Wednesday, July 15, 2026
Home Blog Page 2856

Mahesh Babu Birthday: साऊथ सुपरस्टार अभिनेता महेश बाबूबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहेत का?

0
Mahesh Babu Birthday: साऊथ सुपरस्टार अभिनेता महेश बाबूबद्दल ‘या’ गोष्टी माहित आहेत का?


अभिनेता महेश बाबू याने वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी ‘नीदा’ चित्रपटात काम केले होते. मात्र, मुख्य अभिनेता म्हणून त्याने ‘राजकुमारुडू’ या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. या चित्रपटाद्वारे त्याने टॉलिवूड इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले. या पहिल्याच चित्रपटातून महेश बाबूला प्रेक्षकांचं इतकं प्रेम मिळालं की, त्याने पुन्हा कधीच मागे वळून पाहिलं नाही.



Source link

Pradeep Patwardhan: प्रदीप पटवर्धन यांचे ‘हे’ गाजलेले सिनेमे पाहिलेत का?

0
Pradeep Patwardhan: प्रदीप पटवर्धन यांचे ‘हे’ गाजलेले सिनेमे पाहिलेत का?


प्रदीप पटवर्धन यांनी ‘एक फूल चार हाफ’, ‘डान्स पार्टी’, ‘गरम मसाला’, ‘जमलं हो जमलं’, ‘नवरा माझा नवसाचा’, ‘करायला गेलो एक’, ‘दिली सुपारी बायकोची’, ‘एक शोध’, ‘नवरा माझा भवरा’, ‘लावू का लाथ’, ‘मी शिवाजी राजे भोसले बोलतोय’, ‘गोळा बेरीज, बॉम्बे वेल्वेट’, ‘पोलिस लाईन’, ‘१२३४’ आणि इतर काही हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्यानंतर त्यांनी ‘हे मन बावरे’, ‘अवघाची हा संसार’ या मालिकांमध्ये काम केले. तसेच त्यांनी रंगभूमी देखील गाजवली होती. त्यांचे ‘मोरुची मावशी’ हे नाटक विशेष गाजले होते. त्यानंतर त्यांनी काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले आहे.
वाचा: दर महिन्याला वेगळ्या मुलासोबत दिसते; ऐश्वर्याने साधला होता मनिषा कोईरालावर निशाणा



Source link

सेमिनारमध्येच डॉक्टरचा हृदयविकाराने मृत्यू, २५ तज्ज्ञ डॉक्टरही वाचवू शकले नाहीत प्राण

0
सेमिनारमध्येच डॉक्टरचा हृदयविकाराने मृत्यू, २५ तज्ज्ञ डॉक्टरही वाचवू शकले नाहीत प्राण


heart attack :डॉक्टरांसाठी आयोजित सेमिनारमध्ये तब्बल २५ हून अधिक तज्ज्ञ डॉक्टराच्या उपस्थितीतही एक डॉक्टरचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.



Source link

Conjunctivitis : राज्यात डोळ्यांच्या साथीचं थैमान! तब्बल अडीच लाखाहून जास्त रुग्णांची नोंद

0
Conjunctivitis : राज्यात डोळ्यांच्या साथीचं थैमान! तब्बल अडीच लाखाहून जास्त रुग्णांची नोंद


पावसाळ्याचे दिवस सुरू असल्याने या दिवसात जलजन्य, किटकजन्य साथरोग बळावतात. राज्यात अशा जलजन्य, किटकजन्य साथरोगांचा फैलाव होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत काही भागात साथरोगांचा उद्रेक होण्याची भीतीही असते. त्यामुळे विभागाने सतर्क राहून साथरोग नियंत्रणासाठी विविध उपाययोजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी साथरोग नियंत्रण बैठकीत दिले.



Source link

Nitin Chandrakant Desai Death : नितीन देसाईप्रकरणी एडलवाईजच्या एमडींची चौकशी

0
Nitin Chandrakant Desai Death : नितीन देसाईप्रकरणी एडलवाईजच्या एमडींची चौकशी



<p>Nitin Chandrakant Desai Death : नितीन देसाईप्रकरणी एडलवाईजच्या एमडींची चौकशी&nbsp;</p>



Source link

Britain Corona Patients Increased : ब्रिटेनमध्ये कोरोनाबाधितांच्या संस्खेत वाढ, जगाची चिंता वाढवली

0
Britain Corona Patients Increased : ब्रिटेनमध्ये कोरोनाबाधितांच्या संस्खेत वाढ, जगाची चिंता वाढवली



<p>Britain Corona Patients Increased : ब्रिटेनमध्ये कोरोनाबाधितांच्या संस्खेत वाढ, जगाची चिंता वाढवली</p>



Source link

Mumbai Water Cut : मुंबईकरांना खुशखबर.. १० टक्क्यांची पाणी कपात बुधवारपासून रद्द, पण..

0
Mumbai Water Cut : मुंबईकरांना खुशखबर.. १० टक्क्यांची पाणी कपात बुधवारपासून रद्द, पण..


मुंबईला पाणीपुरवठा करण्यासाठी महानगराला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वैतरणा जलाशय, भातसा, विहार आणि तुळशी या सात जलाशयांमध्ये उपयुक्त जलसाठा १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लीटर इतका असावा लागतो. सध्या तलावाच्या पाणलोट क्षेत्रात समाधानकारक पाऊस झाल्याने एकूण जलसाठी ८० टक्क्यांहून अधिक झाला आहे. या कारणाने आता १० टक्के पाणी कपात रद्द करण्यात आली आहे.



Source link

अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवलं; मंत्री गुलाबराव पाटील यांना हायकोर्टाचा धक्का

0
अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवलं; मंत्री गुलाबराव पाटील यांना हायकोर्टाचा धक्का


High Court On Gulabrao Patil :  शिवसेना आमदार आणि शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या अजब कारभारावर आश्चर्य व्यक्त करत हायकोर्टानं त्यांच्या एका आदेशाला स्थगिती दिली आहे. विभागीय चौकशी सुरु असताना एका अभियंत्याला सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी जारी केले होते. चौकशी सुरु असताना अधिकाऱ्याला सक्तीच्या रजेवर पाठवण्याचे आदेश मंत्र्याने द्यावेत, अशी कोणतीच तरतूद सेवा नियमांत दिसत नाही. तसेच चौकशी होणार असल्यास अन्य कारवाई होते पण सक्तीच्या रजेवर पाठवलं जात नाही, असं निरीक्षणही हायकोर्टानं याप्रकरणी नोंदवलं आहे.

मुळात आपल्या मर्जीतल्या अधिकाऱ्याला त्या पदावर आणण्यासाठी भाजप समर्थक आमदारांनी मंत्री महोदयांकडे तक्रार केली होती. तर राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी खास चौकशीची शिफारस केली, असे धक्कादायक आरोप करत या अभियंत्यानं हायकोर्टात याचिका न्यायालयात दाखल केली आहे. मात्र आता तर या अधिकाऱ्याला निलंबित केल्याचीही माहिती समोर आलीय.

काय आहे प्रकरण :

कोल्हापूर जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा विभागात मुख्य कार्यकारी अभियंता म्हणून अशोक धोंगे कार्यरत होते. या याचिकेनुसार, उप अभियंता अमित शिवाजी पार्थवट यांनाही धोंगे यांच्या पदाचा अतिरिक्त कार्यभार हवा होता. कारण पार्थवट यांचे वडील सरकारी कंत्राटदार आहेत. त्यांची एस. पी. कन्स्ट्रक्शन नावाची कंपनी आहे. ही कंपनी पाणी पुरवठा योजनेचे कंत्राट घेते. मर्जीतला माणूस या पदावर आणण्यासाठी आपल्याविरोधात तक्रार करण्यात आली. आणि पार्थवट यांना या पदाचा अतिरिक्त भार देण्यात आला. याविरोधात आपण मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्यावर न्यायालयानं पार्थवट यांना अतिरिक्त पदभार देण्याचे आदेश स्थगित केले आहेत.

दरम्यान याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी पाच जणांची समिती नेमण्यात आली असून या समितीनं आपला चौकशी अहवाल सादर करूनही कोणतीच कारवाई अद्याप झालेली नाही. त्यानंतर दुसरी चौकशी समिती नेमण्यात आली आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी आपल्याला सक्तीच्या रजेवर जाण्याचे आदेश जारी केले. त्यामुळे मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिलेले सक्तीच्या रजेचे आणि दुसरी चौकशी समिती रद्द करावी, अशी मागणी या याचिकेतून करण्यात आली आहे. 

भाजप समर्थक आमदारांची तक्रार येताच मंत्री चंद्रकांत पाटलांनी या नव्या चौकशीसाठी शिफारस केली होती. तर जल जीवन मिशन अंतर्गत निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याची तक्रार भाजप समर्थक आमदार महादेव जानकर व विनय कोरे यांनी पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली होती. तसेच कोल्हापूर जिल्हा भाजप सचिव नाथाजी पाटील यांनीही तंत्र व उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रारीचे पत्र दिले होतं. मंत्री चंद्रकांत पाटील यांनी नाथाजी यांच्या पत्रानुसार चौकशीसाठी शिफारस पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडे केली होती. याचा तपशीलही याचिकेला जोडण्यात आला आहे. 



Source link

Asha Bhosle: ‘बॉलिवूडमधील सगळ्या कलाकारांचा इतिहास मला माहितीये’, आशा भोसलेंचा व्हिडीओ व्हायरल

0
Asha Bhosle: ‘बॉलिवूडमधील सगळ्या कलाकारांचा इतिहास मला माहितीये’, आशा भोसलेंचा व्हिडीओ व्हायरल


सोशल मीडियावर आशा भोसले यांचे एक ट्वीट व्हायरल झाले आहे. आशाजींना त्या ट्विटमधून नेमके काय सांगायचे आहे असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. या ट्वीटमध्ये त्या म्हणाल्या की, “फिल्म इंडस्ट्रीचा इतिहास केवळ मला माहिती आहे. मला अनेकांच्या खासगी आयुष्याविषयी माहिती आहे. मी या इंडस्ट्रीमधील निर्माते, दिग्दर्शक, कलाकार, गायक जवळपास सर्वांनाच ओळखते. त्यांच्याविषयी बोलायचे झाले तर तीन-चार दिवस लागतील. मी काहीही विसरलेले नाही. मी या इंडस्ट्रीमधील शेवटची मुघल आहे.”



Source link

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑगस्ट 2023| मंगळवार

0
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑगस्ट 2023| मंगळवार


ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 8 ऑगस्ट 2023| मंगळवार

1. मणिपूर हिंसाचाराच्या मुद्यावरून संसदेत अविश्वास प्रस्तावावर चर्चा; आतापर्यंत काय घडलं?https://tinyurl.com/2z66mcnf विरोधकांचा मोदी सरकारविरोधात अविश्वास प्रस्ताव; लोकसभेतील मतांचं गणित काय? https://tinyurl.com/mr26fdyp

2. देशभरात 7 ठिकाणी विधानसभा पोटनिवडणूक जाहीर; पण पुणे, चंद्रपूर लोकसभा पोटनिवडणुकीचं काय? https://tinyurl.com/4p5ypv7u

3. बेस्ट कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप मागे, कामगारांच्या मुख्य समस्या आणि मागण्या मान्य झाल्याचा दावा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत मध्यरात्री झालेली चर्चा यशस्वी https://tinyurl.com/ys5t7886

4. पंतप्रधान पीक विमा योजनेतील लाभार्थ्यांचे 2700 कोटीचे दावे प्रलंबित, सर्वाधिक प्रलंबित प्रकरणे राजस्थानातील, तर महाराष्ट्रातील 336 कोटींचे दावे प्रलंबित, कृषिमंत्र्यांची संसदेत माहिती https://tinyurl.com/3m5an4uu

5. दिल्ली सरकारच्या अधिकाऱ्यांना केंद्राच्या नियंत्रणात आणणारं, सेवा विधेयक राज्यसभेतही मंजूर; विधेयकांच्या बाजूने 131 मते, विरोधात 102 मते https://tinyurl.com/yy5492c2 दिल्ली सेवा विधेयकाच्या मतदानावेळी राष्ट्रवादीच्या चतुराईचं दर्शन, प्रफुल्ल पटेल मतदानासाठी गैरहजर https://tinyurl.com/yckst53f

6. यंदाही पीओपी गणेश मूर्तींवर बंदी, तात्पुरते धोरणही तयार, सुमोटो याचिकेवरील सुनावणीत राज्य सरकारचं उच्च न्यायालयात शपथपत्र https://tinyurl.com/4ax6xj5k

7. लाखोंची लाच मागण्याची हिंमत येतेच कुठून! आता पुन्हा एक लाचखोर ‘बाबू’ एसीबीच्या जाळ्यात https://tinyurl.com/42bepxnz शिक्षक भरती घोटाळ्याप्रकरणी महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेच्या अध्यक्षा शैलजा दराडे यांना अटक https://tinyurl.com/5xbbda2t

8. सेलिब्रिटी कीर्तनकार इंदुरीकर महाराजांना सुप्रीम कोर्टाचा दणका; पुत्रप्राप्तीबाबतच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचा मार्ग मोकळा, काय आहे प्रकरण? https://tinyurl.com/53pvf26s

9. राजीनामा दे म्हणत उपसरपंच महिलेसह कुटुंबाला मारहाण, मुलाचा मृत्यू; परभणी जिल्ह्यातील, सेलूतील ब्राह्मणगावातील घटना https://tinyurl.com/447h9ank

10. ऊसतोड मजुराची मुलगी जर्मनीत करणार ज्युनिअर हॉकी संघाचं नेतृत्व, साताऱ्याच्या शिरपेचात मानाचा तुरा https://tinyurl.com/mryp6b48

 

माझा ब्लॉग

भारतीय परंपरेशी जोडला गेलेला ‘हातमागाचा धागा’…हातमाग दिनानिमित्त ‘एबीपी माझा’च्या प्रतिनिधी स्वरदा वाघुले यांचा ब्लॉग : https://tinyurl.com/mnzuxtr5

 

ABP माझा स्पेशल

अविश्वास प्रस्तावाची संपूर्ण प्रक्रिया, लोकसभेतील मतांचं गणित आणि विरोधकांच्या INDIAची रणनीती; सर्व प्रश्नांची उत्तरं एका क्लिकवर https://tinyurl.com/4cufn5ed

मणिपूर हिंसाचाराच्या तपासावर मुंबईचे माजी पोलिस आयुक्त दत्ता पडसलगीकर यांची देखरेख, थेट सुप्रीम कोर्टाला करणार रिपोर्ट https://tinyurl.com/3cn4f228

भंडाऱ्यात मटनापेक्षाही मशरूम महाग; बाजारपेठेत ‘जंगली मशरूम’ घेण्यासाठी नागरिकांची झुंबड, आरोग्यासाठी नेमके फायदे काय? https://tinyurl.com/35wxxas6

अधिक महिन्यानिमित्त माजलगावच्या भगवान पुरुषोत्तमाच्या दर्शनासाठी भाविकांची प्रचंड गर्दी’; भारतातील एकमेव मंदिर https://tinyurl.com/3pp69wfd

‘अहो, मावशी आजारी आहे, पाहून येते’ म्हणाली, ती परत आलीच नाही; नाशिकमध्ये नवऱ्याला चुना https://tinyurl.com/2dd3kwwe

हॅलो मेडिकल फाऊंडेशनचे संस्थापक डॉ. शशिकांत अहंकारी यांचं पुण्यात निधन https://tinyurl.com/yhuk2wuw

 

ABP माझा बातमीपत्र (न्यूजलेटर) https://marathi.abplive.com/newsletter

थ्रेड्स अॅप – https://threads.net/@abpmajhatv

टेलिग्राम – https://t.me/abpmajhaofficial

युट्यूब चॅनल – https://www.youtube.com/abpmajhatv

इन्स्टाग्राम – https://www.instagram.com/abpmajhatv

फेसबुक – https://www.facebook.com/abpmajha

ट्विटर – https://twitter.com/abpmajhatv

शेअरचॅट – https://sharechat.com/abpmajhatv





Source link