
Madhuri Dixit Mother: वयाच्या ९१व्या वर्षी माधुरी दीक्षितच्या आईचे निधन झाले आहे.
Source link

Madhuri Dixit Mother: वयाच्या ९१व्या वर्षी माधुरी दीक्षितच्या आईचे निधन झाले आहे.
Source link

कोस्टा टिचचे खरे नाव Costa Tsobanoglou असे आहे. त्याचा जन्म १९९५ साली नेलस्प्रूट येथे झाला होता. कोस्टाची एक्सिवेट आणि Nkalakatha या हिट रॅपसाठी विशेष ओळखला जात होता. त्याच्या अचानक निधनाने साउथ अफ्रीकेच्या म्यूझिक इंडस्ट्रीला धक्का बसला आहे.

सोनी मराठी वाहिनीवरील ‘ज्ञानेश्वर माउली’ या मालिकेने प्रेक्षकांना संतांची परंपरा उलगडत भक्तिरसात तल्लीन केले आहे. माउली आणि त्यांची भावंडं, यांचे चमत्कार, रेड्यामुखी वेद, सार्थ श्रीज्ञानेश्वरी, विश्वरूप दर्शन, पसायदान हे सारं काही प्रेक्षकांना विशेष भावलं. प्रेक्षक हरिभक्तीच्या या अलौकिक प्रवासाचे साक्षीदार झाले आहेत. मालिकेतल्या प्रत्येक व्यक्तिरेखेवर प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं आहे. पण आता मालिकेत विविध संतांची मांदियाळी अनुभवायला मिळत असताना यात आणखी एका संताचा प्रवेश होणार आहे.

प्रसिद्ध चित्रपट अभिनेते सतीश कौशिक यांच्या आकस्मिक निधनाने सर्वांनाच धक्का बसला आहे. होळीच्या दिवशी सतीश कौशिश हे दिल्लीतील एका फार्म हाऊसवर पार्टीसाठी गेले होते. याच ठिकाणी त्यांची प्रकृती ढासळू लागली होती. त्यानंतर ९ मार्च रोजी त्यांचे निधन झाले. वैद्यकीय तपासात सतीश कौशिक यांच्या मृत्यूचे कारण हृदयविकाराचा झटका असल्याचे सांगण्यात आले. मात्र, पोलीस आता या संपूर्ण प्रकरणाचा कसून तपास करत आहेत. अशातच आता एका महिलेने दावा केला आहे की सतीश कौशिक यांना तिच्या पतीने मारले आहे.

तासवडे टोलनाका; प्रवीण माळी : सन 2013 च्या कायद्यानुसार सीएसआर निधी देणे कंपन्यांसाठी बंधनकारक करण्यात आले आहे. हा निधी देताना स्थानिक ग्रामपंचायतींसह गावांचा विचार होणे क्रमप्राप्त असतानाही काही कंपन्या वगळता बहुतांश कंपन्यांकडून स्थानिक गावांकडे दुर्लक्ष करत आहेत. त्यामुळे स्थानिक ग्रामपंचायतींकडून तासवडे एमआयडीसीमधील कंपन्यांबाबत तक्रार असूनही एमआयडीसी प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात आहे. याशिवाय काही कंपन्या इतर जिल्ह्यांना सीएसआर फंड देत असल्याने संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
ज्या भागात कंपन्या सुरू केल्या जातात, त्यानंतर त्या ठिकाणच्या नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर संबंधित कंपन्यांकडून केला जातो. त्या बदल्यात परतफेड करण्याची जबाबदारी शासनाकडून सीएसआर निधी तरतूद केली आहे. कंपन्यांकडून काही निधी स्थानिक ग्रामपंचायतींसह परिसरातील गावांच्या विकासासाठी दिला जाणे अपेक्षित आहे. मात्र, असे असूनही तासवडे एमआयडीसीतील अपवाद वगळता बहुतांश कंपन्यांकडून आजवर स्थानिक ग्रामपंचायतींना सीएसआर फंड देण्याकडे कानाडोळा केला जात आहे. सीएसआर निधीतून गावच्या विकासात भर पडेल. तसेच या निधीचा वापर करून शिक्षण, रस्ते, गटर यासह अन्य पायाभूत सुविधांना हातभार लागेल, अशी अपेक्षा ग्रामपंचायतींसह स्थानिकांना आहे.
मात्र असे असूनही कंपन्यांकडून नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करताना जल प्रदूषण, वायू प्रदूषण यासह पर्यावरणाची हानी स्थानिकांना सहन करावी लागतो आहे. असे असूनही अपवाद वगळता बहुतांश कंपन्या स्थानिकांकडे तसेच ग्रामपंचायतींकडे दुर्लक्ष करत आहेत. याबाबत वारंवार विनंती करूनही एमआयडीसी कंपन्यांकडून तसेच प्रशासाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने एमआयडीसी परिसरातील विविध गावांमधून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.
ज्या कंपन्यांचा नफा 5 कोटींहून अधिक आहे. तसेच पत 500 कोटींपेक्षा जास्त असून वार्षिक उलाढाल 1 हजार कोटींहून अधिक असणार्या कंपन्यांना सीएसआर निधी देणे अनिवार्य आहे. मात्र, अनेक कंपन्या तोटा दाखवतात आणि स्थानिक ग्रामपंचायतींवर अन्याय करत आहेत, असा दावा बेलवडे हवेलीचे स्थानिक रहिवाशी महेश कचरे यांनी केला आहे.

पाटण; गणेशचंद्र पिसाळ : पाटण तालुक्यात गेल्या काही दशकांपासून कोयना अभयारण्य, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प, इको सेन्सिटिव्ह झोन, पश्चिम घाट प्रकल्प यासारख्या प्रकल्पांमुळे स्थानिक जनतेवर जे कायदे, नियम, अटी लादण्यात आल्याने स्थानिकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. या प्रकल्पांमुळे स्थानिकांना उदरनिर्वाहासह त्यांच्या घटनात्मक अधिकारांवरदेखील गंडांतर आलेले आहे. स्वाभाविकच या सर्व अन्यायाविरुद्ध आजवर अनेकदा आंदोलने झाली. मात्र स्थानिकांना न्याय मिळालेला नाही. आता या प्रकल्पांसह जाचक अटी व होणार्या नुकसानीमुळे स्थानिकांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे.
स्थानिकांच्या मागण्यांमध्ये कोअर व बफर झोनचे नकाशे कोयनानगर येथे उपलब्ध करून द्यावेत, कोअर तसेच बफर झोनच्या हद्दींवर दगड लावून द्यावेत, खाजगी सर्व्हे नंबर जमिनी कोअर झोनमध्ये दाखवण्यात आलेले आहेत, त्या चुका दुरुस्त करून ते क्षेत्र व चुकीच्या नोंदी वगळाव्यात, कोअर झोनमधून वगळलेल्या जमिनींची सातबारा रेकॉर्ड शासन दरबारी आजही वनविभागाचे शिक्के आहेत, ते काढून सातबारा कोरा करून देण्यात यावा. वनखात्याने चुकीच्या नोंदी वगळून सातबारा दुरुस्त करून द्यावा. कोअर झोनमध्ये अद्यापही खाजगी जमिनी आहेत, त्या ठिकाणी शेतकर्यांना वहिवाट करून दिली जात नाही. त्यामुळे जमिनींचा रोख मोबदला देण्यात यावा.
बफर झोनमधील स्थानिक लोकांना पर्यटन व्यवसायाकरिता 70 टक्के सबसिडी द्यावी. शासनाच्या जाचक अटींमुळे बँकांकडून पर्यटन तसेच हॉटेल व्यवसायाला कर्जही मिळत नाही. त्यामुळे शासनाने बँकांना निर्देश देणे आवश्यक आहे. औषधी व सुगंधी वनस्पती व ग्रो फॉरेस्टची शेती करण्यासाठी स्थानिकांना शेती कर्ज देण्यात यावे. वन्य प्राण्यांकडून नुकसान केलेल्या जनावरांची नुकसान भरपाई देताना बाजार भावाप्रमाणे गाई, म्हैशी, शेळ्या, मेंढ्या, कोंबड्या इत्यादी पाळीव प्राण्यांना भरपाई द्यावी. वन्य प्राण्यांकडून नुकसान झाल्यापासून 15 दिवसांत भरपाई द्यावी, कोयना धरणांतर्गत कोअर झोनमध्ये सन 1985 सालानंतर कोयना कॅचमेंट क्षेत्रात ज्या लोकांच्या जमिनी मालकीमध्ये कौटुंबिक वाटप खरेदी विक्री अथवा अदलाबदलीच्या स्वरूपात झालेले जमिनींचे हस्तांतरण हे त्या – त्या व्यक्तींना सन 1985 सालच्या पूर्वीचे रेकॉर्ड ग्राह्य धरून नुकसान भरपाई द्यावी.
कोअर झोनमधील जल पर्यटनासाठी केरळ राज्यातील पेरियार अभयारण्याच्या धरतीवर जल पर्यटनासाठी मान्यता द्यावी. स्थानिक लोकांना बोटिंगच्या माध्यमातून व्यवसाय, नोकरी व रोजगार उपलब्ध करून द्यावा. धरण सुरक्षेची कारणे न देता, कोणतीही बंधने न घालता कोयनानगर अवसरी सेंटर, तापोळा, बामणोली ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दरे गावापर्यंत हे विभाग जलमार्गाने जोडावेत. अवसरी सेंटर हे रस्त्याने अथवा रोप वे ने जोडण्यात यावे अशी स्थानिक प्रकल्पग्रस्तांची मागणी आहे. मात्र मागील सहा दशकांपासून स्थानिकांची अक्षरशः परवड सुरू असून आता प्रकल्पग्रस्तांच्या सहनशीलतेचा अंत झाल्यासारखी परिस्थिती आहे.
The post पर्यावरणपूरक प्रकल्पात स्थानिकांचा बळी appeared first on पुढारी.

आपल्या गोड आवाजाने श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी लोकप्रिय गायिका म्हणजे श्रेया घोषाल. आज १२ मार्च रोजी श्रेयाचा वाढदिवस आहे. तिचा जन्म दुर्गापूर येथील बंगाली कुटुंबात झाला. श्रेयाने ‘सारेगमप’ या शोमध्ये सहभाग घेतला होता. तिने हा शो जिंकला आणि तिचे संपूर्ण आयुष्य बदलले. तिने आजवर मराठी, कन्नड, तमिळ, मल्याळम, तेलुगू, बंगाली, आसामी आणि काही भाषांमध्ये गाणी गायली आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का चक्क एका देशात ‘श्रेया घोषाल दिन’ साजरा केला जातो. चला जाणून घेऊया हा देश कोणता आहे.
भिलार / पाचगणी; पुढारी वृत्तसेवा : सुरुवातीपासून सत्तेत असणार्या राष्ट्रीय पक्ष काँग्रेससह सर्वच विरोधकांची आजची परिस्थिती काय झाली आहे हे आपण पाहतोय. अलीकडच्या काळात भाजपने भरारी घेत देशात नव्हे जगात एक नंबरचा पक्ष म्हणून नावलौकिक प्राप्त केला आहे. या शिबिरातून कार्यकर्त्यांनी स्वबळावर उभे राहण्याची प्रेरणा आणि सक्षम बनण्याचा मंत्र घेवून जावे, असे आवाहन खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी केले तर सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकवणारच, अशी गर्जना जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांनी केली.
भिलार, ता. महाबळेश्वर येथील जन्नीमाता मंदिर सभागृहात सातारा जिल्हा भाजपा कार्यकारिणीची बैठक आणि दोन दिवसीय अभ्यासवर्ग शिबिराला शनिवारी प्रारंभ झाला. यावेळी खा. उदयनराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, माजी आमदार मदनदादा भोसले, अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, धैर्यशील कदम, मनोज घोरपडे, प्रदेश सरचिटणीस सुदर्शन पाटस्कर, दत्ता थोरात, सुवर्णा पाटील, रामकृष्ण वेताळ, अविनाश फरांदे, डॉ. सौ. सुरभी चव्हाण-भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.
खा. उदयनराजे पुढे म्हणाले, आपल्या देशात असणारा शेतकरीवर्ग सधन झाला तरच व्यवसाय चालणार आहेत. त्यातून आपल्या शासनाच्या विविध योजना तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचवण्याचे काम कार्यकर्त्यांनी करावे. जास्तीत जास्त लोक पक्षाशी जोडण्याचे काम केले जाईल.
आ. जयकुमार गोरे यांनी घणाघाती भाषण केले. ते म्हणाले, सातारा जिल्हा परिषदेवर भाजपचा झेंडा फडकेल तेव्हाच आपण जिल्ह्यात एक नंबर ठरलो, असे मी समजेन. त्यासाठी आपण आजपासून कामाला लागू. कोणत्याही परिस्थितीत झेडपीवर भाजपाचा झेंडा फडकावणारच, असा निर्धार त्यांनी केला. अंगणवाडीसेविका, आशा यांना आमच्या सरकारनं मानधन वाढवून दिले. याचा विरोधकांना आनंद वाटत नाही, अडीच वर्षात त्यांना निर्णय घेता आले नाहीत पण जेव्हा आमच्या सरकारने मानधन वाढवलं तेव्हा आणखी जास्त करायला पाहिजे होतं, असा डांगोरा विरोधक पिटत आहेत. केवळ तीन चार वेळा मंत्रालयात जाणारा, शेतकर्यांचे प्रश्न माहीत नसलेला मुख्यमंत्री देशात पाचव्या नंबरला येतो ही मीडिया मॅनेजमेंटची किमया असल्याचा टोलाही आ. गोरे यांनी उद्घव ठाकरे यांना लगावला.
नरेंद्र पाटील म्हणाले, ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद या निवडणुकीसाठी आपण तयारी केली आहे का? याचे आपण सर्वांनी आत्मचिंतन करणे गरजेचे आहे. आगामी काळात आपल्याला फक्त लढायचे नाही तर जिंकायचे आहे हाच निर्धार करून कार्यकर्त्यांनी कामाला लागावे.
यावेळी चाकोरीबाहेर जावून समाजात काहीतरी वेगळं काम करणार्या महिलांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून गौरव करण्यात आला. दरम्यान, उद्या या शिबिरात विविध मान्यवरांचे महत्त्वपूर्ण मार्गदर्शन होणार आहे. दरम्यान, महिला आणि शेतकर्याला ताकदवान बनवणारा अर्थसंकल्प मांडल्याबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अभिनंदनाचा ठराव टाळ्यांच्या गजरात मंजूर करण्यात आला.
<p>बावधन बागड यांच्या यात्रेचा मुख्य आज दिवस हे बगाड पालखीसह कृष्णा नदीच्या तीरावर काठी असलेल्या परिसरात नेण्याचं काम सध्या भाविक मंडळी करत आहेत. या हे बगाड अवघ्या काही वेळा मध्ये नदीकाठची पोहोचेल. हे बगाड ओढण्यासाठी खिलार बैल या भागाला जोडली जातात एक सारखा असलेला सर्वांचा पोशाख गुलालाची उधळण हा संपूर्ण परिसर मात्र यामध्ये एक वेगळेच चित्र पहायला मिळते. </p>
Source link
<p>साताऱ्यातल्या वाई तालुक्यातील प्रसिद्ध बावधनच्या बगाड यात्रेचा आजचा मुख्य दिवस आहे… आजच्या दिवशी बगाड्यावर बगाडाला टांगलं जातं.. या बगाड यात्रेचं दृश्य पाहण्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक बगाड यात्रेसाठी बावधनमध्ये दाखल झालेत… </p>
Source link