Thursday, July 16, 2026
Home Blog Page 293

निसर्गलिपी : बदलाची चाहूल

0
निसर्गलिपी : बदलाची चाहूल



नवीन लागवड करताना चार महिने सतत अन्न पुरवठा होईल अशा बेतानेच पालापाचोळा, काडी कचरा यांचा वापर करत सगळ्या कुंड्या नव्याने भरून घेतल्या. जोडीला वर्षभरात तयार केलेलं कंपोस्ट होतं. एरवी वाळलेल्या पानांचा भरपूर कचरा मिळत असतो, पण पावसाळ्यात मात्र पानं ओलीगच्च होतात. अशावेळी त्यांचा तितकासा वापर करता येत नाही, त्यामुळे सुका पालापाचोळा साठवून ठेवावा लागतो. एकदा तो हाताशी असला की कधीही, चटकन एखादी भाजी लावता येते.

आंब्याच्या पेट्यामधून येणारा पेंढा किंवा चिमणीचं गवत यांचीसुद्धा साठवणूक उपयोगी पडते. यानंतरच महत्त्वाचं काम होतं ते म्हणजे मांडव तयार करणं. आदल्यावर्षीच्या बांबूच्या काटक्या तपासून नवीन काटक्या रोवत, त्यांना पेललेल इतक्या वजनाच्या जाळीचं आच्छादन करून मांडव तयार करून घेतले.

कडकडीत उन्हानं अवघी सृष्टी पोळून निघत असताना मला मात्र येणाऱ्या पावसाचे वेध लागले होते. शेतकरी जशी पावसापूर्वीची कामं आवरून घेतो तशीच मलासुद्धा माझ्या बागेतली कामं पूर्ण करून घ्यायची होती. लिलीचा बहर अनुभवायचा तर पावसासारखा उत्तम काळ नाही. पावसात आससून बहरणारी, अनेक रंगात फुलणारी लिली अनुभवणं यासारखं सुख नाही.

मागच्या वर्षी मी रेन लिलीचे कंद रंगांप्रमाणे न लावता एकत्रित लावले होते, या वर्षी ते रंगानुसार विभागून लावून घेतले. कर्नाटकातील लेपाक्षी मंदिरात गेले असताना पांढऱ्या रेन लिलींच्या कंदांची अशी एकत्रित लागवड पाहिली होती. वास्तू सौंदर्याने परिपूर्ण अशा लेपाक्षी मंदिराच्या पार्श्वभूमीवर ही नाजूक पांढरी शुभ्र फुलं उठून दिसत होती.

मंदिर परिसरात फिरून तिथला इतिहास जाणून घेताना, तिथल्या सौंदर्याच्या कल्पनेत हरवून जाताना माझं लक्ष मंदिर परिसरा भोवती फुललेल्या त्या नाजूक रेन लिलीवर होतं. हलक्या पावसाच्या सरींच्या साथीने वाऱ्यावर डोलणारी ती इवली नाजूक फुलं पाहाणं हे मनावर गारूड करणार होतं.

त्याचवेळी ठरवलं की, एकदा अशी एकरंगी लागवड करायची. रेन लिलीचे कंद हे अगदी लहानसे असतात. आपल्या छोट्या कांद्यांसारखे कुंडीत एक दोन कंद जरी लावले तरी वर्षभरात त्यांच्यापासून बरीच प्रजा तयार होतात. उन्हाळ्यात ते कंद एकमेकांपासून अलगद सोडवून घेऊन लावून घेतले तर पावसाळ्यात फुलांचा बहर अनुभवता येतो.

यासाठी एखादी आयताकार पसरट कुंडी असेल किंवा एखादं वाटोळं असं मातीचा भांड असेल तर उत्तम. यात पुरेसा सुका पालापाचोळा, थोडं शेणखत किंवा गांडूळखत,थोडं कंपोस्ट वापरून कुंडी भरायची. पावसाळ्याचे चार महिने रोपांना एवढा खुराक पुरतो. रोपांची सुरेख वाढ होते. नवीन कंदांना वाढायला जागा मिळते. उन्हाळ्यात विश्रांती घेऊन सुखावलेले ते इवले कंद पावसाच्या वर्षावात तरारून येतात.

पांढरी, गुलाबी, पिवळी, किरमिजी अशी विविध रंगांची रेन लिली निगुतीने लावून घेतल्यावर पुढचं काम होतं ते अळूचे कंद सोडवून घेण्याचं. वर्षभर अळूची पानं मिळत होतीच, पण पाऊसकाळात होणारी अळूची वाढ ही काही वेगळीच असते. अळूचे कंद सोडवून घेत जास्तीच्या जागेत लावून घेतले. मायाळूच्या काळ्याशार टपोऱ्या बिया जमवून ठेवल्या होत्या. त्याही लावून घेतल्या. घोळाच्या नाजूक काळ्या बिया, हिरव्या माठाचे सुकवलेले तुरे, बियाणांसाठी राखलेल्या घोसाळ्याच्या काळ्याभोर बिया. थंडीत वेलीवर राखलेल्या वाटाण्याच्या शेंगा, भेंडी असं घरचं बियाणं हाताशी होतं.

नवीन लागवड करताना चार महिने सतत अन्न पुरवठा होईल अशा बेतानेच पालापाचोळा, काडी कचरा यांचा वापर करत सगळ्या कुंड्या नव्याने भरून घेतल्या. जोडीला वर्षभरात तयार केलेलं कंपोस्ट होतं. एरवी वाळलेल्या पानांचा भरपूर कचरा मिळत असतो, पण पावसाळ्यात मात्र पानं ओलीगच्च होतात. अशावेळी त्यांचा तितकासा वापर करता येत नाही, त्यामुळे सुका पालापाचोळा साठवून ठेवावा लागतो. एकदा तो हाताशी असला की कधीही, चटकन एखादी भाजी लावता येते.

आंब्याच्या पेट्यामधून येणारा पेंढा किंवा चिमणीचं गवत यांचीसुद्धा साठवणूक उपयोगी पडते. यानंतरच महत्त्वाचं काम होतं ते म्हणजे मांडव तयार करणं. आदल्यावर्षीच्या बांबूच्या काटक्या तपासून नवीन काटक्या रोवत, त्यांना पेललेल इतक्या वजनाच्या जाळीचं आच्छादन करून मांडव तयार करून घेतले.

घोसाळी, काकडी, कारलं, तोंडली यांसारख्या वेलींसाठी बांबूच्या काटक्या रोवून तयार केलेले मांडव पुरतात. दूधी भोपळा, लाल भोपळा पडवळ यांच्यासाठी मात्र मजबूत जाळी आणि भक्कम असा बांबूचा आधार तयार करावा लागतो. मायाळूचा आणि गोकर्णीचे वेल एकामेकांच्या संगतीने वाढतात.मायाळूची गडद ह्दयाकार हिरवीगार पानं आणि गोकर्णीची निळी गडद नाजूक फुलं असलेला वेल जेव्हा एकत्र वाढतो तेव्हा एखादं हिरवं चित्र काढल्याचा भास होतो. चित्रकार जसा आपल्या चित्रात हवे ते आकार आणि रंग यांचा मेळ साधत एक वेगळाच परीणाम साधतो तसं या दोन वेली आपलं सौष्ठव मिरवत, वैगुण्य लपवत एकीमेकींना जोडून घेत एक नवीन चित्र रेखतात.

प्रत्येक ऋतूबदला आधी बाग तयार करताना मला निसर्गाच्या बदलांमुळे साधणाऱ्या चमत्कृतींची नव्याने जाणीव होते. दर चार महिन्याने चित्र बदलतं, पण तरीही हा बदल प्रत्येक वेळी हवाहवासा वाटतो. चैतन्य निर्माण करतो.

नवीन प्रयोग करण्याची प्रेरणा देतो. शेवटी परिवर्तन हा तर निसर्गाचा नियमच आहे नाही का?

मैत्रेयी किशोर केळकर

mythreye.kjkelkar@gmail.com



Source link

ShivSena UBT Seeks Urgent Hearing Of Election Symbol Dispute In Supreme Court Before Maharashtra Local Body Elections

0
ShivSena UBT Seeks Urgent Hearing Of Election Symbol Dispute In Supreme Court Before Maharashtra Local Body Elections



ShivSena UBT Seeks Urgent Hearing Of Election Symbol Dispute In Supreme Court Before Maharashtra Local Body Elections | पालिका निवडणुकीच्या आधी पक्षनाव, पक्षचिन्हाबाबत निर्णय घ्या; ठाकरे गटाची सर्वोच्च न्यायालयात विनंती!



Source link

Nagpur E Raghavendra Rao indias only one civil defense college in nagpur

0
Nagpur E Raghavendra Rao indias only one civil defense college in nagpur



Nagpur E Raghavendra Rao indias only one civil defense college in nagpur | भारताच्या नागरी संरक्षणाचे शिल्पकार नागपूरकर ई. राघवेंद्र राव देशातील एकमेव नागरी संरक्षण महाविद्यालय नागपूरमध्ये



Source link

मालाड रस्ता रुंदीकरण – A मालाडमध्ये रस्ता रुंदीकरणाची रेषा रहिवाशांच्या घरातून; मामलेतदारवाडीतील रहिवाशांमध्ये संताप

0
मालाड रस्ता रुंदीकरण – A मालाडमध्ये रस्ता रुंदीकरणाची रेषा रहिवाशांच्या घरातून; मामलेतदारवाडीतील रहिवाशांमध्ये संताप



मुंबई: पश्चिम उपनगरात मालाड येथील मामलेतदारवाडीत मुंबई महापालिकेने रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेतले असून तेथील इमारतीच्या संरक्षित भिंतीपासून अडीच मीटरपर्यंतचा भाग रस्ता रुंदीकरणात जाणार आहेत. रस्ता रुंदीकरणाची रेषा काही इमारतींच्या अक्षरश: बाल्कनी आणि बेडरुमधून जात आहे. रहिवाशांची बाजू समजून न घेता सुरू केलेल्या रस्ता रुंदीकरणाला स्थानिकांनी कडाडून विरोध केला आहे. विकास आराखड्याची इतकी काटेकोर अंमलबजावणी आताच का असा प्रश्नही तेथील नागरिकांनी उपस्थित केली आहे.

मालाड पश्चिम परिसरात गेल्या काही वर्षांपासून रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेतले आहे. त्याच अंतर्गत मामलेतदार वाडी येथेही रस्ता रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र त्यात मामलेतदार वाडी क्रमांक ६ येथे अंतर्गत गल्ल्यांचेही रुंदीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी मुंबई महापालिकेच्या पी उत्तर विभागाने तेथील रहिवाशांना नोटीसा बजावल्या होत्या. या रुंदीकरणात मैत्री सोसायटी या इमारतीचा खूप मोठा भाग बाधित होतो आहे. तसेच रस्ता रुंदीकरणाची रेषा इमारतीच्या बाल्कनीखालून जाते. त्यामुळे या इमारतीचा बाल्कनीचा भाग तसेच शयनकक्षाचा भागही बाधित होणार आहे. त्यामुळे रहिवाशांनी या रस्ता रुंदीकरणाला विरोध केला आहे.

याबाबत मैत्री सोसायटीतील कमलेश देवरुखकर यांनी सांगितले, आमच्या सोसायटीचा खूप जास्त मोठा भाग रस्ता रुंदीकरणासाठी ताब्यात घेण्यात येणार आहे. स्थानिक रहिवाशांची बाजू विचारात न घेता पी उत्तर विभागाकडून ही कारवाई मनमानी पद्धतीने रेटण्यात येत आहे. रस्तारुंदीकरण हे रहदारीच्या मुख्य रस्त्यावरील नाही तर गल्लीतील आहे. तेथे फारशी रहदारी नाही. तरीही महानगर पालिका हा आतला रस्ता सव्वा मीटर रुंदीचा करण्यासाठी विशेष आग्रही आहे. त्यात काही विकासकांचे लागेबांधे असल्याची चर्चाही परिसरात आहे, असा आरोप रहिवाशांनी केला आहे.

रस्ता रुंदीकरणाचा हा आराखडा ज्या स्वरूपात आहे तेथे रस्ता बांधल्यास तो आमच्या इमारतीच्या सुरक्षेसाठी आणि रहिवाशांच्या जीवितासाठी धोकादायक आहे. आमची इमारत २०१५ साली पूर्णत्वास आली. केवळ दहा वर्ष झालेल्या इमारतीच्या प्रकल्पास मान्यता देताना त्यावेळी या रस्त्याचा विचार महानगरपालिकेने केला नव्हता का? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. गेल्या आठवड्यात महापालिकेची यंत्रणा थेट बुलडोझर घेऊन कारवाई करण्यासाठी आली होती. मात्र, रहिवाशांनी विरोध केल्यामुळे कारवाई थांबली. त्यानंतर २ मे रोजी पालिकेच्या एका अधिकाऱ्याने परिसरात रस्ता रुंदीकरणासाठी जागा चिन्हांकित केली. सर्वात गंभीर बाब म्हणजे प्रस्तावित वळणाचे ठिकाण इमारतीतील पहिल्या मजल्यावरील सदनिकांच्या बाल्कनीखालून आणि बेडरुमखालून जात आहे. इतक्या जवळून रस्ता जात असेल तर आमच्या इमारतीला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच उद्या ही इमारत अनधिकृत ठरू शकते, असा मुद्दा देवरुखकर यांनी मांडला.

आम्ही यापूर्वी २७ डिसेंबर २०२४ आणि १ एप्रिल २०२५ रोजी पालिकेस लेखी पत्र देऊन आक्षेप नोंदवला असून, त्यामध्ये आम्ही नमूद केले आहे की आमच्या इमारतीतील सदस्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता, कोणतीही विचारणा न करता हे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानंतरही पालिका अधिकाऱ्यांशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही त्यांनी आमच्याशी काहीही संवाद साधला नाही, असाही आरोप रहिवाशांनी केला आहे.

दरम्यान, या प्रकरणी सहाय्यक आयुक्त कुंदन वळवी यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, नवीन विकास आराखडयानुसार सर्वच रस्ते हे नऊ मीटरचे करावे लागणार आहेत. त्यामुळे हे रुंदीकरण हाती घेतले आहे. मात्र मैत्री इमारतीच्या रहिवाशांचे आक्षेप विचारात घेऊन आम्ही सध्या केवळ संरक्षित भिंतीपर्यंतचाच भाग घेणार आहोत. भविष्यात जेव्हा त्यांची इमारती पुनर्विकासासाठी पुढे येईल तेव्हा बाल्कनीचा भाग घेतला जाईल. रहिवाशांना लवकरच आम्ही ही बाब समजावून सांगू असेही ते म्हणाले.



Source link

Operation Sindoor Latest News: Know Who is Who is Col. Sofia Qureshi and Wing Commander Vyomika Singh in Operation Sindoor PC

0
Operation Sindoor Latest News: Know Who is Who is Col. Sofia Qureshi and Wing Commander Vyomika Singh in Operation Sindoor PC



Operation Sindoor Latest News: Know Who is Who is Col. Sofia Qureshi and Wing Commander Vyomika Singh in Operation Sindoor PC | कोण आहेत ‘ऑपरेशन सिंदूर’ची माहिती देणाऱ्या कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग?



Source link

Operation Sindoor: बिनशर्त पाठिंबा देत पवारांचा मोदी सरकारला इशारा; म्हणाले, ‘काळजी करण्यासारखी…’

0
Operation Sindoor: बिनशर्त पाठिंबा देत पवारांचा मोदी सरकारला इशारा; म्हणाले, ‘काळजी करण्यासारखी…’


Operation Sindoor Sharad Pawar To Modi Government: भारतामध्ये सत्तेत असलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या हल्ल्याचा बदला घेत पाकिस्तानवर हल्ला केला आहे. भारताने मध्यरात्री केलेल्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानबरोबरच पाकव्याप्त काश्मीरमधील एकूण 9 ठिकाणांवर हल्ला केला. या हल्ल्यामध्ये 90 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा भारताने केला. या हल्ल्यानंतर राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवारांनी मोदी सरकारला बिनशर्त पाठिंबा देत या कारवाईला पाठिंबा दिला आहे. मात्र त्याचवेळी शरद पवारांनी एका गंभीर विषयाकडे लक्ष वेधत चिंतेची बाब कोणती आहे हे सांगितलं आहे.

भारतीय हवाई दलाने सीमा ओलांडली नाही

“गेल्या आठवड्यात जे काही काश्मीरमध्ये घडले त्यामुळे साहजिक देशात लोकांमध्ये एक अस्वस्थता होती. निष्पाप लोकांना गोळ्या घालतात, 27 लोकं जातात. भारत आणि पाकिस्तानमधील पाकव्याप्त काश्मीर त्यांनी 1948 मध्ये घेतला तिथेच हे हल्ला करण्याचे स्थान केंद्रित केल्याचं दिसत आहे,” असं शरद पवारांनी म्हटलं आहे. पाकिस्तानव्याप्त काश्मीरमध्ये जे दहशतवाद्यांचे कॅम्प आहेत तिथे दारूगोळा ठेवला जातो आणि सगळी मदत पाकिस्तान करते. भारत आणि पाकिस्तानची बॉर्डर ओलांडून आपण जाऊ इच्छित नव्हतो आणि त्याची काळजी भारतीय हवाई दलाने घेतली,” असं सूचक विधान शरद पवारांनी पत्रकार परिषदेमध्ये केलं आहे. 

भारताचं धोरण चुकीचं नाही

“पाकिस्तानव्याप्त काश्मीर हल्ले झाले यात एक बदल दिसतो की जे काश्मीर मध्ये झालं, ज्या घटना घडल्या त्यानंतर संपूर्ण काश्मीरमध्ये स्थानिक जनता महाराष्ट्राच्या जनतेच्या सोबत उभी राहिली. काश्मीरमधील विधानसभेत हाल्ल्याच्या विरोधात ठराव झाला. ओमर अब्दुल्ला यांनी स्वच्छ भूमिका घेत दहशतवादाला विरोध केला,” असं शरद पवार म्हणाले. “पाकिस्तानची आर्थिक कोंडी कशी करता येईल यासंदर्भातील सध्याचं भारताचं धोरण चुकीचं नाही,” असं शरद पवार म्हणाले. “या मोहिमेला नाव जे दिलं ते योग्य दिलं गेलं,” असंही पवार ‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल म्हणाले.

शरद पवारांनी ‘या’ गोष्टीबद्दल व्यक्त केली चिंता

‘ऑपरेशन सिंदूर’संदर्भात बोलताना शरद पवारांनी, “हा सगळा निर्णय योग्य घेतला आहे. सर्वपक्षीय बैठकीत सुप्रिया सुळे उपस्थितीत होत्या. अशा परिस्थितीत राजकारणमध्ये न आणता आम्ही सोबत होतो,” असं आवर्जून सांगितलं. “काल रात्री कारवाई झाली त्याच्यापाठी आम्ही उभे आहोत,” असंही शरद पवार म्हणाले. मात्र त्याचवेळी शरद पवारांनी या हल्ल्यानंतर एक चिंताही व्यक्त केली. “अमेरिका, जपान आणि इतर देशांनी भारताला समर्थन दिलं आहे. काळजी करण्यासारखी गोष्ट आहे की चीनने समर्थन दिलेलं नाही. ही सतर्क राहण्याची स्थिती आहे. पाकिस्तानला माहिती नाही पण त्यांना त्यांची ताकद आणि भारताची ताकद माहिती आहे या गोष्टीत आपल्याला सावध रहावं लागेल,” असं शरद पवार म्हणाले. 





Source link

Indian Army Destroyed terror camps where Mumbai terror attacker Ajmal Kasab and David Headly were trained

0
Indian Army Destroyed terror camps where Mumbai terror attacker Ajmal Kasab and David Headly were trained



Indian Army Destroyed terror camps where Mumbai terror attacker Ajmal Kasab and David Headly were trained | अजमल कसाब आणि डेविड हेडलीने प्रशिक्षण घेतलेले तळही उद्ध्वस्त; हल्ल्याचा VIDEO आला समोर!



Source link

चार आठवड्यात निवडणुका जाहीर करणे अशक्य

0
चार आठवड्यात निवडणुका जाहीर करणे अशक्य


मुंबई : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका चार आठवड्यात जाहीर करून चार महिन्यांत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले असले, तरी त्याची अंमलबजावणी करणे राज्य निवडणूक आयोगाला अशक्य आहे. आदेशाचे पालन करावयाचे झाल्यास राज्यात किमान तीन महिने निवडणूक आचारसंहिता लागू होऊन शासकीय यंत्रणेचे बरेचसे कामकाज ठप्प होण्याची भीती आहे.

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दोन ते पाच वर्षे रखडल्या होत्या. या निवडणुकांना दिलेली स्थगिती उठवीत न्यायमूर्ती सूर्य कांत आणि न्यायमूर्ती एन. के. सिंग यांच्या खंडपीठाने राज्य निवडणूक आयोगाला चार आठवड्यात निवडणुका जाहीर करण्याचे आदेश दिले आहे. आयोगाचा कायदा, नियम व कार्यपद्धतीनुसार निवडणुकीआधी सर्वप्रथम मतदारयाद्यांची पुनर्रचना करून ती अंतिम करावी लागते. त्याचदरम्यान मतदानयंत्रणेची तयारी, प्रभागरचना अंतिम करून आरक्षणाची सोडत काढणे आदी कामे केली जातात व त्यानंतर निवडणुकीची तारीख जाहीर होते. जुनीच प्रभागसंख्या व रचना ग्राह्य धरायची की महाविकास आघाडी सरकारच्या काळातील वाढीव प्रभागसंख्या व नवी प्रभागरचना स्वीकारून निवडणूक घ्यायची, या मुद्द्यावर निवडणूक आयोगाला सर्वोच्च न्यायालयाकडून आदेश घ्यावे लागणार आहेत. या सर्व बाबींसाठी लागणारा कालावधी लक्षात घेता चार आठवड्यात निवडणुकांची तारीख जाहीर करणे अशक्य आहे.

त्याचबरोबर मतदानाची तारीख जाहीर करून उमेदवारी अर्जांना सुरूवात, मतदान आणि मतमोजणी यासाठी किमान ३०-४० दिवसांचा कालावधी लागतो. या कालावधीत आचारसंहिता लागू असते आणि सरकारला कोणतेही महत्वाचे निर्णय घेता येत नाहीत. हा कालावधी कमीतकमी असावा, यासाठी प्रयत्न असतो. ग्रामपंचायती, नगरपालिका, जिल्हा परिषदा व महापालिका यांच्या निवडणुका एकाचवेळी घेणे अवघड असून त्या टप्प्याटप्प्याने घ्याव्या लागतील. त्यामुळे त्या तारखा चार आठवड्यात जाहीर केल्या, तर राज्यात पुढील तीन-चार महिने आचारसंहिता लागू करावी लागेल आणि त्याचा परिणाम प्रशासकीय यंत्रणेवर होऊन कामकाज ठप्प होईल. त्यामुळे या सर्व बाबींचा विचार करून आयोगाला निवडणुकीच्या तारखांची घोषणा करावी लागणार असल्याने ते चार आठवड्यात करता येणे अशक्य असल्याचे सूत्रांनी सांगितले.



Source link

निम्रत कौरची ऑपरेशन सिंदूरवर प्रतिक्रिया

0
निम्रत कौरची ऑपरेशन सिंदूरवर प्रतिक्रिया


Nimrat kaur Reaction on Operation Sindoor: २२ एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला. दहशतवाद्यांनी २६ निष्पाप पर्यटकांची गोळ्या झाडून हत्या केली. या हल्ल्यानंतर सर्व मृतांना न्याय मिळावा, अशी मागणी केली जात होती. याचदरम्यान, भारतीय लष्कराने बुधवारी मध्यरात्री उशिरा पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरवर एअर स्ट्राईक केला आणि दहशतवाद्यांची तळं उद्ध्वस्त केली.

बुधवारी रात्री १:३० च्या सुमारास भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळावर एअर स्ट्राईक केला आणि चोख प्रत्युत्तर दिले आहे. या एअर स्ट्राईकवर बॉलीवूडमधून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. बॉलीवूड अभिनेत्री निम्रत कौरने ‘ऑपरेशन सिंदूर’बद्दल पोस्ट केली आहे.

हेही वाचा

निम्रत कौरची पोस्ट

आपल्या सैन्याबरोबर एकजूट आहोत. एक देश. एक ध्येय. #जयहिंद #ऑपरेशनसिंदूर अशी पोस्ट निम्रत कौरने केली आहे.

Nimrat kaur Reaction on Opration Sindoor
निम्रत कौरची पोस्ट (सौजन्य – एक्स अकाउंट)

दरम्यान, रितेश देशमुख व मधुर भांडारकर यांनीही या एअर स्ट्राईकबद्दल प्रतिक्रिया दिल्या आहेत. रितेशने जय हिंद की सेना अशी पोस्ट केली आहे. “आमच्या प्रार्थना आमच्या सैन्याबरोबर आहेत. एक राष्ट्र, तुमच्याबरोबर एकत्र आम्ही उभे आहोत. जय हिंद, वंदे मातरम…”, अशी पोस्ट मधुर भांडारकरने केली.

हेही वाचा

१) बहावलपूर
२) मुरिदके
३) गुलपूर
४) भीमबर
५) चक अमरू
६) बाग
७) कोटली
८) सियालकोट
९) मुजफ्फराबाद या पाकिस्तानमधील नऊ ठिकाणांवर भारतीय सैन्य दलाने एअर स्ट्राईक केला आहे.

हेही वाचा

आज देशभरात मॉक ड्रीलची घोषणा करण्यात आली होती. त्याची तयारीही चालू होती. मात्र त्याआधीच बुधवारच्या मध्यरात्री भारतीय सैन्यदलाने पाकिस्तानवर एअर स्ट्राईक करत दहशतवाद्यांची नऊ तळं उद्ध्वस्त केली आहेत. भारताने कोणत्याही नागरी वस्तीवर हल्ला केला नसून फक्त दहशतवादी तळांनाच लक्ष्य केलं आहे.



Source link

india air strike on pakistan operation sindoor whatexactly happend in during midnigh attack

0
india air strike on pakistan operation sindoor whatexactly happend in during midnigh attack


India Pakistan War Tensions: पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी पाकिस्तानमधून आलेल्या दहशतवाद्यांनी भीषण हल्ला केला. यात २६ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. या हल्ल्यानंतर देशभरातून संतप्त भावना व्यक्त केल्या जात होत्या. गेल्या १५ दिवसांत या मुद्द्यावरून देशभरातील वातावरण तापल्याचं दिसून आलं. या पार्श्वभूमीवर मंगळवारी मध्यरात्रीनंतर अर्थात ७ मे रोजी पहाटे भारतीय हवाई दलानं पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरच्या परिसरातील दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. या एअर स्ट्राईकला भारतानं ‘ऑपरेशन सिंदूर’ असं नाव दिलं.

मध्यरात्रीनंतर पाकिस्तानच्या हद्दीत स्फोटांचे आवाज!

मध्यरात्रीनंतर म्हणजेच साधारणपणे दीडच्या सुमारास भारतीय हवाई दलाच्या फायटर जेट्स आणि राफेल विमानांनी पाकिस्तानमधील एकूण ९ ठिकाणी दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. यात मोठ्या प्रमाणावर या दहशतवादी तळांचं, दहशतवाद्यांच्या मनुष्यबळाचं आणि दहशतवाद्यांना मदत देणाऱ्या संपूर्ण व्यवस्थेचं मोठं नुकसान भारतानं केल्याचं स्पष्ट झालं आहे.

कोणत्या ९ ठिकाणांना केलं लक्ष्य?

दरम्यान, भारतानं कोणत्या ९ ठिकाणी असणाऱ्या दहशतवादी तळांना लक्ष्य केलं, याची यादी समोर आली आहे.

१) बहावलपूर
२) मुरिदके
३) गुलपूर
४) भीमबर
५) चक अमरु
६) बाग
७) कोटली
८) सियालकोट
९) मुजफ्फराबाद

अशी ती ९ ठिकाणं आहेत. या ठिकाणी जैश ए मोहम्मद, लष्कर ए तोयबा आणि हिजबुल मुजाहिद्दीन या तीन दहशतवादी संघटनांचे तळ होते. या ठिकाणी मोठ्या संख्येनं दहशतवादी असल्याची माहिती भारतीय लष्कराकडे होती. त्यानुसार सुनियोजित पद्धतीने फक्त याच ठिकाणांना लक्ष्य करण्यात आलं. या हल्ल्यात कोणत्याही सामान्य पाकिस्तानी नागरिकाला लक्ष्य करण्यात आलेलं नाही. तसेच, पाकिस्तानी लष्कराच्या तळावरदेखील हल्ला केलेला नाही.

पाकिस्तानला लक्ष्य करताना भारतानं याआधीही सर्जिकल स्ट्राईक आणि एअर स्ट्राईक केले आहेत. पण १९७१ नंतर पहिल्यांदाच भारतीय लष्कराच्या तिन्ही सैन्यदलांनी संयुक्तपणे पाकिस्तानविरोधातल्या कारवाईत सहभाग घेतल्याचं सांगितलं जात आहे.

नेमकी वेळ…१ वाजून २८ मिनिटं!

भारतीय हवाई दलानं मध्यरात्रीनंतर म्हणजेच १ वाजून २८ मिनिटांनी दहशतवादी तळांवर एअर स्ट्राईक केला. पुढच्या २३ मिनिटांत सर्व ९ दहशतवादी तळ भारतीय हवाई दलानं उद्ध्वस्त केले होते. या कारवाईसाठी भारताकडून राफेल विमानांचा वापर केल्याचं सांगितलं जात आहे. शिवाय, भेदक मारा करणाऱ्या स्काल्प क्षेपणास्त्रांचा वापर ऑपरेशन सिंदूरसाठी करण्यात आल्याचंही सांगितलं जात आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कारवाईदरम्यान होतं लक्ष

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी या संपूर्ण करावाईवर लक्ष ठेवून होते. मंगळवारी संध्याकाळी एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी सहभागी झाले होते. मात्र, कोणत्याही प्रकारे अशा कोणत्या हल्ल्याची तयारी भारत करतोय, हे उघड न होऊ देता भारतानं हा एअर स्ट्राईक केला आहे.

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांचा इतर देशांशी संपर्क

एअर स्ट्राईक झाल्यानंतर पुढच्या काही वेळातच भारत सरकारचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी इतर देशांमधील राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांशी या एअर स्ट्राईकसंदर्भात संपर्क साधला. त्यांना हल्ल्यासंदर्भात माहिती दिली. यात अमेरिकेचे मार्को रुबियो, संयुक्त अरब अमिराती, सौदी अरेबिया, ब्रिटन अशा देशांचा समावेश आहे.

देशभरातून अभिनंदनपर प्रतिक्रिया

गेल्या काही दिवसांत देशातील सर्वच राजकीय पक्षांनी केंद्र सरकारच्या पाठीशी उभे असल्याचं नमूद केलं होतं. या एअर स्ट्राईकनंतर विरोधी पक्षांतील सदस्यांसह सर्वच राजकीय पक्षांनी भारतीय लष्कराचं अभिनंदन केलं आहे. तसेच, भारतीय लष्कराचा अभिमान वाटत असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. यात विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचाही समावेश आहे.

पीडितांच्या कुटुंबीयांच्या भावनिक प्रतिक्रिया

पहलगाम हल्ल्यामध्ये मृत्यूमुखी पडलेल्या २६ भारतीय नागरिकांच्या कुटुंबीयांनी भारतीय हवाई दलाच्या एअर स्ट्राईकनंतर भावनिक प्रतिक्रिया देत आपल्याला न्याय मिळाल्याचं म्हटलं आहे. महाराष्ट्रातील मृत नागरिकांच्या कुटुंबीयांनीदेखील ऑपरेशन सिंदूरबाबत समाधान व्यक्त केलं आहे.

हेही वाचा

ऑपरेशन सिंदूर नाव का?

दरम्यान, या मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ असंच नाव का दिलं? अशी चर्चा सुरू असताना पहलगाम हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांनी त्यासंदर्भात प्रतिक्रिया दिल्या आहेत. या हल्ल्यात घरातल्या कर्त्या पुरुषांना दहशतवाद्यांनी लक्ष्य करत महिलांचं कुंकू पुसलं होतं. त्यामुळेच या मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ असं म्हटलं गेलं.

डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या एअर स्ट्राईकसंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे. “गेल्या काही दिवसांतील घडामोडी पाहता मोठं काहीतरी घडणार असं वाटतच होतं. भारत व पाकिस्तान यांच्यात गेल्या अनेक वर्षांपासून संघर्ष चालूच होता. मी आशा करतो, की आता हे सगळं लवकर संपेल”, अशी प्रतिक्रिया डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.





Source link