Tuesday, July 7, 2026
Home Blog Page 2997

CM Eknath Shinde Dare Satara EXCLUSIVE : … जेव्हा एकनाथ शिंदे पत्नीसह शेतात राबतात

0



<p>मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्यांच्या दरे गावात असून एबीपी माझाच्या कॅमेऱ्यात आगळेवेगळे शिंदे कैद झालेत…पत्नीसह शेतात काम करणारे शिंदे तुम्ही पाहिलेत का? नसेल तर आम्ही आज तुम्हाला मुख्यमंत्र्यांच्या शेतात घेऊन जाणार आहोत… शेतीची पाहाणी करताना… शेती करताना मुख्यमंत्र्यांसोबत खास गप्पाही झाल्या… पाहुयात</p>
<p>&nbsp;</p>



Source link

Devendra Fadnavis Speech Karad : मणिपूरसाठी अमित शाह पुरेसे, तुम्हाला मोदींवर बोलण्याचा अधिकार नाही

0



<p>Devendra Fadnavis Speech Karad : मणिपूरसाठी अमित शाह पुरेसे, तुम्हाला मोदींवर बोलण्याचा अधिकार नाही</p>



Source link

मातोश्रीवरून वरळीपर्यंत जाऊ शकला नाही, तुम्हाला मोदींवर बोलण्याचा अधिकार नाही; फडणवीसांचा टोला

0


Devendra Fadnavis on Uddhav Thackeray: पीएम मोदींना अमेरिकेला नाही तर मणिपूरला जाण्याची गरज आहे असे एक नेते म्हणाले, पण मी त्यांना सांगू इच्छितो की मणिपूरसाठी आमचे अमित शाह पुरेसे असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. त्यांनी आज सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये बोलताना उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेवरून समाचार घेतला. फडणवीस यांनी मोदी सरकारला 9 वर्ष झाल्याच्या पार्श्वभूमीवर लेखाजोखा मांडतानाच ठाकरे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. 

फडणवीस म्हणाले की, ही 9 वर्षे विकासाची आहेत. या 9 वर्षात सर्वसामान्य जनतेच्या जीवनात बदल करणारे आहेत. अमेरिकेत मोदींच्या नेतृत्वात योगदिवस साजरा करण्यात आला. मूठभर लोकांच्या हितासाठी निर्णय घेतले नाहीत. यावेळी बोलताना फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. आम्हाला आमच्या तिजोऱ्या भरायच्या नाहीत, आम्हला आमची घर भरायची नाहीत, तर जनतेची सेवा करायची आहे. 2024 मध्ये साताराचे खासदार आणि कराड दक्षिणचे आमदार भाजपचेच असतील, जनता अतुल भोसले यांच्या पाठीशी उभा राहतील यात शंका नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. 

तुम्हाला मोदींवर बोलण्याचा अधिकार नाही

फडणवीस म्हणाले की, ते नेते (उद्धव ठाकरे) कधी मातोश्रीवरून वरळीला जाऊ शकले नाहीत. तुम्हाला मोदींवर बोलण्याचा अधिकार नाही. फडणवीस यांनी मोदींनी लस दिल्याचे म्हटल्यानंतर शिवसेना वर्धापन दिनात बोलताना त्यांचा ऑडिओ ऐकवून उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांची खिल्ली उडवली होती. यावर फडणवीस यांनी उद्धव ठाकरे म्हणाले मोदींनी लस तयार केली काय? मग मी म्हणतो तुम्ही सरकार चालवलं म्हणे बैलगाडीसारखं हाकत होता काय?

कोरोना काळात अन्नाविना एक मृत्यू झाला नसल्याचे फडणवीस म्हणाले. शेतकरी सन्मान योजनेत केंद्राचे 6 आणि राज्याचे 6 असे 12 हजार रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. या सरकारच्या आधीच्या अडीच वर्षाच्या सरकारने एक पैसा देखील दिला नाही, आपण आता अनेक प्रकल्पांना निधी उपलब्ध करून दिला. 2019 साली मी सोडून गेलेल्या योजना आहे तिथंच होत्या.  इथल्या योजना देखील माझी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वाट बघत असतील असं वाटतं. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हिमतीने घेतलेल्या निर्णयामुळे या भागातील साखर कारखाने सुरू राहिला, त्यामुळे आमचा ऊस उत्पादक शेतकरी वाचला. अनेक नेते म्हणत होते की मोदींना उसामधील काय कळतं? पण मोदींनी निर्णय घेऊन दाखवले आता केंद्रीय सहकार अमित शाह देखील झपाट्याने निर्णय घेत आहेत. शेतकऱ्यांना दिवसा वीज देण्याचा निर्णय घेतला जात आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 



Source link

Satara Koyna Dam Water Level : महाराष्ट्रातील सर्वात मोठं धरण कोरडं ठाक

0



<p>महाराष्ट्राला वीज निर्मिती करून देणार सर्वात मोठं धरण म्हणजे सातारा जिल्ह्यातील कोयना धरण. 105 टीएमसी असलेलं धरण आज कोरडे ठाक पडल्याचं चित्र पाहायला मिळतंय. &nbsp;कारण कोयना धरणामध्ये &nbsp;आता साडे दहा टीएमसी इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याबरोबर या कोयना धरणा अंतर्गत असलेल्या 105 गावातील लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न ऐरणीवर आलाय.. शिवाय पाऊस न झाल्याने या भागातल्या &nbsp;पेरण्याही रखडलेल्या आहेत.</p>
<p>&nbsp;</p>



Source link

सातारा : गिरणी कामगारांची वारी जिल्हाधिकाऱ्यांच्या दारी | पुढारी

0


सातारा; पुढारी वृत्तसेवा : राज्यातीत 1 लाख 75 हजार गिरणी कामगार अद्यापही घराच्या प्रतीक्षेत आहेत. यामध्ये सातारा जिल्ह्यातील जवळपास 20 हजार पेक्षा जास्त गिरणी कामगार आहेत. आतापर्यंत सातारा जिल्ह्यात हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्याच गिरणी कामगारांना घरे देण्यात आलेले आहेत. याचा निषेध करण्यासाठी आज सातारा येथे गिरणी कामगार व गिरणी कामगारांच्या वारसांनी सरकारता जागे करण्यासाठी पंढरपुरला न जाता शासन दरबारी आपली दिंडी वळवली.

येणाऱ्या पावसाळी अधिवेशनाचे औचित्य साधत सरकारला जागे करण्यासाठी सदरील मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती गिरणी कामगार तरुण स्वराज्य सेवा संस्थेचे अध्यक्ष तेजस कुंभार, विठ्ठल चव्हाण, दिलिप सावंत, अर्जुन भादवणकर यांनी दिली. एका गिरणी कामगाराला मुंबईमध्ये घर तर दुसऱ्या गिरणी कामगाराला मुंबईच्या बाहेर घर ही सरकारची दुटप्पी भूमिका गिरणी कामगारांच्या वारसांना तथापी मान्य नाही. सरकारने पावसाळी अधिवेशनाच्या अगोदर गिरणी कामगारांच्या हक्कांच्या घरांबाबत ठोस निर्णय न घेतल्यास जिल्ह्यातील तसेच संपूर्ण राज्यातीत गिरणी कामगार आझाद मैदानावर हजारोच्या संख्येने उतरल्याशिवाय राहणार नाहीत, असे तेजस कुंभार यांनी सांगितले. तसेच काँग्रेसच्या काळातील 2001 मध्ये झालेल्या शासन निर्णयाची अंमलबजावणी सरकारने तत्काळ लागू करावी. मिलच्या जागेवरती जो काही रोजगार उपलब्ध होईल त्या रोजगारांमधील प्रथम प्राधान्य हे गिरणी कामगारांच्या वारसांना मिळेल, अशा पद्धतीचा शासन निर्णय आहे. मात्र मिलच्या जागेवरती जे काही रोजगार आज उपलब्ध आहेत त्या ठिकाणी परप्रांतीयांना प्राधान्य देण्यात आले आहे, असा आरोप अध्यक्ष तेजस कुंभार यांनी केला.

राज्यात सुरू असलेल्या काही नोकर भरतीत गिरणी कामगारांच्या मुलांना किमान पाच टक्के आरक्षण लागू करावे, अशी मागणी देखील तरुण स्वराज्य सेवा संस्थेच्यावतीने करण्यात आली आहे. पुढील काही दिवसात प्रत्येक गिरणी कामगारांच्या घरावर इथे गिरणी कामगार राहतात असे फलक पाहायला मिळणार असल्याचे कुंभार यांनी सांगितले. त्यामुळे स्थानिक प्रतिनिधी याकडे कितपत लक्ष देऊन गिरणी कामगारांना न्याय मिळवून देतात हे पाहणे महत्वाचे आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये गिरणी कामगारांना घर नाही तर तुमच्या पक्षाला मतदान नाही, अशा प्रकारची भूमिका गिरणी कामगारांनी आज घेतली. सदरीत मेळाव्याचे आयोजन गिरणी कामगार तरुण स्वराज्य सेवा संस्थेचे सातारा जिल्हा अध्यक्ष विठ्ठल चव्हाण दीलीप सावंत यांनी केले होते. या मोर्चामध्ये गिरणी कामगार तरुण स्वराज्य सेवा संस्थेचे अध्यक्ष श्री तेजस कुंभार, अर्जुन भादवणकर, विशाल कुंभार, सागर पिसाळ, अभिजीत शेलार आदी उपस्थित होते.

हेही वाचा : 

The post सातारा : गिरणी कामगारांची वारी जिल्हाधिकाऱ्यांच्या दारी appeared first on पुढारी.



Source link

Rang Maza vegla: अखेर घाडगे वकिलाचा पेनड्राईव्ह दीपाला सापडणार! आयेशाला पुन्हा शिक्षा होणार?

0
Rang Maza vegla: अखेर घाडगे वकिलाचा पेनड्राईव्ह दीपाला सापडणार! आयेशाला पुन्हा शिक्षा होणार?


Rang Maza Vegla Latest Episode: ‘रंग माझा वेगळा’मध्ये लवकरच आयेशाच खरं रूप उघड होणार असून, यावेळी दीपा आयेशाला कठोर शिक्षा ठोठावणार आहे.



Source link

कराड : खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीला | पुढारी

0









कराड, पुढारी वृत्‍तासेवा : सातारा बाजार समितीच्या कार्यक्रमावरून बुधवारी साताऱ्यात खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यासह त्यांच्या समर्थकांत जोरदार वाद झाला होता. याप्रकरणी खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर गुन्हाही दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे भोसले व आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी गुरुवारी सकाळी कराडमध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवारी रात्री उशिरा कराड मधील कृष्णा विश्व विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये दाखल झाले. गुरुवारी सकाळी प्रथम खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले कराडमधील आपल्या समर्थकांसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी दाखल झाले. त्यानंतर आमदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले हे आपल्या समर्थकांसह कृष्णा विश्व विद्यापीठाच्या विश्रामगृहात दाखल झाले.

तत्पूर्वीच विश्रामगृहात भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे, धैर्यशील कदम, डॉक्टर अतुल भोसले यांच्यासह जिल्ह्यातील नेते उपस्थित होते. सर्व नेत्यांमध्ये जवळपास अर्धा तासाहून अधिक काळ चर्चा झाली. मात्र या चर्चेचा तपशील समजू शकला नसला तरी बुधवारच्या वादावर या बैठकीत चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.











Source link

सातारा: अशा गोष्टी कधी कधी होत असतात : देवेंद्र फडणवीस | पुढारी

0









सातारा, पुढारी वृत्‍तसेवा : सातारा येथील विषयाबाबत दोन्ही राजांशी चर्चा झाली आहे. सातारा येथे फार गंभीर गोष्ट घडलेली आहे असे नाही. अशा गोष्टी होतच असतात अशा शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सातारा येथे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले आणि आमदार श्रीमंत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यातील वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

साताराच्या दोन्ही राज्यांशी चर्चा झाली आहे. जिल्ह्यातील विकास कामासंदर्भात त्यांनी काही निवेदने ही दिली आहेत. विकास कामासंदर्भात विशेषत: विकास कामासंदर्भात विस्तृत चर्चा आज झाली. दोन्ही राजांना जनतेचे प्रश्न महत्त्वाचे वाटत आहेत. त्यांना जनतेचे प्रश्न मांडायचे आहेत. अशा गोष्टी कधी कधी होत असतात, पण असे नाही की जिथे काही गंभीर घडले आहे. अशा गोष्टी कधी कधी होत असतात ते फार अडचणीचे आहे असे नाही असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्याचबरोबर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार लवकरच होईल असा विश्वासही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.

 

हेही वाचा 

अहमदनगर : अल्पवयीन मुलीला पळविणारे दोघे गजाआड

Maharashtra politics | ठाकरे कुटुंबियांच्या सुरक्षेबाबत केसरकरांचा मोठा खुलासा

पावसाची ओढ; मत्स्यबीज उत्पादनही आले संकटात











Source link

Adipurush: ‘आदिपुरुष’च्या कमाईत घसरण; प्रेक्षकांना चित्रपटगृहात आणण्यासाठी मेकर्सनी घेतला मोठा निर्णय!

0
Adipurush: ‘आदिपुरुष’च्या कमाईत घसरण; प्रेक्षकांना चित्रपटगृहात आणण्यासाठी मेकर्सनी घेतला मोठा निर्णय!


Adipurush Ticket Prices: ‘आदिपुरुष’च्या वादाचा परिणाम आता चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवरही होऊ लागला आहे. दरम्यान आता निर्मात्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.



Source link

सातारा : आ. शिवेंद्रराजेंसह ८० जणांविरुद्ध गुन्हा दाखल | पुढारी

0


सातारा: पुढारी वृत्तसेवा :  बुधवारी सकाळी खा. उदयनराजे व आ. शिवेंद्रराजे भोसले यांच्यासह समर्थकांमध्ये  वादावादी झाली हाेती.  यानंतर सातारा शहर पोलिस ठाण्यात आ. शिवेंद्रराजे यांच्यासह 80 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्‍या माहितीनुसार, संपत महादेव जाधव यांनी संशयितांनी माझ्या शेतजमीनमध्ये बेकायदेशीर जमाव जमवून जिवे मारण्याची धमकी दिलयाची  तक्रार केली आहे. दरम्यान, संशयितांमध्ये नगरसेवक, सरपंच यांच्यासह राजकीय पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे.

आ. शिवेंद्रराजे भोसले, विक्रम पवार, मधुकर पवार, आनंदराव कणसे, अरुण कापसे, अमीन कच्छी, विजय पोतेकर, रमेश चव्हाण, राजेंद्र नलावडे, शैलेंद्र आवळे, संजय पवार, अनिल जाधव, फिरोज पठाण, रवी ढोणे, अमित महिपाल यांच्यासह 80 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, काल रात्री खा. उदयनराजे यांच्यासह त्यांच्या समर्थकावर गुन्हा  दाखल करण्यात आला हाेता. यानंतर आ. शिवेंद्रराजे यांच्यासह त्यांच्या समर्थकावर दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाप्रकारे सध्या परस्पर विरोधी तक्रार दाखल झाल्या आहेत, अशी माहिती पाोलिसांनी दिली.

Ashadhi Wari 2023 : आषाढी एकादशीला कोल्हापुरातून एकही विशेष रेल्वेगाडी नाही

Nashik ZP : निधीचा नाही पत्ता; काम करा आत्ता, 15 कोटींच्या कामांना मान्यता

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या लंडनमधील निवासस्थानावर परदेशी संस्थांचा डोळा



Source link