
सलमान खानसोबत ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात पूजा हेगडे, व्यंकटेश दग्गुबाती, भूमिका चावला, शहनाज गिल, पलक तिवारी, राघव जुयाल, भाग्यश्री, रामचरण असे अनेक कलाकार झळकले आहेत. तर, दिवंगत अभिनेते सतीश कौशिक यांचीही छोटीशी भूमिका या चित्रपटात आहे.

सलमान खानसोबत ‘किसी का भाई किसी की जान’ या चित्रपटात पूजा हेगडे, व्यंकटेश दग्गुबाती, भूमिका चावला, शहनाज गिल, पलक तिवारी, राघव जुयाल, भाग्यश्री, रामचरण असे अनेक कलाकार झळकले आहेत. तर, दिवंगत अभिनेते सतीश कौशिक यांचीही छोटीशी भूमिका या चित्रपटात आहे.

Urfi Javed Controversies: उर्फीला अतरंगी फॅशनमुळे एका रेस्टॉरंटमध्ये एण्ट्री देण्यास नकार दिला. मात्र नंतर उर्फीने त्याच रेस्टॉरंट बाहेर धिंगाणा घातला आहे.
Source link

प्रत्येक वडीलांचे हे त्यांच्या मुलावर प्रेम असते. विशेष करुन वडील आणि मुलीचे नाते हे खास असते. अनिरुद्ध आणि ईशाचे देखील असेच काहीसे आहे. मात्र आपल्या नकाराने मुलीला त्रास होत आहे हे अनिरुद्धला कळताच तो सगळं बाजूला ठेवून ईशाच्या साखरपुड्यासाठी तयार होतो. तसेच अनिशकडून ‘ईशाला कधीच कोणती गोष्ट कमी पडू देणार नाही’ असे वचन घेतो.

Tu Chal Pudha Latest Update: विद्युत आणि शिल्पी यांच्या घटस्फोटाची सुनावणी सुरू असताना, त्यांच्या मुलाची म्हणजेच संजूची कस्टडी कुणाकडे जाणार यावरून मोठा वाद सुरू होता.

प्लॅनेट मराठीचे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर म्हणतात, ” ही सीरिज प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. पहिल्या दोन्ही एपिसोड्सना भरभरून प्रतिसाद मिळाला. प्रेक्षकांना आवडेल, असा उत्तम कॅान्टेन्ट देणे ही भाडिपाची खासियत आहे. मुळात सगळ्या वयोगटातील प्रेक्षकवर्ग पाहू शकेल, अशी ही सीरिज आहे. तिसरा भाग आणि येणारे पुढील भागही प्रेक्षकांना निश्चितच आवडतील. मागील भागातील सरप्राईज या भागात उघड होणार आहे.’’

Kili Paul Dance Video: टांझानियन सोशल मीडिया स्टार किली पॉल आणि त्यांची बहीण निमा पॉल हे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतात. टांझानियातील एका आदिवासी भागातील भावाबहिणीची ही जोडी प्रत्येक ट्रेंडवर व्हिडीओ बनवताना दिसते.
Source link

Aditi Sarangdhar in Nava Gadi Nava Rajya: ‘नवा गडी नवं राज्य‘ या मालिकेने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे. या मालिकेने पहिल्या दिवसापासून प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन केले आहे. या मालिकेचे जितके कौतुक करावे, तितके कमी आहे. जेव्हापासून या मालिकेची सुरवात झाली, त्या क्षणापासून मालिकेला प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद आणि प्रेम दिले. आनंदी, राघव, रमा, वर्षा, चिंगी ही सगळीच पात्र प्रेक्षकांच्या मनात घर करून वसली आहेत. या मालिकेतील प्रत्येक पात्राला प्रेक्षकांचे भरपूर प्रेम मिळाले आहे. आता आनंदी आणि राघवच्या आयुष्यात एक खास व्यक्ती एन्ट्री करणार आहे. या मालिकेत आता अभिनेत्री आदिती सारंगधर एन्ट्री करणार आहे.

पुढे तो म्हणाला, ‘बॉलिवूड इंडस्ट्रीमधील भ्रष्ट, अनैतिक आणि चापलूसी करणाऱ्या संस्थेला विरोध करत मी हे पुरस्कार घेण्यास नकार दिला आहे. गुलामासारखी वागणूक देणाऱ्या या व्यवस्थेचा मला भाग होण्याची इच्छा नाही.’ सोशल मीडियावर विवेक अग्निहोत्रीचे हे ट्वीट व्हायरल झाले आहे.
खटाव; अविनाश कदम : एप्रिल महिन्यातील पहिल्या आठवड्याच्या उत्तरार्धात खटाव तालुक्यात झालेला वादळी पाऊस व जोरदार गारपिटीने द्राक्ष उत्पादक शेतकरी पुरते उद्ध्वस्त झाले आहेत. देशांतर्गत तसेच स्थानिक बाजारात विकली जाणारी व परदेशात निर्यात होणार्या द्राक्षांचे कोट्यवधींचे नुकसान झाल्याने बळीराजा कर्जाच्या खाईत लोटला गेला आहे. शासनस्तरावर नुकसानीचे पंचनामे झाले असले तरी आता तालुक्यातील शेतकर्यांना लवकरात लवकर आणि भरीव मदत मिळणे गरजेचे आहे.
खटाव तालुक्याच्या दक्षिण भागातील निमसोड, कातरखटाव, डांभेवाडी, बोंबाळे, कलेढोण, शिंगाडवाडी, यलरमरवाडी या पट्ट्यात द्राक्षांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जाते. या भागातील शेतकरी लाखो रुपयांचे भांडवल घालून द्राक्षांची लागवड करतात. चालू वर्षी शेतकर्यांनी मोठ्या कष्टाने द्राक्षबागा फुलवल्या होत्या. उन्हाळ्यात द्राक्षांचा हंगाम सुरु होताच एप्रिलच्या पहिल्या आठवड्याच्या उत्तरार्धात या भागात वादळी पाऊस आणि जोरदार गारपिट झाली. मोठ्या प्रमाणावर मागणी असल्याने खटाव तालुक्यातून दरवर्षी परदेशात द्राक्षे निर्यात केली जातात. यातून शेतकर्यांना बर्यापैकी आर्थिक फायदा होतो, मात्र यावर्षी गारपिटीने निर्यातक्षम द्राक्षमणी गळून गेल्याने कोट्यवधींचे नुकसान झाले.
एक एकर नवीन द्राक्ष बाग लावायला आठ ते नऊ लाखांचा खर्च येतो. त्यानंतर दरवर्षी औषधे, खते, मजूरीवर चार लाखांचा खर्च येतो. निसर्गाने साथ दिली आणि अपेक्षित उत्पादन निघाले तर एकरी आठ ते दहा लाखांचे उत्पन्न घेता येते. निमसोड, डांभेवाडी, बोंबाळे, कलेढोण, शिंगाडवाडी, यलमरवाडी पट्ट्यातील शेतकर्यांनी द्राक्षबागांमध्ये कोट्यवधींचे भांडवल गुंतवले होते. गारपिटीने हे सर्व भांडवल मातीमोल झाले आहे. वादळी वार्यात लोखंडी खांबही उन्मळून पडल्याने द्राक्षबागा भुईसपाट झाल्या आहेत. एक-एका शेतकर्याचे दहा लाखांपासून 35 ते 40 लाखांपर्यंत नुकसान झाले आहे. द्राक्षांच्या काड्याही गारपिटीने मोडून गेल्याने पुढील वर्षी अपेक्षित उत्पन्न निघणे मुश्किल होणार आहे. अत्यंत कष्टाने जीवापाड जपलेल्या आणि वर्षभर परिश्रम करुन दर्जेदार द्राक्षमणी तयार झालेल्या बागा जमीनदोस्त झाल्याने बळीराजा पुरता कोलमडून गेला आहे. माण तालुक्यातील देवापूर, काळचौंडी, पळसावडे या भागात द्राक्षाबागांची लागवड करण्यात आली आहे. या भागात निसर्गाच्या अवकृपेने बहुतांशी द्राक्षबागा जळून गेल्या आहेत.
खटाव तालुक्यातील गारपिटीनंतर लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकार्यांनी पहाणी केली. महसूल आणि कृषी विभागाने पंचनामे केले आहेत. नुकसानीचा अहवाल वरिष्ठ स्तरावर सादर करण्यात आला आहे. आता शासनाकडून द्राक्ष उत्पादक शेतकर्यांना त्वरित आणि भरीव मदत मिळणे गरजेचे आहे.
गारपिटीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही पूर्ण झाली आहे. खटाव आणि माण तालुक्यात द्राक्ष बागांसह झालेल्या इतर नुकसानीचा अहवाल वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आला आहे.
– उज्ज्वला गाडेकर, प्रांताधिकारीतीस लाखांचे कर्ज घेऊन दोन एकर क्षेत्रावर द्राक्षबाग फुलवली होती. द्राक्षमणीही चांगले लागले होते. दोन दिवसांत द्राक्षे परदेशात निर्यात केली जाणार होती. मात्र, प्रचंड मोठ्या प्रमाणावर वादळी पाऊस आणि गारपीट झाल्याने संपूर्ण बाग जमीनदोस्त झाली. सुमारे तीस लाखांचे नुकसान झाले आहे. शासनाने नुकसानग्रस्तांना त्वरित भरपाई द्यावी.
– विक्रम बागल, द्राक्ष उत्पादक , डांभेवाडी

कामाविषयी बोलायचे झाले तर सलमान खानचा चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’ नुकताच प्रदर्शित झाला आहे. सलमान खानसोबत या चित्रपटात पूजा हेगडे, व्यंकटेश दग्गुबाती, भूमिका चावला, शहनाज गिल, पलक तिवारी, राघव जुयाल, भाग्यश्री, रामचरण असे अनेक कलाकार झळकले आहेत. तर, दिवंगत अभिनेते सतीश कौशिक यांचीही छोटीशी भूमिका या चित्रपटात आहे.