Thursday, July 2, 2026
Home Blog Page 3077

Unlock Zindagi: लॉकडाउन काळातील भयाण वास्तव सांगणाऱ्या ‘अनलॉक जिंदगी’चा ट्रेलर प्रदर्शित

0
Unlock Zindagi: लॉकडाउन काळातील भयाण वास्तव सांगणाऱ्या ‘अनलॉक जिंदगी’चा ट्रेलर प्रदर्शित


दोन वर्षांपूर्वी साऱ्या जगावर एक मोठे संकट आले, कोरोना महामारीचे. अवघ्या काही दिवसांतच या महामारीने जगभर हाहाकार माजवला. कोरोनाच्या विळख्यात आपण असे अडकलो की, संपूर्ण जग ठप्प झाले. शाळा, कॉलेजेस, ऑफिसेस, उद्योगधंदे, मंदिरे, दळणवळणाची साधने. संपूर्ण जगच थांबले. निर्मनुष्य रस्ते पाहून जीव घाबराघुबरा व्हायचा. लोकांचे एकमेकांना भेटणे थांबले. या महामारीत कित्येकांनी आपले प्राण गमावले, अनेकांचे भावनिक, आर्थिक, अशा सगळ्याच बाजूने नुकसानही झाले. आजही हे भयाण वास्तव आठवले, की अंगावर काटा येतो. लॉकडाऊनमधील ही परिस्थिती लवकरच आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचा नुकताच ट्रेलर प्रदर्शित झाला आहे.



Source link

Mrunal Thakur New Car : मृणाल ठाकूरने खरेदी केली नवी लग्झरी कार, किंमत ऐकून व्हाल थक्क

0
Mrunal Thakur New Car : मृणाल ठाकूरने खरेदी केली नवी लग्झरी कार, किंमत ऐकून व्हाल थक्क


कामाविषयी बोलायचे झाले तर काही दिवसांपूर्वी मृणाल ठाकूर बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारच्या सेल्फी या चित्रपटातील ‘कुडिए तेरी बाइव’मध्ये दिसली होती. मात्र, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला होता. त्यानंतर ती आदित्य रॉय कपूरच्या गुमराहमध्ये दिसली होती आणि तिचे पुढील चित्रपट ‘पिप्पा’, ‘पूजा मेरी जान’ आणि ‘आंख’ मिचोली लाइनअपमध्ये आहेत.



Source link

सातारा : सोनोग्राफी करायला गेला; तीन तोळे गमावून बसला | पुढारी

0









म्हसवड : पुढारी वृत्तसेवा : म्हसवड येथील एका खाजगी रुग्णालयात सोनोग्राफी करण्याकरता आलेल्या रुग्णाच्या गळ्यातील सुमारे दीड लाखांचा सोन्याचा ऐवज लंपास झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी म्हसवड पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली असून रुग्णालयातील चोरीच्या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे.

याबाबत पोलिस सुत्रांनी दिलेली अधिक माहिती अशी, सांगली जिल्ह्यातील बोंबेवाडी (ता. आटपाडी) येथील संभाजी गणपत पवार हे म्हसवड येथील एका खाजगी रुग्णालयात सोनोग्राफी करण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी रूग्णालय व्यवस्थापनाकडे सोनोग्राफी करायची असल्याचे सांगितले. त्यानुसार सोनोग्राफीही करण्यात आली. त्यादरम्यानच त्यांच्या गळ्यात असणारी सुमारे दीड लाख रुपये किंमतीची ३० ग्रॅम सोन्याची सोनसाखळी अज्ञाताने चोरून नेली. त्याची तक्रार संभाजी पवार यांनी म्हसवड पोलिस ठाण्यात दिली आहे. पोलिसांनी संबंधित सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत चोरट्याचा शोध सुरू केला आहे. अधिक तपास सपोनि राजकुमार भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार शिवाजी जाधव हे करत आहेत.











Source link

7 years of Sairat: आर्ची या भूमिकेसाठी रिंकू राजगुरु नाही तर ‘ही’ अभिनेत्री होती पहिली पसंती

0
7 years of Sairat: आर्ची या भूमिकेसाठी रिंकू राजगुरु नाही तर ‘ही’ अभिनेत्री होती पहिली पसंती


अभिनेत्री सायली पाटीलची आर्ची या भूमिकेसाठी निवड झाली होती. तिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये याबाबत खुलासा केला होता. सायली म्हणाली की, “मी खरं तर अपघाताने अभिनेत्री बनले आहे. मी तेव्हा ऑडिशनसाठीदेखील गेले नव्हते. मी कॉलेजमध्ये असताना मला शॉर्टलिस्ट केले होते त्याचपद्धतीने इतर मुलींनादेखील केले होते.”



Source link

Deepika Chikhalia: रामायणातील ‘सीता’ सध्या काय करते? जाणून घ्या

0
Deepika Chikhalia: रामायणातील ‘सीता’ सध्या काय करते? जाणून घ्या



Deepika Chikhalia Birthday: रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेत सीता ही भूमिका अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी साकारली होती. त्या सध्या काय करतात जाणून घेऊया…



Source link

Chala Hawa Yeudya: थुकरटवाडीत गप्पा रंगणार ‘गौर गोपाल दास’ यांच्यासोबत, पाहा व्हिडीओ

0
Chala Hawa Yeudya: थुकरटवाडीत गप्पा रंगणार ‘गौर गोपाल दास’ यांच्यासोबत, पाहा व्हिडीओ


गौर गोपाळ दास यांच्या बद्दल सांगावे तितके कमीच आहे. ते एक असे व्यक्तीमत्व आहे जे जीवनशैली कशी सकारात्मक असावी त्या बद्दल ते प्रेरणात्मक विचार मांडत असतात. त्यांच्या आगमनाची झलक प्रेक्षकांनी प्रोमो मध्ये पाहीलीच आहे .मनोरंजनाबरोबरच आयुष्य खुप सुंदर आहे या विषयी सांगताना गौर गोपाल दास आपल्याला खळाळून हसवतील व त्यातून आपल्याला बोधही मिळेल यात शंकाच नाही.



Source link

Baipan Bhari Deva: अर्ध आयुष्य संपलं, पण..; ‘बाईपण भारी देवा’चा टीझर प्रदर्शित

0
Baipan Bhari Deva: अर्ध आयुष्य संपलं, पण..; ‘बाईपण भारी देवा’चा टीझर प्रदर्शित



Baipan Bhari Deva Teaser: केदार शिंदेंच्या ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.



Source link

Rishi Kapoor: अमिताभ बच्चन यांना हरवण्यासाठी ऋषी कपूर यांनी ३० हजारांना खरेदी केला होता पुरस्कार! वाचा किस्सा…

0
Rishi Kapoor: अमिताभ बच्चन यांना हरवण्यासाठी ऋषी कपूर यांनी ३० हजारांना खरेदी केला होता पुरस्कार! वाचा किस्सा…


पुरस्कार मिळाल्यानंतर अनेक वर्षांनी ऋषी यांनी त्यांच्या आत्मचरित्रात खुलासा केला की, त्यांना हा पुरस्कार प्रतिभेमुळे नाही, तर पैशामुळे मिळाला होता. अभिनेते ऋषी यांनी त्यांच्या आत्मचरित्रात म्हटले होते की, ‘बॉबी’साठी मला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाल्यावर अमिताभ बच्चन निराश झाले होते. त्यांना वाटले होते की, हा पुरस्कार ‘जंजीर’साठी त्यांना नक्कीच मिळेल. दोन्ही चित्रपट एकाच वर्षी प्रदर्शित झाले होते. मात्र, तो पुरस्कार मी विकत घेतला होता, हे सांगायला मला आता शरम वाटते. खरं तर त्यावेळी मी काही विचार केला नव्हता.



Source link

Khupte Tithe Gupte: आता फक्त खुपणार नाही तर टोचणारही! ‘खुपते तिथे गुप्ते’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

0
Khupte Tithe Gupte: आता फक्त खुपणार नाही तर टोचणारही! ‘खुपते तिथे गुप्ते’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला


‘खुपते तिथे गुप्ते’चं हे पर्व सर्वार्थाने वेगळं असणार आहे कारण, या पर्वाच खास आकर्षण असणार आहे ती म्हणजे एक खास‘खुर्ची’. अशीखुर्ची जिच्यासाठी सगळीकडे चढाओढ पाहायला मिळतेय.मग, ते नोकरीमध्ये असो,कॉर्पोरेट जग असो किंवा मग राजकारण. पण, या शोची ही खुर्ची सर्वार्थानं वेगळी असणार आहे. कारण, या खुर्चीवर जे सेलिब्रिटी, राजकारणी किंवा मान्यवर बसणार आहेत, त्यांना अवधूत गुप्ते असे काही प्रश्न विचारणार आहेत जे त्यांना खुपणार नाही, तर टोचणार आहेत. या आधी देखील ‘खुपते तिथे गुप्ते’ या लोकप्रिय टीव्ही शोने खूप प्रसिद्धी मिळवली होती.



Source link

चला पर्यटनाला : कास, बामणोली अन् किल्ले वासोटा : अनोखी अनुभूती | पुढारी

0









बामणोली; नीलेश शिंदे :  जागतिक वारसास्थळ म्हणून गौरवलेल्या कास पठारासह बामणोली, वासोटा परिसर निसर्ग सौंदर्याची खाण म्हणून ओळखला जात असून, हा परिसर पर्यटकांना बारामहिने साद घालत असतो. कास पठारावरील फुलांचा हंगाम संपला असला, तरी कासचा तलाव पर्यटकांना खुणावत असून, बामणोलीच्या शिवसागर जलाशयातील सफर अनोखी अनुभूती देणारी आहे. याच मार्गावरील किल्ले वासोट्याचे ट्रेकिंग करताना समृद्ध जंगल व प्राणी जगताची नवी ओळख पर्यटकांसाठी पर्वणी ठरत आहे.

सातारा जिल्ह्यात आता बारमाही पर्यटकांची रेलचेल पहावयास मिळत आहे. कोयनेचे पाणी कमी होऊ लागल्यानंतर पाण्यात आयलँड दिसू लागतात. या आयलँडवरही पर्यटकांची गर्दी होत असते. बामणोली, मुनावळे, शेंबडी येथील बोट क्लबच्या माध्यमातून पर्यटकांना बोट सेवा पुरवली जाते. येथून दिसणारा सूर्योदय, सूर्यास्त व पवनचक्क्या प्रकल्प ही आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत. कासच्या तलावाकाठी बसून निवांतपणे गप्पागोष्टी, पाण्यात मौजमस्तीचा आनंद पर्यटक घेत असतात.

किल्ले वासोटा हा अनेक दुर्गयात्रींचा आवडता किल्ला आहे. नैसर्गिक दुर्गमता लाभलेला हा किल्ला जावलीच्या जंगलामधील एक अनोखे दुर्गरत्न आहे. वासोटा किल्ला ट्रेकसाठी महाराष्ट्रभरातून ट्रेकर्स येत असतात. कोयनेच्या शिवसागर जलाशयातून बोटीने दीड तासांचा नयनरम्य प्रवास अ‍ॅमेझॉन खोरेची आठवण करून देतो; तर नंतर सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या राखीव जंगलात वसलेला वासोट्याचा डोंगर चढताना समृद्ध जंगल व प्राणी जगताची ओळख करून देत असतो.

कशी कराल ही अनोखी सफर…

सातारा शहरापासून कास पठार 25 कि.मी. अंतरावर असून, तिथून बामणोली सुमारे 10 कि.मी.चे अंतर आहे. सातारा ते बामणोली हा प्रवास निसर्गाच्या सान्निध्यात सुखद अनुभव देणारा आहे. बामणोली येथून किल्ले वासोटा येथे जाण्यासाठी बोटीतून दीड तासाचा प्रवास करावा लागतो. त्यानंतर पुढे किल्ला सर करण्यासाठी आणखी दीड तासाचे ट्रेकिंग करावे लागते. सातार्‍यातून बामणोलीपर्यंत एस.टी. बससेवा उपलब्ध आहे. सातार्‍यातून पहाटे 5.30 वाजता पहिली एस.टी. बामणोलीकडे रवाना होते. त्यानंतर दुपारी 12.30, 2.00 व सायंकाळी 5.30 असे बसेसचे वेळापत्रक आहे. महाबळेश्वर, तापोळा पर्यटन करणार्‍या पर्यटकांना तापोळ्यातून बोटीने बामणोली येथेही येता येते.











Source link