Friday, June 26, 2026
Home Blog Page 3145

Satish Kaushik: सतीश कौशिक मृत्यूप्रकरणी खळबळजनक खुलासा; होळी पार्टीच्या ठिकाणी सापडली आक्षेपार्ह औषधे!

0
Satish Kaushik: सतीश कौशिक मृत्यूप्रकरणी खळबळजनक खुलासा; होळी पार्टीच्या ठिकाणी सापडली आक्षेपार्ह औषधे!


दिल्लीतील एका व्यावसायिकाच्या फार्म हाऊसवर ही पार्टी आयोजित करण्यात आली होती. पोलीस आता पार्टीत सहभागी झालेल्या सगळ्या पाहुण्यांची यादी तयार करत आहेत. दुसरीकडे, पार्टीत सहभागी असलेल्या व्यावसायिकाचा या प्रकरणातील वाँटेड यादीत समावेश आहे. याच होळी पार्टीत सहभागी होण्यासाठी अभिनेते सतीश कौशिष मुंबईहून दिल्लीला आले होते. विकास मालू या मित्राच्या फार्म हाऊसवर सतीश कौशिक पार्टीत सहभागी होण्यासाठी आले होते. त्याचे हे फार्म हाऊस दिल्लीतील बिजवासन येथे आहे. विकास मालूवर एक वर्षाआधी बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला होता, ज्याचा पोलीस अजूनही तपास करत आहेत.



Source link

Viral Video: बहीण अंशुलाचा रॅम्पवॉक पाहून अर्जुन कपूर झाला खूश; आनंदाने वाजवल्या टाळ्या!

0
Viral Video: बहीण अंशुलाचा रॅम्पवॉक पाहून अर्जुन कपूर झाला खूश; आनंदाने वाजवल्या टाळ्या!


या व्हिडीओमध्ये अर्जुन कपूर हिरव्या रंगाच्या जॅकेट आणि डार्क पँटमध्ये दिसत होता. दुसरीकडे, अंशुला कपूर रॅम्पवर शिमरी कॉर्सेट आऊटफिटमध्ये दिसली होती. या रॅम्पवॉक दरम्यान ती खूप सुंदर आणि ग्लॅमरस दिसत आहे. व्हिडीओ पाहून अर्जुन आणि अंशुलाच्या या भाव-बहिणीच्या जोडीवर लोक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. एका युझरने कमेंटमध्ये लिहिले आहे की, ‘दोघे खूप गोड आहे.’ आणखी एका युझरने कमेंट करत लिहिले की, त्यांना अर्जुनची स्टाईल खूप आवडली. काही लोक अंशुलाच्या या ट्रान्सफॉर्मेशनचे कौतुक करत आहेत.



Source link

Anupam Kher: ‘सतीशला फोन करण्यासाठी अनेकदा मोबाईल हातात घेतला…’; अनुपम खेर झाले भावूक! पहा Video

0
Anupam Kher: ‘सतीशला फोन करण्यासाठी अनेकदा मोबाईल हातात घेतला…’; अनुपम खेर झाले भावूक! पहा Video


आपल्या दमदार अभिनयाने आणि विनोदाने सर्वांची मने जिंकणाऱ्या सतीश कौशिक यांचे ९ मार्च रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. सतीश कौशिक यांच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्यांच्या कुटुंबीय आणि मित्रमंडळींच्या आयुष्यात कधीही न संपणारी पोकळी निर्माण झाली आहे. अभिनेते अनुपम खेर यांना देखील मोठा धक्का बसला आहे. अनुपम खेर आता यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, मित्राच्या आठवणीने सतत त्यांच्या डोळ्यांत अश्रू येत आहेत.



Source link

Payal Ghosh: ‘मला काही झालं तर कुणालाच सोडणार नाही!’, अभिनेत्री पायल घोषची खळबळजनक पोस्ट

0
Payal Ghosh: ‘मला काही झालं तर कुणालाच सोडणार नाही!’, अभिनेत्री पायल घोषची खळबळजनक पोस्ट


पायलने #MeToo मोहिमेदरम्यान आवाज उठवला होता. पायाल घोष हिने बॉलिवूड चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यपवर लैंगिक शोषणाचा आरोप केला होता. यानंतर पायलने बिग बॉसमध्ये पोहोचलेल्या साजिद खानबद्दलही आपले मत व्यक्त केले, ज्यामध्ये तिने सलमान खानपासून ते वाहिनीपर्यंत सर्वांनीच फैलावर घेतले होते. आता पायल घोषने होळीचा फोटो शेअर करताना लिहिले की, ‘ओशिवरा पोलिस माझ्या घरी आले… मला काही झालं तर कुणालाच सोडणार नाही.. माझ्या मानसोपचारतज्ज्ञांना @Syedruxada विचारा की, मी सध्या कोणत्या परिस्थितीतून जात आहे… मी सुशांत नाही, मी पायल घोष आहे… मी मेले तर सगळ्यांना अडकवून मरेन.’



Source link

सातारा : पाणी चोरीविरोधात खटाव तालुक्यात कडकडीत बंद | पुढारी

0









खटाव, पुढारी वृत्तसेवा : कोरेगाव – खटावचे आमदार महेश शिंदे यांनी केंद्र आणि राज्यस्तरावर केलेल्या पाठपुराव्यामुळे जिहे-कठापूर योजनेचे पाणी खटाव तालुक्यातील नेर धरणात आले आहे. आमच्या हक्काचे आलेले पाणी पळवण्याचा घाट काही उपर्‍या अपप्रवृतींनी घातला आहे. मात्र आमच्या सहनशीलतेचा अंत कुणी पाहू नये. वर्धनगड घाटाखाली सुरू असलेली आमच्या पाण्याची चोरी त्वरित थांबवावी, अन्यथा हातात दांडकी घेऊन आम्हाला रस्त्यावर उतरावे लागेल, असा इशारा खटाव तालुका जिहे-कठापूर पाणी बचाव समितीच्या पदाधिकारी व शेतकर्‍यांनी दिला.

गुरुवर्य लक्ष्मणराव इनामदार जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेचे खटाव-माणचे हक्काचे पाणी बेकायदेशीरपणे पळवणार्‍यांचा व त्यांना पाठीशी घालणार्‍यांचा पुसेगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात खटाव तालुका जिहे-कठापूर पाणी बचाव समिती व लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांनी जाहीर निषेध केला. यावेळी लाभक्षेत्रातील पुसेगाव, खटाव, बुध, डिस्कळ, विसापूर, जाखणगावसह तालुक्यातील अनेक गावांमध्ये बाजारपेठांत उत्स्फूर्तपणे कडकडीत बंद पाळण्यात आला.

खटाव तालुक्यासाठी वरदान ठरलेल्या जिहे-कठापूर उपसा सिंचन योजनेचे पाणी नेर धरणात पडण्याआधीच रामोशीवाडी (ता. कोरेगाव) येथील नागरिकांकडून एअर वॉल्व्हच्या माध्यमातून चोरले जात आहे. संबंधीत विभागाने खटावच्या दुष्काळी भागाच्या आरक्षित पाणी चोरीला आळा घालण्यासाठी हा एअर वॉल्व्ह कायमस्वरूपी बंद करण्याची मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.

आंदोलनकर्त्यांची मागणी विभागीय कार्यालकडे त्वरित कळवण्यात येईल. काम अपूर्ण असलेल्या जिहे-कठापूर योजनेची चाचणी सुरु आहे. या काळात मिळणारे सर्व पाणी नेर धरणात सोडण्यात येईल. वॉल्व्ह बंद करण्याची कार्यवाही सुरु आहे. त्यासाठी पोलिस यंत्रणेची मदत घेतली जाईल असे उपअभियंता मयुर महाजन यांनी निवेदन स्वीकारल्यावर सांगितले.

दरम्यान, आमच्या हक्काचे पाणी मिळालेच पाहिजे, पाणी आमच्या हक्काचे , नाही कुणाच्या बापाचे , पाणी गळती थांबलीच पाहिजे अशा घोषणा देत शेकडो शेतकर्‍यांनी परिसर दणाणून सोडला. अनेकांनी मनोगत व्यक्त करताना आ. शशिकांत शिंदे यांचे नाव घेऊन तेच पाणी चोरीला पाठीशी घालत असल्याचा आरोप केला.











Source link

Urmi: मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार प्रेमाची धमाल; अण्णा नाईकांच्या ‘उर्मी’ चित्रपटाचा टीझर लाँच!

0
Urmi: मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार प्रेमाची धमाल; अण्णा नाईकांच्या ‘उर्मी’ चित्रपटाचा टीझर लाँच!


मल्टिस्टारर ‘उर्मी’ या चित्रपटाचा टीझर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. प्रेम आणि नात्यांची धमाल गोष्ट या चित्रपटात पाहायला मिळणार असून, १४ एप्रिलला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. समृद्धी क्रिएशननं ‘उर्मी’ चित्रपटाची प्रस्तुती केली आहे. डॉ. प्रवीण चौधरी चित्रपटाचे निर्माता, चैताली प्रवीण चौधरी सहनिर्माती आहेत. राजेश जाधव यांनी चित्रपटाचं पटकथा, संवादलेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. विजय गटलेवार यांनी संगीत, अनंत कामत यांनी संकलन, कौशल गोस्वामी यांनी छायाचित्रणाची जबाबदारी निभावली आहे.



Source link

Lock Upp 2: टीव्हीवर होणार डबल ड्रामा! कंगनाच्या ‘लॉकअप २’मध्ये कैद होणार राखी सावंत आणि शर्लिन चोप्रा!

0
Lock Upp 2: टीव्हीवर होणार डबल ड्रामा! कंगनाच्या ‘लॉकअप २’मध्ये कैद होणार राखी सावंत आणि शर्लिन चोप्रा!


काही दिवसांपूर्वी दोघींनी आपण एकमेकींच्या मैत्रिणी असल्याचे म्हटले आहे. यावेळी शर्लिन चोप्राला विचारण्यात आले की, तिची आणि राखीची मैत्री कशी झाली? तेव्हा शर्लिनने सांगितले की, राखीसोबत तिचे कधीही त्यांचे वैयक्तिक वैर नव्हते. मात्र, जेव्हा जेव्हा ती एखाद्या आरोपीविरुद्ध आवाज उठवायची, तेव्हा तेव्हा राखी तिच्या समोर यायची. शर्लिन पुढे म्हणाली की, जेव्हाही तिने साजिद खानच्या विरोधात आवाज उठवला, तेव्हा राखी त्याच्या बाजूने बोलायची.



Source link

पाचवड गाव कार्बन न्यूट्रल करण्याचा ठराव | पुढारी

0


भुईंज; पुढारी वृत्तसेवा :  समता दिनानिमित्त पाचवड गावची डुबळा डोंगर पायथ्याला विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये कार्बन न्यूट्रल पाचवड गाव असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. त्यासाठी ‘नवलाई देवराई’ प्रकल्पही साकारला जात आहे. दरम्यान, अशा पद्धतीचा ठराव करणारे पाचवड हे देशातील तिसरे गाव असल्याचा दावा ग्रामपंचायतीच्या पदाधिकार्‍यांनी केला आहे.

राष्ट्रीय महामार्गावरील पाचवड हे गाव झपाट्याने विकसित होवू लागले आहे. विविध योजना राबवण्यातही हे गाव अग्रेसर राहिले असून, कार्बन न्युट्रल पाचवड हा त्याचाच एक भाग आहे. जागतिक तापमानवाढ व त्यामुळे होणारे हवामान बदल हे प्रलयकारी संकट टाळण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाच्या पुढाकाराने जागतिक पातळींवर जोरदार प्रयत्न सुरू आहेत. या विषयावर सर्वत्र जनजागृतीही केली जात आहे. या शतकाअखेर तापमानवाढ जास्तीतजास्त 1.5 सेंटिग्रेडच्या आत रोखण्याचे जागतिक उद्दिष्ट आहे. यासाठी जगातील सर्व देशांकडून 2050 पर्यंत कार्बन न्यूट्रल अथवा नेट झीरो कार्बन उत्सर्जन व्हावे असा व्यापक प्रयत्न आहे. या अनुषंगाने अनेक देशांनी कार्बन न्यूट्रलची उद्दिष्ट ठरवली आहेत. अशा या वैश्विक पवित्र कामात खारीचा वाटा म्हणून पाचवड गाव सामील होत आहे. यासाठी पाचवडची ग्रामदैवत नवलाई देवीच्या नावाने ‘नवलाई देवराई’ ची संकल्पना अंमलात आणली जात आहे. त्याची सुरुवात 5 वटवृक्ष व 5 तुळशीची रोपे लावून करण्यात आली. कार्बन न्यूट्रल होण्यासाठी आवश्यक तेवढी झाडे लावून जगवण्याचा संकल्प ग्रामस्थांनी एकमताने केल्याची माहिती सरपंच सौ. अर्चना नितीन विसापुरे यांनी दिली.

यासंदर्भात झालेल्या ग्रामसभेमध्ये सुमारे 250 ते 300 नागरिक सहभागी झाले होते. आठवड्यातून एक तास यासाठी नागरिकांनी द्यावा, असेही यावेळी एकमताने ठरले. यावेळी प्रत्यक्ष वृक्ष लागवड व संगोपन करण्यासाठी नवलाई वृक्षसंवर्धन समितीची स्थापना करण्यात आली. दरम्यान, ग्रामपंचायत, स्वच्छ वसुंधरा अभियान पुणे, आधार ज्येष्ठ नागरिक संघ, नवलाई पतसंस्था, विकास सेवा सोसायटी, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, आपुलकी मतिमंद मुलांची शाळा आदी विविध संस्थांचे पदाधिकारी, कर्मचारी, शिक्षक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सूत्रसंचालन ग्रामविकास अधिकारी बी. के. चव्हाण यांनी केले. प्रास्ताविक युवा नेते अजित शेवाळे, स्वागत उपसरपंच कमलाकर गायकवाड यांनी केले. अनिल गायकवाड, रामचंद्र गायकवाड, आनंदराव गायकवाड, रमेश पारखे, लक्ष्मण जाधव, सुषमा पवार यांनी मार्गदर्शन केले. आभार सरपंच अर्चना विसापुरे यांनी मानले. या उपक्रमाची सुरुवात म्हणून मानकर्‍यांनी पालखीतून काढलेली नवलाई देवीच्या पादुकांची मिरवणूक खास आकर्षण ठरली. दरम्यान, कार्बन न्युट्रल गाव ही संकल्पना साकारल्यानंतर पर्यावरणाचा जागर होणार असून, तालुक्यात अनोखा संदेश पोहोचणार आहे.



Source link

झेरॉक्सला ‘मास्कड् आधार’चा पर्याय; शासनाचा नवा निर्णय | पुढारी

0


पुसेसावळी; पुढारी वृत्तसेवा :  आधार कार्डच्या झेरॉक्सचा वापर करून आजअखेर अनेक जणांची फसगत झाली आहे. ही फसगत टाळण्यासाठी आता मास्कड् आधार कार्डचा पर्याय समोर आला आहे. यापुढे मास्कड् आधार कार्डचा वापर करावा, असे आवाहन शासनाकडून करण्यात येत आहे. मास्कड् आधार कार्ड म्हणजे ई-आधार कार्ड होय. ज्यामध्ये 12 वर्णांऐवजी केवळ 4 वर्ण दिसतात. आधार कार्ड डेटा लीक झाल्याच्या बातमीनंतर यूआयडीएआयने मास्कड् आधारची संकल्पना सुरू केली आहे. जी नियमितपेक्षा अधिक सुरक्षित आहे. ते मिळवणे खूप सोपे आहे. यूआयडीएआय वेबसाईटवर जाऊन काही आवश्यक माहिती देऊन ते सहज डाऊनलोड केले जाऊ शकते.

मास्कड् आधार कार्ड हा आधार क्रमांक अर्धवट लपवल्याशिवाय सामान्य आधार कार्डासारखाच असतो. आधार क्रमांकाचे फक्त शेवटचे चार अंक दिसतात. मास्कड् आधार कार्डमध्ये नाव, जन्मतारीख, लिंग, पत्ता आणि क्यू.आर.कोड यासारखीच इतर माहिती असते. आधार कार्ड ऑनलाईन अगदी सहज डाउनलोड करु शकता.

आपण यूआयडीएआयच्या अधिकृत वेबसाईटवरून मास्कड् आधार ऑनलाईन डाउनलोड करू शकता. हे लक्षात घेण्यासारखे आहे की आपला मोबाईल क्रमांक यूआयडीएआय डेटाबेसमध्ये नोंदणीकृत असेल तरच आपण या सुविधेचा लाभ घेऊ शकता. मास्कड् आधार कार्ड डाउनलोड करण्यासाठी यूआयडीएआयच्या अधिकृत वेबसाईटला भेट देणे गरजेचे आहे. आधार डाऊनलोड असे करा.
ख हर्रींश विभागात आधार/ व्हीआयडी/ नोंदणी आयडी हा पर्याय निवडा. आता डशश्रशलीं र्ूेीी झीशषशीशपलश पर्यायामधून चरीज्ञशव -रवहररी वर टिक करा. त्यानंतर इतर आवश्यक माहिती एंटर करा आणि ठर्र्शिींशीीं जढझ वर क्लिक करा आणि ख -सीशश वर क्लिक करा. नंतर उेपषळीा वर क्लिक करा. आधारशी लिंक असलेल्या मोबाईल नंबरवर एक जढझ पाठवला जाईल. आता ओटीपी प्रविष्ट करा, द्रुत सर्वेक्षणासाठी ऊेुपश्रेरव -रवहररी वर क्लिक करा. यानंतर मास्कड् आधार कार्ड डाऊनलोड होईल.

The post झेरॉक्सला ‘मास्कड् आधार’चा पर्याय; शासनाचा नवा निर्णय appeared first on पुढारी.



Source link

Shyam Benegal: राष्ट्रीय पुरस्कार विजेते श्याम बेनेगल यांची दोन्ही मूत्रपिंड निकामी; घरीच सुरूये डायलिसिस

0
Shyam Benegal: राष्ट्रीय पुरस्कार विजेते श्याम बेनेगल यांची दोन्ही मूत्रपिंड निकामी; घरीच सुरूये डायलिसिस


श्याम बेनेगल यांनी केवळ चित्रपटच नाही, तर माहितीपट आणि जाहिरातीही बनवल्या आहेत. दैनिक भास्करच्या वृत्तानुसार, श्याम बेनेगल यांनी स्वतः सांगितले की, त्यांची प्रकृती ठीक नाही. त्यांच्यावर उपचार सुरू असून, डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. मात्र, किडनी निकामी झाल्याबद्दल त्यांनी काहीही सांगितले नाही. काही दिवसांपूर्वीपर्यंत श्याम बेनेगल बरे असल्याचे त्यांच्या कार्यालयातील लोकांनी सांगितले. मात्र, सध्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ते विश्रांती घेत आहेत.



Source link