Thursday, July 16, 2026
Home Blog Page 312

माझ्या हिश्श्याचे किस्से: संजय दत्तचा पहिला सिनेमा ‘रॉकी’ रिलीज होण्याच्या 3 दिवस आधी झाले नर्गिस यांचे निधन; प्रीमियरवेळी रिक्त ठेवली सीट

0
माझ्या हिश्श्याचे किस्से:  संजय दत्तचा पहिला सिनेमा ‘रॉकी’ रिलीज होण्याच्या 3 दिवस आधी झाले नर्गिस यांचे निधन; प्रीमियरवेळी रिक्त ठेवली सीट


  • Marathi News
  • Opinion
  • Nargis Passed Away 3 Days Before The Release Of Sanjay Dutt’s First Film ‘Rocky’; Seat Kept Vacant At The Premiere

रूमी जाफरी, लेखक-दिग्दर्शक12 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

माझी आणि संजय दत्तची ३५ वर्षांची दोस्ती आहे. या काळात त्याने अनेक गोष्टी मला सांगितल्या, बऱ्याच गोष्टींचा मी स्वत: साक्षीदार आहे. त्यामुळे अधूनमधून संजय दत्तच्या आयुष्यातील काही क्षण तुम्हाला सांगावेत, असे मला वाटले. त्यापैकीच एक – दोन किस्से आज मी सांगणार आहे.

खरे तर संजय दत्तशी संबंधित अनेक गोष्टी त्याच्या आयुष्यावर आधारित ‘संजू’ सिनेमात आपण पाहिल्याच आहेत. पण, आज मी तुम्हाला काही नव्या गोष्टी सांगणार आहे. काल, ३ मे रोजी संजय दत्तच्या आई नर्गिसजींचा स्मृतिदिन होता आणि ६ मे या दिवशी संजय दत्तचा पहिला सिनेमा ‘रॉकी’ प्रदर्शित झाला होता. तसे पाहता प्रत्येक आई आपल्या मुलांवर आणि मुले आपल्या आईवर खूप प्रेम करत असतात. पण, नर्गिसजींचे प्रेम अनोखे होते, अद्वितीय होते. त्या संजूला प्रेमाने ‘बाबा’ म्हणायच्या.

संजूने मला सांगितले होते की, रात्रीच्या वेळी दत्तसाहेब बंगल्याच्या लॉनवर बसून गप्पा मारत सिगारेट ओढायचे. पण, सिगारेट विझवत नव्हते. हातात उरलेली सिगारेट पाठीमागे फेकून द्यायचे. ती गवतात, रोपांमध्ये, टेबल-खुर्चीच्या खाली जावून पडायची. संजूबाबा लहानपणापासून खोडकर आहे, हे सगळ्यांना माहीत आहेच. कधी कधी तो तिथे पडलेली सिगारेट गुपचूप उचलून एक-दोन झुरके मारायचा. मुले आपल्या वडिलांचे अनुकरण करतात, असे म्हणतात. संजूबाबा वडिलांचे अनुकरण करण्याच्या नादात दत्त साहेबांनी फेकलेली सिगारेट ओढायचा.

एकेदिवशी दत्तसाहेब यश जोहरजींशी बोलत बसले होते. बोलता बोलता त्यांनी सिगारेट फेकली. इतक्यात संजू तिथे आला आणि लपून ती सिगारेट ओढू लागला. यश जोहरजींनी ते पाहिले आणि दत्त साहेबांना सांगितले. दत्त साहेबांनी संजूबाबाला सिगारेटसह पकडले आणि त्यानंतर त्याला बोर्डिंगमध्ये पाठवले.

संजूबाबाने त्याविषयी पुढे सांगितले… बोर्डिंगमध्ये नेल्यावर मला वाटले की, हे हिल स्टेशन आहे आणि तिथे मी फिरायला आलोय. माझ्यासोबत काय घडतेय, याची त्यावेळी मला कल्पना नव्हती. मला तिथे सोडून आई निघून गेली आणि दरवाजा बंद झाला. रात्र झाल्यावर मला घराची, आईची आठवण येऊ लागली. ‘मला आईकडे जायचंय..’ म्हणून रडायला लागलो. मी धावत त्या दरवाजाजवळ गेलो आणि आपल्या छोट्या हातांनी त्यावर थपडा मारु लागलो. त्या दरवाजातून जाताना मी आईला शेवटचे पाहिले होते, त्यामुळे त्या पलीकडे ती उभी असेल, दरवाजा उघडेल आणि ती समोर उभी असलेली दिसेल, असे मला वाटले. हा प्रकार खूप दिवस सुरू होता. मी रात्री उठून धावत दरवाजाजवळ जायचो आणि माँ.. माँ.. असे ओरडायचो. आई त्या दरवाजाच्या पलीकडे नाही, हे मला समजायला खूप दिवस लागले. या गोष्टीवरुन मला मुनव्वर राणा यांचा एक शेर आठवतोय…

चलती फिरती हुई

आँखों से अज़ाँ देखी है

मैंने जन्नत तो नहीं देखी है

माँ देखी है।

असो. संजू मोठा झाला तेव्हा नर्गिसजींना कॅन्सर झालेला होता. त्यांना उपचारासाठी अमेरिकेला नेण्यात आले आणि इकडे दत्तसाहेबांनी संजूला हीरो म्हणून लाँच केले. सिनेमा पूर्ण झाला आणि नर्गिसजींना भारतात परत आणून ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. आपला मुलगा आपल्या डोळ्यादेखत स्थिरस्थावर व्हावा, यशस्वी व्हावा, असे प्रत्येक आईला वाटत असते. संजूचा पहिला सिनेमा तयार झाला होता. तो आपण पाहावा, संजूला स्टार झालेला बघावा, अशी नर्गिसजींची खूप इच्छा होती. सिनेमाच्या प्रीमियरला येऊन मला तो पाहायचाय, असा हट्टच त्यांनी धरला. दत्त साहेबांनी तशी सगळी व्यवस्था केली. सर्वात पुढची सीट त्यांच्यासाठी राखून ठेवण्यात आली.

नर्गिसजींना हॉस्पिटलमधून थिएटरमध्ये घेऊन जाण्यासाठी आणि दत्त साहेबांसोबत पहिल्या सीटवर बसवण्यासाठी अँम्ब्युलन्स, व्हीलचेअरसह सर्व तयारी करण्यात आली. पण, ईश्वराने एका आईवर आणि एका मुलावरही अन्याय केला. ३ मे रोजी नर्गिसजींचे निधन झाले. त्यांना ना संजूबाबाचा पहिला सिनेमा- ‘रॉकी’ बघता आला, ना त्याला स्टार होताना पाहता आले. पण, नर्गिसजींसाठी राखून ठेवलेली ती सीट रिकामी ठेऊनच दत्त साहेबांनी या सिनेमाच्या प्रीमियरला हजेरी लावली. नंतर त्यांनी सांगितले, मला अशी जाणीव होत होती की ही सीट रिकामी नाहीय. त्यावर संजूची आई बसलीय, ती सिनेमा बघतेय आणि त्याला आशीर्वाद देतेय…आज संजय दत्तसाठी ‘रॉकी’ सिनेमातील हे गाणे ऐका…

दोस्तों को सलाम,

दुश्मनों को सलाम,

रॉकी मेरा नाम…

स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.



Source link

पाकिस्तानवर अधिक निर्बंध;आयातबंदी, जहाजांनाही प्रवेश नाही

0
पाकिस्तानवर अधिक निर्बंध;आयातबंदी, जहाजांनाही प्रवेश नाही



नवी दिल्ली : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानबरोबर वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, भारताने पाकिस्तानविरोधात निर्बंध कठोर केले आहेत. त्यानुसार, पाकिस्तानातून होणाऱ्या सर्व वस्तूंच्या आयातीवर बंदी घालण्यात आली आहे. पाकिस्तानकडून हवाई किंवा अन्य मार्गाने होणारी टपालसेवा बंद केली गेली आहे.

या उपायांच्या जोडीला पाकिस्तानी जहाजांना भारताच्या बंदरांवर प्रवेश बंद करण्यात आला आहे. भारतीय जहाजांनाही पाकिस्तानला जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे असे शिपिंग महासंचालनालयाने (डीजीएस) जाहीर केले. भारतीय मालमत्ता, मालवाहू जहाजे आणि पायाभूत सुविधांची सुरक्षा विचारात घेऊन हे आदेश जारी करण्यात आल्याचे ‘डीजीएस’च्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

भारताने पाकिस्तानी वस्तूंच्या आयातीवर घातलेली बंदी तत्काळ लागू करण्यात येत असल्याचे सरकारने जारी केलेल्या आदेशात नमूद करण्यात आले आहे. यासंबंधीची अधिसूचना २ मे रोजी काढण्यात आली. यापूर्वी २०१९मध्ये पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी वस्तूंवर २०० टक्के आयातशुल्क लागू केले होते. त्यामुळे थेट बंदी न घालताही पाकिस्तानी वस्तूंची आयात थांबली होती. मात्र, आता घेतलेल्या निर्णयानुसार, तिसऱ्या देशांच्या मार्गानेही पाकिस्तानी वस्तूंच्या भारतात प्रवेशावर निर्बंध घालण्यात आले आहेत.

परकीय व्यापार महासंचालनालयाने (डीजीएफटी) शुक्रवारच्या आदेशात नमूद केले आहे की, ‘‘पुढील आदेश येईपर्यंत पाकिस्तानात उत्पन्न होणाऱ्या किंवा तेथून निर्यात होणाऱ्या सर्व वस्तूंच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष आयात किंवा वाहतुकीवर बंदी घालण्यात येत असल्याची तरतूद परदेश व्यापार धोरण (एफटीपी) २०२३मध्ये जोडण्यात आली आहे.’’ या निर्बंधांमध्ये कोणताही अपवाद करावयाचा असल्यास त्यासाठी भारत सरकारच्या परवानगीची गरज असेल. यामुळे पाकिस्तानकडून थेट किंवा अन्य कोणत्याही व्यापार मार्गाने होणाऱ्या आयातीवर निर्बंध घातले जातील असे वाणिज्य मंत्रालयाने स्पष्ट केले.

एप्रिल २०२४ ते जानेवारी २०२५ या कालावधीत भारताने पाकिस्तानला ४४.७६ कोटी डॉलर इतक्या मूल्याच्या वस्तू निर्यात केल्या होत्या. तर याच कालावधीत पाकिस्तानकडून केलेल्या आयातीचे मूल्य केवळ ४२ लाख डॉलर इतके होते. या आयात वस्तूंमध्ये अंजीर, बेसिल आणि रोझमेरी वनस्पती, विशिष्ट रसायने आणि हिमालयातील गुलाबी मीठ यांचा समावेश होता.

दहशतवादाविरोधात निर्णायक कारवाईसाठी कटिबद्ध

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने दहशतवादाविरोधात निर्णायक कारवाईचा पुनरुच्चार केला. दहशतवादी आणि त्यांच्या पाठीराख्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नमूद केले.

अंगोलाचे राष्ट्रपती जोआओ मैनुअल गोंकाल्वेस भारताच्या चार दिवसीय भेटीवर आले आहेत. नवी दिल्लीत त्यांच्याशी चर्चा करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाविरोधातील कारवाईचा निर्धार स्पष्ट केला.

ओमर अब्दुल्लांची पंतप्रधानांशी चर्चा

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी शनिवारी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी दहशतवादी हल्ला झाला होता. त्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची आहे. पंतप्रधानांच्या निवासस्थांनी सुमारे ३० मिनिटे त्यांच्यात चर्चा झाली. जम्मू आणि काश्मीरमधील परिस्थितीबाबत यावेळी आढावा घेण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.



Source link

Netflix earn profits from India at Rs 16000 crore says Netflix CEO Ted Sarandos zws 70

0
Netflix earn profits from India at Rs 16000 crore says Netflix CEO Ted Sarandos zws 70



Netflix earn profits from India at Rs 16000 crore says Netflix CEO Ted Sarandos zws 70 | नेटफ्लिक्सला भारतातून १६ हजार कोटींचा फायदा; टेड सारंडोस यांच्याकडून मनोरंजन विश्वातील बदलांचा वेध



Source link

NEET JEE book market in Latur worth Rs 30 crore zws 70

0
NEET JEE book market in Latur worth Rs 30 crore zws 70


लातूर : राज्याच्या वैद्याकीय महाविद्यालयांच्या प्रवेश क्षमतेच्या ३० टक्के मुले लातूरमध्ये ‘ नीट’ची परीक्षेची तयारी करणारी असतात. त्यामुळे लातूरमध्ये प्रवेशासाठी गुणवत्ता वरच्या दर्जाची. परिणामी शिक्षण क्षेत्राला पूरक अशी येथील बाजारपेठ मोठी. या विद्यार्थ्यांमुळे गणित, पदार्थ विज्ञान, जीवशास्त्र, रसायन शास्त्र या पुस्तकांची उलाढाल सुमारे ३० कोटी रुपयांची.

विद्यार्थ्याला पदार्थ विज्ञान, जीवशास्त्र व रसायनशास्त्र या तीन विषयांची किमान चार हजार रुपयांची पुस्तके खरेदी करावे लागतात. याशिवाय ‘सीबीएससी’ अभ्यासक्रमाची सुमारे पंधराशे रुपयांची , ‘एनसीआरईटी’ची पंधराशे रुपये तसेच ज्या शिकवणी वर्गात शिकत असतील तर तिथे किमान सहा हजार रुपये तर मोठ्या शिकवणी वर्गात दहा ते पंधरा हजार रुपये पुस्तकासाठी खर्च करावे लागतात . राज्य पाठ्यपुस्तक मंडळाची दोन हजार रुपयांची पुस्तकेही लागतात. अभ्यासक्रमातील या पुस्तकांबरोबरच ऑनलाइन सराव चाचण्यांची किंमत वेगळी. त्यासाठी पाच हजार रुपये पासून ३५ हजार रुपयांपर्यंत पालकांचा खर्च होतो. लातूर शहरात नामांकित महाविद्यालयाबरोबरच देशातील जवळजवळ सर्व प्रमुख शिकवणी वर्गाच्या शाखा लातूरात कार्यरत आहेत.

नवे प्रकाशकही

आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय अशा अनेक प्रकाशन संस्था कार्यरत आहेत . सुमारे दीडशे प्रकाशन संस्था या व्यवसायात गुंतलेल्या आहेत. लातूरातील खासगी शिकवणी वर्ग स्वत:ची पुस्तके प्रकाशित करतात. देशातील नामवंत प्रकाशन संस्थेसोबत भागीदारी करून त्यांच्याकडूनच स्वत:च्या नावाने पुस्तके प्रकाशित केली जातात.

हेही वाचा

पंचवीस हजार विद्यार्थी

सरासरी २५ ते ३० हजार विद्यार्थी या शिकवणी वर्गात प्रवेशित होतात. गतवर्षी नीट परीक्षेत २४ हजार ७०० विद्यार्थी लातूर परीक्षा केंद्रावरून परीक्षेत बसले होते. तर जेईई परीक्षेसाठी ४५०० विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. संदर्भित पुस्तकांचा वर्षभराचा खर्च २५ हजार रुपये होतो. जे विद्यार्थी अधिक मेहनत घेऊन अनेक पुस्तकांचा संदर्भ चाळतात त्यांच्यासाठी रक्कम अधिक लागते.

विज्ञान शाखेचे विद्यार्थी परीक्षेची तयारी करताना अधिकाधिक माहिती मिळावी यासाठी एका विषयाची चार तरी पुस्तके वर्षभरात अभ्यासतात हा आपला अनुभव आहे.

प्रा. भगवान तांबळकर, सेवानिवृत्त पदार्थ विज्ञान प्रमुख, दयानंद विज्ञान महाविद्यालय

नीट व जेईई अभ्यासक्रमाच्या तयारीसाठी विद्यार्थी प्रारंभापासून पुस्तके खरेदी करतात. काही प्रमाणात राज्य मंडळाच्या अभ्यासक्रमाची पुस्तके विकली जातात मात्र केंद्रीय अभ्यासक्रमाची पुस्तके मोठ्या प्रमाणावर विकली जातात.

रवी जोशी, विक्रेते लातूर

दरवर्षी अकरावी बारावीचे विद्यार्थी शिकण्यासाठी पंधरा हजारापासून २५ हजार रुपयांपर्यंत पुस्तकावर खर्च करतात. लातूरची शैक्षणिक बाजारपेठ त्यामुळेच देशात गाजत असून राज्यातील पहिल्या दोन क्रमांकात लातूरचे नाव घेतले जाते आहे. उमाकांत होनरावशिकवणी वर्गचालक



Source link

‘वेव्हज बाजार’च्या माध्यमातून ८०० कोटी रुपयांची उलाढाल

0
‘वेव्हज बाजार’च्या माध्यमातून ८०० कोटी रुपयांची उलाढाल



मुंबई : आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांतून भरवण्यात येणाऱ्या ‘फिल्म बाजार’च्या धर्तीवर मुंबईतही वेव्हज परिषदेअंतर्गत ‘वेव्हज बाजार’चे आयोजन करण्यात आले आहे. गेल्या तीन दिवसांत ‘वेव्हज बाजार’ अंतर्गत चित्रपट, संगीत, अॅनिमेशन्स, रेडिओ, व्हीएफएक्स अशा विविध विभागातून तब्बल ८०० कोटी रुपयांची उलाढाल झाली आहे. विविध राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये संयुक्त चित्रपट निर्मितीपासून संगीत कार्यक्रम, डिजिटल आशयनिर्मिती अशा विविध उपक्रमांसाठी करण्यात आलेल्या करारातून ही उलाढाल झाली आहे.

‘वेव्हज बाजार’मध्ये जपान, दक्षिण कोरिया, रशिया, नेदरलँड, न्यूझीलंड, अमेरिका अशा विविध २२ देशांतील मोठमोठ्या कंपन्या सहभागी झाल्या आहेत. तसेच, नेटफ्लिक्स, प्राईम व्हिडिओ, मेटा, डिस्ने हॉटस्टार अशा मनोरंजन माध्यमातील नामांकित कंपन्यांचाही यात सहभाग आहे. या ‘वेव्हज बाजार’ अंतर्गत काही महत्वाच्या आंतरराष्ट्रीय स्तरावरील कार्यक्रम निर्मितीसाठी करार झाले असून त्यातून ८०० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे. आणखी काही प्रकल्पही प्रस्तावित असून येत्या काही दिवसांत उलाढालीचा हा आकडा हजार कोटी रुपयांच्या पुढे जाणार आहे.

करारांतर्गत चित्रपट निर्मिती

● ‘वेव्हज बाजार’मध्ये भारत आणि युके यांची पहिली संयुक्त निर्मिती असलेल्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. एनएफडीसी, माहिती आणि प्रसारण मंत्रालय यांच्या सहभागातून तयार होणारा ‘देवी चौधुरानी’ हा ऐतिहासिक चित्रपट या करारांतर्गत निर्माण करण्यात आला असून यात बंगाली कलाकार प्रोसेनजीत चॅटर्जी आणि श्रबंती चॅटर्जी यांच्या मुख्य भूमिका आहेत. याशिवाय, युकेच्याच निर्मितीसंस्थेबरोबर ‘व्हायोलेटेड’ हा आणखी एक थरारपट संयुक्तरित्या तयार करण्यात येणार आहे.

● फिल्म इंडिया स्क्रीन कलेक्टिव्ह आणि स्क्रीन कॅन्टबरी एनझेड या न्यूझीलंड येथील कंपनीमध्येही करार झाला असून त्याअंतर्गत पहिल्यांदाच न्यूझीलंड येथे भारतीय चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार आहे.

● रशिया आणि भारतीय कंपन्यांमध्येही विनोदी कार्यक्रम, संगीत कार्यक्रमांचे आयोजन आणि दोन्हीकडे चित्रपट महोत्सवांचे आयोजन अशा विविध प्रकल्पांसाठी करार करण्यात आले आहेत.



Source link

dcm Eknath Shinde skipped event organised by Ajit Pawar led NCP to feliciate ex Chief Ministers zws 70

0
dcm Eknath Shinde skipped event organised by Ajit Pawar led NCP to feliciate ex Chief Ministers zws 70


मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) वतीने माजी मुख्यमंत्र्यांच्या आयोजित केलेल्या गौरव सोहळ्याकडे बहुतांश मुख्यमंत्र्यांनी पाठ फिरवली. विशेष म्हणजे महायुतीचे माजी मुख्यमंत्री व विद्यामान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे या सोहळ्याला गैरहजर राहिल्याने त्याचीच चर्चा अधिक रंगली. याच वेळी ‘२३ नोव्हेंबरच्या त्या ७२ तासांच्या सरकारमध्येच आजच्या महायुतीच्या सरकारची मुहूर्तमेढ रोवली गेली’, असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या वतीने जांबोरी मैदानावर ‘गौरवशाली महाराष्ट्र’ महोत्सवाचे आयोजन केले आहे. शनिवारी राज्याच्या आजी व माजी मुख्यमंत्र्यांच्या सत्काराचा कार्यक्रम या महोत्सवामध्ये होता. या सत्कार सोहळ्याला देवेंद्र फडणवीस यांच्यासह नारायण राणे, अशोक चव्हाण हे तिघे आजी-माजी मुख्यमंत्री उपस्थित होते. शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे हे पाच माजी मुख्यमंत्री या गौरव सोहळ्याला निमंत्रण देवूनही गैरहजर राहिले.

पवार यांची नापसंती

एकनाथ शिंदे यांच्या वतीने प्रताप सरनाईक यांनी सत्कार स्वीकारला. याबद्दल अजित पवार यांनी नापसंती व्यक्त केली. सोहळ्याचे प्रास्ताविक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी केले. व्यासपीठावर यावेळी प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ, इंद्रनील नाईक, दिलीप वळसे पाटील, नरहरी झिरवाळ, बाबासाहेब पाटील, आदिती तटकरे, मुश्ताक अंतुले आदी राष्ट्रवादीचे नेते उपस्थित होते.

हेही वाचा

मुख्यमंत्री व्हावेसे वाटते पण योग जुळून आलाच नाही

राज्यात महिला मुख्यमंत्री व्हावे हे सर्वांना वाटते पण ते अद्याप शक्य झालेले नाही. कित्येक वर्षे मलाही मुख्यमंत्री व्हावे असे वाटत आहे पण तो योग कुठेही जुळून आलेला नाही, अशी कबुली उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

पाच माजी आमदारांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते, माजी मंत्री सतिश पाटील व गुलाबराव देवकर यांच्यासह माजी आमदार कैलास पाटील, दिलिपराव सोनवणे, धुळ्याचे शिवसेना ठाकरे पक्षाचे माजी आमदार शरद पाटील तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या महिला आघाडीच्या नेत्या तिलोत्तमा पाटील यांनी हाती घड्याळ बांधले.

राज्य विकासात आजपर्यंतच्या सर्व मुख्यमंत्र्यांचा वाटा आहे. राज्याला विकासाच्या असीम संधी आहेत. बलशाली महाराष्ट्र घडवण्यासाठी राष्ट्रवादीच्या या सत्काराने प्रेरणा मिळाली.– देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री



Source link

स्पर्धेतही भारतीय वस्त्रोद्योगाचा जागतिक बाजारपेठेत प्रभाव; वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांच्याकडून गौरव

0
स्पर्धेतही भारतीय वस्त्रोद्योगाचा जागतिक बाजारपेठेत प्रभाव; वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांच्याकडून गौरव



कोल्हापूर :वस्त्रोद्योगाच्या जागतिक बाजारपेठेतील समीकरणे बदलत असली, तरी त्यामध्ये संधी मिळवण्याचा भारत सरकारचा प्रयत्न आहे. चीन, बांगलादेश यांसारख्या स्पर्धक देशाच्या रणनीतीला शह देऊन निर्यात बाजारपेठेत भारत आपला प्रभाव दाखवून देईल, असे मत केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांनी व्यक्त केले.

दोन दिवसीय कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह आले होते. या वेळी त्यांच्याशी ‘लोकसत्ता’च्या प्रतिनिधींनी संवाद साधला. या वेळी मंत्री सिंह यांनी भारतीय वस्त्रोद्योग निर्यात बाजारपेठ, कापूस गुणवत्तासुधार कार्यक्रमातून शेतकरी – विणकारांचे होणारे कल्याण, सरकारी धोरण आदीबाबत आपली भूमिका मांडली.

अमेरिकेने आयात कर धोरणात मोठ्या प्रमाणात बदल केल्याने त्याचा भारतीय वस्त्र उद्योगावर होणाऱ्या परिणामाची चर्चा करताना मंत्री सिंह म्हणाले, प्रत्येक देशाला आपले करविषयक, तसेच व्यवसाय वाढवण्याचे धोरण राबवण्याचा अधिकार आहे. अमेरिकेने आयात करामध्ये मोठा बदल केला आहे. तो तूर्त तीन महिन्यांसाठी स्थगित ठेवला असल्याने आपल्याला पूर्वीच्या कर रचनेप्रमाणे निर्यात करण्याची संधी मिळालेली आहे. दुसरीकडे, भारताचे वस्त्रोद्योग निर्यातीतील मुख्य स्पर्धक चीन, बांगलादेश हे देश आहेत. अमेरिका, युरोपीय, तसेच अन्य देशांमध्ये भारतीय वस्त्रोद्योग निर्यात वाढवावी यासाठी प्रभावी, आक्रमक धोरणे आखली असून, त्यानुसार वाटचाल सुरू आहे. भारतीय वस्त्रोद्योजक वेगवेगळ्या प्रकारचे वस्त्र उत्पादने बनवत असल्याने आपल्याकडे कौशल्य – गुणवत्तेची कमतरता नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय वस्त्रोद्योग जगाचा बाजारपेठेत उतरून आपला प्रभाव नजीकच्या काळात निश्चितपणे दाखवून देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

भारतात गेल्या दोन हंगामांत कापूस मोठ्या प्रमाणात आयात करावा लागला. याकडे लक्ष वेधले असता मंत्री गिरीराज सिंह म्हणाले, की जगाच्या तुलनेत भारताचे एकरी कापूस उत्पादनाचे प्रमाण कमी आहे. ते अधिक प्रमाणात वाढावे यासाठी केंद्र सरकारने कापूस अभियान सुरू केले आहे. महाराष्ट्रात अकोला जिल्ह्यात सुमारे सात हजार हेक्टरपर्यंत हे अभियान राबवले जात आहे. एकाच प्रकारची पेरणी, खते, कीटकनाशके, उगवण पद्धत यावर या अभियानात भर देण्यात आला आहे. कस्तुरी हा गुणवत्तापूर्ण कापूस अधिक वाढण्यासाठी नियोजन केले केले आहे. शिवाय शेतकरी उत्पादक कंपन्यांनाही यामध्ये सामावून घेतलेले आहे. त्याचे फायदे दिसून येतील. याचबरोबर कृत्रिम धागा उद्योग वाढावा यासाठी केंद्र सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्यासाठी कंपन्या तयार झाल्या आहेत. खेरीज, बांबूसारख्या अन्य प्रकारच्या नैसर्गिक धाग्यांचा वापर केलेली वस्त्रप्रावरणे वाढीस लागावी याकडे लक्ष पुरवलेले आहे.

भारतीय वस्त्रोद्योगातील यंत्रसामग्रीही भारतात निर्मित व्हावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत,असा उल्लेख करून मंत्री गिरीराज सिंह म्हणाले, की भाजपचे सरकार केंद्रात येण्याआधी काँग्रेसच्या कार्यकाळात दहा वर्षांमध्ये ३३ लाख शिलाई मशिन आयात करण्यात आल्या होत्या. मोदींच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात दीड कोटी शिलाई मशिन आयात झाल्या आहेत.आता अशा प्रकारची यंत्रसामग्री भारतातच उत्पादित व्हावी यावर भर दिला जात आहे. शिलाई मशिन बनवणारा प्रकल्प उत्तर प्रदेशमध्ये उभा केला जात आहे. गुजरातमध्येही अशी यंत्रसामग्री बनवणारे कारखाने उभे केले जाणार आहेत,असेही त्यांनी या वेळी सांगितले.
कुरकुटे, शहा आणि ललवाणी

मुलाखतीवेळी मंत्री गिरीराज सिंह यांनी इचलकरंजीतील काही वेगळ्या प्रयोगशीलतेचा आवर्जून संदर्भ दिला.संजय कुरकुटे या उद्योजकाने जागतिक दर्जाचे रेपीयर लुम (अत्याधुनिक माग) निर्माण केला आहे. रोहित शहा निर्मित कपडे तरुणांमध्ये लोकप्रिय बनत आहेत.अरुण ललवाणी यांची धोती प्रसिद्ध आहे,असा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला.



Source link

देशातील सामाजिक सलोखा धोक्यात; जम्मू-काश्मीरचे माजी अर्थमंत्री हसीब द्राबू यांचे मत

0
देशातील सामाजिक सलोखा धोक्यात; जम्मू-काश्मीरचे माजी अर्थमंत्री हसीब द्राबू यांचे मत



पुणे :‘काश्मीर खोऱ्यात वाढलेले पर्यटन आणि व्यापार शांततेचे प्रतीक आहे. त्यामुळे काश्मीर देशातल्या इतर राज्यांशी जोडले जात आहे. अशा परिस्थितीत पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या हल्ल्याने देशातील सामाजिक सलोखा धोक्यात आला आहे,’ असे मत जम्मू-काश्मीरचे माजी अर्थमंत्री हसीब द्राबू यांनी शनिवारी व्यक्त केले. ‘काश्मीर सोडून देशातील अन्य ठिकाणी हल्ल्याआडून राजकारण केले जात आहे,’ अशी खंतही दाब्रू यांनी व्यक्त केली.

‘सरहद’ संस्थेतर्फे आयोजित ‘काश्मीरचे तिसरे सम्राट ललितादित्य’ स्मृती व्याख्यानात ‘पहलगाम हल्ल्याचे काश्मीरमधील शांतता, प्रगती आणि सुरक्षिततेवर परिणाम’ या विषयावर द्राबू बोलत होते. निवृत्त लेफ्टनंट जनरल सुदर्शन हसबनीस, विजय फाउंडेशनचे संतसिंग मोखा, सरहद संस्थेचे प्रमुख संजय नहार, शैलेश पगारिया या वेळी उपस्थित होते.

दाब्रू म्हणाले, ‘जम्मू-काश्मीरची एकूण अर्थव्यवस्था २.६५ लाख कोटींची आहे. त्यात पर्यटनाचा वाटा केवळ ७ टक्के आहे. पर्यटन हा काश्मीरच्या अर्थव्यवस्थेचा कणा नाही. सफरचंद, आक्रोड, चेरी, केशर, रेशीम, शाल अशी अनेक उत्पादने तेथे घेतली जातात. ती देशाच्या कानाकोपऱ्यांत विक्रीसाठी पाठवली जातात. व्यापार हाच काश्मीरच्या अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा भाग आहे. त्या निमित्ताने काश्मीरचा देशातील इतर भागांशी संबंध येतो. आता पर्यटनामुळे स्थानिकांतही विश्वास निर्माण होत आहे. काश्मीरसह देशात सामाजिक सलोख्याचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. मात्र, हल्ल्यामुळे या सामाजिक सलोख्याला आणि एकोप्यालाच धक्का बसला आहे.’

‘पहलगाम येथे झालेला दहशतवादी हल्ला स्वीकारार्ह नाही. काश्मीरची जनता हल्ल्याविरोधात रस्त्यावर येत आहे. सर्व जाती-धर्मांचे लोक निषेध व्यक्त करत आहेत. काश्मीरचा वापर केवळ राजकीय प्रचारासाठी केला जातो. महाराष्ट्रासह इतर राज्यांच्या निवडणुकीतही काश्मीरचा मुद्दा पुढे केला जातो. आता नव्याने काश्मीरकडे पाहताना तेथील नागर संस्कृतीचा पुनर्विचार करायला हवा,’ असे मत दाब्रू यांनी व्यक्त केले.
‘भारताचा स्वित्झर्लंड म्हणून लोकप्रिय असलेल्या पहलगाम येथे कोट्यवधी पर्यटक दर वर्षी भेट देतात. नजीकच्या काळात जम्मू-काश्मीरमध्ये सरकारने अनेक पायाभूत सुविधा निर्माण केल्या. काश्मीरच्या पर्यटनाला चालना मिळाली. पहलगाम हल्ल्यामागे काश्मीरमधील शांतता नष्ट करण्याचा दहशतवाद्यांचा हेतू होता,’असे हसबनीस यांनी सांगितले.

संजय नहार यांनी प्रास्ताविक केले. साची मोरे यांनी सूत्रसंचालन केले. शैलेश वाडेकर यांनी आभार मानले.

पहलगाम हल्ल्यामागे काश्मीरमधील शांतता नष्ट करण्याचा दहशतवाद्यांचा हेतू होता. नागरिकांनी सरकारवर दबाव येईल, अशी परिस्थिती निर्माण करण्यात काहीही अर्थ नाही. आताच्या काळात नागरिकांमध्ये एकोपा गरजेचा आहे.- सुदर्शन हसबनीस, निवृत्त लेफ्टनंट जनरल



Source link

मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्ग धोकादायक; २४ तासांत तीन अपघातांत तिघांचा मृत्यू

0
मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्ग धोकादायक; २४ तासांत तीन अपघातांत तिघांचा मृत्यू



पुणे : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्ग, तसेच वडगाव उड्डाणपूल परिसरात २४ तासांत झालेल्या तीन अपघातांत तीन जणांचा मृत्यू झाला. भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे घडली, तर दुपारी एकच्या सुमारास झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला. शुक्रवारी सकाळी झालेल्या अन्य एका अपघातातही दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला.

भरधाव मोटारीचा पहाटे अपघात झाल्यानंतर शनिवारी दुपारी बाह्यवळण मार्गावर भरधाव ट्रकने दोन दुचाकी,रिक्षा,मोटारी अशा चार वाहनांना धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार राहुल जगन्नाथ खाटपे (वय ३२, रा. सिंहगड महाविद्यालय रस्ता, वडगाव बुद्रुक)यांचा मृत्यू झाला.या अपघातात दुचाकीस्वार दयावर हुसेन सरवर (वय ४५, रा. साईबाबानगर, कोंढवा खुर्द) हे जखमी झाले. याप्रकरणी ट्रकचालक संजय श्रीमंत बिराजदार (वय ३६,रा.सक्करगाव,ता.आळंद,जि. गुलबर्गा, कर्नाटक) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खाटपे सिंहगड महाविद्यालयात सुरक्षारक्षक होते.बाह्यवळण मार्गाने शनिवारी दुपारी एकच्या सुमारास कात्रजकडून नवले पुलाकडे भरधाव वेगाने ट्रक निघाला होता. भरधाव ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले.सुरुवातीला ट्रकने दुचाकीस्वार सरवर यांना धडक दिली. त्यानंतर ट्रकने मोटार, रिक्षा आणि दुचाकीस्वार खाटपे यांना धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार खाटपे गंभीर जखमी झाले.अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

दरम्यान,वडगाव उड्डाणपुलावर शुक्रवारी (२ मे)सकाळी सातच्या सुमारास ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. किरण पावनोजी गावडे-पाटील (वय ३६,रा. गगनगिरी मंदिराजवळ, हिंगणे, कर्वेनगर)असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे.याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकीस्वार किरण शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास उड्डाणपुलावरून निघाले होते.त्या वेळी भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली.अपघातानंतर घटनास्थळी न थांबता ट्रकचालक पसार झाला. किरण खासगी कंपनीत कामाला होते.पोलीस उपनिरीक्षक अमोल मालुसरे तपास करत आहेत.

पाच महिन्यांत सहा जणांचा मृत्यू

गेल्या पाच महिन्यांत बाह्यवळण मार्गावर पाच गंभीर अपघात झाले असून, या अपघातात सहा जणांचा मृत्यू झाला. बाह्यवळण मार्गावरील अपघाताच्या घटना रोखण्यासाठी वाहतूक पोलीस, महामार्ग प्राधिकरणाने विविध उपाययोजना केल्या आहेत. बाह्यवळण मार्गावरील दरीपूल ते नवले पूलदरम्यान तीव्र उचारावर भरधाव वाहनांचे नियंत्रण सुटून गंभीर स्वरूपाचे अपघात घडतात. अपघाताच्या घटना रोखण्यासाठी गतीरोधक, वेग नियंत्रणासाठी ‘रमब्लिंग स्ट्रिप’, वेगमर्यादा, तसेच जागोजागी फलक लावण्यात आले आहेत. अवजड वाहनचालकांकडून वेगमर्यादा धुडकावली जात असल्याने गंभीर स्वरूपाचे अपघात घडतात, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.



Source link

गेमाड जुगाड..

0
गेमाड जुगाड..



चिंतन थोरात

अवघ्या ४९ रुपयांत एक नाही तर तीन कोटी रुपये बक्षीस मिळवून देण्याच्या स्वप्नांनी सध्या बऱ्यापैकी देशवासीय ग्रस्त झालेत. आवडते क्रिकेटपटू जुगार नसलेला वित्तीय जोखमीचा ‘कौशल्य खेळ’ खेळण्यास प्रोत्साहन देत असल्याने त्यांचे अबालवृद्ध चाहते पैसे गमावण्याच्या उद्योगात मानसिक आणि आर्थिक गुंतवणूक करीत आहेत. ‘तुम्ही करोडपती बनणारच’ अशा त्रिवार शब्द उच्चारणाऱ्या गाण्यांना भुलत रोज होणाऱ्या व्यवहारात श्रीमंत नक्की कोण बनतेय, या गेमाड जुगाडात नक्की कोण जिकंतेय, तसेच हे आभासी खेळ समाजात तीव्र व्यसनाच्या पातळीवर कसे चालले आहेत, याची तपशीलात चर्चा…

भारतीय क्रिकेट आणि बाजारपेठेचे नाते १९९० च्या दशकात एका नव्या वळणावर आले. जागतिकीकरण, खासगीकरण आणि उदारीकरण ( GPL) या धोरणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था नव्या दिशेने वाटचाल करत असतानाच, मार्क मॅस्करेन्हास यांनी क्रिकेटपटूंना सदिच्छा दूत (ब्रॅण्ड अॅम्बेसेडर) बनवून भारतीय विपणन क्षेत्रात क्रांती घडवली. सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सौरव गांगुली यांसारख्या खेळाडूंचे चेहरे भारतीय बाजारपेठेत झळकू लागले आणि क्रिकेट हा केवळ खेळ राहिला नाही; तर तो भारतीय बाजारपेठेचा महत्त्वाचा चालक बनला.

२००८ मध्ये इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)ची सुरुवात झाली आणि क्रिकेट हा खेळ व्यावसायिक स्तरावर आणखी एक पाऊल पुढे गेला. ‘बीसीसीआय’ आणि ‘डेलॉईट’ यांच्या २०२३ च्या अहवालानुसार, भारतातील क्रिकेट अर्थव्यवस्थेचे मूल्य सुमारे ५.३ अब्ज डॉलर (४४,००० कोटी रुपये) आहे. ‘आयपीएल’ने क्रिकेटचे मनोरंजन मूल्य वाढवले, प्रेक्षकसंख्या वाढवली आणि जाहिरात महसूल अभूतपूर्व पातळीवर पोहोचला. भारतीयांचे क्रिकेटबाबत असलेले अतुलनीय प्रेम आणि उत्साह हा आपल्या संस्कृतीचा अविभाज्य भाग बनला. जनतेची क्रिकेटबद्दल असलेली निस्सीम आवड आणि भक्ती ही एक शुद्ध आणि प्रामाणिक जुळवणीच…

याच दरम्यान, स्मार्टफोन्स आणि सोशल मीडियाच्या युगात भारतीयांचे मनोरंजनाचे स्वरूप बदलले. मोबाइल हा लोकांच्या हातात चोवीस तास राहू लागला. त्यांना त्याचे व्यसन जडले. स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीच्या २०२० मधील संशोधनानुसार, मोबाइल फोनवरील प्रत्येक नोटिफिकेशन, लाइक किंवा नवीन मेसेज यांमुळे मेंदूमध्ये डोपामाइनचा स्राव होतो. हा स्राव इतका तीव्र असतो की न्यूरोसायंटिस्ट डॉ. अॅना लेम्बकी यांच्या मते, ‘‘मोबाइल फोन वापरताना आणि जुगार खेळताना मेंदूतील अगदी समान भाग सक्रिय होतात.’’ जर्नल ऑफ बिहेवियरल अॅडिक्शन्समध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, मेंदूचा न्यूक्लियस अकम्बेन्स ( Nucleus Accumbens) हा भाग या दोन्ही क्रियांमध्ये सक्रिय होतो, ज्यामुळे व्यक्ती ‘रिवॉर्ड सिस्टम’च्या (बक्षीस व्यवस्था) चक्रात गुरफटते. २०२२ मध्ये इंटरनॅशनल जर्नल ऑफ अॅडिक्शन स्टडीजमध्ये प्रकाशित एका अभ्यासानुसार, ‘फॅण्टसी स्पोर्ट्स खेळताना व्यक्तीच्या मेंदूमध्ये डोपामाइनचे प्रमाण ४०० टक्क्यांपर्यंत वाढू शकते – जे नैसर्गिक स्तरापेक्षा चार पट अधिक आहे. स्वत:च्या संघाचा खेळाडू धावा काढतो तेव्हा, बळी घेतो तेव्हा किंवा विजेता ठरतो तेव्हा मिळणारा ‘डोपामाइन’ स्राव अत्यंत शक्तिशाली असतो, जो व्यसनाचा मार्ग तयार करू शकतो.

फॅण्टसी स्पोर्ट्स या संकल्पनेने भारतीयांच्या क्रिकेटवरील प्रेमाला नवीन आयाम दिला. डेलॉईट इंडिया आणि फेडरेशन ऑफ इंडियन फॅण्टसी स्पोर्ट्सच्या अलीकडील अहवालानुसार, भारतातील फॅण्टसी स्पोर्ट्स उद्याोगाने २०२४ च्या आर्थिक वर्षात ९,१०० कोटी रुपयांचा महसूल नोंदवला- जो २०२२ ते २०२४ या काळात ३० टक्के चक्रवाढ वार्षिक वृद्धी दर दर्शवितो. हा उद्याोग भारतात अंदाजे २२५ दशलक्ष (२२.५ कोटी) वापरकर्त्यांपर्यंत पोहोचला आहे.

फॅण्टसी स्पोर्ट्स कंपन्या आपल्या व्यासपीठाला ‘कौशल्याचा खेळ’ असे संबोधतात, ज्याला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने २०१७ मध्ये मान्यता दिली. त्यामुळे फॅण्टसी स्पोर्ट्स भारतात कायदेशीर आहे आणि जुगार कायद्यांतून वगळण्यात आला आहे. तरीही सिक्कीम, आसाम, तेलंगणा, ओदिशा, आंध्र प्रदेश, नागालॅण्ड आणि अरुणाचल प्रदेश या राज्यांनी फॅण्टसी स्पोर्ट्सवर बंदी घातली आहे. पण या राज्यांतील नागरिक आडमार्ग ( VPN) वापरून हे खेळ खेळतात. या प्लॅटफॉर्मवर वापरकर्ते वास्तविक खेळाडूंचे ‘आभासी संघ’ तयार करतात आणि त्यांच्या वास्तविक खेळातील कामगिरीवर आधारित स्पर्धा करतात. डेलॉईट इंडिया आणि FIFS च्या अहवालानुसार, २०२४ मध्ये भारतीय फॅण्टसी स्पोर्ट्स बाजार जागतिक उद्याोगाच्या ४ इतका होता. डेलॉईट इंडिया आणि फेडरेशन ऑफ इंडियन फँटसी स्पोर्ट्सच्या २०२४ मधील अहवालानुसार, भारतात अंदाजे २२५ दशलक्ष (२२.५ कोटी) फॅण्टसी स्पोर्ट्स वापरकर्ते आहेत. हे भारताच्या एकूण लोकसंख्येच्या सुमारे १६ आहे. प्रत्येक सहा भारतीयांपैकी एक व्यक्ती फॅण्टसी स्पोर्ट्स खेळते, ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. अशा प्रकारचे व्यसन समाजाच्या आर्थिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्यासाठी मोठा धोका ठरू शकते.

ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या इंटरनेट इन्स्टिट्यूटच्या एका अभ्यासानुसार, फॅण्टसी स्पोर्ट्स खेळणाऱ्या ६० व्यक्तींमध्ये व्यसनाधीनतेची लक्षणे दिसून येतात; आणि २८ लोकांनी कबूल केले आहे की, त्यांनी या गेम्समध्ये पैसे गमावल्यामुळे त्यांचे कौटुंबिक संबंध बिघडले आहेत. भारतातील एका स्वतंत्र सर्वेक्षणानुसार, पैसे लावून हा गेमाड जुगाड खेळणाऱ्या ३७ लोकांनी कर्ज घेतले किंवा घरातील पैसे वापरले आहेत, तर २२ लोकांनी या खेळांमुळे त्यांच्या कामावर परिणाम झाल्याचे सांगितले.

भारतीयांचे क्रिकेटप्रेम काही कंपन्यांद्वारे व्यापारीकरणाचे लक्ष्य बनले. फॅण्टसी स्पोर्ट्सची भारतातील वाढ, त्याचा मानसिक आरोग्यावरील परिणाम आणि समाजावर होणारा त्याचा दीर्घकालीन प्रभाव याबद्दल सविस्तर चर्चा म्हणूनच महत्त्वाची. क्रिकेटबाबत असलेल्या निरागस भक्तीचे रूपांतर डोपामाइन-चालित व्यसनात बदलले आणि अशा व्यसनापासून स्वत:चे आणि समाजाचे संरक्षण करणे गरजेचे बनले आहे. फॅण्टसी स्पोर्ट्स हा खरोखरच कौशल्याचा खेळ आहे की व्यसन लादणारा नव्या प्रकारचा डिजिटल जुगार, असा प्रश्न लोकांना पडत नाही यातच सारे फावतेय.

या खेळाचा देशी इतिहास

भारतात फॅण्टसी स्पोर्ट्सची सुरुवात २००१ मध्ये झाली, जेव्हा ईएसपीएन-स्टार स्पोर्ट्सने ‘सुपर सिलेक्टर’ गेम उपलब्ध करून दिला. माजी क्रिकेटपटू रवी शास्त्री यांनी याचे आयोजन केले होते आणि या खेळामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली. परंतु या खेळाचा खरा विस्तार २००८ मध्ये इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) सुरू झाल्यानंतर झाला. आयपीएलच्या माध्यमातून क्रिकेटला नवीन आयाम मिळाला आणि त्यामुळे फॅण्टसी गेमिंगला प्रचंड वेग मिळाला. स्मार्टफोन्स आणि इंटरनेटच्या वाढत्या प्रवेशामुळे लोकांना फॅण्टसी स्पोर्ट्सचा आनंद घेणे अधिक सोपे झाले.

२०१२ मध्ये ‘ड्रीम-११’ या पहिल्या प्रमुख भारतीय फॅण्टसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्मची स्थापना झाली. सुरुवातीला केवळ क्रिकेटवर लक्ष केंद्रित करण्यात आले होते, परंतु नंतर हळूहळू त्यात फुटबॉल, कबड्डी, बास्केटबॉल आणि हॉकी यांसारख्या इतर खेळांचाही समावेश झाला. करोना टाळेबंदीदरम्यान फॅण्टसी स्पोर्ट्सचा वापर झपाट्याने वाढला, कारण घरात अडकलेल्या लोकांसाठी ते मनोरंजनाचे प्रमुख स्राोत बनले.

२०२३ पर्यंत ड्रीम-११, एमपीएल, ‘माय ११सर्कल’ आणि फॅण्टसी पॉवर ११ यांसारख्या गेमाड जुगाड प्रकारांना भारतातील सर्वात लोकप्रिय अॅप्समध्ये स्थान मिळाले. अलीकडील वर्षांत ड्रीम ११ इंडियन क्रिकेट टीमची आणि आयपीएलची प्रायोजक बनली, ज्यामुळे हा उद्याोगच मुख्य धारेत आला.

महसुलाचा अगडबंब आकडा…

भारतातील फॅण्टसी स्पोर्ट्स उद्योगाचा महसूल सातत्याने वाढत आहे. डेलॉईट इंडिया आणि फेडरेशन ऑफ इंडियन फॅण्टसी स्पोर्ट्सच्या अहवालानुसार, २०२४ मध्ये या उद्याोगाने ९,१०० कोटी रुपयांचा महसूल नोंदवला. २०२२ ते २०२४ या काळात या उद्याोगाने ३० टक्के चक्रवाढ वार्षिक वृद्धी दर दर्शवला. परंतु रेडसीरच्या अहवालानुसार, २०२४ मध्ये फॅ ण्टसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्मचा महसूल घटून ८,८०० कोटी रुपये झाला- जो २०२३ मध्ये ११,००० कोटी रुपये होता. ऑक्टोबर २०२३ मध्ये अमलात आणलेल्या कर धोरणातील बदलांमुळे या उद्याोगाच्या वाढीची गती कमी झाली. २०२५ च्या आर्थिक वर्षात या उद्योगाचा महसूल वार्षिक १० टक्के घटण्याची शक्यता आहे; परंतु २०२६ मध्ये पुन्हा वाढ होण्याचे भाकितदेखील करण्यात आले.

२०२४ मध्ये भारतीय फॅण्टसी स्पोर्ट्स बाजार जागतिक उद्याोगाच्या ४ टक्के इतका होता. जागतिक बाजाराचे मूल्य २.१ ट्रिलियन रुपये असून, त्याच्या वृद्धीचा दर ७ टक्के आहे. २०२३ वर्षाच्या KPMG आणि FIFSच्या अहवालानुसार, फॅण्टसी स्पोर्ट्स उद्याोगाचे मूल्य २०२७ पर्यंत २५,२४० कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.

क्रिकेट या एका खेळातूनच या उद्योगाला ८५ टक्के महसूल मिळतो. त्यानंतर फुटबॉल (६ टक्के) आणि इतर खेळ येतात. एका आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यात सुमारे १५,००० कोटी रुपये या प्लॅटफॉर्मवर लावले जातात, तर आयपीएलसारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये ही रक्कम दुप्पट होते.

ओळख पटवण्यासाठी फॅण्टसी स्पोर्ट्स कंपन्या वापरकर्त्यांकडून पॅन कार्ड, आधार कार्ड यांसारखे दस्तावेज गोळा करतात. या कंपन्यांनी २०२२-२३ मध्ये जाहिरातींवर १,००० कोटी रुपयांहून अधिक खर्च केला आणि प्रमुख क्रिकेटपटू आणि सेलिब्रिटींशी करार करून तीन ते १० कोटी रुपयांची तगडी रक्कम दिली. २०२० मध्ये ‘ड्रीम इलेव्हन’ने आयपीएलचे मुख्य प्रायोजकत्व २२२ कोटी रुपयांना घेतले.

सरकारने फॅण्टसी स्पोर्ट्सवर २८ टक्के जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे या उद्योगावर मोठा आर्थिक भार पडेल. २०१८-२३ या पाच वर्षांच्या कालावधीत फॅण्टसी स्पोर्ट्स उद्योगाने सुमारे २३,८६० कोटी रुपयांचा संचयी महसूल निर्माण केला. त्याचबरोबर ४,२९० कोटी रुपयांचा वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) दिला. २०२४ मध्ये जीएसटी योगदान १,४८० कोटी रुपयांवरून वाढून ३,५२० कोटी रुपये होण्याचा अंदाज आहे.

२०२९ पर्यंत टीडीएस आणि जीएसटी एकत्रितपणे ५,८१५ कोटी रुपयांचे योगदान देण्याची अपेक्षा आहे.

फॅण्टसी स्पोर्ट्स आणि डोपामाइन

या गेमाड जुगाडाचे आकर्षण समजून घेण्यासाठी आपल्याला मेंदूमध्ये घडणाऱ्या रासायनिक प्रक्रियांवर लक्ष केंद्रित करावे लागेल. फॅण्टसी स्पोर्ट्स खेळताना, वापरकर्त्याच्या मेंदूमध्ये डोपामाइन नावाचे न्यूरोट्रान्समीटर मोठ्या प्रमाणात स्रावित होते. न्यूरोसायन्सच्या २०२२ मधील एका अभ्यासानुसार, फॅण्टसी स्पोर्ट्स खेळताना व्यक्तीच्या मेंदूमध्ये डोपामाइनचे प्रमाण ४०० टक्क्यांपर्यंत वाढू शकते – जे नैसर्गिक स्तरापेक्षा चार पट अधिक आहे.

डोपामाइन हे एक ‘बक्षीस रसायन’ म्हणून ओळखले जाते. जेव्हा आपण आनंददायक अनुभव घेतो तेव्हा मेंदू डोपामाइन स्रावित करतो. फॅण्टसी स्पोर्ट्स खेळताना, वापरकर्त्याचा निवडलेला खेळाडू अपेक्षेपेक्षा चांगली कामगिरी करतो- विशेषत: जर त्या खेळाडूला कर्णधार किंवा उप-कर्णधार म्हणून निवडले असेल तेव्हा डोपामाइन मोठ्या प्रमाणात स्रवतो. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अॅण्ड न्यूरो-सायन्सेस ( NIMHANS) च्या २०२१ च्या अभ्यासानुसार, हा ‘डोपामाइन आवेग’ तीव्र असू शकतो, विशेषत: जेव्हा वापरकर्त्याने पैसे लावलेले असतात.

डोपामाइन रिवॉर्ड सिस्टमची कार्यप्रणाली समजण्यासाठी, आपल्याला मेंदूच्या ‘न्यूक्लियस अकम्बेन्स’ ( Nucleus Accumbens) या भागाकडे लक्ष द्यावे लागेल. जर्नल ऑफ बिहेवियरल अॅडिक्शन्समध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार, न्यूक्लियस अकम्बेन्स हा भाग फँटसी स्पोर्ट्स खेळताना आणि जुगार खेळताना अगदी समान पद्धतीने सक्रिय होतो.

खेळात जिंकणे- मग ते छोटेसे बक्षीस का असेना- अत्यंत आनंददायक असते. कारण ते मेंदूमध्ये डोपामाइनचा धबधबा निर्माण करते. हा अनुभव इतका मजबूत असतो की मेंदू पुन्हा पुन्हा तशी इच्छा करतो. हेच फॅण्टसी स्पोर्ट्स व्यसनाकडे नेणारे पहिले पाऊल आहे.

मेंदूतील ‘पूर्वानुमान त्रुटी’ ( prediction error) नावाची प्रक्रिया यासाठी जबाबदार आहे. जेव्हा अनपेक्षित पारितोषिक मिळते तेव्हा डोपामाइनचा स्राव अधिक होतो. अशा परिस्थितीत मेंदू या अनुभवाचे अतिशय मजबूत स्मरण तयार करतो. फॅण्टसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म्स या मनोवैज्ञानिक तत्त्वाचा फायदा घेतात, म्हणूनच ते नवीन वापरकर्त्यांना प्रारंभिक बक्षिसे देतात. हे वापरकर्त्यांना या अॅप्सचे व्यसन लावते.

हार्वर्ड मेडिकल स्कूलच्या डॉ. हॅन्स ब्रायसेन यांच्या शोधानुसार, फॅण्टसी स्पोर्ट्सचे अनोखे वैशिष्ट्य असे आहे की, ते मेंदूच्या तीन प्रमुख प्रणालींना एकाच वेळी उत्तेजित करते : डोपामाइन रिवॉर्ड सिस्टम, अनिश्चिततेशी संबंधित कॉर्टेक्स आणि सामाजिक मान्यतेशी संबंधित अमिग्डाला. ही त्रिपदरी उत्तेजना व्यसनाच्या मानसशास्त्रामध्ये ‘परफेक्ट स्टॉर्म’ म्हणून ओळखली जाते.

जेव्हा वापरकर्ता विजेता ठरतो तेव्हा मिळणारा डोपामाइन हिट एवढा शक्तिशाली असतो की तो पुन्हा पुन्हा खेळण्यास प्रवृत्त करतो. हरल्यानंतरही, ‘जवळपासचा चुकण्याचा प्रभाव’ ( near- miss effect) मेंदूला पुन्हा प्रयत्न करण्यास प्रोत्साहित करतो. सॅन फ्रान्सिस्को युनिव्हर्सिटीमधील २०२३ च्या अभ्यासानुसार, फॅण्टसी स्पोर्ट्स अॅप्स जाणीवपूर्वक ‘जवळपास… पण थोडं दूर’ अशा अनुभवांचे डिझाइन करतात, ज्यामुळे वापरकर्त्यांना वाटते की ते पुढील वेळी जिंकण्याच्या जवळ आहेत.

नोटिफिकेशन पाठविणे आणि स्टॅंडिंग्जचे लाइव्ह अपडेट्स यांसारख्या फीचर्समुळे फॅण्टसी स्पोर्ट्स अॅप्स वापरकर्त्यांना सातत्याने गुंतवून ठेवतात. प्रत्येक अपडेटसह डोपामाइनचे छोटे बर्स्ट होतात, जे व्यसनाच्या चक्राला बळकट करते.

स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीचे डॉ. अँड्रू हुबरमन यांच्या संशोधनानुसार, डोपामाइन ही केवळ बक्षिसाबद्दलच नाही तर अपेक्षेबद्दलदेखील आहे. फॅण्टसी स्पोर्ट्स प्लॅटफॉर्म्स अपेक्षा वाढविणारे एक पारिस्थितिकी तंत्र तयार करतात – रँकिंग, पॉइंट्स सिस्टम्स, लिडरबोर्ड्स आणि रोलिंग टूर्नामेंट्स. या सर्व गोष्टी मेंदूला सतत डोपामाइनची अपेक्षा करण्यास प्रवृत्त करतात, जे व्यसन चक्र बळकट करते.

आज भारतातील सुमारे २२५ दशलक्ष फॅण्टसी स्पोर्ट्स वापरकर्त्यांपैकी जवळपास ६० टक्के जणांमध्ये व्यसनाच्या वर्तनाची लक्षणे दिसून येतात. डोपामाइन रिवॉर्ड सिस्टममधील या कृत्रिम हस्तक्षेपाचे दीर्घकालीन परिणाम गंभीर असू शकतात.

मानसिक आरोग्यावरील दुष्परिणाम

फॅण्टसी स्पोर्ट्सचे व्यसन हे कोणत्याही व्यसनाप्रमाणेच मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम करू शकते. बेंगलोरमधील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ अॅण्ड न्यूरो-सायन्सेस ( NIMHANS)च्या ‘सर्व्हिस फॉर हेल्दी यूज ऑफ टेक्नॉलॉजी’ ( SHUT) क्लिनिकचे प्रमुख डॉ. मनोज शर्मा यांच्या मते, २०१४ मध्ये आठवड्याला तीन-चार रुग्ण गेमिंग व्यसनासाठी येत होते, आता ही संख्या वाढून २०-२२ झाली आहे.

डोपामाइन सेन्सिटिव्हिटीचा ऱ्हास – कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीच्या २०२१च्या अभ्यासानुसार, फॅण्टसी स्पोर्ट्ससारख्या गेम्सचे दीर्घकालीन व्यसन मेंदूतील डोपामाइन रिसेप्टर्सची संख्या कमी करते. याला ‘टॉलरन्स’ म्हणतात, ज्यामुळे व्यक्तीला समान आनंदाचा अनुभव घेण्यासाठी अधिकाधिक उत्तेजना हवी असते. परिणामी, रोजच्या जीवनातील साधारण आनंददायक क्रिया आनंददायी वाटेनाशा होतात.

चिंतेत वाढ – न्यूरोसायन्स जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या २०२२ च्या अभ्यासानुसार, फॅण्टसी स्पोर्ट्स खेळणाऱ्या ६० टक्के व्यक्तींमध्ये चिंता वाढलेली आढळली. कारण त्यांच्या मेंदूतील अमिग्डाला (भावना नियंत्रित करणारा भाग) आणि प्रीफ्रंटल कॉर्टेक्स (निर्णय क्षमता नियंत्रित करणारा भाग) यांच्यातील संतुलन बिघडते. हे अनिश्चिततेच्या स्थितीत तणाव वाढवते.

तणावाचा सामना

ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या अभ्यासानुसार, या खेळांत पैसे गमावणाऱ्या ३७ टक्के लोकांमध्ये प्रचंड तणावाची (डिप्रेशन) लक्षणे दिसतात. ‘सिरोटोनिन’ या आनंददायक न्यूरोट्रान्समीटरच्या पातळीत घट होते; आणि मेंदूतील ‘कॉर्टिसोल’ या तणाव हार्मोनच्या पातळीत वाढ होते. हे दोन्ही परिणाम एकत्र येऊन डिप्रेशनचा धोका वाढवतात.

नात्यांवरील परिणाम

याबाबत एका सर्वेक्षणानुसार, २८ टक्के वापरकर्त्यांनी गेमाड जुगाडाच्या सवयींमुळे कौटुंबिक संबंध बिघडल्याचे मान्य केले आहे. हे व्यसन एवढे तीव्र होऊ शकते की व्यक्ती आपल्या प्रियजनांवरील प्रेमापेक्षा गेमिंगला अधिक प्राधान्य देते.

आर्थिक तणाव – भारतातील एका सर्वेक्षणानुसार खेळातील आर्थिक नुकसानामुळे निर्माण होणारा तणाव मानसिक आरोग्य समस्या वाढवतो. ऑक्सफोर्ड युनिव्हर्सिटीच्या इंटरनेट इन्स्टिट्यूटच्या एका अभ्यासानुसार, सरासरी फँटसी स्पोर्ट्स वापरकर्ता सहा महिन्यांत त्याच्या मासिक उत्पन्नाच्या १२-१५ टक्के गमावतो.

स्व-मूल्यांकनाची कमतरता – स्टॅनफोर्ड मेडिकल स्कूलच्या अभ्यासानुसार, जे लोक या खेळांत मोठी रक्कम गमावतात, त्यांच्यात स्व-मूल्यांकनाची कमतरता निर्माण होते. त्यांचा मेंदू त्यांच्या अपयशाला व्यक्तिगत अपयश म्हणून पाहतो, ज्यामुळे आत्मसन्मान कमी होतो.

अनैतिक वर्तनांत वाढ

जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सिटीच्या अभ्यासानुसार, या खेळांच्या अति व्यसनामुळे नैतिक निर्णय क्षमता कमी होते. अनेक व्यसनी आपले नुकसान भरून काढण्यासाठी लबाडी, चोरी किंवा अफरातफर करू शकतात.

आयुष्यातील अन्य क्षेत्रांकडे दुर्लक्ष

डॉ. मनोज शर्मा यांच्या अभ्यासानुसार, २२ टक्के गेमाड जुगाड वापरकर्त्यांनी या व्यसनामुळे त्यांच्या कामावर नकारात्मक परिणाम झाल्याचे सांगितले. तीव्र व्यसनामुळे व्यक्ती नोकरी, शिक्षण, कारकीर्द, कौटुंबिक जबाबदाऱ्या यांकडे दुर्लक्ष करते.

आत्महत्येत वाढ

तेलंगणा राज्यातील निझामाबाद येथे एका कुटुंबातील तीन जणांनी ऑनलाइन गेमिंगमध्ये ३० लाख रुपये गमावल्यानंतर आत्महत्या केली. पालमपूर, हिमाचल प्रदेशमधील मनोविश्लेषक डॉ. सोहेल खान यांच्या अभ्यासानुसार, या खेळांमुळे व्यसनासह मोठ्या आर्थिक नुकसानीमुळे आत्महत्येचे विचार निर्माण होण्याचा धोका वाढतो.

सामाजिक तुटलेपणा

अखेरीस, या खेळांच्या व्यसनामुळे व्यक्ती सामाजिक संबंधांत तुटलेपणा अनुभवते. वास्तव जगातील सामाजिक संबंधांऐवजी तो या खेळांच्या आभासी जगात अधिक वेळ घालवू लागतो. त्यामुळे डिप्रेशन आणि चिंतेचा सर्वाधिक सामना त्याला करावा लागतो.

हे टाळणे योग्य का?

हा पैसा दैनंदिन गमावण्याचा खेळ खेळणे टाळण्याची किंवा त्याचा वापर कमी करण्याची अनेक महत्त्वपूर्ण कारणे आहेत. फँटसी स्पोर्ट्स अॅप्स आपले मन, वेळ आणि पैसे सतत आकर्षित करतात. वाढती गुंतवणूक, अमर्याद स्क्रोलिंग आणि प्रत्येक सामन्याबद्दल विचार करण्याचा तणाव यामुळे आपली स्वतंत्र विचारसरणी कमकुवत होते. अखेरीस आपण एखाद्या बाहेरच्या संस्थेच्या अधीन होऊन आपली स्वायत्तता गमावतो. हे मानसिकतेवर चांगले परिणाम करत नाही.

हा खेळ खेळणारे लोक कालांतराने स्पोर्ट्सचा आनंद घेण्यापेक्षा आपल्या आभासी संघाच्या कामगिरीकडे अधिक लक्ष देतात. यामुळे व्यक्ती खेळाचा खरा आनंद घेण्यापासून वंचित राहतो. अनेक व्यक्ती आभासी संघावरून वास्तविक खेळाडूंवर राग काढतात, ज्यामुळे त्यांच्या खेळाच्या आनंदाची हानी होते. किती विचित्र परिस्थिती आहे – ज्या खेळांवर आपण प्रेम केले, त्याच खेळांकडे पाहण्याचा दृष्टिकोन या गेमाड जुगाडाने बदलला.

या जुगारासारख्याच माध्यमातून अचानक श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहणे हे व्यक्तीला कठोर परिश्रम, नियमित बचत आणि गुंतवणुकीसारख्या प्रचलीत आर्थिक मार्गांपासून दूर नेऊ शकते. या खेळांत मोठे बक्षीस जिंकण्याची संभाव्यता अत्यंत कमी आहे. त्यापेक्षा किती तरी उत्तम मार्ग आहेत जे आपल्याला खऱ्या अर्थाने श्रीमंत बनवू शकतात – मग ती आर्थिक, मानसिक किंवा भावनिक श्रीमंती असो.

या खेळांच्या व्यसनातून बाहेर पडण्यासाठी, पहिली पायरी आहे आपल्या अडचणीला ओळखणे आणि स्वीकारणे. आपण स्वत:ला प्रश्न विचारायला हवेत- आपण या खेळांसाठी इतर महत्त्वाच्या कामांकडे दुर्लक्ष करतो का? आपण आवाक्यापेक्षा जास्त पैसे त्यात लावतो का? आपण हरल्यावर नकारात्मक भावना अनुभवतो का? आपण नातेसंबंधांना या खेळांपेक्षा कमी प्राधान्य देतो का?

या प्रश्नांच्या बहुतेक उत्तरांमध्ये ‘होय’ असल्यास, आता यातून बाहेर पडण्याची वेळ आली आहे. या खेळांचे अॅप्स डिलीट करा, आपल्या फोनवर ‘स्क्रीन टाइम’ची मर्यादा आखून घ्या आणि व्यसनाशी लढण्यासाठी ‘डिजिटल डिटॉक्स चॅलेंज’ स्वीकारा. स्वत:साठी खर्चाची मर्यादा निश्चित करा, ऑटो-पेमेंट फीचर्स बंद करा आणि महिन्याचे ‘बजेट’ तयार करा. या काळजुगारी अॅप्सऐवजी खऱ्या खेळांमध्ये भाग घ्या…

संत तुकाराम महाराजांच्या एका अभंगाचा उल्लेख मुद्दाम इथे करतो, जो व्यसनापासून मुक्त होण्याच्या मार्गावर प्रकाश टाकतो-

‘‘विषयाचे आवडी धरिली जिवें।

तेणें केली सेवा देवें।

वासना जीवीची पाहिजे।

होय तरी सुख नांदे जीवें।।’’

म्हणजेच, जेव्हा आत्मा विषयांच्या आकर्षणाकडे खेचला जातो तेव्हा त्याची भक्ती देवापासून दूर जाते. आपल्या मनातील वासना आणि इच्छा नष्ट झाल्याशिवाय मन शांत होत नाही. फॅण्टसी स्पोर्ट्ससारख्या व्यसनांपासून मुक्त होण्यासाठी आपल्याला स्वत:च्या मनावर विजय मिळवावा लागेल, अनावश्यक इच्छांवर नियंत्रण ठेवावे लागेल आणि जीवनातील खऱ्या आनंदाकडे वळावे लागेल.

श्रीमंत स्वप्नांचे व्यसन…

दोन दशकांपूर्वी ‘कौन बनेगा करोडपती’ या टीव्ही मालिकेने प्रश्नमंजूषेला राष्ट्रीय पातळीवर लोकप्रिय केले. त्या वेळी त्यातील एक कोटी ही बक्षिसाची रक्कम आणि त्यासाठी किमान ज्ञानाचा म्हणजेच निर्णयकौशल्याचा कस याबाबत अप्रूप होते. फोनद्वारे तिथपर्यंत पोहोचायची स्वप्ने देशवासीयांमध्ये सारख्याच पातळीवर होती. आता आभासी खेळातील एकाहूून अधिक कोटींच्या रकमा, अनेक विजेते बनण्याची आमिषे या खेळांची सवय व्यक्तीला लागेल, याची दक्षता घेत आहेत. परिणामी पारंपरिक जुगार खेळणाऱ्यांपासून ते आयुष्यात कधीच गेमाडपंथाच्या नादाला न लागलेल्या व्यक्तीदेखील आपले कौशल्य अजमावण्याच्या वाटेला जात आहेत. लॉटरी, सट्टा किंवा इतर अवैध बदनाम मार्गांऐवजी हा दिसायला फारच सोज्ज्वळ प्रकार असल्याने त्यात पैसे लावताना आपण काही वावगे करीत नसल्याची खात्री प्रत्येकाला असते. मग कर्जे काढून यात पैसे हरलेल्यांच्या अवतीभोवतीची उदाहरणे सातत्याने ऐकू येतात. अगदीच किंचित पॉइंट्स कमी मिळाल्याने किंवा जिंकण्याच्या अगदी जवळ जाऊन पैसे गमावलेल्यांची संख्यादेखील आजूबाजूला प्रचंड पाहायला मिळते. तरीही श्रीमंत बनविणाऱ्या स्वप्नांचे व्यसन काही थांबायला तयार होत नाही. याचे सामाजिक दुष्परिणाम पुढल्या काळात आणखी प्रखर होतील. तेव्हा त्यांत पोळून निघायचे की बाहेर पडायचे हे ठरविण्यासाठी योग्य वेळ प्रत्येकाने आपापली निवडणे आवश्यक.

हे सारे कसे होते?

फॅण्टसी स्पोर्ट्स हे एक ऑनलाइन प्लॅटफॉर्म आहे, जिथे वापरकर्ते खऱ्या खेळातील खेळाडूंचा एक आभासी संघ तयार करतात आणि त्या खेळाडूंच्या वास्तविक खेळातील कामगिरीवर आधारित स्पर्धा करतात. प्रत्येक खेळासाठी वापरकर्त्याला प्रवेश शुल्क भरावे लागते, ज्याचा उपयोग बक्षिसांच्या रकमेसाठी केला जातो. उदाहरणार्थ, जर पाच खेळाडू प्रत्येकी १०० रुपये देतात, तर एकूण ५०० रुपये जमतात. या रकमेतून सर्वप्रथम २८ टक्के जीएसटी वजा होतो, म्हणजेच १४० रुपये सरकारकडे जातात. उर्वरित ३६० रुपयांतून प्लॅटफॉर्म त्यांचे सेवा शुल्क म्हणून साधारणत: १५३०टक्के कापून घेते. २० टक्के सेवा शुल्क मानल्यास त्यांना ७२ रुपये मिळतात आणि २८८ रुपये बक्षिसाच्या रकमेसाठी उपलब्ध राहतात. विजेत्याला मिळालेल्या रकमेवर ३० टक्के टीडीएस (कर) आकारला जातो, ज्यामुळे प्रत्यक्षात विजेत्याला २०१.६० रुपये मिळतात.

फॅण्टसी क्रिकेटमध्ये वापरकर्त्याला दोन संघांतील खेळाडूंमधून ११ खेळाडू निवडावे लागतात, ज्यामध्ये कर्णधार आणि उपकर्णधारही निवडावे लागतात. खेळाडूंच्या निवडीवर मर्यादा असतात. प्रत्येक संघातून जास्तीत जास्त ७ खेळाडू, कमीत कमी तीन फलंदाज, कमीत कमी एक यष्टिरक्षक, कमीत कमी एक गोलंदाज, इत्यादी. प्रत्येक खेळाडू ७५१२५ क्रेडिट्स किमतीचा असतो आणि एकूण ७५ ते १०० क्रेडिट्सच्या मर्यादेत संघ तयार करावा लागतो.

खेळाडूंची कामगिरी त्यांच्या वास्तविक खेळातील प्रदर्शनावर आधारित असते धावा बनवणे, बळी घेणे, झेल पकडणे, यष्टिचीत करणे इत्यादी कृत्यांसाठी पॉइंट्स मिळतात. कर्णधार म्हणून निवडलेल्या खेळाडूला २ गुणिले पॉइंट्स आणि उपकर्णधाराला १.५ गुणिले पॉइंट्स मिळतात. सर्वाधिक पॉइंट्स मिळवणारा वापरकर्ता विजेता ठरतो.

यात जिंकण्याची संधी कितपत?

या खेळांची सर्व अॅप्स ‘करोडपती व्हा’ अशी स्वप्ने दाखवतात; परंतु या माध्यमातून खरोखर श्रीमंत होण्याची शक्यता किती? गणितीय दृष्टिकोनातून याचे उत्तर पाहा…

या खेळांत मोठे बक्षीस जिंकण्याची गणितीय संभाव्यता अत्यंत कमी. म्हणजे किती तर यातल्या ‘मेगा इव्हेंट’मध्ये विजेता होण्याची संभाव्यता ०.०००००६६७ टक्के. म्हणजेच जवळपास १५ लाखांत एकाची शक्यता.

हे इतके कठीण का?

दोन क्रिकेट संघांतील २२ खेळाडूंमधून, वापरकर्त्याला ११ खेळाडू निवडावे लागतात.

अशा प्रकारे तयार होणाऱ्या संभाव्य संघांची (टीम्स) संख्या ७०५,४३२ होते.

त्यापैकी प्रत्येक संघामध्ये, कर्णधार आणि उपकर्णधार निवडण्याचे ११० पर्याय बनतात.

एकूण बदलजाळे ( कॉम्बिनेशन्स) : ७०५,४३२ ७ ११० = ७७,५९७,५२० (७ कोटी ७५ लाख ९७ हजार ५२०).

म्हणजेच, सर्व संभाव्य तांत्रिक जाळ्यातून अचूक विजयी टीम निवडण्याची संभाव्यता केवळ ०.००००००१२८ आहे. त्यातही, क्रेडिट मर्यादा, विविध खेळाडूंच्या श्रेणी (फलंदाज, गोलंदाज,यष्टीरक्षक) यांसारख्या अतिरिक्त नियमांमुळे, हे आणखी कठीण.

त्याहून यांची शक्यता अधिक

वीज कोसळून मृत्यू होण्याची संभाव्यता : १/१५,३००

विमान अपघातात मृत्यू होण्याची संभाव्यता : १/१११,३७१

लॉटरी जिंकण्याची संभाव्यता : १/१४,०००,०००

ऑलिम्पिक पदक जिंकण्याची संभाव्यता : १/६६२,०००

म्हणजेच, एखाद्या सामान्य खेळाडूला ऑलिम्पिक पदक जिंकण्याची संभाव्यता फॅण्टसी स्पोर्ट्समध्ये करोडपती होण्यापेक्षा बऱ्याच पटीने अधिक आहे!

chintanthorat@protonmail.com (लेखक राजकीय संवाद विश्लेषक आणि माध्यमांचे अभ्यासक आहेत)



Source link