Wednesday, July 15, 2026
Home Blog Page 292

Operation Sindoor: भारत-पाकमध्ये तनाव; जम्मू, अमृतसरसह देशातील १८ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; २०० उड्डाणे रद्द

0
Operation Sindoor: भारत-पाकमध्ये तनाव; जम्मू, अमृतसरसह देशातील १८ एअरपोर्ट १० मे पर्यंत बंद; २०० उड्डाणे रद्द


या विमानतळांमध्ये श्रीनगर, लेह, जम्मू, अमृतसर, पठाणकोट, चंदीगड, जोधपूर, जैसलमेर, सिमला, धर्मशाला आणि जामनगर या विमानतळांचा समावेश आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एकट्या इंडिगो एअरलाइन्सने जवळपास १६० उड्डाणे रद्द केली आहेत. जम्मू, श्रीनगर, लेह, जोधपूर, अमृतसर, भुज, जामनगर, चंदीगड आणि राजकोट येथून येणारी सर्व उड्डाणे १० मे रोजी पहाटे ५ वाजून २९ मिनिटांपर्यंत रद्द करण्यात आली आहेत.



Source link

किती रुपयांना येते एक हॅमर मिसाईल? पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे नेस्तनाबूत करण्यासाठी झाला होता वापर

0
किती रुपयांना येते एक हॅमर मिसाईल? पाकिस्तानमधील दहशतवाद्यांचे अड्डे नेस्तनाबूत करण्यासाठी झाला होता वापर


Operation Sindoor : 7 मे रोजी भारतीय लष्कराच्या वतीनं सैन्यदल आणि वायुदलानं संयुक्तरित्या ऑपरेशन सिंदूर ही मोहिम हाती घेत यशस्वीरित्या पाकिस्तानातील दहशतवादी तळ उध्वस्त केले. यावेळी अतिशय नियोजित आणि केंद्रीत असे हल्ले पाकिस्तानी तळांवर करण्यात आले. या ऑपेरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानातील 4 आणि जम्मू काश्मीरमधील 5 म्हणजेच एकूण 9 आतंकवादी ठेक्यांना लक्ष केलं. या माध्यमातून अनेक आतंगवाद्यांना संपवण्यात भारतीय सैन्याला यश आलं. इंडियन आर्मी, इंडियन एअर फोर्स आणि इंडियन नेवीने एकत्र मिळून ऑपरेशन सिंदूरमध्ये हॅमर मिसाईलचा वापर केला. तेव्हा हॅमर मिसाईलची किंमत किती आणि ती किती पॉवरफुल आहे याबाबत जाणून घेऊयात. 

हॅमर मिसाईलची किंमत किती?

हॅमर मिसाईल ही एक एक्यूरेट गाइडेड मिसाईल असून यामुळे अतिशय सहजपणे एयर टू ग्राउंडवर अटॅक केला जाऊ शकतो. भारताने पाकिस्तानमध्ये ऑपरेशन सिंदूरला राबवत असताना  हॅमर मिसाईलचा उपयोग केला.  हॅमर मिसाईल ही आधुनिक लढाऊ विमान असलेल्या राफेलला फिट होते. हॅमर मिसाईल भारतीय सैन्याला अजूनच ताकदवर बनवते. 

हॅमर मिसाईलच्या किंमतीबाबत बोलायचं झालं तर याची किंमत ही 85,000 यूरो पासून 1.5 लाख यूरोपर्यंत म्हणजेच 70 लाख रुपयांपासून ते 1.2 कोटी रुपयांपर्यंत आहे. हॅमर ही एक फ्रांसीसी मिसाईल असून ज्याचं संपूर्ण नाव हे Highly Agile Modular Munition Extended Range मिसाईल असं आहे. ही मिसाईल 50 ते 70 किलोमीटर अंतरावरील लक्ष्यांवर हल्ला करू शकते.

Hammer

हेही वाचा : अंपायरशी वाद नेहराला पडला महागात, मुंबई इंडियन्सलाही दंड, BCCI ने सुनावली शिक्षा

 

हॅमर मिसाईलची वैशिष्ट्य :  

हॅमर मिसाईलमध्ये जीपीएस सुद्धा असतं. यात लेजर गायडंस सुद्धा असते, ज्यामुळे ही अचूकपणे आणि लांब अंतरावर लक्ष्य गाठण्यास सक्षम आहे. या मिसाईलवर इलेक्ट्रॉनिक जॅमिंगचाही परिणाम होत नाही. हे विशेषतः बंकर नष्ट करण्यासाठी डिझाइन केले गेले आहे. राफेल लढाऊ विमान एका वेळी ६ हॅमर मिसाईलसह उड्डाण करू शकते. म्हणजेच एकावेळी 6 वेगवेगळ्या ठिकाणांना निशाणा बनवले जाऊ शकते. वर्ष 2020 मध्ये भारताने हे मिसाईल खरेदी केलं होतं. हॅमर मिसाईलचा वापर भारतीय सैन्याने जैश-ए-मोहम्मद, हिजबुल मुजाहिद्दीन आणि लश्कर-ए-तैयबाच्या दहशतवादी ठिकाणांना नेस्तनाबूत केले. 





Source link

निवृत्त हवाई दलाच्या अधिकाऱ्याचा दावा ; अस्तित्व दाखवण्यासाठी पाकिस्तान भारतावर हल्ला करेल “

0
निवृत्त हवाई दलाच्या अधिकाऱ्याचा दावा ; अस्तित्व दाखवण्यासाठी पाकिस्तान भारतावर हल्ला करेल “


नागपूर : भारत शांतताप्रिय देश आहे. त्याला संपूर्ण युद्ध नको आहे, परंतु भारताविरुद्ध कुरापती करणाऱ्या पाकिस्तानला धडा शिवकण्यासाठी प्रतिउत्तर देणे आवश्यक असते. भारताने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानच्या काही भाग दहशतवाद्यांचे अड्डे उदध्वस्त केले आहे. आता पाकिस्तान आपले अस्तित्व जगाला दाखवण्यासाठी भारताविरुद्ध काहीतरी निश्चत कारवाई करेल. पण, भारत त्यांचा हल्ला शंभर टक्के परतवून लावेल, असे भारतीय हवाई दलाचे एअर व्हाईस चीफ मार्शल (निवृत्त) सूर्यकांत चाफेकर म्हणाले.

पाकिस्ताने दहशताद्यांमार्फत पहलगाम येथे हल्ला केला. त्यानंतर जनता भारतीय लष्कर काय करेल, याबाबत विचारणा करीत होती. भारताला संपूर्ण युद्ध करायचे नाही. परंतु पाकिस्तान प्रतिउत्तर द्यायचे होते आणि त्यासाठी हवाई दल एकमेव पर्याय होते. हवाई दलाचे काही गुणधर्म आहेत. हे दल दूरवर मारा करू शकतात. अचूक मारा करू शकतात आणि त्यांच्या कारवाईत सरप्राईज इलेमेंट असतो. शत्रूला काही कळण्याच्या हात हल्ला करण्याची क्षमता आहे.अलिकडे जगभर रात्रीच्या अंधारात कारवाई केली जाते. अंधारात अचूक कारवाई होऊ शकते. त्यासाठी आ‌वश्यक अतिशय प्रगत शस्त्र उपलब्ध आहेत. खूप दुरून अचूक मारा करणाऱ्या मिसाईल आहेत. भारताने बालकोटमध्ये प्रातिनिधिक स्वरुपाचे प्रतिउत्तर दिले होते. यावेळी एकाचवेळी अनेक ठिकाणांवर हल्ला चढवून पाकिस्तानला अद्दल घडवण्यात आली.

कोणतीही कारवाई करण्यापूर्वी गुप्तचर खात्याकडून गोळा केलेली माहिती महत्वाची असते. त्या माहितीनुसार लक्ष्य निश्चित केले जातात. त्यानुसार लक्ष्य बरोबर निवडल्या गेले आणि दहशतवाद्यांचे मुख्यालय किंवा त्यांचे अड्डे ध्वस्त करण्यात आले. मोजून मापून ही कारवाई करण्यात आली.पाकिस्तानने शिमला करार रद्द केला आहे. नियंत्रण रेषेचे महत्व उरले नाही. त्यामुळे भारताने पाकिस्तानाच्या हद्दीत जावून कारवाई केली. या पाकिस्तानच्या कांगव्याला काही अर्थ उरत नाही. भारतीय हवाई दलाने केलेल्या कारवाईचा मुख्य उद्देश्य दहशतवाद्यांचे मुख्यालय, त्यांचे प्रशिक्षण केंद्र यांना नष्ट करणे होते.

हेही वाचा

या कारवाईची त्यांना सुद्धा साधारणत: कल्पना असेलच. त्यामुळे काहींनी पळ काढला असेल, काही अड्डे रिकामे असतील. पण, पळून पळून किती पळणार, आपल्या गुप्तचर यंत्रणा त्यांच्या मागावर असतील आणि ते जेथपर्यंत जातील, तेथपर्यंत त्यांच्या पिच्छा पुरवतील. आपण पाकिस्तान देशावर हल्ला करीत नाहीतर दहशतवाद्यांविरुद्धच लढाई करीत आहोत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.



Source link

India-Pakistan Tensions Escalate: Pahalgam Terror Attack, As India-Pakistan Tensions Rise, Paramilitary Cancels Leaves and Recalls Jawans

0
India-Pakistan Tensions Escalate: Pahalgam Terror Attack, As India-Pakistan Tensions Rise, Paramilitary Cancels Leaves and Recalls Jawans



India-Pakistan Tensions Escalate: Pahalgam Terror Attack, As India-Pakistan Tensions Rise, Paramilitary Cancels Leaves and Recalls Jawans | आईनं केलं औक्षण, मुलगा झाला भावुक; सुट्टी रद्द झाल्यानंतर सीमेवर निघालेल्या जवानाचा व्हिडीओ होतोय व्हायरल



Source link

Operation Sindoor: युद्ध उत्तर नाही, दहशतवाद्यांना शोधून नेटवर्क उध्वस्त करा, ‘सिंदूर’वर राज ठाकरेंची प्रतिक्रिया

0
Operation Sindoor: युद्ध उत्तर नाही, दहशतवाद्यांना शोधून नेटवर्क उध्वस्त करा, ‘सिंदूर’वर राज ठाकरेंची प्रतिक्रिया


Raj Thackeray On operation sindoor : महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) चे प्रमुख राज ठाकरे यांनी बुधवारी म्हटले की, युद्ध हे काही दहशतवादावरील उपाय नाही. त्याऐवजी सरकारने दहशतवाद्यांना शोधून काढून त्यांचे नेटवर्क संपवले पाहिजे. दहशतवादी हल्ल्यामागील दोषींना पकडण्याला प्राधान्य द्यायला हवे.



Source link

‘ऑपरेशन सिंदूर’वर काँग्रेस नेते वडेट्टीवार म्हणाले; त्यांच्या धैर्याला सलाम

0
‘ऑपरेशन सिंदूर’वर काँग्रेस नेते वडेट्टीवार म्हणाले; त्यांच्या धैर्याला सलाम



नागपूर : जम्मू- काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने ‘ऑपरेशनन सिंदूर’मधून घेतला आहे. भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील नऊ दहशतवादी तळांवर हल्ला करुन पाकिस्तानच्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर देत पहलगाममध्ये मृत्यूमुखी पडलेल्या २६ पर्यटकांनाही न्याय दिला आहे.२२ एप्रिल रोजी झालेल्या पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा हात उघड झाला आहे आणि त्याचा उद्देश देशात जातीय तणाव वाढवणे होता.पहलगाम येथे निष्पाप पर्यटकांवर भ्याड दहशतवादी हल्ला करण्यात आला होता. त्यात भारतीयांनी आपल्या प्रियजनांना गमावले होते. आज त्या दहशतवादी कारवायांना भारतीय सशस्त्र दलाने चोख उत्तर दिले आहे.

‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या नऊ अड्ड्यावर क्षेपणास्त्र हल्ला भारतीय हवाई सेनेन केली. यात अनेक दहशतवादी ठार झाले आहेत. निष्पाप भारतीयांना न्याय देण्यासाठी सैन्याने केलेल्या या कारवाईचे आम्ही अभिनंदन करतो असे काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार म्हणाले.पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधून भारतावर होणाऱ्या दहशतवादी कारवाया विरोधात भारताने नेहमीच कठोर भूमिका घेतली आहे. भारताविरुद्ध कोणताही दहशतवाद भारत सहन करणार नाही हाच संदेश आज या कारवाई मधून देण्यात आला आहे. भारतीय सैन्याने दाखवलेल्या धैर्याचा आणि दृढनिश्चयाचा आम्हाला अभिमान आहे असे विधिमंडळ नेते वडेट्टीवार म्हणाले.

याआधी देखील देशावर जेव्हा संकट आले तेव्हा भारतीय सैन्याने कारवाई केली आहे. आणि आज देखील दहशतवाद्या विरोधात केलेल्या कारवाईने दाखवून दिले की भारत आपल्या नागरिकांवर होणारे हल्ले सहन करणार नाही. पाकिस्तानला धडा शिकवण्याची गरज होती आणि आज भारतीय सैन्याने एक मोठा धडा पाकिस्तानला शिकवला आहे असे वडेट्टीवार म्हणाले. दहशतवाद विरोधात भारतीय सैन्य आणि केंद्र सरकारकडून केल्या जाणाऱ्या प्रत्येक कारवाईला आमचा पाठिंबाच आहे ,अस वडेट्टीवार म्हणाले.

दरम्यान, पहलगाम हल्ल्यात पाकिस्तानचा हात उघड झाला आहे, त्याची रूपरेषा पाकिस्तानच्या ट्रॅक रेकॉर्डशी जुळते. पाकिस्तान दहशतवाद्यांसाठी सुरक्षित आश्रयस्थान बनले आहे, दहशतवादी येथे लपण्यासाठी येतात. हल्ल्याला १५ दिवस उलटूनही पाकिस्तानने कोणतीही कारवाई केलेली नाही. आज भारताने सीमापार दहशतवादी हल्ले रोखण्याचा आणि त्यांना प्रत्युत्तर देण्याचा आपला अधिकार वापरला आहे. दहशतवादाविरुद्ध मोजमापाने कारवाई केली असून आमची कृती चिथावणीखोर नाही. आम्हाला गुप्तचर माहिती होती की आणखी हल्ले होऊ शकतात, असे लष्कराने म्हटले आहे.



Source link

old dispute led a young man to attack with a sharp iron cutter, injuring a father and his two sons Chikhali buldhana

0
old dispute led a young man to attack with a sharp iron cutter, injuring a father and his two sons Chikhali buldhana


बुलढाणा: जुना वाद उकरून काढत एका युवकाने धारदार लोखंडी ‘कटर’ने सपासप वार केल्याने तिघे बाप लेक जखमी झाले. यातील दोघेजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर बुलढाणा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ असलेल्या चिखली शहरातील सुभाष नगर परिसरात काल मंगळवारी, ६ मे रोजी रात्री साडेदहा च्या सुमारास हा थरारक घटनाक्रम घडला. या प्रकरणी काल रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास चिखली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या घटनेमुळे काल रात्री खळबळ उडाली. सुभाष नगर, चिखली पोलीस ठाणे परिसरात नातेवाईक, बघ्यांची एकच गर्दी उसळली होती.

शेख जाबाज शेख सुलेमान बागवान (राहणार सुभाष नगर, चिखली पंचायत समिती कार्यलया मागे, चिखली) असे आरोपीचे नाव नाव आहे. जखमी शेख जुनेद शेख गणी बागवान (वय ३२, राहणार सुभाष नगर, चिखली) यांनी तक्रार दिली. यावरूनआरोपी शेख जाबाज विरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम ११५ (२),११८ (१),३५१ (३), ३५२ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हल्ल्याचा तपास चिखली पोलीस ठाण्याचे पोलीस उप निरीक्ष नितीनसिंह चौहान करीत आहे.

हेही वाचा

काल रात्री दहा वाजता जुनेद चा भाऊ घरासमोर बसलेला असताना जाबाज तिथे आला. जुन्या कारणावरून शिवीगाळ करू लागला त्यास शिवीगाळ का करतो अशी विचारणा केली असता त्याने जुनेदच्या भावाला लोटपाट केली. आरडा ओरड झाल्याने घरातून बाहेर आलेल्या जुनेद याने सोडवासोडवि केली. यावर जाबाज याने त्याचे खिशातील लोखंडी कटर काढून जुनेदच्या छातीत, काखेत,व भावाला चेहऱ्यावर, पोटावर, आणि वडील शेख गणी बागवान यांच्या पोटावर कटर ने वार केले. या तिघे बापलेक जखमी झाले.

या हल्ल्यात गंभीर झालेल्या जुनेद चे वडील व भावाला उपचारासाठी बुलढाणा येथे हलवण्यात आले. आरोपी शेख जाबाज यास चिखली पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखलं करुन अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे सुभाष नगर परिसरासह चिखली शहरात खळबळ उडाली आहे.



Source link

Operation Sindoor : ऑपरेशन सिंदूरमध्ये पाकिस्तानात घुसून ध्वस्त केले दहशतवादी अड्डे, लष्कराने जारी केला ॲक्शन VIDEO

0
Operation Sindoor : ऑपरेशन  सिंदूरमध्ये  पाकिस्तानात घुसून ध्वस्त केले दहशतवादी अड्डे,  लष्कराने जारी केला ॲक्शन VIDEO


Operation Sindoor Video : भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील नऊ दहशतवाद्यांच्या तळांवर अचूक क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले. २६ मिनिटांत पूर्ण झालेल्या या मोहिमेत लष्कर-ए-तोयबा, जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीन सारख्या अतिरेकी संघटनांच्या प्रमुख प्रशिक्षण तळांना लक्ष्य करण्यात आले. भारतीय लष्कराने या ऑपरेशनचा ३४ सेकंदाचा व्हिडिओ जारी केला आहे, ज्यात लष्कराची ताकद दिसत आहे.



Source link

Operation Sindoor : नाद करा पण भारताचा कुठं? Indian Air Defence System ची यादी शत्रू राष्ट्र हेच म्हणेल

0
Operation Sindoor : नाद करा पण भारताचा कुठं? Indian Air Defence System ची यादी शत्रू राष्ट्र हेच म्हणेल


Operation Sindoor : भारतीय लष्कराच्या वतीनं सैन्यदल आणि वायुदलानं संयुक्तरित्या ऑपरेशन सिंदूर ही मोहिम हाती घेत यशस्वीरित्या पाकिस्तानातील दहशतवादी तळ उध्वस्त केले. यावेळी अतिशय नियोजित आणि केंद्रीत असे हल्ले पाकिस्तानी तळांवर करण्यात आले. या हल्ल्यानंतर जगभरात भारतीय लष्करातील वायुदलाच्या ताकदीविषयीसुद्धा बरंच लिहिलं आणि बोललं गेलं. इतकं की, भारतातील Air Defence System ची संपूर्ण यादीच समोर आली आणि शत्रूचा थरकाप उडाला. (India Pakistan War)

किती बलशाली आहे भारताचं वायुदल? 

भारतीय वायुदल (Indian Airforce) मध्ये एकूण 1750 विमानांचा समावेश आहे, ज्यामध्ये जवळपास 900 लढाऊ विमानांचा समावेश आहे. हल्लीच भारतानं एक मोठा अब्जावधींचा करार करत 26 राफेल विमानांचीसुद्धा खरेदी केली आणि ही ताकद आणखी वाढली. भारतीय वायुदलानं Akash-NG नावाचं एक देशी बनावटीचं क्षेपणास्त्र तयार करत त्या मदतीनं 70 ते 80 किमीपर्यंतचा मारा करण्याची क्षमता गाठली. सध्या भारतातून हायपरसॉनिक क्षेपणास्त्र आणि त्यांच्या तंत्रज्ञानावर काम सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. 

भारतातील लाँग रेंज डिफेन्स सिस्टीम 

दूरवरच्या अंतरावर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्रांमध्ये बॅलिस्टीक मिसाईलचा समावेश असल्याचं सांगण्यात येतं. याशिवाय भारतातील पृथ्वी एअर डिफेन्स मिसाईलही या यादीत येतं. एक्सो अॅटमॉसफेरिक इंटरसेप्टर पद्धतीचं हे मिसाईल 300 ते 2000 किमी रेंजमध्ये मारा करतं. साधारण 600 किमीवर असणारे 200 लक्ष्यसुद्धा हे मिसाईल हेरतं. 2006 मध्ये त्याची यशस्वी चाचणी करण्यात आली होती. अॅडवान्स एअर डिफेन्स सिस्टीमसुद्धा याच यादीतील एक भाग. ज्याची भेदक क्षमता 150 ते 200 किमी इतकी आहे. 

मध्यम आणि कमी अंतरावर मारा करणारी क्षेपणास्त्र 

आकाश एअर डिफेन्स सिस्टीमचा या यादीत समावेश होत असून, या क्षेपणास्त्रानं साधारण 45 किमी अंतरापर्यंत भेदक मारा केला जातो. तर, इस्रायली बनावटीच्या स्पाडर या क्षेपणास्त्राचासुद्धा यात समावेश आहे.  Quick-reaction low-level defence system अशी त्याची ओळख. 2K12 Kub (Kvadrat) हे असंच एक रशियन बनावटीचं क्षेपणास्त्र असून 24 किमी अंतरावरील लक्ष्यभेद ते अचूकपणे करतं. तर, Barak 8 (LR-SAM/MR-SAM) हे क्षेपणास्त्र 0.5–100 किमीवरील लक्ष्यभेद करत असून, सैन्यदल, वायूदल आणि नौदलाकडे ही यंत्रणा आहे.  QRSAM (Quick Reaction SAM) या प्रणालीच्या माध्यमातून 3.30 किमी अंतरावरील लक्ष्य नष्ट करता येतं. BEML-Tatra 8WD trucks वर ही क्षेपणास्त्र तैनात करता येतात. 

(VSHORAD) अतिशय कमी अंतरावरील लक्ष्यभेद 

9K35 Strela-10, साधारण रणगाड्यासम दिसणाऱ्या या स्ट्रेलातून 5 किमीवरील शत्रूचा नायनाट करता येतो. तर, 2K22 Tunguska च्या मदतीनं 65 km/h इतक्या वेगानं शत्रूवर चाल करता येते. ZSU-23-4 Shilka मध्ये 4 × 23 mm च्या तोफवजा बंदुका तैनात असून, ही एक रडारवर आधारित शस्त्रप्रणाली आहे. अँटी एअरक्राफ्ट आणि अँटी मटेरिअल श्रेणीतील 14.5 मिमीची KPV Heavy Machine Gun सुद्धा देशाच्या शस्त्रसाठ्यात महत्त्वाची भर पडते. 

पर्यायी संरक्षण प्रणाली 

S-125 Pechora ही रशियन बनावटीची प्रणाली असून त्या माध्यमातून 30 किमीपर्यंत मारा करता येतो. 9K33 Osa-AK चासुद्धा या यादीत समावेश आहे. 15 ते 18 किमीवरील लक्ष्यभेद करण्यात ही प्रणाली समर्थ असून, 





Source link

ड्रग्जच्या व्यसनामुळे प्रतीक स्मिता पाटीलला शाळा-कॉलेजमधून काढलेलं

0
ड्रग्जच्या व्यसनामुळे प्रतीक स्मिता पाटीलला शाळा-कॉलेजमधून काढलेलं



Prateik Smita Patil drugs addiction : Prateik babbar was a raging addict :Subhash Ghai college kicked Prateik babbar out for doing drugs : प्रतीक बब्बर ड्रग्ज व्यसन : प्रतीक बब्बरला कोणत्या गोष्टीचा पश्चाताप : ड्रग्जच्या व्यसनामुळे प्रतीक स्मिता पाटीलला शाळा-कॉलेजमधून काढलेलं



Source link