Wednesday, July 8, 2026
Home Blog Page 2969

Mumbai Agra road accident : मुंबई आग्रा महामार्गावर पळासनेर गावाजवळ भीषण अपघात; १२ जण ठार

0
Mumbai Agra road accident : मुंबई आग्रा महामार्गावर पळासनेर गावाजवळ भीषण अपघात; १२ जण ठार



Mumbai Agra road accident : मुंबई आग्रा महामार्गावर पळासनेर गावाजवळ भीषण अपघात झाला आहे. ब्रेक फेल झाल्याने कंटेनर एका हॉटेलमध्ये शिरला. या घटनेत १२ जणांचा चिरडून जागीच मृत्यू झाला तर तर पंधरा ते वीस जण जखमी झाले आहेत. मृत्यू पडलेल्यांची संख्या अजून वाढण्याची भीती आहे.



Source link

अपघातांच्या मालिकेनं मराठवाडा हादरला! पाच अपघातांमध्ये 9 जण ठार, तर 23 जखमी

0
अपघातांच्या मालिकेनं मराठवाडा हादरला! पाच अपघातांमध्ये 9 जण ठार, तर 23 जखमी


Marathwada Accident News : राज्यात अपघातांची (Accident) मालिका सुरूच असून मराठवाड्यात (Marathwada) गेल्या 24 तासांत पाच अपघातांमध्ये 9 जण ठार, तर 23 जखमी झाले आहेत. बीड, हिंगोली, लातूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत झालेल्या या पाच अपघातांमुळे मराठवाडा हादरला आहे. तर यातील एक अपघात समृद्धी महामार्गावर झाला आहे. यातील सर्व जखमींवर वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे. यात काहींची प्रकृती गंभीर आहे. 

पहिला अपघात : बीड जिल्ह्यात सोमवारी दोन अपघात झाले. शिरूर कासार तालुक्यातील जाटनांदूर येथील कालिकादेवी महाविद्यालयात जाणाऱ्या दोन प्राध्यापकांचा अपघातात मृत्यू झाला. शहादेव शिवाजी डोंगर (वय 44) व अंकुश साहेबराव गव्हाणे असे या दोन्ही शिक्षकांचे नावं आहेत. नगर रोडवर मुर्शदपूर फाट्यानजीक त्यांच्या दुचाकीला एका क्रेटा कारने जोराची धडक दिली. हा अपघात एवढा भीषण होता, की दुचाकीने पेट घेतला. अपघातात जखमी प्राध्यापक आगीत होरपळले. यात दोघांचाही मृत्यू झाला. त्यांच्या दुचाकीचा अक्षरश: कोळसा झाला होता. 

दुसरा अपघात : बीड तालुक्यातील उदंडवडगाव येथे दुसऱ्या अपघाताची घटना घडली आहे. भाविकांच्या पिकअप जीपला एसटी बसने धडक दिल्यामुळे दोन भाविक महिलांचा मृत्यू झाला असून, 23 जण जखमी झाले आहेत. परभणी येथील भाविक पिकअप जीपमधून मांढरादेवीकडे जात होते. दरम्यान रविवारी मध्यरात्री एकच्या सुमारास अंबड आगाराच्या जालना- पंढरपूर या बसने (एम. एच. 06 एस. 8545) पिकअपला पाठीमागून धडकी दिली. यात मथुराबाई पांडुरंग गवाले (वय 70 वर्षे, आंबेडकरनगर, परभणी) व रंगूबाई साहेबराव जाधव (वय 55 वर्षे, पंचशीलनगर, परभणी) यांचा मृत्यू झाला. तसेच इतर 23 जण जखमी झाले असून, यात 11 लहान मुलांचा समावेश आहे. 

तिसरा अपघात : हिंगोली जिल्ह्यातील वारंगा फाटा ते डोंगरकडा मार्गावर गीतांजली हॉटेलजवळ अज्ञात वाहनाने दुचाकीस धडक दिल्याने दोन विद्यार्थी ठार, तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना रविवारी रात्रीच्या सुमारास घडली. तोंडापूर येथील कृषी महाविद्यालयात बीएस्सी (कृषी) तृतीय वर्षात शिक्षण घेणारे विष्णू बालाजी पाटील (शिवणी बुद्रुक, जि. लातूर), मयूर केशवराव दुबे (शुक्रवारपेठ, वाशीम) आणि त्यांचा मित्र पंढरी इंगोले हे तिघे रविवारी रात्री आठच्या सुमारास मित्राच्या वाढदिवसानिमित्त केक आणण्यासाठी दुचाकीवर वारंगाफाटा येथे जात होते. याचवेळी अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असता विष्णू पाटील व मयुर दुबे यांचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जाहीर केले.

चौथा अपघात : लातुरातील एका महाविद्यालयात प्रवेश घेऊन मोटारसायकलवरून गावाकडे परतत असताना टिप्परने जोराची धडक दिल्यामुळे सख्खे बहीण-भाऊ जागीच ठार झाले. ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास आष्टा मोड येथे घडली. अवधूत शिवराज रक्ताटे (वय 18 वर्षे) आणि निकिता शिवराज रक्ताटे (वय 20 वर्षे) अशी मृतांची नावे आहेत. निकिता बी. कॉम. तर अवधूत बी. एस्स्सी प्रवेश पूर्ण करून आंबुलगाकडे परतत होते. तेव्हा टिप्परने (एमएच 20, ईआय 7204) त्यांना समोरून जोराची धडक दिली. या अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाला. 

पाचवा अपघात : दरम्यान बुलढाणा येथील समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात 26 जणांचा मृत्यू झाला असल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा छत्रपती संभाजीनगरमध्ये समृद्धी महामार्गावर अपघात झाला आहे. या अपघातात एकाच कुटुंबातील तीन जण गंभीर जखमी झाले होते. ज्यात एकाच मृत्यू झाला आहे. सुशीलकुमार दिलीप थोरात (वय 38 वर्षे रा. शिरपूर जैन सरकारी दूध डेअरी मागे मालेगाव जि. वाशिम) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. तर बबिता सुशीलकुमार थोरात (वय 35 वर्षे) व अर्पिता सुशीलकुमार थोरात (8 वर्षे) असे जखमींचे नावं आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या : 

Chhatrapati Sambhaji Nagar : समृद्धी महामार्गावर पुन्हा अपघात, पती ठार आणि पत्नी-मुलगी जखमी; छत्रपती संभाजीनगरमधील घटना



Source link

Rakhi Sawant Viral Video: राखी सावंतने विमानतळावर उडवले पैसे; व्हिडीओ बघून नेटकरी संतापले!

0
Rakhi Sawant Viral Video: राखी सावंतने विमानतळावर उडवले पैसे; व्हिडीओ बघून नेटकरी संतापले!


राखीला हे कृत्य करताना पाहून अनेक यूजर्सचा संयम सुटला आहे. एका व्यक्तीने कमेंट करत म्हटले की, ‘ती आता पैशांचा पाऊस पाडत आहे. एकवेळ अशी होती जेव्हा आईच्या उपचारासाठी पैसे हवे म्हणून रडत होती आणि अंबानींकडे मदत करण्याची विनंती करत होती.’ दुसर्‍याने लिहिले, ‘हे आरबीआयच्या नियमाविरुद्ध आहे, बँकिंग नियमन कायदा, १९४९च्या कलम ३५ए नुसार तुम्ही असे करू शकत नाही.’ ‘असे कृत्य केल्याबद्दल राखीला तुरुंगात पाठवा’, असेही एका यूजरने म्हटले आहे.



Source link

Rekha On Vogue: सिंदूर अन् गळ्यात हिऱ्यांचा नेकलेस… ‘वोग अरेबिया’च्या मुखपृष्ठावर झळकली रेखा!

0
Rekha On Vogue: सिंदूर अन् गळ्यात हिऱ्यांचा नेकलेस… ‘वोग अरेबिया’च्या मुखपृष्ठावर झळकली रेखा!


Rekha On Vogue Arabia: व्होग अरेबियाच्या कव्हर पेजवर रेखा यांचे हे पदार्पण आहे. त्यांनी पदार्पणातच चाहत्यांची मने जिंकली आहेत.



Source link

आदल्या दिवशी अजितदादांसोबत, दुसर्‍या दिवशी शरद पवारांच्या गाडीत; आ. मकरंद पाटील यांच्या भूमिकेने कार्यकर्ते बुचकळ्यात | पुढारी

0


सातारा; पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रवादीतील फाटाफुटीनंतर सातारा जिल्ह्यातही दुफळी निर्माण झाली असून, पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये फूट पडली. पक्षाच्या आमदारांनी कुणी सावध तर कुणी उघडपणे भूमिका घेतली. वाईचे आमदार मकरंद पाटील यांनी रविवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सोबत हजेरी लावली. मात्र दुसर्‍याच दिवशी सोमवारी त्यांनी खंडाळ्यात महामार्गावरच खा. शरद पवार यांचे जोरदार स्वागत करत त्यांच्या कराड, सातार्‍यातील सर्व कार्यक्रमांना उपस्थिती दर्शवली. त्यामुळे कार्यकर्ते बुचकळ्यात पडले.

उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी रविवारी भाजप-शिवसेना युतीच्या सरकारमध्ये सामील होत स्वत:सह पक्षाच्या 9 आमदारांचाही शपथविधी घडवून आणला. तत्पूर्वी अजित पवार यांनी देवगिरी या आपल्या बंगल्यावर पक्षाच्या आमदारांची बैठकही घेतली होती. या बैठकीला आ. मकरंद पाटील यांनी हजेरी लावली. त्यामुळे मकरंदआबा अजितदादांसोबत असल्याच्या चर्चांना उधाण आले.

राष्ट्रवादीच्या मंत्रीमंडळात आ. मकरंद पाटील यांचा समावेशही होणार होता. अजित पवार व मकरंद पाटील यांची तशी चर्चाही झाली. विशेष म्हणजे या चर्चेत विधान परिषदेचे माजी सभापती आ. रामराजे ना. निंबाळकर हेही उपस्थित होते. आ. मकरंद पाटील शपथ विधी सोहळ्याला उपस्थित राहिल्याचे व्हिडीओ सुद्धा कार्यकर्त्यांनी व्हायरल केले. त्याचे पडसाद वाई, खंडाळा, महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात उमटले. अनेक पदाधिकार्‍यांनी ‘मकरंदआबा जिकडे आम्ही तिकडे’ असे स्पष्ट केले. काहींनी सावध प्रतिक्रिया देत मकरंदआबा यांनी बैठक बोलावली असून त्यानंतर आम्ही आमची भूमिका जाहीर करू, असे म्हटले. तर काहींनी आ. मकरंदआबांनी खा. शरद पवार यांच्यासोबतच रहावे, अशी थेट भूमिका घेतली. आ. मकरंदआबा अजितदादांसोबतच असल्याचा अनेकांचा कयास होता. वृत्तवाहिन्यांवरुन अजितदादांसोबत असलेल्या आमदारांच्या यादीत आ. मकरंद पाटील यांचे नाव सतत दाखवत होते.

शनिवारी रात्री अजितदादांसोबत भोजन केलेल्या रविवारी दुपारपर्यंत अजितदादांसोबत राहिलेल्या आ. मकरंद पाटील यांनी अजितदादांना चकवा देत सोमवारी मात्र शरद पवार यांच्या स्वागतासाठी जंगी तयारी केली. पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंडाळ्यात शरद पवारांचे त्यांनी कार्यकर्त्यांसमवेत जोरदार स्वागत केले. एवढेच नाही तर आ. मकरंद पाटील पवारांबरोबर कराडपर्यंत गेले. कराड व सातार्‍यातील शरद पवारांच्या सर्व कार्यक्रमांना त्यांनी जाहीर हजेरी लावली. प्रत्येकवेळी पवारांच्या आसपास असणारी त्यांची उपस्थिती व देहबोली यामुळे ते शरद पवारांसोबतच असल्याचेही दिसले.

जिल्ह्याच्या सीमेवर खा. शरद पवार यांचे स्वागत

नायगाव : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्रात घडलेल्या राजकीय घडामोडीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा. शरद पवार हे कराड येथे जात असताना जिल्ह्याच्या सीमेवर शिंदेवाडी, ता. खंडाळा येथे जंगी स्वागत करण्यात आले. जिल्ह्याच्या सीमेवर फुलांची उधळण आणि पुष्पहार घालून खा. शरद पवार यांचे जोरदार स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी तोबा गर्दी केली होती. यावेळी ज्येष्ठ नेते सुभाषराव शिंदे, आ. मकरंद पाटील, माजी जि.प. अध्यक्ष उदय कबुले, मनोज पवार, राजेंद्र तांबे, डॉ.नितीन सावंत, उपसरपंच ताहेर काझी, हणमंतराव सांळुखे, अजय भोसले, आदेश भापकर, अमीर काझी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. शिंदेवाडीनंतर खंडाळ्यातही शरद पवार यांचे जंगी स्वागत करण्यात आले.



Source link

Satya: सुरुवातीला अवघे २०-३० प्रेक्षक लाभलेल्या ‘सत्या’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रचला होता मोठा विक्रम!

0
Satya: सुरुवातीला अवघे २०-३० प्रेक्षक लाभलेल्या ‘सत्या’ चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर रचला होता मोठा विक्रम!


मीडिया रिपोर्टनुसार, रिलीजच्या सुरूवातीला फक्त २०-३० लोकच हा चित्रपट पाहण्यासाठी पोहोचले होते. त्याचवेळी, सुरुवातीचे काही दिवस असाच ट्रेंड कायम राहिला, ज्यामुळे चित्रपट फ्लॉप होण्याच्या मार्गावर पोहोचला होता. पण, मग न जाणो असा काही चमत्कार घडला की, काही वेळातच चित्रपटगृहात धडाधड गर्दी वाढू लागली. फ्लॉप ठरल्याचा अंदाज बांधलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई करायला सुरुवात केली. दरम्यान, एक वेळ अशी आली की अवघ्या २.५ कोटींमध्ये बनलेल्या या चित्रपटाने तब्बल १८ कोटींहून अधिक कमाई केली होती. हा चित्रपट ब्लॉकबस्टर हिट ठरला आणि बॉलिवूडला मनोज बाजपेयीसारखा स्टार मिळाला.



Source link

बंडाळीनंतरही शरद पवारांचाच ‘जलवा’; सातार्‍यात जोरदार एंट्री | पुढारी

0


सातारा; पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आ. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत केलेल्या बंडाळीनंतरही सातार्‍यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचाच करिष्मा कायम असल्याचे सोमवारी पहायला मिळाले. त्यांच्या स्वागतासाठी जिल्ह्याच्या सीमेपासून पुढे सातार्‍यातील सर्किट हाऊसपर्यंत शरद पवारांचाच जलवा दिसून आला. कार्यकर्त्यांची प्रचंड झुंबड, पदाधिकार्‍यांची भेटण्यासाठी रस्सीखेच, फुलांचा वर्षाव, फटाक्यांची आतषबाजी असा त्यांच्या करिष्म्याचा सिलसिला सातार्‍याने पक्षातील फाटाफुटीनंतरही अनुभवला.

सातारा जिल्हा हा तसा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. या जिल्ह्यातील जनता कायमच पवारांच्या पाठीशी राहिली. 2019 च्या विधानसभा निवडणुकीवेळी पवारांच्या सातार्‍यातील पावसाच्या सभेने राज्याच्या राजकारणातील सत्तास्थानाला हादरे दिले होते. दरम्यानच्या काळात पवारांनी राष्ट्रवादी अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर जेव्हा ते सातार्‍यात आले तेव्हा तितक्याच दणक्यात त्यांचे स्वागत झाले होते. मात्र, रविवारी त्यांचेच पुतणे व राष्ट्रवादीचे खमके नेते आ. अजित पवार यांनी बंडाचे निशान फडकावत भाजप-शिवसेनेच्या सत्तेत उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या अन्य 8 आमदारांनीही मंत्रीपदाची शपथ घेतली. या शपथविधीला सातारा जिल्ह्यातील पक्षाचे काही आमदारही हजर होते. या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांची सोमवारी सातार्‍यात झालेली एंट्री तितकीच जल्लोषी ठरली.

सातार्‍यात शासकीय विश्रामगृह येथे शरद पवार यांचे आगमन झाले. जिल्हा परिषद चौक ते विश्रामगृह परिसरात रस्त्याच्या दुतर्फा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी उभे राहून शरद पवार यांच्या वाहनांच्या ताफ्यावर पुष्पवृष्टी करत त्यांचे स्वागत केले. यावेळी कार्यकर्त्यांनी ‘देश का नेता कैसा हो, शरद पवार जैसा हो.., पवारसाहेब तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है…, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा विजय असो.., महाराष्ट्राचा बुलंद आवाज शरद पवार… शरद पवार..’, अशी जोरदार घोषणाबाजी केली. शासकिय विश्रामगृहात पवार यांच्या वाहनांचा ताफा आल्यानंतर एकच गर्दी झाली होती. खा. पवार हे शासकिय विश्रामगृहातील दालनात दाखल होत असताना त्यांनी विश्रामगृहाच्या गेटवर उभे राहून हात उंचावताच एकच जल्लोष झाला.

यावेळी खा. श्रीनिवास पाटील, आ. बाळासाहेब पाटील, आ. शशिकांत शिंदे, आ. मकरंद पाटील, आ. रोहित पवार, सारंग पाटील, सत्यजित पाटणकर, प्रभाकर देशमुख, अमित कदम, दीपक पवार, संजूबाबा गायकवाड, नितीनदादा भिलारे, तेजस शिंदे, राजकुमार पाटील, समिंद्रा जाधव, स्मिता देशमुख, शशिकला देशमुख उपस्थित होते. दरम्यान, शरद पवार यांचे महामार्गावर वाढेफाटा येथेही कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यांना भेटण्यासाठी लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते, पदाधिकारी व महिलांची रिघ लागली होती.

फूट पडल्यानंतरही लोकप्रियता टिकून…

शासकीय विश्रामगृह परिसरात राष्ट्रवादीच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. यात तरुणांपासून वयोवृध्द दिसून आले. यामध्ये अनेकांनी सदैव साहेबांसोबत असणार असे फलक झळकवले. हे फलक सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. पक्षात उभी फूट पडल्यानंतरही त्यांच्या लोकप्रियतेत तसूभरही फरक पडला नसल्याचे दिसून आले.



Source link

पवार-चव्हाण यांचा प्रीति‘संगम’; कराडमध्ये एकाच कारमधून प्रवास | पुढारी

0









कराड; पुढारी वृत्तसेवा :  राजकीय मतभेद असतानाही सोमवारी आ. पृथ्वीराज चव्हाण यांनी कराडमध्ये शरद पवार यांच्या खांद्याला खांदा लावत एकाच कारमधून प्रवास केला. तसेच या दोन्ही नेत्यात मोठी जवळीक पहावयास मिळाल्याने कराडमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये झालेला प्रीतिसंगम पहावयास मिळाला. खा. शरद पवार कराडात दाखल होताच आ. बाळासाहेब पाटील व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री आ. पृथ्वीराज चव्हाण या दोघांनी एकत्रिपणे त्यांचे स्वागत केले.

राष्ट्रवादीतील बंडानंतर शरद पवार यांनी कराड येथे महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी भेट देऊन आदरांजली वाहिली. गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर पवारांनी समाधीस्थळी एल्गार पुकारला. शरद पवार जेव्हा प्रीतिसंगमावर दाखल झाले तेव्हा त्यांना समाधीस्थळीपर्यंत आणण्यासाठी एक कार ठेवण्यात आली होती. या कारमध्ये त्यांच्या शेजारी एका बाजूला आ. पृथ्वीराज चव्हाण बसले होते, तर दुसर्‍या बाजूला आ. बाळासाहेब पाटील होते. प्रत्यक्ष समाधीस्थळी शरद पवार जेव्हा दाखल झाले, तेव्हा त्यांनीही पाठीमागे राहिलेल्या पृथ्वीराज चव्हाण यांना सोबत घेत त्यांच्या हातात स्वतःच्या हातातील पुष्पचक्र दिले.

राष्ट्रवादी विरोधी काँग्रेस नेता ही ओळख दूर

मुख्यमंत्री म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांनी पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी घेतलेल्या काही निर्णयामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेस विरोधातील काँग्रेस नेते आहेत, अशी टीका राष्ट्रवादीच्या विविध नेत्यांकडून सातत्याने होत होती. राष्ट्रवादी काँग्रेस व त्यांच्यातील सुप्त संघर्षामुळे 2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसने पाठिंबा काढून घेतला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाली होती. एकीकडे हा इतिहास असताना सोमवारी कराडमध्ये घडलेल्या घडामोडीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधातील काँग्रेस नेता अशी पृथ्वीराज चव्हाण यांची असणारी ओळख दूर होण्यास मोठी मदत होणार आहे.











Source link

Sharad Pawar karad news | आम्ही साहेबांसोबत…, कराड भूमीत झळकले फलक | पुढारी

0









कराड; पुढारी वृत्तसेवा : अजित पवार यांनी बंड करून शिंदे -फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेऊन महाराष्ट्रात राजकीय भूकंप घडविला. याचे पडसाद सोमवारी स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या कराड कर्मभूमीत उमटले. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार सकाळी कराड शहरात दाखल झाले आणि हजारोंच्या संख्येने राष्ट्रवादीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते त्यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले. आम्ही साहेबांसोबत असे फलक ठिकठिकाणी झळकले. (Sharad Pawar karad news)

अजित पवार यांच्या बंडानंतर दुसर्‍याच दिवशी शरद पवार सातारा दौर्‍यावर आले. सोमवारी सकाळी ते कराड येथील स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीला अभिवादन करण्यासाठी आले. यावेळी कराड पाटणसह जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेर हजारोंच्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते कराडमध्ये दाखल झाले. स्व. यशवंतराव चव्हाण समाधी परिसरात कार्यकर्त्यांचा प्रचंड जोश पहायला मिळाला.
प्रचंड घोषणाबाजी करत कार्यकर्त्यांनी समाधी परिसर दाणाणून सोडला. शरद पवार यांच्या पाठिंब्याचे बॅनर शहरभर झळकले. फुटून गेलेल्या आमदारांबद्दल कार्यकर्त्यांमध्ये संतापही पहायला मिळाला. आम्ही साहेबांसोबत असे पाठिंब्याचे फलक हातात घेऊन शकडे कार्यकर्ते समाधीस्थळी दाखल झाले होते.

सकाळी दहा वाजता शरद पवार समाधीस्थळी येणार होते. मात्र आठ पासूनच कार्यकर्ते जमा होवू लागले. ‘शरद पवार तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है.., देश का नेता कैसा हो शरद पवार जैसा हो’ अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. यानंतर समाधीस्थळी झालेल्या सभेत शरद पवार यांनी जातीच्या, धर्माच्या नावाखाली जातीय तेढ निर्माण करणार्‍या प्रवृत्तींना रोखण्यासाठी सर्वांनी एकत्र यावे, असे आवाहन केले. दरम्यान सभास्थळी मोठी गर्दी झाली होती. जिल्ह्यातील विविध भागातून कार्यकर्ते पाठिंब्यासाठी आले होते. गर्दीेवर नियंत्रण मिळविताना पोलिसांची दमछाक झाली.

पक्षाची भूमिका प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी स्पष्ट केली : आ. बाळासाहेब पाटील

आ. बाळासाहेब पाटील यांनी रविवारी आपण शरद पवार यांच्यासोबत असून त्यांची भूमिका तीच आपली भूमिका असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संपूर्ण पक्षासह पक्ष चिन्हावर दावा केल्याकडे आ. पाटील यांचे लक्ष वेधले असता त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनी रविवारी रात्रीच पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे, असे सांगत या विषयावर अधिक भाष्य करण्याचे टाळले. त्याचबरोबर खासदार शरद पवार यांच्यावर यापूर्वी असे अनेक प्रसंग ओढवले आहेत असे सांगत अशा कठीण प्रसंगातून पक्ष पुन्हा उभा करण्याचे काम शरद पवार यांनी केले आहे. आताच्या कठीण प्रसंगातही शरद पवार निश्चित मार्ग काढतील. सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते शरद पवार यांच्या पाठीशी ठाम राहतील.

खा. शरद पवार यांच्याशिवाय महाराष्ट्राला कोणी मार्ग दाखवू शकत नाही : पाटणकर

पाटण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते व पदाधिकारी खा. शरद पवार यांच्यासोबत ठामपणे उभे आहेत. आजपर्यंत महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेवर ज्या – ज्या वेळी संकट आले आहे त्या – त्या वेळी खा. शरद पवार यांनी मार्ग दाखवला आहे. यापूर्वीही असे संकटाचे प्रसंग ओढवले होते. त्या प्रत्येक वेळी आपण आपल्या कार्यकर्त्यांसह शरद पवार यांच्या पाठीशी ठामपणे उभे होतो आणि आजही आहे. पवार यांचे निकटवर्तीय मानले जाणारे लोक विरोधात गेल्याने आता जनताच त्यांचे परीक्षण करेल आणि निवडणुकीत योग्य निर्णय घेईल असेही माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी स्पष्ट केले. पाटण राष्ट्रवादी पवार यांच्या सोबत ठाम राहील, असे पाटणकर म्हणाले. (Sharad Pawar karad news)











Source link

डोळ्यात आसवे अन् खांद्यावर राष्ट्रवादीचा झेंडा | पुढारी

0









कराड; पुढारी वृत्तसेवा :  राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेली फूट आणि त्यामुळे झालेल्या वेदनामुळे डोळ्यात आसवे अन् खांद्यावर राष्ट्रवादीचा झेंडा घेतलेले हजारो लोक सकाळी आठ वाजल्यापासून राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांची स्व. यशवंतराव चव्हाण समाधीस्थळी प्रतिक्षा करत होते. झालं हे चांगलं झालं नाही, अशा शब्दात आपल्या भावनांना वाट मोकळी करून देत आम्ही साहेबांसोबतच असा नाराही कार्यकर्ते देत होते.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी रविवारी आपण कराडमध्ये येणार असल्याचे जाहीर केले होते. शरद पवार हे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधी स्थळे दर्शन घेऊन नव्या राजकीय वाटचालीस प्रारंभ करणार असल्याने ते काय बोलणार? ते कोणती भूमिका घेणार? याची संपूर्ण राज्याचे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना मोठी उत्सुकता होती. शरद पवार हे सकाळी सव्वाआठ वाजण्याच्या सुमारास पुण्याहून कराडच्या दिशेने रवाना झाले. मात्र तत्पूर्वीच शेकडो निष्ठावंत कार्यकर्ते स्व. यशवंतराव चव्हाण समाधीस्थळ परिसरात दाखल झाले होते.

सकाळी नऊनंतर मात्र कार्यकर्त्यांचे जथ्येच्या जथ्ये प्रीतिसंगम बाग परिसरात येत असल्याचे पहावयास मिळाले. यात सातारा जिल्ह्यासोबतच नजीकच्या सांगली, पुणे, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा समावेश होता. पंढरपूर होऊन कराडमध्ये दाखल झालेले दत्तात्रय बडवे यांच्यासह उपस्थित शेकडो कार्यकर्त्यांच्या डोळ्यात पक्षात पडलेल्या फुटीचे दुःख स्पष्टपणे पाहावयास मिळत होते. अनेकांनी झालं हे चांगलं झालं नाही, अजित पवार यांनी असे करायला नको होते अशा शब्दात भावना व्यक्त केल्या. तर काहींनी दिलेल्या आमदारांनी परत यावे आणि शरद पवार यांची हात बळकट करावेत अशाही भावना व्यक्त केल्या.

कराडमध्ये सोमवार सकाळपासून रिमझिम पाऊस पहावयास मिळत होता. पाऊस आला तरी आपण हटायचे नाही असे काही कार्यकर्ते आपल्या सहकार्‍यांना सांगत होते. सकाळी दहानंतर मात्र समाधीस्थळ परिसरातील प्रीतीसंगम बागेत हजारो कार्यकर्ते जमा झाले. हजारो कार्यकर्ते घोषणाबाजी करत शरद पवार यांची प्रतीक्षा करत होते. पावणे अकराच्या सुमारास शरद पवार यांचे आगमन झाल्यानंतर अक्षरश: चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली होती. नियोजित कार्यक्रमानुसार यशवंतराव चव्हाण समाधीस्थळ परिसरात शरद पवार पत्रकारांशी संवाद साधणार होते. आमदार रोहित पवार यांचे सूचनेवरून आ. बाळासाहेब पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून तशी व्यवस्था करण्यात आली होती.

पंतप्रधान, अमित शहा यांच्या विरोधात घोषणा

स्व. यशवंतराव चव्हाण समाधी स्थळ परिसरात जमा झालेल्या कार्यकर्त्यांनी सकाळपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. ही घोषणाबाजी दुपारपर्यंत सुरू होती. एकीकडे असे असले तरी कार्यकर्त्यांनी संयम बाळगत राष्ट्रवादी काँग्रेसच्या धोरणा विरोधात वेगळी भूमिका घेतलेल्या अजित पवार यांच्यासह एकाही आमदारा विरोधात कार्यकर्त्यांनी चार तासात एक अवाक्षरही काढले नाही. भाजप नेत्यांबद्दल मात्र संताप व्यक्त केला.











Source link