Wednesday, July 15, 2026
Home Blog Page 2855

सातारा : वांग-मराठवाडी धरणात ७३ टक्‍के पाणी साठा | पुढारी

0









सातारा ; पुढारी वृत्‍तसेवा सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात असणाऱ्या ढेबेवाडी विभागातील वांग – मराठवाडी धरण 73 टक्के भरले आहे. 2.73 टीएमसी पाणी साठवण क्षमतेच्या या धरणात 56.576 दशलक्ष घनमीटर इतका पाणी साठा झाला आहे. धरणाच्या सांडव्यातून प्रतिसेकंद 361 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

जून महिन्यापासून आजवर अत्यल्प पाऊस झाल्याने हे धरण 73 टक्के भरण्यासाठी ऑगस्ट महिना उजाडला आहे. तसेच या धरणाची काही कामे अजूनही प्रलंबित असल्याने यंदा धरणात यापेक्षा जादा पाणी साठा केला जाणार नाही, अशी माहिती प्रकल्प अभियंता निखिल खांडेकर यांनी दिली आहे. मागील वर्षी धरणाची प्रलंबित कामे असल्याचे कारण देत मागणी नसतानाही ऑक्टोबरमध्ये धरणातील बहुतांश पाणी सोडून देण्यात आले होते. तर उर्वरित पाणी राखीव ठेवण्यात आल्याने ऐन उन्हाळ्यात त्यामुळे पाणी टंचाईचा सामना करावा लागून लाभक्षेत्रातील शेतकर्‍यांच्या पिकांना पाणी मिळू शकले नव्हते. त्यामुळे यंदा मागणी नसताना पाण्याचा विसर्ग केला जाऊ नये अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.

हेही वाचा : 











Source link

Gautami Patil: महाराष्ट्र गाजवणाऱ्या दोन नृत्यांगना आमनेसामने; गौतमी पाटीलवर भारी पडली माधुरी पवार?

0
Gautami Patil: महाराष्ट्र गाजवणाऱ्या दोन नृत्यांगना आमनेसामने; गौतमी पाटीलवर भारी पडली माधुरी पवार?


झी युवा वरील ‘अप्सरा आली’ या डान्स रिॲलिटी शोची विजेती म्हणून माधुरीने तिच्या जिद्दीने आणि मेहनतीने हे यश कमवले. स्वतःच्या कलेच्या बळावर आज माधुरी पवारने स्वतःचे स्थान निर्माण केले आहे. लावणी हा महाराष्ट्राची लोककला आणि लावणी नेमकी काय असते हे लावण्यवती माधुरी पवार पेक्षा चांगली कोणाला माहित असणार. दिलखेचक अदांनी लावणी सादर करणारी माधुरी ही महाराष्ट्राची आवडती अभिनेत्री, नृत्यांगना आहे, हे या कार्यक्रमात माधुरीने सिध्द करुन दाखवले. माधुरीने सादर केलेल्या लावणीला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला आणि तिचे कौतुक देखील झाले.



Source link

Kangana Ranaut: कंगना रनौत-जावेद अख्तर यांच्यातील वाद चिघळला; कोर्टाने अभिनेत्रीकडे मागितले उत्तर!

0
Kangana Ranaut: कंगना रनौत-जावेद अख्तर यांच्यातील वाद चिघळला; कोर्टाने अभिनेत्रीकडे मागितले उत्तर!


यानंतर कंगना रनौत हिने नंतर त्याच कोर्टात जावेद अख्तर यांच्या विरोधात ‘खंडणी आणि गुन्हेगारी धमकी’ या प्रकरणी उलट तक्रार दाखल केली. कंगना रनौतने तिच्या तक्रारीत दावा केला होता की, सह-कलाकाराशी तिच्या वादानंतर, जावेद अख्तर यांनी तिला आणि तिच्या बहिणीला म्हणजेच रंगोली चंडेल यांना चुकीच्या हेतूने आपल्या घरी बोलावले होते आणि नंतर त्यांना धमकावले.’ या प्रकरणात महानगर दंडाधिकारी आरएम शेख यांनी २४ जुलै रोजी जावेद अख्तर यांना समन्स बजावले होते. या प्रकरणात कोर्टाने जावेद अख्तर यांच्यावरील खंडणीचे आरोप फेटाळले.



Source link

August Kranti Din : ‘नागनाथअण्णांची क्रांतिकारी उडी’ धगधगता रणसंग्राम | पुढारी

0









सातारा : पुढारी वृत्तसेवा : सातारचा तुरुंग म्हणजे कुणालाही भेदता न येणारी अभेद्य तटबंदी. चारही बाजूला उंचच्या उंच काळ्या दगडांच्या भक्कम भिंती, प्रशस्त व जाडजूड प्रवेशद्वार, ब्रिटिश पोलिसांचा पहाडासारखा बंदोबस्त अशा प्रतिकूल परिस्थितीत ब्रिटिशांच्या तावडीतून सुटका करून घेणे सोपे नव्हते. मात्र, १० सप्टेंबर १९४४ रोजी क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांनी सातारचा तुरुंग फोडून शौर्य व पराक्रमाची प्रेरणादायी गाथा रचली. ‘भारत माता की जय’ म्हणत त्यांनी घेतलेली ‘क्रांतिकारी उडी’ आजही युवा पिढीमध्ये धगधगता रणसंग्राम बनून राहिली आहे.

क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान प्रेरणादायी ठरले आहे. त्यांनी दिलेला लढा शौर्याचे प्रतीक समजला जातो. या लढ्यातील अनेक घटना पराक्रमांची गाथा सांगून जातात. यापैकी सातारा जेलच्या तटावरून नागनाथ अण्णांनी मारलेली क्रांतिकारी उडी आजही साऱ्यांनाच देशभक्तीने प्रेरित करत असते. २९ जुलै १९४४ रोजी नागनाथ अण्णांना ब्रिटिशांनी अटक करून इस्लामपूरच्या जेलमध्ये ठेवले. या जेलमधून नागनाथ अण्णांना रात्रीच्या काळ्याकुट्ट अंधारात सातारा जेलमध्ये आणले होते. अण्णांनी पळून जाऊ नये यासाठी हा आटापिटा करण्यात आला होता. सातारच्या जेलमध्ये दोन-तीन दिवस राहिल्यानंतर नागनाथअण्णांनी तेथील राजकीय कैद्यांशी मैत्री जोडणे सुरू केले. जेलमध्ये राहणे त्यांना पसंत नव्हते. त्यांनी ही खंत आपल्या जवळच्या राजकीय कैद्यांशी तसेच जेलमध्ये असलेल्या कामेरीच्या एस. बी. पाटील यांना बोलून दाखवली. एका रात्री अचानक त्यांनी जेल फोडण्याचा विचार बोलून दाखवला.
जेल फोडताना सापडलो गेलोच तर गोळीला बळी पडावे लागणार, हे नागनाथ अण्णांना पूर्ण माहीत होते. मात्र त्याची पर्वा त्यांनी केली नाही.

सातारच्या जेलची रचना विचित्र आहे. आतून त्याचे तट उंच आणि बाहेरून चढावाची भर असलेले कमी उंच शिवाय सर्व तटांवर उभ्या काचा सिमेंटमध्ये बळकट बसवलेल्या होत्या. सातारा जेल फोडताना एस. बी. पाटील म्हणाले, माझी शिक्षा संपत आली आहे. बर्वे गुरुजीही म्हणाले, माझी शिक्षाही संपत आली आहे. शेवटी अण्णा म्हणाले मी जेल फोडून जातो. निदान मला तरी मदत करा.
‘मला पकडून इग्रजांनी माझा अपमान केला आहे. त्यांचा पराभव करुन त्यांना धडा शिकवायचा आहे. काही झाले तरी मी तुरुंग फोडणारच’ असा इरादा अण्णांनी बोलून दाखवला होता. त्यावर एस. बी. पाटील यांनी जेल फोडून पळून जाण्यासाठी जे नियोजन केले आहे त्या मार्गे तुम्हाला आम्ही मदत करतो असे सांगितले. त्याप्रमाणे या कामासाठी नेर्लेच्या शामू रामा, वशीचा सिटचोर साळी व नागठाण्याचे पोलीस अडिसरे यांचा उपयोग करुन तुरुंग फोडायच्या अगोदर सर्वांनी तुरुंग फोडायची ट्रायल घेतली. सातारा जेलमध्ये येऊन अण्णांना चार दिवस संपणार होते. त्याच दिवशी रविवार दि. १० सप्टेंबर १९४४ रोजी सर्व कैद्यांना अंघोळीसाठी बराकी बाहेर सोडले. प्रथम बर्डे गुरुजी नंतर नागनाथ अण्णा बाहेर आले. बर्डे गुरुजी अंघोळीसाठी हौदाकडे गेले. अडिसरे पोलीस गुरुजींच्या बरोबर गेला. एस. बी. पाटील, साळी व शामू रामा चौघेंही पलायनाच्या भिंती जवळ गेले. साळी व शामू रामू भिंतीकडे तोंड करुन बसले. एस. बी. पाटील दोघांच्या खाद्यांवर बसले तर नागनाथ अण्णा एस. बी. पाटील यांच्या खांद्यावर बसले. नियोजनाप्रमाणे पहिली जोडी उभी राहिली. शेवटी अण्णा उभे राहिले. नागनाथ अण्णा भिंतीवर चढले त्यावेळी उगवत्या सुर्याला साक्ष ठेऊन कसलाही विचार न करता १८ फूट उंचीच्या तटावरुन त्यांनी उडी मारली. तळहाताला थोडीशी इजा झाली बाकी कुठेही खट्ट झाले नाही. ते तिथेच बसून बारीक हराळी उपटू लागले. कुणी पाहिले व एखाद्याला शंका आलीच तर हा माणूस गणपतीला हराळी (दुर्वा ) काढत आहे, असं वाटावं. कारण त्यावेळी घरोघरी गणपती बसवले होते.

अण्णांनी कोणी नाही हे जाणून सरळ सातारा शहराच्या पश्चिम बाजूचा रस्ता धरला आणि ते बेधडक सकाळी ६ वा. च्या सुमारास सोमवार पेठेतील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या घराजवळ आले. त्यांच्या दारावर पाटी होती रयत सेवक सोसायटी. नागनाथ अण्णा तिथे थबकले, दार अर्धवट उघडे होते. बाहेरच्या व्हरांडयात कॉटवर मच्छरदाणी लावलेली होती. कॉटवर कोणीच नव्हते. समोर कर्मवीरांचा फोटो पाहिला आणि त्यांना हिमालयासारखा आधार वाटला. कर्मवीर अण्णा घरी नाहीत, ते पुण्याला गेलेत असे सांगण्यात आले. मात्र नागनाथ अण्णांनी काम आणि नांव टाळले आणि बोर्डींगचे सुपरिटेंडेंट कोठे आहेत त्यांना बोलावता का ? असे विचारले. मावशींनी एका मुलाकरवी बोर्डिंगचे सुपरिटेंडेंट असलेल्या ए.डी. आत्तार यांना बोलावले. ते येईपर्यत नागनाथ अण्णा कॉटवर मच्छरदाणीत गाढ झोपले. स्वातंत्र्यासाठी जीवाची पर्वा न करता जेल फोडून आलेला हा ढाण्या वाघ बंदूकधारी पोलीसांचा ससेमिरा कर्मवीरांमुळे आपल्यापर्यंत पोहोचणार नाही हे जाणून होते. क्रांतिवीर नागनाथ अण्णा हे आज हयात नाहीत मात्र सातारा जेल परिसरातून जाताना त्या क्रांतीकारक उडीची आठवण आल्याशिवाय राहत नाही.

अण्णांच्या पराक्रमाची गाथा सर्वदूर…

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव समारोप सोहळा ‘माझी माती, माझा देश’ या उपक्रमाने साजरा होत आहे. यानिमित्ताने देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या व अतुलनीय पराक्रम गाजवणाऱ्या स्वातंत्र्यवीरांची यानिमित्ताने आठवण होते. क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या पराक्रमाची गाथा सर्वदर पोहोचली आहे. आज ९ ऑगस्ट क्रांतिदिनाच्या निमित्ताने अण्णांचे हे शौर्य सायांसाठीच प्रेरणेचा स्रोत बनले आहे.











Source link

Dharmaveer 2 : ‘धर्मवीर २’ मधून उलगडणार साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट! निर्मात्यांनी केली अधिकृत घोषणा

0
Dharmaveer 2 : ‘धर्मवीर २’ मधून उलगडणार साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट! निर्मात्यांनी केली अधिकृत घोषणा


‘धर्मवीर २’ चित्रपटाच्या निर्मात्या टीमने नुकतेच खंडोबाचे दर्शन घेत, चित्रपटाची पहिली झलक दाखवली. या विली रिलीज करण्यात आलेल्या पोस्टरवर भगव्या बॅकग्राऊंडवर ‘धर्मवीर २’ साहेबांच्या हिंदुत्त्वाची गोष्ट… अशी टॅगलाईन नमूद करण्यात आली आहे. या टॅगलाईनवरून हा चित्रपट धडाकेबाज पद्धतीने आणि रंजक कथानकाद्वारे हिंदुत्त्वावर भाष्य करणारा असल्याचा प्राथमिक अंदाज बांधला जात आहे. या चित्रपटात कलाकार कोण असणार हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आले आहे. मात्र, आता ‘धर्मवीर २’च्या अधिकृत घोषणेमुळे चित्रपटाविषयी प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे.



Source link

OMG 2: अक्षय कुमारच्या चित्रपटावर भडकले महाकाल मंदिराचे पुजारी; मेकर्सना पाठवली कायदेशीर नोटिस!

0
OMG 2: अक्षय कुमारच्या चित्रपटावर भडकले महाकाल मंदिराचे पुजारी; मेकर्सना पाठवली कायदेशीर नोटिस!


या बाबत अधिकची माहिती देताना ते म्हणाले की, ‘आम्ही उच्च न्यायालयाच्या अधिवक्ता अभिलाषा व्यास यांच्यामार्फत चित्रपट दिग्दर्शक अमित राय, निर्माता विपुल शाह, चंद्रप्रकाश द्विवेदी, अभिनेता अक्षय कुमार तसेच सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.’ या नोटिसमध्ये त्यांनी चित्रपटात दाखवलेली सर्व अपमानास्पद दृश्ये २४ तासांच्या आत हटवावीत, अशी मागणी केली आहे. अक्षय कुमार याचा ‘ओएमजी २’ हा चित्रपट ११ ऑगस्टला रिलीज होणार आहे.



Source link

Mumbai Local Train : ट्रॅक बदलून लोकल स्थानकावर आली; संतापलेल्या प्रवाशांनी चक्क रेल्वेच रोखून धरली!

0
Mumbai Local Train : ट्रॅक बदलून लोकल स्थानकावर आली; संतापलेल्या प्रवाशांनी चक्क रेल्वेच रोखून धरली!


मिळालेल्या माहितीनुसार, दिवा स्थानकातून सीएसटीच्या दिशेने जाणारी लोकल प्लॅटफॉर्म क्रमांक चार ऐवजी दोन वर आल्याने प्रवाशांमध्ये चांगलाच गोंधळ निर्माण झाला. याशिवाय सीएटीकडे जाणारी लोकल उशीराने प्लॅटफॉर्म बदलून आल्याने संतप्त प्रवाशांनी जवळपास १० ते १५ मिनिटं लोकल रेल्वे रोखून धरली. यावेळी संतापलेल्या प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तसेच रेल्वेसमोर गर्दी करत प्रशासनाच्या अनागोंदी कारभारावर संताप व्यक्त केला. या प्रकरणाची माहिती समजताच रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी तातडीने दिवा स्थानकावर धाव घेत संतप्त प्रवाशांची समजूत काढली. त्यानंतर लोकल रेल्वे पुढील प्रवासाठी रवाना करण्यात आली.



Source link

Don 3: ‘डॉन ३’मध्ये शाहरुख खानच्या ऐवजी रणवीर सिंहची वर्णी! चाहत्यांनी व्यक्त केला संताप! म्हणाले…

0
Don 3: ‘डॉन ३’मध्ये शाहरुख खानच्या ऐवजी रणवीर सिंहची वर्णी! चाहत्यांनी व्यक्त केला संताप! म्हणाले…


मात्र, ‘डॉन ३’मध्ये शाहरुख खानऐवजी रणवीर सिंह दिसणार असल्याचे समोर आले आहे. आता ‘डॉन ३’च्या घोषणेनंतर सोशल मीडियावर शाहरुख खानच्या चाहत्यांचा भडका उडाला आहे. ‘डॉन’मध्ये शाहरुखची जागा कोणीही घेऊ शकत नाही, असे चाहत्यांचे म्हणणे आहे.



Source link

Kranti Din : 15 ऑगस्ट पूर्वी 9 ऑगस्ट दिवस क्रांती दिन म्हणून नोंदविला जातो, पण का?

0
Kranti Din : 15 ऑगस्ट पूर्वी 9 ऑगस्ट दिवस क्रांती दिन म्हणून नोंदविला जातो, पण का?



<p>Kranti Din : 15 ऑगस्ट पूर्वी 9 ऑगस्ट दिवस क्रांती दिन म्हणून नोंदविला जातो, पण का?</p>



Source link

Siddique Ismail: ‘बॉडीगार्ड’ फेम दिग्दर्शक सिद्दिकी इस्माईल यांचे निधन; ६३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

0
Siddique Ismail: ‘बॉडीगार्ड’ फेम दिग्दर्शक सिद्दिकी इस्माईल यांचे निधन; ६३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास


सिद्दिकी इस्माईल यांनी अनेक मल्याळम, तमिळ, तेलुगू आणि बॉलिवूड चित्रपटांचे दिग्दर्शन केले होते. यामध्ये सलमान खानचा हिट चित्रपट ‘बॉडीगार्ड’चाही समावेश आहे. २०११मध्ये, सिद्दीकीने ‘बॉडीगार्ड’ या चित्रपटामधून आपल्या दिग्दर्शनाची खोलवर छाप सोडली. ‘बॉडीगार्ड’ हा चित्रपट सलमानच्या कारकिर्दीतील हिट चित्रपट ठरला. सिद्दिकी यांनी ‘बॉडीगार्ड’ची तमिळ आवृत्ती ‘कवलन’चेही दिग्दर्शन केले होते. त्यांनी ‘काबुलीवाला’, ‘व्हिएतनाम कॉलनी’, ‘हरिहर नगर’, ‘गॉडफादर’ या चित्रपटांचे त्यांनी यशस्वी दिग्दर्शन केले होते.



Source link