Tuesday, July 7, 2026
Home Blog Page 2976

हा खेळ जनता सहन करणार नाही; अजित पवारांच्या राजकीय भूकंपानंतर संजय राऊतांचं ट्विट

0
हा खेळ जनता सहन करणार नाही; अजित पवारांच्या राजकीय भूकंपानंतर संजय राऊतांचं ट्विट


Sanjay Raut on New DCM Ajit Pawar अजित पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. यामुळे राष्ट्रवादी पक्षाला आणि मविआ सरकारला मोठा धक्का मानला जात आहे. राष्ट्रवादीत फुट पडणार नाही, असं शरद पवार म्हणाले होते मात्र आता राष्ट्रावादीत फुट पडली आहे. अजित पवारांसोबत 30 आमदारांचा पाठिंबा आहे. यावर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. आमदारांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी ट्वीट करत दिली आहे. 

संजय राऊतांनी ट्विटमध्ये काय लिहिलंय?

“महाराष्ट्राच्या राजकारणाचे साफ मातेरे करण्याचा विडा काही लोकांनी उचलला आहे. त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. माझे आताच शरद पवार यांच्याशी बोलणे झाले. ते म्हणाले, ‘मी खंबीर आहे. लोकांचा आपल्याला पाठिंबा आहे. उद्धव ठाकरेंसह पुन्हा सर्व नव्याने उभे करू.’. होय, जनता हे खेळ फार काळ सहन करणार नाही.”, असं राऊत यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे. या ट्विटच्या माध्यमातून महाविकास आघाडी सरकार आणि शरद पवार हे खंबीर असल्याचं ते महाराष्ट्रातील राजकारण्यांना आणि जनतेला भासवत आहे. जनता हा खेळ फार काळ सहन करणार नसल्याचंदेखील त्यांनी ट्विटमार्फत सांगितलं आहे. 



Source link

अजित पवार अखेर ‘देवेंद्रवासी’, पण सीएम एकनाथ शिंदे यांचीच गोची अधिक होण्याची शक्यता!

0
अजित पवार अखेर ‘देवेंद्रवासी’, पण सीएम एकनाथ शिंदे यांचीच गोची अधिक होण्याची शक्यता!


Maharashtra Political Crisis : महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी फुटणार ही शक्यता वर्तवली जात असतानाच आज मोठा राजकीय भूकंप घडला आहे. आज अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहेत. त्यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीमध्ये बंडखोरी झाली असून जवळपास 30 आमदारांसह अजित पवार यांनी भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यांच्यासह राष्ट्रवादीचे 9 आमदार मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. यामध्ये छगन भुजबळ, दिलीपराव वळसे-पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मरावबाबा आत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, सनिल पाटील हे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत.

राष्ट्रवादी फोडण्यात यश, पण शिंदे गटाचं काय?

राष्ट्रवादीमध्ये फूट पडली असून त्यासोबतच बंडाचा स्वीकेल पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपला राष्ट्रवादी फोडण्यात यश आले असलं, तरी आता शिंदे गटाचं काय स्थान असणार याची चर्चा आतापासूनच सुरु झाली आहे. शिवसेनेतून बंडखोरी केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वाधिक राष्ट्रवादी काँग्रेस आणि विशेष करून उपमुख्यमंत्री विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर हल्लाबोल केला आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गोची होणार?

निधी वाटपामध्ये त्यांनी दुजाभाव केल्याचा आरोप केला होता. त्याचबरोबर सातत्याने राष्ट्रवादीवरही हल्लाबोल केला होता. मात्र, आता अजित पवार आणि राष्ट्रवादी सोबत आल्याने शिंदे गटाची आणि विशेष करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गोची तर होणार नाही ना? अशी शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादीमधील ऑपरेशन सक्सेस झालं असलं तरी शिंदे गटाला काय मिळणार आणि त्यामधून लाभ किती मिळणार? याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज?

या घडामोडी सुरु असतानाच गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा नाराज तर नव्हते ना? अशी शक्यता वर्तवली जात आहे. एकनाथ शिंदे मध्यंतरी अचानक तीन दिवस सुद्धा सुट्टीवर गेले होते. त्यावेळी सुद्धा राजकीय भुवया उंचावल्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीमधील आमदार फोडून अजित पवार हे भाजप गटात जातील असं बोललं जात असतानाच मुख्यमंत्री शिंदे अचानक तीन दिवस गावी गेले होते. 

इतर महत्वाच्या बातम्या 



Source link

अजित पवारांच्या बैठकीबाबत शरद पवारांना कल्पनाच नव्हती…

0
अजित पवारांच्या बैठकीबाबत शरद पवारांना कल्पनाच नव्हती…


Sharad Pawar on Ajit Pawar Meeting : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाला कलाटणी दिली आहे. अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकार सोबत हातमिळवणी करत उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. पक्षाच्या बैठकीत अजित पवारांनी (Sharad Pawar ) अप्रत्यक्षरित्या प्रदेशाध्यक्ष होण्याची इच्छा व्यक्त केली आणि त्यानंतर राज्यात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष बदलाची चर्चा सुरु झाली होती. त्यानंतर अजित पवार आज सरकारमध्ये सामील झाले आहेत.

अजित पवारांच्या बैठकीबाबत शरद पवारांना कल्पनाच नव्हती

अजित पवार नाराज असल्याची चर्चा गेले अनेक दिवस रंगली होती. आज सकाळी अजित पवारांनी मुंबईत बैठक बोलवली होती. अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीसंदर्भात शरद पवार यांनी काही वेळा पूर्वी प्रतिक्रिया दिली होती. यावेळी शरद पवारांनी म्हटलं होतं की, मला आजच्या बैठकीचे नियोजन काय आहे माहिती नाहीत पण विरोधी पक्ष नेता म्हणून विधिमंडळाच्या सदस्यांची बैठक त्यांना बोलवण्याचा आधिकार असल्याचं ते म्हणाले. मात्र येत्या 6 जुलैला  बैठक बोलावली आहे. सकाळी 10 वाजता बैठक होणार असल्याचं शरद पवारांनी सांगितलं. त्या बैठकीत प्रदेशाध्यक्षपदाबाबत चर्चा होणार असल्याचंही ते म्हणाले. दरम्यान, त्यानंतर आता अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. 

6 जुलैला राष्ट्रवादीची महत्त्वाची बैठक

ते म्हणाले की, अजित पवार यांच्या बैठका होतच असतात. ते विरोधी पक्षाचे नेते आहेत. पण 6 तारखेला महत्त्वाची बैठक होणार आहे. ती नेत्यांची बैठक आहे. मी नेत्यांना या बैठकीसाठी निमंत्रित केलं आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं. अजित पवारांच्या बैठकीत  काय चर्चा होइल हे माहिती घेऊन सांगतो. सुप्रिया सुळे मुंबईवरुन पुण्याला यायला निघाल्या आहेत. प्रदेशाध्यक्षपदाविषयी आणि त्या संदर्भात मी 6 तारखेला बैठक बोलावली आहे. ज्यात संघटनात्मक बांधणी करण्यावर चर्चा करणार आहोत. संघटनेत बदल करण्याची गरज आहे का? यावर विचार होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. 

‘अशोक पवार यांच्या मुलीच्या लग्नाला दिल्लीला गेलो होतो’

शरद पवार पुढे म्हणाले की, अजित पवार दिल्लीला गेल्याच्या चर्चा झाल्या होत्या, त्यावेळी दिल्लीला मी पण गेलो ते पण गेले आणि जयंत पाटील पण गेले होते पण अशोक पवार यांच्या मुलीच्या लग्नाला गेलो असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. अजित पवारांना संघटनेत काम करण्याची इच्छा आहे, हे त्यांनी सगळ्यांसमोर जाहीर सभेत सांगितलं आहे. त्यावर विचार करु, असं देखील ते म्हणाले होते. 

‘पक्षाचे सगळे निर्णय मी एकटा घेत नाही’

पक्षाचे सगळे निर्णय मी एकटा घेत नाही. कोणताही निर्णय पक्षातील सगळे नेते मिळून घेत असतात. त्यामुळे 6 जुलैच्या बैठकीत हा निर्णय घेणार असल्याचं ते म्हणाले. राष्ट्रवादी पक्ष फुटू शकतो अशा चर्चा रंगाताना दिसत आहे. मात्र राष्ट्रवादी फुटेल असं मला वाटत नसल्याचं पवार म्हणाले. 

अजित पवारांकडून राजकारणात मोठा भूंकप 

दरम्यान, पवारांची प्रसार माध्यमांसोबत संवाद साधला. त्यानंतर काहीच तासांनी महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप आला. अजित पवारांनी राजकारणाला कलाटणी दिली. शरद पवारांनी अल्टीमेटम न पाळल्यामुळे अजित पवारांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. आता पवार यावर काय प्रतिक्रिया देणार हे पाहावं लागेल.



Source link

Sanjay Raut : राष्ट्रवादी काँग्रेस फुटताच संजय राऊतांचा शरद पवारांना फोन, ट्वीट करून म्हणाले…

0
Sanjay Raut : राष्ट्रवादी काँग्रेस फुटताच संजय राऊतांचा शरद पवारांना फोन, ट्वीट करून म्हणाले…


अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, जयंत पाटील, दिलीप वळसे पाटील, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, आदिती तटकरे, अनिल पाटील यांनी आज मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल हे देखील अजित पवार यांच्यासोबत राजभवनात उपस्थित आहेत. त्यामुळं राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्याचं स्पष्ट झालं आहे.



Source link

Ajit Pawar: राष्ट्रवादीचे कोण कोणते नेते घेणार शपथ ?

0
Ajit Pawar: राष्ट्रवादीचे कोण कोणते नेते घेणार शपथ ?



<p>Ajit Pawar: राष्ट्रवादीचे कोण कोणते नेते घेणार शपथ ?</p>



Source link

राष्ट्रवादीचे आमदारच नव्हे, ‘हे’ दोन खासदारही अजित पवारांसोबत; शरद पवारांना मोठा धक्का करतोय

0
अजित पवारांच्या बैठकीबाबत शरद पवारांना कल्पनाच नव्हती…


Maharashtra Political Crisis : राज्याच्या राजकरणात मोठा राजकीय भूकंप आला आहे. अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीमध्ये भूट पडली आहे. अजिप पवारांसोबत राष्ट्रवादीचा एक गट शिंदे-फडणवीस सरकारसोबत सामील झाला आहे. राष्ट्रवादीचे 40 आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चन्द्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. मात्र राष्ट्रवादीचे फक्त आमदारचं नव्हे तर 2 खासदार देखील अजित पवारांच्यासोबत गेले आहेत. सध्या राजभवनात खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare)  आणि अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे दोन्ही खासदार उपस्थित आहे. त्यामुळे शरद पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. 

राष्ट्रवादीमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अजित पवारांनी दिलेला अल्टिमेटम शरद पवारांनी मान्य न केल्यामुळे अजित पवार नाराज असल्याने त्यांनी हे पाऊल उचललं आहे. अजित पवार यांनी विरोधी पक्षनेताचा राजीनामा दिला त्यानंतर राजभवनावर उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. अजित पवारांकडे 25 आमदारांचा पाठिंबा असल्याचे पत्र असल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, यावेळी एकूण 9 राष्ट्रवादीचे आमदार शपथ घेणारअसल्याचं सांगितलं जात आहे. तर आता राष्ट्रवादीचे दोन खासदार देखील अजित पवारांसोबत गेल्याने त्यांना देखील केंद्रात काही जबाबदारी मिळते का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. 



Source link

पहाटेचा शपथविधी अखेर साक्षात उतरला! महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री अजित पवार

0
पहाटेचा शपथविधी अखेर साक्षात उतरला!  महाराष्ट्राचे नवे उपमुख्यमंत्री अजित पवार


मुंबई: अजित पवार (Ajit Pawar)  यांनी आज राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. राजभवनातील दरबार हॉलमध्ये आज उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली  आहे. आज अजित पवारांनी विरोधी पक्ष नेत्याचा राजीनामा देत शरद पवारांच्या नेतृत्वाला रामराम केला आहे. अजित पवारांनी चार वर्षात तिसऱ्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे.

पहाटेच्या शपथविधीनंतर आता  दुपारच्या शपथविधीच्या चर्चा होणार आहे. पहाटेच्या शपथविधीवरुन शरद पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये आरोप-प्रत्योराप झाले होते. पहाचेच्या शपथविधीनंतर 72 तासात देवेंद्र फडणवीस  आणि अजित पवार यांचे सरकार पडले होते. मात्र, आता दुपारी अजित पवार यांनी शपथविधी घेतली आहे. अजित पवारांसह  छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ,धनंजय मुंडे, आदिती तटकरे ,धर्मरावबाबा अत्राम,संजय बनसोडे ,अनिल पाटील यांनी मंत्री पदाची शपथ घेतली. 

अजिप पवारांसोबत राष्ट्रवादीचा एक गट शिंदे-फडणवीस सरकारसोबत सामील झाला आहे. राष्ट्रवादीचे 40 आमदार आपल्यासोबत असल्याचा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चन्द्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे. मात्र राष्ट्रवादीचे फक्त आमदारचं नव्हे तर 2 खासदार देखील अजित पवारांच्यासोबत गेले आहेत. सध्या राजभवनात खासदार सुनील तटकरे (Sunil Tatkare)  आणि अमोल कोल्हे (Amol Kolhe) हे दोन्ही खासदार उपस्थित आहे. त्यामुळे शरद पवार यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. 



Source link

NCP : शिवसेनेनंतर राष्ट्रवादी फुटली? छगन भुजबळ मंत्री होणार, कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार? 

0
NCP : शिवसेनेनंतर राष्ट्रवादी फुटली? छगन भुजबळ मंत्री होणार, कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेणार? 


Maharashtra Political Crisis : आज राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) मोठा भूकंप घडण्याची शक्यता आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी (NCP) फुटली असून काही दिवसांपासून असलेली धुसपूस समोर येताना पाहायला मिळत आहे. यानुसार अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असून त्याचबरोबर छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेणार असल्याचं समोर येत आहे. 

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. वर्षभरापूर्वी ज्या पद्धतीने शिवसेना (Shivsena) फुटून एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. आज त्याच घटनेची पुनरावृत्ती होताना दिसत आहे. कारण अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे 30 आमदार राजभवनावर दाखल झाले आहेत. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसह देवेंद्र फडणविस (Devendra Fadnavis) हे देखील राजभवनावर दाखल झाल्याने राष्ट्रवादीचा एक गट शिंदे-भाजप सरकारमध्ये सामील होण्याची शक्यता आहे. त्यानुसार अजित पवार हे उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असून छगन भुजबळ हे देखील या मंत्रिमंडळात सहभागी असणार आहे. त्यानुसार छगन भुजबळ हे कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतील, अशी माहिती मिळत आहे. 

दरम्यान, मागील दोन दिवसांच्या घडामोडी बघता अजित पवार यांनी दोन दिवसापासून आपले सर्व कार्यक्रम रद्द केले होते. सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि शरद पवार (Sharad Pawar) यांचेही आजचे कार्यक्रम त्यांनी रद्द केले आहेत. त्यानुसार राज्यभरातील अजित पवार समर्थक असलेल्या राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना रातोरात फोन करून सकाळी लवकर मुंबईत पाचारण होण्यासाठी सांगण्यात आले होते. त्यानुसार आज सकाळी बैठक बोलवण्यात आली होती. सुरुवातीला प्रदेशाध्यक्ष पदासाठी बैठक असल्याचे सांगण्यात येत होते. अजित पवार यांनी बोलावलेल्या बैठकीला 30 आमदार उपस्थित होते. त्यानुसार आताच्या शिंदे भाजप सरकारला राष्ट्रवादीच्या एका 30 आमदारांच्या गटाचा पाठिंबा असणार आहे. 

राष्ट्रवादीचा एक गट फुटला…? 

त्यामुळे राष्ट्रवादीत मोठी फूट पडली असून राष्ट्रवादीच्या 54 पैकी 30 आमदारांचा सरकारला पाठिंबा असल्याचे यावरून दिसत आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांनी घेतलेल्या बैठकीत फक्त आमदारांना निमंत्रित करण्यात आले होते. राष्ट्रवादीच्या कार्याध्यक्ष सुप्रिया सुळे, अध्यक्ष शरद पवार यांना बैठकीचे निमंत्रण देण्यात आले नव्हते, त्यांना या बैठकीबाबत माहिती नसल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे राष्ट्रवादीचे निष्ठावान असलेले छगन भुजबळ हे देखील अजित पवारांच्यासोबत असून त्यासोबत दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ हे देखील शपथ घेणार असल्याचे समजते आहे. मात्र हा सगळा गोंधळ राज्याच्या राजकारणाला कलाटणी देणारा आहे. 



Source link

मराठवाड्यातून धनंजय मुंडे घेणार मंत्रीपदाची शपथ?; राजभवनात शपथविधीची जय्यत तयारी सुरु

0
मराठवाड्यातून धनंजय मुंडे घेणार मंत्रीपदाची शपथ?; राजभवनात शपथविधीची जय्यत तयारी सुरु


Maharashtra Political Crisis : राज्याच्या राजकारणात भूकंप होण्याची शक्यता असून, अजित पवार (Ajit Pawar) उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याची शक्यता आहे. राजभवनात शपथविधीची जय्यत तयारी सुद्धा सुरु आहे. विशेष म्हणजे यावेळी राष्ट्रवादीचे 9 आमदार मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यामध्ये मराठवाड्यातून धनंजय मुंडे हे मंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचं समोर येत आहे. सध्या राजभवनात धनंजय मुंडे दाखल झाले आहेत. धनंजय मुंडे हे आधीपासूनच अजित पवारांचे समर्थक समजले जातात. तर पहाटेच्या शपथविधीच्या वेळी देखील धनंजय मुंडे अजित पवारांच्या सोबत गेले असल्याची जोरदार चर्चा होती. 



Source link

अजित पवारांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही राजभवानात पोहोचले

0
अजित पवारांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही राजभवानात पोहोचले


Ajit Pawar Resigns : राजाच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा राजकीय भूकंप झाला आहे. अजित पवार यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला असून ते समर्थक आमदारांसह ते राजभवनावर पोहोचले आहेत. त्यांच्यासह मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजप आणि शिवसेना शिंदे गटातील मंत्रीही राजभवनात पोहोचले आहेत. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी आता राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पाडली आहे, हे जवळपास स्पष्ट झालं आहे. त्यांना जवळपास 30 आमदारांचा पाठिंबा असून त्यातील आमदारांच्या पाठिंब्यावर ते भाजपशी हातमिळवणी करण्यावर जवळपास शिक्कामोर्तब झाला आहे. 

अजित पवार यांचा विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा

राष्ट्रवादीचे 9 आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्याचबरोबर अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकारावर अजून कोणीही थेट प्रतिक्रिया दिली नसली, तरी एकंदरीत राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजभवनात पोहोचताच माध्यमांनी गराडा घातला. त्यांना घडामोडींबाबत विचारले असता त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. ‘मी पाहून सांगतो,’ अशी मोजकीच प्रतिक्रिया त्यांनी दिली. त्यामुळे आज सायंकाळपर्यंत या राजकीय नाट्याचा काय शेवट असेल याचा अंदाज आहे. 

अजित पवार राष्ट्रवादीत भूकंप करणार?

गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रचंड अस्वस्थ असलेल्या अजित पवार, आज राष्ट्रवादीला हादरा देणार का, अशीही स्थिती आहे. आज सकाळपासून अजित पवारांच्या शासकीय निवासस्थानी राष्ट्रवादीच्या आमदारांची बैठक सुरु होती. अजित पवार यांच्याकडून हालचाली सुरु झाल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्यासोबत भाजपचे मंत्री राजभवनात दाखल झाले आहेत. त्यामुळे एकंदरीत आता अजित पवार हे स्वतंत्र गट घेऊन भाजपमध्ये सामील होणार की अन्य कोणती राजकीय घडामोड घडणार, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागून राहिलं आहे. 

गेल्या अनेक दिवसांपासून अजित पवार अनेक विषयांमुळे चर्चेत आहेत. त्याचबरोबर काही वेळापूर्वीच शरद पवार यांनी शक्यता खोडून काढली होती. मात्र, आता थेट अजित पवारांची राजभवनाच्या दिशेने गेल्याने आजच राजकारणामध्ये मोठीच एखादी घडामोडी जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 30 आमदारांसह अजित पवार हे भाजपमध्ये सामील होणार असल्याचं म्हटलं जात आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या 



Source link