बनाव केला. त्यांच्या मध्यस्थांनी संबंधित विभागातील अधिकाऱ्यांशी तडजोड केली आणि ते परतले.

सध्या गल्लीबोळातील तरुणांकडे nice7777.fun ,nice45 या क्रिकेट जुगाराचा ऑनलाईन आयडी उपलब्ध आहे. त्यांच्या माध्यमातून कोट्यवधींची उलाढाल होत आहे. बुकींचा टोळीचा म्होरक्या म्हणून प्रदीप गंगमवारला ओळखले जाते. त्याच्यावर आधीही सट्टा आणि जुगाराचे गुन्हे दाखल आहे. काही वर्षांपूर्वी याच गंगमावरचे नागपुरातील टोळीने पैशाच्या वादातून अपहरण केले होते. त्यानंतर हीच टोळी आणि गंगमवार यांच्यात नागपूर मार्गावरील एका हॅाटेलमध्ये राडा झाला. तीन महिने तो तुरुंणात होता. मात्र, त्याला पोलीस दलातील काही अधिकाऱ्यांचा ‘आशीर्वाद’ असल्याने लवकरच त्याने पुन्हा आपले साम्राज्य उभे केले. आता आयपीएलच्या निमित्ताने तो पुन्हा सक्रिय झाला आहे.

माहिती असूनही कारवाई नाही?

बुकींच्या वर्तुळात आणि पोलिसाच्या खबऱ्यांना यासंदर्भात माहिती आहे. मात्र, अद्याप ते त्यांच्यापर्यंत पोहचू शकले नाहीत. विशेष म्हणजे, पोलीस जुगार, भंगार चोर यांच्यावर कारवाईत रमले असताना युवकांचे आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या ऑनलाईन जुगाराकडे अद्याप त्यांचे लक्ष गेले नाही.

वसुलीची नवी पद्धत

या धंद्यात नव्याने दाखल झालेला राजू निमजेने वसुलीची नवी पद्धत निर्माण केली आहे. पैसे न घेता तो संबंधितांना आयडी देतो. त्यानंतर त्यांच्याकडून व्याज घेतो. आधीच कंगाल झालेले सट्टेबाज मग आपली संपत्ती, सोने, वाहन निमजेकडे देऊन आपली सुटका करतात, असे सूत्रांनी सांगितले.



Source link

‘व्हाट्सॲप, फेसबूकवर लिहिण्यापेक्षा दीर्घ लिखाण करा’

0
‘व्हाट्सॲप, फेसबूकवर लिहिण्यापेक्षा दीर्घ लिखाण करा’



पत्रकार विकास महाडिक लिखित ‘एका आज्जीची गोष्ट’ या पुस्तकाचे प्रकाशन गणेश नाईक यांच्या हस्ते झाले. नवी मुंबईतील वाशी स्थित साहित्य मंदिर सभागृहात पुस्तक प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला होता.



Source link

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो अकाऊंट चेक करा..! १५०० रुपये जमा होण्यास सुरूवात, तुम्हाला आले का?

0
Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींनो अकाऊंट चेक करा..! १५०० रुपये जमा होण्यास सुरूवात, तुम्हाला आले का?


Ladki Bahin Yojana April installment : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार, याकडे राज्यातील लाडक्या बहि‍णींचे लक्ष लागलेलं असतानाच आता खुशखबर समोर आली आहे. अक्षय्य तृतीयेला एप्रिल महिन्याचा हफ्ता मिळणार होता, मात्र अजूनही १५०० रुपये खात्यात जमा न झाल्याने लाडक्या बहिणींना धाकधूक लागली होती. आता राज्यातील काही लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येण्यास सुरूवात झाली आहे.



Source link

विद्यापीठे, महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमात बदल; यूजीसीचे निर्देश

0
विद्यापीठे, महाविद्यालयांच्या अभ्यासक्रमात बदल; यूजीसीचे निर्देश



पुणे: राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२०च्या अनुषंगाने देशभरातील विद्यापीठे, महाविद्यालयांना अभ्यासक्रमांमध्ये बदल करून त्यांची अंमलबजावणी करण्याच्या सूचना विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) दिल्या आहेत.

विद्यार्थ्यांवरील विषयांचे ओझे कमी होण्यासह जीवनोपयोगी कौशल्यांचा समावेश, प्रत्यक्ष अनुभवाधिष्ठित, कृतीशील शिक्षणास चालना मिळण्यासाठी अभ्यासक्रमांचे नियमित आणि विचारपूर्वक पुनरावलोकन, अद्ययावतीकरण करणे आवश्यक आहे, असेही यूजीसीने स्पष्ट केले आहे.

यूजीसीने या बाबतचे परिपत्रक प्रसिद्ध केले आहे. आजचा काळ अतिशय वेगाने बदलणारा आहे. संकल्पनात्मक नवकल्पना, तंत्रज्ञानातील प्रगती सतत विकसित होत आहे. या पार्श्वभूमीवर शैक्षणिक प्रणालीही या गतीशी सुसंगत असणे अत्यंत आवश्यक झाले आहे. या नव्या आव्हानांना आणि संधींना सामोरे जाण्याची जबाबदारी शैक्षणिक नेते, शिक्षक, प्रशासकीय अधिकारी तसेच समाजातील सर्व घटकांवर आहे.

राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अभ्यासक्रमात व्यापक आणि मुलभूत बदलांची गरज अधोरेखित करते. या धोरणात शिक्षणाला लवचिक आणि २१व्या शतकाच्या गरजांशी सुसंगत करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. पारंपरिक पाठांतरावर आधारित शिक्षणाऐवजी संकल्पनात्मक समज, विचारशक्ती, सर्जनशीलता आणि बहुविद्याशाखीय शिक्षणावर भर देणारा दृष्टिकोन स्वीकारण्याचे आवाहन या धोरणात करण्यात आले आहे, असे यूजीसीने नमूद केले आहे.

विद्यापीठे, संलग्न महाविद्यालयांनी अभ्यासक्रमांचे पुनरावलोकन करून आवश्यक त्या सुधारणा कराव्यात, तसेच अंमलबजावणी करावी. अभ्यासक्रमांत सुधारणा करताना राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या दिशानिर्देशांशी सुसंगत असे राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा, राष्ट्रीय उच्च शिक्षण पात्रता आराखडा, पदवी अभ्यासक्रम आणि श्रेयांक आराखडा, अभ्यासक्रमात कौशल्यांचा समावेश, कार्यप्रशिक्षण समाविष्ट पदवी अभ्यासक्रम, कार्यप्रशिक्षण, पदव्युत्तर अभ्यासक्रम आणि श्रेयांक आराखडा या दस्तावेज विचारात घ्यावेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.



Source link

Vaani Kapoor DELETES All Posts About Abir Gulaal With Pak Actor Fawad Khan After Film Gets Banned In India

0
Vaani Kapoor DELETES All Posts About Abir Gulaal With Pak Actor Fawad Khan After Film Gets Banned In India



Vaani Kapoor DELETES All Posts About Abir Gulaal With Pak Actor Fawad Khan After Film Gets Banned In India | पहलगाम हल्ल्यानंतर भारतात ‘अबीर गुलाल’वर बंदी, वाणी कपूरने घेतला मोठा निर्णय



Source link

Maitri’ training for animal husbandry assistants brings big job opportunities; find out what the scheme is all about

0
Maitri’ training for animal husbandry assistants brings big job opportunities; find out what the scheme is all about



Maitri’ training for animal husbandry assistants brings big job opportunities; find out what the scheme is all about | ‘मैत्री’ पशुपालक मदतनीसाचे धडे, रोजगाराची मोठी संधी; जाणून घ्या नेमकी योजना काय?



Source link

girl remove pakistani flag from the Road expelled after video goes viral in up marathi news

0
girl remove pakistani flag from the Road expelled after video goes viral in up marathi news



girl remove pakistani flag from the Road expelled after video goes viral in up marathi news | रस्तावरचा पाकिस्तानचा झेंडा काढणं भोवलं! व्हिडीओ व्हायरल होताच ११वीच्या विद्यार्थिनीला शाळेतून काढलं



Source link