Wednesday, July 1, 2026
Home Blog Page 3089

Aai Kuthe Kay Karte: अरुंधती आणि आशुतोषचं गोड संभाषण, मालिकेत रोमँटिक ट्रॅक

0
Aai Kuthe Kay Karte: अरुंधती आणि आशुतोषचं गोड संभाषण, मालिकेत रोमँटिक ट्रॅक


सध्या ‘आई कुठे काय करते’ मालिकेतील रोमँटिक ट्रॅक पाहून चाहते आनंदी झाले आहेत. अरुंधतीला योग्य वागणून आणि प्रेम मिळत असल्याचे पाहून प्रेक्षक खूश झाले आहेत. मात्र देशमुख कुटुंबात मोठे वादळ आले आहेत. संजना आणि अनिरुद्ध यांच्यामध्ये सतत वाद होत आहेत. तर ईशाच्या लग्नामुळे घरातील वातावरण बदलले आहे. तिच्या लग्नाला अभी आणि यश सोडून सर्वांचा नकार असल्याचे दिसते.



Source link

Urvashi Rautel: ऋषभ पंतचा उल्लेख होताच उर्वशीने बदलले फोटोचे कॅप्शन, जाणून घ्या काय होती पोस्ट?

0
Urvashi Rautel: ऋषभ पंतचा उल्लेख होताच उर्वशीने बदलले फोटोचे कॅप्शन, जाणून घ्या काय होती पोस्ट?


काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, उर्वशी आणि ऋषभ हे रिलेशनशीपमध्ये होते. मात्र त्यांचे नाते फार काळ टिकले नाही. उर्वशीने सोशल मीडियावर अनेकदा केलेल्या पोस्टमध्ये आरपीचा उल्लेख केला होता. त्यामुळे अनेकांना त्यांच्या रिलेशनबाबत कल्पना होती. पण त्यांनी कधीही उघडपणे यावर प्रतिक्रिया दिली नाही.



Source link

Twitter Blue Tick: ट्विटरने बिग बी, रजनीकांतसह या कलाकारांच्या अकाऊंटची ब्लूट टिक हटवली

0
Twitter Blue Tick: ट्विटरने बिग बी, रजनीकांतसह या कलाकारांच्या अकाऊंटची ब्लूट टिक हटवली


ब्लू टिक हटवलेल्या अकाऊंटच्या यादीमध्ये क्रिकेटपटू विराट कोहली, क्रिकेटर रोहित शर्मा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, महेंद्रसिंग धोनी, विजय, रजनीकांत यांचा समावेश आहे. आता हे सर्वजण ब्लू टिकसाठी पैसे भरणार का तसच ठेवणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.



Source link

Twitter Review: “भाईजानच्या एन्ट्रीला शिट्ट्या”, जाणून घ्या कसा आहे ‘किसी का भाई किसी की जान’

0
Twitter Review: “भाईजानच्या एन्ट्रीला शिट्ट्या”, जाणून घ्या कसा आहे ‘किसी का भाई किसी की जान’


सलमान खानच्या यंदा रिलीज होणाऱ्या ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटाकडून प्रेक्षकांना भरपूर अपेक्षा होत्या. परंतु, एकंदरीत सध्याचं चित्र पाहता, या अपेक्षा कितपत पूर्ण होऊ शकतील यात शंकाच आहे. सलमान खानचा ‘किसी का भाई किसी की जान’ हा चित्रपट २१ एप्रिलला थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. फरहाद सामजी दिग्दर्शित या चित्रपटात सलमान खान व्यतिरिक्त पूजा हेगडे, शहनाज गिल, व्यंकटेश दग्गुबाती, सिद्धार्थ निगम, राघव जुयाल, पलक तिवारी आणि जस्सी गिल महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.



Source link

Dream Girl 2: ‘ड्रीम गर्ल २’मध्ये सलमान सांगणार अविवाहित असण्यामागचे कारण? मजेशीर टीझर चर्चेत

0
Dream Girl 2: ‘ड्रीम गर्ल २’मध्ये सलमान सांगणार अविवाहित असण्यामागचे कारण? मजेशीर टीझर चर्चेत


ड्रीम गर्ल या आयुषमान खुरानाच्या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती. त्यानंतर आता ड्रीम गर्ल २ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट ७ जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचा टीझर पाहाता चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता पाहायला मिळते.



Source link

Poster Boys 2: ‘दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं’, श्रेयस तळपदेचा ‘बॉईज २’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला

0
Poster Boys 2: ‘दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं’, श्रेयस तळपदेचा ‘बॉईज २’ येणार प्रेक्षकांच्या भेटीला


‘आले रे पोश्टर बॉईज २’चे पोस्टर पाहता यात तिघे बॉईज लंडनच्या रॉयल गार्डच्या रूपात दिसत आहेत. त्यामुळे यावेळी हे बॉईज लंडनमध्ये काहीतरी धुमाकुळ घालणार आहेत, हे नक्की ! त्यांच्या हातात असलेल्या पोस्टरमध्ये ‘फुल्ल बॉडी मसाज, कॉल डॉली’ असे लिहिलेले दिसत आहे, म्हणजे हे नेमकं काय प्रकरण आहे? आणि ‘दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं’, या उक्तीनुसार कोणाची फसवणूक होणार आहे का, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांना थोडी प्रतीक्षा करावी लागणार आहे. श्रेयस तळपदे, एएनडब्लू स्टुडिओज आणि विरांगना फिल्म्स प्रस्तुत या चित्रपटाचे अविनाश वडगावकर, सेजल शिंदे आणि दिप्ती तळपदे निर्माते असून अमित भानुशाली सहनिर्माते आहेत. हितेश मोडक यांचे संगीत लाभलेल्या या चित्रपटाला डॉ. सुधीर निकम यांची पटकथा आणि संवाद लाभले आहेत.



Source link

गौतम अदानींबाबत पंतप्रधानांनीच उत्तर द्यावे : पृथ्वीराज चव्हाण | पुढारी

0









कराड; पुढारी वृत्तसेवा : अदानींबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गंभीर आरोप झाले आहेत. त्यामुळे अदानींबाबत पंतप्रधानांनीच उत्तर द्यावे, असे सांगत माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी शरद पवार व अदानी यांच्या भेटीबाबत मी काहीही बोलू शकत नाही, असे सांगितले.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार यांची गौतम अदानी यांनी भेट घेतली. त्यांच्यामध्ये सुमारे दोन तास प्रदीर्घ चर्चा झाली. याबाबत आ. पृथ्वीराज चव्हाण यांना विचारले असता कोण कुणाला भेटले याबाबत मी काय बोलणार? त्यांचे जुने संबंध असून सहकार्य घेण्यासाठी ते भेटले असतील. त्याबाबत मी काही बोलू शकणार नाही. अदानींबाबतचे आमचे प्रश्न कायम आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे अदानींनी नाही तर पंतप्रधानांनी दिली पाहिजेत. कारण आरोप त्यांच्यावर झाले आहेत. राहुल गांधी व केजरीवाल यांनी पंतप्रधानांवर गंभीर आरोप केले आहेत. त्यांची उत्तरे त्यांनाच द्यावी लागतील. पैसे कोणाचे याबाबत काहीही उत्तर आले नाही. आत्ता सांगितले जाते की कंपन्या विकून मी पैसे गोळा केले आहेत. मग बेनामी कंपन्यांच्या माध्यमातून परदेशात पैसे का गुंतवले? भारतात का गुंतवले नाहीत, असा प्रश्न निर्माण होतो.

ज्याच्यावर गंभीर आरोप आहे तो त्यातून बाहेर पडण्यासाठी कोणालाही भेटू शकतो. त्यामध्ये वावगे मानण्याचे काही कारण नाही. कुठून तरी आपल्याला मदत व्हावी म्हणून तो प्रयत्न करत असतो. वीस हजार कोटी कोणाचे आहेत? याबाबत प्रधानमंत्र्यांवर थेट आरोप झाले आहेत. त्यामुळे त्याची उत्तरेही त्यांना द्यावी लागतील. ते शरद पवार किंवा अदानी हे देऊ शकणार नाहीत. प्रश्न भटकवण्यासाठी इतर गोष्टी सुरू आहेत, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

कोण कुणाला भेटलं याबाबत आम्हाला काहीही देणे-घेणे नाही. महाराष्ट्रातील जनता सुज्ञ आहे. ते सुरू असलेल्या सर्व प्रकार बघते आहे. त्यामुळे यावर महाराष्ट्रातील जनता जो काही निष्कर्ष काढायचा असेल तो काढेल, असेही त्यांनी सांगितले.











Source link

सातारा : सराईत टोळीकडून 64 तोळे सोने जप्त | पुढारी

0


सातारा; पुढारी वृत्तसेवा :  सातारा जिल्ह्यात दरोडा, जबरी व घरफोड्या करणार्‍या टोळीचा पोलिस दलाने पर्दाफाश करत, चोरीतील 35 लाख 84 हजार रुपये किमतीचे तब्बल 64 तोळे सोने जप्त केले. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली असून, संशयित सराईत चोरटे आहेत. एसपी समीर शेख यांच्या मार्गदर्शनाखाली झालेली पोलिसांची ही रेकॉर्डब्रेक कामगिरी ठरली आहे.

चांद ऊर्फ सूरज जालिंधर पवार (वय 22, रा. काळज), पृथ्वीराज युरोपियन शिंदे (वय 25, रा. ठाकुरकी), चिलम्या ऊर्फ संदीप महावीर ऊर्फ माळव्या शिंदे (वय 22, रा. सुरवडी, सर्व ता. फलटण) अशी संशयितांची नावे असून, आणखी तीन संशयितांचा शोध सुरू आहे. सातारा मुख्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी याची माहिती दिली.

लोणंद पोलिस ठाण्यातील गंभीर गुन्ह्याबाबतचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग करत होते. गेली आठ दिवस चांद उर्फ सुरज पवार याचा पोलिस शोध घेत होते. तो काळज गावच्या हद्दीतील बडेखान या ठिकाणासह इतर ठिकाणी असल्याची माहिती पोलिसांना होती. पोलिसांनी त्याला पकडल्यानंतर त्याने साथीदारांसोबत दरोडा, जबरी चोरी, घरफोड्या केल्याची कबुली दिली. त्यानुसार पोलिसांनी पथके तयार करुन इतर संशयितांची धरपकड केली. न्यायालयाने त्यांना 5 दिवस पोलिस कोठडी दिली.

संशयितांची पोलिस कोठडी मिळाल्यानंतर एक-एका गुन्ह्यांची उकल करण्यास सुरुवात झाल्यानंतर चोरट्यांनी दिलेल्या माहितीने पोलिसही हादरुन गेले. कारण एकामागून एक अशा प्रकारे 21 गुन्ह्यांची कबुली दिली. संशयितांनी दिलेल्या कबुली नंतर खातरजमा करत पोलिसांनी मुद्देमाल जप्त करण्यास सुरुवात केली. त्यानुसार पहिल्या गुन्ह्यातील मुद्देमालापैकी 46 हजार 200 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, गुन्हयात वापरलेले हत्यार कोयता हस्तगत केला. त्यानंतर पुढे आणखी 20 गुन्ह्यातील एकूण 64 तोळे सोन्याचे दागिने, रोख रक्कम, अर्धा किलो चांदीचे दागिने, गुन्हयात वापरलेली मोटार सायकल असा एकूण 36 लाख 74 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि अरुण देवकर, सपोनि संतोष पवार, रविंद्र भोरे, विजय जाधव, फौजदार विश्वास शिंगाडे, अमित पाटील, पोलिस तानाजी माने, विजय कांबळे, साबीर मुल्ला, मंगेश महाडीक, दिपाली यादव, मोहन नाचण, राजकुमार ननावरे, अमोल माने, मुनीर मुल्ला, अजित कर्णे, स्वप्नील माने, केतन शिंदे, मोहसिन मोमीन, मयुर देशमुख, सचिन ससाणे, पंकज बेसके, गणेश कचरे, राजू कुंभार, अजय जाधव, अमित झेंडे, ज्योती शिंदे, महेश पवार यांनी ही कारवाई केली.

सहा महिने… दीड किलो सोने जप्त…

समीर शेख यांनी सातारा जिल्ह्याचा कार्यभार घेऊन सहा महिने झाले आहेत. आतापर्यंत त्यांनी रेकॉर्डब्रेक कामगिरींचा सपाटाच लावला आहे. नोव्हेंबर 2022 पासून दरोडा, जबरी चोरी, घरफोडी, मोटारसायकल चोरी, इतर चोरी असे एकूण 67 गुन्हे उघडकीस आणले आहेत. गुन्ह्यातील चोरीस गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांपैकी 153 तोळे सोने अर्थात दीड किलो सोन्याचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. हा सर्व मुद्देमाल 1 कोटी 33 लाख 76 हजार 830 एवढ्या किमतीचा आहे.



Source link

Aai Kuthe Kay Karte: अनिशचे आई-बाबा येणार म्हणून अनिरुद्ध चिडला, मालिका रंजक वळणावर

0
Aai Kuthe Kay Karte: अनिशचे आई-बाबा येणार म्हणून अनिरुद्ध चिडला, मालिका रंजक वळणावर


‘काय मुर्खपणा आहे हा. तुमच्या दोघांचं भविष्य एकत्र नाही हे मी आधीच सांगितलं होतं. मला न विचारता त्यांना कोणी बोलवलं. मी त्यांच्याशी बोलणार नाहीये’ असे अनिरुद्ध बोलतो. त्यावर अण्णा ‘मग बाहेर भेटायचं होतं का? फक्त बोलायला काय हरकत आहे. आणि तुला कोणी त्यांच्याशी बोलायला सांगितलं आहे. अरुंधती येणार आहे. ती बोलेल ईशासाठी. तू घरी थांबला नाहीस तरी चालेल’ असे उत्तर देतात. लगेच कांचन ‘बघू तरी माणसं कशी आहेत. गेल्या वेळी तो साहिल आला होता आठवतय ना. काय म्हणत होता त्यांचे दारुचे ठेके आहेत’ असे म्हणते.



Source link

36 Guni Jodi: आरतीच्या लग्नाच्या निमित्ताने वेदांत आणि अमुल्या येणार एकत्र!

0
36 Guni Jodi: आरतीच्या लग्नाच्या निमित्ताने वेदांत आणि अमुल्या येणार एकत्र!


झी मराठी वरील ‘३६ गुणी जोडी’ या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अविनाश नारकर, ऋजुता देशमुख, आयुष संजीव आणि अनुष्का सरकटे अशी तगडी स्टारकास्ट या मालिकेत आहे. ह्या मालिकेची टॅग लाईनच आहे ‘प्रत्येक जोडी जुळत नसते’. या मालिकेतील नायक नायिका विरुद्ध दृष्टिकोन असलेल्या दोन व्यक्ती आहेत. वेदांत हा एक सुप्रसिद्ध तरुण, प्रस्थापित उद्योगपती आहे तो स्त्रीपेक्षा पुरुषांच्या सहवासाला प्राधान्य देतो कारण त्याचा असा विश्वास आहे की पुरुष स्त्रीपेक्षा अधिक सक्रिय, कार्यक्षम, तीक्ष्ण आणि मेहनती आहे. तर अमुल्याला डॉक्टर बनण्याची इच्छा असली तरी तिला हिमोफोबिया आहे. ती प्रेमळ, स्वैच्छिक, टॅलेंटेड आणि विनोदी असून ही तिच्या व्यक्तिमत्त्वाची मजबूत बाजू आहे.



Source link