Thursday, July 16, 2026
Home Blog Page 313

Marathi drama review Filter Coffee written and directed by Mahesh Manjrekar

0
Marathi drama review Filter Coffee written and directed by Mahesh Manjrekar


विशुद्ध कला आणि पैसाप्रसिद्धी आणि महत्त्वाकांक्षा यांचं नातं सहसा परस्परविरोधीच राहिलेलं आहे. फारच क्वचित ते समांतर पातळीवर असलेलं दिसतं. त्यातही कला आणि जगण्यातील नैतिकता यांचाही खरं तर जवळचा संबंध असायला हवा. पण तोही बऱ्याचदा तसा असतोच असं नाही. अशात महत्त्वाकांक्षेने कलाव्यवहारात प्रवेश केला की कलेचा ऱ्हास व्हायला वेळ लागत नाही. याच मुद्द्यावरचं ‘फिल्टर कॉफी’ हे महेश मांजरेकर लिखित- दिग्दर्शित नाटक अलीकडेच रंगभूमीवर आलेलं आहे.

अनिता ही एक उत्तम चित्रकार. तिचा नवरा सतीश हाही याच प्रांतातला. जास्तच कलावादी. जीवनातील सगळ्या चांगल्या गोष्टींचा भरभरून आस्वाद घेणारा. मस्त कलंदर. पण दीड वर्षांपूर्वी त्याचं अचानक अपघाती निधन झालं आणि अनिताचं आयुष्यातील स्वारस्यच संपलं. आता आला दिवस ढकलायचा एवढंच ती करत असते. तिचा आणि सतीशचा चित्रकार मित्र संदीप याचाच काय तो आता तिला आधार असतो. (संदीपही खरं तर तिच्या प्रेमात असतो. पण ते व्यक्त करायचं त्याच्याकडून राहून गेलेलं असतं.) आणि तिच्याकडे पेइंग गेस्ट म्हणून राहणारी मानसी ही तिची जीवश्च मैत्रीण. विष्णू हा घरातील हरकाम्या नोकर तिची प्रत्येक आज्ञा शिरसावंद्या मानत असतो.

अशात एके दिवशी विक्रम नावाचा मानसीचा आतेभाऊ त्या घरात आगंतुक म्हणून येतो आणि तो आपल्या बेदरकार हुशारीनं अनिताच्या घरासकट तिचा सर्वस्वी ताबाच घेतो. तो हरहुन्नरी, अफाट कष्टाळू, बेफिकीर आणि बिनधास्त असतो. आपल्याला जे मिळवायचंय ते येनकेनप्रकारेण मिळवल्याशिवाय राहायचं नाही, ही त्याची उपजत वृत्ती! साहजिकच तो अनिताच्या स्टुडिओचा ताबा घेतो. तिची चित्रं वाजवीपेक्षा जास्त दामात विकण्याची चलाखी दाखवतो. त्यामुळे अचानक अनिताच्या हाती प्रचंड पैसा येतो.

हेही वाचा

चित्रांचे क्लाएंट्स, डीलर, कलासंग्रहालयांचे चालक अशा सगळ्यांना विक्रमने खिशात घातलेलं असतं. त्याच्या या झंझावाती झपाट्याने अनिता अक्षरश: भिरभिरते. तिला हा वेग सहन होत नाही. पण तरीही ती विक्रमच्या या बहकाव्यात वाहवत जाते. संदीपला विक्रमची ही अकल्पित घोडदौड संशयास्पद वाटते. तो तसं अनिताला बोलूनही दाखवतो. पण अनिता ते फारसं मनावर घेत नाही. विक्रमने तिला आयुष्यात परत रस घ्यायला भाग पाडलेलं असतं. तिचं अवघं व्यक्तिमत्त्वच त्याने जणू ताब्यात घेतलेलं असतं.

खरं तर विक्रम मानसीचा आतेभाऊ वगैरे काही नसतो, तर तो तिचा प्रियकर असतो. पण ही गोष्ट ते दोघं अनितापासून लपवून ठेवतात.

बंगरूळूच्या एका कलाप्रदर्शनाच्या वेळी विक्रम अनिताला आपण तिच्या प्रेमात पडल्याची गोष्ट उघड करतो आणि ती हादरते. ती अजूनही सतीशच्या आकंठ प्रेमात असते आणि विक्रमकडे ‘त्या’ दृष्टीनं तिने कधी बघितलेलंही नसतं. पण त्यानं हे सगळं हुशारीनं जमवून आणलंय हे तिच्या त्याच क्षणी लक्षात येतं आणि ती त्याला ताडकन् तोडून बंगरूळूहून मुंबईला परतते. मानसी आपल्या वडलांच्या आजारपणामुळे बडोद्याला गेलेली असते. तिलाही ती बोलवून घेते.

हेही वाचा

झाला प्रकार ती तिला सांगते, तेव्हा विक्रमने तिलाही फसवल्याचं तिच्या लक्षात येतं. विक्रम मुंबईला येताच त्याला कोरा चेक देऊन आपल्यापासून दूर जाण्यास ती त्याला फर्मावते. मानसीचीही त्याने तिच्यासारखीच घोर फसवणूक केलेली असल्याने त्याबद्दलही ती त्याला चिडून जाब विचारते. तेव्हा निर्लज्जपणे तो तिला मानसीबद्दलची आपली ‘व्यावहारिक’ भूमिका व तिच्याशी असलेलं आपलं नातं स्पष्ट करतो आणि त्याबद्दल खोटी दिलगिरीही व्यक्त करतो. या सगळ्यामुळे एव्हाना तो अनिताच्या मनातून पार उतरलेला असतो. पण झाल्या प्रकाराबद्दल त्याला ना कसला खेद आहे, ना खंत हे जेव्हा तिच्या लक्षात येतं तेव्हा ती त्याला आपल्या परीनं धडा शिकवायचं ठरवते…

लेखक-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी एक वेगळा विषय या नाटकात हाताळला आहे. अनेकींना आपल्या जाळ्यात ओढून फसवणारा तरुण तर यात आहेच, पण कला, कलेप्रतीची निष्ठा, बांधीलकी, कला आणि जगण्यातील नैतिकता हेही मुद्दे यानिमित्ताने ऐरणीवर येतात, हे विशेष. पहिल्या अंकात नाटक कुठं चाललंय हे बराच काळ लक्षात येत नाही, कारण प्रस्तावनेतच ते रेंगाळतं. पण हळूहळू ते पकड घेत जातं. विक्रमची चाल लक्षात आल्यावर ज्या संयमिततेनं अनिता त्याला हाताळते तिथे नाटक वेगळं वळण घेतं.

विक्रमसारखा कुटील, निब्बर, महत्त्वाकांक्षी तरुण कुठल्या टोकाला जाऊ शकतो याचा प्रत्ययही यथावकाश येतो. म्हटलं तर फसवणुकीचाच विषय या नाटकाच्या केंद्रस्थानी आहे. पण त्याला कलेचं अस्तर मिळाल्यानं तो थोडा वेगळा ठरतो. लेखक म्हणून महेश मांजरेकर यांनी ठोस पात्रं रेखाटली आहेत. दिग्दर्शक म्हणून त्यांचे व्यवहारही कौशल्याने हाताळले आहेत. यातली सगळीच पात्रं हाडामांसाची वाटतात. विशेषत: विष्णू हे पात्र लव्हेबल झालं आहे. पात्रांचे परस्परसंबंध नीट गुंफले गेले आहेत.

फक्त एक गोष्ट खटकते : एवढ्या स्मार्ट, हरहुन्नरी, डोकेबाज विक्रमला साधी नोकरी मुंबईत मिळू नये? मानसीची नेमकी पार्श्वभूमी न कळल्याने तिचं अनिताच्या घरातलं स्थान न समजणारं. तसंच तिची आणि विक्रमची भेट कुठं आणि कशी झाली हेही गुलदस्त्यात राहिल्याने त्यांचीही इतकी घसट कशी, हाही प्रश्न अनुत्तरितच राहतो. अनिताची फिल्टर कॉफीही नको इतक्या वेळा नाटकात डोकावते.

संदेश बेंद्रे यांनी एलिट क्लासमधील अनिताचं आलिशान घर तपशिलांत उभं केलं आहे. हितेेश मोडक यांचं संगीत नाटकातले मूड्स उजळवणारं. लक्ष्मण गोल्लार यांची वेशभूषाही पात्रांची व्यक्तित्वं खुलवणारी. शीतल तळपदे यांनी प्रकाशयोजनेद्वारे नाट्यपूर्ण क्षण अधोरेखित केले आहेत. उल्लेश खंदारे यांनी रंगभूषेतून पात्रांना बाह्य व्यक्तिमत्त्व प्रदान केलं आहे. सगळ्याच कलाकारांनी मनापासून कामं केली आहेत.

महत्त्वाकांक्षी, डोकेबाज, स्ट्रीटस्मार्ट विक्रमच्या भूमिकेत विराजस कुलकर्णी फिट्ट बसले आहेत. त्यांचा वावर, वागणं-बोलणं, या हातावरची थुंकी झटक्यात त्या हातावर घेणं यांतून त्यांनी विक्रमची गगनाला गवसणी घालण्याची आकांक्षा आणि त्यासाठी वाट्टेल ते करायची तयारी दाखवून दिली आहे. त्यांची थंड माथ्यानं सगळ्या गोष्टी करण्याची वृत्ती विक्रमचं टोकाला जाणं जायज ठरवते. नवऱ्या पश्चात एकाकी झालेली, जीवनातला रस हरवून बसलेली अनिता आणि नंतर विक्रमच्या बहकाव्यात येऊन तिचं वाहवत जाणं, आणि एका क्षणी आपल्यातील कलावंताची तिला झालेली जाणीव उर्मिला कानेटकर यांनी उत्कटपणे दर्शवली आहे. त्यांचं वागणं, वावरणं सहज आहे.

संदीपच्या भूमिकेतील विक्रम गायकवाड संयमिततेनं आपलं व्यक्तिमत्त्व आकारतात. त्यांचं ‘लो प्रोफाइल’ असणं संदीपच्या भूमिकेला खरेपण देतं. अंकिता लांडे या मानसीचा उद्रेक आणि तिची घालमेल नेमकेपणाने व्यक्त करतात. त्यांना उचित पार्श्वभूमी मिळती तर बरं झालं असतं. कुणाल मेश्राम यांनी अनिताचा हरकाम्या नोकर विष्णू लोभसपणे साकारला आहे. त्यांचं वैदर्भीय बोली आणि अधूनमधून तोडक्यामोडक्या इंग्लिश भाषेतलं बोलणं प्रेक्षकांना छानपैकी रिझवतं.



Source link

चांदनी चौकातून : राहुल आणि रेवंत…

0
चांदनी चौकातून : राहुल आणि रेवंत…



दिल्लीवाला

तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना काँग्रेसमध्ये अचानक महत्त्व आलेलं आहे. पक्षाच्या कार्यकारी समितीच्या बैठकीसाठी रेड्डी यांना विशेष बोलावण्यात आलेलं होतं. या समितीमध्ये मुख्यमंत्री सदस्य असताच असं नव्हे. त्यामुळं समितीच्या बैठकांना ते उपस्थित राहात नाहीत. यावेळी कार्यकारी समितीच्या बैठकीचा विषय जातगणना असल्यामुळं रेवंत हैदराबादहून तातडीने रवाना झाले. काँग्रेसच्या या बैठकीमध्ये पहलगामचा विषयही चर्चिला गेला असला तरी, प्रमुख मुद्दा जातगणनाच होता. काँग्रेसकडं तेलंगणातील जातगणनेचा मुद्दा शिल्लक राहिलेला आहे. तेलंगणाच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसनं जातगणना करण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानुसार सत्ता आल्यावर काँग्रेसनं जातगणना केली. तीन महिन्यांपूर्वी फेब्रुवारीमध्ये जातनिहाय लोकसंख्येची आकडेवारी जाहीर केली गेली. संपूर्ण अहवाल प्रसिद्ध करण्यात आलेला नाही. तेलंगणाच्या जातनिहाय आकडेवारीमध्ये मागास हिंदू आणि मागास मुस्लीम अशी दोन्ही वेगळी वर्गवारी केलेली आहे. दोन्ही मिळून मागासांची संख्या ५६ टक्के आहे. इतर जातींची वर्गवारी केली असून त्यामध्येही हिंदू व मुस्लीम वेगवेगळे केलेले आहेत. या दोन्ही मिळून इतर जातींचे प्रमाण १५ टक्के आहे. अनुसूचित जाती १७ टक्के, अनुसूचित जमाती १० टक्के आहेत. ही तेलंगणातील जातनिहाय आकडेवारी योग्य आहे. या मोजमापाचं केंद्रानं अनुकरण केलं पाहिजे असं काँग्रेसचं म्हणणं आहे. तेलंगणातील जातींच्या विभागणीचा मुद्दा काँग्रेसनं पकडला आहे. काँग्रेसच्या कार्यकारी समितीच्या बैठकीमध्ये तेलंगणाच्या जातगणनेवर चर्चा झाली, त्यावर रेवंत रेड्डींशिवाय योग्य व्यक्ती दुसरी कोण असणार? बैठकीमध्ये केंद्राच्या निर्णयाचं श्रेय राहुल गांधी आणि त्यानंतर त्यांचे शिलेदार रेवंत रेड्डींना देण्यात आलं.

धक्कातंत्र…

केंद्र सरकारने जातगणनेची घोषणा केल्यावर सर्वात जास्त आश्चर्य काँग्रेलाच वाटलं असावं. काँग्रेसचे नेते आणि माध्यम विभागप्रमुख जयराम रमेश यांच्याकडून दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषदेत ते अप्रत्यक्षपणे व्यक्तही झालं होतं. पहलगामसंदर्भात घडामोडी होत आहेत, मोदी बैठका घेत आहेत, संरक्षणमंत्री राजनाथ त्यांची भेट घेत आहेत. मोदी अनेकांची भेट घेत आहेत, त्यामुळे मोदींनी सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट घेतली असेल असं सगळ्यांना वाटलं होतं. पण झालं भलतंच! भागवत मोदींना भेटून गेले आणि दुसऱ्या दिवशी मोदींनी जातगणना जाहीर केली. हा काय प्रकार आहे, असं जयराम रमेश म्हणत होते. या प्रकरणातील दुसरा भाग असा की, यूपीए सरकारच्या काळात विलासराव देशमुख हे ग्रामीण विकासमंत्री होते, त्यांच्या कारकीर्दीत मनमोहन सिंग सरकारने सामाजिक-आर्थिक पाहणी सुरू केली होती. त्यामध्ये जातींच्या मागासपणाचा आढावा घेण्यात आला होता. विलासरावांनंतर हे खातं जयराम रमेश यांच्याकडे आलं. त्यामुळे ते मंत्री असताना सामाजिक-आर्थिक पाहणीचं काम होत होतं. रमेश याचं म्हणणं होतं की, हे केवळ सर्वेक्षण नव्हतं. जातगणनाच होती. या पाहणीचं नाव सामाजिक-आर्थिक पाहणी आणि जातगणना असं होतं. पण जातगणनेचा उल्लेख का केला जात नाही? मोदी सरकार याच पाहणी अहवालातील जातींचं प्रमाण पाहून कल्याणकारी योजना राबवत आहे. असं असूनदेखील मोदी सरकारने हा अहवाल प्रसिद्ध केला नाही. आता जातगणना करून भाजप श्रेय घेतंय! मोदींच्या धक्कातंत्राचा काँग्रेसला धक्का बसला हे नक्की.

मी महाराष्ट्राचा आणि गुजरातचाही!

दिल्लीचे नायब राज्यपाल विनयकुमार सक्सेना यांनी महाराष्ट्र दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित करून केंद्रीय गृहमंत्री अमित शहांना बोलावलं होतं. १ मे हा गुजरातचाही स्थापना दिन असल्यामुळे दोन्ही राज्यांचे स्थापना दिन एकाच वेळी साजरे करण्याचा इरादा होता. पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यामुळे सध्या सगळीकडे भान बाळगून कार्यक्रम होतात. तसा उल्लेखही शहांनी छोटेखानी भाषणामध्ये केला. मेजवानी ठेवण्याचा विचार होता, पण प्रसंग बघून ‘मीलन दिन’ आयोजित केला आहे, असं शहादेखील म्हणाले. सक्सेना यांनी हा कार्यक्रम यमुनेच्या किनारी ठेवला होता. ‘आप’ सरकारच्या काळात यमुना स्वच्छ झाली नाही. आता भाजपचं सरकार आलंय, आम्ही यमुना स्वच्छ करतोय, असा राजकीय संदेश देण्याचा हेतू होता. शहांनीही सक्सेना यांचं कौतुक केल्यामुळे हेतू साध्य झाला असं दिसतंय. शहांनी त्यांच्या भाषणात महाराष्ट्र आणि गुजरात या दोन्ही राज्यांमध्ये भाजपची सरकारे स्थापन झाली आहेत, असं आवर्जून सांगितलं. महाराष्ट्रात अडीच वर्षं भाजपचं सरकार नव्हतं त्याची सल भाजप नेत्यांच्या मनातून जात नाही हेच खरं! शहांना महाराष्ट्र आणि गुजरात दोन्ही राज्यांबद्दल प्रेम आहे असं दिसतंय. दोन्ही राज्यांतील जनतेला त्यांच्या त्यांच्या राज्याच्या स्थापना दिनाच्या शुभेच्छा. पण माझ्यासाठी हे दोन्ही दिन विशेष आहेत. दोन्ही राज्यांच्या स्थापना दिनाच्या शुभेच्छा स्वीकारण्याचा मला अधिकार आहे. माझा जन्म आणि लग्न दोन्ही महाराष्ट्रात झालेलं आहे आणि माझी कर्मभूमी गुजरात आहे, असं म्हणत शहांनी दोन्ही राज्यांना आपलंसं केलं. शहांचं म्हणणं होतं की, महाराष्ट्र व गुजरातने देशासाठी मोठा धडा घालून दिला आहे. एकाच राज्यातून दोन राज्यं होऊ शकतात व स्वबळावर स्वत:चा विकास घडवून आणू शकतात, त्यातून देशाचाही विकास साधला जातो. एकाच राज्यातून दोन राज्यं कोणतीही कटुता न बाळगता निर्माण झाली! शहांचं पुढचं वाक्य मराठी माणसांना पटेलच असं नाही. शहांचं म्हणणं होतं की, महाराष्ट्र व गुजरात यांच्यामध्ये कोणतीही स्पर्धा नाही… महाराष्ट्रातून उद्याोग गुजरातला गेले, तेव्हा मराठी माणसं नाराज झाली होती. बाकी शहांचं म्हणणं योग्यच होतं. दोन्ही राज्यं देशाची संस्कृती मजबूत करत आहेत. गणेश उत्सव, गरबा दोन्हींकडे असतो. गुढीपाडवा असो वा उत्तरायण, दोन्ही राज्यं साजरी करतात. दोन्ही राज्यं आर्थिक विकासाचा आधारस्तंभ आहेत. २०४७ मध्ये देश विश्वात पहिल्या क्रमांकावर असेल. त्यामध्ये दोन्ही राज्यांचा वाटा मोठा असेल, असं शहा म्हणाले. हे सगळं सांगताना मोदींच्या नेतृत्वामुळे ही राज्यं विकास साधत असल्याचं शहांचं म्हणणं औचित्याला धरून होतं असं म्हणता येईल.

काश्मीर आणि खासदारांचे अभ्यासदौरेउन्हाळ्याच्या दिवसांमध्ये 

सगळ्यांनाच काश्मीरला जायला आवडतं. संसदेचे खासदारही त्याला अपवाद नाहीत. भाजपच्या नेत्यानं तर गुलमर्गमध्ये जंगी पार्टी आयोजित केली होती. त्यावरून मोठा वाद झाला होता. या नेत्याची ही खासगी पार्टी होती. पण, संसदीय समित्याही काश्मीरला एप्रिल-मे महिन्यामध्ये अभ्यास दौरा आयोजित करतात. यावर्षीही अनेक समित्यांच्या सदस्यांना काश्मीरला फिरून यायचं होतं. पण, पहलगाममुळं त्यांना ‘अभ्यास’ रद्द करावा लागला आहे. पहलगाममध्ये दहशतवादी हल्ला झाला तेव्हा लोकलेखा समितीचे सदस्य काश्मीरमध्येच होते. २१ ते २३ एप्रिल असे तीन दिवस ते काश्मीरमध्ये अभ्यास करणार होते. या समित्यांचे सदस्य नेमका काय अभ्यास करतात माहीत नाही. लोकलेखा समितीचे अध्यक्ष आहेत, काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाल. त्यांच्यासह या समितीचे सदस्य दौरा स्थगित करून दिल्लीला परतले. भाजपचे नेते राधामोहन दास यांच्या अध्यक्षतेखालील गृहविषयक स्थायी समितीचे सदस्यही अभ्यास दौऱ्यावर काश्मीरला जाणार होते. खरंतर आताही त्यांना काश्मीरला जायला हरकत नाही, पर्यटक तिथं आहेतच. पण, प्रश्न आहे की, या खासदारांना सुरक्षा पुरवावी लागेल. भाजपनेत्याच्या कार्यक्रमाला सुरक्षा दिली जाते पण, पहलगामच्या बैसरन पठारावर एक पोलीस देखील नसल्याबद्दल केंद्रीय गृहमंत्रालयाला फटके बसले आहेत. त्यामुळं ही समिती काश्मीरला गेली नाही. एक देश एक निवडणूक या विधेयकावर चर्चा करण्यासाठी केंद्राने संयुक्त संसदीय समिती नेमलेली आहे. या समितीचेही मे महिन्यामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये दौरे सुरू होतील. पहिला दौरा महाराष्ट्रात असेल. त्यानंतर जूनमध्ये ही समिती जम्मू-काश्मीरला जाणार होती. पहलगामच्या हल्ल्यानंतर या समितीचाही दौरा रद्द झालेला आहे.



Source link

कल्याण डोंबिवलीत नाले सफाईच्या कामात हलगर्जीपणा करणारे ठेकेदार काळ्या यादीत, कडोंमपा आयुक्त अभिनव गोयल यांचा इशारा

0
कल्याण डोंबिवलीत नाले सफाईच्या कामात हलगर्जीपणा करणारे ठेकेदार काळ्या यादीत, कडोंमपा आयुक्त अभिनव गोयल यांचा इशारा



kalyan dombivli municipal corporation blacklisted contractors for negligence in drainage cleaning work कल्याण डोंबिवलीत नाले सफाईच्या कामात हलगर्जीपणा करणारे ठेकेदार काळ्या यादीत, कडोंमपा आयुक्त अभिनव गोयल यांचा इशारा



Source link

कल्याणमध्ये दुर्गाडी चौकात रथयात्रा स्वागताची कमान कोसळल्याने वाहतुकीला अडथळा

0
कल्याणमध्ये दुर्गाडी चौकात रथयात्रा स्वागताची कमान कोसळल्याने वाहतुकीला अडथळा



in kalyan Traffic jam Rath Yatra welcome arch collapses at Durgadi Chowk कल्याणमध्ये दुर्गाडी चौकात रथयात्रा स्वागताची कमान कोसळल्याने वाहतुकीला अडथळा



Source link

चिखली-चऱ्होली‘टीपी’ला स्थगिती द्या;आमदार महेश लांडगे यांची मागणी

0
चिखली-चऱ्होली‘टीपी’ला स्थगिती द्या;आमदार महेश लांडगे यांची मागणी



पिंपरी :‘पिंपरी-चिंचवड महापालिकेकडून चिखली-चऱ्होलीत नगररचना योजना (टीपी स्कीम) राबविण्याचे नियोजन असून, ही योजना भूमिपुत्र, लघु उद्योजकांसाठी अन्यायकारक आहे. त्यामुळे या योजनेला तत्काळ स्थगिती देण्यात यावी,’ अशी मागणी भोसरीचे भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी केली.

महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांना त्यांनी निवेदन दिले आहे. ‘महापालिका प्रशासनाच्या माध्यमातून चिखली आणि चऱ्होलीसाठी नगररचना योजना जाहीर करण्यात आली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून या योजनेला विरोध आहे. भूमिपुत्र आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांना विश्वासात न घेता प्रशासन मनमानीपणे अशी योजना राबवू शकत नाही. प्रशासकीय राजवट पुढे करून भूमिपुत्र व स्थानिकांवर अशाप्रकारे योजना लादणे अत्यंत खेदजनक आहे,’ असे लांडगे यांनी निवेदनात म्हटले आहे.

‘भाजपच्या सत्ताकाळात गेल्या दहा वर्षांमध्ये पिंपरी- चिंचवडमधील समाविष्ट गावांचा सर्वांगीण विकास झाला. समाविष्ट गावांमधील वाडी-वस्त्यांवर रस्ते, पाणी, वीज आणि ड्रेनेज व्यवस्था सक्षम करण्यासाठी कायम पुढाकार घेतला आहे. भूमिपुत्रांना विश्वासात न घेता प्रशासनाने ही योजना लादल्यास नागरिकांचा रोष निर्माण झाला, तर त्याला जबाबदार कोण,’ असा सवाल लांडगे यांनी उपस्थित केला आहे.



Source link

in satara minister dada bhuse said military schools should focus to send more youth at national defense academy जास्तीत जास्त तरुण एनडीएमध्ये जाण्यासाठी सैनिकी शाळांनी प्रयत्न करावेत

0
in satara minister dada bhuse said military schools should focus to send more youth at national defense academy जास्तीत जास्त तरुण एनडीएमध्ये जाण्यासाठी सैनिकी शाळांनी प्रयत्न करावेत



in satara minister dada bhuse said military schools should focus to send more youth at national defense academy जास्तीत जास्त तरुण एनडीएमध्ये जाण्यासाठी सैनिकी शाळांनी प्रयत्न करावेत – दादा भुसे



Source link

सांताक्रूझ पोलीस ठाण्यातच तक्रारदारासह पोलिसांवर हल्ला, चौघांविरोधात गुन्हा दाखल

0
सांताक्रूझ पोलीस ठाण्यातच तक्रारदारासह पोलिसांवर हल्ला, चौघांविरोधात गुन्हा दाखल



in mumbai attack on complainant and Police at Santacruz police station Mumbai Crime News : सांताक्रूझ पोलीस ठाण्यातच तक्रारदारासह पोलिसांवर हल्ला, चौघांविरोधात गुन्हा दाखल



Source link

सोलापुरात उष्णतेची दाहकता; दोन मोटारींसह तीन वाहने जळून खाक

0
सोलापुरात उष्णतेची दाहकता; दोन मोटारींसह तीन वाहने जळून खाक


सोलापूर : सोलापुरात यंदाच्या उन्हाळ्यात तुलनेने जास्त दाहकता जाणवत असून तापमानाचा पारा ४५ अंश सेल्सिअसच्या घरात असताना नागरिकांच्या अंगाची लाही लाही होत आहे. तर दुसरीकडे प्रखर उन्हात रस्त्यावर वाहने पेटण्याचेही प्रकार घडत आहेत. मागील आठवड्यापासून शहर व परिसरात तीन वाहने जळाली आहेत.

सोलापूर-कोल्हापूर महामार्गावर शहराजवळ देगाव हद्दीत एका पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी गेलेल्या एका स्कार्पिओ मोटारीच्या इंजिनमधून अचानकपणे धूर निघून आगीच्या ठिणग्या उडू लागल्या. तेव्हा तात्काळ प्रसंगावधान राखून मोटारचालकाने मोटार लगेच पेट्रोल पंपापासून काही दूर अंतरावर नेऊन थांबविली. तोपर्यंत मोटारीने पेट घेतला होता.

ही मोटार माळशिरसचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांचे पुत्र जीवन जानकर यांची असून ते स्वतः मोटारीत असताना ही दुर्घटना घडली खरी; परंतु त्यांनी अवघ्या काही सेकंदात प्रसंगावधान राखून मोटार पेट्रोल पंपाबाहेर नेऊन थांबविल्यामुळे पुढील मोठा अनर्थ टळला. मात्र सभोवताली आगीने लपेटल्यामुळे मोटार संपूर्ण जळून खाक झाली.

हेही वाचा

दुसरी घटना सोलापूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर बोरामणी (ता. दक्षिण सोलापूर) येथे घडली. सोलापूर महानगरपालिका परिवहन उपक्रमाची प्रवासी बस दक्षिण सोलापूर तालुक्यात मुस्ती येथे निघालेल्या एका प्रवासी बसला दुपारच्या रणरणत्या उन्हात अचानकपणे आग लागली. सुरूवातीला इंजिनमधून धूर वाढला आणि आग लागल्याचे बसचालकाच्या लक्षात आले. तेव्हा कोणताही विलंब न लावता त्याने बसवाहकासह सर्व प्रवाशांना आगीची माहिती दिली आणि सर्वांना तात्काळ खाली उतरण्यास सांगितले. त्याप्रमाणे सर्वजण बसमधून खाली उतरले. नंतर संपूर्ण बसला आगीने लपेटले होते. आगीत संपूर्ण बस जळाली.

शहरातील नव्या पेठे सारख्या अति वर्दळीच्या बाजारपेठेत एक दुचाकी अचानकपणे लागलेल्या आगीत जळून खाक झाली. एक दुचाकीस्वार नव्या पेठेत आल्यानंतर त्यांच्या दुचाकीच्या इंजिनमधून मोठ्या प्रमाणात धूर येत असल्याने लक्षात आले. नंतर आगीत संपूर्ण दुचाकी जळाली.



Source link

उकाड्यापासून दिलासा मिळणार ! मुंबईत रविवारपासून पावसाचा अंदाज

0
उकाड्यापासून दिलासा मिळणार ! मुंबईत रविवारपासून पावसाचा अंदाज



Mumbai rain latest updates chances of heavy rainfall from sunday Mumbai Weather Updates : उकाड्यापासून दिलासा मिळणार ! मुंबईत रविवारपासून पावसाचा अंदाज



Source link

एकनाथ शिंदे असे मित्र, ज्यांच्यावर एकही डाग नाही; नाना पाटेकरांकडून शिंदेंचे तोंड भरून कौतुक

0


सातारा : राज्याच्या राजकारणात खूप कमी मंडळी आहेत ज्यांच्यावर कोणताही ठपका नाही, त्यापैकी एक म्हणजे एकनाथ शिंदे (Eknath Shinde) अशा शब्दात अभिनेते नाना पाटेकर (Nana Patekar) यांनी शिंदेंवर कौतुकाचा वर्षाव केला.  काही मित्र असे असतात ज्यांच्याकडे पाहून समाधान वाटतं, एकनाथ शिंदे हे त्यापैकीच एक असल्याचं नाना पाटेकर म्हणाले. नाम फाऊंडेशन, (Naam Foundation) टाटा मोटर्स (Tata Motors) आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने कोयना धरण परिसरात ‘गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार’ ही योजना राबवली जात आहे. त्याचा शुभारंभ हा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अभिनेते नाना पाटेकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी नाना पाटेकर बोलत होते. 

काय म्हणाले नाना पाटेकर? 

नाना पाटेकर म्हणाले की, “एकनाथ शिंदे यांना बाळासाहेबांचे शिवसैनिक असल्यापासून ओळखत आहे. आमची मैत्री जुनी आहे, मी त्याच्यांकडे काही मागत नाही. काही राजकीय मंडळी आहेत ज्यांच्यावर कोणतेही ठपके नाहीत, त्यांच्यापैकी एक म्हणजे एकनाथ शिंदे आहेत. शिंदेंनी मुख्यमंत्रिपद भूषवलं, पण कुणीही त्याच्याकडे बोट दाखवू शकत नाही. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोघांना सुद्धा मी जवळून ओळखतो. त्यांचे सुद्धा काम चांगले आहे.” 

धरणातील गाळ काढला पाहिजे

नाना पाटेकर पुढे म्हणाले की, “नाम  फाउंडेशनचा टाटा समूह आणि  आणि राज्य सरकार सोबत करार झाल्याने आमचे काम अधिक सोयीचे झाले आहे. धरणातून गाळ काढल्यास आणि तो शेतकऱ्यांच्या शेतामध्ये वापरल्यास शेतीची सुपिकता वाढते. माझ्या खडकवासल्यातील शेतीमध्ये याचा वापर केला. त्यामुळे उत्पादनात दुप्पट वाढ झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे पाण्याचा साठाही वाढतो आणि शेतकऱ्यांचे उत्पादनही वाढेल. 

कोयना धरणातील गाळ काढण्याचे काम पुढच्या वर्षी अधिक प्रमाणात सुरू करावे असे आवाहन नाना पाटेकर यांनी केलं. 

नाम फाऊंडेशनच्या मदतीने धरणातील गाळ काढणार

एकनाथ शिंदे म्हणाले की, “नाम फाऊंडेशन, टाटा मोटर्स आणि राज्य शासनाच्या संयुक्त विद्यमाने गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार ही योजना राबवली जात आहे. नाम फाऊंडेशनच्या वतीने राज्यभरात हे काम सुरू आहे. चिपळूण, महाड आणि खेडमध्ये याचे परिणाम दिसतात. त्यामुळे पुराती तीव्रता कमी झाल्याचं दिसतंय. कोयना धरण आणि बॅक वॉटर परिसरातली त्याचे सकारात्मत परिणाम दिसत आहेत. याची व्याप्ती आता वाढवली जाणार आहे. धरणाचा गाळ काढणे याला पर्याय नाही. त्यावर मागच्या कॅबिनेटमध्ये चर्चा झाली. त्यासाठी वेगवेगळे विभाग आणि नाम फाऊंडेशनच्या माध्यमातून गाळ काढण्याचं काम केलं जाणार आहे.”

सिनेमा बघायला वेळ मिळत नाही. पण नाना हे आवडते अभिनेते आहेत. त्यामुळे कोविड झाल्यानंतर हॉस्पिटलमध्ये असताना नानांचे चित्रपट पाहिल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले. 

अधिक पाहा..



Source link