Tuesday, July 7, 2026
Home Blog Page 2993

कराड : मान्सूनची हजेरी; पाटणला बरसल्या पावसाच्या हलक्या सरी | पुढारी

0


मारूल हवेली : पुढारी वृत्तसेवा : आभाळाकडे डोळे लावून बसलेला शेतकरी पावसाच्या आगमनाने सुखावला आहे. शुक्रवारी दुपारपासून पाटण तालुक्यात हलक्या सरी बरसू लागल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.

जून महिना संपत चालला तरी मान्सून सक्रिय न झाल्याने सर्वांच्याच पुढे चिंतेचे ढग दाटले होते. मान्सून पूर्व पावसानेही अपेक्षित हजेरी लावली नव्हती. तरीदेखील शेतक-यांनी पेरणीपूर्वीची कामे आटोपून शेत तयार करून ठेवली आहेत. मात्र, पाऊल लांबल्याने खरीपाच्या पेरण्या रखडल्या आहेत. पेरण्या लांबल्यास शेतकर्‍यांचे नियोजन कोलमडून पडणार अशी विचित्र अवस्था शेतकर्‍यांची झाली होती. ऐन पावसाळयात कडक ऊन व वाढलेल्या उकाड्याने जनता हैराण झाली होती. त्यातच पावसाची चिन्हे दिसत नसल्याने मान्सून दाखल होणार की नाही? याबाबत चिंता व्यक्त केली जात होती.

शुक्रवारी (दि.२३) रोजी सकाळपासून आभाळात भराभर ढग जमा होऊन वातावरणात गारवा निर्माण झाला. काही ठिकाणी पावसाने हजेरी लावत शेतकर्‍यांमध्ये आनंद पेरला गेला. कोयना व पाटण परिसरात हलक्या सरी बरसल्या होत्या. तर शनिवारी (दि.२४) रोजी सकाळी तालुक्यात पावसाने हजेरी लावली. पावसाच्या आगमनाने सर्वत्र समाधान व्यक्त होत असले तरी अजूनही सुरुवातीला भरपूर प्रमाणात पाऊस होणे आवश्यक आहे.

पेरण्यांना प्रारंभ करण्यासाठी तालुक्यात जोरदार पावसाची आवश्यकता असल्याची अपेक्षा शेतकरी करीत आहेत. आभाळात ढग दाटून येऊन सरी मागून सरी येऊ लागल्या. चांगला पाऊस पडेल अशा आशा पल्लवीत झाल्या आहेत.

हेही वाचा : 

The post कराड : मान्सूनची हजेरी; पाटणला बरसल्या पावसाच्या हलक्या सरी appeared first on पुढारी.



Source link

Adipurush: नेपाळमध्ये हिंदी सिनेमांना हिरवा कंदील, आदिपुरुषवर बंदी मात्र कायम

0
Adipurush: नेपाळमध्ये हिंदी सिनेमांना हिरवा कंदील, आदिपुरुषवर बंदी मात्र कायम


नेपाळची राजधानी काठमांडूचे महापौर बलेन शाह यांनी शहरातील सर्व चित्रपटगृहांमध्ये भारतीय चित्रपटांच्या प्रदर्शनावर बंदी घातली होती. एवढेच नाही तर, नेपाळच्या राजधानीतील कोणत्याही थिएटरमध्ये भारतात बनवलेले चित्रपट प्रदर्शित होऊ नयेत, यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. मात्र, आता हिंदी चित्रपटांना हिरवा कंदील देण्यात आला आहे. मात्र आदिपुरुष चित्रपटावर बंदी कायम आहे.



Source link

कराड : येळगावात चोरट्यांचा धुमाकूळ; सात घरे फोडली | पुढारी

0


येळगांव : पुढारी वृत्तसेवा येळगाव ता. कराड येथे काल (शुक्रवार) मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञातांनी सात ठिकाणी घरफोडी करुन रोकड, सोने चांदीच्या दागिन्यांसह नवीन कपड्यांवर डल्ला मारला. त्यानंतर अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी पोबारा केला.

याबाबत अधिक माहिती अशी की, येथील सोनेचांदीचे व्यापारी वर्दीचंद नवलमन गांधी, झुंजार बाजीराव पाटील, डॉ. आनंदा बाळू सोरटे, तानाजी बापूराव मस्कर, पोपट गणपती पाटील, विजयकुमार भगवान पाटील, आनंदा राजाराम पाटील यांच्या घरांची समोरच्या बाजूने मुख्य दरवाजांची कुलुपे कापून चोरट्यांनी घरात प्रवेश केला. मात्र त्यापूर्वी शेजारच्या घरांमधील लोकांनी बाहेर येऊ नये म्हणून त्यांच्या घरांना बाहेरून कड्या लावल्या. तद्नंतर संबंधित घरातील कपाटे, तिजोरीवर प्रहार करीत कपाटातील सोनेचांदीचे दागिने, रोकड तसेच मोल्यवान वस्तू घेऊन अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी पोबारा केला. यामुळे येळगांवमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे घटना घडली त्यादरम्यान विद्युत पुरवठाही खंडित झाला होता. त्‍यामुळे लाईट नेमकी वरून गेली होती, की चोरट्यांनीच वीजपुरवठा खंडित करून आपला कार्यभाग साधला अशीही चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरु आहे. पोलिसांनी चोरट्यांचा छडा लावून त्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी जनतेतून होत आहे.

हेही वाचा :  



Source link

Aathvani Trailer:असफल प्रेमाची गोष्ट! ४८ वर्षांपूर्वी लिहिलेले पत्र पोहोचणार का योग्य ठिकाणी? ‘आठवणी’चा ट्रेलर प्रदर्शित

0
Aathvani Trailer:असफल प्रेमाची गोष्ट! ४८ वर्षांपूर्वी लिहिलेले पत्र पोहोचणार का योग्य ठिकाणी? ‘आठवणी’चा ट्रेलर प्रदर्शित


गेल्या काही दिवसांपासून ‘आठवणी’ हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटात एक थोडी वेगळी लव्हस्टोरी पाहायला मिळणार आहे. कथेच्या शोधात निघालेला तो आणि या प्रवासात त्याला गवसलेली भावनिक गुंतागुंत, ओढ व त्यातून साकारलेली प्रेमकथा म्हणजे ‘आठवणी.’ या चित्रपटाचे पोस्टर रिलीज झाले आणि तेव्हापासूनच प्रेक्षकांना प्रतिक्षा होती ती या चित्रपटाच्या ट्रेलरची, आणि आता ती प्रतिक्षा संपली आहे, कारण आज ‘आठवणी’ खास ट्रेलर रिलीज झाला.



Source link

सातारा : माऊलींना जिल्ह्याचा भक्तिमय निरोप | पुढारी

0









सातारा; पुढारी वृत्तसेवा : गेल्या रविवारपासून सातारा जिल्ह्यात टाळ-मृदंग व हरिनामाचा जयघोष करत व लाखो वारकरी व भाविकांसह पंढरपूरकडे निघालेला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पाच दिवस मुक्कामी होता. जिल्ह्यातील बरड येथील अखेरचा मुक्काम आटोपून पालखी सोहळ्याने शुक्रवारी सकाळी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश करत पंढरपूरकडे प्रस्थान केले. यावेळी सातारा जिल्हावासीयांनी माऊलींना भक्तिमय वातावरणात निरोप दिला.

माऊलींच्या पालखी सोहळ्याचे आळंदी येथून दि. 10 जून रोजी प्रस्थान झाले असून गुरुवार, दि. 29 जुलै रोजी आषाढी एकादशी दिवशी हा सोहळा पंढरपूर येथे पोहोचणार आहे. आळंदी ते पंढरपूर असा या पालखी सोहळ्याचा प्रवास असून हा पालखी सोहळा रविवार, दि. 18 जून रोजी पुणे जिल्ह्यातून सातारा जिल्ह्यात आला. तत्पूर्वी प्रथम नीरा नदीमध्ये माऊलींच्या पादुकांना दत्त घाटावर स्नान घालण्यात आले. त्यानंतर दुपारी 4 वाजता हा पालखी सोहळा लोणंदच्या पालखी स्थळावर स्थिरावला. लोणंद येथे दोन दिवसांचा मुक्काम आटोपल्यावर मंगळवार, दि. 20 रोजी चांदोबाचा लिंब येथे उभा रिंगण सोहळा झाला. हा सोहळा म्हणजे भाविकांसाठी ‘याचि देही याचि डोळा’ असा होता. हा रिंगण सोहळा झाल्यानंतर माऊलींची पालखी तरडगाव येथे एक दिवसाच्या मुक्कामासाठी विसावली. बुधवार, दि. 21 जून रोजी तरडगावचा मुक्काम आटोपून हा पालखी सोहळा काळज, सुरवडी, वडजल, निंभोरे गावामार्गे सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास फलटणनगरीत आला. फलटणमधील प्रशस्त पालखी तळ (विमानतळ) येथे एक दिवसासाठी हा सोहळा विसावला. गुरुवार, दि. 22 जून रोजी फलटण येथील एक दिवसाचा मुक्काम आटोपून या पालखी सोहळ्याने बरडकडे प्रस्थान केले. दरम्यान, विडणी येथे सकाळी 9 वाजता माऊलींच्या पालखी सोहळ्याचे ग्रामस्थांनी स्वागत केले. त्यानंतर पिंप्रद येथे दुपारी माऊलींच्या पादुकांना अभिषेक घालण्यात आला. तसेच नैवेद्य दाखवून हरिनामाचा जयघोष करण्यात आला. त्यानंतर हा सोहळा पुढे निंबळक (वाजेगाव) येथे थांबून नंतर सायंकाळी 7 च्या सुमारास मुक्कामासाठी बरडगाव येथे विसावला. बरड येथेही मोठ्या उत्साहात पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. शुक्रवार दि. 23 जून रोजी बरड येथील तसेच सातारा जिल्ह्यातील अखेरचा मुक्काम आटपून माऊलींच्या पालखी सोहळ्याने सकाळी 9 वाजता सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. यावेळी सातारा जिल्हावासियांनी पालखी सोहळ्यास सातारा-सोलापूर जिल्ह्याच्या सिमेवर (धर्मपूरी) येथे भक्तीमय वातावरणात निरोप दिला.

दरम्यान, धर्मपुरी येथे सातारा जिल्हा प्रशासनाकडून जिल्हाधिकारी डुडी यांनी सोलापूरचे जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांच्याकडे संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी हस्तांतरीत केली. यावेळी सातारचे मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलिस अधीक्षक समीर शेख, सोलापूरचे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, सोलापूरचे पोलिस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे उपस्थित होते.

माऊलींच्या पालखीचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले सारथ्य

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी राजुरी पासून ते सोलापूर जिल्ह्याच्या सीमेपर्यंत माऊलींच्या रथाचे सारथ्य केले. हरी नामाचा गजर करत पालखीला जिल्हा प्रशासनाकडून निरोप देण्यात आला. दरम्यान, सोहळा प्रमुख अ‍ॅड. विकास ढगे पाटील यांनी प्रशासनाने चांगल्या प्रकारे सहकार्य व सोयी-सुविधा उपलब्ध करुन दिल्याबद्दल सातारा जिल्हा प्रशासनाचे आभार मानले.











Source link

सातारा : बकरी बाजारात कोट्यवधीची उलाढाल | पुढारी

0









लोणंद; पुढारी वृत्तसेवा :  लोणंद बाजार समितीच्या आवारातील बोकड व बकरीच्या गुरुवारच्या बाजारात व्यापारी व शेतकर्‍यांनी गर्दी केली होती. पुढील आठवड्यात होणार्‍या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीला जत्रेचे स्वरूप आले होते. या बाजारात बकरी खरेदी-विक्री व्यवहारात कोट्यवधींची उलाढाल झाली.

लोणंद बाजार समितीच्या बकरी व बोकड, जनावरे बाजारात चांगलीच गर्दी झाली होती. पहाटे पाचपासून बाजार आवारावर दुचाकी, चार चाकी व ट्रकमधून शेळी, मेंढी, बकरी व बोकड यांची मोठी आवक सुरू होती. बाजारात बकरी व बोकडांची सुमारे पाच, दहा, पंधरा ते वीस हजारापर्यंत किंमती गेल्या होत्या. एका बोकडाची किंमत एक लाखापेक्षा जास्त गेली होती. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जनावरांचा बाजार फुल्ल झाला. मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्रीचे व्यवहार झाल्याने सुमारे 3 ते 4 कोटींची उलाढाल झाल्याचे सभापती सुनील शेळके-पाटील यांनी सांगितले. या बाजारात बकरी व बोकड खरेदीसाठी कर्नाटक, गोवा, राज्यासह हुबळी, धारवाड, बेंगलोर, कोकणातील महाड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, सातारा, पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सांगली आदी भागातील सुमारे 15 ते 20 हजार खरेदीदार व्यापारी आले होते.











Source link

Khushi Kapoor: पदार्पणापूर्वीच अफेअरच्या चर्चा! खूशी कपूर डेट करते ‘या’ गायकाला

0
Khushi Kapoor: पदार्पणापूर्वीच अफेअरच्या चर्चा! खूशी कपूर डेट करते ‘या’ गायकाला



Khushi Kapoor Affair: खुशी कपूर ‘द आर्चिज’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या पहिल्यावहिल्या चित्रपटाआधीच तिच्या अफेअरच्या चर्चा रंगल्या आहेत.



Source link

फडणवीसांच्या सभांनी राष्ट्रवादीला धडकी | पुढारी

0


सातारा; पुढारी वृत्तसेवा :  दरमहिन्याला होणारे केंद्रीय मंत्र्यांचे मायक्रो प्लॅनिंग असणारे दौरे, जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यात अ‍ॅक्टिव्ह केल्या गेलेल्या बूथ कमिट्या, प्रत्येक पंचायत समिती गणात जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांनी केलेले झंझावाती दौरे या सार्‍या एकजुटीचा परिणाम म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दहिवडी व कराडमध्ये झालेल्या सभांना दिसलेली गर्दी पाहता लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या द़ृष्टीने तयारीमध्ये मागे राहिलेल्या राष्ट्रवादीला धडकी भरवणारे वातावरण तयार झाले आहे. भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सहा आमदार व दोन खासदार निवडून आणण्याची रणनीती जिल्ह्यात आखली आहे. या रणनीतीला राष्ट्रवादीकडून पुढच्या 24 तासांत कोणतेही प्रत्युत्तर आले नाही.

सातारा जिल्हा कधीकाळी राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला. मध्यंतरी झालेल्या नगरपंचायत, बाजार समितीच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी अनेक ठिकाणी बॅकफूटवर आली आहे. राज्यात अनेक ठिकाणी शिंदे गट व भाजपच्या विरोधात वातावरण असताना
शरद पवारांना मानणार्‍या सातारा जिल्ह्यात मात्र राष्ट्रवादीचा नेता कोण? हेच ठरेनासे झाले आहे.

भाजप वेगवेगळ्या उपक्रमाच्या माध्यमातून गावोगावी जाण्याचा प्रयत्न करत आहे. पंतप्रधान मोदींच्या 9 वर्षे पूर्तीच्यानिमित्ताने वेगवेगळे उपक्रम जिल्ह्यात राबवले जात आहेत. जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर आ. जयकुमार गोरे यांनी अनेक बेरजा केल्या आहेत. ग्राऊंडवर राहणे, शासकीय अधिकार्‍यांमार्फत लोकांची कामे करणे, बुथ कमिट्या अ‍ॅक्टिव्ह करणे, भाजपच्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ताकद देणे ही जयकुमार गोरे यांनी आत्मसात केलेली नवी स्वभावनीती आहे. जिल्हाध्यक्ष झाल्यानंतर त्यांनी प्रत्येक पंचायत समिती गणात दौरे केले आहेत. त्यांना खा. रणजितसिंह ना. निंबाळकर, खा. उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रराजे भोसले, डॉ. अतुल भोसले, प्रभाकर घार्गे, धैर्यशील कदम, मनोज घोरपडे, मदनदादा भोसले, जयकुमार शिंदे, विक्रम पावस्कर व भाजपच्या संघटनेचीही साथ मिळत आहेत.

केंद्रीय मंत्र्यांचे सतत दौरे जिल्ह्यात होत आहे. भाजप पक्ष संघटना वाढवणे, केंद्राचा निधी गावोगावी पोहोचतो आहे की नाही हे पाहणे, बुथ कमिट्यांशी चर्चा करणे हे या दौर्‍याचे वैशिष्ट्य राहिले आहे. या उलट राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खा. शरद पवार यांचे सातारा जिल्ह्यात अलिकडच्या दोन वर्षांमध्ये झालेले दौरे केवळ रयत शिक्षण संस्थेच्या उपक्रमांसाठी राहिले आहेत. अजितदादांनी एकदोन ठिकाणी घेतलेले दौरे वगळता राष्ट्रवादी काँग्रेसचा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कोणताही कार्यक्रम, उपक्रम झालेला दिसत नाही. मुळातच राष्ट्रवादी पूर्वी रामराजे ना. निंबाळकर विधान परिषदेचे सभापती असताना त्यांच्या नेतृत्वाखाली एकसंघ होती. आता रामराजे सभापती नाहीत. ते नुसते आमदार आहेत. शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील हे माजी पालकमंत्री आहेत. बाकी इतरांचा धरबोळच राहिलेला नाही. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीत नेता कोण? अशी परिस्थिती सध्या आहे. याउलट काँग्रेसमधून भाजपमध्ये आलेल्या तरण्याबांड जयकुमार गोरेंना जिल्ह्यातील भाजपच्या नेत्यांनी आमदार, खासदार व पक्ष संघटनेतील कार्यकर्त्यांनी नेता म्हणून स्वीकारले आहे. त्याचीच फलनिष्पत्ती भाजपची पक्ष संघटना वाढीस लागण्यात झाली आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल कराड व दहिवडीमध्ये घेतलेल्या भाजपच्या सभांना मिळलेला उत्स्फूर्त प्रतिसाद भाजप जिल्ह्याच्या कानाकोपर्‍यात पोहोचत आहे हेच दर्शवत आहे. कराडमध्ये डॉ. अतुल भोसले यांनी केलेले सभेचे नियोजन आणि दहिवडीत आ. जयकुमार गोरे यांनी दाखवलेला करिश्मा राष्ट्रवादीला धडकी भरवणारा आहे. दस्तुरखुद्द देवेंद्र फडणवीस यांनी ही ऐतिहासिक, अतिविराट अशा शब्दात या नियोजनाचे वर्णन केले आहे.

सद्यस्थितीत सातारा जिल्ह्यात राष्ट्रवादीचा एक खासदार व विधानसभेचे तीन आमदार आहेत. पूर्वी 9 आमदार, 2 खासदार देणारा हा पक्ष झपाट्याने बॅकफूटवर येवू लागला आहे. एकाच घरात तीन तीन पदे देणे, कंत्राटदार जोपासणे, स्वत:च्याच विश्वात मश्गुल राहणे, बुथ कमिट्यांचा विचार न करणे, छोट्या गावातील कार्यकर्त्यांना न मोजणे या गर्विष्ठपणामुळे राष्ट्रवादीच्या नेत्यांबद्दलची प्रतिमा दिवसेंदिवस बदलत आहे. याउलट भाजपचे नेते पक्ष शिस्तीच्या चौकटीत संघटनेच्या कार्यकर्त्यांना ताकद देताना दिसत आहेत. त्यामुळेच भाजपच्या सभांना सातारा जिल्ह्यात गर्दी दिसू लागली आहे. भाजपने देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली 6 आमदार व 2 खासदारांचे केलेले नियोजन, कोेअर कमिटीच्या बैठकीत बलाढ्य नेत्यांना फडणवीसांनी दिलेली तंबी पाहता राष्ट्रवादीने सुधारणा केली नाही तर भाजपचा नारा यशस्वी होवू शकतो.

The post फडणवीसांच्या सभांनी राष्ट्रवादीला धडकी appeared first on पुढारी.



Source link

अस्तित्व टिकवण्यासाठी विरोधक एकत्र : मुख्यमंत्री शिंदे | पुढारी

0









सातारा; पुढारी वृत्तसेवा :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात विरोधकांमध्ये खूप वेळा चर्चा झाल्या, अनेकदा एकत्र आले, मोदींच्यावर टिका केली. 2014 ला एकत्र आले, परत 2019ला एकत्र आले. मात्र, काहीही झाले तरी 2024 मध्ये पुन्हा नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान होणार आहेत. अस्तित्व टिकवण्यासाठी विरोधक एकत्र आले आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांचा समाचार घेतला.

सर्व विरोधी पक्षांचे नेते पाटणा येथे एकत्र आले आहेत. या पार्श्वभूमीवर दरे या आपल्या गावी माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मोदी यांचे काम सत्तेसाठी, खुर्चीसाठी नाही ते देशासाठी, जनतेसाठी अहोरात्र काम करत आहेत. लोकांच्या भल्यासाठी ते कार्यरत आहेत. जगभरामध्ये त्यांचा करिष्मा दिसून आला आहे. त्यांना जगात आग्रहाचे स्थान आहे. अमेरिकेच्या सदनामध्ये त्यांना भाषण करण्याची संधी मिळते हे आपणा भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे. विरोधक वैयक्तिक स्वार्थाने बरबटलेले आहेत. स्व:ताची खुर्ची कशी वाचवायची, आपले अस्तित्व कसे टिकवायचे यासाठी विरोधकांची धडपड सुरू आहे. त्यासाठी ते एकत्र आले आहेत. जेवढी मोदी यांच्यावर टिका झाली तेवढेच जनतेने त्यांना उचलून धरले आहे. जनतेनेच आता ठरवले आहे राष्ट्रभक्त, राष्ट्रप्रेमी नरेंद्र मोदी यांचीच देशाला आवश्यकता आहे, ती काळाची गरज आहे. 2024 ला पूर्ण मजबुतीने, बहुमताने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकार अस्तित्वात येणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.











Source link

भिजव पांडुरंगा आता… माझा सारा गाव तू..! | पुढारी

0









कराड; पुढारी वृत्तसेवा : 

नको पांडुरंगा मला,
सोन्या – चांदीचं दान रे…,
फक्त भिजव पांडुरंगा,
हे तहानलेलं रान रे…
कमरेवरचा हात सोडून,
आभाळाला लाव तू,
ढगाला थोडं हलवून,
भिजव माझा गाव तू…

कोयना धरण अद्यापही पाण्यासाठी तहानलेले व व्याकुळलेले पहायला मिळत आहे. 105.25 टीएमसी पाणी साठवण क्षमता असलेल्या धरणात सध्या केवळ 10.82 टीएमसी इतका उपलब्ध पाणीसाठा असून यापैकी केवळ 5.82 टीएमसी इतकाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. पश्चिमेकडील वीज निर्मितीसाठी कमालीच्या मर्यादा आल्यानंतर कोयना धरणाचा चौथा टप्पा हा तब्बल एक हजार मेगॅवॅट क्षमतेचा जलविद्युत निर्मिती प्रकल्प बंद ठेवण्यात आला आहे. गरज व मागणीनुसार पोफळी व अलोरे येथून वीज निर्मिती सुरू असून गेल्या काही महिन्यांपासून सिंचनासाठी अव्याहतपणे पूर्वेकडे सोडण्यात येणारे पाणीही गुरुवारपासून चार दिवस मागणी कमी असल्याने बंद करण्यात आले आहे.

महाराष्ट्रासह पूर्वेकडे कर्नाटक, आंध्रप्रदेश राज्याच्या सिंचनाची तर निम्म्याहून अधिक महाराष्ट्राच्या विजेची गरज भागवणार्‍या कोयना धरणात सध्या पाण्याचा सार्वत्रिक ठणठणाट पहायला मिळत आहे. धरणाची समुद्रसपाटीपासूनची पाणी उंची 2029.4 फूट इतकी तर जलपातळी 618.541 मीटर इतकी आहे. ही जलपातळी 618 मीटरवर गेल्यानंतर पश्चिमेकडील एक हजार मेगॅवॅट क्षमतेचा कोयना चौथा टप्प्यातील वीज निर्मिती बंद पडते. मात्र यावर्षी त्या अगोदरच गेल्या काही दिवसांपासून ही वीज निर्मिती बंद ठेवण्यात आली आहे. सध्या केवळ पोफळी व अलोरे प्रकल्पातून मागणीनुसार वीज निर्मिती सुरू आहे. दरम्यान सिंचनासाठी कोयना धरण पायथा वीजगृहातून वीज निर्मिती करून तर वेळप्रसंगी आपत्कालीन दरवाजातून सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत होते. मात्र पूर्वेकडे सध्या सिंचनाची मागणी कमी झाल्याने चार दिवसांसाठी सिंचनासाठी सोडण्यात येणारे पाणी बंद ठेवण्यात आले आहे.

अत्यल्प पाणीसाठ्यामुळे चिंता वाढली…

एक जूनपासून सुरू झालेल्या धरणाच्या नव्या तांत्रिक जलवर्षात आत्तापर्यंत कोयना 77, नवजा 84 व महाबळेश्वर येथे 100 मिलिमीटर इतक्याच अत्यल्प पावसाची नोंद झाली आहे. धरणात सध्या एकूण उपलब्ध पाणीसाठा 10.82 टीएमसी म्हणजेच एकूण क्षमतेच्या 10.28 टक्के इतका उपलब्ध पाणीसाठा शिल्लक आहे. तर त्यापैकी 5.82 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक असल्याने चिंता व्यक्त होत आहे.











Source link