Wednesday, July 15, 2026
Home Blog Page 2853

बाळाला पतीऐवजी लिव्ह इन जोडीदाराचं नाव देण्यासाठी आईची हायकोर्टात याचिका

0
बाळाला पतीऐवजी लिव्ह इन जोडीदाराचं नाव देण्यासाठी आईची हायकोर्टात याचिका


Live In Partners :  आपल्या बाळाला त्याच्या खऱ्या पित्याचं नाव मिळावं यासाठी एका आईनं मुंबई उच्च न्यायालयात (High Court) धाव घेतली आहे. जन्म दाखल्यावर एकदा पित्याचं नाव आलं की त्यात बदल करण्याचा अधिकार आम्हाला नाही, अशी महापालिकेची भूमिका आहे. तर या प्रकरणात जन्म, मृत्यू नोंदणी कायदा लागू होत नाही, असं महानगर दंडाधिकारी न्यायालयानं स्पष्ट केलेलं आहे. त्यामुळे हायकोर्टात आईनं दाखल केलेल्या याचिकेवर पालिकेनं उत्तर सादर करण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ मागितला आहे. न्यायमूर्ती सुनील शुक्रे आणि न्यायमूर्ती राजेश पाटील यांच्या खंडपीठासमोर यावर सुनावणी झाली.

काय आहे प्रकरण – 

न्यायालयात याचिका करणाऱ्या या महिलेचा विवाह साल 2017 मध्ये झाला होता. अवघ्या वर्षभरात या जोडप्यानं स्वतंत्र होण्याचा निर्णय घेतला. घटस्फोटासाठी अर्ज दाखल झाल्यानंतर दोघे वेगवेगळे राहत होते. त्यावेळी ती महिला दुसऱ्या पुरूषासोबत ‘लिव्ह इन रिलेशनशीप’मध्ये राहत होती आणि त्यातच ती गरोदर राहिली. प्रसुतीच्यावेळी मात्र तिचा पती तिच्यासोबत होता. त्यानेच तिला रुग्णालयात दाखल केलं. आणि बाळ जन्माला येताच बाप म्हणून त्यानं त्याचं नाव दिलं. त्यामुळे बाळाच्या जन्म दाखल्यावरही त्याचेच नाव टाकण्यात आलं.

मात्र आपल्या बाळाचा जन्मदाता हा वेगळा आहे. त्यामुळे त्याचं नाव जन्म दाखल्यावर टाकावं, अशी विनंती आईनं नवी मुंबई पालिकेकडे केली होती. मात्र एकदा नाव नमूद झाल्यानंतर त्यात बदल करण्याचा अधिकार आम्हाला नाही, असं पालिकेनं सांगितले. याविरोधात त्या महिलेने प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्याकडे अर्जही केला होता. मात्र याप्रकरणात जन्म, मृत्यू नोंदणी कायदा लागू होत नाही, असं दंडाधिकारी न्यायालयानं स्पष्ट करत तिला दिलासा देण्यास नकार दिला.

अखेर या महिलेने मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत. आपण लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहत होतो, तेव्हा घटस्फोट झालेला नव्हता. बाळ झालं तेव्हा पतीसोबत होता. रुग्णालयात त्यानं चुकून त्याचं नाव पालक म्हणून दिलं होतं. त्यानुसार जन्म दाखल्यावर पतीचं नाव नमूद करण्यात आलं. आपण ज्याच्यासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहत होते, तोच बाळाचा जन्मदाता आहे. त्यामुळे त्याचं नाव बाळाच्या जन्म दाखल्यावर नमूद करावं, अशी मागणी या महिलेनं या याचिकेतून केली आहे. 

कोर्टाचे निकाल काय सांगतात –

एकल पालक किंवा अविवाहीत महिलेनं बाळाच्या जन्म दाखल्यासाठी अर्ज केला तर त्यांच्याकडून प्रतिज्ञापत्रावर संबंधित माहिती घ्यावी व जन्म दाखला द्यावा, असं सर्वोच्च न्यायालयानं आपल्या निकालात स्पष्ट केलेलं आहे. तसेच मुंबई उच्च न्यायालयानंही एका प्रकरणात पित्याचं नाव जन्म दाखल्यावरुन काढून टाकण्याचे आदेश दिलेले आहेत, याचाही तपशील या याचिकेत देण्यात आलेला आहे.



Source link

Mumbai Nashik Road Special Report : नाशिकच्या उद्योजकाची जर्मनीची वाट खड्ड्यांनी रोखली

0
Mumbai Nashik Road Special Report : नाशिकच्या उद्योजकाची जर्मनीची वाट खड्ड्यांनी रोखली



Mumbai Nashik Road Special Report : नाशिकच्या उद्योजकाची जर्मनीची वाट खड्ड्यांनी रोखली

नाशिक आणि मुंबईला जोडण्यासाठी नाशिक मुंबई महामार्ग बांधण्यात आलाय. पण सध्या हा महामार्ग या दोन शहरांना जोडण्याऐवजी तोडण्याचंच काम करतोय आणि याचं कारण आहे या महामार्गावरचे खड्डे.. याच खड्ड्यांमुळे देशाचं नाव सातासमुद्रापार पोहोचवायला निघालेल्या एका उद्योजगाचं स्वप्न मुंबईत येण्याआधीच याच रस्त्यावरच्या खड्ड्यांत गेलं. पाहुयात काय घडलंय नाशिकच्या या उद्योजकासोबत.



Source link

Buldhana Accident : ट्रक-दुचाकीचा समोरासमोर भीषण धडक; दोन सख्ख्या भावांसह तीन जण जागीच ठार

0
Buldhana Accident : ट्रक-दुचाकीचा समोरासमोर भीषण धडक; दोन सख्ख्या भावांसह तीन जण जागीच ठार


मिळालेल्या माहितीनुसार, उमेश कांडारकर,  प्रशांत कांडारकर आणि नितीन कांडारकर अशी अपघातात ठार झालेल्या भावांची नावे आहेत. तिघे जण एकाच दुचाकीवरून निघाले होते. या भीषण अपघातात दुचाकीवरील तीन जण जागीच ठार झाले. या मृतात दोन सख्खे भाऊ तर तिसरा चुलत भाऊ आहे .तिघेही तरुण मलकापूर तालुक्यातील झोडगा गावचे रहिवासी आहेत. तिघांचा मृत्यू झाल्यानं कुटूंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अपघातानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहे.



Source link

Ahmednagar Crime : एका सॅनिटरी पॅडने लावला महिलेच्या हत्येचा छडा.. मामा-भाच्याला केले गजाआड

0
Ahmednagar Crime : एका सॅनिटरी पॅडने लावला महिलेच्या हत्येचा छडा.. मामा-भाच्याला केले गजाआड


Ahmednagar Murder case : एका सॅनेटरी पॅडमुळे एका महिलेच्या हत्या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून आरोपींना गजाआड केले आहे.



Source link

शिवाजी विद्यापीठ : बी.कॉम. पेपरफुटी प्रकरणी शहाजी कॉलेजचे चार कर्मचारी बडतर्फ | पुढारी

0









कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : शिवाजी विद्यापीठाच्या बी.कॉम. भाग-३ सत्र सहा अडव्हान्स अकौंटन्सी पेपर-४ (टॅक्सेशन) पेपर फुटी प्रकरणी शहाजी कॉलेजमधील चार कर्मचाऱ्यांना श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेने बडतर्फीची कारवाई करीत बडगा उगारला आहे. सेवेतून बडतर्फ केलेल्यांमध्ये अधीक्षक रवींद्र भोसले, क्लार्क सिद्धेश मिस्त्री, गणेश पाटील आणि विशाल पाडळकर यांचा समावेश आहे. शिवाजी विद्यापीठाच्या इतिहासात एका संस्थेने ऐवढी मोठी कारवाई करण्याची पहिलीच घटना आहे.

विद्यापीठ उन्हाळी सत्र परीक्षेतंर्गत ३१ मे २०२३ रोजी परीक्षा सुरू होण्याअगोदर बी.कॉम. भाग-३ सत्र सहा अडव्हान्स अकौंटन्सी पेपर-४ (टॅक्सेशन) पेपर फुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. शिवाजी विद्यापीठाने याची तात्काळ गंभीर दखल घेत परीक्षा प्रमाद समितीमार्फत चौकशी सुरु केली. गेले दोन महिन या प्रकरणाची चौकशी सुरू होती. विद्यापीठ प्रशासनाने संबंधित कॉलेज प्रशासनाकडून अहवाल मागविला होता. सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले होते.

दरम्यान, शहाजी कॉलेज व्यवस्थापनाने साऱ्या प्रकाराची दखल घेतली. पेपर फुटी प्रकरणातील दोषींवर कारवाईसाठी जूनमध्ये संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे यांनी त्रि-सदस्यीय समिती नेमली. चौकशी समितीकडून प्रकरणाची शहानिशा, तपास सुरु झाला. दुसरीकडे विद्यापीठाच्या परीक्षा प्रमाद समितीची चौकशी सुरु होती. दोन महिने याप्रकरणी चौकशी, संबंधित कर्मचाऱ्यांचे जबाब, कायदेशीर बाबी तपासण्याची प्रक्रिया सुरु होती. संस्थेने नेमलेल्या समितीचा अहवाल जुलै महिन्याच्या अखेरीस आला. त्यानंतर विद्यापीठ परीक्षा प्रमाद समितीने संबंधित चार कर्मचाऱ्यांचे निलंबन करुन त्यांच्यावर सेवाशर्तीनुसार शिस्तभंगाची कारवाईची शिफारस ऑगस्टच्या पहिल्या आठवडयात संस्था प्रशासनास केली.

काही सिनेट सदस्यांनीही याबाबत संबंधित कारवाई करावी, अशा सूचना केल्या होत्या. त्यानंतर परीक्षा प्रमाद समितीचा अहवाल कॉलेजला प्राप्त झाल्यानंतर संस्थेचे चेअरमन मानसिंग बोंद्रे यांनी व्यवस्थापन मंडळाशी चर्चा करुन चार कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याच्या निर्णय घेतला. संस्था व कॉलेज व्यवस्थापनने मंगळवारी चार कर्मचाऱ्यांना सेवेतून बडतर्फ करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी केली.

श्री शाहू छत्रपती शिक्षण संस्थेला १२५ वर्षाची मोठी शैक्षणिक परंपरा आहे. शहाजी महाविद्यालयास ५० वर्षपूर्ण झाली आहेत. अशा पद्‌धतीचे कृत्य महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांनी करणे संस्थेच्या लौकिकास बाधा आणणारे अशा भावना संस्था चेअरमन यांची सुरुवातीपासून होती. त्यामुळे या कृत्यात सहभागी असणाऱ्यांवर संस्थेने नियमानुसार कारवाई करीत समाजात वेगळा पायंडा पाडला आहे.

– डॉ. राजेखान शानेदिवाण, प्राचार्य, शहाजी कॉलेज

हेही वाचंलत का?











Source link

Rinku Rajguru: ओव्हर साइज कोटमध्ये रिंकूचा बोल्ड अंदाज

0
Rinku Rajguru: ओव्हर साइज कोटमध्ये रिंकूचा बोल्ड अंदाज



Rinku Rajguru Photo: नुकतंच रिंकूने खास फोटोशूट केलं आहे. या नव्या फोटोशूटमधील काही फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केले आहेत.



Source link

Girish Mahajan : … म्हणून शिवसेना भाजप युती तुटली, गिरीष महाजनांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

0
Girish Mahajan : … म्हणून शिवसेना भाजप युती तुटली, गिरीष महाजनांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा



<p>Girish Mahajan : … म्हणून शिवसेना भाजप युती तुटली, गिरीष महाजनांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा</p>



Source link

Covid News : महाराष्ट्रात आढळले कोविडच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण, तज्ज्ञांचं म्हणणं काय?

0
Covid News : महाराष्ट्रात आढळले कोविडच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण, तज्ज्ञांचं म्हणणं काय?


Eris Covid Variant : कोविडच्या नव्या एरिस या अवतारानं आता मुंबई, महाराष्ट्रासह भारताची चिंता वाढवली आहे. महाराष्ट्रात या व्हेरिएंटचे काही रुग्ण आढळले आहेत.



Source link

Subhedar: प्रदर्शनापूर्वीच ‘सुभेदार’ चित्रपटाचा नवा विक्रम, ट्रेलरला लाखोंची पसंती

0
Subhedar: प्रदर्शनापूर्वीच ‘सुभेदार’ चित्रपटाचा नवा विक्रम, ट्रेलरला लाखोंची पसंती



Subhedar Trailer: तान्हाजी मालुसरे यांचा सुवर्ण इतिहास १८ ऑगस्टला ‘सुभेदार’ या भव्य चित्रपटातून रुपेरी पडद्यावर उलगडला जाणार आहे. तत्पूर्वी चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.



Source link

Priya Berde: प्रिया बेर्डेने सादर केली ठसकेबाज लावणी Video Viral

0
Priya Berde: प्रिया बेर्डेने सादर केली ठसकेबाज लावणी Video Viral



Priya Berde Video Viral: प्रिया बेर्डे यांची लावणी पाहिल्यानंतर कार्यक्रमाचे परीक्षक आणि स्पर्धक थक्क झाले आहेत.



Source link