Sunday, July 12, 2026
Home Blog Page 2895

Surinder Shinda Death: प्रसिद्ध पंजाबी गायक सुरिंदर शिंदा यांचे निधन; ६४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

0
Surinder Shinda Death: प्रसिद्ध पंजाबी गायक सुरिंदर शिंदा यांचे निधन; ६४व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


सुरिंदर शिंदा यांचे पहिले गाणे ‘उच्चा बुर्ज लाहोर दा’ हे होते. त्यांचे हे गाणे प्रचंड सुपरहिट झाले होते. या गाण्याने सुरिंदर शिंदा खरी ओळख मिळवून दिली होती. १९७९मध्ये सुरिंदर छिंदा यांचा ‘रख ले क्लिंदर यारा’ हा अल्बम पंजाबी म्युझिक इंडस्ट्रीमध्ये सुपरहिट ठरला. सुरिंदर शिंदा यांनी आतापर्यंत १६५हून अधिक गाण्यांच्या कॅसेट प्रसिद्ध केल्या होत्या. सुरिंदर शिंदा यांना कला परिषदेचा ‘पंजाब गौरव रत्न पुरस्कार’, पंजाब सरकारचा ‘शिरोमणी गायक पुरस्कार’, ‘पंजाब सर्कल इंटरनॅशनल’, यूकेचा ‘पंजाबी लोक पुरस्कार’ मिळाला आहे.



Source link

Dono Teaser Out: सनी देओलच्या दुसऱ्या लेकाचे बॉलिवूडमध्ये पदार्पण! राजवीरच्या ‘दोनो’चा टीझर रिलीज

0
Dono Teaser Out: सनी देओलच्या दुसऱ्या लेकाचे बॉलिवूडमध्ये पदार्पण! राजवीरच्या ‘दोनो’चा टीझर रिलीज


Dono Teaser Out: सनी देओल याचा मोठा मुलगा करण देओलनंतर आता त्याचा धाकटा मुलगा राजवीर देओल देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याच्या तयारीत आहे.



Source link

Kalki Koechlin: अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव, ‘निर्मात्याने मला रात्री…’

0
Kalki Koechlin: अभिनेत्रीने सांगितला कास्टिंग काऊचचा अनुभव, ‘निर्मात्याने मला रात्री…’



Kalki Koechlin: तिने तिला गोऱ्या रंगावरुन चिडवण्यात आले, तसेच कास्टिंग काऊचचा देखील सामना करावा लागल्या अशा अनेक गोष्टी एका मुलाखतीमध्ये सांगितल्या आहेत.



Source link

Kaas Pathar Road Problem : पावसामुळे कासकडे जाणाऱ्या रस्त्यावर चिखल, बामणोलीकडे जाणारी एसटी अडकली

0


Pune Crime News : पतीसमोरच पत्नीवर बलात्कार; उसने घेतलेले पैसे परत न दिल्याने खाजगी सावकाराचं कृत्य, पुण्यातील धक्कादायक घटना



Source link

Gautami Patil : ‘गौतमी पाटीलची लावणी फार वर्षे चालणार नाही’, राज्यस्तरीय तमाशा कलावंतांच्या बैठकीत मोठे निर्णय

0
Gautami Patil : ‘गौतमी पाटीलची लावणी फार वर्षे चालणार नाही’, राज्यस्तरीय तमाशा कलावंतांच्या बैठकीत मोठे निर्णय


मोडलिंब येथे राज्यस्तरीय तमाशा कलावंत, केंद्र मालक, पार्टी मालकीण, स्त्री पुरुष कलावंत यांची राज्यस्तरीय बैठक झाली. या बैठकीत दोन महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. एक म्हणे डीजेचा वापर तमाशा थिएटरमध्ये या पुढे करण्यात येणार नाही. दुसरे म्हणजे १८ वर्षा खालील मुलांना तमाशा थिएटरमध्ये आपली कला सादर करता येणार नाही. तसेच तमाशा थिएअटरमध्ये परंपरागत लावणी शेवटपर्यंत कायम राहील, असा विश्वास लावणी कलावंत वैशाली वाफळकर यांनी केला आहे.



Source link

Kargil war : कारगिल युद्धात शहीद मुलाला आजही भरवते ‘ही’ माऊली; झोपायला अंथरूनही लावते

0
Kargil war : कारगिल युद्धात शहीद मुलाला आजही भरवते ‘ही’ माऊली; झोपायला अंथरूनही लावते


शहीद प्रेमपाल यांच्या कुटुंबीयांना सरकारने खैर येथे गॅस एजन्सी दिली होती. प्रेमपालचा धाकटा भाऊ महावीर सिंग आपल्या कुटुंबासह तेथे राहतो. वडील शिव सिंह यांचे पाच महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. आई गावात एकटीच राहते. आईने सांगितले की, मुलाच्या समाधीबाहेर पाणी तुंबले आहे, बाहेर पडण्यास खूप त्रास होत आहे. प्रधान यांच्याकडेही अनेकवेळा तक्रारी केल्या, मात्र कोणतीही सुनावणी झाली नाही. पावसाळ्याच्या दिवसात घराबाहेर पाणी तुंबते.



Source link

सातारा : कासकडे घाटाईदेवी मार्गे जाणाऱ्या रस्‍त्‍याला भेग; २ एसटी बस अडकल्‍या | पुढारी

0


सातारा ; पुढारी वृत्‍तसेवा कासकडे घाटाईदेवी मार्गे जाणाऱ्या रस्त्याला मधोमध भेग पडली आहे. त्‍यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या दोन एसटी अडकल्या आहेत. रस्ता मोठ्या प्रमाणात खचल्याचे सकाळी निदर्शनास आले. कास बामणोलीकडे जाणारी एसटी चिखलात अडकली आहे. कासकडे जाणारा हा घाटाई रोड वाहतुकीसाठी महत्वाचा मानला जातो. कारण कास धरण भरल्यामुळे रस्त्यावर पाणी आहे. त्यामुळे हा रस्ता बंद करून घाटई मार्गे वाहतूक वळवण्यात आलेली आहे.

हेही वाचा :  

The post सातारा : कासकडे घाटाईदेवी मार्गे जाणाऱ्या रस्‍त्‍याला भेग; २ एसटी बस अडकल्‍या appeared first on पुढारी.



Source link

Sandip Deshpande on Thackeray : जे भाषणात, तेच विधानसभेत, आणि तेच मुलाखतीत,पॉडकास्ट मुलाखतीवर टीका

0
Sandip Deshpande on Thackeray : जे भाषणात, तेच विधानसभेत, आणि तेच मुलाखतीत,पॉडकास्ट मुलाखतीवर टीका



<p>उद्धव ठाकरे यांच्या पॉडकास्ट मुलाखतीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांची टिका. जे भाषणात, तेच विधानसभेत, आणि तेच मुलाखतीत. नवीन काहीच नाही. आज बाळासाहेब असते तर दोघांनाही शंभर उठाबशा काढायला लावल्या असत्या. संदीप देशपांडेंचं ट्विट.</p>



Source link

Jaya Bachchan: ‘मी बहिरी नाही, ओरडू नका…’; जया बच्चन पुन्हा मीडियावर वैतागल्या! Video Viral

0
Jaya Bachchan: ‘मी बहिरी नाही, ओरडू नका…’; जया बच्चन पुन्हा मीडियावर वैतागल्या! Video Viral


ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन यांनी ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’च्या स्क्रीनिंगला हजेरी लावली होती. या ठिकाणी मुलगा अभिषेक बच्चन आणि मुलगी श्वेता नंदा यांची वाट पाहत त्या थांबल्या होत्या. त्याच वेळी पापाराझींनी मोठ्याने त्यांचे नाव घेण्यास सुरुवात केली. पापाराझी त्यांना कॅमेऱ्यात पाहण्यास सांगत होते. मात्र, त्यावेळी जया बच्चन पुन्हा एकदा मीडियावर वैतागल्या. जया बच्चन पापाराझींना असं काही बोलल्या की, त्यांचा हा व्हिडीओ चर्चेत आला. त्या पापाराझींना ओरडून म्हणाल्या की, ‘मी बहिरी नाही. ओरडू नका आरामात बोला.’



Source link

नागठाणेच्या शिकलगार टोळीतील चौघांना ‘मोक्का’ | पुढारी

0









सातारा /नागठाणे, पुढारी वृत्तसेवा : बोरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत गंभीर गुन्हे दाखल असलेल्या साहिल शिकलगार या टोळीवर संघटित गुन्हेगारी अंतर्गत (मोक्का) कारवाई करण्यात आली आहे. टोळीमध्ये एकूण चौघांचा समावेश असून, पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्या कारवाईने गुन्हेगारीवर नियंत्रण येण्यास मदत होणार आहे.

साहिल रुस्तुम शिकलगार, भरत संजय मोहिते, अमित ऊर्फ कन्हैया सुनील साळुंखे, आशिष बन्सीराम साळुंखे (सर्व रा. नागठाणे, ता. जि. सातारा) अशी टोळीतील संशयितांची नावे आहेत.

संशयित टोळीवर बोरगाव पोलिस ठाण्यात गंभीर गुन्हा दाखल आहे. त्यांनी एकाला कोयत्याने, पट्ट्याने, हाताने व लाथाबुक्याने तोंडावर, पाठीवर व अंगावर गंभीर मारहाण करून तक्रारदार यांच्याकडील 25 हजार रुपयांची रक्कम चोरली होती. बोरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांच्या तपासामध्ये संशयितांनी टोळीची दहशत निर्माण करून आर्थिक व इतर फायद्याकरिता संघटितपणे गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने सपोनि रवींद्र तेलतुंबडे यांनी टोळी विरुद्ध दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती संकलित केली.

यामध्ये जुलुम, जबरदस्ती करून हिंसाचाराची धमकी देत तसेच अन्य अवैध मार्गाने दहशतीच्या बळाचा वापर करून गंभीर स्वरुपाचे कृत्ये केली असल्याने संशयितांविरुध्द महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण अधिनियमान्वये (मोक्का) कारवाईसाठी पोलिस अधीक्षक समीर शेख यांच्याकडे प्रस्ताव पाठवण्यात आला. सातार्‍यातून कोल्हापूर परिक्षेत्र कार्यालयात पाठवला असता मोक्काच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली. या गुन्ह्याचा पुढील तपास सातारचे डीवायएसपी किरणकुमार सुर्यवंशी करत आहेत.

दरम्यान, नोव्हेंबर 2022 पासून आतापर्यंत 7 मोक्का प्रस्तावामध्ये 105 जणांविरुध्द मोक्का कायद्यांतर्गत कारवाई केली आहे. तसेच 19 जणांना हद्दपार व एकावर एमपीडीए कायद्यान्वये स्थानबद्ध करण्यात आले आहे. भविष्यातही अशाच प्रकारे गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई केली जाणार आहे.











Source link