Monday, July 6, 2026
Home Blog Page 2998

Thalapathy Vijay: थलापती विजयच्या चित्रपटाला विरोध करताच संतापले होते चाहते; सरकारने दिलेल्या वस्तूही फोडल्या!

0
Thalapathy Vijay: थलापती विजयच्या चित्रपटाला विरोध करताच संतापले होते चाहते; सरकारने दिलेल्या वस्तूही फोडल्या!


Thalapathy Vijay Craze : साऊथचा सुपरस्टार थलापती विजय आज (२२ जून) त्याचा ४९वा वाढदिवस साजरा करत आहेत. केवळ साऊथ इंडस्ट्रीच नव्हे तर, संपूर्ण मनोरंजन विश्वात विजयची खूप क्रेझ आहे. आज जगभरातील चाहते आपल्या लाडक्या अभिनेत्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा देत आहेत. विजयच्या चाहत्यांची इतकी क्रेझ आहे की, त्याच्या चित्रपटाला सरकार विरोधी म्हणताच संतापलेल्या चाहत्यांनी थेट सरकारने मोफत दिलेल्या वस्तूंची तोडफोड केली होती.



Source link

खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजेंसह 50 जणांवर गुन्हे दाखल

0


सातारा : साताऱ्यातील (Satara News) प्रस्तावित नव्या बाजार समितीच्या भूमिपूजनावरून बुधवारी साताऱ्यात जोरदार राडा झाला होता. खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आणि आमदार शिवेंद्रराजेंसह (Shivendraraje Bhosale) 50 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. गर्दी जमवणे, दमदाटी आणि मालमत्तेचे नुकसान केल्याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रम पवार यांनी तक्रार केली आहे. 

भाजपचे एक खासदार आणि एक आमदार यांच्यात बुधवारी साताऱ्यात मोठा राडा पहायला मिळाला. खासदार आमदार म्हणजे छत्रपती शिवरायांचे हो दोन वंशज. या दोन्ही वंशजांमध्ये 16 एकर जमिनीचा वाद रंगताना पाहायला मिळाला. खासदार उदयनराजेंच्या नावे असलेली जमिन ही आमदार शिवेंद्रराजेंच्या ताब्यात असलेल्या बाजार समितीच्या नावे झाली आणि बुधवारी (21 जून)  शिवेंद्रराजेंनी त्या जागेत नारळ फोडताना  सगळा राडा झाला. खासदार उदयनराजे भोसले, आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची कराडमध्ये बैठक सुरू आहे. बुधवारी बाजार समितीच्या भूमिपूजनामध्ये दोन्ही राजेंमध्ये मोठा वाद झाला. दोघांचे कार्यकर्तेही काही काळ आक्रमक झाले होते. याबद्दल आज उदयनराजे आणि शिवेंद्रराजे हे फडणवीस यांच्याशी चर्चा करत आहेत.

 भाजपचे खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात  बुधवारी समोरा समोर उभे राहून राडा झाला. अवघ्या तीन फुटांवर एकमेकांना झापाझापीचा कार्यक्रम सुरु होता. सुमारे अडीच -तीन तास हा राडा सुरु होता. पुणे – बेंगलोर महामार्गावरच्या साताऱ्याच्या हद्दीतील उदयनराजें यांच्या जमिनीवरून हा वाद झाला. या राड्यावेळी दोन्ही बाजूने आपापल्या राज्यांच्या नावाच्या घोषणा समर्थकांच्या सुरु होत्या. पोलिसांचा मोठा फौज फाटा त्या ठिकाणी तैनात करण्यात आला होता. दोन्ही गटामध्ये पोलिसांनी साखळी केल्यामुळे वाद टोकाला गेला नाही.मात्र दोन्ही राजे आक्रमक होते.

 शिवेंद्रराजेंना त्या ठिकाणी भूमीपूजनाचा नारळ फोडायचा होता आणि कुदळ मारायची होती. तर उदयनराजेंना ते रोखायचे होते. शिवेंद्रराजेंनी दिलेल्या एक तास वेळेआधी उदयनराजेंनी त्या ठिकाणी जेसीबीसकट ठिय्या मांडला.बाजार समितीने उभारलेल्या ऑफिसचा त्यांनी जेसीबीने चक्काचुर केला. काही वेळातच शिवेंद्रराजे कार्यकर्त्यांसमवेत जागेत दाखल झाले. हळू हळू राडा वाढत गेला. पोलिसांनाही दोन्ही गटाने जुमानले नाही. एवढ्या राड्यातूनही शिवेंद्रराजेंनी नारळ फोडून भूमीपूजन केले. 

 काय आहे नेमका हा वाद ?

 पुणे – बंगळूरु महामार्गावरील सातारा शहरानजिक  सोळा एकर जागा आहे. या जागेवर  छत्रपती शाहू फळे फुले व भाजीपाला मार्केट कमिटीचे नाव आहे. या जागेचे मूळ मालक खा उदयनराजे भोसले आहे. मात्र शिवेंद्रराजे भोसले यांचे वडिल अभियसिंहराजे भोसले हे मंत्री असताना त्यांनी या जागेवर बाजार समितीसाठी आरक्षण टाकले. तसा प्रस्ताव सादर झाला आणि त्याचे जिल्हाधिकाऱ्यांकडे पैसेही भरले गेले. ती जागा जरी उदयनराजेंच्या नावे असली तरी त्या जागेवर अनेक वर्षापासून कुळ आहेत आणि ते आजच्या तारखेपर्यंत जमिन कसत होते. तरीही या जागेवर बाजारसमितीचे नाव लागले.  चौदा वर्षापूर्वी या जागेवर बाजार समित्या नावाचा शिक्का बसला.  अनेक कोर्ट कचेऱ्या झाल्या. मात्र त्यातून कोणताच निर्णय उदयनराजेंच्या बाजूने मिळाला नाही. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार ती जागा बाजारसमितीला देण्याचा निर्णय न्यायालयाने दिला आहे 

उदयनराजे आणि शिवेंद्रराजे हे दोघेही एकाच पक्षातील  आहे . मात्र तरीही दोघांमधील वाद हा संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे. या दोघांच्या वादातील छोटे छोटे पैलू एक दिवसाआड सातारकर अनुभवत असताना हा पुन्हा जागेसाठीचा वादाचा अंक पहायला मिळाला या दोन्ही राजेंच्या वादाचा त्रास मात्र सातारकरांना अनेकदा सोसायला लागला आहे. या दोन्ही राजेंच्या वादाची मोठी ठिणगी ही लोकसभा विधानसभांच्या अगोदर सातारकरांना अनुभवयायला मिळत असते. त्यातीलच हा एक भाग असल्याचे अनेकांचे मत आहे. मात्र यांच्या या वादात सातारकरांचे मुलभूत प्रश्न बाजूला पडत आहेत.

संबंधित बातम्या :

साताऱ्यात बाजार समितीच्या भूमीपूजनावरून राडा, उदयनराजे आणि शिवेंद्रराजे आमनेसामने

 



Source link

Choi Sung Bong Death: प्रसिद्ध कोरियन गायकाचे निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह

0
Choi Sung Bong Death: प्रसिद्ध कोरियन गायकाचे निधन; राहत्या घरात आढळला मृतदेह


Choi Sung Bong Death: ३३ वर्षीय गायक चोई सुंग बाँग याचे दक्षिण कोरियातील सोल येथील राहत्या घरी निधन झाले.



Source link

Leo First Look: साऊथ सुपरस्टार विजयच्या ‘लिओ’चा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला; पाहा जबरदस्त पोस्टर…

0
Leo First Look: साऊथ सुपरस्टार विजयच्या ‘लिओ’चा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला; पाहा जबरदस्त पोस्टर…


लोकेश कनगराज या चित्रपटाचे दिग्दर्शन करत आहेत. या चित्रपटाबाबत चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे. आज निर्मात्यांनी ‘लियो’ मधील सुपरस्टार थलापती विजयचा नवीन लूक रिलीज केला आहे. त्याचा हा लूक खूप जबरदस्त आहे.



Source link

कांदाटीतील तरुणांचे स्थलांतर रोखण्यासाठी उत्पन्नाची साधने वाढवा : मुख्यमंत्री शिंदे | पुढारी

0









सातारा; पुढारी वृत्तसेवा :  कांदाटी खोर्‍यातील तरुण रोजगारासाठी मुंबई, ठाणे व पुणे या शहरांकडे जात आहेत. त्यांचे स्थलांतर रोखण्यासाठी व या तरुणांना पुन्हा रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी कांदाटी खोर्‍यात पर्यटन विकासाबरोबरच त्यांना वनौषधी, बांबू लागवड करण्यास प्रोत्साहित करुन उत्पन्नाचे नवीन साधन तयार करण्यावर भर द्यावा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

दरे ता. महाबळेश्वर येथे आपल्या निवासस्थानी घेतलेल्या सातारा जिल्ह्यातील विविध विकासकामांच्या आढावा बैठकीत मुख्यमंत्री ना. शिंदे बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व धरणांतील पाणीसाठ्याची माहिती घेऊन मुख्यमंत्री ना. शिंदे म्हणाले, सद्य परिस्थितीत पाऊस लांबलेला असून कोयना जलाशयातील जलसाठाही कमी झालेला आहे. यामुळे जलाशयात साठलेला गाळ उचलण्याची संधी निर्माण झाली असून गाळ मुक्त धरण योजनेंतर्गत या जलाशयातील गाळ उचलण्यात यावा. यामुळे कोयना जलाशयाच्या पाणी साठवण क्षमतेत वाढ होईल. जिल्ह्यातील जास्त पर्जन्यमान असलेल्या ठिकाणी बांबू लागवड करून शेतकर्‍यांना त्याद्वारे अधिक उत्पन्न मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावेत.

मुख्यमंत्री अचानक हेलिकॉप्टरने दरे गावी

पाचगणी : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे बुधवारी अचानक सातारा जिल्ह्यातील त्यांच्या मूळ गावी दरेला दाखल झाले. यामुळे जिल्हा प्रशासनाची चांगलीच धांदल उडाली. बुधवारी दुपारी 2 वा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर अचानक दरे गावातील हेलिपॅडवर उतरले अन प्रोटोकॉलप्रमाणे त्यांचे स्वागत करण्यासाठी अधिकार्‍यांची एकच धावपळ उडाली. ना. एकनाथ शिंदे यांच्या आगमनानंतर नूतन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, कोल्हापूर विभागाचे पोलिस उपमहानिरिक्षक सुनील फुलारी, सातारा पोलीस अधीक्षक समीर शेख व अन्य उपस्थित अधिकार्‍यांनी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले.मुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे अचानक गावी येण्यामागचं कारण काय? याबाबत अद्यापही माहिती मिळू शकली नाही. मात्र, नेहमीच लवाजमा घेवून येणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी अचानक एकटेच जिल्हा दौर्‍यावर आल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.











Source link

उदयनराजे-शिवेंद्रराजेंमध्ये राडा | पुढारी

0


सातारा/कोडोली; पुढारी वृत्तसेवा :  सातारा बाजार समितीच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजनावरून बुधवारी खा. उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यात जोरदार राडा झाला. भूमिपूजनाच्या एक तास आधी खा. उदयनराजेंनी तात्पुरते उभारलेले बाजार समितीचे कार्यालय जेसीबीने जमीनदोस्त केले. त्यानंतर लगेचच घटनास्थळी येऊन उदयनराजेंच्या या अ‍ॅक्शनवर आ. शिवेंद्रराजेंनी रिअ‍ॅक्शन देत प्रचंड तणावाच्या वातावरणातही उदयनराजेंसमोरच टिकाव मारून बाजार समितीच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन केले. तब्बल दोन तास दोन्ही राजांमध्ये व त्यांच्या समर्थकांमध्ये हा राडा सुरू होता. या विषयावरून सातार्‍यात रात्री उशिरापर्यंत तणावाचे वातावरण आहे.

सातारा बाजार समितीच्या संभाजीनगर, ता. सातारा येथील जागेवर नवीन इमारत उभारणीचे भूमिपूजन बुधवारी सकाळी आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्या उपस्थितीत होणार होते. यासाठी आमदार गट व बाजार समितीच्या संचालकांनी बुधवारी सकाळी महामार्गालगत असलेल्या जागेवर पत्र्याचे शेड उभे केले होते. भूमिपूजन होणार असल्याची माहिती खा. उदयनराजे यांना समजल्यानंतर ते समर्थकांसह सकाळी 9 वाजताच पोहोचले. खा. उदयनराजेंच्या समर्थकांनी यावेळी भूमिपूजनासाठी उभारलेल्या पत्र्याच्या शेडची मोडतोड करण्यास सुरुवात केली.

अवघ्या पाच मिनिटांमध्ये शेड जमीनदोस्त करण्यात आले. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पाहता पाहता घटनास्थळी समर्थकांची व बघ्यांची गर्दी वाढू लागली. ‘ही जागा आमची आहे. इथे कोणीही पाय ठेवायचा नाही’, अशी भूमिका खा. उदयनराजे भोसले यांनी घेऊन तेथेच त्यांनी तळ ठोकला. या घटनेची माहिती पोलिसांना समजल्यानंतर त्यांनी तात्काळ अतिरीक्त पोलिसांची कुमक मागवून परिसराला वेढा दिला.

भूमिपूजनाच्या जागेवर राडा सुरु असल्याची माहिती आ. शिवेंद्रराजे भोसले यांना समजल्यानंतर तेही समर्थकांसोबत घटनास्थळी दाखल झाले. यावेळी बाजार समितीचे संचालकही उपस्थित होते. आ. शिवेंद्रराजे नियोजित जागेकडे निघाले त्याचवेळी खा. उदयनराजे व त्यांचे समर्थक हे त्यांच्या पाठोपाठ जावू लागले. दोन्ही राजे व त्यांचे समर्थक आमने-सामने उभे राहिले. घटनेचे गांभीर्य पाहून पोनि हेमंतकुमार शहा दोन्ही राजेंमध्ये थांबून राहिले. याचवेळी जागेचे मालक आणि कुळांनी जागेवर बैठक मांडून ‘आमच्यावर अन्याय नको’, अशी मागणी केली. यावेळी दोन्ही राजे समर्थकांनी आपल्या नेत्यांच्या जयघोषाच्या घोषणा देण्यास सुरुवात केली. यावेळी एकमेकांविरुध्दही घोषणाबाजीला सुरुवात झाल्यानंतर पुन्हा वातावरण तापले. अखेर घोषणाबाजी सत्र थांबल्यानंतर दोन्ही राजेंनी आपापल्या बाजू पोलिसांपुढे मांडल्या.

दोन्ही राजेंनी एकमेकांच्या समोर उभे राहून युक्तिवाद केला. वहिवाटदार यांची ही जागा असून याची कोणतीही परवानगी आमदार गटाने घेतलेली नाही. त्यामुळे हे भूमिपूजन बेकायदेशीर आहे, अशी बाजू खासदार गटाने मांडली. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार या जागेचा सातबारा मार्केट कमिटीच्या नावावर झाला आहे. खासदार गटाकडे कायदेशीर कागदपत्रे असतील तर ती दाखवावी, अशी मागणी शिवेंद्रराजे यांनी केली. यावेळी पुन्हा समर्थकांनी जोरदार घोषणाबाजीला सुरुवात केली. त्यामुळे एकच गोंधळ उडाला. या वादातच आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी मार्केट कमिटीच्या नूतन इमारतीचा भूमिपूजनाचा टिकाव मारला व नारळ फोडला. यावेळी कुळांनी ‘आमची जागा असून येथे कोणी पाय ठेवू नका’, अशी भूमिका घेत दोन्ही राजांच्या समोर ठिय्या मारला. त्यांनी आमदार व मार्केट कमिटीला निषेध केला. तर आमदार गटाने जोरदार घोषणाबाजी केली.

आ. शिवेंद्रराजेंनी उदयनराजेंच्या समोरच टिकाव मारल्याने आमदार गटाला जोरदार चेव चढला. पोलिसांनी दोघांतील वाद थांबवण्याचा प्रयत्न केला. पण दोन्ही राजे आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. हा वाद सुरू असतानाच आमदार समर्थक आणि मार्केट कमिटीच्या संचालकांनी त्याच जागेत पुन्हा नारळ फोडला व भूमिपूजन करून फटाक्यांची आताषबाजी केली. आमदार गटाने ही चाल केल्यानंतर संभाजीनगर ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी त्याच जागेत खा. उदयनराजे यांच्या समोरच ग्रामपंचायतीच्या विकासकामांचा नारळ फोडला. त्यावेळी खा. उदयनराजे यांच्या समर्थकांनी घोषणाबाजी केली.

ही घोषणाबाजी सुरू असतानाच वाद चिघळला आणि दोन्ही बाजूकडून रेटारेटीला सुरुवात होत समर्थकांमध्ये धक्काबुक्की झाली. यानंतर आ. शिवेंद्रराजे भोसले व त्यांचे समर्थक तेथून निघून गेले. सकाळी 9 वाजता ठिय्या मांडून बसलेले खा. उदयनराजे भोसले हे देखील 11.30 वाजता समर्थकांना सूचना देवून तेथून बाहेर पडले. पोलिसांचा बंदोबस्त मात्र तेथे कायम होता. या घटनेवरुन दिवसभर सातार्‍यात तणावाचे वातावरण होते.

दोन्ही गटांकडून भूमिपूजन…
आ. शिवेंद्रराजे भोसले व बाजार समिती नूतन संचालकांनी बाजार समितीच्या नूतन इमारतीचे भूमिपूजन केले तर खा. उदयनराजे भोसले व संभाजीनगर, खिंडवाडी ग्रुप ग्रामपंचायत सदस्यांनी विविध विकासकामांचे भूमिपूजन यावेळी केले. यावेळी दोन्ही गटांकडून फटाक्याची आतषबाजी करत घोषणाबाजी केली.

The post उदयनराजे-शिवेंद्रराजेंमध्ये राडा appeared first on पुढारी.



Source link

Adipurush: अखेर ‘आदिपुरुष’चे संवाद बदलले! ‘जलेगी भी तेरे बाप की..’च्या ऐवजी ऐकू येणार नवा डायलॉग

0
Adipurush: अखेर ‘आदिपुरुष’चे संवाद बदलले! ‘जलेगी भी तेरे बाप की..’च्या ऐवजी ऐकू येणार नवा डायलॉग


Adipurush Dialogue Change : ओम राऊत दिग्दर्शित ‘आदिपुरुष’ हा चित्रपट रिलीज झाल्यापासूनच वादात सापडला आहे. या चित्रपटाचे व्हीएफएक्स प्रेक्षकांना आवडले नाही. तसेच, चित्रपटातील संवादांवरही लोकांनी अनेक आक्षेप नोंदवले आहेत. या चित्रपटातील संवादांच्या भाषेवरून बरेच वाद सुरू आहेत. आता, मात्र निर्मात्यांनी चित्रपटाचा एक संवाद बदलला आहे. या चित्रपटात लंका दहनाचे दृश्य आहे, ज्यामध्ये हनुमानजींची भूमिका साकारणारा अभिनेता देवदत्त नागे म्हणतो की, ‘कपडा तेरे बाप का, तेल तेरे बाप का, जलेगी भी तेरे बाप की..’ चित्रपटातील या डायलॉगवरून सध्या बराच गदारोळ सुरू आहे. मात्र, आता निर्मात्यांनी हा संवाद बदलून त्यातून ‘बाप’ हा शब्द काढून टाकला आहे.



Source link

Amrish Puri : लोकांचा इन्श्युरन्स काढणारे अमरीश पुरी ‘असे’ बनले बॉलिवूडचे सुपर व्हिलन! वाचा…

0
Amrish Puri : लोकांचा इन्श्युरन्स काढणारे अमरीश पुरी ‘असे’ बनले बॉलिवूडचे सुपर व्हिलन! वाचा…


जेव्हा अमरीश पुरी खलनायकाच्या भूमिकेत पडद्यावर यायचे, तेव्हा लोक अक्षरशः घाबरायचे. दमदार अभिनयासोबतच त्यांची संवादफेक शैलीही चाहत्यांना खूप आवडली होती. अमरीश पुरी हे आजही बॉलिवूडमधील सर्वोत्तम खलनायक मानले जातात. ‘मिस्टर इंडिया’, ‘दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे’, ‘घातक’, ‘दामिनी’, ‘करण-अर्जुन’ या सर्व चित्रपटांमध्ये सुपरस्टार कलाकार मुख्य अभिनेत्याच्या भूमिकेत होते. पण, या चित्रपटांना सुपरहिट करण्यात चित्रपटाचे खलनायक अमरीश पुरी यांचा मोठा वाटा होता.



Source link

Thalapathy Vijay Birthday: कधीकाळी ५०० रुपये मिळवणारा विजय आता कमाईत रजनीकांतलाही टाकतोय मागे! वाचा…

0
Thalapathy Vijay Birthday: कधीकाळी ५०० रुपये मिळवणारा विजय आता कमाईत रजनीकांतलाही टाकतोय मागे! वाचा…


Happy Birthday Thalapathy Vijay : साऊथचा सुपरस्टार अभिनेता थलापती विजय आज (२२ जून) आपला ४९वा वाढदिवस साजरा करत आहे. विजय हा साऊथ फिल्म इंडस्ट्रीचा सुपरस्टार आहे. त्याने ‘बीस्ट’, ‘मास्टर’सारखे अनेक सुपरहिट चित्रपट केले आहेत. आजफ्गाडीला इंडस्ट्रीतील सर्वाधिक मानधन आकारणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीमध्ये विजयचे नाव अग्रक्रमी आहे. मात्र, आज जरी विजय कोट्यवधींची फी आकारात असला, तरी त्याला त्याच्या पहिल्या चित्रपटासाठी अवघे ५०० रुपये मिळाले होते.



Source link

सातारा : खासदार उदयनराजेंसह ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल | पुढारी

0









सातारा, पुढारी वृत्तसेवा : खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह समर्थकांमध्ये झालेल्या वादावादीनंतर सातारा शहर पोलीस ठाण्यात उदयनराजे यांच्यासह ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. संशियतांनी जीवे मारण्याची धमकी देऊन २ लाख रुपये किंमतीच्या साहित्याचे नुकसान केले, असल्याचे आ. शिवेंद्रराजे भोसले यांचे समर्थक विक्रम पवार यांनी तक्ररीत म्हटले आहे. दरम्यान, संशयितामध्ये जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, माजी नगराध्यक्ष, नगरसेवकांचा समावेश आहे.

खा. उदयनराजे, विनीत पाटील, अजय मोहिते, सनी भोसले, अमोल तांगडे, पंकज चव्हाण, स्वप्नील घुसाळे, गणेश जाधव, पंकज मिसाळ, सतीश माने, जितेंद्र खानविलकर, सोमनाथ उर्फ काका धुमाळ, अभिजित मोहिते, समीर माने, राहुल गायकवाड, सुभाष मगर, किशोर शिंदे यांच्यासह ५० जणांविरुद्ध बेकायदा जमाव जमवणे, दमदाटी करून नुकसान करणे यानुसार गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचंलत का?











Source link