Tuesday, July 7, 2026
Home Blog Page 2996

राजेंच्या भांडणाकडे फडणवीसांचा कानाडोळा | पुढारी

0


कराड, पुढारी वृत्तसेवा : सातार्‍यातील बाजार समितीच्या जागेवरून बुधवारी खा. उदयनराजे व आ. शिवेंद्रराजे यांच्यासह समर्थकांमध्ये झालेल्या भांडणाकडे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांनी कानाडोळा केला आहे. खा. उदयनराजे व आ. शिवेंद्रराजे यांनी जनतेचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देत विकासकामांबाबत निवेदने दिली आहेत. सातार्‍यात फार गंभीर घडले आहे असे नाही. अशा गोष्टी होतच असतात, असे सांगत या प्रकरणावर अधिक भाष्य करणे टाळले.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बुधवारी मध्यरात्री मलकापूर (कराड) येथील कृष्णा विश्व विद्यापीठाच्या विश्रामगृहात दाखल झाले. त्यानंतर गुरूवारी सकाळी जिल्ह्यातील भाजपा नेत्यांसह खा. उदयनराजे भोसले व आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्वतंत्रपणे समर्थकांसमवेत भेट घेतली. बुधवारी सातारा बाजार समितीच्या कार्यक्रमावरून झालेल्या राडेबाजीनंतर दोन्ही राजे व त्यांच्या समर्थकांविरूद्ध गुन्हे दाखल झाले आहेत. या पार्श्वभूमीवर या भेटीकडे संपूर्ण जिल्ह्यासह राज्याचे लक्ष लागून राहिले होते.

खा. उदयनराजे भोसले हे सकाळी आठ वाजण्यापूर्वीच कृष्णा विश्व विद्यापीठाच्या विश्रामगृहात दाखल झाले होते. भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे, आ. महेश शिंदे, धैर्यशिल कदम, विक्रम पावसकर, डॉ. अतुल भोसले यांच्यासह भाजपा नेत्यांच्या उपस्थितीत त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर साडेआठच्या सुमारास आ. शिवेंद्रराजे भोसले हे आपल्या सहकार्‍यांसह दाखल झाले. खा. उदयनराजे भोसले हे चर्चा करत असतानाच आ. शिवेंद्रराजे भोसले दाखल झाले आणि त्यांनीही उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. त्याचवेळी खा. उदयनराजे भोसले बैठकीतून बाहेर येत डॉ. अतुल भोसले यांच्यासह भाजपा नेत्यांशी चर्चा करताना पहावयास मिळाले.त्यानंतर जवळपास अर्धा ते पाऊण तासाने आ. शिवेंद्रराजे भोसले हे बैठकीतून बाहेर येत डॉ. अतुल भोसले यांचे बंधू विनायक भोसले यांच्यासह धैर्यशिल कदम व अन्य भाजपा नेत्यांशी चर्चा करताना पहावयास मिळाले. दोन्ही नेत्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. मात्र या भेटीचा तपशील उपलब्ध होऊ शकला नव्हता.

शासकीय आढावा बैठकीनंतर खा. उदयनराजे भोसले यांना याबाबत विचारले असता त्यांनी या बैठकीबाबत कोणतेच भाष्य केले नाही. तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी सातार्‍यात आमदार व खासदार गटातील वादाबाबत विचारणा करत काय चर्चा झाली ? असा प्रश्न केला. त्यावेळी उपमुख्यमंत्र्यांच्या पाठिमागे उभे असलेल्या आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी केवळ स्मितहास्य केले. तर उपमुख्यमंत्र्यांनी सातार्‍यातील वाद फारसा गंभीर नाही, असे सांगत अशा गोष्टी कधी कधी होतच असतात असे सांगितले. त्याचवेळी दोन्ही नेत्यांनी जनतेच्या प्रश्नांसह सिंचन प्रश्नाबाबत निवेदन दिले आहे. दोन्ही नेत्यांसाठी जनतेचे प्रश्न सुटणे महत्त्वाचे असल्याचे सांगत या वादाबाबत अधिक भाष्य करणे टाळले.

उपमुख्यमंत्र्यांची दोन तासाहून अधिक काळ चर्चा…

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकाळी साडेसात वाजल्यापासूनच जिल्ह्यातील भाजपा नेत्यांशी विविध विषयावर चर्चा करण्यास सुरूवात केली होती. सकाळी 10 वाजता कृष्णा हॉस्पिटल कॅम्पस येथे भाजपा सातारा जिल्हा कोअर कमिटीची बैठक होणार होती. तर 10.30 वाजता शासकीय योजनांचा आढावा घेण्यासाठी शासकीय अधिकार्‍यांची बैठक होणार होती. मात्र असे असले तरी उपमुख्यमंत्री सकाळी पावणे अकराच्या सुमारास भाजपा नेत्यांशी चर्चा केल्यानंतर नाश्ता करण्यासाठी आले आणि त्यानंतर 15 ते 20 मिनिटांनी ते शासकीय बैठकीसाठी रवाना झाले.

मंत्रीमंडळ विस्तार होणारच…

राज्य मंत्रीमंडळ विस्ताराबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारले असता त्यांनी मंत्रीमंडळ विस्तार लवकरच होईल असे स्पष्ट केले.

The post राजेंच्या भांडणाकडे फडणवीसांचा कानाडोळा appeared first on पुढारी.



Source link

सातारा : परत पाय ठेवला तर खल्लास करीन : खा. उदयनराजेंकडून धमकी | पुढारी

0


सातारा, पुढारी वृत्तसेवा : बाजार समितीच्या जागेवरून बुधवारी झालेल्या राड्याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्यासह 49 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. ‘ही माझ्या मालकीची जमीन आहे. परत पाय ठेवला तर पाय काढून खल्लास करीन,’ अशी धमकी खा. उदयनराजे यांनी दिल्याची तक्रार आ. शिवेंद्रराजे समर्थक विक्रम पवार यांनी दिली आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, माजी नगराध्यक्ष, नगरसेवक यांच्यावरही गुन्हा दाखल झाला आहे.

खा. उदयनराजे भोसले यांच्यासह विनीत पाटील, अजय मोहिते, सनी भोसले, अमोल तांगडे, पंकज चव्हाण, स्वप्नील घुसाळे, गणेश जाधव, पंकज मिसाळ, सतीश माने, जितेंद्र खानविलकर, सोमनाथ उर्फ काका धुमाळ, अभिजित मोहिते, समीर माने, राहुल गायकवाड, सुभाष मगर, किशोर शिंदे, कुणाल चव्हाण, नंदकुमार नलवडे, रोहित लाड, युनुस झेंडे, अनिल पिसाळ, काशिनाथ गोरड, संपत जाधव, शेखर चव्हाण, सौरभ सुपेकर, प्रवीण धस्के, सुनील काटकर, संदेश कुंजीर, सागर जाधव, अर्चना देशमुख, गितांजली कदम, रंजना रावत, अश्विनी गुरव यांच्यासह अनोळखी 15 अशा एकूण 49 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

विक्रम पवार यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, सन 2015 पासून कृषी उत्पन्न बाजार समितीचा सभापती म्हणून कार्यरत आहे. मी सभापती होण्यापूर्वीच संभाजीनगर ग्रामपंचायत हद्दीतील गट नंबर 6/3/2, 6/3/3, 6/3/4, 6/3/5/6/4/1/अ, 6/4/2/ब + 6/3/4/क, 6/3/4/अ, 6/3/4/ब, 6/3/1 यावर बाजार समिती सातारा अशी नोंदणी झालेली होती. मी सभापती झाल्यानंतर या जागेचे विकसन करण्यासाठी प्रयत्न सुरु केले. तेव्हा मला खा. श्री. छ. उदयनराजे भोसले व जमिनीचे कुळ संपत जाधव, गणपत जाधव, अशोक जाधव (सर्व रा. सातारा परिसर) हे विरोध करू लागले. यामुळे मी पोलीस बंदोबस्तात संबंधित जागेचे विकसन करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालय येथे रिट पिटीशन नं 2390/2017 प्रमाणे अर्ज दाखल केला.

विक्रम पवार यांनी तक्रारीत पुढे म्हटले आहे की, उच्च न्यायालयात सुनावणी होऊन न्यायालयाने पोलीस अधिक्षक यांना बाजार समितीला संबंधित जागेचे विकसन करण्यासाठी पोलिस बंदोबस्त द्यावा, असा आदेश पारित केला. त्यावर खा. श्री. छ. उदयनराजे भोसले यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशावर रिट पिटीशन नं 8614/2017 प्रमाणे अर्ज करून स्थगिती मिळवली होती.

त्यानंतर सन 2017 ते 2022 पर्यंत रिट पिटीशनमध्ये वेळोवेळी सुनावणी होऊन दि.17 फेब्रुवारी 2022 रोजी त्यांची रिट पिटीशीन उच्च न्यायालयाने फेटाळून लावली. त्यानुसार जागेच्या विकसनासाठी आम्हाला यापूर्वीच उच्च न्यायालयाने पोलिस बंदोबस्ताचा आदेश पारित केला होता. त्यानुसार आम्ही पोलिस अधिक्षकांकडे रितसर बंदोबस्तासाठी अर्ज केला. त्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे व शासकीय शुल्क भरल्यानंतर दि. 20 जून 2023 ते दि. 26 जून 2023 रोजी पर्यंत पोलिस बंदोबस्त दिला.

सातारा पोलिस दलाचा बंदोबस्त मिळाल्याने संबंधित जागेवर काम सुरू करण्यासाठी आम्ही लोखंडी कंटेनर ठेवला होता. दि. 21 जून रोजी या कामाचा शुभारंभ करण्यासाठी मी, आ. शिवेंद्रराजे भोसले, बाजार समितीचे संचालक तसेच इतर काही लोक हजर असताना सकाळी अंदाजे 9.45 वाजता संशयितांनी पोलिस बंदोबस्त असतानाही आमच्या विकसनाच्या कामास विरोध केला. मी तसेच आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी त्यांना कायदेशीर बाबी समजावून सांगितल्या. तसेच पोलिसांनी त्यांना व आम्हाला शांततेचे आवाहन केले.

तरीही संशयितांनी आमचे तसेच पोलिसांचे काही न ऐकता खा. उदयनराजे भोसले यांनी मला ‘ही माझ्या मालकीची जमीन आहे. परत पाय ठेवला तर पाय काढून खल्लास करीन,’ अशी धमकी दिली. तसेच आम्ही त्याठिकाणी विकसन कामासाठी ठेवलेला लोखंडी कंटेनर (ट्रक क्रमांक एमएच46 एच 4269) मधून आणलेल्या पोकलेनने तोडफोड करून अंदाजे दोन लाख रूपयांचे नुकसान केल्याचे पवार यांनी फिर्यादीत म्हटले आहे.

धमकी देवून 2 लाखाचेही नुकसान…

जीवे मारण्याची धमकी देऊन 2 लाख रुपये किमतीच्या साहित्याचे नुकसान केले असल्याची तक्रार विक्रम पवार यांनी दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार बेकायदा जमाव, धमकी देणे, तोडफोड करुन नुकसान करणे अशा कलमाखाली खा. उदयनराजे यांच्यासह 49 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.



Source link

उपमुख्यमंत्र्यांकडून माऊलींच्या पालखीचे सारथ्य | पुढारी

0









फलटण, पुढारी वृत्तसेवा : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचे फलटण तालुक्यातील बरड येथे दर्शन घेतले आणि माऊलींच्या पालखीचे सारथ्य केले. यावेळी त्यांनी माऊलींच्या चरणी लीन होत भरपूर पाऊस पडू दे, बळीराजासह सगळी जनता सुखी राहुदे, असे साकडे घातले.

संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा पालखी सोहळा पाच दिवसांच्या मुक्कामासाठी सातारा जिल्ह्यात आला आहे. लोणंद, तरडगाव व फलटण येथील मुक्कामानंतर हा सोहळा गुरुवारी बरड येथील मुक्कामी विसावला. दरम्यान, सातारा जिल्हा दौर्‍यावर आलेले उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी निंबळक नाका येथे माऊलींचे दर्शन घेतले.

यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई, खा. श्री.छ. उदयनराजे भोसले, खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर, आ. प्रवीण दरेकर, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनिल फुलारी, पोलिस अधीक्षक समीर शेख, अप्पर पोलिस अधीक्षक बापू बांगर उपस्थित होते. यावेळी ना. देवेंद्र फडणवीस म्हणाले, सारथ्य करण्याची संधी मिळाली हा माझासाठी भाग्याचा दिवस आहे. पद कोणतेही असो माऊलींकडे आलेला प्रत्येक व्यक्ती हा वारकरी आहे. आपल्या मनातील प्रत्येक गोष्ट माऊली पूर्ण करते, मी फक्त आशीर्वाद मागितला असल्याचे त्यांनी सांगितले.











Source link

Adipurush Collection: तिकिटाचे दर कमी करून देखील प्रेक्षकांनी ‘आदिपुरुष’कडे फिरवली पाठ! पाहा कलेक्शनचे आकडे

0
Adipurush Collection: तिकिटाचे दर कमी करून देखील प्रेक्षकांनी ‘आदिपुरुष’कडे फिरवली पाठ! पाहा कलेक्शनचे आकडे


Adipurush Box Office Collection: बॉलिवूड स्टार्स प्रभास, क्रिती सेनन आणि सैफ अली खान स्टारर ‘आदिपुरुष’ हा चित्रपट रिलीज होऊन आता एक आठवडा झाला आहे. एकीकडे या चित्रपटावर टीकेची झोड उठत आहे. तर, दुसरीकडे या सगळ्याचा परिणाम बॉक्स ऑफिस कलेक्शनवर देखील होत आहे. आता या चित्रपटाचे सातव्या दिवसाचे कलेक्शन समोर आले आहे. मात्र, या कलेक्शनचे आकडे अतिशय निराशाजनक आहे. ‘आदिपुरुष’ने रिलीज झाल्यानंतर जगभरातील बॉक्स ऑफिसवर शानदार ओपनिंग मिळवली होती. या चित्रपटाने पहिल्या वीकेंडमध्येच जगभरात ३०० कोटींचे कलेक्शन केले. पण, रिलीजच्या दोन दिवसानंतरपासून ‘आदिपुरुष’ची अवस्था बिकट झाली आहे. भारतीय बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाचा व्यवसाय सातत्याने मंदावत चालला आहे.



Source link

Satara : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्नीसह रमले शेतात

0



Satara : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्नीसह रमले शेतात



Source link

Suhana Khan: शाहरुख खानच्या लेकीने शेतीसाठी खरेदी केली तब्बल ‘इतकी’ जमीन! किंमत ऐकून बसेल धक्का

0
Suhana Khan: शाहरुख खानच्या लेकीने शेतीसाठी खरेदी केली तब्बल ‘इतकी’ जमीन! किंमत ऐकून बसेल धक्का


Suhana Khan Bought Land : काहीना काही कारणांमुळे नेहमीच चर्चेत राहणाऱ्या सुहानाने नुकतीच शेतीसाठी जमीन खरेदी केल्याचे समोर आले आहे.



Source link

एक महिन्यात टेंभू योजनेला दोन हजार कोटी : ना. देवेंद्र फडणवीस | पुढारी

0


दहिवडी, पुढारी वृत्तसेवा : महाविकास आघाडीच्या सरकारला लकवा झाला होता. अडीच वर्षांत त्यांनी दुष्काळी भागातील एकाही सिंचन प्रकल्पाला मान्यता आणि निधी दिला नाही. आम्ही सहा महिन्यांत 29 योजनांना प्रशासकीय मान्यता दिल्या आहेत. आ. जयकुमार गोरेंच्या मागणीनुसार एका महिन्यात टेंभू उपसा योजनेला दोन हजार कोटींचा निधी आम्ही देणार आहोत, अशी घोषणा उपमुख्यमंत्रि देवेंद्र फडणवीस यांनी केली. आ. जयकुमारांचे दुष्काळमुक्तीचे स्वप्न साकारायला आम्ही सर्वजण त्यांच्या पाठिशी आहोत, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

दहिवडी येथे आयोजित भाजपच्या अतिविराट सभेत ते बोलत होते. यावेळी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, आ. प्रवीण दरेकर, जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे, खा. उदयनराजे भोसले, खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर, अमरसिंह साबळे, आ. शिवेंद्रराजे भोसले, आ. राम सातपुते, आ. राहुल कुल, रणजितसिंह मोहिते-पाटील, विक्रम पावसकर, भरत पाटील, प्रशांत परिचारक, मकरंद देशपांडे, धैर्यशील कदम, मनोज घोरपडे, भगवानराव गोरे, अंकुशभाऊ गोरे, सौ. सोनिया गोरे, अरुण गोरे, शिवाजी शिंदे, धनंजय चव्हाण, डॉ. संदीप पोळ आदींसह खटाव, माणसह जिल्ह्यातील भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आ. जयकुमार गोरे यांच्या दुष्काळाच्या लढाईत खांद्याला खांदा लावून लढणार आहे. जिहे-कठापूरमुळे 15 हजार हेक्टर जमीन पाण्याखाली येणार आहे. आतापर्यंत ही जमीन पाण्याखाली येऊ नये, अशी विरोधकांनी व्यवस्था केली. अडीच वर्षे नाकर्त्या लोकांचे सरकार आले. त्यांना जनतेशी, दुष्काळाशी देणेघेणे नाही, ते कसे जगतात याच्याशी देणेघेणे नाही. त्यांच्याकरिता तुम्ही फक्त व्होट बँक आहात. म्हणूनच आ. गोरे यांनी जी योजना मंजूर केली ती योजना त्यांनी अडवून ठेवली. मात्र, भाजप-शिवसेनेचे सरकार आल्यावर जयाभाऊ भिडले. त्यांनी उडी सरकारमध्येही आणि पुलावरूनही घेतली; पण तुमच्या आशीर्वादामुळे त्यांना काही होणार नाही. रणजित व जयाभाऊंची ही जय-वीरूची जोडी आहे. जिहे-कठापूर योजनेचे भूमिपूजन केले याचा आनंद आहे. अडीच वर्षांनंतर आता पाणी येणार आहे.

हे पाणी डिसेंबरमध्ये येणार आहे; पण ऑक्टोबरमध्ये येणारी निवडणूक जयाभाऊ तुम्ही लढा. डिसेंबर 2024 मध्ये 15 हजार हेक्टर जमीन पाण्याखाली येईल. यासाठी 370 कोटींचा निधी दिला आहे. योजनेसाठी पैशाची कमतरता भासूू देणार नाही, असा शब्दही ना. देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

मुख्यमंत्र्यांनी तिजोरीची चावी माझ्या हातात दिली आहे. त्यांनी दुष्काळी भागासाठी जेवढी तिजोरी रिकामी करायची ते करा, असे सांगितले आहे, असे सांगून ना. देवेंद्र फडणवीस म्हणाले, कृष्णा खोर्‍यातील विनावापर 4 टीमएसी पाण्याचे नियोजन केले आहे. या पाण्याचे फेरवाटप करून ते पाणी सातारा, माण, खटाव व कोरेगाव भागाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. कण्हेर व आरफळ योजनेतून बंदिस्त पाईपलाईनमधून पाणी दुष्काळी भागात आणणार आहे. टेंभूची फेरप्रशासकीय मान्यतेचा निर्णय मागच्या सरकारने घेतला. मागच्या सरकारला निर्णय लकवा होता. त्यांचा पेन चालत नव्हता. आमचे सरकार आल्यावर 8 लाख हेक्टर सिंचन होणारे प्रश्न 6 महिन्यांत मंजूर झाले. एक महिन्याच्या आत टेंभूला 2 हजार कोटींची मान्यता देणार आहे. यातून 8 टीएमसी पाणी उपलब्ध होऊन 41 हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येईल. सातारा, सांगली व सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाला दुष्काळमुक्त करणार आहे. पाच वर्षांनंतर माणदेशाच्या दुष्काळावर कोणी कादंबरी लिहिणार नाही. त्यासाठी दुष्काळमुक्तीचे काम हाती घेतले आहे, असेही ते म्हणाले.

2014 ते 2019 या कालावधीत सत्तेत असताना जलयुक्त शिवारमधील कामे यशस्वी केली. त्यामुळे जिल्ह्यात 58 हजार टीसीएम पाणी सिंचनासाठी तयार करू शकलो. 48 हजार विहिरी, 3 हजार शेततळी तयार केली. या कालावधीत 48 हजार हेक्टर जमीन ओलिताखाली आली. त्यापूर्वी 15 वर्षांत तेव्हा सिंचन प्रकल्प का झाले नाहीत? सातार्‍याने तुम्हाला भरभरून दिले; पण तरी देखील तुम्ही एकही योजना पूर्ण केली नाही. योजना पूर्ण करण्यासाठी केंद्रात मोदींचे तर राज्यात भाजप-शिवसेनेचे सरकार यावे लागले. प्रधानमंत्री सिंचन योजनेेअंतर्गत जिल्ह्यातील 5 धरणे व सर्व पाणी योजनांना मोठ्या प्रमाणात चालना दिली. त्यामुळेच आज परिवर्तन होत असल्याचे पहायला मिळत आहे. महाराष्ट्राला नरेंद्र मोदीजींनी सिंचन प्रकल्पासाठी 30 हजार कोटी दिले. त्यामुळे बंद पडलेले प्रकल्प सुरू झाले असल्याचे त्यांनी सांगितले.

उद्या अनेक पक्ष पाटण्यामध्ये चालले आहेत. उद्या हातात हात घेवून मोदी हटावचा नारा देणार आहे. हे 2014 मध्येही केले होते. त्यावेळी 52 लोक व्यासपीठावर होते. पण काँग्रेसचे फक्त 48 लोक निवडून आले. मोदींजींना पर्याय तयार करत असताना हे सर्व एक नेता ठरवू शकत नाही. नेत्याविना निवडणूक लढवू असे सांगतात, पण जनता त्यांना निवडून देत नाही. मागच्या अ‍ॅटो रिक्षाचे सरकार पंक्चर झाले. तुमच्या आशिवार्दाने विरोधी पक्षनेतेपदाचा टायरही पंक्चर होईल, असेही ना. फडणवीस म्हणाले.

जयाभाऊं सारखा नेता माझ्यासोबत हे मला अभिमानास्पद…

मला अभिमान आहे की, जयाभाऊंसारखा नेता माझ्यासोबत आहे. तो जनतेसाठी त्याग करायला तयार आहे. जयकुमार जनता व ईश्वर तुमच्या पाठिशी आहे. जे तुम्ही ठरवले ते झाले आहे. जे तुम्ही ठरवले आहे त्यासाठी या व्यासपीठावरील सर्व नेते तुमच्या पाठिशी खंबीरपणे आहेत. तुमचा संकल्प आपण पूर्ण करू. माढा व सातार्‍याची लोकसभा आपण जिंकणार आहोत. सातारा जिल्ह्यात परिवर्तनाचे वारे वाहत आहे. सातारा मोदी व शिवसेना-भाजपसोबत उभा राहत आहे, असे ना. देवेंद्र फडणवीस म्हणाले.
चोरीला गेलेली एमआयडीसी

जयाभाऊंनी आणली…

मुंबई-बेंगलोर कॉरिडॉरमध्ये म्हसवडला एमआयडीसी करायची होती; पण अडीच वषार्र्ंत इथे अख्खी एमआयडीसी चोरीला गेली होती. सरकार आल्यानंतर जयाभाऊ व रणजित यांनी मुंबई व दिल्लीत चकरा मारून आमची एमआयडीसी चोरीला गेली आहे. आमची एमआयडीसी परत करा, अशी मागणी केली. या भागातील सर्वात मोठी एमआयडीसी म्हसवडला देत आहोत. यासाठी केंद्राने मंजुरी दिली असून निधीही देत आहोत. यामुळे या भागातील युवकांना रोजगार मिळेल. कॉरिडोरचे काम होत असल्याने मोठी गुंतवणूक येईल, असे ना. देवेंद्र फडणवीस म्हणाले.



Source link

Raj Babbar Birthday: स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर राज बब्बर आणि रेखा यांच्यात वाढली होती जवळीक!

0
Raj Babbar Birthday: स्मिता पाटील यांच्या मृत्यूनंतर राज बब्बर आणि रेखा यांच्यात वाढली होती जवळीक!


रेखा आणि राज बब्बर यांच्या अफेअरच्या बातम्या व्हायरल होऊ लागल्यावर चित्रपट निर्माते हबीब नाडियादवाला यांनी राज बब्बर यांना रेखापासून दूर राहण्यासाठी धमकी दिली. तेव्हापासून ते रेखापासून दूर झाले. मात्र, यावर बोलताना राज बब्बर यांनी एका मुलाखतीत म्हटले होते की, ‘धमकी हा शब्द मी वापरणार नाही. पण, मला धमकावण्याची क्षमता हबीब नाडियादवालामध्ये होती. आमच्या नात्यामुळे वाद निर्माण झाले होते.’



Source link

मुख्यमंत्री रमले शेतात, पत्नीसह केली केळी आणि नारळाची लागवड 

0


CM Eknath Shinde : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) हे दोन दिवसांसाठी त्यांच्या सातारा (satara) जिल्ह्यातील दरे या गावी आले आहेत. यावेळी त्यांनी आपल्या शेतात पत्नीसह केळीची लागवड (banana trees) केल्याचे पाहायला मिळालं. त्यांनी पाच हजार केळींच्या झाडांची लागवड केली. तसेच नारळाच्या झाडांची देखील लागवड केली. मला शेतीची आवड आहे. मी प्रत्येक वेळी आलो की झाडे वाढवतो असे मुख्यमंत्री म्हणाले. 

मुख्यमंत्र्यांच्या पत्नीही रमल्या शेतात 

यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पत्नी लताताई शिंदे या देखील शेतात उपस्थित होत्या. यावेळी त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्या म्हणाल्या की, मला शेतीची आवड आहे. 
मी हमेशा शेताकडे येत असते. गेल्या वेळेस हळदीच्या झाडांची लागवड केली होती. यावेळेस केळीच्या झाडांची लागवड करण्यात आली आहे. माझ्या मुलाला तसेच साहेबांनी देखील शेतीची आवड असल्याची माहिती लताताई शिंदे यांनी दिली. 

कोयना धरणातील गाळ काढण्याच्या कामाचा शुभारंभ

कोयना धरणात मोठ्या प्रमाणात गाळ साठला आहे. हा गाळ काढण्यासाठी नाम फाऊंडेशनने पुढाकार घेतला आहे. या कामाचा शुभारंभ देखील मुख्यमंतरी एकनाथ शिंदे यांच्या हस्त करण्यात आला. यावेळी त्यांनी कोयनेच्या पात्रातून फेरफटका मारला. गाळमुक्त धरण आणि गाळयुक्ती शेती करण्याचे धोरणं अवलंबल असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. धरणातील गाळ शेतीसाठी उपयुक्त असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी मुख्यमंत्र्यांकडे अनेक ग्रामस्थ समस्या घेऊन तसेच त्यांची कामे घेऊन आले होते. 

विविध प्रकारच्या फळांची लागवड 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दरे या गावी शेती आहे. दरे हे सातारा जिल्ह्यातील कांदाटकी खोर्‍यातील डोंगरांमध्ये आणि कोयना धरणाच्या तिरावर वसलेलं आहे. या शेतामध्ये त्यांनी आंबा, चिकू, स्ट्रॉबेरी, मोसंबी, सफरचंद, नारळ, केली या झाडांची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. मुख्यमंत्र्यांना ज्यावेळी वेळ मिळतो त्यावेळी ते गावातील शेतीत रमतात. आपल्या वडिलोपार्जित असलेल्या शेतीत लक्ष घालून त्यांनी आपली शेती चांगल्या पद्धतीने विकसीत केली आहे. 

सातारा जिल्ह्यातील सर्व धरणांतील पाणी साठ्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली. कोयना जलाशयातील कमी झालेला जलसाठा व जलाशयातील साठलेला गाळ उचलण्याची असलेली संधी पाहता गाळमुक्त धरण योजनेंतर्गत गाळ उचलण्याच्या सूचना दिल्या. महाबळेश्वर येथील सोळशी धरणाचा सर्वेक्षण आराखडा जलदगतीने पूर्ण करण्याचेही निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले.

महत्त्वाच्या बातम्या:

CM Eknath Shinde on Virat Morcha : दरोडे टाकणाऱ्यांच्या तोंडी चोरीची भाषा शोभत नाही, ठाकरे गटाच्या विराट मोर्चावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया



Source link

अजित पवार भला माणूस : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | पुढारी

0









सातारा, पुढारी वृत्तसेवा : अजित पवार भला माणूस आहे. त्यांचा कामाचा आवाका जबरदस्त असून कामाची पद्धत निश्चित चांगली आहे; पण त्यांची तिकडे गोची होत आहे. दरम्यान, लवकरच मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याची स्पष्टोक्ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बुधवारपासून सातारा जिल्ह्यातील दरे या त्यांच्या मूळगावी आले आहेत. यावेळी त्यांच्यासह कुटुंबीयांनी माध्यमांशी दिलखुलास चर्चा केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, विरोधकांमधील अजितदादा पवार हा भला माणूस आहे. कामे कशी असावीत व ती कशी करून घ्यावीत, यात त्यांचा हातखंडा आहे. सर्वसामान्यांशी व लहानात लहान कार्यकर्त्यांशी त्यांची नाळ जुळलेली आहे. आमचे सहकारी मंत्री दीपक केसरकर विरोधकांचा समाचार घेत असताना मी मात्र माझ काम करतोय. विरोधकांना आरोप करू द्या. मी मात्र कामाने उत्तर देणार. ‘बंड फसले असते तर’ यासंबंधी त्यांनी केलेल्या वक्तव्यावर तेच सविस्तर उत्तर देतील. माझ्यामुळे एकाही आमदाराचे नुकसान होऊ नये, हीच माझी भूमिका होती.

जलयुक्त शिवार ही शेतकर्‍यांसाठी उपयुक्त योजना आहे. मागील मंत्रीमंडळाने ही योजना खूप चांगल्या पध्दतीने राबवली. त्याचा सर्वत्र फायदा झाला आहे. दुर्दैवाने ही योजना महाविकास आघाडीने बंद केली. आमचे सरकार आल्यानंतर मात्र आम्ही ती तातडीने सुरू केली. गावी आल्यानंतरही कामाचा झपाटा सुरुच आहे. कांदाटी खोर्‍यातला युवक बाहेर कामासाठी गेला नाही पाहिजे असा प्रामाणिक प्रयत्न आहे. इकडे पर्यटनाला मोठी संधी असल्याने त्यासाठी विविध प्रोजेक्ट राबवले जाणार आहे. तसेच कोयना धरणातील पाणी साठा अत्यल्प झाल्याने त्यामध्ये साठलेला गाळ दिसत आहे. हा गाळ काढला जाईल असेही मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

मला शेतीची आवड आहे. शेतीवरून माझ्यावर टिका केली जात असते मी टिकेला उत्तर देत नाही. आज याठिकाणी केळाची, नारळाची झाडे लावत आहे. गावी आलो की प्रत्येक वेळी झाडे वाढवतो. यावेळी मिसेस मुख्यमंत्री यांनीही संवाद साधला. त्या म्हणाल्या, मलाही शेतीची आवड आहे. गेल्या वेळेस हजार किलो हळदीची झाडे लावली. इकडे यायला कायम आवडते, असेही त्यांनी सांगितले.











Source link