Bholaa Vs Dasara: भोला चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दसरा हा दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र, भोलाने कमाईच्या बाबतीत दसऱ्याला मागे टाकले आहे.
Source link

Bholaa Vs Dasara: भोला चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर दसरा हा दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित झाला. मात्र, भोलाने कमाईच्या बाबतीत दसऱ्याला मागे टाकले आहे.
Source link

Rashmika Mandana Birthday: आज ५ एप्रिल रोजी रश्मिकाचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी…
Source link

सातारा: जिल्ह्यात कोरोनाच्या (Corona)वाढत्या प्रार्दूभावामुळे जिल्हा प्रशासन सतर्क झाले असून आता सातारा जिल्हयातील शाळा, महाविद्यालये, रूग्णालये आणि गर्दीच्या ठिकाणी नागरिकांना मास्क अनिवार्य करण्यात आले आहे. जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरानाचे रूग्ण वाढत असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात नागरिकांना मास्क सक्ती करण्यात आली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Health Minister Tanaji Sawant) यांनी सांगितले की, कोराना रूग्णांची ( Corona Patient) संख्या वाढत आहे. पण हा सौम्य प्रकारातील कोरोना असून त्यामुळे घाबरून जाण्याची अजिबात आवश्यकता नाही. तरीही सर्वांनी योग्य ती खबरदारी घेण्याची आवश्यकता आहे.

सध्या राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवर 13-14 एप्रिल रोजी राज्यात मॉक ड्रील घेण्यात येणार आहे अशी माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी मंगळवारी दिली. "केंद्र सरकारने सूचना दिल्यानुसार, आम्ही 13-14 एप्रिल रोजी राज्यात आपल्या कोविड सज्जतेसाठी मॉक ड्रिल घेणार असल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली.

महाराष्ट्रातील सर्व कोराना रूग्णालयांकडून (Corona hospitals)माहिती घेतली जात असून वेंटिलेटरच्या सपोर्टची अजून तरी गरज पडलेली नाही. सर्वात समाधानकारक बाब म्हणजे 48-72 तासांमध्ये कोरोना रूग्ण बरे होत आहेत. त्यामुळे जास्त घाबरण्याचे कारण नाही. याचे कारण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतील डेल्टा व्हेरियंटसारखा सध्याचा कोराना प्राणघातक स्वरूपाचा नाही, असे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितले आहे.

आरोग्यमंत्री तानाजी सावंत म्हणाले की, सध्या तरी कोरोनाच्या वेगवेगळ्या चाचण्या करण्याची आवश्यकता वाटत नाही पण यासंर्दभात आम्हाला केंद्र सरकारकडून तशा प्रकारच्या सूचना आल्या तर तशी खबरदारी नक्कीच घेतली जाईल. तसेच कोरोनाच्या दोन्ही लसी (booster dose) टोचून घेतल्यानंतर बूस्टर डोस देण्यासंदर्भात केंद्राच्या निर्देशानुसार त्याचे पालन केले जाणार आहे, असेही आरोग्यमंत्र्यानी सांगितलं.

लोकसंख्येची घनता ( Population density)अधिक असलेल्या जिल्ह्यात रूग्णसंख्येचे प्रमाण अधिक असल्याचं दिसून येतंय. त्यामध्ये सांगली, कोल्हापूर, सोलापूर, सिंधुदुर्ग, पुणे आणि सातारा या सहा जिल्ह्याचा समावेश आहे. ज्या भागात रूग्णसंख्येचे प्रमाण वाढत आहे त्या ठिकाणची लोकसंख्येची घनता अधिक आहे. यामध्ये पुणे, रायगड, ठाणे या जिल्ह्यांचा समावेश असून येथिल दिवसेंदिवस कोरोना पॉझिटिव्ह रूग्णसंख्येत (corona positive patient) वाढ पाहायला मिळत आहे.

सणवारांच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक ठिकाणी गर्दी टाळायला हवी

सध्याच्या चैत्र महिना सुरू असून संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहाने सण (several festivals) साजरे केले जातात आणि सुट्टीनिमित्त लोक एकत्र जमा होतअसतात. त्यामुळे अशा ठिकाणी गर्दी करताना नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेऊन आनंद घ्यावा, असे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी सांगितलं.

या सर्व पार्श्वभूमीवर कोरोना रूग्णालयांकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत असून आमच्याकडे रूग्णांसाठी लागणारे आवश्यक ते आरोग्य साहित्यासह ऑक्सिजन किटची (oxygen kit) उपलब्धता आहे, असा दावाही आरोग्यामंत्र्यांनी केला आहे.

Source link

अनिश आणि ईशाचं नातं आता अरुंधतीसमोर देखील आलं आहे. तिचा या नात्याला विरोध नसला तरी, प्रत्येक आईप्रमाणेच तिला देखील आपल्या मुलीची काळजी वाटत आहे. आधी शिक्षण पूर्ण करा, स्वतःच्या पायावर उभे राहा आणि मग पुढचा विचार करा, असा सल्ला तिने अनिश आणि ईशाला दिला. मात्र, घरून विरोध झाला तर मी पळून जाऊन लग्न करेन असा चंग ईशाने बांधला आहे. अनिशा आणि ईशा एकाच कॉलेजमध्ये असल्याने आता त्यांची डोकेदुखी आणखीनच वाढली आहे.

बॉलिवूड किंग शाहरुख खान याचा हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल होत असून, यात आर्यन खान आपल्या वडिलांना नाचताना पाहून आनंदी होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख खान नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी स्टेजवर डान्स करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये शाहरुख खान त्याच्या मेगा ब्लॉकबस्टर चित्रपट ‘पठान’ मधील ‘झूम जो पठान’ या सुपरहिट गाण्यावर जबरदस्त डान्स करताना दिसत आहे.

आपल्यासाठीही रिचर्ड गेअर यांची कृती अनपेक्षित असल्याचे शिल्पा शेट्टीने म्हटले होते. दरम्यान, सार्वजनिक कार्यक्रमात अश्लील आणि असभ्य वर्तन केल्याप्रकरणी शिल्पा शेट्टीवर राजस्थानमधील वेगवेगळ्या भागात फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले होते. यानंतर राजस्थान न्यायालयाने शिल्पा आणि गेअरविरोधात अटक वॉरंटही काढले होते. तर, २०१७मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार हे प्रकरण मुंबईला वर्ग करण्यात आले होते. यानंतर जानेवारी २०२२मध्ये न्यायालयाने सदर प्रकरणात शिल्पा शेट्टी हिची निर्दोष मुक्तता केली होती.

नागराज मंजुळे यांचा ‘घर बंदूक बिरयानी’ या चित्रपट ७ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात थोडी हटके कथा दाखवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने नागराज मंजुळे आपल्याला ॲक्शन मोडमध्ये आणि एका वेगळ्याच शैलीत दिसणार आहेत. तर, सयाजी शिंदेही अतिशय रावडी आणि तडफदार अंदाजात दिसणार आहेत. आकाशची रोमँटिक इमेजही तरुणांच्या पसंतीस उतरणारी आहे. या चित्रपटात काहीतरी नवीन पाहायला मिळणार असल्याची उत्सुकता प्रेक्षकांना लागली आहे. पोलीस आणि डाकूंची चकमक यात दिसणार असून, हा पाठलाग कशासाठी आहे आणि यातून काय निष्पन्न होणार आहे, हे चित्रपट पाहिल्यावरच कळणार आहे.

परिणीती आणि राघव चढ्ढा यांच्या साखरपुड्यात फक्त खास मित्र आणि नातेवाईकच सहभागी होणार आहेत. अभिनेत्री प्रियांका चोप्रा जोनास आणि तिची मुलगी मालत, पती निक जोनास देखील परिणीतीच्या साखरपुड्याला उपस्थित राहणार आहेत. बॉलिवूड कॉरिडोरमध्ये जरी या चर्चा रंगल्या असल्या, तरी कुटुंबाकडून याला अद्याप दुजोरा मिळालेला नाही.

भांडारकर एंटरटेन्मेंट आणि पराग मेहता प्रस्तुत ‘सर्किट’ या चित्रपटाची निर्मिती मधुर भांडारकर, फिनिक्स प्रॉडक्शनच्या पराग मेहता, अमित डोगरा आणि देवी सातेरी प्रॉडक्शनच्या प्रभाकर परब यांनी केली आहे. स्वरूप स्टुडिओचे सचिन नारकर, विकास पवार तर फिनिक्स प्रॉडक्शनचे अल्पेश गेहलोत, कीर्ति पेंढारकर, आकाश त्रिवेदी, मनोज जैन, मोहित लालवाणी चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. आकाश पेंढारकर यांनी या चित्रपटातून आपले दिग्दर्शकीय पदार्पण केलं आहे. आनंद पेंढारकर, जितेंद्र जोशी यांनी गीतलेखन, तर अभिजीत कवठाळकर यांचं श्रवणीय संगीत या चित्रपटाला लाभलं आहे. संजय जमखंडी यांनी रुपांतरित कथा आणि संवाद लेखन, शब्बीर नाईक यांनी छायांकन, तर अतुल साळवे यांनी कार्यकारी निर्माता म्हणून जबाबदारी निभावलीय. चित्रपटात वैभव तत्त्ववादी, हृता दुर्गुळे, रमेश परदेशी, मिलिंद शिंदे अशी तगडी स्टारकास्ट आहे.

‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात अभिनेत्री पूजा हेगडे पहिल्यांदाच सलमान खानसोबत ऑनस्क्रीन रोमान्स करताना दिसणार आहे. या चित्रपटात व्यंकटेश दग्गुबती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर हे कलाकार देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत. ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट २०२३च्या ईदला प्रदर्शित होणार आहे.