Thursday, July 16, 2026
Home Blog Page 311

Is IDBI Bank a government bank, a private bank, or a moneylender | आयडीबीआय बँक

0
Is IDBI Bank a government bank, a private bank, or a moneylender | आयडीबीआय बँक


सरकारचा विक्रेता विभाग ज्याला ‘दीपम’ असे संक्षिप्तनाम देण्यात आले आहे, एका नव्या मोहिमेवर सध्या आहे. सरकारला स्वतःचे आणि भारतीय आयुर्विमा महामंडळ म्हणजेच एलआयसीलाही तिचे गुंतलेले भांडवल सोडवून घ्यायचे आहे. त्या दिशेने ‘दीपम’चे प्रयत्न गेल्या अनेक वर्षांपासून सुरूही आहेत. पण यशाचा प्रकाश काही गवसू शकलेला नाही.

सरतेशेवटी चालू आर्थिक वर्षात तो दिसेल असा त्याच्या नव्या प्रमुखांचा दावा आहे. तर बराच काळ चर्चेत असलेल्या ‘आयडीबीआय बँके’चे काय होणार, या प्रश्नाची तड लवकरच लागण्याची चिन्हे आहेत. या बँकेचा मुद्दा राजकीय, आर्थिक चर्चापटलाला व्यापून टाकेल वगैरे म्हणणे अगदीच महत्त्वाकांक्षी असले तरी ती, या संबंधाने रोध-प्रतिरोध, रोष, त्रागा, हळहळ अशा भाव-भावनांचे प्रतिध्वनी निश्चितच उमटत आहेत. १९६४ साली संसदेच्या कायद्याद्वारे स्थापित या संस्थेने मधल्या काळात अनेक संक्रमणं पाहिली. आता ती मूळ अस्तित्वासह नष्ट होणे म्हणजे देशातील आणखी एका विकास वित्त संस्थेला मूठमाती देण्यासारखेच आहे.

विकास वित्त संस्था (Development Financial Institution – DFI) म्हणजे काय? या संस्थांची भारतातील आजची समर्पकता काय, हे आपण आज ‘प्रतिशब्द’मधून पाहू.आयडीबीआय बँकेच्या विक्रीला त्या बँकेतील कर्मचारी-अधिकाऱ्यांचा निकराने विरोध आहे. तर आजच्या काळाला धरून अशा विरोधाबाबत नाके मुरडणारेही आहेत. याचे प्रातिनिधिक स्वरूप म्हणजे -“जर आयसीआयसीआयला यशस्वीरीत्या खासगी बँकेत रूपांतरित केले गेले, तर मग आयडीबीआय का होऊ शकत नाही? करदात्यांचा पैसा आणखी उधळून वाया दवडण्यापेक्षा खासगीकरण केलेलेच बरे!”

“काही हजार कर्मचाऱ्यांच्या नोकरीच्या सुरक्षिततेसाठी, केंद्र सरकारने आयडीबीआय बँकेतील त्यांची हिस्सेदारी का राखून ठेवावी? अत्यंत सुस्त, कामचुकार आणि बथ्थड कर्मचारी हे सरकारचे जावईच जणू.”बँकेच्या कर्मचारी-अधिकाऱ्यांचे विरोधाचे मुद्दे अधिक ठोस आणि मूलगामी आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँक म्हणून आजवर तिचा सरकारच्या कल्याणकारी योजनांत सहभाग कोणालाही नाकारता येणार नाही.

जनधन योजनेतील १८.७२ लाख खाती, पंतप्रधान सुरक्षा तसेच जीवन विमा योजनेतील एकत्रित १४ लाखांहून अधिक खातेदार, अटल पेन्शन योजनेत साडेपाच लाख खातेदारांचा सहभाग हे आकडे याचा प्रत्यय देतात. अगदी तळच्या ग्राहकांना ती सेवा देत आहे. या शिवाय पीक कर्जे, पीएम-स्वनिधी, मुद्रा योजना, स्टँड अप इंडिया योजनेत तिने कोट्यवधींची विनातारण कर्जे फेरीवाले, छोटे-कारागीर, वंचित समाज घटकांतील स्वयंउद्योगी होतकरूंना दिली आहेत. खासगी अथवा विदेशी गुंतवणूकदारांच्या मालकीच्या बँकेकडून हे होणे अशक्यच!

किंबहुना, जानेवारी २०१९ मध्ये सरकारने आपला ५१ टक्के हिस्सा ‘एलआयसी’ या सरकारी महामंडळाकडेच वळता केला आणि तरी रिझर्व्ह बँकेने आयडीबीआयचे ‘खासगी’ म्हणून वर्गीकरण केले. मात्र त्यासरशी, बँकेच्या कैक शाखांनी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डाचे वितरण व पतपुरवठा बंद केला, असे युनायटेड फोरम ऑफ आयडीबीआय ऑफिसर्स ॲण्ड एम्प्लॉइज’चे समन्वयक देवीदास तुळजापूरकर यांनी सांगितले. बँकेतील २० हजारांहून अधिक कर्मचाऱ्यांमधील जवळपास ४७ टक्के अनुसूचित जाती-जमाती, ओबीसी आणि अल्प-उत्पन्न गटाचे प्रतिनिधित्व करणारे आहेत. शिवाय २९ टक्के महिला कर्मचारी आहेत. खासगीकरणानंतर मनुष्यबळाचे हे सामाजिक प्रारूप टिकून राहिल?मुंबई-पुण्यासह देशातील अव्वल ७ बड्या शहरांमध्ये आयडीबीआय बँकेच्या १२० स्थावर मालमत्ता आहेत, त्यांचे मूल्यांकन कसे केले जाईल?

मल्या-नीरव मोदी-चोक्सी या फरारांचा समावेश असलेल्या हेतुपुरस्सर कर्जबुडव्यांनी (विल्फुल डिफॉल्टर) थकविलेल्या २६,५६२ कोटींच्या वसुलीचे काय होणार? असे अनेक सवाल कर्मचारी-अधिकारी मंचाने उपस्थित केले आहेत.सर्वात कळीचा प्रश्न हा की, विकास वित्त संस्था (डीएफआय) म्हणून आयडीबीआय बँकेच्या योगदानाचे विस्मरण आणि देशाच्या औद्योगिक विकासातील ही महत्त्वपूर्ण भूमिका नफा हेच सारसर्वस्व असलेल्या व्यापारी बँकांवर सोपविली जाईल काय? एक गोष्ट जी लक्षात घेतली पाहिजे ती म्हणजे भारतीय उत्पादन क्षेत्र तसेच देशातील वित्तीय सेवा पायाभूत सुविधांचा पाया तयार करण्यात तीन मुख्य डीएफआयची मोठी भूमिका राहिली आहे. या तीन डीएफआय म्हणजे – आयसीआयसीआय, आयडीबीआय आणि आयएफसीआय. देशात निर्मिती क्षेत्र, पोलाद, खते, अभियांत्रिकी क्षेत्रात ज्या बड्या कंपन्या आज डौलाने उभ्या आहेत, त्या या डीएफआयनी पुरविलेल्या प्रारंभिक भांडवलांतूनच. इतकेच नव्हे तर एनएसई, एनएसडीएल, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन, केअर, एक्झिम बँक, सिडबी, एससीआयसीआय, क्रिसिल, एचडीएफसी, टीडीआयसीआय आणि टीएफसीआय यासारख्या खासगी क्षेत्रातील पायाभूत वित्तीय संस्थांच्या वाढीलादेखील त्यांनी प्रोत्साहन दिले.

केवळ अनुत्पादित मालमत्ता (एनपीए) वाढल्या म्हणून त्यांना आज निकाली काढणे म्हणजे इतिहासाशी बेईमानी ठरेल. वस्तुतः आयडीबीआय बँकेने गेल्या दोन वर्षांत उत्तम नफ्याची कामगिरी करूनही दाखविली आहे. आज निर्मिती क्षेत्राचा देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पादनांत (जीडीपी) वाटा वाढविण्याचे आपल्यापुढे आव्हान आहे. अनेक नवनवीन उद्योग क्षेत्र उदयास येत आहेत. अशा समयी भारताच्या निर्मिती क्षेत्र, पायाभूत क्षेत्र आणि नवतंत्रज्ञानाधारीत डिजिटल क्षेत्रासाठी दीर्घ मुदतीच्या संस्थात्मक पतपुरवठ्याचे स्रोत नितांत गरजेचे बनले आहेत. सरकारचे पाठबळ असलेल्या आणि व्यावसायिकरीत्या चालणाऱ्या विकास वित्त संस्थांची आज कधी नव्हे इतकी गरज आहे. त्यांना संपविणे म्हणजे आपल्याच पायावर धोंडा ओढवून घेणे. नंतर हळहळ व्यक्त करण्याची वेळ येऊ नये, यासाठी इतिहासाकडे पाठ न करता, इतिहासातून योग्य तो बोध घेणे हेच अधिक शहाणपणाचे.



Source link

Ordnance Factory Chandrapur cancels leaves of employees due to tense in India and Pakistan zws 70

0
Ordnance Factory Chandrapur cancels leaves of employees due to tense in India and Pakistan zws 70



Ordnance Factory Chandrapur cancels leaves of employees due to tense in India and Pakistan zws 70 | आयुध निर्माणीतील कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द; भारत-पाकमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर निर्णय



Source link

देश – परदेश: अमेरिकेची ढासळती विश्वासार्हता

0
देश – परदेश:  अमेरिकेची ढासळती विश्वासार्हता


ज्ञानेश्वर मुळे46 मिनिटांपूर्वी

  • कॉपी लिंक

ट्रम्प यांनी संपूर्ण निर्णय प्रक्रिया आपल्या हातात घेतली आहे आणि ते आपले निर्णय एकहाती अंमलात आणण्याचा प्रयत्न करतात. मात्र, त्यातही सातत्य नसते. वारंवार स्वत:च्याच भूमिकेत ते बदल करतात. त्यामुळे आजवर जगासाठी मानदंड मानल्या जाणाऱ्या अमेरिकेच्या विश्वासार्हतेला मात्र तडा जातो आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ज्या पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारे धक्का देऊन प्रस्थापित नियमावलीला सुरुंग लावला आहे, त्यामुळे संपूर्ण विश्व चक्रावून गेले आहे. त्यांनी आयातीवर लागू केलेल्या टेरिफ म्हणजे करांमुळे जगाचा थरकाप उडाला आहे. हे करताना ट्रम्प यांनी तिथल्या संसदेला विश्वासात घेतले नाही. कोणत्याही प्रकारचा संवाद किंवा जनतेच्या मताचा अंदाज घेतला नाही. परिणामी अमेरिकेचा शेअर बाजार सुमारे आठ ट्रिलियनने डॉलरने खाली गेला.

अमेरिकेच्या राज्यघटनेने राष्ट्राध्यक्षाला आणीबाणीच्या किंवा गंभीर परिस्थितीत वापरण्याचे अधिकार दिले आहेत. पण, याचा अर्थ तेथे काँग्रेस किंवा सिनेट अस्तित्वात नाही, असे नव्हे. खरे तर अमेरिकेच्या राज्यघटनेतील कलम एकच्या भाग आठप्रमाणे कोणत्याही कायद्याची सुरूवात संसदेच्या खालच्या गृहापासून व्हायला हवी. यातले काहीही न करता ट्रम्प यांनी स्वतःच्या अधिकारामध्ये एखाद्या राजेशाही किंवा हुकूमशाहीमध्ये जसे निर्णय आणि फतवे जाहीर केले जातात, तशीच पद्धत अवलंबलेली दिसते. त्यांची निर्णय घेण्याची प्रक्रिया ही वरकरणी ठरवून केल्यासारखी भासत असली, तरी त्यामध्ये वैचारिक खोली मात्र अभावानेच दिसते.

ट्रम्प यांच्या एकंदरीतच कार्यपद्धतीविषयी माझ्यासारख्याच्या मनात अनेक शंका उपस्थित होतात. आता हेच पाहा. अमेरिका हा जगातील सर्वात ताकदवान देश आहे. या देशाच्या राष्ट्राध्यक्षांकडे एका अर्थाने संपूर्ण जगाला दिशादर्शन करण्याचे काम आले आहे. यापूर्वी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी जगभर, मुख्यतः लोकशाही पसरवण्याच्या दृष्टीने आणि वेगवेगळ्या राष्ट्रांमध्ये मानवी हक्कांचे संरक्षण व्हावे, यासाठी काम केले आहे. त्यामुळेच अमेरिका काय करते, अमेरिकेची धोरणे काय आहेत, वेगवेगळ्या राष्ट्रांसंदर्भात अमेरिका कोणते वक्तव्य करते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष असते. लष्करी सत्ता असण्याबरोबरच अमेरिका ही तंत्रज्ञानाची राजधानी आहे. शिक्षण आणि संस्कृतीबरोबरच जगाचे आर्थिक केंद्रही आहे. अशा देशाच्या राष्ट्राध्यक्षांकडून संपूर्ण जग, जबाबदार वर्तन-व्यवहाराची अपेक्षा करत असते. या पार्श्वभूमीवर आपण फक्त एक – दोन विषयांबाबत राष्ट्राध्यक्ष ट्रम्प जे बोलतात आणि करतात ते तपासून पाहूया.

‘राष्ट्राध्यक्ष होताच एका दिवसात युक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्ध थांबवू,’अशी काहीशी गर्वोक्ती ट्रम्प यांनी केली होती. रशिया आणि युक्रेनमधील युद्ध ही एक अत्यंत गंभीर गोष्ट आहे. या युद्धाचा परिणाम फक्त या दोन देशांपुरता मर्यादित नसून, आसपासच्या देशांबरोबरच संपूर्ण जगावर झाला आहे. उदाहरणार्थ, एका बाजूला संपूर्ण युरोप आणि दुसरीकडे रशिया व चीन अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. पारंपरिक नात्यांचा विचार करता, अमेरिका आणि युरोप हे ‘नाटो’ या आंतरराष्ट्रीय लष्करी संघटनेचे सदस्य आहेत. या पार्श्वभूमीवर अमेरिका ‘नाटो’बरोबर काम करून रशियाविरुद्ध मोर्चेबांधणी करेल आणि युक्रेनला सहाय्य करेल ,अशी सर्वांचीच अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र अगदी सुरूवातीपासूनच ट्रम्प हे अमेरिकेचा पारंपरिक शत्रू मानल्या गेलेल्या रशियाच्याच बाजूने बोलत आहेत. राष्ट्राध्यक्षांनी स्वतंत्र भूमिका घ्यावी, याबाबत कोणाचेही दुमत नसले, तरी बहुधा आतापर्यंतच्या राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकेच्या स्थायी धोरणांपलीकडे जाऊन वेगळ्याच देशाची बाजू घेण्याचा प्रकार मात्र पहिल्यांदा होत आहे. अमेरिकेत रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट असे दोन राजकीय पक्ष आहेत. त्यांच्या धोरणांमध्ये करप्रणालीपासून विदेशातून येणाऱ्या मनुष्यबळापर्यंत अनेक बाबतीत मतभेद आहेत. पण, आतापर्यंत या मतभेदांचे स्वरूप फार उग्र नसायचे आणि असले तरी त्या बाबतीत काँग्रेस आणि सिनेटमध्ये चर्चा होऊन निर्णय घेतले जात. आता मात्र परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे. ट्रम्प यांनी संपूर्ण निर्णय प्रक्रिया आपल्या हातात घेतली आहे आणि आपले निर्णय जवळपास एकहाती अंमलात आणण्याच्या दृष्टीने ते प्रयत्नशील असतात. मात्र, यातही सातत्य नसते आणि वारंवार स्वत:च्याच भूमिकेत ते बदल करत असतात.

आता युक्रेन आणि रशियाच्या युद्धाबाबतच पाहा. ट्रम्प यांना सत्तेवर येऊन शंभर दिवस होऊन गेले आहेत. त्यांनी अलीकडेच वक्तव्य केले की, रशिया क्रिमियाचा प्रदेश स्वत:कडे घेईल. स्वतःच्या या वक्तव्यावर पुन्हा एकदा विचार करताना ते म्हणतात, ‘झेलेन्स्की यांना क्रिमिया युक्रेनजवळ ठेवणे कठीण जाईल.’ त्यामुळे अप्रत्यक्षरीत्या ट्रम्प रशियाचा अजेंडा चालवताहेत, असे अनेकांना वाटत आहे. पण, हे करताना युक्रेनच्या बाजूने कोणताही समतोल साधण्याचा त्यांचा प्रयत्न दिसत नाही. त्यांच्या वक्तव्यातून हे स्पष्ट झाले आहे की, ‘नाटो’मध्ये युक्रेनने प्रवेश करावा, या विचाराला त्यांचा अजिबात पाठिंबा नाही. एका बाजूला क्रिमिया रशियाकडे देणे आणि दुसरीकडे युक्रेनला ‘नाटो’मध्ये प्रवेश देण्याच्या बाबतीत विरोध करणे, यात ट्रम्प यांच्या कोणत्या राजनैतिक गुणांचा प्रत्यय येतो, हे सांगणे अतिशय कठीण आहे.

ट्रम्प ज्याप्रमाणे रशिया – युक्रेनसंदर्भात वक्तव्ये करत आहेत, त्याचप्रमाणे त्यांनी चीनवर लादलेले टेरिफ हाही अतिशय विवादास्पद विषय ठरला आहे. कोणत्याही ठोस कारणाशिवाय अमेरिकेने जीनवर १४५ % टेरिफ लावले आहे. चीनने प्रत्युत्तरादाखल तितकेच टेरिफ लागू केले. याबाबत बोलताना ट्रम्प म्हणाले की, चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांचा फोन आला होता आणि या करप्रणालीविषयी आमची फोनवर चर्चा झाली आहे. पण, ती केव्हा झाली याबाबत त्यांनी काही स्पष्टीकरण न दिल्यामुळे अशी चर्चा झालीच नसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अमेरिकेतील चीनच्या दूतावासानेही अशा प्रकारची चर्चा झाल्याचा इन्कार केला आहे. थोडक्यात, ट्रम्प धडधडीतपणे खऱ्याची साथ सोडत आहेत, हे आपण पाहतो आहोत. इतकेच नव्हे तर २०० देशांनी आपल्याशी टेरिफसंदर्भात करार करण्याची इच्छा व्यक्त केली असल्याचेही ते म्हणाले. अशा देशांची नावे सांगा, असा आग्रह पत्रकारांनी धरताच ते वेगळेच काहीतरी बोलत राहिले आणि मुख्य विषयाला बगल दिली.

या सर्व गोष्टींतून एकच सत्य समोर येते. अमेरिकेच्या विश्वासार्हतेकडे आजपर्यंत जगामध्ये एक मानदंड म्हणून पाहिले जात होते. आज तिच्या या विश्वासार्हतेला तडा जातो आहे. यामुळे इतर देशांपेक्षा अमेरिकेवर त्याचे गंभीर परिणाम होण्याची शक्यता आहे.

ट्रम्प यांची वक्तव्ये आणि धोरणांबाबत जगभरातील देश साशंकच आहेत असे नव्हे, तर त्यांना ट्रम्प तर्कहीन निर्णय घेऊ शकतात, याची पुरेपूर जाणीव आहे. त्यांच्या धक्कादायक धोरणांचा आणि वक्तव्याचा भारत – अमेरिका संबंधावरही गंभीर परिणाम होईल, हे निश्चित. भारत – पाकिस्तानात यांच्यातील तापलेल्या वातावरणावर त्यांनी केलेल्या वक्तव्याविषयीही न बोललेलेच बरे. ‘या दोन देशांमध्ये हजार – पंधराशे वर्षांपासून संघर्ष सुरू आहे,’ असे म्हणणाऱ्या ट्रम्प यांनी याबाबतीत भारताच्या धोरणांना स्पष्ट पाठिंबा मात्र दिलेला नाही. ‘भारत माझा मित्र आहे आणि पाकिस्तानही मित्र आहे,’ अशा अर्थाचे वाक्य ते बोलले आहेत. ट्रम्प यांच्या बेभरवशीपणामुळे भारताला विचार करूनच आपली पावले टाकावी लागतील.

(संपर्कः dmulay58@gmail.com)



Source link

Global companies support IICT says Union Minister Ashwini Vaishnav zws 70

0
Global companies support IICT says Union Minister Ashwini Vaishnav zws 70



Global companies support IICT says Union Minister Ashwini Vaishnav zws 70 | आयआयसीटीला जागतिक कंपन्यांचे सहकार्य;केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांचे प्रतिपादन



Source link

रसिक स्पेशल: ‘सायबर युद्धा’चे नवे तंत्र, नवी रणभूमी!

0
रसिक स्पेशल:  ‘सायबर युद्धा’चे नवे तंत्र, नवी रणभूमी!




जगभरातील वाढतं संगणकीकरण, त्याला असलेली इंटरनेटची जोड अन् आता मिळालेली ‘एआय’ची साथ यामुळे सायबर युद्धांची व्याप्ती, गांभीर्य नि परिणाम हे सगळंच अधिकाधिक खोल होत चाललं आहे. त्यामुळे भविष्यातील युद्धं केवळ पारंपरिक पद्धतीनं न होता ती ‘सायबर युद्धा’च्या रुपात होतील, असं म्हटलं जातं. पहलगाममधल्या भयानक दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं नेमकं काय केलं पाहिजे, याविषयी होणाऱ्या चर्चेतील एक मुद्दा आहे ‘सायबर युद्धा’चा. दृश्य माध्यमांतील नेहमीच्या अतिरंजित आणि भावना भडकावण्याच्या हेतूनं केलेल्या विश्लेषणाला बाजूला ठेवलं, तरी खरोखरच सायबर युद्धाच्या माध्यमातून भारताला काय करणं शक्य आहे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याचवेळी, पाकिस्तानकडून सायबर युद्ध म्हणून नेमकं काय केलं जाऊ शकतं, याचाही अंदाज घेणं आवश्यक आहे. अलीकडच्या काळात ‘सायबर युद्ध’ हा शब्द वारंवार आपल्या कानांवर पडत असला, तरी त्याची नेमकी व्याप्ती किती असू शकते, याचा अंदाज येण्यासाठी आपण आत्तापर्यंत या बाबतीत विविध देशांनी काय केलं आहे, याचा धावता आढावा घेऊ. इराणवरचा ‘स्टक्सनेट हल्ला’ ‘सायबर युद्ध’ हा शब्द प्रथम सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचला, तो २०१० च्या दशकात. इराण अणुबॉम्ब बनवत असल्याचा अमेरिकेला दाट संशय होता. इराणनं मात्र आपण शांततामय कामांसाठी, म्हणजे अणुऊर्जानिर्मितीसाठी युरेनियमशी संबंधित काम करत असल्याचं सांगितलं होतं. इराणचा हा खोटारडेपणा असल्याचा अमेरिकेचा दावा होता. त्यानंतर इराणमधल्या या कामाशी संबंधित असलेल्या संगणक यंत्रणांमध्ये संथपणा आणि बिघाड घडवून आणण्यासाठी अमेरिका व इस्त्रायल यांनी ‘सायबर युद्ध’ घडवल्याचं प्रकरण खूप गाजलं. या संगणकीय हल्ल्यामुळे इराणला आपल्या अणू कार्यक्रमाशी संबंधित असलेलं युरेनियमचं शुद्धीकरण करण्यात अपयश आलं. हे प्रकरण ‘स्टक्सनेट हल्ला’ म्हणून ओळखलं जातं. यामुळेच इंटरनेटच्या माध्यमातून शत्रूशी थेट युद्धभूमीवर न लढताही त्याला जेरीला आणता येतं, हे प्रथमच सिद्ध झालं. रशियाने केली युक्रेनची बत्ती गुल या प्रकारे एका देशातून दुसऱ्या देशात थेट सायबर हल्ले करता येत असतील, तर यातून मोठे धोके निर्माण होऊ शकतात, ही जाणीव झालेली असतानाच त्याचा प्रत्यक्ष अनुभव २०१५-१६ च्या दरम्यान आला. रशियाने सायबर हल्ला करून युक्रेनमधल्या वीजपुरवठा यंत्रणा बंद पाडल्या. यामुळे लाखो युक्रेनी नागरिकांच्या घरांमध्ये अंधार झाला. अर्थात, रशियाने अधिकृतपणे या हल्ल्याची जबाबदारी घेतली नसली, तरी त्यामागे त्याच देशाचा हात असणार, याविषयी अभ्यासकांच्या मनात कुठलीच शंका नव्हती. ‘नॉटपेट्या’ने मागितली खंडणी संगणकांमध्ये घुसून त्यांना ठप्प करून टाकणारं ‘नॉटपेट्या’ नावाचं ‘मॅलवेअर’ २०१७ मध्ये पुन्हा एकदा युक्रेनमध्ये शिरलं. हेसुद्धा रशियाकडूनच आलं होतं, हे वेगळं सांगायला नको. संगणकांमधला सगळा मजकूर अगम्य भाषेत बदलून टाकणाऱ्या या घातक सॉफ्टवेअरनं लवकरच आपला मोर्चा इतर देशांकडेही वळवला. मूळ मजकूर हवा असेल, तर यासाठी बिटकॉइन या आभासी चलनाच्या रूपातली खंडणी हवी असल्याचं या सॉफ्टवेअरनं जाहीर केलं. मर्क, कॅडबरी, फेडेक्स अशा मोठमोठ्या कंपन्यांना याचा जोरदार फटका बसला. फेडेक्स ही जगभरातल्या सामानाची वाहतूक करणारी कंपनी असल्यामुळे हा एका नव्हे, तर अनेक देशांवरचा हल्ला ठरला.
या घटनेनंतर जगभरात खळबळ उडाली. बहुतांश देशांमध्ये वीजनिर्मिती आणि वितरण, पाणीपुरवठा आणि त्याचं शुद्धीकरणं, कचरा हाताळणं, वाहतूकव्यवस्था आणि तिचं नियंत्रण अशा जवळपास सगळ्याच सार्वजनिक सुविधांमध्ये संगणकीय यंत्रणांचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने असा एखादा हल्ला झाला तर काय हाहाकार होईल, या भीतीनं अनेकांचा थरकाप उडाला. उदाहरणार्थ, एखाद्या शहराच्या पाणीपुरवठा विभागानं पाण्याचं शुद्धीकरण करण्यासाठी त्यात ठरावीक प्रमाणात क्लोरिन मिसळण्यासाठीची यंत्रणा संगणकांद्वारे नियंत्रित केलेली असेल आणि यात सायबर हल्ला करून कुणी बिघाड घडवला तर? किंवा प्रचंड वर्दळीच्या रस्त्यांवरची वाहतूक नियंत्रित करत असलेल्या यंत्रणेमध्ये बदल केले तर? एकूण काय, तर जगभरातील वाढतं संगणकीकरण, त्याला असलेली इंटरनेटची जोड आणि आता मिळालेली ‘एआय’ची साथ या त्रिकुटामुळे सायबर युद्धांची व्याप्ती, त्यांचं गांभीर्य आणि त्यांचे परिणाम हे सगळंच अधिकाधिक खोल होत चाललं आहे. सॉफ्टवेअर तयार करणाऱ्या कंपन्यांकडून त्यामध्ये अनेकदा त्रुटी शिल्लक राहतात. या त्रुटींचा शोध घेऊन त्यांच्यावर हल्ले करण्यासाठी हल्लेखोर सतत टिपूनच बसलेले असतात. यातूनच हे हल्ले घडतात. आता तर स्वयंचलित गाड्या, इस्पितळांमधली रुग्णसेवा, यंत्रमानवाधारित श्रम अशा गोष्टी अधिकाधिक स्वरूपात दिसत असल्यामुळे या सायबर युद्धांची भीती आणखीनच वाढलेली आहे. त्यापुढे शत्रू देशातील यूट्यूब चॅनलवर बंदी घालणं, तिथली काही फेसबुक किंवा ट्विटर खाती बंद करणं या गोष्टी अगदी बाळबोध वाटाव्यात, अशी परिस्थिती आहे. म्हणूनच भविष्यातील युद्धं केवळ पारंपरिक पद्धतीनं न होता ती ‘सायबर युद्धा’च्या रुपात होतील, असं म्हटलं जातं. आणि हे भाकित फारसं चुकीचं नसल्याचं कदाचित येत्या काळात स्पष्टही होईल. सौदी तेल कंपन्यांना इराणने केले ‘टार्गेट’ ज्या इराणवर ‘सायबर युद्ध’ प्रकारचा पहिला जागतिक हल्ला झाला, त्याच इराणनं आपला दुसरा शत्रू सौदी अरेबियावर २०१२ आणि २०१६ मध्ये असाच हल्ला केला. सौदी अरेबियाचं सगळं अर्थकारण तेलावर चालत असल्यामुळे या तेलाच्या व्यवसायालाच काही काळ खिळखिळं करण्याचं धोरण इराणच्या मदतीनं हल्ले करत असलेल्या मंडळींनी अवलंबलं. यासाठी त्यांनी ‘अरामको’ आणि इतर बलाढ्य तेल कंपन्या वापरत असलेल्या संगणकीय यंत्रणांमध्ये बिघाड घडवून आणला. (संपर्कः akahate@gmail.com)



Source link

बुकमार्क: डॉ. अहंकारींनी घडवलेल्या आरोग्यक्रांतीचा दस्तावेज

0
बुकमार्क:  डॉ. अहंकारींनी घडवलेल्या आरोग्यक्रांतीचा दस्तावेज


स्वप्नील जोशी5 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

ज्यांना समाजभान राखता येतं, तीच मंडळी चळवळ निर्माण करू शकतात. ग्रामीण आरोग्याचा स्तर उंचावताना तेथील लोकांचे आर्थिक आणि सामाजिक उन्नयन व्हावे, यासाठी आयुष्यभर सक्रिय असणारे डॉ. शशिकांत अहंकारी यांच्या अद्वितीय कार्याचा परिचय करून देणाऱ्या ‘शशिकांत अहंकारी – दृष्टी आरोग्यक्रांतीची’ या पुस्तकाची ही गोष्ट. अतुल देऊळगावकर यांनी या पुस्तकाचे संपादन केले आहे. महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात जिथे डॉक्टरही पोहोचू शकत नाहीत, अशा ठिकाणी आपण काम करावं, असं डॉ. अहंकारींना का वाटलं असेल? वैद्यकीय शिक्षणादरम्यान प्रतिबंधात्मक आणि सामाजिक औषध हा विषय त्यांना का महत्त्वाचा वाटला असेल? याच काळात त्यांना शिक्षक म्हणून लाभलेल्या डॉ. साठे, डॉ. घारपुरे, डॉ. भागवत या प्राध्यापकांचा त्यांच्या मनावर कोणता परिणाम झाला? अशा अनेक प्रश्नांचा वेध घेत आपल्या वाचनाची सुरूवात होते.

तत्कालीन औरंगाबादच्या वैद्यकीय महाविद्यालयातील नोटिस बोर्डवर १९८० मध्ये लिहिलेल्या एका मजकुराने सर्व विद्यार्थ्यांचे लक्ष वेधून घेतले जाते.. मग त्यावरून उठलेला गदारोळ, पुढे शशिकांत यांनी केलेले भाषण आणि अंत:र्मुख झालेले श्रोते.. हा प्रसंग वाचताना, वैद्यकीय पेशा स्वीकारल्यावर त्याचे नेमके प्रयोजन काय असले पाहिजे? या कळीच्या मुद्द्यापाशी आपण येऊन थांबतो. डॉ. अहंकारी वयाच्या अठराव्या वर्षीच भोवतालच्या परिस्थितीकडे किती डोळसपणाने पाहत होते, हे आपल्याला जाणवते. मळलेल्या वाटेने पुढे जाणे त्यांना पसंत नव्हते. समवयस्क विद्यार्थ्यांसमोर त्यांनी केलेल्या भाषणाचा प्रभाव एवढा पडतो की, आपण शिक्षण घेत असताना समाजासाठी काहीतरी केले पाहिजे, हा विचार प्रत्येकाच्या मनात डोकावू लागतो.

ज्या काळात मराठवाड्यातील मुले घरातील आर्थिक परिस्थितीमुळे रोजगार हमी योजनेवर जात होती, अशा मोठ्या स्थित्यंतराच्या कालखंडात डॉ. अहंकारी यांनी वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले. आपला समाज आरोग्यसंपन्न झाला, तरच येथील लोक आर्थिक स्वावलंबी होतील, असा त्यांचा ठाम विश्वास होता. त्यासाठी शिक्षणही गरजेचे होते. अनेक रूढींचा पगडा, वैयक्तिक आरोग्याबाबत असलेले अज्ञान, गरिबी, स्थलांतर अशा कितीतरी समस्यांनी ग्रासलेले ग्रामजीवन त्यांनी जवळून अनुभवले. रुग्णालयात उपचारासाठी आलेली महिला असो वा दुष्काळात राबणारे कष्टकरी असोत, या सर्वांसाठी ‘आपण काहीतरी केलं पाहिजे,’ हाच एकमेव ध्यास ते बाळगून होते.

‘ज्वाला आणि फुले’ या बाबा आमटेंच्या काव्यसंग्रहातील कविता त्यांचासाठी प्रेरणा बनली होती. हैद्रराबाद मुक्तिसंग्रामातील अनेक नामवंत नेत्यांच्या सहवसात ते आले. मग विद्यार्थी आंदोलन असो वा अन्यायाविरुद्धची चळवळ असो; या सगळ्यांमध्ये ते अग्रणी राहिले.

वैद्यकीय शिक्षण १९७८ मध्ये पूर्ण झाल्यावर डॉ. बानू कोयाजी यांच्या प्रेरणेने पुण्याजवळील एका लहानशा खेड्यात डॉ. अहंकारी यांनी ‘जनस्वास्थरक्षक पथदर्श प्रकल्पा’मध्ये काम सुरू केले. गावातील मंडळींना प्रशिक्षित करून त्यांना मुख्य प्रवाहात आणणे, हे एक मोठे आव्हान होते. प्रबोधन शिबिर, तरुणांसाठी रोजगार मेळावा, मोफत आरोग्य तपासणी इत्यादी उपक्रमांतून त्यांनी अल्पावधीतच गावातील मंडळींचा विश्वास संपादन केला. दरम्यान ही आरोग्य मोहीम केवळ एका गावापुरती मर्यादित न ठेवता ती महाराष्ट्रात सर्वदूर पोहोचली पाहिजे, या उद्देशाने त्यांनी ‘हॅलो’ अर्थात ‘हेल्थ ॲन्ड ऑटो लर्निंग ऑर्गनायझेशन’ या संघटनेची स्थापना केली. गावपातळीवरील सर्व समस्यांबाबत कार्य करण्यासाठी या संस्थेला मूर्त प्राप्त झाले. रोगराई पसरू नये म्हणून प्रतिबंधक उपचार करणे, गावकऱ्यांशी विद्यार्थी आणि तरुण वर्गाला एकत्र करून संवाद साधणे, गाव दत्तक घेऊन गावकऱ्यांमध्ये जनजागृती निर्माण करणे आणि त्यांना आरोग्याच्या सर्व प्राथमिक सुविधा देणे अशा विविध पातळ्यांवर हे काम बहुआयामी होत गेले. हे काम बघून अनेक तरुण आणि नामांकित डॉक्टर संस्थेसोबत आले. आज ‘हॅलो’च्या मुशीतून बाहेर पडलेल्या चारशेच्या वर डॉक्टरांनी आपल्या स्वत:च्या परिसरात या कार्याचा ठसा उमटवला आहे.

एकूणच, डॉ. शशिकांत अहंकारी यांच्या पुढाकाराने महाराष्ट्रात उभी राहिलेली ही आरोग्य आणि ग्रामसुधार चळवळ समजून घ्यायची असेल, तर हे पुस्तक वाचायला हवे. प्रसिद्ध लेखक, विचारवंत अतुल देऊळगावकर यांनीही या कार्याचा योग्य सन्मान होईल, असे ओघवते लेखन केले आहे. डॉ. अहंकारींच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘भारतवैद्य’, ‘हॅलो मेडिकल फाउंडेशन’, ‘महिला बचत गट योजना’, ‘एकल महिलांचे सक्षमीकरण’ अशा कित्येक बहुउद्देशीय प्रकल्पांनी ग्रामीण आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रात सुधारणा घडवली. डॉ. अहंकारींचे आयुष्य समाजाला सावलीप्रमाणे लाभले, पण त्यांच्यासाठी हा प्रवास सोपा नव्हता. त्यांच्या ठायी कठोर निग्रह, निरलस सेवा आणि भूमीसारखी अपार सोशिक वृत्ती या गुणांचा संगम असल्याने एवढे मोठे कार्य उभे राहू शकले. देशपातळीवरही आरोग्य यंत्रणा सक्षम करुन समाजाला निरामय स्वास्थ्याचा लाभ द्यायचा असेल, तर डॉ. अहंकारी यांच्याप्रमाणेच समर्पित सेवाभावाने कार्य करणाऱ्यांची गरज आहे, याची जाणीव हे पुस्तक करुन देते.

पुस्तकाचे नाव : शशिकांत अहंकारी – दृष्टी आरोग्यक्रांतीची संपादक : अतुल देऊळगावकर प्रकाशक : साधना प्रकाशन पाने : २१४, किंमत : रू. ३००

(संपर्कः swapnilkashi566@gmail.com)



Source link

‘एआय’च्या विश्वात…: ‘एआय’च्या साथीने बेटिंग ॲप्सचा ‘खेळ’

0
‘एआय’च्या विश्वात…:  ‘एआय’च्या साथीने बेटिंग ॲप्सचा ‘खेळ’


डॉ. अमेय पांगारकर7 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

सध्या ‘आयपीएल’चा हंगाम सुरू आहे. त्याबरोबरच बेटिंग अॅप्सनाही सुगीचे दिवस आले आहेत. ऑनलाइन गेमिंग – बेटिंगमधून, मग अगदी रमीसारख्या पत्त्याच्या खेळापासून ते अगदी सामन्याआधी आपापली टीम बनवून वरकमाई करु पाहणारे, आपले नशीब आजमावणारे अनेक खेळाडू उदयास येतात. या इंटरनेटवरच्या आभासी विश्वातील जुगारात आता जवळपास १५ कोटींहून अधिक भारतीय सक्रिय आहेत. जगातील सर्वाधिक बेटिंग अॅप्सवरील खेळाडूंच्या संख्येद्वारे पहिल्या पाच देशांत भारताची गणती होऊ लागली आहे. या क्षेत्राने नुकतीच भारतात ५७ दशलक्ष डॉलरची उलाढाल पार केली.

वापरकर्त्यांच्या वाढत्या संख्येमुळे या क्षेत्रात गेल्या काही काळापासून ‘एआय’ अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेने शिरकाव केला आहे. कोट्यवधी वापरकर्त्यांचा डेटा वापरून, अगणित पद्धतींनी त्याचे पृथ:करण करून त्यातून अपेक्षित असा अंदाज वर्तवून या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर काही गोष्टी आता सर्रास घडताना दिसत आहेत. वापरकर्त्यांना जाणूनबुजून ‘गाजर’ दाखवून या अॅप्सच्या आहारी पाडले जात आहे. अशा वापरकर्त्यांची Customer Lifetime Value (सीएलव्ही) अर्थात ग्राहकाकडून किती काळात किती पैसे काढता येतील, याचा अंदाज त्याच्या पहिल्या काही दिवसांतील हालचालींचा वेध घेत ‘एआय’मार्फत वर्तवला जातो. त्यानंतर असे पैसे उकळण्याच्या उद्देशाने ‘एआय’प्रेरित अनेक डीप लर्निंग अल्गोरिदम्सचा वापर करून ही ‘सीएलव्ही’ वाढवण्यासाठी डाव आखले जातात. त्या सगळ्यामध्ये जास्त गंडले जाणारे लोक म्हणजे १८ ते ३५ या वयोगटातील तरुण – तरुणी, गृहिणी, नोकरदार तसेच सेवानिवृत्त मंडळी. तसे पाहिले तर कमी वेळेत जास्त पैसे कमवण्याची लालसा बाळगणारे सर्वच! यात मध्यमवर्गीय अन् ग्रामीण भागातील मंडळींची संख्या अधिक आहे.

पैसे कमावण्याचा सोपा मार्ग.. घरबसल्या तुमचा आवडता खेळ खेळा आणि टीम बनवून जिंका.. अशी आमिषे दाखवली जातात. मग कोणी यातून जिंकून बुलेट घेतली, तर कोणी घर बांधले अशा भुलवणाऱ्या, खऱ्या वाटणाऱ्या जाहिरातींचा मारा सुरू होतो. काही ठिकाणी तुम्ही खेळायला सुरू करणार म्हणून काही गोष्टी मोफत दिल्या जातात. त्या पैशांमधून तुम्ही काही डाव खेळता. आता ‘एआय’ची गंमत बघा.. सर्रास असे दिसून येते की, या अशा सुरूवातीच्या डावात तुम्ही हमखास काही ना काही जिंकता. ही असते एका प्रोग्रामद्वारे तुम्हाला व्यसनाधीन करण्याची पहिली पायरी, जी अर्थातच आपल्या लक्षात येत नाही. मग जसजसे आपण जास्त पैसे लावत जातो, तसतसे काठिन्य पातळी असो किंवा डावतले पत्ते असोत; ते अवघड येत जातात आणि आपण हरू लागतो. पुन्हा ‘एआय’च्या मदतीने तुमच्या मनाचा अंदाज घेतला जातो. सलग पैसे हरू लागल्यावर भानावर येऊन तुम्ही हा जुगार खेळणं थांबवाल, असा अंदाज आला की मध्येच तुम्ही एखाद्या वेळेस जिंकता अन् परत खेळत राहता.

अर्थात, तुमच्या लक्षात राहावे म्हणून रंगसंगती, अॅनिमेशन, संगीत अशा गोष्टींचा वापर केला जातो पैशांचा पाऊस, नाण्यांचा आवाज, सोनेरी मुकुट इ. गोष्टी दाखवून हे जिंकण ‘साजरं’ केलं जातं. म्हणून ते लक्षात राहते. पण, एक हजार रुपये लावल्यावर सहाशे परत आले तरी चारशे रुपयांचे नुकसान झाले, हे कोणाच्या लक्षातही येत नाही. या प्रकाराला “Loss Disguised as Win” म्हणजे जिंकल्याच्या आभासाखाली नुकसानही लपवण्याचा प्रयत्न असे म्हटले जाते.

काही बेंटिग अॅपवर ‘एआय’चा सदुपयोग झालेलाही बघायला मिळतो. अर्थातच अशी उदाहरणे विरळाच! अशा अपवादांमध्ये बॉट्स नव्हे, तर खरी माणसेच खेळत आहेत, हे तपासण्यासाठी KYC Documents किंवा Face Recognition वापरले जाते. या अशा बाबींवर कायद्याच्या स्वरुपात भारत सरकारने काही प्रमाणात पावले उचलली आहेत. गेल्या वर्षी जवळपास शंभरहून अधिक अॅपवर घातलेली बंदी असो किंवा डीप फेक व्हिडिओवर वाॅटरमार्क टाकणे असो; अशा अॅप्सना मुख्य तक्रार निवारण अधिकाऱ्याची नेमणूक करणे अनिवार्य केले आहे.

मित्रांनो, शेवटी पैसा तुमचा आहे. तो कुठे आणि कसा खर्च करायचा, हे तुमच्या हातात आहे. पण, या अशा अॅप्सवर ‘फेअर प्ले’ म्हणजेच सचोटीचा खेळ होत नाही, हे लक्षात ठेऊन तुम्ही खेळत असाल, तर हरकत नाही. आखिर समझदार को इशारा काफी होता है!

(संपर्कः ameyp7@gmail.com)



Source link

डायरीची पाने: माडीतलं वाचन

0
डायरीची पाने:  माडीतलं वाचन


इंद्रजित भालेराव9 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

ती माडी, तिथल्या देवळीतली त्याची पुस्तकं, तिथं ठेवलेली शेतीची अवजारं अन् बाजेवर वाचत पडलेला तो.. हाच त्याच्यासाठी सगळ्यात मोठा आनंदाचा ठेवा!

पन्नास वर्षांपूर्वीची गोष्ट.. एक गाव असतं. त्या गावात एक माडी असते. तिची उंची तशी थोडी असते. वर हात केला की जोडणीला लागतो. तिथं पंखा वगैरे काही नसतं. अजून गावात लाइटच आलेली नसते. उघड्या दारातून अन् खिडकीतून भरपूर हवा नि प्रकाश येत असतो. माडी हौसेनं बांधलेली असते, पण तिच्यात कोणी राहत नाही. अडगळीच्या खोलीसारखं शेतात कधीमधी लागणारं आणि एरवी पडूनच राहणारं सगळं सामान त्या माडीत ठेवलेलं असतं. हे सामान म्हणजे या माडीचंच भाग्य असतं किंवा त्या सामानाचंच भाग्य असतं की, त्याला माडीत राहायला मिळतं.

घरात एक मुलगा असतो. तो शिकत असतो, वाचत असतो. वाचतो म्हणजे अभ्यासाची पुस्तकं नव्हे, तर ती सोडून इतर काहीबाही वाचत असतो. कथा, कविता, कादंबऱ्या, चरित्रं.. त्यात प्रामुख्यानं शेतीमातीच्या पुस्तकांचा भरणा जास्त. कारण त्याचं अनुभवविश्व शेतीमातीशी जोडलेलं.. मग तो व्यंकटेश माडगूळकर, आनंद यादव, बहिणाबाई चौधरी, रा. रं. बोराडे, ना. धों. महानोर, भास्कर चंदनशिव अशा कितीतरी साहित्यिकांची पुस्तकं वाचतो. विकत घेऊन त्यांचा संग्रह करत असतो. माडीत एक बाज रिकामीच पडलेली असते. ती त्याच्या मालकीची होऊन जाते. त्या बाजेवर अंथरूण आणि उशी नसली तरी चालतं. बाजेच्या सुंभाचे वण त्याच्या पाठीला, दंडाला, पोटऱ्यांना पडतात, पण त्याच्या ते लक्षातही येत नाही. तो वाचण्यात इतका रंगून गेलेला असतो की, आडांग बदलायचंही भान त्याला राहत नाही. तहानभूक विसरून तो वाचत असतो. आई खालून जेवणासाठी हाका मारत असते. त्याही त्याला ऐकू येत नाहीत. तो हातातलं वाचन संपल्याशिवाय थांबत नाही. पुस्तक वाचून झाल्यावर मगच तो जेवायला जातो.

घरातली सगळी माणसं रानामाळात कामाला गेलेली असतात. भाऊ – भावजया रानावनात पांगलेले असतात. बाप तालुक्याच्या गावी काहीतरी काम काढून निघून गेलेला असतो. आई एकटीच घरी असते. तिला आपल्या या पोराची काळजी वाटत असते. शाळेची पुस्तकं सोडून हा हे काय वाचत बसलाय? अशी तिला चिंता. घरातली आणि गावातली इतर मुलं परीक्षा संपली की, पुन्हा शाळा सुरू होईपर्यंत पुस्तकांकडं ढुंकून बघत नाहीत. शाळा सुरू झाली की सांदीकुंदीत हरवलेली पुस्तकं शोधत बसतात. पण, याचं परीक्षा संपल्यावर वाचन सुरू होतं. काय वाचतो? कशासाठी वाचतो? याचा फायदा काय? माहीत नाही, पण वाचत राहतो.

अशा वाचनामुळं डोकं सरकलेल्या गावातल्या अन् तिच्या माहेरच्या एक-दोन मुलांची उदाहरणं आईला माहीत असतात. त्यामुळं तिला आपल्या मुलाची चिंता वाटत असते. गावातल्या मुलांना वेगवेगळी व्यसनं लागलेली तिनं पाहिलेली असतात. पण, हे असं मुलखावेगळं वाचनाचं व्यसन तिनं कधी पाहिलेलं नसतं. हा पुस्तकापायी वेडा होतो, हे व्यसनच की! याला पुस्तकाशिवाय दुसरं काही सुधरंत नाही, हा पुस्तकाच्या बाहेर डोकं काढत नाही, नुसतं वाचत असतो.. याचं कसं होईल? याला कोण बायको देईल? याचा संसार कसा काठाला लागंल? याची तिला चिंता वाटते. गावजेवणाच्या सार्वजनिक पंक्तीला जा म्हटलं, तर हा जात नाही, लाज वाटते म्हणतो.

आता लोकांमध्ये मिसळायचं, त्यांच्यासोबत जेवायचं यात कसली आली लाज? पण, हा मुलगा वेगळाच. कशाचाच हट्ट धरत नाही, काहीच मागत नाही. फक्त अधूनमधून पुस्तकांसाठी पैसे मागतो. नाही दिले तरी आग्रह करत नाही. मास्तरांकडून, वाचनालयातून पुस्तकं आणून वाचत राहतो. त्याच्यासारखं वाचन करणारा त्याला कुणी भेटत नाही आणि इतरांसारखं इतर गोष्टीत रमणं त्याला जमत नाही. त्यामुळं हा एकलकोंडा झाला आहे. तो आणि पुस्तक, एवढंच त्याचं जग आहे. या पुस्तकातून त्याला कुठला आनंद मिळतो, हे आईच्या समजण्याच्या बाहेरचं असतं. त्यामुळं तिला तो आनंदी आहे, हेही कळत नाही. तिला फक्त हा सगळ्यांसारखा नाही, म्हणून याचं कसं होईल, हीच चिंता सतावत असते.

गावातला पीठ मागायला येणारा गोसावी, आठवड्याला एकदा येणारा पोस्टमन आणि घरात अधूनमधून येणारे साधुसंत हेच याचे सगेसोयरे. त्यांना मात्र हा भरभरून बोलत असतो. काहीबाही सांगत असतो. तेही त्याचं ऐकत असतात. त्याला काही सांगत असतात. त्याच्या वाचनवेडाचं या लोकांना कौतुक, त्यामुळं तो त्यांच्यात रमतो. वाचलेल्या पुस्तकातलं काहीतरी त्यांना सांगतो. तेच त्याला सखेसहोदर वाटतात. उलट घरात येणारे पाहुणेरावळे, सख्खं गणगोत मात्र त्याला नकोसं वाटतं. कारण त्या सगळ्यांना याचं हे असं वागणं विक्षिप्त वाटतं. त्याच्या वाचनात कुणालाही रस नसतो. त्यामुळं त्यालाही त्या कुणामध्ये रस नसतो. कारण, या लोकांशी काय बोलावं, हे त्याला कळत नाही. तो सहज काही बोलायला गेला, तर त्याला सगळे वेड्यात काढतात. याला व्यवहारातलं काही कळत नाही, म्हणून नेहमीच हिणवतात. त्यामुळं तो त्यांच्यापासून आणखीनच दूर आणि पुस्तकांच्या जवळ जात राहतो.

त्याची ती माडी, तिथल्या देवळीतली त्याची पुस्तकं, तिथं ठेवलेल्या शेतीच्या अवजारांचं ते सगळं प्रदर्शन, त्या बाजेवर वाचत पडलेला तो.. हाच त्याच्यासाठी सगळ्यात मोठा आनंदाचा ठेवा! हा आनंद तो मनसोक्त उपभोगत असतो. त्यातूनच त्याला त्याच्या आयुष्याचा मार्ग आखायचा असतो. त्याला मराठीचा प्राध्यापक व्हायचं असतं. त्यासाठी खूप वाचन सुरू असतं. त्याचे शिक्षक – प्राध्यापक त्याच्यावर खुश असतात. त्याला हवी ती पुस्तकं देतात, मार्गदर्शन करतात. शिदोरी बांधून आणावी तशा पुस्तकाच्या पिशव्या त्यांच्याकडून भरून आणत असतो. ही शिदोरी संपली की, तो पुन्हा त्यांच्याकडं, तर कधी कॉलेजच्या किंवा तालुक्याच्या ग्रंथालयात जातो. आपल्याला काय काय हवं, ते तिथून आणत असतो.

…आणि एक दिवस तो प्राध्यापक होतो. चांगल्या पगाराची नोकरी मिळते. तो काळ असा असतो की, नोकरीसाठी पैसे लागत नसत. पगारही चांगले वाढलेले असतात. हे सगळं समजल्यावर त्याच्याशी सगळ्यांचंच वागणं बदलतं. त्याच्यासाठी सोयरिकी येतात. आधी ढुंकूनही न पाहणारे लोक त्याच्याभोवती गोळा होतात. पण, त्याला त्यांच्याविषयी काहीही वाटत नाही. आपण एका वेडात वावरत होतो, ते वेड समजून घेणारे गावातले पीठ मागणारे गोसावी, आठवड्यात एकदा घरी येणारा पोस्टमन आणि अधूनमधून घरात येणारे साधुसंत हेच त्याला आपले आत्मीय सोयरे वाटत असतात. आतून काळजी करणारी आई तर खूप आत, अगदी काळजात ठाण मांडून बसलेली असते. बाकीचे सगळे संधिसाधू…

(संपर्कः inbhalerao@gmail.com)



Source link

ai makes possible to create movie scenes without actors says Aamir Khan at waves summit 2025 zws 70

0
ai makes possible to create movie scenes without actors says Aamir Khan at waves summit 2025 zws 70



ai makes possible to create movie scenes without actors says Aamir Khan at waves summit 2025 zws 70 | कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे कलाकाराविना दृश्य चित्रित करणे शक्य ; आमिर खान याचे मत



Source link

माझ्या हिश्श्याचे किस्से: संजय दत्तचा पहिला सिनेमा ‘रॉकी’ रिलीज होण्याच्या 3 दिवस आधी झाले नर्गिस यांचे निधन; प्रीमियरवेळी रिक्त ठेवली सीट

0
माझ्या हिश्श्याचे किस्से:  संजय दत्तचा पहिला सिनेमा ‘रॉकी’ रिलीज होण्याच्या 3 दिवस आधी झाले नर्गिस यांचे निधन; प्रीमियरवेळी रिक्त ठेवली सीट


  • Marathi News
  • Opinion
  • Nargis Passed Away 3 Days Before The Release Of Sanjay Dutt’s First Film ‘Rocky’; Seat Kept Vacant At The Premiere

रूमी जाफरी, लेखक-दिग्दर्शक12 तासांपूर्वी

  • कॉपी लिंक

माझी आणि संजय दत्तची ३५ वर्षांची दोस्ती आहे. या काळात त्याने अनेक गोष्टी मला सांगितल्या, बऱ्याच गोष्टींचा मी स्वत: साक्षीदार आहे. त्यामुळे अधूनमधून संजय दत्तच्या आयुष्यातील काही क्षण तुम्हाला सांगावेत, असे मला वाटले. त्यापैकीच एक – दोन किस्से आज मी सांगणार आहे.

खरे तर संजय दत्तशी संबंधित अनेक गोष्टी त्याच्या आयुष्यावर आधारित ‘संजू’ सिनेमात आपण पाहिल्याच आहेत. पण, आज मी तुम्हाला काही नव्या गोष्टी सांगणार आहे. काल, ३ मे रोजी संजय दत्तच्या आई नर्गिसजींचा स्मृतिदिन होता आणि ६ मे या दिवशी संजय दत्तचा पहिला सिनेमा ‘रॉकी’ प्रदर्शित झाला होता. तसे पाहता प्रत्येक आई आपल्या मुलांवर आणि मुले आपल्या आईवर खूप प्रेम करत असतात. पण, नर्गिसजींचे प्रेम अनोखे होते, अद्वितीय होते. त्या संजूला प्रेमाने ‘बाबा’ म्हणायच्या.

संजूने मला सांगितले होते की, रात्रीच्या वेळी दत्तसाहेब बंगल्याच्या लॉनवर बसून गप्पा मारत सिगारेट ओढायचे. पण, सिगारेट विझवत नव्हते. हातात उरलेली सिगारेट पाठीमागे फेकून द्यायचे. ती गवतात, रोपांमध्ये, टेबल-खुर्चीच्या खाली जावून पडायची. संजूबाबा लहानपणापासून खोडकर आहे, हे सगळ्यांना माहीत आहेच. कधी कधी तो तिथे पडलेली सिगारेट गुपचूप उचलून एक-दोन झुरके मारायचा. मुले आपल्या वडिलांचे अनुकरण करतात, असे म्हणतात. संजूबाबा वडिलांचे अनुकरण करण्याच्या नादात दत्त साहेबांनी फेकलेली सिगारेट ओढायचा.

एकेदिवशी दत्तसाहेब यश जोहरजींशी बोलत बसले होते. बोलता बोलता त्यांनी सिगारेट फेकली. इतक्यात संजू तिथे आला आणि लपून ती सिगारेट ओढू लागला. यश जोहरजींनी ते पाहिले आणि दत्त साहेबांना सांगितले. दत्त साहेबांनी संजूबाबाला सिगारेटसह पकडले आणि त्यानंतर त्याला बोर्डिंगमध्ये पाठवले.

संजूबाबाने त्याविषयी पुढे सांगितले… बोर्डिंगमध्ये नेल्यावर मला वाटले की, हे हिल स्टेशन आहे आणि तिथे मी फिरायला आलोय. माझ्यासोबत काय घडतेय, याची त्यावेळी मला कल्पना नव्हती. मला तिथे सोडून आई निघून गेली आणि दरवाजा बंद झाला. रात्र झाल्यावर मला घराची, आईची आठवण येऊ लागली. ‘मला आईकडे जायचंय..’ म्हणून रडायला लागलो. मी धावत त्या दरवाजाजवळ गेलो आणि आपल्या छोट्या हातांनी त्यावर थपडा मारु लागलो. त्या दरवाजातून जाताना मी आईला शेवटचे पाहिले होते, त्यामुळे त्या पलीकडे ती उभी असेल, दरवाजा उघडेल आणि ती समोर उभी असलेली दिसेल, असे मला वाटले. हा प्रकार खूप दिवस सुरू होता. मी रात्री उठून धावत दरवाजाजवळ जायचो आणि माँ.. माँ.. असे ओरडायचो. आई त्या दरवाजाच्या पलीकडे नाही, हे मला समजायला खूप दिवस लागले. या गोष्टीवरुन मला मुनव्वर राणा यांचा एक शेर आठवतोय…

चलती फिरती हुई

आँखों से अज़ाँ देखी है

मैंने जन्नत तो नहीं देखी है

माँ देखी है।

असो. संजू मोठा झाला तेव्हा नर्गिसजींना कॅन्सर झालेला होता. त्यांना उपचारासाठी अमेरिकेला नेण्यात आले आणि इकडे दत्तसाहेबांनी संजूला हीरो म्हणून लाँच केले. सिनेमा पूर्ण झाला आणि नर्गिसजींना भारतात परत आणून ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. आपला मुलगा आपल्या डोळ्यादेखत स्थिरस्थावर व्हावा, यशस्वी व्हावा, असे प्रत्येक आईला वाटत असते. संजूचा पहिला सिनेमा तयार झाला होता. तो आपण पाहावा, संजूला स्टार झालेला बघावा, अशी नर्गिसजींची खूप इच्छा होती. सिनेमाच्या प्रीमियरला येऊन मला तो पाहायचाय, असा हट्टच त्यांनी धरला. दत्त साहेबांनी तशी सगळी व्यवस्था केली. सर्वात पुढची सीट त्यांच्यासाठी राखून ठेवण्यात आली.

नर्गिसजींना हॉस्पिटलमधून थिएटरमध्ये घेऊन जाण्यासाठी आणि दत्त साहेबांसोबत पहिल्या सीटवर बसवण्यासाठी अँम्ब्युलन्स, व्हीलचेअरसह सर्व तयारी करण्यात आली. पण, ईश्वराने एका आईवर आणि एका मुलावरही अन्याय केला. ३ मे रोजी नर्गिसजींचे निधन झाले. त्यांना ना संजूबाबाचा पहिला सिनेमा- ‘रॉकी’ बघता आला, ना त्याला स्टार होताना पाहता आले. पण, नर्गिसजींसाठी राखून ठेवलेली ती सीट रिकामी ठेऊनच दत्त साहेबांनी या सिनेमाच्या प्रीमियरला हजेरी लावली. नंतर त्यांनी सांगितले, मला अशी जाणीव होत होती की ही सीट रिकामी नाहीय. त्यावर संजूची आई बसलीय, ती सिनेमा बघतेय आणि त्याला आशीर्वाद देतेय…आज संजय दत्तसाठी ‘रॉकी’ सिनेमातील हे गाणे ऐका…

दोस्तों को सलाम,

दुश्मनों को सलाम,

रॉकी मेरा नाम…

स्वत:ची काळजी घ्या, आनंदी राहा.



Source link