Wednesday, July 1, 2026
Home Blog Page 3091

Mahabaleshwar Rain : महाबळेश्वरात ढगफुटीसदृश्य पाऊस, तुफान वाऱ्यासह मुसळधार पाऊस

0


सातारा: महाबळेश्वरमध्ये सध्या ढगफुटीसदृश्य पाऊस सुरू झाला आहे. तुफान वाऱ्यासह मुसळधार पावसाने हजेरी लावल्याने जनजीवन विस्कळीत झाल्याचं चित्र आहे. महाबळेश्वरमध्ये फिरायला आलेल्या पर्यटकांना याचा मोठा फटका बसला आहे. राज्यातही अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसल्याचं चित्र आहे. 

आज सकाळपासूनच महाबळेश्वरमध्ये पावसाचं वातावरण दिसत होतं. त्यात दुपारनंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली. हा पाऊस ढगफुटीसदृश्य असल्याचं दिसून येतंय. अचानक आलेल्या या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालेलं आहे. 

पुढील चार दिवसात राज्यात उष्णतेत मोठी घट

राज्यातील नागरिकांची उकाड्यापासून सुटका होणार आहे. उद्यापासून म्हणजे गुरुवारपासून पुढील चार दिवसात राज्यातील उष्णतेत मोठी घट होणार असून उन्हाळ्यामुळे हैराण झालेल्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. संपूर्ण राज्यातील कमाल तापमानात उद्यापासून पुढील चार दिवस घट होणार आहे. पुढील चार दिवस राज्यभरतील तापमानात मोठी घट होणार असल्याची माहिती पुणे वेध शाळेचे प्रमुख डॉ. के एस होसाळीकर यांनी दिली आहे.

दुसऱ्या बाजूला, गेल्या काही दिवसात पुण्याचे तापमान 40 च्या वर जात आहे. पुण्यात एप्रिल किंवा मे महिन्यात 40 अंश तापमान बऱ्याचदा नोंदी झाल्या आहेत. 40 अंशापेक्षा जास्त तापमान गेल्यावर नागरिकांनी काळजी घ्यावी. दुपारी 12 ते 4 वाजेपर्यंत लोकांनी गरज नसेल तर बाहेर पडू नये असे देखील आवाहन हवामान विभागाने केले आहे. 

कोल्हापुरात उष्णतेचा पारा 39 अंशावर 

कोल्हापूरसारख्या हिरव्यागार जिल्ह्यात उन्हाचा पारा 39 अंशांवर पोहचला आहे. त्यामुळे नागरिकांच्या अंगाची अक्षरशः लाहीलाही होत आहे. घरातून बाहेर पडणे म्हणजे शिक्षा असं समजलं जातं आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी कोल्हापुरात धुक्याची चादर पसरली होती. त्यानंतर चारच दिवसांपूर्वी करवीर तालुक्यातील काही गावात गारांचा पाऊस झाला. मात्र आता कोल्हापूरचे तापमान 39 अंशांवर पोहचले आहे. नागरिकांना चक्कर येणे, धाप लागणे, डोकं दुखणे असे त्रास होऊ लागले आहेत. कामानिमित्त बाहेर येणारे अनेकजण गॉगल आणि कॅपचा वापर करत आहेत.

हिंगोलीत गारांसह पाऊस

हिंगोली जिल्ह्यातील आनेक भागात मंगळवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाची हजेरी लावली आहे. काही भागात तर गारांचा सुद्धा पाऊस झाला आहे. या पावसाने शेतातील पिकांचेसुद्धा मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. शेतातील भाजीपालावर्गीय फळबागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे. 



Source link

Badshah: रॅपर बादशाह मोठ्या अडचणीत; महाकाल मंदिराच्या पुजाऱ्यांनी दिला इशारा! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

0
Badshah: रॅपर बादशाह मोठ्या अडचणीत; महाकाल मंदिराच्या पुजाऱ्यांनी दिला इशारा! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण


या गाण्यामुळे धार्मिक भावना दुखावल्या जात आहेत, असे अनेकांनी म्हटले आहे. गाण्यात एकीकडे अश्लीलता दाखवली जात आहे, तर दुसरीकडे शिवभक्त म्हणून स्वतःचे वर्णन केले जात आहे. मात्र, हे अजिबात सहन केले जाणार नाही, असा इशारा आता बादशहाला देण्यात आला आहे. ‘सनक’ या गाण्यातून ही ओळ ताबडतोब काढून टाकावी आणि शिव भक्तांची माफी मागावी. त्यांनी तसे न केल्यास २४ तासांत त्यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात येईल, असा इशारा बादशहाला देण्यात आला आहे. बादशाहने बॉलिवूड आणि पंजाबी गाण्यांमध्ये आपल्या रॅप गाण्यांनी खास ओळख निर्माण केली आहे. तथापि, बरेचदा रॅपर्स काहीतरी नवीन करण्याच्या नादात वादात अडकतात. आता बादशहा काय करणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.



Source link

Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan: अब्दू रोझिकच सलमान प्रेम; भाईजानच्या चित्रपटासाठी करणार संपूर्ण थिएटर बुक!

0
Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan: अब्दू रोझिकच सलमान प्रेम; भाईजानच्या चित्रपटासाठी करणार संपूर्ण थिएटर बुक!


‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट येत्या २१ एप्रिल रोजी प्रदर्शित होत आहे, ज्यासाठी भाईजानच्या चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आहे. भाईजानच्या चाहत्यांमध्ये ‘बिग बॉस’ फेम अब्दू रोजिक देखील आहे. अब्दू रोजिक याने सलमान खानच्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटासाठी संपूर्ण थिएटर बुक करण्याची घोषणा केली आहे. अब्दू सलमानच्या चित्रपटासाठी संपूर्ण सिनेमा हॉल बुक करणार आहेत. सलमानच्या सोशल मीडिया पोस्टवर कमेंट करत अब्दूने स्वतः याबद्दल सांगितले आहे.



Source link

Viral Video: ‘सिटाडेल’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त झाली प्रियांका; निक जोनासने शेअर केला खास व्हिडीओ!

0
Viral Video: ‘सिटाडेल’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त झाली प्रियांका; निक जोनासने शेअर केला खास व्हिडीओ!


Priyanka Chopra Viral Video: प्रियांका चोप्राची ‘सिटाडेल’ ही मोस्ट अवेटेड वेब सीरीज लवकरच प्रदर्शित होणार आहे. या सीरिजच्या निमित्ताने प्रियांका चोप्रा ओटीटीच्या जगात प्रवेश करणार आहे.



Source link

Tu Chal Pudha: ‘मिसेस इंडिया’ स्पर्धेनंतर अश्विनीला मिळणार मोठी संधी; काय असणार तिचा निर्णय?

0
Tu Chal Pudha: ‘मिसेस इंडिया’ स्पर्धेनंतर अश्विनीला मिळणार मोठी संधी; काय असणार तिचा निर्णय?


अश्विनी वाघमारे ‘मिसेस इंडिया’ ही स्पर्धा जिंकून सगळ्यांसाठीच प्रेरणा ठरली आहे. या स्पर्धेनंतर तिच्याकडे अनेक नव्या संधी चालून येत आहेत. मात्र, अश्विनी या स्पर्धेनंतर आपल्या संसारात आणि रोजच्या जीवनात मग्न झाली आहे. आपला संसार सुरळीत चालवा म्हणून अश्विनीने एक छोटसं ब्युटी पार्लर सुरू केलं होतं. याच ब्युटी पार्लरचा व्यवसाय वाढवा म्हणून आणि स्वतःला सिद्ध करण्यासाठी तिने ‘मिसेस इंडिया’ या स्पर्धेत भाग घेतला होता. हे सगळं करत असताना देखील ती नेहमीच सामान्य गृहिणी म्हणून वावरली.



Source link

दोन पुलांसाठी 1.60 कोटी रुपये मंजूर : खा. उदयनराजे भोसले | पुढारी

0









सातारा; पुढारी वृत्तसेवा :  सातारा शहरातील पश्चिम भागातील दक्षिणोत्तर लांबीचा महत्वाचा रस्ता म्हणून ओळखल्या जाणार्‍या अनंत इंग्लीश स्कूल ते गेंडामाळ नाका या रस्त्यावरील बदामी विहिरीजवळील पुलाचे आणि अर्कशाळेच्या पिछाडीस असणार्‍या पुलांच्या रुंदीकरणासाठी सातारा जिल्हा नियोजनमधून 1 कोटी 60 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. निधीदेखील प्राप्त झाला आहे. या दोन महत्वाच्या पुलांच्या रुंदीकरणाचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल, अशी माहिती खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी दिली.

सातारा शहरातील पश्चिम भागातील दक्षिणोत्तर लांबीचा अनंत इंग्लीश स्कूल ते गेंडामाळ नाका या एक प्रमुख रस्ता ओळखला जातो. या रस्त्यावरील बदामी विहिरीजवळील आणि अर्कशाळा पिछाडीस असलेल्या अस्तित्वातील अरुंद पुलाचे रुंदीकरण करणे गरजेचे आहे, हे लक्षात घेवून माजी उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांनी या दोन्ही पुलांच्या रुंदीकरणाचे प्रस्ताव नियोजन समितीला नगरपरिषदेमार्फत सादर केले होते. नियोजन समितीमधून निधी मंजूर करण्याबाबत आम्ही तसेच किशोर शिंदे यांनी पाठपुरावा केला. तसेच पालकमंत्री ना.शंभुराज देसाई यांनी तसेच सातारा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक अभिजीत बापट आणि स्थापत्य अभियंता अनंत प्रभुणे यांचे सहकार्य मिळाले.

या दोन पुलांच्या रुंदीकरणासह नवीन बांधकामासाठी एकूण 1 कोटी 60 लाख रुपयांचा भरीव निधी नियोजन समितीमधून मंजूर करण्यात येवून, सदरचा निधी नगरपरिषदेकडे वर्ग देखिल करण्यात आला आहे. दरम्यान, या भागातील रहिवाशी यांनी या दोन महत्वाच्या पुलांच्या रुंदीकरणासह नवीन बांधकाम करण्याचे प्रस्ताव नियोजन समितीमधून मंजूर करुन घेतल्याबददल खा. उदयनराजे भोसले, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे आणि संपूर्ण सातारा विकास आघाडीचे आभार व्यक्त करुन अभिनंदन केले आहे.

MP Udayanaraje Bhosale











Source link

खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी 12 पथके; बोगस प्रकार करणार्‍यांचे धाबे दणाणले | पुढारी

0









सातारा; पुढारी वृत्तसेवा :  खरीप हंगामातील विविध पिकांसाठी आवश्यक रासायनिक खते व बियाण्यांचा मुबलक साठा जिल्ह्यात उपलब्ध आहे. रासायनिक खतांची कृत्रिम टंचाई निर्माण करुन खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हयात 12 भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. त्यामुळे बोगस प्रकार करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, शेतकर्‍यांनी कृषि सेवा केंद्र चालकांकडून खरेदीची पक्की बिले घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र 3 लाख 97 हजार 348 हेक्टर आहे. यासाठी 47 हजार 339 क्विंटल बियाणांची मागणी नोंदवण्यात आली आहे. त्यासाठी 1 लाख 36 हजार 500 मेट्रीक टन रासायनिक खतांची मागणी कृषि आयुक्तालयाकडे केली आहे. कृषी आयुक्तालयाकडून जिल्ह्याच्या खरीप हंगामासाठी 1 लाख 15 हजार 101 मेट्रिक टन रासायनिक खत व 54 हजार 770 नॅनो युरिया बॉटलचे आवंटन मंजूर झाले आहे. यामध्ये युरिया 42 हजार 521 मे. टन, डीएपी 12 हजार 131 मे.टन, एमओपी 6 हजार 761 मे.टन, सुपर फॉस्फेट 11 हजार 939 मे.टन तर इतर संयुक्त खते 39 हजार 19 मे.टन खतांचा समावेश आहे. याबाबतची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे व जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी विजय माईनकर यांनी दिली.

सद्यस्थितीत जिल्ह्यात 63 हजार 561 मे.टन खत उपलब्ध आहे. यामध्ये मागील हंगामातील 55 हजार 862 मे.टन खत शिल्लक असून दि.1 एप्रिल पासून 7 हजार 699 मे.टन खत पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे युरिया 18 हजार 943 मे.टन, डीएपी 9 हजार 119 मे.टन, एमओपी 834 मे.टन, सुपर फॉस्फेट 9 हजार 798 मे.टन, इतर संयुक्त खते 24 हजार 867 मे. टनचा उपलब्ध आहेत. रासायनिक खतांचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्ह्यात 12 भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. प्रत्येक तालुका व जिल्हास्तरावर सनियंत्रण कक्षाची स्थापन केली आहे. कृषी सेवा केंद्र चालकांनी शेतकर्‍यांना खते बियाणे व कीटकनाशके खरेदीची पक्की बिले द्यावीत, अशा सूचना करण्यात आल्या आहेत.

खत उपलब्धता माहितीसाठी कृषिक अ‍ॅप

आपल्या जवळपासच्या कृषी सेवा केंद्रातील खत उपलब्धतेची माहिती पाहण्यासाठी कृषी विभागाने कृषिक अ‍ॅपच्या माध्यमातून सेवा उपलब्ध केलेली आहे. हे कृषिक अ‍ॅप गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध असून शेतकरी बांधवांनी हे अ‍ॅप डाऊनलोड करून खत उपलब्धतेच्या सेवेचा लाभ घ्यावा, असे अवाहन कृषी विकास अधिकारी विजय माईनकर यांनी केले आहे.











Source link

सातार्‍यातील नेत्याकडूनच मेडिकल कॉलेजचे काम बंद : आ. शिवेंद्रराजे | पुढारी

0


सातारा; पुढारी वृत्तसेवा :  सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीत घोटाळा झालाय, असं सांगणार्‍या खासदारांनी त्यावेळच्या चौकशीचे काय झालं, हे सांगावं. सातारा शहरातील नेत्याच्या सांगण्यावरूनच मेडिकल कॉलेजचे काम बंद पाडण्यात आले. खिंडवाडीतील खाणीचा खाणपट्टा मंजूर नसून बेकायदा सुरू असलेल्या या खाणीच्या चौकशीची मागणी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. या खाणीवर खासदारांनी बोलावे. ‘मी नाय त्यातली अन् कडी लाव आतली’, असा काही जणांमध्ये प्रकार आहे, असे टीकास्त्र आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी पत्रकार परिषदेत सोडले.

मंगळवारी आ. शिवेंद्रराजे यांनी जिल्हाधिकार्‍यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. आ. शिवेंद्रराजे म्हणाले, सातारा मेडिकल कॉलेजच्या कामाला संरक्षण मिळणे आवश्यक आहे. काही दिवसांपूर्वी शहरातील राजकीय नेत्यांच्या सांगण्यावरून कार्यकर्त्यांनी काम बंद पाडले. त्यामागचा हेतू काय होता, हे कळत नाही. ठेकेदाराची हॅरेशमेंट होऊ नये आणि आर्थिक मागणीचा प्रकार असेल किंवा राजकीय हेतूने आडकाठी आणली जात असेल तर ते चुकीचे आहे. खिंडवाडी येथील खाणीतून बेकायदा उत्खनन सुरू आहे. या खाणीचा खाणपट्टा मंजूर नाही, रॉयल्टी भरलेली नसून याप्रकरणाची चौकशी करावी. जिल्हा बँकेला ईडीची नोटीस आली, भ्रष्टाचार झालाय का, असे विचारले असता आ. शिवेंद्रराजे म्हणाले, ईडीची नोटीस आली नाही; पण माहिती घेऊन गेले होते. त्याचवेळी हा विषय संपला. खिंडवाडीत सुरू असलेल्या बेकायदा उत्खननाबाबत खासदारांनी बोलावे. बोलायचं भरपूर पण काम करण्याचा प्रकार वेगळा आहे. सातार्‍यातील काही लोकांमध्ये मराठीतील म्हणीप्रमाणे, ‘मी नाय त्यातली आणि कडी लाव आतली,’ असा प्रकार सुरू आहे. मेडिकल कॉलेजचे काम रखडवू नये याचा विचार लोकप्रतिनिधींनी करायला हवा.

बाजार समितीच्या प्रस्तावित इमारतीबाबत विचारले असता आ. शिवेंद्रराजे म्हणाले, खिंडवाडीतील 17 एकर जागेवर सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीचे नियोजन आहे. ही जागा परत मिळावी, असा काही लोकांचा प्रयत्न होता. प्लॉट पाडून कोट्यवधी रूपये मिळवण्याचा प्रयत्न होता पण आम्ही त्यांना साथ दिली नाही. त्यामुळे काही नेतेमंडळी नाराज होवून बाजूला गेली. निवडणुकीनंतर प्लॅन तयार करणार आहे. जागा परत दिली नाही म्हणून मनोमीलन तुटले का?, हे त्यांनाच विचारायला हवे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

खा. उदयनराजे यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांच्याही गाठीभेटी घ्यायला सुरूवात केली आहे, असे विचारले असता आ. शिवेंद्रराजे म्हणाले, गेली 15 वर्षे खासदार म्हणून कुणाला निवडून दिले, हे लोकांना या निमित्ताने कळेल. गाठीभेटी घेणे, मिठ्या मारण्याची वेळ निघून गेली आहे. पाणी पुलाखालून नाहीतर पूलच पाण्यात गेला आहे. गाठीभेटीचा काहीही परिणाम लोकांवर होणार नाही. केविलवाणा प्रयत्न सुरू आहे. त्यांनी सगळीकडे फिरावे, असा सल्लाही त्यांनी दिला. यावेळी माजी जि. प. सदस्य राजू भोसले, फिरोज पठाण, विक्रम पवार, सौरभ शिंदे, विरेंद्र शिंदे आदि उपस्थित होते.

कोर्टाच्या निकालावर विश्वास नाही का?

बाजार समितीबाबत बोलताना आ. शिवेंद्रराजे म्हणाले, मार्केट कमिटीच्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून दंगा करत त्यांनी त्यांच्या लोकांचे राजीनामे घेतले आणि बाहेर पडले. त्यांनी त्यावेळी मागणी केलेल्या चौकशीचे काय झाले? कोर्टाचा निकाल मनवे यांच्या बाजूने लागला आहे. खा. उदयनराजे मनवेबद्दल बोलत असतील, तर त्यांचा कोर्टाच्या निकालावर विश्वास नाही का? तसे नसेल तर त्यांनी निकाल कसा दिला, याचा जाब कोर्टाला विचारावा. कोर्टाच्या निकालानंतर मनवे यांना कामावर हजर करून घेतले. खासदार कोर्टापेक्षा वर आहेत का? ते म्हणतील तेच खरं का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.



Source link

महाराणी ताराराणींची समाधी वाळूच्या ढिगार्‍याखाली; ‘पुरातत्व’च्या दुर्लक्षाने अस्तित्व धोक्यात | पुढारी

0









खेड; अजय कदम :  हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची धाकटी सून महाराणी ताराराणी यांची संगममाहुली येथील समाधी वाळूच्या ढिगार्‍यात लोप पावली आहे. अनेकदा याबाबत आवाज उठवूनही या समाधीच्या जीर्णोध्दारासाठी ठोस प्रयत्न न झाल्याबद्दल इतिहासप्रेमींनी नाराजी व्यक्त केली आहे. ऐतिहासिक पाऊलखुणा काळाच्या पडद्याआड जात असताना पुरातत्व विभाग झोपला आहे का? अशा संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांचे धाकटे पुत्र छत्रपती राजाराम महाराज यांचा विवाह 1684 मध्ये तळबीड, ता. कराड येथील सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या ताराराणी यांच्याशी झाला. 9 जून 1696 ला त्यांना झालेल्या मुलाचे नाव शिवाजी ठेवण्यात आले. 2 मार्च 1700 रोजी राजाराम महाराजांचे निधन झाले. त्यानंतर 7 वर्षे छत्रपती ताराराणी यांनी स्वराज्याची सुत्रे हाती घेऊन औरंगजेबाला कडवी झुंज दिली.

1713 मध्ये कोल्हापूर येथे करवीर छत्रपती गादीची स्थापना केली. 1714 मध्ये सावत्र पुत्र संभाजी महाराजांनी त्यांच्याकडून सत्ता काढून घेतली. त्यानंतर महाराणी ताराराणी यांना येथील अजिंक्यतारा किल्ल्यावर रहावे लागले. तेथेच त्यांचे 10 डिसेंबर 1761 ला निधन झाले. संगममाहुली येथील कृष्णा – वेण्णा संगमावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करून तेथे त्यांची समाधी बांधण्यात आली.











Source link

The Song Of Scorpions : इरफान खानला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी; बाबीलने शेअर केला ट्रेलर!

0
The Song Of Scorpions : इरफान खानला पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी; बाबीलने शेअर केला ट्रेलर!


दिवंगत अभिनेता इरफान खान याचा मुलगा बाबील खान याने या चित्रपटाची झलक सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केली आहे. ‘द साँग ऑफ स्कॉर्पिअन’ या चित्रपटात इरफानने एका उंट व्यापाऱ्याची भूमिका केली आहे. इरफानने साकारलेला हा व्यापारी नूरन नावाच्या मुलीच्या प्रेमात पडतो. नूरन एक स्वतंत्र मुलगी आहे आणि तिची आजी झुबेदा यांच्याकडून ‘साँग ऑफ स्कॉर्पिअन’ ही प्राचीन उपचार कला शिकत आहे. एका प्रचलित दंतकथेनुसार, जर एखाद्या विंचूने एखाद्याला दंश केला, तर व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. परंतु, या साँग ऑफ स्कॉर्पिअन गाऊन गायक त्या व्यक्तीला बरे करू शकतो.



Source link