Thursday, July 16, 2026
Home Blog Page 2835

Kiran Mane: ‘मी परत येतोय, ताठ मानेनं, ताठ कण्यानं’; किरण मानेंनी अखेर करून दाखवलं!

0
Kiran Mane: ‘मी परत येतोय, ताठ मानेनं, ताठ कण्यानं’; किरण मानेंनी अखेर करून दाखवलं!


किरण माने यांनी ‘सिंधुताई माझी माई’ या मालिकेतून छोट्या पडद्यावर पुनरागमन केले आहे. यानिमित्ताने त्यांनी सोशल मीडियावर एक जळजळीत पोस्ट शेअर करून आपण स्वतःला सिद्ध करून दाखवल्याचं म्हटलं आहे. किरण माने यांनी लिहिलेल्या या पोस्टमध्ये म्हटलेय की, ‘आज स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी मी परत येतोय, ताठ मानेनं, ताठ कण्यानं! दिड वर्षापूर्वीच्या ‘त्या’ दिवशी, ती घटना घडल्यावर मी सोशल मीडियावर येऊन बोललो होतो की, ‘काट लो जुबान, आंसुओं से गाऊंगा… गाड़ दो, बीज हूँ मैं, पेड़ बन ही जाऊंगा!’ …आज ते सिद्ध करून दाखवलं! पण मला आनंद होतोय तुमच्यासाठी. ‘त्या’ सगळ्या काळात तुम्ही मायबाप प्रेक्षक माझ्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिलात. मला पूर्वीपेक्षा शंभरपटींनी प्रेम दिलंत. त्यामुळं आज या क्षणी नम्रपणे तुम्हा चाहत्यांच्या पायाशी रहाणं, हे माझ्यासाठी सगळ्यात जास्त आनंदाचं असेल.’



Source link

OMG 2 collection: अक्षय कुमारचा ‘ओएमजी २’ संथ गतीने सुरू! आतापर्यंत कमावले ‘इतके’ कोटी

0
OMG 2 collection: अक्षय कुमारचा ‘ओएमजी २’ संथ गतीने सुरू! आतापर्यंत कमावले ‘इतके’ कोटी


अक्षय कुमारचा ‘ओएमजी २’ चित्रपट आतापर्यंत ५० कोटींच्या क्लबमध्ये सामील झाला आहे. तर, आता हा चित्रपट लवकरच ७५ कोटींचा टप्पा गाठू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. अक्षय कुमार आणि यामी गौतमच्या या चित्रपटाने पहिल्या दिवशी चांगली कमाई केली होती. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी १०.२६ कोटींची कमाई केली होती. त्यानंतर दुसऱ्या दिवशी १५.३० कोटी, तिसऱ्या दिवशी १७.५५ कोटी आणि चौथ्या दिवशी १२.०६ कोटी रुपये कमावले आहे. चौथ्या दिवसानंतर या चित्रपटाचे एकूण कलेक्शन ५५.१७ कोटी इतके झाले आहे.



Source link

Independence Day : ‘सध्याची परिस्थिती बघता देशात खरं स्वातंत्र्य उरलंय का?’

0
Independence Day : ‘सध्याची परिस्थिती बघता देशात खरं स्वातंत्र्य उरलंय का?’


Jitendra Awhad on Independence Day : ‘अनेकांनी बलिदान दिल्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळालंय. मात्र, देशात आणि महाराष्ट्रात आज जी परिस्थिती आहे, ती पाहाता खरंच स्वतंत्र उरलं आहे का? असा प्रश्न जनतेला आज स्वातंत्र्याचा ७७ वा वर्धापन दिन साजरा करताना पडला आहे, अशी टिप्पणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली.



Source link

Independence Day 2023: कुणी तिरंगा फडकवला, तर कुणी केली खास फॅशन! मराठी कलाकारांनी असा साजरा केला ‘स्वातंत्र्य दिन’

0
Independence Day 2023: कुणी तिरंगा फडकवला, तर कुणी केली खास फॅशन! मराठी कलाकारांनी असा साजरा केला ‘स्वातंत्र्य दिन’


‘मराठी बिग बॉस’नंतर हिंदी बिग बॉसमध्ये देखील आपला जलवा दाखवणारा अभिनेता शिव ठाकरे सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. सोशल मीडियावर त्याचा मोठा चाहता वर्ग आहे. ‘स्वातंत्र्य दिना’चं निमित्त साधत शिव ठाकरे याने एक खास व्हिडीओ शूट केला आहे, जो त्याने त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.



Source link

तुरुंगातून बाहेर येताच अजित पवार गटाचे नेते मलिकांच्या भेटीला; मलिकांच्या भूमिकेकडे लक्ष

0
तुरुंगातून बाहेर येताच अजित पवार गटाचे नेते मलिकांच्या भेटीला; मलिकांच्या भूमिकेकडे लक्ष



Nawab Malik: तुरुंगातून बाहेर येताच अजित पवार गटाचे नेते मलिकांच्या भेटीला; मलिकांच्या भूमिकेकडे लक्ष



Source link

Aai Kuthe Kay Karte: देशमुखांच्या घरातील राडा संपेना, अनिरुद्धला समजलं विशाखाचं सत्य

0
Aai Kuthe Kay Karte: देशमुखांच्या घरातील राडा संपेना, अनिरुद्धला समजलं विशाखाचं सत्य



Aai Kuthe Kay Karte serial update: देशमुखांच्या घरात आणखी एक घटस्फोट? जाणून घ्या आजच्या भागात नेमकं काय होणार…



Source link

The Vaccine War Teaser: १५ ऑगस्टचं निमित्त साधून विवेक अग्निहोत्रींनी शेअर केला ‘द व्हॅक्सिन वॉर’चा टीझर! पाहा व्हिडीओ..

0
The Vaccine War Teaser: १५ ऑगस्टचं निमित्त साधून विवेक अग्निहोत्रींनी शेअर केला ‘द व्हॅक्सिन वॉर’चा टीझर! पाहा व्हिडीओ..


या चित्रपटाच्या मेकर्सनी मंगळवारी, स्वातंत्र्यदिनी ‘द व्हॅक्सिन वॉर’चा टीझर रिलीज केला. जेव्हा देशभरात कोरोनाने थैमान घातलं होतं आणि बरेच लोक आजारी पडत होते, तेव्हा त्याच्याशी सामना करण्यासाठी भारतात एक लस तयार करण्यात आली होती. त्या काळात कशाप्रकारे या संकटाला तोंड द्यावे लागले आणि डॉक्टर-शास्त्रज्ञांनी कोरोना विषाणूशी लढण्यासाठी कोणते प्रयत्न केले, याची झलक चित्रपटात दाखवण्यात आली आहे.



Source link

Pune High Alert : पुणे शहरात हाय अलर्ट; चौकाचौकांत मोठा पोलीस बंदोबस्त, नेमकं कारण काय?

0
Pune High Alert : पुणे शहरात हाय अलर्ट; चौकाचौकांत मोठा पोलीस बंदोबस्त, नेमकं कारण काय?


काही दिवसांपूर्वीच राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि एटीएसने आयसिस, अल सुफा या दहशतवादी संघटनेशी संबंध असलेल्या सात लोकांना अटक केली होती. याशिवाय शहरातील कोथरुड भागात दुचाकी चोरताना दोन अतिरेक्यांना अटक करण्यात आली होती. दोन्ही आरोपी एनआयएच्या फरार गुन्हेगारांच्या यादीत होते. त्यामुळं पुणे शहरात खळबळ उडाली आहे. त्यानंतर आता पुणे पोलिसांनी अतिरेक्यांना आश्रय दिल्याच्या आरोपावरून आणखी पाच लोकांना अटक केली आहे. याशिवाय मुंढवा, हडपसर, कोंढवा आणि कोथरुड या भागात पोलिसांकडून अटकसत्र सुरू असल्याची माहिती आहे.



Source link

‘त्या’ एका पत्रामुळं गावचं राजकरण पेटलं, लव्ह मॅरेजसंदर्भात ठरावच झाला नाही, नेमके काय घडलं? 

0
‘त्या’ एका पत्रामुळं गावचं राजकरण पेटलं, लव्ह मॅरेजसंदर्भात ठरावच झाला नाही, नेमके काय घडलं? 


नाशिक : नाशिकच्या सायखेडा ग्रामपंचायतमध्ये (saykheda Grampanchayat) आलेला एक अर्ज सध्या जिल्हाभर चांगलाच चर्चेचा विषय ठरतो आहे. आई वडीलांना विचारल्याशिवाय रजिस्टर लग्न करता येणार नाही, असा ठराव करावा, एवढेच नाही तर असा कायदा करून शासनाकडेही पाठपुरावा करण्यात यावा, अशी मागणी यातून करण्यात आली असून या पत्रामुळे गावातील राजकारणही चांगलेच पेटले आहे. 

नाशिकच्या निफाड (Niphad) तालुक्यातील साडेआठ हजार लोकसंख्येचं हे आहे सायखेडा गाव.. शेती हा या गावचा मुख्य व्यवसाय.. एरव्ही शांत आणि कधीही चर्चेत न आलेल्या या गावचे नाव सध्या मात्र जिल्हाभर चांगलेच गाजते आहे आणि ह्याला कारण ठरलय ते म्हणजे ग्रामपंचायतीच्या एका माजी सरपंचाने 11 ऑगस्ट रोजी सरपंच आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांकडे ग्रामसभेत एक पत्र देत केलेली मागणी आहे. या पत्रात काय म्हटलंय तर ‘गुजरातप्रमाणे आई वडीलांची परवानगी न घेता रजिस्टर लग्न (Love Marriage)करणाऱ्या मुला मुलींची रजिस्टर नोंद करू नये. आपल्याकडे देखिल कायदा व्हावा असा ग्रामसभेमध्ये ठराव करून शासनाकडे पाठपुरावा करण्यात यावा ही विनंती, असा मजकूर लिहलेला आहे. 

दरम्यान हे पत्र सोशल मिडीयावरही (social Media) चांगलेच व्हायरल होताच सायखेडा ग्रामपंचायत ही चांगलीच चर्चेचा विषय ठरली आहे. यात एक गंमतीचा विषय म्हणजे ग्रामसभेत हे पत्र देऊन मागणी करणारे माजी सरपंच भाऊसाहेब कातकाडे यांची पत्नी सध्या ग्रामपंचायत सदस्य आहे तर सरपंचही त्यांचे नातेवाईकच आहे. त्यामुळे भाऊसाहेब कातकाडे यांनी जरी गावकरी म्हणून ही मागणी केली असली तरी मात्र ग्रामपंचातीच्या सदस्यांचा एक गटच नोंदणी विवाहासाठी आई वडिलांची परवानगी आवश्यक करण्याच्या मागणीसाठी आग्रही असल्याची गावात चर्चा असून सदस्यांचा दुसरा गट मात्र याला कडाडून विरोध करत असल्याचे चित्र आहे. एकंदरीतच या पत्रामुळे गावचे राजकारणही चांगलेच पेटल्याने गावचे ग्रामसेवक मात्र मीडियापासून दूर पळत आहेत.  

तर अशी मागणी करणारे माजी सरपंच भाऊसाहेब कातकाडे म्हणाले की ‘मी ग्रामसभेत हे पत्र देऊन आई वडीलांची परवानगी न घेता रजिस्टर लग्न करणाऱ्या मुला मुलींची रजिस्टर नोंद करू नये, अशी मागणी केली आहे. आई वडिलांना याचा त्रास होतो, ठराव लिहून आम्ही शासनाकडे पाठवू, खूप चांगली मागणी आहे, निर्णय घ्या, असे मला खूप फोन आले’, असे ते म्हणाले. तर सदस्य मनोज भुतडा म्हणाले की, गुजरात राज्याने हा कायदा मंजूर केला आहे, माजी सरपंचाने जो अर्ज केला, तो उपक्रम आम्ही राबवत आहोत. हा निर्णय प्रत्येक ग्रामपंचायत, महापालिकेने घेतला पाहिजे, जेणेकरून शासनावर दबाव येईल आणि कायद्यात कसे बदल येऊ शकतील. लव्ह जिहादचे दुष्परिणाम आपण बघतोच आहे, सायखेडा ग्रामपंचायतीने ही सुरुवात केली आहे. सरकारने निर्णय घ्यावा, असे ते म्हणाले. 

सदस्य म्हणाले…

अकरा ऑगस्टला ग्रामसभा संपत असतांना शेवटच्या मिनिटाला हा अर्ज आला होता. अर्धे सदस्य यावेळी निघून गेले होते. असा कोणताही ठराव झालेला नाही. ही मागणी आमच्या गावासाठी घातक झाली आहे, कारण बाहेर असा मेसेज गेला आहे की गावातील मुली लग्नाला आहेत आणि ईथे खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे. त्यामुळे ठराव करत आहेत, ग्रामसेवकाचा फोन पण स्विच ऑफ आहे, असा कोणताही ठराव झालेला नाही, लिहिलेला नाही. एकूण 17 सदस्य आहे, गावात त्यात 9 महिला आहेत. माझे स्वतःचे लव्ह मॅरेज आहे. शासन मॅरेजसाठी प्रोत्साहन देते, अनुदान देते तर दुसरीकडे असा ठराव कसा होईल. महिलांसाठी एक विशेष ग्रामसभा घेऊन यावर चर्चा केली पाहिजे. एकीकडे हे राजकारण करत आहेत, मात्र दुसरीकडे कुटुंब बदनाम होणार असल्याची प्रतिक्रिया ग्रामपंचायत सदस्य अशपाक शेख यांनी दिली. कायद्यानूसार मुलीचे वय 18 तर मुलाचे वय 21 हे लग्नासाठी योग्य समजले जाते. विवाह नोंदणीसाठी कुठलीही अट टाकणे हे कितपत कायदेशीर ठरेल हा प्रश्नच असून सायखेडा ग्रामपंचायतीने अशा कोणत्या प्रकारचा ठराव केल्यास तो महाराष्ट्रात ऐतिहासिक ठरेल की वादग्रस्त ठरेल हेच आता पहाणं महत्वाचं ठरणार आहे..

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Nashik : लव्ह मॅरेज करायचंय? आधी आई-वडिलांचं परवानगी पत्र आणा, नाशिकमधील ग्रामपंचायतीचा ठराव?



Source link

Akshay Kumar: स्वातंत्र्यदिनी अक्षय कुमारनं चाहत्यांना दिलं मोठं गिफ्ट! खास फोटो शेअर करत म्हणाला…

0
Akshay Kumar: स्वातंत्र्यदिनी अक्षय कुमारनं चाहत्यांना दिलं मोठं गिफ्ट! खास फोटो शेअर करत म्हणाला…


अनेक मीडिया मुलाखतींमध्ये अक्षयने कॅनडाच्या नागरिकत्वाबाबत ट्रोलिंगवर प्रतिक्रिया दिल्या होत्या. अक्षय कुमार म्हणाला होता की, ‘भारत माझ्यासाठी सर्वस्व आहे. मी जे काही कमावले आहे, ते मी इथे राहून कमावले आहे. आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की, मला परतण्याची संधी मिळाली आहे. पण, लोक जेव्हा माझ्या नागरिकत्वावर प्रश्नचिन्ह लावतात तेव्हा वाईट वाटते.’



Source link