Wednesday, July 1, 2026
Home Blog Page 3080

अपशिंगे सैनिकांचेच नव्हे, तर लढवय्यांचे गाव; पहिल्या महायुद्धात 178 जणांचा सहभाग | पुढारी

0


सातारा; पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्यातील अपशिंगे (मिल्ट्री) हे सैनिकांचे गाव म्हणून ओळखले जात असले, तरी ते सैनिकांचेच नव्हे तर लढवय्यांचे गाव असल्याचे ऐतिहासिक पुरावे समोर आले आहेत. पहिल्या महायुद्धात गावातील 178 जण ब्रिटिश सैन्यात होते. अनेक जण सधन कुटुंबातील असतानाही मायभूमीच्या रक्षणासाठी अपशिंगेकर लढवय्या म्हणूनच सैन्यात दाखल झाले.

गावातीलच यशवंतराव निकम यांनी गावच्या सैनिकी परंपरेचा धांडोळा घेतला. सैनिक आणि लढवय्या यामधील फरक जाणून घेत या आनोख्या प्रवासाला यशवंतराव निकम यांनी सुरुवात केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही केवळ अर्थार्जन नव्हे तर शौर्य दाखवणे व पराक्रम गाजवण्यासाठीच अनेक जण सैन्यात दाखल झाले.

आदित्य निकम (पाटील) यांच्याकडे सापडलेल्या कागदपत्रांनुसार त्यांचे मूळ पुरूष सयाजी खळोजी पाटील हे अदिलशाहीचे सरदार होते. मात्र, यावर पुढे संशोधन झालेले नाही. यशवंतराव निकम यांचे वडील स्व. राजाराम निकम हे जर्मनीत 5 वर्षे युद्धकैदी होते. या दरम्यान पहिल्या महायुध्दात गावातील अनेक जण धारातीर्थी पडले होते. अपशिंगेकर हे केवळ सैनिक नव्हे तर लढवय्या असल्याचा शोध घेण्यासाठी अनेक ब्रिटीशकालीन कागदपत्रांचा शोध त्यांनी घेतला. काही घरांमध्ये दिवंगत लढवय्यांची कागदपत्रे उपलब्ध झाली.

आतापर्यंत 1914 पासूनच्या 300 व्यक्तिंची माहिती त्यांनी संकलित केली आहे. कॅ. रामचंद्र निकम यांनी त्यांच्या आजोबांच्या काळातील कागदपत्रे जपून ठेवली आहेत. या दस्तावेजानुसार त्यांच्या आजोबांची नेमणूक ब्रिटिशांनी निवृत्तीनंतर रिक्रूटींग ऑफिसर अशी केल्याचे दिसून येते. कॅ. पिराजी निकम यांच्याकडील उपलब्ध कागदपत्रांनुसार 45 पेन्शनर, 12 फॅमिली पेन्शनर (युद्ध विधवा), 2 रिझर्व्ह 43 डिसचार्ज, 60 सेवेत असलेले, 14 शहीद आणि 2 हयात अशा एकूण 178 लोकांनी पहिल्या महायुध्दात पराक्रम गाजवला आहे. यावेळी 14 जण शहीद झाले होते. त्याकाळी गावातील प्रत्येक घरात 20-25 एकर जमीन होती. केवळ अर्थार्जनासाठी हे सैन्यात दाखल झाले असतील हे संभवत नाही. लढवय्या वृत्ती व शौर्याची परंपरा या बाबी त्याला कारणीभूत आहेत. यामुळेच या गावाने देशसेवेसाठी अख्खी कुटुंबेच्या कुटुंबे देशाला समर्पित केली आहेत.

या ऐतिहासिक दस्तावेजावरून अपशिंगे गावास ‘सैनिकांचे गाव’ संबोधन्याऐवजी लढवय्यांचे, शूरवीरांचे, योद्ध्यांचे गाव म्हणणे समर्पक ठरेल. केवळ अर्थार्जनासाठी सैनिकी परंपरा जपणारी ही भूमी नाही तर पराक्रम, शौर्य गाजवणार्‍यांची ही भूमी आहे.

अपशिंगे हे सैनिकांचेच गाव नसून लढवय्यांचे गाव आहे. सैनिक व लढवय्या यातील फरक समजल्यानंतर ऐतिहासिक दस्तावेज काढण्यास सुरुवात केली. यामध्ये मला यश मिळाले असून अगदी अदिलशाहीपासून ते ब्रिटिश सरकारपर्यंतची माहिती मिळाली. यातून अपशिंगे हे लढवय्यांचे गाव असल्याचे स्पष्ट झाले असून याचा मला अभिमान आहे. – यशवंतराव निकम



Source link

मी सुट्टीवर नाही, सध्या डबल ड्यूटीवर आहे; मुख्यमंत्री शिंदे यांचा उद्धव ठाकरेंना टोला | पुढारी

0









पाचगणी; पुढारी वृत्तसेवा :  मी सुट्टीवर नाही, सध्या डबल ड्यूटीवर आहे. अडीच वर्षे घरी बसलेल्यांनी दोन-तीन दिवस इकडे-तिकडे गेलो यावर बोलू नये, असा टोला मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लगावला. आरोप करणार्‍यांना काहीच कामधंदा नाही, आता त्यांना घरीच बसवलंय. घरी बसवलंय म्हणून आरोप करताय. पण, आम्ही आरोपांचे उत्तर आरोपाने नव्हे तर कामाने देऊ, असा विश्वासही मुख्यमंत्री ना. शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तीन दिवस रजेवर गेल्याची चर्चा मंगळवारपासून रंगली होती. मुख्यमंत्र्यांच्या या रजेवरून अनेक तर्कवितर्क लढवले जात होते. तसेच विरोधकांनी देखील त्यांना घेरले होते. यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी महाबळेश्वरमधील राजभवन येथे माध्यमांशी संवाद साधला.

ना. शिंदे म्हणाले, मी सुट्टीवर आलो नसून डबल काम करत आहे. हे आमचं डबल इंजिनचं सरकार आहे. विरोधकांच्या टिकेवर मी कधीच लक्ष दिले नाही. माझे कामावर लक्ष असून काम हेच माझे कर्म आहे. माझा हा दौरा नियोजित होता. आम्हाला सुट्टी वगैरे काहीही नसते. टिका करणं हे विरोधकांचं कामच आहे. त्यांच्याकडे मी लक्ष देत नाही. अडीच वर्षे घरी बसणार्‍यांनी माझ्या सुट्टीवर बोलू नये.
समृद्धी महामार्गालादेखील सुरुवातीला विरोध केला होता. मात्र, मी खंबीरपणे आणि जिद्दीने हा प्रकल्प पुढे नेला,असेही ना. शिंदे यांनी यावेळी सांगितले. चांगल्या कामाला विरोध करणे हा दुटप्पीपणा असल्याची टिकाही त्यांनी ठाकरेंवर केली. बारसू ही ग्रीन रिफायनरी असून यामुळे प्रदूषण होणार नाही. बारसू येथे रिफायनरी व्हावी, त्या भागाचा विकास व्हावा, लोकांना रोजगार मिळावा, हा उद्देश या पाठीमागे असून हजारो कोटींची गुंतवणूक तिकडे होऊ शकते, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

बारसू रिफायनरीला त्यावेळी का विरोध केला नाही?

बारसू ग्रीन रिफायनरीसाठी तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीले होते. त्यामुळेच या प्रकल्पाला हिरवा कंदील मिळाला होता. त्यावेळी ठाकरेंनी का विरोध केला नाही? त्यावेळी विशिष्ट परीस्थिती होती का? विशिष्ट तडजोडी झाल्या होत्या का? आता मुख्यमंत्रीपद गेल्यानंतर विरोध करण्याचे कारण काय? असे सवालही ना. शिंदे यांनी उपस्थित केले.

 











Source link

Jiah Khan Case : जिया खान मृत्यू प्रकरणाची चौकशी पूर्ण; १० वर्षांनंतर सूरज पांचोलीवर लागलेले आरोप पुसले जाणार?

0
Jiah Khan Case : जिया खान मृत्यू प्रकरणाची चौकशी पूर्ण; १० वर्षांनंतर सूरज पांचोलीवर लागलेले आरोप पुसले जाणार?


तर, यावर बोलताना सूरज पांचोलीचे वकील प्रशांत पाटील म्हणाले की, ‘आम्ही या प्रकरणातील अंतिम युक्तिवाद पूर्ण केला आहे. हे प्रकरण सूरज पांचोली विरुद्ध सीबीआयचे होते. सुप्रीम कोर्टाने दिलेल्या अनेक ऐतिहासिक निकालांच्या प्रतीही आम्ही सोबत जोडल्या आहेत. यात त्याने आत्महत्येस प्रवृत्त केल्याचे सिद्ध होत नाहीये. आता या प्रकरणाचा अंतिम निर्णय २८ एप्रिलला येणार आहे. तब्बल १० वर्षांनंतर आता सूरज पांचोलीला यातून सुटका मिळणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.



Source link

Chrisann Pereira: कुत्र्यावरून वाद झाला अन् त्यानं अभिनेत्रीला ड्रग्ज प्रकरणात अडकवलं! वाच नेमक काय घडलं..

0
Chrisann Pereira: कुत्र्यावरून वाद झाला अन् त्यानं अभिनेत्रीला ड्रग्ज प्रकरणात अडकवलं! वाच नेमक काय घडलं..


अभिनेत्रीला क्रिसान परेराला अडकवण्यासाठी अँथनीने त्याचा मित्र राजेश याची टॅलेंट कन्सल्टंट म्हणून ओळख करून दिली. राजेशने क्रिसनला शारजाहमध्ये होणाऱ्या ऑडिशनबद्दल सांगितले आणि तिला या ऑडिशनसाठी राजी करून घेतले. क्रिसानने शारजाहला जाण्यास होकार दिला, तेव्हा राजेशने तिला ट्रॉफी दिली आणि वेब सीरिजच्या ऑडिशनमध्ये ही ट्रॉफी उपयुक्त ठरणार असल्याचे सांगितले होते. राजेशच्या सांगण्यावरूनच क्रिसान ट्रॉफी घेऊन शारजाहमध्ये गेली होती. या ट्रॉफीमध्ये ड्रग्ज लपवले आहेत, याची तिला पुसटशी कल्पना देखील नव्हती. अभिनेत्री दुबईतील विमानतळावर उतरताच राजेशने विमानतळावरील प्रशासनाला ही बातमी सांगून तिला अडकवले. दोन्ही आरोपींना मुंबईत अटक केल्यानंतर आता मुंबई क्राइम ब्रँचची टीम परराष्ट्र मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून अभिनेत्री क्रिसान परेरा हिच्या प्रकरणाचा तपास करणार आहे.



Source link

Viral Video: किली पॉललाही पडली ‘बहरला हा मधुमास’ची भुरळ; बहीण निमासोबत धरला ठेका! पाहा व्हिडीओ

0
Viral Video: किली पॉललाही पडली ‘बहरला हा मधुमास’ची भुरळ; बहीण निमासोबत धरला ठेका! पाहा व्हिडीओ


टांझानियन सोशल मीडिया स्टार किली पॉल आणि त्यांची बहीण निमा पॉल हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. टांझानियातील एका आदिवासी भागातील भावाबहिणीची ही जोडी प्रत्येक ट्रेंडवर व्हिडीओ बनवताना दिसते. हिंदीचं नव्हे तर, मराठी गाण्यांवरचं त्यांचं प्रेम देखील अनेकदा नेटकऱ्यांनी पाहिलं आहे. आता ‘महाराष्ट्र शाहीर’ या चित्रपटातील ‘बहरला हा मधुमास नवा’ या गाण्यावरील व्हायरल रील पाहून किली आणि निमाला देखील यावर व्हिडीओ करायचा मोह आवरला नाहीये. त्यांनी देखील यावर व्हिडीओ तयार केला आहे.



Source link

Abdu Rozik-MC Stan: अब्दू रोझिक आणि एमसी स्टॅनमधील मधील वाद मिटले? ‘या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण!

0
Abdu Rozik-MC Stan: अब्दू रोझिक आणि एमसी स्टॅनमधील मधील वाद मिटले? ‘या’ पोस्टमुळे चर्चांना उधाण!


काही दिवसांपूर्वी सुंबुल तौकीर खान, शिव ठाकरे आणि अब्दू रोजिक नुकतेच एका कार्यक्रमादरम्यान एकत्र दिसले होते. यादरम्यान, मीडियाला मुलाखत देताना, अब्दू यांनी आता ‘मंडली गँग’ची मैत्री संपल्याची पुष्टी केली होती. इतकेच नाही, तर त्याने यामागचे कारणही सांगितले होते. काही मीडिया रिपोर्ट्समध्ये असा दावा करण्यात आला होता की, एमसी स्टॅन आणि अब्दू रोजिक एक गाणे रेकॉर्ड करणार होते. मात्र, या गाण्यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. गाणे रेकॉर्ड न होऊ शकल्याने अब्दू एमसी स्टेनवर नाराज झाला असल्याचे बोलले गेले होते.



Source link

Feroz Khan Death Anniversary : बॉलिवूडच्या ‘आरडीएक्स’वर होती पाकिस्तानात बंदी; कारण ऐकून वाटेल अभिमान!

0
Feroz Khan Death Anniversary :  बॉलिवूडच्या ‘आरडीएक्स’वर होती पाकिस्तानात बंदी; कारण ऐकून वाटेल अभिमान!


अभिनेते फिरोज खान यांनी आपल्या चित्रपट कारकिर्दीत चॉकलेट हिरोपासून ते भयानक खलनायकापर्यंतच्या सगळ्याच भूमिका साकारल्या होत्या. एकीकडे भारतासह जगभरात त्यांचे चित्रपट गाजत होते. मात्र, या दरम्यान पाकिस्तानात त्यांच्यावर बंदी घालण्यात आली होती. २००६मध्ये अभिनेते फिरोज खान ‘ताजमहाल’ चित्रपटाच्या प्रमोशनसाठी पाकिस्तानात गेले होते. मात्र, पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान परवेझ मुशर्रफ यांनी त्यांना ब्लॅक टाकल्याचे म्हटले जाते. फिरोज खान यांनी एका पाकिस्तानी गायकावर टीका करण्यासोबतच, पाकिस्तानलाही खडे बोल सुनावले होते. मला भारतीय असल्याचा अभिमान आहे, असे म्हणत अभिनेते फिरोज खान यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली होती. त्यामुळे पाकिस्तानात त्यांच्यावर बंदी घालण्यात आली होती.



Source link

Vinod Khanna Death Anniversary: कारकीर्द यशाच्या शिखरावर असताना विनोद खन्ना यांनी घेतला होता संन्यास!

0
Vinod Khanna Death Anniversary: कारकीर्द यशाच्या शिखरावर असताना विनोद खन्ना यांनी घेतला होता संन्यास!


अनेक चित्रपटांतून आपल्या अभिनयाची जादू दाखवल्यानंतर १९७१मध्ये त्यांनी गीतांजली यांच्याशी लग्न केले. विनोद खन्ना प्रत्येक बाबतीत यशस्वी ठरले होते. त्यांच्याकडे संपत्ती, प्रसिद्धी, कुटुंब, सर्व काही होते. पण, या सगळ्यातही त्यांना रितेपणा जाणवत होता. स्वतःला जाणून घेण्यासाठी ते अस्वस्थ झाले होते. त्याचवेळी त्यांच्या आईचे निधन झाले. आईच्या मृत्यूमुळे ते पूर्णपणे खचून गेले होते.



Source link

Tu Chal Pudha: चिमुकल्या संजूसाठी शिल्पी आणि विद्युतला एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार अश्विनी!

0
Tu Chal Pudha: चिमुकल्या संजूसाठी शिल्पी आणि विद्युतला एकत्र आणण्याचा प्रयत्न करणार अश्विनी!


‘नवरा-बायकोचा घटस्फोट होतो. मात्र, आई-वडिलांचा कधीच घटस्फोट होऊ शकत नाही’, असा म्हणून अश्विनी विद्युतला समजावण्याचा प्रयत्न करत आहे. पती-पत्नीच्या नात्यात अहंकार बाजूला ठेवून, आपल्या मुलांसाठी त्यांनी नेहमी एकत्र राहीलं पाहिजे, हेच अश्विनी विद्युतला समजावत आहे. आता अश्विनीचा हा पर्यटन सफल ठरणार की, विफल हे मालिकेच्या येत्या भागामध्ये कळणार आहे.



Source link

Rang Maza Vegla: दीपावर कोसळणार नवं संकट! ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत नवा ट्वीस्ट

0
Rang Maza Vegla: दीपावर कोसळणार नवं संकट! ‘रंग माझा वेगळा’ मालिकेत नवा ट्वीस्ट


Rang Maza Vegla Latest Update : आधीच इनामदारांच्या घरात दीपाला कार्तिक आणि श्वेता यांच्यापासून मोठा निर्माण झाला होता. त्यातच आता आयेशा देखील परतून आल्याने तिच्या संकटात आणखी वाढ झाली आहे.



Source link