
आज अखेर या प्रकरणावर निकालाची सुनावणी झाली. जिया खान मृत्यू प्रकरणात आरोपी असलेला सूरज पांचोली त्याच्या आईसोबत कोर्टात पोहोचला होता. सूरज पांचोली याची आई अभिनेत्री झरिना वहाब या वेळी सतत आपल्या मुलाला आधार देताना दिसली.

आज अखेर या प्रकरणावर निकालाची सुनावणी झाली. जिया खान मृत्यू प्रकरणात आरोपी असलेला सूरज पांचोली त्याच्या आईसोबत कोर्टात पोहोचला होता. सूरज पांचोली याची आई अभिनेत्री झरिना वहाब या वेळी सतत आपल्या मुलाला आधार देताना दिसली.

Kim kardashian look a like Christina Ashten Death: किम कार्दाशियनसारखी दिसणारी क्रिस्टीना अॅश्टन खूपच चर्चेत होती. मात्र, आता एक सर्जरीनंतर तिला आपला जीव गमवावा लागला आहे.
कराड; प्रतिभा राजे : कुस्तीमध्ये देशाला पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून देणार्या आणि जागतिक दर्जाचे पैलवान राहिलेल्या ऑलिम्पिकवीर स्व. खाशाबा जाधव यांच्या आयुष्यावर सिनेमा बनवण्याचा निर्णय दिग्दर्शक नागराज मंजुळे यांनी घेतला असून, याबाबत स्व. खाशाबा जाधव यांचे सुपुत्र रणजित जाधव यांच्याशी त्यांची चर्चा झाली आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांचे ‘खाशाबा’ या सिनेमाचे लिखाण पूर्ण झाले असून, ते सध्या ‘खाशाबा’ची दमदार व्यक्तिरेखा साकारणार्या अभिनेत्याच्या शोधात आहे. त्यामुळे चरित्रपट असलेल्या या सिनेमात कुस्तीपटू खाशाबा जाधव यांची व्यक्तिरेखा कोण साकारणार याबद्दल उत्सुकता राहणार आहे. सिनेमात खाशाबा जाधव यांच्या व्यक्तिरेखेत प्रस्थापित अभिनेता असेल, की नवा चेहरा ही व्यक्तिरेखा साकारेल हे लवकरच कळेल.
खाशाबा जाधव यांची व्यक्तिरेखा साकारणारा अभिनेता मंजुळे यांना मिळाला की लवकरच स्व. खाशाबा जाधव यांचे जीवनचरित्र सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार असून, कुस्तीप्रेमींसाठी ही अत्यंत अभिमानस्पद बाब ठरणार आहे. दिग्दर्शक नागराज मंजुळे यांच्या घरी कुस्तीचा वारसा आहे. त्यांचे वडील व भाऊ यांनी कुस्ती मैदाने जिंकली आहेत. कुस्तीमध्ये भारताला पहिले ऑलिम्पिक मिळवून देणारे खाशाबा जाधव यांचे जीवनचरित्र व त्यांचे योगदान प्रेक्षकांसमोर आणून खाशाबा जाधव यांच्या कुस्तीचे क्षण पुन्हा जिवंत करावेत. त्यातून कुस्तीपटूंना प्रेरणा मिळावी, हा उद्देश असल्याचे दिग्दर्शक मंजुळे यांनी रणजित जाधव यांना सांगितले आहे.
खाशाबा दादासाहेब जाधव (15 जानेवारी 1926 – 14 ऑगस्ट 1984) हे एक भारतीय फ्रीस्टाइल कुस्तीपटू होते. हेलसिंकी येथील 1952 मधील उन्हाळी ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकल्यामुळे ते प्रसिद्ध आहेत. ऑलिम्पिकमध्ये वैयक्तिक पदक जिंकणारे ते स्वतंत्र भारतातील पहिले खेळाडू होते. 1900 मध्ये भारतासाठी अॅथलेटिक्समध्ये दोन रौप्य पदके जिंकणार्या नॉर्मन प्रिचर्ड यांच्यानंतर खाशाबा जाधव हे स्वतंत्र भारतातील पहिले वैयक्तिक खेळाडू होते. ज्यांनी ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले होते.
खाशाबा जाधव यांच्या आधीच्या वर्षांमध्ये भारत फक्त फील्ड हॉकी या सांघिक खेळात सुवर्णपदक जिंकत असे. खाशाबा हे एकमेव भारतीय ऑलिम्पिक पदक विजेते आहेत. ज्यांना पद्म पुरस्कार मिळाला नाही. खाशाबा अत्यंत चपळ होते. ज्यामुळे ते त्यांच्या काळातील इतर पैलवानांपेक्षा वेगळे होते. इंग्लिश प्रशिक्षक रीस गार्डनर यांनी त्यांच्यामध्ये हे वैशिष्ट्य पाहिले आणि 1948 च्या ऑलिम्पिक खेळांपूर्वी त्यांना प्रशिक्षण दिले. खाशाबा जाधव यांनी 1948 सालातील लंडन उन्हाळी ऑलिंपिक स्पर्धांमध्ये फ्लायवेट वजनगटातील कुस्तीत सहावा क्रमांक मिळवला. इ.स. 1952 सालातील हेलसिंकी उन्हाळी ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये 52 किलोग्रॅम वजनगटात फ्रीस्टाइल प्रकारांतर्गत कांस्यपदक जिंकले.
2000 मध्ये, भारत सरकारने खाशाबा यांना कुस्तीमधील त्यांच्या योगदानाबद्दल मरणोत्तर अर्जुन पुरस्काराने सन्मानित केले. 2010 च्या दिल्ली कॉमनवेल्थ गेम्ससाठी नव्याने बांधलेल्या कुस्ती स्थळाला त्यांच्या कामगिरीचा सन्मान म्हणून त्यांचे नाव देण्यात आले. 15 जानेवारी 2023 रोजी गुगलने खाशाबा जाधव यांना त्यांच्या 97 व्या जयंतीनिमित्त गुगल डुडलद्वारे सन्मानित केले आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील उमळवाडमध्ये महाशिवरात्री यात्रेनिमित्त आयोजित कुस्त्यांच्या जंगी मैदानात नागराज मंजुळे यांनी हजेरी लावली होती. याच कुस्तीच्या मैदानातून नागराज मंजुळे यांनी खाशाबा जाधव यांच्या जीवनावरील चित्रपटाबाबत घोषणा केली होती. मंजुळे यांनी रणजित जाधव यांच्याशी संपर्क साधून खाशाबा जाधव यांच्या जीवनचरित्राची माहिती घेतली आहे. आतापर्यंत अनेक चित्रपट वेगवेगळ्या खेळांवर तसंच खेळाडूंवर बनवण्यात आले आहेत. ते बॉक्स ऑफिसवर यशस्वीही झाले आहेत. त्यामुळे आता मराठीच्या मोठ्या पडद्यावर हा सिनेमा कोणते नवे विक्रम करतो, हे पाहणे रंजक ठरेल.
स्व. खाशाबा जाधव यांचा मी वारस आहे, याचा मला अभिमान वाटतो. त्यांच्या ऑलिम्पिकची दखल मराठी चित्रपट सृष्टीने घेतली याचा अभिमान वाटतो. कोणत्याही सुविधा नसताना खाशाबा जाधव यांनी त्यांचे ध्येय गाठण्यासाठी घेतलेली मेहनत लोकांपर्यंत या चित्रपटाद्वारे जाणार आहे.
– रणजित खाशाबा जाधव

Ponniyin Selvan 2: तमिळ चित्रपट दिग्दर्शक मणिरत्नम यांचा आगामी चित्रपट ‘पोन्नियीन सेल्वन २’ सध्या चर्चेत आहे. तमिळ सुपरस्टार चियान विक्रम, ऐश्वर्या राय बच्चन, कार्ती, त्रिशा कृष्णन आणि जयराम रवी स्टारर दिग्दर्शक मणिरत्नम यांच्या चित्रपटाविषयी बरीच चर्चा सुरू आहे. आज (२८ एप्रिल) हा चित्रपट चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाचा पहिला भाग खूप गाजला होता. या चित्रपटाच्या पहिल्या भागाने जगभरात ५०० कोटींची कमाई केली होती. तेव्हापासूनच चित्रपटाच्या दुसऱ्या भागासाठी चाहते आतुर झाले होते. आता या चित्रपटाबाबत एक रंजक माहिती समोर आली आहे. या चित्रपटात ऐश्वर्या राय बच्चन मुख्य अभिनेत्रीच्या म्हणजेच ‘नंदिनी’च्या भूमिकेत आहे. या चित्रपटाची कथा नंदिनीच्या फसवणुकीभोवती फिरते. पण या चित्रपटासाठी ऐश्वर्या राय बच्चन ही पहिली पसंती नव्हती.

Happy Birthday Sharman Joshi: बॉलिवूड अभिनेता शर्मन जोशी आज (२८ एप्रिल) आपला वाढदिवस साजरा करत आहे. शर्मन जोशी याने १९९९मध्ये आलेल्या ‘गॉडमदर’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली होती. या चित्रपटाद्वारे त्याने अभिनय विश्वात स्वतःचे हक्काचे स्थान निर्माण केले. पण, त्याला हवी ती ओळख मिळवता आली नाही. यानंतर शर्मन जोशीला ‘एक्सक्यूज मी’ हा चित्रपट मिळाला आणि हा चित्रपट अभिनेत्याच्या करिअरसाठी टर्निंग पॉइंट ठरला. या चित्रपटानंतर शर्मन जोशीने अनेक हिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. परंतु, त्यानंतर त्याने सहाय्यक भूमिकांमध्येच आपले नशीब आजमावले. चला जाणून घेऊया त्याच्या अशाच काही गाजलेल्या चित्रपटांबद्दल…

लग्नानंतरही मेधा यांनी महेश मांजरेकर यांच्या ‘काकस्पर्श’, ‘दे धक्का’, ‘नटसम्राट’, ‘एफ. यू’, ‘नायलॉन– बंध रेशमाचे’ अशा अनेक चित्रपटांमध्ये दमदार भूमिका साकारल्या आहेत. मेधा यांनी स्किन ट्रीटमेंटमध्ये स्पेशलायझेशन केले आहे. स्किनवरील सर्व ट्रीटमेंट करणे हेच त्यांचं पॅशन आहे, असं त्या स्वतः एका मुलाखतीत म्हणाल्या होत्या.
सातारा; पुढारी वृत्तसेवा : मुख्यमंत्री व्हावे, अशी अनेकांची इच्छा असून त्यात अजित पवारही आहेत. मात्र, ती सगळ्यांचीच इच्छा पूर्ण होत नाही. अजित पवार भाजपमध्ये आले तरीही त्यांना मुख्यमंत्रिपदाची संधी लवकर मिळेल असे नाही. मुख्यमंत्रिपदी एकनाथ शिंदेच राहतील, असे सूतोवाच केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले. दरम्यान, सर्वोच्च न्यायालयाचा निकाल शिंदे यांच्याच बाजूने लागेल. त्यांच्या पदाला कोणताही धोका होणार नसून महायुती भक्कम असल्याचे ते म्हणाले.
सातारा येथील शासकीय विश्रामगृह येथे पत्रकारांशी बोलताना ना. आठवले म्हणाले, मुख्यमंत्री शिंदे हे सातार्यामध्ये कुटुंबीय व शेतकर्यांना भेटण्यासाठी आले होते. त्यांच्यावर कोणतीही टांगती तलवार नसून टांगती तलवार उद्धव ठाकरे यांच्यावर आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे असते तर ते काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत गेले नसते. उद्धव ठाकरे लोकांना भेटत नव्हते. त्यामुळेच शिवसेनेत महाबंड झाले. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल शिंदे यांच्याच बाजूने लागेल. त्यांच्या पदाला कोणताही धोका होणार नसून महायुती भक्कम आहे. मुख्यमंत्रिपदाबाबत बॅनर लावणारे उत्साही कार्यकर्ते असतात. मुख्यमंत्री होण्याची इच्छा अनेकांची असते, पण ती पूर्ण होत नाही.
आले होते, तेव्हा अजित पवारांची मुख्यमंत्री होण्याची इच्छा होती. पण, तेव्हा संधी मिळाली नाही. आता लवकर संधी मिळेल असे नाही. राज ठाकरे यांनी स्वतंत्र रहावे. त्यांना भाषण करायला आवडते. ते आमच्यासोबत आले तर त्यांना एवढे भाषण करायला मिळणार नाही. त्यांची आम्हाला आवश्यकता नाही. त्यांना सोबत घेणे भाजपला देश पातळीवर परवडणारे नाही, असे ही ते म्हणाले.
रिपब्लिकन पक्षाचे शिर्डी येथे दि. 28 मे रोजी देशव्यापी अधिवेशन आहे. त्यापूर्वी 27 मे रोजी ऑल इंडिया कमिटीतील प्रमुखांची बैठक होणार आहे. त्यात संपूर्ण देशभरात रिपब्लिकन पक्ष वाढवण्यासाठी चर्चा होणार आहे. तसेच या अधिवेशनात केंद्र व राज्य सरकारकडे भूमिहीन कुटुंबांना 5 एकर शेतजमीन द्या, पदोन्नतीत दलितांचे आरक्षण कायम ठेवा, 2019 पर्यंतच्या झोपडपट्टीधारकांना घरे द्या, अशा विविध मागण्या केल्या जाणार असल्याचे ना. रामदास आठवले यांनी सांगितले.

Samantha Ruth Prabhu Birthday: समंथा तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. परंतु, अभिनयविश्व गाजवणाऱ्या समंथाला कधीही अभिनेत्री बनण्याची इच्छा नव्हती.

Karan Gunhyala Mafi Nahi: ‘कारण गुन्ह्याला माफी नाही’ या मालिकेचे लेखन चिन्मय मांडलेकरने केले आहे.
Source link

सुदिप्तो सेनने ‘द केरळ स्टोरी’ या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात चार सर्वसामान्य कॉलेजमधील मुलींना जगातील सर्वात खतरनाक दहशतवादी संघटनेत कशा प्रकारे सामिल करण्यात आले हे दाखवण्यात येणार आहे. जवळपास पाच महिन्यांपूर्वी या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता. आता हा चित्रपट ५ मे रोजी प्रदर्शित होणार असल्याचे समोर आले आहे.