Wednesday, July 15, 2026
Home Blog Page 2854

“तसं असतं तर मुख्यमंत्रीपदाची खुर्चीही हलू दिली नसती”, मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावर ठाकरे गटाची प्रतिक्रिया

0
“तसं असतं तर मुख्यमंत्रीपदाची खुर्चीही हलू दिली नसती”, मोदींच्या ‘त्या’ वक्तव्यावर ठाकरे गटाची प्रतिक्रिया


संजय राऊतांचं पंतप्रधानांना प्रत्युत्तर –

मोदींच्या वक्तव्यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे, शिवसेनेनं युती तोडली, असं पंतप्रधान मोदी म्हणत असतील, तर ते दिशाभूल करत आहेत. २०१४ ची परिस्थिती पंतप्रधानांना आठवायला हवी. २०१४ साली युती कोणी आणि का तोडली हे संपूर्ण देशानं पाहिलं. त्यानंतर शिवसेना स्वतंत्र लढली. आपली युती तुटली,आपण वेगळे झाले आहोत, असं भाजपातर्फे अधिकृतपणे एकनाथ खडसे यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून सांगितलं. त्यामुळे शिवसेनेची साथ कोणी सोडली, याचे जुने रेकॉर्ड पंतप्रधानांनी तपासून पाहावे, असं संजय राऊतांनी म्हटलं आहे.



Source link

Territory: नरभक्षक वाघाचा शोध! ‘टेरिटरी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित

0
Territory: नरभक्षक वाघाचा शोध! ‘टेरिटरी’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित



Territory Teaser: सचिन श्रीराम दिग्दर्शित ‘टेरिटरी’ या चित्रपटात संदीप कुलकर्णी, किशोर कदम अशी तगडी स्टारकास्ट असून १ सप्टेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.



Source link

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू आक्रमक, शिंदे-फडणवीस सरकारला इशारा

0
शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू आक्रमक, शिंदे-फडणवीस सरकारला इशारा


Amravati Prahar Farmers Protest : शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी आमदार बच्चू कडू यांनी सरकारमध्ये असूनही आज भव्य एल्गार मोर्चा पुकारला. आज 9 ऑगस्ट क्रांती दिनी आमदार बच्चू कडू (MLA Bacchu Kadu) यांच्या नेतृत्वात अमरावती विभागीय कार्यालयावर ‘जन एल्गार मोर्चा’ पुकारण्यात आला. यावेळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. या जन एल्गार मोर्चामध्ये हजारोंच्या संख्येने प्रहारचे कार्यकर्ते, शेतकरी, मजूर लोकं उपस्थित होते.

शेतकऱ्यांच्या मागणीसाठी प्रहार संघटनेचा मोर्चा

आज अमरावतीत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेचा भव्य मोर्चा पुकारण्यात आला होता. शेतकऱ्यांच्या शेतातील कामे रोजगार हमी योजनेतून व्हावे, नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार अनुदान द्यावे, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना भरघोस मदत द्यावी, कंत्राटी कामगारांसाठी महामंडळ स्थापन करण्यात यावे, यासह विविध मागण्यांसाठी शांततेत आज सकाळी 11 वाजता भव्य मोर्चा संत गाडगेबाबा समाधी मंदिर वरून निघला. यामध्ये मोठ्या संख्येने लोक सहभागी झाले होते.

‘सत्तेत असणं म्हणजे मान खाली घालून वखर वागणं नाही’

यावेळी आमदार बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया देत सांगितलं की, ”आमच नातं जात आणि धर्माशी नाही तर आमचं नात दुःखी लोकांशी आहे. आजच्या मोर्चा इथपर्यंत मर्यादित नाही आम्ही महाराष्ट्र पिंजून काढू.” सरकारमध्ये आहे म्हणून मोर्चा काढायचा नाही. प्रश्न सत्तेचा नाही, सत्तेत असणं म्हणजे खाली मान घालून वखर वागणं नाही, असंही त्यांनी म्हटलं. हा मोर्चा हजारोंचा आहे पुढील लाखो लोकांचा असेल. 

बच्चू कडू यांचा पुन्हा आंदोलनाचा इशारा

आमदार बच्चू कडू यांनी सांगितलं की, ”आता मी प्रत्येक जिल्ह्याचा दौरा करणार आणि जनतेला जागृत करण्याचं काम मी आता करणार आहे. आता लढल्याशिवाय मी राहणार नाही. आता आंदोलन करावं लागेल. आमची युती कोणासोबत नाही झाली तरी, चालेल आता आपली संघटना दहा पट वाढली पाहीजे असं काम करायचं आहे.” तीन महिन्यात जर मागण्या पूर्ण नाही झाल्या तर शेतकऱ्यांच्या कुटुंबांना घेऊन आता आंदोलन करणार असा इशारा बच्चू कडू यांनी सरकारला दिला आहे.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी बच्चू कडू यांनी एल्गार मोर्चा काढला. आमदार बच्चू कडू यांच्यासोबत हजारो प्रहारचे कार्यकर्ते चांदूरबाजार येथून अमरावतीसाठी रवाना झाले. चांदूरबाजारमध्ये प्रहरच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात हा मोर्चा अमरावती विभागीय कार्यालयावर धडकला. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेनं हा भव्य मोर्चा पुकरला.

 

 

 



Source link

Kiran Mane: “दादा कोंडकेंना अश्लील म्हणून हिणवलं…”, किरण मानेची संतप्त पोस्ट चर्चेत

0
Kiran Mane: “दादा कोंडकेंना अश्लील म्हणून हिणवलं…”, किरण मानेची संतप्त पोस्ट चर्चेत



Kiran Mane Social Media Post: सध्या सोशल मीडियावर किरण मानेची पोस्ट चर्चेत आहे. या पोस्टच्या माध्यमातून त्यांनी संताप व्यक्त केला आहे.



Source link

Sundara Manamadhe Bharali: ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप

0
Sundara Manamadhe Bharali: ‘सुंदरा मनामध्ये भरली’ मालिका लवकरच घेणार प्रेक्षकांचा निरोप


मध्यंतरी या मालिकेत नवे वळणे आले. अभीचा मृत्यू दाखवण्यात आला. त्यामुळे प्रेक्षकवर्गाने नाराजी व्यक्त केली होती. पण, त्यानंतर अभी आणि लतिकाच्या चिमुकल्या मुलीची एंट्री दाखवण्यात आली आणि पुन्हा ‘सुंदरा मनामध्ये भरली’ प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. मात्र,आता ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मालिकेच्या शेवटच्या भागाचे नुकताच शुटिंग पूर्ण झाले आहे.



Source link

Ira Khan: आमिर खानची लेक कधी करणार लग्न? इराने केला लग्नाबाबत खुलासा

0
Ira Khan: आमिर खानची लेक कधी करणार लग्न? इराने केला लग्नाबाबत खुलासा


आमिर खानचा होणारा जावई हा पेशाने फिटनेस ट्रेनर असून, अनेक बॉलिवूड कलाकारांसोबत तो काम करतो. बॉलिवूडच्या अनेक दिग्गज कलाकारांसाठी त्याने फिटनेस कोचिंग केले आहे. इतकंच नाही, तर नुपूर शिखरे हा काही काळ आमिर खानचा देखील फिटनेस ट्रेनर होता. याच दरम्यान त्याची भेट आमिरची लेक आयरा खान हिच्याशी झाली. दोघांमध्ये छान मैत्री झाली आणि नंतर या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं.



Source link

Don 3 Teaser: अमिताभचा अजरामर डायलॉग रणवीर सिंहनं कसा म्हटलाय?; नव्या डॉनचा टीझर बघाच!

0
Don 3 Teaser: अमिताभचा अजरामर डायलॉग रणवीर सिंहनं कसा म्हटलाय?; नव्या डॉनचा टीझर बघाच!


Don 3 Teaser Out:अभिनेता-दिग्दर्शक-निर्माता फरहान अख्तर याने नुकतीच त्याच्या ‘डॉन ३’ या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटाबद्दलची लोकांची उत्सुकता आता गगनाला भिडली आहे. आधी फरहानने केवळ चित्रपटाची घोषणा केली होती. मात्र, आता त्याने या चित्रपटाचा टीझर शेअर करून मुख्य अभिनेत्याची झलक देखील दाखवली आहे. यावेळेस शाहरुख खान या चित्रपटात डॉनच्या भूमिकेत दिसणार नसल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या,ज्या अखेर खऱ्या ठरल्या आहेत. टीझरमधून फरहान अख्तरने ‘डॉन ३’च्या मुख्य अभिनेत्याचा खुलासा देखील केला आहे. अभिनेता जरी नवा असला, तरी ‘डॉन’चा अंदाज मात्र जुनाच असणार आहे. या टीझरमध्ये देखील ‘डॉन’चा आयकॉनिक डायलॉग ऐकायला मिळाला आहे.



Source link

Aai Kuthe Kaay Karte: इशाच्या वागण्यामुळे अरुंधतीला होतोय त्रास, जाणून घ्या आजच्या भागात काय होणार

0
Aai Kuthe Kaay Karte: इशाच्या वागण्यामुळे अरुंधतीला होतोय त्रास, जाणून घ्या आजच्या भागात काय होणार



Aai Kuthe Kay Karte Serial update: काही दिवसांपूर्वी ईशाने पळून जाऊन लग्न करत सर्वांना धक्काच दिला आहे. आता ईशा तिच्या प्रत्येक चुकीला अरुंधतीला दोष देत असते आणि अरुंधतीला याचा त्रास होऊ लागला आहे.



Source link

Madha Crime News : प्रेम विवाहाला विरोध; प्रियकराशी संगनमत करून मुलीनं दिली वडिलांवर हल्ल्याची सुपारी

0
Madha Crime News : प्रेम विवाहाला विरोध; प्रियकराशी संगनमत करून मुलीनं दिली वडिलांवर हल्ल्याची सुपारी


यावेळी अचानक अज्ञात हल्लेखोर दुचाकीवरून आले. त्यांनी शहा यांना मारहाण करून ते दोन दुचाकीवरून शेटफळच्या दिशेने फरार झाले अशी तक्रार मुलीने पोलीसांना दिली. यावेळी पोलिसांनी या प्रकरणी ५ जणांना अटक केली. दरम्यान, पोलिस जेव्हा प्रत्यक्ष घटनास्थळी गेले, तेव्हा साक्षीने आणि अटक करण्यात आलेल्या पाच जणांच्या जबाबात तफावत आढळली. यावेळी, पोलिसांनी त्यांना हिसका दाखवताच त्यांनी सत्य सांगितले.



Source link

Movies Releasing This Week: ‘गदर २’ला टक्कर देणार ‘ओएमजी २’! आणखी कोणता चित्रपट असणार शर्यतीत?

0
Movies Releasing This Week: ‘गदर २’ला टक्कर देणार ‘ओएमजी २’! आणखी कोणता चित्रपट असणार शर्यतीत?


जेलर

रजनीकांत यांचा ‘जेलर’ हा चित्रपट १० ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज झाला आहे. तब्बल २ वर्षांनंतर रजनीकांत मोठ्या पडद्यावर परतले आहेत. थलायवा अभिनेते रजनीकांत यांचा हा नवा अवतार पाहण्यासाठी चाहते उत्सुक झाले आहेत. ‘जेलर’ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये रजनीकांत मुथुवेल पांडियन, एका सामान्य कुटुंबाभिमुख पुरुषाची भूमिका साकारत असल्याचे दाखवण्यात आले आहे. जेव्हा त्यांच्यावर संकट कोसळू लागतात तेव्हा ते त्यांचा सामना कसा करतात, याची झलकही पाहायला मिळाली आहे.



Source link