Sunday, June 28, 2026
Home Blog Page 3130

Swara Bhaskar: पाकिस्तानमधून आलेला स्वराच्या लग्नातील लेहंगा पाहिलात का?

0
Swara Bhaskar: पाकिस्तानमधून आलेला स्वराच्या लग्नातील लेहंगा पाहिलात का?



Swara Bhaskar Wedding: फहदच्या कुटुंबीयांनी स्वरासाठी पाकिस्तानमधील एका प्रसिद्ध डिझायनरकडून लेहंगा मागावला होता



Source link

Chitra Gaurav 2023: चित्रपट सृष्टीच्या लाडक्या अशोक मामांचा ‘जीवनगौरव पुरस्कारा’ने सन्मान होणार!

0
Chitra Gaurav 2023: चित्रपट सृष्टीच्या लाडक्या अशोक मामांचा ‘जीवनगौरव पुरस्कारा’ने सन्मान होणार!


अशोक सराफ यांची चित्रपटसृष्टीतली ओळख म्हणजे ‘अशोक मामा’! खळखळून हसवणारे आणि तेवढेच अंतर्मुख करणारे अशोक मामा. पन्नासच्या वर हिंदी सिनेमे, दोनशेच्या आसपास मराठी सिनेमे, पंधरा टीव्ही मालिका, पंचवीस नाटकं आणि पुरस्काराचं अर्धशतक. एवढा प्रचंड प्रवास आहे मामांचा, जो आजही तेवढ्याच ताकदीने चालू आहे. अभिनय शिकायला कुठल्या शाळेत जायची गरज नाही. अशोक सराफ नावाचं विद्यापीठ आहे केवळ बघत राहिलो तरी खूप काही शिकण्यासारखं आहे.



Source link

Shivsena Leader Satara Firing : साताऱ्यात एक तास फायरिंग, दोघांची हत्या; शिवसेनेच्या नेत्याला अटक

0



<p>Shivsena Leader Satara Firing : साताऱ्यात एक तास फायरिंग, दोघांची हत्या; शिवसेनेच्या नेत्याला अटक</p>



Source link

Ashutosh Rana: सेटवर आशुतोष राणाने राजकुमारच्या लगावली कानशिलात आणि मग…

0
Ashutosh Rana: सेटवर आशुतोष राणाने राजकुमारच्या लगावली कानशिलात आणि मग…


बॉलिवूडमधील अतिशय लोकप्रिय अभिनेता म्हणून आशुतोष राण ओळखला जातो. तो लवकरच ‘भीड’ या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. या चित्रपटात आशुतोष सोबत अभिनेता राजकुमार राव आणि अभिनेत्री भूमी पेडणेकर दिसणार आहेत. तिघेही कलाकार या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसत आहेत. दरम्यान, आशुतोष राणाने एका मुलाखतीमध्ये राजकुमार रावच्या खरोखर कानशिलात लगावल्याचा किस्सा सांगितला आहे.



Source link

Aishwarya Rajinikanth: रजनीकांत यांच्या लेकीच्या घरी जबरी चोरी; चोरट्यांनी लांबवलं ६० तोळे सोनं

0
Aishwarya Rajinikanth: रजनीकांत यांच्या लेकीच्या घरी जबरी चोरी; चोरट्यांनी लांबवलं ६० तोळे सोनं


Aishwarya Rajinikanth jewellery missing case: ऐश्वर्याच्या घरातील लॉकरमधून सोन्याचे आणि हिऱ्याचे दागिने चोरीला गेल्याची घटना घडली आहे. चोरीची माहिती मिळताच ऐश्वर्याने तातडीने पोलिसांत तक्रार दाखल केली.



Source link

पाटण गोळीबार प्रकरण : शिवसेनेचे मदन कदम यांच्यासह कुटुंबातील चौघांना अटक   | पुढारी

0


पाटण; पुढारी वृत्तसेवा : पाटण तालुक्यातील कोरडेवाडी येथे राजकीय वैमनस्यातून केलेल्या गोळीबारात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवारी (दि.१९) रात्री घडली. श्रीरंग लक्ष्मण जाधव (वय ४८) व सतीश बाळू सावंत (वय ३५) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. तर प्रकाश लक्ष्मण जाधव (वय ४४) हे यात गंभीर जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी शिवसेनेचे ठाण्याचे माजी नगरसेवक व माजी सातारा जिल्हा संपर्क प्रमुख मदन कदम याच्यासह कुटुंबातील चौघांना ताब्यात घेतले आहे. मदन कदम यांची पत्नी नीता मदन (वय ४५), मुलगा गौरव कदम (वय २२), योगेश कदम (वय २५, सर्वजण रा. शिद्रुकवाडी ता . पाटण) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.

या घटनेची पाटण पोलिसांत नोंद झाली असून, याबाबतची फिर्याद प्रकाश जाधव यांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच दिवसांपूर्वी मोरणा गुरेघर रस्त्यावर कोरडेवाडी गावच्या हद्दीत गाडीची धूळ अंगावर उडाली म्हणून फिर्यादी प्रकाश जाधव यांचे चुलत भाऊ सखाराम जाधव यांना मदन कदम व त्यांच्या मुलांनी मारहाण केली होती. त्यावेळी भांडणात मदन कदम यांनी श्रीरंग जाधव यांनाही शिवीगाळ केली होती. तसेच जर याबाबत कोणी विचारणा करायला आले तर गोळ्या घालीन, अशी धमकी दिली. सखाराम जाधव यांनी घडलेली घटना प्रकाश व श्रीरंग यांना सांगितली व याप्रकरणी पाटण पोलिसांत तक्रार दाखल केली.

रविवारी (दि.१९) कोरडेवाडी, धावडे गावासह स्थानिक विकास सोसायटीची निवडणूक कोकिसरे येथे होती. तेथे प्रकाश व त्याचा मोठा भाऊ श्रीरंग हे ठाण्याहून मतदानाला आले होते. मतदान करून ते संध्याकाळी घरी आल्यानंतर रात्री आठ वाजण्याच्या सुमारास श्रीरंग, सतीश सावंत, प्रकाश व अन्य पाच-सहाजण मदन यांना सखाराम जाधव यांच्या मारहाणीचा जाब विचारण्यासाठी शिद्रुकवाडीतील त्यांच्या घरी गेले. त्यांनी मदन यांना घराबाहेर बोलावून तुम्ही मारहाण, शिवीगाळ का केली? असा जाब विचारला. त्यानंतर त्यांच्यात शाब्दिक वाद झाला. यावेळी मदन यांच्यासह मुलगा योगेश, गौरव व पत्नी निता घरी होते. यानंतर जाधव मंडळी कदम यांच्या घरातून बाहेर पडली. त्यावेळी मदन हे घरातून बंदूक आणून द्या, त्यांना गोळ्या घालतो, असे म्हणत होते. मदन यांच्या पत्नीने घरातील बंदूक त्यांना दिली. त्यानंतर त्यांनी पहिली गोळी श्रीरंग यांच्यावर झाडली तर दुसरी गोळी सतीश सावंत यांच्यावर झाडली, यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर मदन व त्यांच्या मुलांनी प्रकाश याला मारहाण केली, यात तो गंभीर जखमी झाला.

घटनास्थळी जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख बांगर, उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक लावंड, पोलीस निरीक्षक विकास पाडळे यांनी भेट दिली असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस उपअधीक्षक विवेक लावंड करीत आहेत. दरम्यान, या गोळीबारात मृत्यू झालेल्या श्रीरंग व सतीश यांचे मृतदेह इन कॅमेरा शिवविच्छेदनासाठी कराडला पाठवण्यात आले असून प्रकाश जाधव यांच्यावर कृष्णा रुग्णालय कराड येथे पुढील उपचार सुरू आहेत.

हेही वाचा : 



Source link

Prajakta Mali: प्राजक्ता माळी ठरली यंदाचा ‘तेजस्वी चेहरा’, युवा सन्मान सोहळ्यात पटकावला महत्त्वपूर्ण पुरस्कार!

0
Prajakta Mali: प्राजक्ता माळी ठरली यंदाचा ‘तेजस्वी चेहरा’, युवा सन्मान सोहळ्यात पटकावला महत्त्वपूर्ण पुरस्कार!


मालिका, नाटक, सिनेमा, वेबसीरीज, निवेदन, काव्यलेखन, उदयोजिका या प्रत्येक क्षेत्रात मुशाफिरी करणाऱ्या प्राजक्ता माळी हिने तिच्या सौंदर्यालाही एक सात्विक स्पर्श दिला आहे. योगा, शाकाहार, नियमित व्यायाम यातून बहरलेल्या प्राजक्ताच्या नितळ सौदर्याला नेहमीच दाद मिळते. सौंदर्याविषयीच्या तिच्या टिप्स गाजत असतात. ‘प्राजक्तप्रभा’ हा काव्यसंग्रह आणि ‘प्राजक्तराज’ हा पारंपरिक दागिन्यांचे व्यवसाय करत प्राजक्ताने वेगळी ओळख निर्माण केली आहे. झी युवा तेजस्वी चेहरा या विभागासाठी झी युवा वाहिनीने प्राजक्ता माळी हिच्या नावावर शिक्कामोर्तब केलं आणि तिच्या चाहत्यांच्या आनंदालाही उधाण आलं.



Source link

Satara Patan : साताऱ्यातील पाटण हत्याकांड कारण समोर, जाब विचारल्याचा राग आल्यानं बेछूट गोळीबार

0



<p>&nbsp;साताऱ्यातील पाटण तालुक्यात काल रात्री दोघांची हत्या. आरोपी मदन कदम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री शंभूराज देसाई यांचे निकटवर्तीय असल्याची माहिती. कदम ठाण्याचे माजी नगरसेवक. वादातून हत्या केल्याचं समोर. मदन कदमला पोलिसांनी केली अटक.&nbsp;</p>
<p>&nbsp;</p>



Source link

Deepak Tijori: अभिनेता दीपक तिजोरीला कोट्यवधींचा चुना; प्रसिद्ध निर्मात्याविरोधात तक्रार

0
Deepak Tijori: अभिनेता दीपक तिजोरीला कोट्यवधींचा चुना; प्रसिद्ध निर्मात्याविरोधात तक्रार


दीपक तिजोरीने १९९०मध्ये महेश भट्ट यांच्या ब्लॉकबस्टर चित्रपट ‘आशिकी’मधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. याशिवाय ‘जो जीता वही सिकंदर’, ‘खिलाडी’, ‘कभी हा कभी ना’, ‘बादशाह’, ‘वास्तव’, ‘दुल्हन हम ले जाएंगे’ आणि ‘राजा नटवरलाल’ यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले होते. अभिनयासोबतच दीपक तिजोरीने यापूर्वी ‘उप्स’, ‘फरेब’, ‘फॉक्स’ आणि ‘दो लफ्जों की कहानी’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.



Source link

Swara Bhasker Wedding: पाठवणी करताना स्वरा भास्करला अश्रू अनावर; व्हिडीओ होतोय व्हायरल

0
Swara Bhasker Wedding: पाठवणी करताना स्वरा भास्करला अश्रू अनावर; व्हिडीओ होतोय व्हायरल


स्वराच्या एका मैत्रिणीने हा व्हिडीओ ट्विटरवर शेअर करत लिहिले की, ‘स्वराला तिच्या विदाईच्या शुभेच्छा, आपल्या सर्वांसाठी एक भावनिक आणि जबरदस्त क्षण…’ मात्र, या फोटोमध्ये स्वराचे वडील दिसत नव्हते. या व्हिडीओवर स्वराच्या वडिलांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. त्यांनी लिहिले की, ‘हा हृदयस्पर्शी ‘क्षण’ शेअर केल्याबद्दल धन्यवाद @sinjini_m… स्वरा भास्करच्या लग्नाचा हा सोहळा आता संपत आला आहे. होय.. या माणसाकडे फ्रेम बाहेर राहण्यासाठी चांगले कारण होते. हा खरंच प्रत्येकासाठी भावनिक क्षण आहे, अगदी ‘खडूस’ वडिलांसाठी… आमच्या लाडक्या स्वरा भास्करची बिदाई’



Source link