Friday, July 3, 2026
Home Blog Page 3051

सातारा : माफक दर, प्रदूषणमुक्त वीज निर्मितीत कोयना प्रकल्प आघाडीवर | पुढारी

0









पाटण; गणेशचंद्र पिसाळ : महाराष्ट्राची वरदायिनी ठरलेल्या कोयना धरणातील सिंचनासह निम्म्याहून अधिक राज्यामध्ये प्रकाश देणार्‍या कोयना जलविद्युत प्रकल्पातील टप्पा एक व टप्पा दोन या पोफळी जलविद्युत निर्मिती प्रकल्पाला 61 तर एक हजार मेगावॅट क्षमतेच्या चौथ्या टप्प्याच्या 21 वा वर्धापनाच्या निमित्ताने भारतीय तंत्रज्ञान व अभियंत्यांचा हा धाडसी प्रयोग राज्याला ऊर्जा देणारा ठरला आहे. भारतीय अभियंत्यांच्या तंत्रज्ञान व बुद्धिमत्तेचा अविष्कार असलेले हे जलविद्युत प्रकल्प आहेत.

कोयना धरणाची निर्मिती मुळातच जलविद्युत प्रकल्पाच्या द़ृष्टीने करण्यात आली. हे धरण बांधताना एका बाजूला पूर्वेकडील प्रदेशात मोठ्या प्रमाणावर असलेली सिंचनाची गरज लक्षात घेण्यात आली त्याचबरोबर धरणात अडवलेल्या पाण्यावर पश्चिमेकडे मोठ्या प्रमाणावर वीजनिर्मिती प्रकल्प साकारण्यात आले. एका बाजूला धरणातील पाणी साठवण सुरू झाले आणि त्यासोबतच पश्चिमेकडील प्रामुख्याने चिपळूण तालुक्यात पोफळी, अलोरे, कोळकेवाडी या ठिकाणी कोयना धरणातील पाण्यावर जलविद्युत निर्मितीचे प्रकल्प साकारण्यात आले. कोयनेच्या एकूण चार जलविद्युत प्रकल्पांची तब्बल 1960 मेगावॅट क्षमता असून यातून जवळपास निम्म्याहून अधिक महाराष्ट्राला विजेची गरज भागवली जाते. कोयना जलविद्युत प्रकल्प पोफळी टप्पा एक व दोन हा प्रकल्प 16 मार्च
1962 ला कार्यान्वित झाला त्याचा 61 वा वर्धापन दिन साजरा होत आहे.

त्यानंतर कोयना चौथा टप्पा जलविद्युत निर्मिती प्रकल्प साकारण्यात आला. 250 मेगावॅट क्षमतेच्या चार जनित्रांवर चालणारा तब्बल एक हजार हजार मेगावॅट क्षमतेचा कोयना चौथा टप्पा प्रकल्प आहे. महाराष्ट्राच्या द़ृष्टीने कोयनेचे योगदान हे ऊर्जा व प्रेरणादायी ठरले आहे. जागतिक विचार करायचा झाला तर याच प्रकल्पात धाडसी निर्णय घेण्यात आले. धरणात पाणी असताना लेक टॅपिंगचे तब्बल दोन वेळा प्रयोग करण्यात आले यामध्ये पहिल्या लेक टॅपिंगनंतर कोयना चौथा टप्पा कार्यान्वित झाला. त्यानंतरच्या काळात धरणाची जलपातळी ज्यावेळी 630 मीटरच्या खाली जायची त्यावेळी ऐन उन्हाळ्यात एप्रिल मे महिन्यातच धरणात पाणी असूनदेखील एक हजार मेगावॅट क्षमतेचा हा चौथा टप्पा बंद पडायचा आणि निम्म्याहून अधिक महाराष्ट्राला भारनियमन अथवा अंधाराला सामोरे जावे लागत होते. त्यानंतर धरणात दुसरे लेक टॅपिंग घेण्याचा निर्णय झाला.

अशिया खंडात नावाजलेल्या या लेक टॅपिंगनंतर धरणाची जलपातळी 618 मीटर खाली जाईपर्यंत ही वीजनिर्मिती अखंडित व सुरळीत राहिली. 1960 मेगावॉट क्षमतेच्या या प्रकल्पात पूर्वेकडे धरणातून जे पाणी सिंचनासाठी सोडण्यात येथे त्या पाण्यावर धरणाच्या पायथ्याशी असलेल्या धरण पायथा वीजगृहातून 20 मेगावॅट क्षमतेच्या दोन जनित्रांद्वारे 40 मेगावॅट वीज निर्मिती करण्यात येते. तब्बल 1920 मेगावॅट वीजनिर्मिती ही पोफळी, कोयना चौथा टप्पा, अलोरे या जलविद्युत प्रकल्पातून केली जाते. पूर्वी कोयना धरणाची साठवण क्षमता 98.78टीएमसी होती मात्र त्यानंतर धरण दरवाजांची उंची वाढवून कोणत्याही पुनर्वसनासह शिवाय कमीत कमी खर्चात तब्बल साडेसहा टीएमसीने धरणाची साठवण क्षमता वाढवली.

धरणाची साठवण क्षमता 105.25 टीएमसी

धरणात 105.25 टीएमसी पाणी साठवले जाते. या साठवलेल्या पाण्यापैकी पश्चिमेकडील प्रकल्पांसाठी एक जून ते 31 मे या तांत्रिक वर्षासाठी 67.50 टीएमसी पाणी हे पाणीवाटप लवादानुसार वीज निर्मितीसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे. पूर्वेकडे सिंचनासाठी पाण्याला कोणत्याही मर्यादा नाहीत. सरासरी वर्षभरात तीस ते पस्तीस टीएमसी पाणी सिंचनासाठी वापरले जाते. त्यातूनही वीजनिर्मिती केली जाते.











Source link

TMKOC: ‘तारक मेहता’ची ‘रोशन’ या आधीही ठरलीय कास्टिंग काऊचची शिकार! जुना व्हिडीओ होतोय व्हायरल

0
TMKOC: ‘तारक मेहता’ची ‘रोशन’ या आधीही ठरलीय कास्टिंग काऊचची शिकार! जुना व्हिडीओ होतोय व्हायरल


जेनिफर मिस्त्रीने एकदा तिच्या युट्युब व्लॉगवर कास्टिंग काऊचबद्दल धक्कादायक खुलासा केला होता. तिचा हाच जुना व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये ती स्वतःची आपबिती सांगताना दिसत आहे. जेनिफर म्हणते की, ‘तुम्ही विवाहित आहात हे कोणालाही सांगू नका, नाहीतर तुम्ही कधीही यशस्वी होणार नाही. तुम्ही सगळ्यांना सांगत राहिलात की, तुमचं लग्न झालंय, तर तुम्हाला यश कधीच मिळणार नाही. तुम्ही दुसरे काही करू नका, मी तुम्हाला एक संधी देतो. थोडं थोडं निर्मात्यासोबत फिरावं लागेल… मला हे सगळं सांगितलं जात होतं’.



Source link

Nushrratt Bharuccha Birthday: अनेक वर्षांच्या संघर्षानंतर नुसरत भरुचाच्या चित्रपटाला मिळाला होता १०० कोटींचा गल्ला!

0
Nushrratt Bharuccha Birthday: अनेक वर्षांच्या संघर्षानंतर नुसरत भरुचाच्या चित्रपटाला मिळाला होता १०० कोटींचा गल्ला!


अभिनेत्री नुसरत भरुचा तिच्या बोल्ड लूकसाठी आणि उत्कृष्ट अभिनयासाठी बॉलिवूडमध्ये ओळखली जाते. नुसरतने ‘किटी पार्टी’ या मालिकेतून अभिनयाच्या दुनियेत पाऊल ठेवले. यानंतर तिने आपल्या बॉलिवूड करिअरची सुरुवात ‘जय संतोषी मां’ या चित्रपटामधून केली होती. पण, या चित्रपटातून तिला फारशी ओळख मिळवता आली नाही. पाच वर्षे संघर्ष केल्यानंतर नुसरतला एकता कपूरच्या ‘लव्ह सेक्स और धोखा’ या चित्रपटात कास्ट करण्यात आले होते. तिचा हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला होता.



Source link

Sara Ali Khan: लेहेंगा परिधान करून, रॉयल अंदाजात सारा अली खान पोहोचली कान्सच्या रेड कार्पेटवर!

0
Sara Ali Khan: लेहेंगा परिधान करून, रॉयल अंदाजात सारा अली खान पोहोचली कान्सच्या रेड कार्पेटवर!


यावेळी अनेक भारतीय सेलिब्रिटी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये सहभागी होणार आहेत. ‘केदारनाथ’ फेम बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खानची यंदा रेड कार्पेटवर ही पहिलीच एंट्री होती. याबाबत सारा खूपच उत्साहित दिसत होती. कान्स पदार्पणासाठी सारा अली खान हिने खास भारतीय पोशाख निवडला. तिने अबू जानीची डिझाईन असलेला क्रीम रंगाचा लेहेंगा परिधान केला होता, ज्यासोबत तिने एक लांब ओढणी कॅरी केली होती. सारा या सोहळ्यातील पहिल्या चित्रपटाच्या स्क्रिनिंगच्या प्रीमियरला उपस्थित होती.



Source link

Mukta Barve Birthday: मुक्त बर्वे अजूनही अविवाहित का? अभिनेत्रीने सांगितलेलं ‘हे’ कारण ऐकाच…

0
Mukta Barve Birthday: मुक्त बर्वे अजूनही अविवाहित का? अभिनेत्रीने सांगितलेलं ‘हे’ कारण ऐकाच…


अभिनेत्री मुक्ता बर्वे यंदा तिचा ४५वा वाढदिवस साजरा करत आहे. वयाचा हा टप्पा गाठूनसुद्धा मुक्ता अजूनही अविवाहित आहे. मुक्ताने अजूनही लग्नाचा निर्णय का घेतला नाही, असा प्रश्न तिच्या चाहत्यांना सतत पडत असतो. मुक्ताला लग्नाबद्दल अनेकदा विचारणा झाली आहे. पण, तिने त्यावर ठोस स्पष्टीकरण कधीच दिले नाही. मात्र, अद्याप लग्न न करण्याचे कारण सांगताना मुक्ता म्हणाली की, ‘मी आत्ता जितकी सुखी आणि आनंदी आहे त्यापेक्षा माझा आनंद आणि सुख वाढणार असेल, तरच मी लग्न करेन’.



Source link

Shraddha Kapoor: श्रद्धा कपूरचा मराठमोळा अंदाज, फोटोग्राफर्सशी साधला मराठीत संवाद

0
Shraddha Kapoor: श्रद्धा कपूरचा मराठमोळा अंदाज, फोटोग्राफर्सशी साधला मराठीत संवाद


दरम्यान, श्रद्धाने पिवळ्या रंगाचा टॉप आणि निळ्या रंगाची जीन्स परिधान केली आहे. त्यावर तिने पांढऱ्या रंगाची चप्पल, काळ्या रंगाचा गॉगल घातला आहे. श्रद्धाने केस कापल्यामुळे तिचा लूक थोडा वेगळा वाटत आहे.



Source link

Aamhi Jato Amuchya Gava: ५५ वर्षांपूर्वीचा ‘आम्ही जातो अमुच्या गांवा’ सिनेमा घरबसल्या पहाण्याची संधी

0
Aamhi Jato Amuchya Gava: ५५ वर्षांपूर्वीचा ‘आम्ही जातो अमुच्या गांवा’ सिनेमा घरबसल्या पहाण्याची संधी


दर्जेदार मराठी चित्रपट सादर करत प्रवाह पिक्चर वाहिनीने अल्पावधीतच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. ‘पावनखिंड’, ‘झिम्मा’, ‘चंद्रमुखी’, ‘दगडी चाळ २’, ‘बळी’, ‘कारखानिसांची वारी’ अश्या अनेक नव्या कोऱ्या चित्रपटांच्या वर्ल्ड टेलिव्हिजननंतर प्रवाह पिक्चरवर पाहायला मिळणार आहे ५५ वर्षांपूर्वीचा चिरतरुण चित्रपट ‘आम्ही जातो अमुच्या गांवा.’



Source link

Cannes Film Festival: कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या तिकिटांची किंमत माहितेय का? जाणून बसेल धक्का

0
Cannes Film Festival: कान्स फिल्म फेस्टिव्हलच्या तिकिटांची किंमत माहितेय का? जाणून बसेल धक्का


बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा यावर्षी कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये पदार्पण करणार आहे. या महोत्सवातील एका भव्यदिव्य कार्यक्रमात अनुष्का सहभागी होणार आहे. या कार्यक्रमामध्ये चित्रपटसृष्टीतील महिलांचा गौरव केला जाणार आहे. या कार्यक्रमात अभिनेत्रीसोबत हॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री केट विन्सलेट देखील सहभागी होणार आहे. अनुष्का शर्मा व्यतिरिक्त, माजी मिस वर्ल्ड आणि अभिनेत्री मानुषी छिल्लर देखील यावेळी कान्सच्या रेड कार्पेटवर जलवा दाखवताना दिसणार आहे. या कार्यक्रमात मानुषी अभिनेत्री अनुष्कासोबत दिसणार असल्याचे बोलले जात आहे.



Source link

Avatar: ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ सिनेमा या दिवशी होणार ओटीटीवर प्रदर्शित

0
Avatar: ‘अवतार: द वे ऑफ वॉटर’ सिनेमा या दिवशी होणार ओटीटीवर प्रदर्शित


‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घातला होता. जगभरात चित्रपटाने बक्कळ कमाई केली. आता हा चित्रपट डिस्ने प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट इंग्रजीसह हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत प्रदर्शित होणार आहे. येत्या ७ जूनला हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.



Source link

Prashant Damle: मराठी नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी अभिनेता प्रशांत दामले

0
Prashant Damle: मराठी नाट्यपरिषदेच्या अध्यक्षपदी अभिनेता प्रशांत दामले


रंगकर्मी नाटक समूहाचे विजेते सदस्य

प्रशांत दामले यांना ७५९, सयाजी शिंदे यांना ६३४, सुशांत शेलार ६२३, विजय केंकरे ७०५, विजय गोखले ६६४, सविता मालपेकर ५९१, वैजयंती आपटे ५९० आणि अजित भुरे यांना ६२१ मते मिळाली. तर दुसरा गट प्रसाद कांबळी यांना ५६५ मते आणि सुकन्या माने यांना ५६७ मतांनी विजय मिळाला.



Source link