
अठराव्या शतकातील मराठा साम्राज्याच्या राणी अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर चित्रपट बनवण्याच्या निर्णयाला महाराष्ट्रातील भाजप प्रणित आघाडी सरकारने मंजुरी दिली आहे. याशिवाय इतरही अनेक निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले आहेत.
Source link

अठराव्या शतकातील मराठा साम्राज्याच्या राणी अहिल्याबाई होळकर यांच्या जीवनावर चित्रपट बनवण्याच्या निर्णयाला महाराष्ट्रातील भाजप प्रणित आघाडी सरकारने मंजुरी दिली आहे. याशिवाय इतरही अनेक निर्णय मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आले आहेत.
Source link

बोईसर :वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसाने पालघर जिल्ह्यातील बहुतांश भागातील वीज पुरवठा ठप्प झाला. दोन दिवसांपासून खंडीत झालेल्या वीजेमुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. महावितरण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी वीज पुरवठा पुन्हा सुरु करण्यासाठी कार्यरत असून ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये वीजेचा लपंडाव सुरु आहे.
पालघर जिल्ह्यात सहा आणि सात मे रोजी दोन दिवस झालेल्या वादळी वारा आणि मुसळधार पावसाने जनजीवन विष्कळीत केले. मंगळवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ३० ते ४० किमी प्रती वेगाने निर्माण झालेल्या वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी विद्युत खांब जमिनीवर आले. तर विद्युत रोहित्रे नादुरुस्त झाल्याने तसेच विद्युत तारांवर झाडे आणि फांद्या तुटून पडल्याने जिल्ह्यातील शहरी आणि ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी वीज पुरवठा खंडीत झाला असून दुर्गम भागात ३६ तासानंतर देखील वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरु आहे.
महावितरणच्या पालघर विभाग अंतर्गत पालघर, डहाणू, जव्हार, विक्रमगड, बोईसर भागात उच्चदाब वाहिनीचे ५४ तर लघुदाब वाहिनीचे तब्बल ७६ खांब पडले. उच्चदाबाच्या ९.५ किलोमीटर वीजवाहिन्या आणि लघुदाबाच्या ७.६ किलोमीटर वीजवाहिन्या कोसळल्या. एकूण तीन रोहित्र जमिनदोस्त होण्यासह ५ रोहित्र नादुरुस्त झाले व ४ उपकेंद्रामंधील वीज वितरण उपकरणांत बिघाड झाला.
जिल्ह्यात वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी अशी एकूण २० पथके रांत्रदिवस प्रयत्न करीत आहेत. महावितरण विभागाच्या डहाणू उपविभागात सर्वाधिक नुकसान झाले असून डहाणू जव्हार ३३ केव्ही वीज वाहिनीत बिघाड झाल्याने आशागड, कासा, विक्रमगड, जव्हार, मोखाडा या परिसरातील गावे दोन दिवस अंधारात होता. त्या पाठोपाठ पालघर येथे देखील मोठ्या प्रमाणात विद्युत खांब व विद्युत रोहित्रांचे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी विजेच्या तारांवर वादळी वाऱ्यामुळे झाडे व झाडांच्या फांद्या पडल्याने झाडे हटवून विद्युत तारा व वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे.
महावितरणच्या बोईसर उपविभागाअंतर्गत बोईसर परिसर, पूर्व भागातील गावे आणि तारापूर, वाणगाव भागात जवळपास २४ ते ३० तास वीज पुरवठा खंडीत झाला होता. यामुळे घरातील विद्युत उपकरणे आणि पाण्याचे बोरिंग बंद झाल्याने नागरीकांचे अतोनात हाल झाले. बुधवारी रात्रीपासून खंडीत झालेला वीज पुरवठा सुरळीत करण्यात महावितरण विभागाला यश आल्याची माहिती उपकार्यकारी अभियंता नरेंद्र संगेपू यांनी दिली तर पाऊस आणि जोरदार वाऱ्यामुळे ३३ केव्ही वीज वाहिनीचा बंद झालेला वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला आहे. तसेच जिल्ह्यातील इतर ठिकाणी महावितरणची २० पथके वीज पुरवठा पूर्ववत सुरु करण्यासाठी काम करीत असल्याची माहिती कार्यकारी अभियंता सुनील भारंबे यांनी दिली.

Operation Sindoor: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारताने अलीकडेच ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तान आणि पीओकेमधील 9 दहशतवादी अड्डे नष्ट केले. भारताच्या या कृतीने हादरलेल्या पाकिस्तानने प्रथम आपल्या लोकांना मूर्ख बनवण्यासाठी सोशल मीडियावर अनेक बनावट बातम्या पसरवल्या आणि नंतर सीमेवर युद्धबंदीचे उल्लंघन केले. पाकिस्तानच्या या भ्याड कृत्यामुळे सीमावर्ती भागात अनेक निष्पाप भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. गुरुवारी, भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने (MEA) पत्रकार परिषद घेतली आणि पाकिस्तानसोबतच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल माहिती दिली.
कर्नल सोफिया कुरेशी म्हणाल्या, ‘7 मे 2025 रोजी ऑपरेशन सिंदूरवरील पत्रकार परिषदेत भारताने स्पष्टपणे सांगितले होते की आमची कारवाई जाणिवपूर्वक, मर्यादित आणि चिथावणीशिवाय करण्यात आली होती. कोणत्याही पाकिस्तानी लष्कराला लक्ष्य केले गेले नाही, असे स्पष्टपणे सांगण्यात आले. भारतीय लष्करी तळांवर हल्ला झाल्यास त्याला निश्चितच प्रत्युत्तर दिले जाईल, असेही पुनरुच्चार करण्यात आले. 7-8 मे च्या रात्री पाकिस्तानने भारताच्या उत्तर आणि पश्चिम भागातील अनेक लष्करी तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये अवंतीपुरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज या भागांचा समावेश होता.
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. भारताने पाकव्याप्त काश्मिर आणि पाकिस्तानमधील 9 दहशतवादी स्थळांना निशाण बनवल्यानंतर पाकिस्तानकडून सीमारेषेजवळ गोळीबार करण्यात आला. यानंतर भारताकडून प्रत्युत्तर देण्यात आले. भारतीय सैन्यदलाकडून यासंदर्भात महिती देण्यात आली.
पाकिस्तानी सैन्य ठिकाणांना निशाणा बनवलं नव्हत. पण भारतीय सैन्यावर हल्ला झाल्यास जशास तसे उत्तर दिलं जाईल, असंही म्हटलं होतं. पण पाकिस्तानने भारताच्या काही शहरांवर ड्रोन आणि मिसाईल हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आला पण तो निष्क्रिय करण्यात आल्याची माहिती परराष्ट्र सचिवांकडून देण्यात आली.
पाकिस्तानने नियंत्रण रेषेवर गोळीबार केला. सीमेजवळी भागांवर मोठ्या प्रमाणात गोळीबार केला गेला. यात 16 नागरिकांचा मृत्यू झाला. यानंतर भारताने त्याच तिव्रतेने प्रतिक्रिया दिली. लाहोरमधील एअर डिफेन्स रडार निष्क्रिय करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आला.



७-८ मे च्या मध्यरात्री पाकिस्तानने अवंतीपोरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना, आदमपूर, भटिंडा, चंदीगड, नल, फलोदी, उत्तरलाई आणि भुज सह उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी तळांवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा वापर करून हल्ले करण्याचा प्रयत्न केला. हे हल्ले काउंटर यूएएस ग्रिड आणि एअर डिफेन्स सिस्टीमने निष्प्रभ केले. या हल्ल्यांचे अवशेष आता अनेक ठिकाणांहून सापडत आहेत, ज्यावरून पाकिस्तानी हल्ले सिद्ध होतात.

भारताच्या या कारवाईनंतरही दहशतवादाला आश्रय देणारा पाकिस्तान आपल्या कारवायांपासून मागे हटत नसून सीमेवर जोरदार गोळीबाराबरोबरच अनेक ठिकाणी क्षेपणास्त्र हल्ले करण्याचा प्रयत्न केला आहे. संरक्षण मंत्रालयाने गुरुवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ७ आणि ८ मे च्या रात्री पाकिस्तानने उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी आस्थापनांना क्षेपणास्त्रे आणि ड्रोनद्वारे लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये अवंतीपोरा, श्रीनगर, जम्मू, पठाणकोट, अमृतसर, कपूरथला, जालंधर, लुधियाना आणि भुज यांचा समावेश आहे. मात्र, भारताची हवाई संरक्षण यंत्रणा एस-४०० आणि इस्रायली हार्पी ड्रोनने पाकिस्तानी क्षेपणास्त्रे आणि ड्रोन नष्ट केले.


