Friday, June 26, 2026
Home Blog Page 3144

महाराष्ट्रातील 52 कारखान्यांना पाच हजार 176 कोटींचे कर्ज | पुढारी

0









सातारा : महेंद्र खंदारे केंद्र सरकारने इंधन आयात कमी करण्यासाठी इथेनॉल उत्पादनाला प्रोत्साहन देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणीही प्रभावीपणे सुरू आहे. इथेनॉल उत्पादनात महाराष्ट्राने आघाडी घेतली आहे. इथेनॉलचे नवीन प्रकल्प सुरू करणे व सध्याच्या प्रकल्पाचा विस्तार करण्यासाठी महाराष्ट्रातील कारखान्यांनी प्रस्ताव सादर केले होते. त्यातील 52 कारखाने व कंपन्यांना केंद्राने 5 हजार 176.17 कोटींचा निधी कर्ज स्वरूपात मंजूर केला आहे. त्यामुळे पुढील हंगामात इथेनॉल उत्पादनात मोठी वाढ होण्याची शक्यता आहे.

देशात मोठ्या प्रमाणात खनिजतेल आयात करावे लागते. यासाठी मोठया प्रमाणात परकीय गंगाजळी खर्च होत असते. त्यामुळे यावर उपाय म्हणून सरकारने इथेनॉल उत्पादन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार 2025 पर्यंत पेट्रोलमध्ये 25 टक्के इथेनॉल मिश्रण करण्याचे ध्येय सरकारने ठेवले आहे. यापूर्वीची उद्दिष्टे वेळेपूर्वीच पूर्ण झाल्याने वर्ष सरेल तसे उद्दिष्ट वाढवले जात आहे. यामध्ये सरकारला यशही येत आहे. इथेनॉलमुळे शिल्लक साखरेचा प्रश्न मिटला आहे. त्यामुळे अनेक साखर कारखान्यांनी साखर उत्पादनाऐवजी इथेनॉल उत्पादन वाढवले आहे.

बहुतांश कारखान्यांकडे इथेनॉलचे प्रकल्प नाहीत. तर अनेकांचे प्रकल्प कमी क्षमतेचे आहे. यासाठी कारखान्यांनी केंद्राकडे हे प्रकल्प सुरू करण्यासाठी कर्ज मागितले आहे. यासाठीचे प्रस्ताव कारखान्यांकडून केंद्राकडे गेले आहे. 13 फेब्रुवारीअखेरपर्यंत राज्यातील 52 कारखाने व कंपन्यांना तब्बल 5 हजार 176 कोटी 17 लाखांचे कर्ज मंजूर झाले आहे. हे कर्ज इथेनॉल उत्पादनासाठी वापरले जाणार आहे. त्यामुळे पुढील हंगामात साखर उत्पादन घटून इथेनॉल निर्मिती वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, देशातील 299 कारखान्यांना हे कर्ज मंजूर झाले आहे. यामध्ये सहकारी व खासगी कारखाने आणि कंपन्यांचाही समावेश आहे. यामध्ये उसापासून व धान्यापासून इथेनॉल निर्मिती केली जाणार आहे.

देशात महाराष्ट्र आघाडीवर

इथेनॉल उत्पादनात देशात महाराष्ट्र आघाडीवर असून त्यानंतर उत्तर प्रदेश, कर्नाटक, गुजरात, तामिळनाडू या राज्यांमध्ये इथेनॉल उत्पादन केले जात आहे.











Source link

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली संत ज्ञानेश्वर पालखी मार्गाची हवाई पाहणी | पुढारी

0









पाचगणी : आळंदी व पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणार्‍या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाची शनिवारी (दि. 11) केंद्रीय वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, अधिकारी यांच्यासह पाहणी केली. श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग – 965) हा 234 किमी लांबीचा असून हडपसर (पुणे) – सासवड – जेजुरी – निरा – लोणंद – फलटण – नातेपुते – माळशिरस – बोंडले – वाखरी – पंढरपूर असा आहे. या चौपदरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वारकर्‍यांच्या सोयीसाठी स्वतंत्र पालखी मार्ग समाविष्ट करण्यात आला आहे.

या मार्गावर एकूण 12 पालखी स्थळे आहेत. पालखी मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूस वृक्षारोपण करण्याबरोबरच आवश्यक त्या ठिकाणी महाराष्ट्रातील संत महात्म्यांची शिल्पे, भित्तीचित्रे, अभंगवाणी आदी बाबींवर आधारित काम करण्यात येणार आहे. सद्यस्थितीत रस्त्याच्या मध्यात 57,200 व दोन्ही बाजूस मिळून 18,840 वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.











Source link

अंधश्रद्धेच्या भुताला पचेना विज्ञानाचा उतारा | पुढारी

0


सातारा; मीना शिंदे :  दावजी पाटील मंदिरातील घटनेमुळे जिल्ह्यात अंधश्रध्देची पाळेमुळे अद्याप कायम असल्याचे समोर आले. ज्यांनी अंधश्रध्दा निर्मूलनाला बळ देण्यासाठी जादूटोणा विरोधी कायदा करण्यासाठी आपले आयुष्य वेचले त्याच डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या जन्मभूमीची शोकांतिकाच म्हणावी लागेल. यापूर्वीही मंत्र-तंत्र व नरबळीच्या अनेक घटना समोर आल्या असून भूतबाधा उतरवणे, देवीचा कोप टाळण्यासाठी जटा राखणे अशा अनेक घटनांमुळे अंधश्रध्देच्या भुताला विज्ञानाचा उतारा पचत नसल्याचे वास्तव आहे. बुवाबाजीच्या थोतांडाला आळा घालण्यासाठी कायद्याची कठोर अंमलबजावणी करण्याची गरज आहे.

सातारा येथील डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीव्दारे भूतबाधा व बुवाबाजीचे थोतांड कमी करण्यासाठी आपले आयुष्य वेचले. अंधश्रध्दा निर्मूलनाला बळ देण्यासाठी जादूटोणा विरोधी कायदा करण्यासाठी पाठपुरावा केला. त्याच डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या जिल्ह्यात आजही अंधश्रध्देला खतपाणी घालण्याच्या घटना घडत आहेत. गुप्तधनासाठी संपूर्ण कुटंबाची हत्या घडवणार्‍या सांगलीच्या म्हैसाळ प्रकरणाने समाजमन ढवळून निघाले होते. त्यानंतर जिल्ह्यात पाटण तालुक्यामध्ये गुप्तधनाच्या लालसेने कुटुंबीयांकडूनच अल्पवयीन मुलीचा बळी देण्यात आला होता. मागील आठवड्यामध्ये सुरुर, ता. वाई येथील दावजी पाटील मंदिरामध्ये मंत्र-तंत्र व अघोरी विद्येचा प्रकार समोर आल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली. जिल्ह्यात वारंवार घडणार्‍या बुवाबाजी, भोंदूगिरीच्या घटनांनी अंनिसचे जनक डॉ. नरेंद्र दाभोळकरांच्या जिल्ह्यात अद्याप अंधश्रध्देची पाळेमुळे कायम आहेत.
विज्ञान व तंत्रज्ञान युगात भूतबाधा, गुप्तधन, अनिष्ठ चालीरिती, बुवाबाजी अशा अनेक घटना आजही घडत आहेत. अशिक्षित व भाबड्या कष्टकरी वर्गाच्या अज्ञान व असायतेचा गैरफायदा घेत बुवाबाजीची दुकानदारी सुरू असल्याचे दाहक वास्तव समोर येत आहे. अंधश्रध्देला मूठमाती देण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृतीबरोबरच जादूटोणा विरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी तसेच अशा केसमध्ये जास्तीत जास्त शिक्षा लागणे आवश्यक आहे.

नागरिकांनी पुढे येण्याची गरज…

कष्टकरी वर्ग आजही अज्ञान व अंधश्रध्देच्या प्रभावाखाली येत आहे. त्यांच्यामध्ये अनिष्ठ रुढी परंपरांचा पगडा अद्याप कायम आहे. त्यामुळे ग्रामीण भागात परडी, मांड भरणे, म्हसोबाला कोंबडा देणे, देवाचा कोप होईल म्हणून केसातील गुंत्याची जट राखणे असे प्रकार होत आहेत. मात्र, त्याकडे सोयीने दुर्लक्ष केले जाते. यातूनच पुढे नरबळीसारख्या अघोरी कृत्यांना बळ मिळते. त्यामुळे आपल्या आजूबाजूला होणार्‍या छोट्या-मोठ्या घटनांमध्येही तक्रार करण्यासाठी नागरिकांनी पुढे येण्याची गजर आहे.

The post अंधश्रद्धेच्या भुताला पचेना विज्ञानाचा उतारा appeared first on पुढारी.



Source link

Rang Maza Vegla: ‘रंग माझा वेगळा’मधून ‘या’ दोन मुख्य कलाकारांची एक्झिट? चर्चांना उधाण!

0
Rang Maza Vegla: ‘रंग माझा वेगळा’मधून ‘या’ दोन मुख्य कलाकारांची एक्झिट? चर्चांना उधाण!


‘रंग माझा वेगळा’ या मालिकेत ‘आदित्य इनामदार’ आणि ‘ललित इनामदार’ हे पात्र साकारणारे दोन्ही कलाकार गेल्या काही दिवसांपासून मालिकेत दिसत नाहीयेत. तर, काहीच दिवसांपूवी ‘आदित्य’चे पात्र साकारण्यासाठी एका नव्या अभिनेत्याची एन्ट्री झाली आहे. या आधी हे पात्र अभिनेता अंबर गणपुले साकारत होता. मात्र, आता तो ‘लोकमान्य’ या मालिकेत दिसत आहे. यामुळे त्याची जागा आता नव्या अभिनेत्याने घेतली आहे. तर, ललित इनामदार हे पात्र सध्या परगावी गेल्याचे दाखवण्यात आले आहे.



Source link

सातारा: रणजीतसिंह निंबाळकर, नितीन गडकरींनी केली ‘पालखी मार्गा’ची हवाई पाहणी | पुढारी

0









पाचगणी, इम्तियाज मुजावर : आळंदी व पंढरपूर या दोन महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना जोडणाऱ्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग हडपसर (पुणे) – सासवड – जेजुरी – निरा – लोणंद – फलटण – नातेपुते – माळशिरस – बोंडले – वाखरी – पंढरपूर असा २३४ किलोमीटर लांबीचा आहे. या चौपदरी मार्गाची आज (दि.११) केंद्रीय वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, अधिकारी यांच्यासह पाहणी केली.

श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग (राष्ट्रीय महामार्ग – ९६५) हा २३४ किमी लांबीचा मार्ग हडपसर (पुणे) – सासवड – जेजुरी – निरा – लोणंद – फलटण – नातेपुते – माळशिरस – बोंडले – वाखरी – पंढरपूर असा आहे. या चौपदरी रस्त्याच्या दोन्ही बाजूला वारकऱ्यांच्या सोयीसाठी स्वतंत्र पालखी मार्ग समाविष्ट करण्यात आला आहे. या मार्गावर एकूण १२ पालखी स्थळे असून याठिकाणी वारकऱ्यांसाठी आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात येतील.

सदर पालखी मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजूंस वृक्षारोपण करण्याबरोबरच आवश्यक त्या ठिकाणी महाराष्ट्रातील संत महात्म्यांची शिल्पे, भित्तीचित्रे, अभंगवाणी आदी बाबींवर आधारित काम करण्यात येईल. यामुळे मार्गाच्या सौंदर्यात भर पडेल तसेच वारकऱ्यांना वारीच्या दरम्यान या सुविधांचा फायदा होईल.

पालखी मार्गावर विशिष्ट प्रकारच्या वृक्षांची लागवड करण्यात येणार असून यामध्ये विशेषतः चंदन, तुळशी, इतर सुगंधित वृक्षांबरोबरच वड, कडुनिंब, पिंपळ, चिंच या सावली देणाऱ्या वनौषधी वृक्षांची लागवड करण्यात येत आहे. सद्यस्थितीत रस्त्याच्या मध्यात ५७,२०० व दोन्ही बाजूस मिळून १८,८४० वृक्षांची लागवड करण्यात आली आहे.

हेही वाचा 











Source link

Aai Kuthe Kay Karte: अरुंधतीची पाठवणी करताना देशमुख कुटुंब झालं भावूक; कांचन आजीकडून मिळालं खास गिफ्ट!

0
Aai Kuthe Kay Karte: अरुंधतीची पाठवणी करताना देशमुख कुटुंब झालं भावूक; कांचन आजीकडून मिळालं खास गिफ्ट!


Aai Kuthe Kay Karte Latest Update: लग्नाला संमती देऊन आधीच कांचनने सगळ्यांना सरप्राईज दिले होते. मी अरुंधतीचं, माझ्या मुलीचं कन्यादान करेन, असं म्हणत कांचन आजीने अरुंधतीचा मुलगी म्हणून स्वीकार केला आहे.



Source link

Gautami Patil: लावणीनंतर आता गौतमी पाटील गाणं गाणार? उत्कर्ष शिंदेच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण!

0
Gautami Patil: लावणीनंतर आता गौतमी पाटील गाणं गाणार? उत्कर्ष शिंदेच्या पोस्टमुळे चर्चांना उधाण!


उत्कर्ष शिंदे याने फोटो शेअर करून, कॅप्शनमध्ये नव्या गाण्याच्या घोषणेसोबतच गौतमी पाटीलला देखील टॅग केले आहे. यानंतर आता उत्कर्षच्या या नव्या प्रोजेक्टमध्ये गौतमीचा देखील सहभाग असणार आहे. लावणीनंतर आता गौतमी पाटील तिच्या आवाजाची जादू देखील प्रेक्षकांना दाखवणार असल्याचे बोलले जात आहे. आता, गौतमीचा नवा प्रोजेक्ट येणार म्हणजे त्याची हवा तर होणारच! उत्कर्षच्या या घोषणेनंतर आता त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकतेचे वातावरण निर्माण झाले आहे.



Source link

कराड : येणपेत रिक्षा व ट्रॅक्टरचा भीषण अपघात; कोल्‍हापूर जिल्‍ह्यातील एकाच कुटुंबातील ३ जण ठार | पुढारी

0









उंडाळे ; पुढारी वृत्तसेवा कराड ते कोथरूड जाणाऱ्या रोडवर येणपे तालुका कराड गावच्या हद्दीत रिक्षा व ट्रॅक्टर यांच्यामध्ये भीषण अपघात झाला. या अपघातात एकाच कुटुंबातील तीनजण जागीच ठार झाले. तर एकजण गंभीर जखमी झाला. हा अपघात आज (शनिवार) सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास झाला.

महारूगडे कुटुंबीय हे मुळचे शाहुवाडी तालुक्‍यातील आहेत. सध्या ते पुण्यात असतात. दरम्‍यान पणुंद्रे तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर येथे गावच्या यात्रेसाठी ते पुण्याहून रिक्षाने पणुंद्रेकडे जात होते. यावेळी काळाने या कुटुंबावर घाला घातला. यावेळी रिक्षा आणि ट्रॅक्‍टर यांच्यात भीषण अपघात झाला. यामध्ये सुवर्ण सुरेश महारुगडे, सुरेश सखाराम महारुगडे, समीक्षा सुरेश महारुगडे (सर्व राहणार पनुंद्रे तालुका शाहुवाडी जिल्हा कोल्हापूर) अशी अपघातात ठार झालेल्यांची नावे आहेत.

तर मुलगा समर्थ सुरेश महारुगडे हा गंभीर जखमी झाला असून, ग्रामस्थांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलवले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

हेही वाचा : 











Source link

Oscars 2023 : ऑस्कर सोहळ्यात ‘नाटू नाटू’ गाण्यावर परफॉर्मन्स देणार नाहीत रामचरण-ज्युनियर एनटीआर!

0
Oscars 2023 : ऑस्कर सोहळ्यात ‘नाटू नाटू’ गाण्यावर परफॉर्मन्स देणार नाहीत रामचरण-ज्युनियर एनटीआर!


यंदा ऑस्करचे हे ९५वे वर्ष असणार आहे. या ‘नाटू नाटू’ या गाण्यावर कोण परफॉर्मन्स सादर करणार यावर बोलताना ज्युनियर एनटीआरने सांगितले की, एमएम कीरावानी, राहुल सिपलीगंज आणि काल भैरव या गाण्यावर परफॉर्म करतील. यावेळी केवळ कलाकार नव्हे तर, संपूर्ण देश या सोहळ्यात मानाने सहभागी होणार आहे, असे देखील अभिनेता यावेळी म्हणाला. ‘नाटू नाटू’ या गाण्याला आणि ‘आरआरआर’ चित्रपटाला चांगला प्रतिसाद मिळाला आहे.



Source link

Urfi Javed: तिला आता मुंबईत राहूच देणार नाही; सोशल मीडिया स्टारने उर्फीला पाठवली कायदेशीर नोटीस!

0
Urfi Javed: तिला आता मुंबईत राहूच देणार नाही; सोशल मीडिया स्टारने उर्फीला पाठवली कायदेशीर नोटीस!


Legal Notice To Urfi Javed : उर्फी जावेद आणि सोशल मीडिया इन्फ्लूएन्सर फैजान अन्सारी यांच्यात कपड्यांवरून सुरू झालेले भांडण आता कोर्टात पोहोचले आहे.



Source link