Wednesday, July 1, 2026
Home Blog Page 3090

Hemant Dhome: हेमंत ढोमेने अशोक मामांचे गाणे केले रिक्रिएट, पाहा व्हिडीओ

0
Hemant Dhome: हेमंत ढोमेने अशोक मामांचे गाणे केले रिक्रिएट, पाहा व्हिडीओ


‘फकाट’ या चित्रपटाचे दिग्दर्शक श्रेयश जाधव करत असून नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर करण्यात आले. येत्या १९ मे रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या पोस्टरमध्ये हेमंत ढोमे, सुयोग गोऱ्हे, अविनाश नारकर, कबीर दुहान सिंग, अनुजा साठे, रसिका सुनील, नितीश चव्हाण, किरण गायकवाड आणि महेश जाधव हे कलाकार दिसत आहेत. दमदार कलाकारांची फळी असलेला हा एक अ‍ॅक्शन कॉमेडी चित्रपट आहे.



Source link

TMKOC: ‘तारक मेहता’च्या निर्मात्यांविरोधात शैलेश लोढाने पोलिसात केली तक्रार, काय आहे प्रकरण?

0
TMKOC: ‘तारक मेहता’च्या निर्मात्यांविरोधात शैलेश लोढाने पोलिसात केली तक्रार, काय आहे प्रकरण?


यापूर्वी एका मुलाखतीमध्ये मालिकेचे निर्माते असित मोदी यांना कलाकारांच्या पैशांबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी ते म्हणाले होते की, ‘आम्ही कलाकारांना पैसे दिले नाहीत, असे जे म्हटले जात आहे, ते अतिशय चुकीचे आहे. एखाद्याच्या मेहनतीचे पैसे घेऊन मी काय करू? देवाच्या दयेने माझ्याकडे सगळं काही आहे. लोकांचं माझ्यावर भरपूर प्रेम आहे. मी लोकांना पैसे दिले नाहीत, असं काहीही नाही.’



Source link

Raavrambha: ‘रावरंभा’मध्ये संतोष जुवेकरची वर्णी, दिसणार ‘या’ भूमिकेत

0
Raavrambha: ‘रावरंभा’मध्ये संतोष जुवेकरची वर्णी, दिसणार ‘या’ भूमिकेत



Raavrambha: १२ मे ला ‘रावरंभा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटातील कलाकार पाहाता कलाकारांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे.



Source link

Aaradhya Bachchan: आराध्या बच्चन संदर्भातील याचिकेवर उच्च न्यायालयाची सुनावणी

0
Aaradhya Bachchan: आराध्या बच्चन संदर्भातील याचिकेवर उच्च न्यायालयाची सुनावणी


दिल्ली उच्च न्यायालयात न्यायाधीश सी हरीशंकर यांच्या समोर आज २० एप्रिलला या याचिकेवर सुनावणी पार पडली. न्यायाधिशांनी संबंधित यूट्यूब चॅनेलला आराध्याबद्दलच्या आक्षेपार्ह कंटेन्ट हटवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच आराध्याच्या शारीरिक व मानसिक आरोग्याबद्दल खोटे दावे करणारे सर्व व्हिडीओ व मजकूर काढून टाकण्यास सांगितले आहे.



Source link

Chauk: ‘एकच गेम वाजवणार, आख्खा जिल्हा गाजवणार’, ‘चौक’चा टीझर प्रदर्शित

0
Chauk: ‘एकच गेम वाजवणार, आख्खा जिल्हा गाजवणार’, ‘चौक’चा टीझर प्रदर्शित



Chauk Teaser: सध्या सगळीकडे एकाच चित्रपटाची चर्चा सुरू आहे, तो म्हणजे देवेंद्र गायकवाड दिग्दर्शित ‘चौक.’ या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.



Source link

सातारा : वडिलांचा खून करून मृतदेहाची लावली विल्हेवाट; मुलाला अटक | पुढारी

0









कराड: पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्‍ल्‍हातील कोपर्डे हवेली येथे वडिलांना लाकडाने मारहाण करून मुलाने खून केला. त्यानंतर मृतदेहाची विल्हेवाटही लावली. ही घटना मंगळवारी रात्री दीडच्या सुमारास घडली. पोलिसांनी मुलाला अटक केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, तानाजी लक्ष्मण होवाळ (वय 65, रा. कोपर्डे हवेली, ता. कराड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. तर अभिजीत तानाजी होवाळ असे मुलाचे नाव असून पोलिसांनी त्‍याला अटक केली आहे. तानाजी होवाळ पत्नी, मुलगी, व मुलगा यांच्यासह कोपर्डे हवेली येथे राहत होता. त्याला दारूचे व्यसन होते. सोमवार दिनांक 17 रोजी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास अभिजीत हा त्यांच्या घराच्या बाहेरील बाजूस उभा राहून कोणालातरी फोन वरून वडीलांना मी मारले आहे आणि आता मी मुंबईला जात आहे, असे बोलत होता. हे त्‍याचे बोलणे एका इसमाने ऐकले.

दरम्‍यान, इसमाने याबाबत माहिती दिल्‍यानंतर हे खरे आहे का पाहण्यासाठी लोक गेले तर त्‍यावेळी लक्ष्मण होवाळ मयत झाल्याचे व त्यांच्या अंगावर चादर टाकल्याचे समोर आले. त्या चादरीवरती प्रमाणात रक्ताचे डाग पडलेले होते. मुलाबाबत इसमाने कराड तालुका पोलिसांना माहिती दिली. माहितीवरून पोलिसांनी मुलाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्‍याने वडीलांना मारल्‍याचे कबूल केली. कबुनीनंतर त्‍याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.

.हेही वाचा 

आकाशातून पाहता येणार सागरी किल्ले आणि समुद्रकिनारे

पिंपरी : मोकाट कुत्र्यांच्या उपद्रवप्रकरणी मानवी हक्क आयोगात दावा दाखल

पोलिस दलात महासंचालकांच्या पाच पदांसह 42 पदे रिक्तच











Source link

Sari : मृणाल कुलकर्णीच्या प्रेमाच्या ‘सरी’चा ट्रेलर प्रदर्शित

0
Sari : मृणाल कुलकर्णीच्या प्रेमाच्या ‘सरी’चा ट्रेलर प्रदर्शित


अशोका के. एस. दिग्दर्शित या चित्रपटात अजिंक्य राऊत, रितिका श्रोत्री, पृथ्वी अंबर आणि मृणाल कुलकर्णी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. कॅनरस प्रॉडक्शन प्रस्तुत, डॉ. सुरेश नागपाल, आकाश नागपाल निर्मित हा चित्रपट येत्या ५ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.



Source link

Pamela Chopra : निर्माते आदित्य चोप्रा यांची आई, प्रसिद्ध गायिका पामेला चोप्रा यांचं निधन

0
Pamela Chopra : निर्माते आदित्य चोप्रा यांची आई, प्रसिद्ध गायिका पामेला चोप्रा यांचं निधन


Pamela Chopra Passes Away : कभी कभी, सिलसिला, काला पत्थर, चाँदनी अशा अनेक सुपरहिट चित्रपटांतील गाण्यांना आवाज देणाऱ्या प्रसिद्ध पार्श्वगायिका व निर्माते आदित्य चोप्रा यांच्या आई पामेला चोप्रा यांचं आज निधन झालं. वयाच्या ७४ व्या वर्षी पामेला यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात निर्माता आदित्य चोप्रा व अभिनेता उदय चोप्रा ही दोन मुलं व सून अभिनेत्री राणी मुखर्जी असा परिवार आहे.



Source link

सातारा : इन्स्टाग्रामवरील ओळखीनंतर अल्पवयीन मुलीवर अत्याचार | पुढारी

0









सातारा; पुढारी वृत्तसेवा : इन्स्टाग्रामवरून ओळख झाल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यातील युवकाने सातार्‍यात येऊन अल्पवयीन मुलीवर वेळोवेळी अत्याचार केले. हा अत्याचार सातारा शहरातील कॅफे, हॉटेलमध्ये झाला आहे. याप्रकरणी संकेत मेंगाणे (वय 19, मूळ रा. मेंगाणेवाडी ता. पन्हाळा, सध्या रा. शिक्रापूर, जि. पुणे) याच्याविरुद्ध शाहूपुरी पोलिस ठाण्यात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, संशयिताने फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना फेब्रुवारी ते 13 एप्रिल 2023 या कालावधीत घडली आहे. पीडित मुलगी 14 वर्षांची अल्पवयीन आहे. संशयित युवकाची पीडित मुलीसोबत इन्स्टाग्रामवर ओळख झाली. या ओळखीतून युवकाने तिला सातार्‍यातील एका शाळेजवळ भेटायला येत असल्याचे सांगितले.

पहिली भेट झाल्यानंतर संशयित युवकाने त्या भेटीचा व्हिडीओ व फोटो काढला. पुन्हा त्यानंतर संशयिताने सातार्‍यात भेटायला येवून मुलीला कॅफेमध्ये नेऊन तिचा जबरदस्तीने विनयभंग केला. याबाबतची माहिती कोणाला सांगितल्यास काढलेले फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी त्याने मुलीला दिली. यामुळे मुलगी घाबरली. याचाच गैरफायदा पुढे युवकाने घेतला. मुलगी अल्पवयीन आहे, हे माहित असतानाही संशयित युवकाने तिला सातार्‍यातील कॅफे, हॉटेल येथे नेऊन तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले. या कृत्यामुळे मुलगी घाबरल्याची बाब पालकांच्या लक्षात आली. तिला विश्वासात घेऊन बोलते केले असता तिने कुटुबीयांना घडत असलेल्या घटनेची माहिती दिली. त्यानुसार पालकांनी पोलिस ठाण्यात जावून तक्रार दिल्यानंतर युवकाविरुध्द बालकांचा लैंगिक अत्याचार (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.











Source link

इन्स्टावर ओळख अन् ब्लॅकमेल करत अल्पवयीन मुलीवर अत्याचार, कोल्हापूरच्या तरुणाला बेड्या 

0


Kolhapur Crime : सोशल मीडिया प्लॅटफाॅर्म इन्स्टावरून अल्पवयीन मुलीशी ओळख केल्यानंतर ब्लॅकमेल करून तीनवेळा अत्याचार केल्याप्रकरणी कोल्हापुरातील तरुणाला साताऱ्यात बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. संकेत मेंगणे (वय 19, रा. मेंगणेवाडी, ता. पन्हाळा, जि. कोल्हापूर, सध्या रा. शिक्रापूर, जि. पुणे) असे सातारा पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत तरुणाने पीडित मुलीवर अत्याचार केल्याचे पोलिसांनी सांगितले. संबंधित पीडित मुलगी 14 वर्षाची असून सध्या नववीत शिकत आहे. याप्रकरणी त्या तरुणावर सातारमधील शाहूपुरी पोलिस ठाण्यात पोक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित मुलीची आणि संकेतची इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. ओळख झाल्यानंतर  एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये संकेत हा पीडित मुलीला भेटण्यासाठी तिच्या शाळेजवळ आला. यावेळी त्याने त्या मुलीचे फोटो काढले होते. फोटो काढून तो पुण्याला गेल्यानंतर पुन्हा 13 एप्रिल रोजी साताऱ्यात गेला. यावेळी त्याने त्या मुलीला तुझे फोटो व्हायरल करेन, अशी धमकी देऊन तिला शहरातील एका हाॅटेलमध्ये नेत अत्याचार केला. त्यानंतर त्याने आणखी दोन ठिकाणी नेत अत्याचार करत पुण्याला गेला. 

मुलीने दिली आईला माहिती 

सलग अत्याचार केल्याने घाबरलेल्या मुलीने घडलेला प्रकार आईला सांगितला. आईने मुलीकडून माहिती घेत पोलिस स्टेशनला धाव घेतली. आईने मुलीसोबत घडलेल्या प्रसंगाची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी मंगळवारी संकेत मेंगणेवर ‘पाॅक्सो’अन्वये गुन्हा दाखल केला. शाहूपुरी पोलिसांनी शिक्रापूरमधून पोलिसांनी संकेतला ताब्यात घेत अटक केली.

डॉक्टरकडून विवाहित महिलेचा विवस्त्र व्हिडिओ करण्याचा प्रकार

दरम्यान, महिलेच्या असहाय्यतेचा फायदा घेत डाॅक्टरकडून विवस्त्र व्हिडिओ करण्याचा प्रकार कोल्हापुरात घडला होता. महिला पीडिताने तक्रार दिल्यानंतर डॉ. प्रशांत लक्ष्मण कनुजे या संशयिताविरोधात गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेला डाॅक्टर शिरोळ तालुक्यामधील आहे. विवाहितेच्या आर्थिक असहाय्यतेचा गैरफायदा घेत शिरोळ तालुक्यातील एका डॉक्टराने तिला गोकुळ शिरगाव (ता करवीर) येथील एका हॉटेलमध्ये नेऊन लैंगिक अत्याचार केले. त्यानंतर पीडितेचे अश्लील फोटो व व्हिडीओ तयार करण्याचा प्रकार घडला. त्यामुळे पीडितेकडून पोलिसांकडे धाव घेत तक्रार दिली.

इतर महत्वाच्या बातम्या 



Source link