Tuesday, June 30, 2026
Home Blog Page 3102

Salman Khan: कुणी दिली होती सलमान खानला जीवे मारण्याची धमकी? झाला मोठा खुलासा!

0
Salman Khan: कुणी दिली होती सलमान खानला जीवे मारण्याची धमकी? झाला मोठा खुलासा!


आरोपी मुलाने फोनवर सांगितले होते की, तो येत्या ३० एप्रिलला सलमान खानला मारणार आहे. सध्या याप्रकरणी आरोपीची चौकशी सुरू आहे. कारण आरोपी अल्पवयीन असून, त्याला अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पोलीस आरोपीची चौकशी करत असून, त्याने हा फोन का केला असावा हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे मुंबई पोलिसांनी काल रात्रीच हे प्रकरण मुंबई गुन्हे शाखेकडे सोपवले होते. धमकीचा हा फोन आल्यानंतर अवघ्या १२ तासांच्या आतच पोलिसांनी धमकी देणाऱ्या व्यक्तीला पकडले आहे. आता या आरोपीला बाल न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.



Source link

Shiv Thakare-Archana Gautam: राडा तर होणारच! शिव ठाकरे आणि अर्चना गौतम पुन्हा येणार आमने सामने!

0
Shiv Thakare-Archana Gautam: राडा तर होणारच! शिव ठाकरे आणि अर्चना गौतम पुन्हा येणार आमने सामने!


मीडिया रिपोर्टनुसार ‘बिग बॉस १६’च्या घरात एकमेकांसोबत भांडणारे अर्चना गौतम आणि शिव ठाकरे हे दोघे हर्ष लिंबाचिया आणि पुनित पाठक यांच्या शो ‘एंटरटेनमेंट की रात’मध्ये एकत्र येऊन चाहत्यांसाठी मनोरंजनाचा डोस दुप्पट करणार आहेत. मात्र, हे दोघेही या शोमध्ये कायमस्वरूपी सहभागी होणार नसून, केवळ पाहुणे म्हणून मंचावर हजर राहणार आहेत. अर्चना आणि शिव जेव्हा बिग बॉसच्या घरात होते, तेव्हा या दोघांनी एकत्र खेळावे, असे सगळ्याच चाहत्यांना वाटत होते. चाहत्यांनी अनेकदा दोघांना एकत्र खेळण्याचा सल्ला दिला होता. मात्र, ‘बिग बॉस’च्या घरात ज्याप्रकारे दोघांमध्ये भांडण झाले, त्यानंतर शो संपल्यानंतरही हे दोघे भेटतील असे कोणालाच वाटले नव्हते.



Source link

Maharashtra Shahir: सह्याद्रीचा सिंह आहे, पिंजऱ्यात नाही अडकवू शकत आपण… ‘महाराष्ट्र शाहीर’चा दमदार ट्रेलर पाहिला का?

0
Maharashtra Shahir: सह्याद्रीचा सिंह आहे, पिंजऱ्यात नाही अडकवू शकत आपण… ‘महाराष्ट्र शाहीर’चा दमदार ट्रेलर पाहिला का?


‘,महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातील अनेक गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहेत. या चित्रपटाची गाणी जितकी श्रवणीय आहेत, तितकेच या चित्रपटातील संवाद देखील दमदार असल्याचे या ट्रेलरवरून लक्षात आले आहे. ‘सह्याद्रीचा सिंह आहे, पिंजऱ्यात नाही अडकवू शकत आपण…’, ‘आम्ही कलाकार आहोत पण कुणाचे मिंधे नाहीत..’ असे दमदार संवाद या ट्रेलरमध्ये ऐकू येत आहेत. या चित्रपटातून ‘येळकोट येळकोट जय मल्हार’, ‘जेजुरीच्या खंडेराया जागराला या या’, ‘आगंगंगं इंचू चावला…’ अशी विविध प्रकारातील शाहिरांनी गायलेली गाणी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. अजय-अतुल या संगीतकार जोडीने शाहिरांच्या संगीत कारकिर्दीला पूर्ण न्याय दिला आहे. त्यांची ही विविधांगी गाणी पडद्यावर रसिकांसाठी एक आगळी पर्वणीच ठरणार आहे.



Source link

Suhana Khan: मनोरंजन विश्वात पदार्पण करण्याआधीच शाहरुख खानच्या लेकीची मोठी झेप!

0
Suhana Khan: मनोरंजन विश्वात पदार्पण करण्याआधीच शाहरुख खानच्या लेकीची मोठी झेप!


सध्या सुहाना खान तिच्या आगामी’द आर्चीज’चित्रपटामुळे चर्चेत आहे. सुहाना खान चित्रपटांमध्ये आपला जलवा कधी दाखवणार याची चाहत्यांनाही बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा आहे. तिच्या या पहिल्या चित्रपटाची बऱ्याच दिवसांपासून चर्चा सुरू आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन झोया अख्तर यांनी केले असून, या चित्रपटाने प्रदर्शित होण्यापूर्वीच आंतरराष्ट्रीय महोत्सवांमध्ये धुमाकूळ घातला आहे. या चित्रपटामध्ये सुहाना खानसोबतच बॉलिवूडचे अनेक स्टारकिड्स मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहेत.



Source link

Ankush Chaudhari: अन् अंकुश चौधरीला कार्यक्रमात झाले अश्रू अनावर, जाणून घ्या नेमकं काय झालं?

0
Ankush Chaudhari: अन् अंकुश चौधरीला कार्यक्रमात झाले अश्रू अनावर, जाणून घ्या नेमकं काय झालं?


अंकुश चौधरी… मराठी सिनेसृष्टीचा सुपरस्टार. चाळीतील सांस्कृतिक कार्यक्रमांमधून अभिनयाचा श्रीगणेशा करत अंकुशने नाटक, मालिका आणि सिनेमा या तिन्ही माध्यमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप उमटवली. म्हणता म्हणता प्रेक्षकांचा हा लाडका अभिनेता सुपरस्टार झाला. सध्या तो ‘मी होणार सुपरस्टार जल्लोष ज्युनियर्सचा’ या शोमध्ये परिक्षक म्हणून दिसत आहे. शोच्या आगामी भागात अंकुशला अश्रू अनावर होताना दिसणार आहेत.



Source link

Pushpa 2: ‘पुष्पा २’मध्ये समांथा पुन्हा करणार आयट साँग? अखेर अभिनेत्रीने सोडले मौन, म्हणाली…

0
Pushpa 2: ‘पुष्पा २’मध्ये समांथा पुन्हा करणार आयट साँग? अखेर अभिनेत्रीने सोडले मौन, म्हणाली…



Samantha Ruth Prabhu: समंथाला ‘पुष्पा २’ या चित्रपटात देखील एका आयटम साँग करण्याची ऑफर देण्यात आल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. आता समांथाने यावर वक्तव्य केले आहे.



Source link

Celina Jaitly: वडील आणि मुलासोबत झोपणारी अभिनेत्री…; सेलिना जेटलीचे ट्रोलरला सडेतोड उत्तर

0
Celina Jaitly: वडील आणि मुलासोबत झोपणारी अभिनेत्री…; सेलिना जेटलीचे ट्रोलरला सडेतोड उत्तर


सेलिनाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर तिने ‘अपना सपना मनी-मनी’, ‘नो एंट्री’, ‘गोलमाल रिटर्न्स’, ‘जवानी-दीवानी’ या चित्रपटांमध्ये महत्त्वाची भूमिका साकारली. तिचे हे सर्व चित्रपट सुपरहिट ठरले होते.



Source link

सातारा : आमदार शशिकांत शिंदे म्हणजे जिल्ह्यातले आसराणी, आ.महेश शिंदे यांची खोचक टीका | पुढारी

0









सातारा; इम्तियाज मुजावर कोरेगाव तालुक्यातील अनेक भागात असलेल्या पाण्याच्या दुष्काळावरून कोरेगाव तालुक्याचे वातावरण चागलंच तापलं आहे. काल आ.शशिकांत शिंदे यांनी आ.महेश शिंदेंवर टीका केली होती. सोमवारी आंदोलन करण्याचा इशारा देखील दिला होता. या टीकेला उत्तर देत असताना आ.महेश शिंदेंनी शशिकांत शिंदे यांची तुलना शोले पिक्चर मधल्या असरानी यांच्याशी केली आहे. यावेळी बोलत असताना ते म्हणाले, शशिकांत शिंदेंना सध्या आंदोलन करण्याशिवाय दुसरा उद्योगच काय आहे. त्यांची अवस्था शोले पिक्चर मधल्‍या असरानीं सारखी झाली आहे.

आधे इधर आधे उधर आणि बाकी मेरे पीछे आओ असे झाले आहे. जिल्ह्याच्या राजकारणातले शशिकांत शिंदे हे असराणी असल्याची खोचक टीका यावेळी महेश शिंदे यांनी केली आहे. गेल्या 25 वर्षे सत्ता आणि जलसंपदा विभागाचे मंत्री असून, सुद्धा ते या भागाचे पाणी प्रश्न सोडवू शकले नाहीत. आता खोटे आरोप करत आहेत. कोरेगाव तालुक्यातील रामोशी वाडी आणि आजूबाजूच्या गावांचा आणि खटाव तालुक्याचा पाणी प्रश्न मीच सोडविणार असल्याचा दावा देखील आ.महेश शिंदे यांनी केला आहे.

हेही वाचा :  











Source link

Sari: हृता दुर्गुळेनंतर अजिंक्य राऊत ‘या’ अभिनेत्रीसोबत झाला रोमँटिक; ‘मला का भासे’ गाणं प्रदर्शित

0
Sari: हृता दुर्गुळेनंतर अजिंक्य राऊत ‘या’ अभिनेत्रीसोबत झाला रोमँटिक; ‘मला का भासे’ गाणं प्रदर्शित


कॅनरस प्रॅाडक्शन प्रस्तुत, डॉ. सुरेश नागपाल, आकाश नागपाल निर्मित या चित्रपटाचे लेखन, संकलन दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्दर्शक अशोका के. एस. यांनी केलं असून रितिका श्रोत्री, अजिंक्य राऊत, पृथ्वी अंबर, मृणाल कुलकर्णी, संजय खापरे, पंकज विष्णू आणि केतकी कुलकर्णी यांच्या या चित्रपटात प्रमुख भूमिका आहेत.



Source link

TDM Movie: कपिल शर्माच्या सेटवरून अनेकदा हाकलंल, तोच ‘पृथ्वीराज’ बनला मराठी चित्रपटाचा नायक!

0
TDM Movie: कपिल शर्माच्या सेटवरून अनेकदा हाकलंल, तोच ‘पृथ्वीराज’ बनला मराठी चित्रपटाचा नायक!


सिनेसृष्टीतल्या कामाची आवड होती म्हणून पृथ्वीराजने पुणे ते मुंबई प्रवास गाठला. मुबईतल्या फिल्मसिटीमध्ये सेटवर होणाऱ्या हालचालींना पाहण्याची उत्सुकता, तिथे होणाऱ्या तांत्रिक घडामोडी, तिथला माहोल आणि अभिनयाची आवड हे सार काही शांत बसू देत नव्हतं, याबाबत बोलताना पृथ्वीराजने सांगितलेला किस्सा ऐकून विश्वास बसणार नाही. हा किस्सा सांगताना पृथ्वीराज म्हणाला की, ‘दोन चारदा कपिल शर्मा शोला प्रेक्षक म्हणून जाण्याचा मी प्रयत्न केला. मात्र, तिथवर पोहोचवणारं माझ्या ओळखीतल कुणी नसल्यानं, मला तिथून हाकलून देण्यात आलं. शेवटी एके दिवशी पुन्हा मी तो सेट गाठला आणि सेटवर काम करणाऱ्या एका काकांना खूप लांबून हा शो बघण्यासाठी आलोय असं सांगितलं. त्यांनाही माझी दया आली असावी, तेव्हा त्यांनी मला त्या शोच्या व्यवस्थापकापर्यंत पोहोचवलं आणि त्याच्या हातापाया पडून मी तो शो लाईव्ह पाहिलाच.’



Source link