Wednesday, July 15, 2026
Home Blog Page 2852

Phule: ‘फुले’ सिनेमातील प्रतिक गांधी आणि पत्रलेखाचा चकीत करणारा लूक प्रदर्शित

0
Phule: ‘फुले’ सिनेमातील प्रतिक गांधी आणि पत्रलेखाचा चकीत करणारा लूक प्रदर्शित


फुलेंनी १८७३ साली सत्यशोधक समाजाची स्थापना केली. त्यांनी महिला आणि दलितांच्या हक्कासाठी चळवळ केली. महात्मा फुले आणि सावित्र फुले यांनी महिनांला शिक्षण देण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले आहे. या सर्व गोष्टी ‘फुले’ या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अनंत महादेव करत आहे. प्रतिक आणि पत्रलेखाचा फर्स्ट लूक पाहून चाहत्यांमध्ये चित्रपटाबाबत उत्सुकता वाढली आहे.



Source link

सातारा : सूर्याचीवाडी येथे भीषण अपघात; ४ ठार, ४ गंभीर जखमी | पुढारी

0









खटाव : पुढारी वृत्तसेवा : सूर्याचीवाडी (ता. खटाव) येथे आज (दि.१०) पहाटे सहा वाजता चारचाकी गाडी झाडावर आदळून झालेल्या अपघातात चार जण ठार झाले. तर चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

खटाव तालुक्यातील बनपुरी आणि सिध्देश्वर कुरोली येथील एकूण आठ जण देवदर्शनासाठी निघाले होते. दहीवडी – मायणी रस्त्यावरील सुर्याचीवाडी येथे सहाच्या सुमरास गाडी झाडावर आदळून अपघात झाला. अपघातात एक पुरुष आणि दोन महिला जागीच ठार झाल्या, तर अन्य जखमी झाले. जखमींना वडूज आणि सातारा येथील रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. उपचार सुरु असताना वडूज येथील रुग्णालयात एका महिलेचा मृत्यू झाल्याची माहिती मिळत आहे.

हेही वाचा : 











Source link

Prices of Pulses:डाळींच्या पेरणी क्षेत्रात 9 टक्क्यांची घसरण,डाळ्यांची किमतीत वाढ होण्याची शक्यता

0
Prices of Pulses:डाळींच्या पेरणी क्षेत्रात 9 टक्क्यांची घसरण,डाळ्यांची किमतीत वाढ होण्याची शक्यता



<p>किराणा मालाच्या भावात मागील महिन्याभरापासून खूप वाढ होत चाललीये. अशातच आता केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार सर्व प्रकारच्या डाळींच्या उत्पादनांत यंदा चार लाख टनांची घट होणार असल्याचं समोर आलंय. तसंच यावर्षी सर्व प्रकारच्या डाळींच्या लागवडीत ९ टक्क्यांनी &nbsp;घसरण झालीय. गेल्यावर्षी पाच लाख टन डाळीची तूट होतीच त्यात येणाऱ्या वर्षांत ही तूट कायम असणार असल्याचंही बोललं जातंय.</p>
<p>&nbsp;</p>



Source link

Rujuta Deshmukh: “या विषयाचे पुढे काही होत नाही”, तिप्पट टोलवसुलीनंतर ऋजुता देशमुख त्रस्त

0
Rujuta Deshmukh: “या विषयाचे पुढे काही होत नाही”, तिप्पट टोलवसुलीनंतर ऋजुता देशमुख त्रस्त


मराठी चित्रपटसृष्टीमधील अनेक कलाकार हे वारंवार मुंबई ते पुणे असा प्रवास करत असतात. मग कधी कामानिमित्त असेल तर कधी कुटुंबीयांना भेटण्यासाठी असेल. त्यांचा प्रवास हा सुरुच असतो. या प्रवासादरम्यान, अभिनेत्री ऋजुता देशमुखला आलेला अनुभव तिने सोशल मीडियाच्या माध्यमातून सांगितला. तिने या व्हिडीओच्या माध्यमातून संताप व्यक्त केला. अनेकांनी तिच्या या व्हिडीओवर कमेंट करत त्यांचे अनुभव देखील सांगितले. आता पुन्हा एकदा ऋजुताने व्हिडीओ शेअर करत “या विषयाचे पुढे काही होत नाही” असे म्हटले आहे.



Source link

TMKOC: शैलेश लोढाने केस जिंकलेली नाही; तारक मेहतामधील निर्मात्याचा खुलासा

0
TMKOC: शैलेश लोढाने केस जिंकलेली नाही; तारक मेहतामधील निर्मात्याचा खुलासा



Taarak Mehta Ka Ooltah Chashmah: असित मोदीने नुकताच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये ‘शैलेश जो दावा करतोय की केस जिंकला आहे हा पू्र्णपणे चुकीचा आहे’ असे म्हटले आहे.



Source link

Pratyusha Banerjee: प्रत्युषा बनर्जीचे ‘ते’ शेवटचे शब्द आजही सर्वांच्या आहेत लक्षात

0
Pratyusha Banerjee: प्रत्युषा बनर्जीचे ‘ते’ शेवटचे शब्द आजही सर्वांच्या आहेत लक्षात



Pratyusha Banerjee Birth Anniversary: अभिनेत्री प्रत्युषा बॅनर्जीची आज १० ऑगस्ट रोजी जयंती आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही गोष्टी…



Source link

सातारा : दारूबंदीच्या जावलीत चक्क दारूसाठी ठराव | पुढारी

0


मेढा; पुढारी वृत्तसेवा : दारूबंदीसाठी व उभी बाटली आडवी करण्यासाठी यापूर्वी आंदोलने, ग्रामसभा, संघर्ष झाल्याच्या कितीतरी घटना आजपर्यंत घडल्या आहेत. सातारा जिल्ह्यातील जावली तालुक्यात दारूबंदीसाठी अनेकदा आंदोलने झाली. त्यानंतर कुठे जावली तालुका दारूमुक्त झाला. आता मात्र उलटेच घडत आहे. तालुक्यातील मुख्य बाजारपेठ असलेल्या कुडाळ येथे व्यापारी, व्यावसायिक आणि स्थानिक नेत्यांची बैठक होऊन तालुक्यातील दारूबंदी हटवण्याची मागणी करण्यात आली आहे. बैठकीतील या अजब मागणीची चर्चा जिल्ह्यात सुरू आहे.

दारूमुळे जावली तालुक्यात अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले, अपघात झाले. हे टाळण्यासाठी आणि पुढची पिढी व्यसनमुक्त होण्यासाठी जावलीतील विविध व्यक्ती आणि संघटनांनी दारूविरोधात एल्गार पुकारला. त्यानंतर अनेकदा संघर्षही करावा लागला. सरतेशेवटी तालुक्यातून दारू हद्दपार झाली. मात्र, आता तालुक्यात उलटाच मतप्रवाह पुढे येऊ लागला आहे.दारुबंदीच्या जावलीत दारुबंदी हटावचा नारा दिला जावू लागला आहे.

दारुबंदी हटवण्याच्या मागणीसाठी आज कुडाळ येथे प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे यांच्या पुढाकाराने बैठक झाली. दारूबंदीमुळे जावली तालुक्याच्या बाजारपेठेत होणारी आर्थिक उलाढाल कमी झाली आहे. प्रशासन व ग्रामपंचायती यांना विश्वासात घेऊन दारूबंदी हटवण्यात येऊ शकते का? यावर कुडाळ येथील बैठकीत विचारमंथन करण्यात आले. प्रसंगी महिलांचे परिवर्तन करून दारूबंदी उठवून पुन्हा दारूधंदे चालू करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. दि. 15 ऑगस्टच्या बैठकीत तसा ठराव घेण्याचा ग्रामस्थांचा मनोदय असल्याचे मत काहींनी मांडले.

दारूबंदी मागे घेण्याचे कारण देताना काही लोकांनी सांगितलं की, जावलीत गेली 16 वर्षांपासून दारूबंदी होती. त्यावेळी या लढ्यात बर्‍याच चेहर्‍यांनी आपलं योगदान दिलं होतं. मात्र, त्यानंतर तालुक्यात अवैध दारू विक्री आणि गुन्हेगारी वाढली आहे. त्यामुळे हा प्रकार रोखायचा असेल तर दारूबंदी हटवावी लागेल, असेही मत काहींनी मांडले. अवैध धंदे मोठ्या प्रमाणावर फोफावल्याने फक्त या तालुक्यात दारूबंदी असून उपयोग नाही, संपूर्ण जिल्ह्यात दारुबंदी केली गेली तर त्याचा परिणाम झाला असता लगतच्या तालुक्यांमध्ये दारू विक्री सुरू असल्याने जावलीतील दारूबंदीचा हेतू साध्यच होत नाही, असेही मत मांडण्यात आले. दारूबंदीमुळे बाजारपेठेवर होणारा परिणाम दिसू लागल्याने कुडाळ ग्रामस्थांनी आडवी बाटली उभी करण्यासाठी आग्रही भूमिका घेण्याचा निर्णय घेतला आहे.
या बैठकीला प्रतापगड सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सौरभ शिंदे, माजी उपसभापती रवी परामणे, संदीप परामणे, बाजार समिती माजी उपसभापती राजेंद्र शिंदे, सरपंच परिषदेचे उपाध्यक्ष समाधान पोफळे, माजी सरपंच विरेंद्र शिंदे व कुडाळ ग्रामस्थ उपस्थित होते.

दारूबंदी हटवण्याचे‘अर्थकारण’ चर्चेत…

जावली तालुका दारूमुक्त झाल्यानंतर जिल्ह्यातच नव्हे तर संपूर्ण राज्यात तालुक्याचा गवगवा झाला होता. आदर्श तालुका म्हणून जावलीचा उल्लेख केला जाऊ लागला. मात्र, हीच गोष्ट अनेक फुटकळांना खटकली असावी. त्यांचेच सगेसोबती चोरीछुपे इतर तालुक्यांतून दारू आणून जावलीला बदनाम करण्याचा उद्योग करत होते. सातत्याने अवैध दारू विक्री होत असल्याची आवई उठवली गेली आणि आता लगतच्या तालुक्यातून दारू येत असेल तर आपल्याच तालुक्यातील दारूबंदी हटवा, असा पवित्रा घेतला गेला की काय? अशीही चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. दारूबंदी हटवण्याची नेमकी गरज का वाटते? दारूतच सगळे अर्थकारण आहे का? निकोप आणि निर्व्यसनी पिढी निर्माण करायची नाही काय? समाज सुधारणेच्या मार्गातील अडथळे सक्षम करायचे आहेत काय? असेही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत.



Source link

सातार्‍यातील मेडिकल कॉलेजला छत्रपती संभाजी महाराजांचे नाव; राज्य शासनाचा निर्णय | पुढारी

0









खेड; पुढारी वृत्तसेवा :  जिल्ह्याच्या हेल्थ व्हिजनमध्ये माईल स्टोन ठरणार्‍या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सातारा असे नामकरण करण्याचा निर्णय राज्य शासनाने बुधवारी घेतला. या निर्णयाचे जिल्हावासीयांनी स्वागत केले असून अनेक दिवस मेडिकल कॉलेज व रुग्णालयाच्या नामकरणावरून होत असलेल्या मागणीला पूर्णविराम मिळाला आहे.

सातार्‍यातील मेडिकल कॉलेज हे जलसंपदा विभागाच्या 25 एकर जागेवर होत आहे. या प्रकल्पासाठी 60 एकर जागा कॉलेजकडे हस्तांतरित करण्यात आली आहे. मेडिकल कॉलेजच्या विविध इमारतींचा बांधकाम आराखडा तयार करण्यात आला आहे. यासाठी 495 कोटींचा निधी मंजूर झाला आहे. येथे 100 विद्यार्थी क्षमतेचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व त्या संलग्न 500 खाटांचे रूग्णालय दिल्ली व बारामतीच्या धर्तीवर सुरू होणार आहे.

सातारा मेडिकल कॉलेज व रूग्णालयाला यापूर्वी थोर महापुरूषांची नावे देण्याची मागणी विविध संघटनानी केली होती. मेडिकल कॉलेजचे काम मार्गी लागल्यानंतर या कॉलेजच्या नामकरणाची बाब शासनाच्या विचाराधीन होती. अखेर बुधवारी राज्य शासनाने छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय, सातारा असे नामकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची आयुक्त वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालय, मुंबई यांनी कार्यवाही करावी, अशी सूचना करण्यात आली आहे. ऐतिहासिक सातारा राजधानीला साजेसे नाव देण्याचा निर्णय राज्य शासनाने क्रांतीदिनी घेतल्याने या निर्णयाचे जिल्हावासियांनी स्वागत केले आहे.











Source link

Pune Daund news : विद्यार्थी शाळा सोडून गेल्याने पुण्यात शिक्षकानं उचललं टोकाच पाऊल; संपवलं स्वतःचं आयुष्य

0
Pune Daund news : विद्यार्थी शाळा सोडून गेल्याने पुण्यात शिक्षकानं उचललं टोकाच पाऊल; संपवलं स्वतःचं आयुष्य


अरविंद देवकर असे या शिक्षकांचे नाव असून त्याची दोन महिन्यांपूर्वी बुवाची वाडी येथील जिल्हा परिषद शाळेवर बदली झाली होती. मात्र, येथील शाळा ही खराब असल्याने त्यांनी शाळेची दुरवस्था पाहून ती शाळा व्यवस्थित करण्याचे ठरवले. या साठी विद्यार्थ्यांना देखील त्यांनी सोबत घेण्याचे ठरवले. दरम्यान, छोट्याश्या शाळेची स्वच्छ करून घेण्यासाठी आणि स्वयंशिस्तीचे शिक्षण मिळावे यासाठी विद्यार्थ्यांना विश्वासात घेत त्यांच्या मदतीने शाळा स्वच्छ करुन घेतली. श्रमदानाचा हेतु मुलांना समजावा असा उदात्त हेतु ठेऊन त्यांनी ही कृती केली, मात्र, मुलांच्या पालकांना ही बाब पटली नाही. त्यांनी शाळेत येऊन दरेकर यांच्याशी वाद घालत गोंधळ घातला. त्यांनी आपल्या मुलांना त्यांच्या शाळेतून काढून टाकत दुसऱ्या शाळेत घातले. ही बाब अरविंद देवकर यांच्या मनाला लागली. चांगलं करण्याच्या हेतूने केलेल्या कृतीमुळे सर्वच विद्यार्थी शाळा सोडून गेल्याने ते नैराश्यात गेले. त्यांनी विषारी तणनाशक पिऊन आत्महत्या केली. चिठ्ठीत त्यांनी या बाबतचा खुलासा केला आहे.



Source link

आरबीआयकडून पतधोरण जाहीर होणार, लोकसभेत अविश्वास ठरावावर चर्चा; आज दिवसभरात

0
आरबीआयकडून पतधोरण जाहीर होणार, लोकसभेत अविश्वास ठरावावर चर्चा; आज दिवसभरात


10th August Headline: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात लोकसभेत मांडण्यात आलेल्या अविश्वाच्या प्रस्तावावर (No Trust Vote) आजही हा चर्चा होणार आहे, आज या चर्चेचा तिसरा दिवस असणार आहे. आज पंतप्रधान मोदी (PM Modi) संसदेत या मुद्द्यावरुन प्रत्युत्तर देणार असल्याने तिथे गदारोळ होण्याची शक्यता आहे. आरबीआयकडून आज पतधोरण जाहीर केलं जाणार आहे, यातून महागाईचा अंदाज मिळणार आहे. तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाची आज दुपारी बैठक होणार आहे.

आरबीआयकडून पतधोरण होणार जाहीर

आरबीआयकडून आज सकाळी गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्याकडून पतधोरण जाहीर केलं जाणार आहे. डाळी, टोमॅटो, कांदा, मसाले आणि भाजीपाल्याचे दर वाढल्याने मागील महिन्यात महागाईत वाढ झाली होती. अशात महागाई संदर्भात सविस्तर माहिती शक्तिकांत दास यांच्याकडून सादर केली जाणार आहे. अमेरिकी फेडररकडून व्याजदर वाढीचे संकेत मिळत असल्यानं आरबीआयच्या पतधोरण समितीच्या बैठकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

अविश्वास प्रस्तावावर चर्चेचा आज तिसरा दिवस

मणिपूरच्या मुद्द्यावरुन विरोधककांडून केंद्र सरकारच्या विरोधात अविश्वास ठराव मांडण्यात आला आहे. अविश्वास प्रस्तावावर चर्चेचा आज तिसरा दिवस आहे. लोकसभेत अविश्वास प्रस्तावावर विरोधकांच्या आरोपांना आज पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्युत्तर देणार आहेत. 

राष्ट्रवादीची (अजित पवार गट) बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसची (अजित पवार गटाची) आज दुपारी 3 वाजता प्रदेश कार्यालयात महत्त्वाची बैठक होणार आहे. बैठकीला अजित पवार यांच्यासह पक्षातील सर्व मंत्री आणि प्रमुख आमदार उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महिला अत्याचारांबाबत ठाकरे गट घेणार राज्यपालांची भेट

राज्यात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांबाबत ठाकरे गट राज्यपाल रमेश बैस यांची भेट घेणार आहेत. दुपारी ठाकरे गटाचे नेते राज्यपालांच्या भेटीला जाणार आहेत.

आपच्या खासदारांची सकाळी पत्रकार परिषद

आपचे नेते राघव चड्ढा यांना विशेषाधिकार समितीची नोटीस आली आहे, या प्रकरणी आपचे सर्व खासदार आक्रमक झालेत. आज सकाळी आपचे 10 खासदार पत्रकार परिषद घेणार आहेत आणि या प्रकरणावर आपली मतं मांडणार आहेत.

विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार विदर्भ दौऱ्यावर

विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आज गोंदिया आणि भंडारा जिल्हा दौऱ्यावर आहेत. गोंदिया जिल्हा काँग्रेस कमिटीची आज बैठक होणार आहे. त्यानंतर दुपारी 1.30 वाजता विजय वड्डेटीवार पत्रकार परिषद घेतील.



Source link