
Hera Pheri 3 Latest Update: इरॉस इंटरनॅशनलने ‘हेरा फेरी ३’ चित्रपटाच्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

Hera Pheri 3 Latest Update: इरॉस इंटरनॅशनलने ‘हेरा फेरी ३’ चित्रपटाच्या निर्मात्यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.

नताशा दलाल ही वरुणची बालपणीची मैत्रीण आहे. वरुण आणि नताशा मुंबईतील एकाच शाळेत शिकले होते. इयत्ता सहावीत असताना त्यांची पहिली भेट झाली होती. दोघेही माणेकजी कूपर शाळेत जायचे. शाळेत असतानाच वरुण नाताशाच्या प्रेमात पडला होता. मात्र, वरुणसाठी हा प्रेमाचा मार्ग सोपा नव्हता. वरूणचे नाताशावर प्रेम असले, तरी नताशा मात्र वरुणकडे बघत देखील नव्हती. खुद्द वरुण धवनने एका मुलाखतीत खुलासा केला होता की, नताशाने एक-दोन नव्हे, तर तब्बल चार वेळा त्याचा प्रस्ताव नाकारला होता. पण, तरीही वरुणने हार मानली नाही, वरुणचं प्रेम पाहून अखेर नताशाने होकार दिलाच होता.

राज शांडिल्य दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती एकता कपूरने केली आहे. ‘ड्रीम गर्ल २’मध्ये नुसरत भरुचा, आयुष्मान खुराना आणि अनन्या पांडे मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. तर, ‘ड्रीम गर्ल २’ हा चित्रपट यावर्षी २५ ऑगस्ट २०२३ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.

ही कथा आहे यशोदाची म्हणजेच एका अश्या आईची आहे जिने साने गुरुजींना घडवलं, ही मालिका आपल्या मुलांवर संस्कार व्हावेत आणि आपली संस्कृती कळावी यासाठी सुरु केली होती, पण मालिकेची दुपारची ही वेळ बदलावी यासाठी अनेक पालकांचे फोन कॉल्स आणि इ मेल्स वाहिनीकडे आले. या सर्वांचा आदर राखत ८ मे पासून ही मालिका प्रेक्षकांना नवीन वेळेत म्हणजे संध्या. ६ वाजता प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या मालिकेची निर्मिती केली आहे पिकोलो फिल्म्स ने (वीरेन प्रधान) यांनी आधी वीरेन प्रधान यांची उंच माझा झोका ही मालिका झी मराठीवर खूप गाजली होती.

अजय देवगणची मोठी मुलगी न्यासा ही सतत सर्वांचे लक्ष वेधून घेत असते. कधी तिने परिधान केलेल्या कपड्यांमुळे तर कधी तिच्या वागणुकीमुळे. नुकताच तिचा देखील एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. रविवारी न्यासा ही तिचा जवळचा मित्र ओरीसोबत एका पार्टीला गेली होती. न्यासा गाडीतून उतर असताना अचानक बॉडीगार्ड तिच्या समोर येतो. दोघांची टक्कर होते. याचा व्हिडीओ बॉलिवूड सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भय्यानीने त्याच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता.

महाबळेश्वर; पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्राचे नंदनवन असलेल्या महाबळेश्वर या पर्यटनस्थळी तापमानाचा पारा सारखा बदलत असून या बदलत्या तापमानाने पर्यटक व स्थानिकही अचंबित होत आहेत. रविवारी पहाटे वेण्णालेक व लिंगमळा परिसरात 9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. त्यामुळे ऐन उन्हाळ्यात पर्यटकांसह स्थानिकांना थंडीचा फिल अनुभवयास मिळाला.
महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाते. ऐन उन्हाळ्यात जिल्ह्यात इतरत्र तापमान वाढत असताना थंडीचा बालेकिल्ला असलेल्या या जागतिक पर्यटनस्थळी मात्र वातावरणात कमालीचा बदलाव जाणवत आहे. गेल्या दोन दिवसांपासून तापमानात कमी अधिक प्रमाणात चढ -उतार होत आहे. सायंकाळी थंड तर सकाळी काहीसा उष्मा जाणवत आहे. महाबळेश्वरमधील वेण्णालेक व लिंगमळा परिसरात रविवारी पहाटे अवघ्या 9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असून हा परिसर गारठून गेला.
शहरातील अन्य भागातही तापमान 12 अंशांपर्यंत घसरले होते. या बदलत्या ऋतूचक्राने पर्यटकांसह स्थानिकही हैराण झाले आहेत. गेले दोन दिवस येथे पर्यटकांची विकेेंडमुळे वाढती गर्दी असून या बदलत्या हवामानाचा पर्यटकही आनंद घेताना दिसत आहेत. शनिवार व रविवारमुळे येथे पर्यटकांची रेलचेल पहावयास मिळत आहे.

मारूल हवेली; पुढारी वृत्तसेवा : शेतात शिकारीसाठी लावलेल्या तारेच्या फासकीत अडकून आबदारवाडी (ता. पाटण) येथे एका मादी बिबट्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना शनिवार दि. 22 रोजी घडली. या प्रकाराबाबत वन्यप्रेमींकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी तारेचा फास लावणार्या अज्ञाताविरोधात वनविभागाने गुन्हा नोंदवला आहे.
मल्हारपेठ वनविभागाच्या अधिकार्यांकडून मिळालेलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी आबदारवाडी येथील धायटा नावाच्या शिवारात सुमारे चार वर्षे वयाचा मादी बिबट्या खाण्याच्या शोधात डुकराला लावलेल्या तारेच्या फासात अडकला. यात बिबट्याचा कमरेचा भाग अडकल्याने धडपडून त्याचा जागीच मृत्यू झाला. याविषयीची एका नागरिकाने फोनवरून माहिती दिल्यानंतर सहायक वनसंरक्षक महेश झांझुर्णे, पाटणचे वनपरिक्षेत्र अधिकारी एल. व्ही. पोतदार, मल्हारपेठचे वनपाल संजय भाटे व वन कर्मचार्यांनी घटनास्थळी भेट दिली.
घटनेचा पंचनामा करून पशू वैद्यकीय अधिकारी अतुल पाटणे यांना बोलावून बिबट्याचे शवविच्छेदन करण्यात आले. दुपारी 3 वाजल्यानंतर मल्हारपेठ जंगल क्षेत्रातील एका ठिकाणी बिबट्याचे दहन करण्यात आले. त्यानंतर वन कर्मचार्यांनी घटनास्थळासह परिसराची पहाणी केली असता त्यांना बिबट्याची पिल्ले आढळून आली नाहीत. दरम्यान वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी तारेचा फास लावणार्या अज्ञात व्यक्तीविरोधात वनविभागाने गुन्हा नोंदवला असून संशयिताचा शोध सुरू आहे.

बाबांनी अनिशच्या आईबाबांचा अपमान केला. माझ्या आणि अनिशच्या लग्नाला नकार दिला. सध्या माझ्यापेक्षा तुमच्या भावना महत्त्वाच्या नाहीत. मला ना लाज वाटते तुम्हाला वडील म्हणायची असे ईशा म्हणते. तेवढ्यात अरुंधती तिला थांबवते. ‘काही तरी भान ठेव, ते तुझे वडील आहेत’ असे अरुंधती म्हणते. आता ईशा परत घरी जाणार का? की ईशा कायमची अरुंधतीकडे राहाणार? अनिरुद्ध त्या दोघांच्या लग्नाला तयार होणार का? असे अनेक प्रश्न प्रेक्षकांना पडले आहेत. मालिकेच्या आगामी भागात प्रेक्षकांना त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळणार आहेत.

पाटण; गणेशचंद्र पिसाळ : मागील वर्षी कोयना जलाशयाला भगदाड पडल्याच्या वृत्ताने राज्यभर भीती निर्माण झाली होती. त्यानंतर हे वृत्त निराधार असल्याचे स्पष्ट झाले आणि यातूनच कोयना जलविद्युत प्रकल्पाच्या टप्पा एक व दोन उल्लोळक विहीर व आपत्कालीन झडप भुयारातील पाणी गळती समोर आली होती. आता याच्या दुरूस्तीसाठी राज्य शासनाकडून निविदा जाहीर झाली आहे. मात्र असे असले तरी सध्या सुरू झालेल्या कार्यवाहीला काहीसा वेळ झाल्याने निदान यावर्षी तरी हे दुरुस्तीचे काम होणे अशक्य असल्याचे स्पष्ट आहे.
कोयना प्रकल्पाच्या पहिल्या व दुसर्या टप्प्यातील वीज निर्मितीसाठी जे पाणी नवजा टॉवरमधून अधिजल भुयार किंवा हेड रेस टनेलमार्गे निघते, त्यासाठी बोगद्याच्या शेवटी एक उल्लोळक विहीर (सर्जवेल) बांधलेली आहे. या विहिरीपासून पुढे बोगद्यातून पाणी वीजगृहाकडे जाते. ही सर्जवेल सन 1960 साली बांधलेली आहे. त्या काळात शंभर मीटर खोल कातळात ती खोदलेली आहे आणि त्या ठिकाणी अर्धा मीटर रुंदीचे काँक्रीट अस्तरीकरण केलेले आहे. या विहिरीने सहा दशकांच्या कालावधीत आजवर शेकडो भूकंपाचे धक्के पचवलेले आहेत.
मात्र आता काही ठिकाणी अस्तरीकरणाला तडे गेल्याने सर्जवेलमधून हे झिरपलेले पाणी इमर्जन्सी वॉल टनेल किंवा आपत्कालीन झडपद्वार भुयारात जाते आणि तेथून ते डोंगराच्या उतारावरून बाहेर पडत आहे. यामुळे वीजगृह, जलाशय किंवा धरण परिसरातील डोंगराला कोणताही धोका नाही. संबंधित गळतीची दुरुस्ती प्रस्तावित असून आता यासाठी 16 कोटी 12 लाख रुपयांची निविदाही प्रसिद्ध करण्यात आली आहे. या दुरुस्तीसाठी टप्पा एक व टप्पा दोन वीज निर्मिती काहीकाळ बंद ठेवावी लागणार आहे. दुरुस्तीसाठी टप्पा एक व दोनमधून त्या काळात वीज निर्मिती बंद राहिली तरी त्यावेळी टप्पा चारमधून आवश्यक ती वीज निर्मिती केली जाणार आहे.
ज्या ठिकाणाहून पाण्याची गळती होत आहे, तेथून प्रतिसेकंद तीन घनफुटापेक्षा जास्त पाण्याची गळती होत नाही. संबंधित जागा ही दुर्गम ठिकाणी असून धरणातील पाणीसाठ्याचा विचार करता उन्हाळ्यात पाण्याची पातळी कमी असताना ही दुरुस्ती करणे शक्य होईल. त्यासाठी महाजनको व जलसंपदा विभाग प्रयत्नशील आहे. या गळतीमुळे धरणासह वीज निर्मिती प्रकल्पांना कोणताही धोका नाही. आता निविदा प्रसिद्ध झाल्याने लवकरच दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येईल आणि गळती पूर्णपणे थांबेल, असा विश्वास कोयना धरणाचे सेवानिवृत्त मुख्य अभियंता दीपक मोडक यांनी व्यक्त केला आहे.

चाहत्यांनी मानसीला नवे खर खरेदी केल्यामुळे शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेता सुबोध भावे, मीरा जगन्नाथ, मेघा धाडे आणि इतर काही कलाकारांनी मानसीच्या या पोस्टवर कमेंट करत तिला शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र मानसीने हे नवे घर कुठे खरेदी केले याबाबत माहिती दिलेली नाही.