Thursday, July 16, 2026
Home Blog Page 2834

Saif Ali Khan : ‘या’ अटीवर करीनाने सैफशी बांधली होती लग्नगाठ

0
Saif Ali Khan : ‘या’ अटीवर करीनाने सैफशी बांधली होती लग्नगाठ



Saif Ali Khan Birthday: आज १६ ऑगस्ट रोजी सैफ अली खानचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया तिच्याविषयी काही खास गोष्टी…



Source link

मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसेचा निर्धार मेळावा; आज दिवसभरात…

0
मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसेचा निर्धार मेळावा; आज दिवसभरात…


16th August Headlines :  आज  दिवसभरात महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत. सामाजिक, राजकीय वर्तुळात महत्त्वाच्या घडामोडी होणार आहेत. आज, पारशी नववर्षाचा पहिला दिवस आहे. हा दिवस नवरोझ म्हणून देखील ओळखला जातो. पारशी समाजाचं नवं वर्ष ही नव्या पारशी वर्षाची/ कॅलेंडरची सुरूवात असते. अग्यारी या त्यांच्या धार्मिकस्थळाला भेट देऊन ते प्रार्थना करतात. देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा आज स्मृतीदिन आहे. 

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा स्मृतीदिन

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा आज स्मृतीदिन आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक नेते त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी त्यांच्या स्मृतीस्थळाला भेट देणार आहेत.

दिल्ली विधानसभेचे विशेष अधिवेशन 

दिल्ली विधानसभेचे विशेष अधिवेशन आजपासून सुरू होत आहे.  संसदेच्या दिल्ली सेवा विधेयकाच्या मंजुरीनंतर प्रथमच सत्र बोलवण्यात आले आहे. हे सत्र 16 आणि 17 ऑगस्ट 2023 या दोन दिवसांसाठी बोलवण्यात आले आहे. कामकाजाच्या अत्यावश्यकतेनुसार सभागृहाचा कालावधी वाढवला जावू शकतो. 

उद्धव ठाकरे यांच्याकडून लोकसभा निवडणुकीसाठी बैठकांचा धडाका

शिवसेना ठाकरे गटाचे (Shiv Sena UBT) पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्याकडून लोकसभा निवडणुकांच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर आजपासून बैठका सुरू होणार आहेत. 16 ते 19 ऑगस्ट दरम्यान पहिल्या टप्प्यात एकूण 16 लोकसभा मतदारसंघांचा आढावा घेतला जाणार आहे.

मुंबई-गोवा महामार्गासाठी मनसेचा निर्धार मेळावा 

मुंबई गोवा महामार्गप्रश्नी आता मनसे आक्रमक झाली आहे. जवळपास 17 वर्ष रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम पूर्ण करण्यासाठी मनसे मैदानात उतरली आहे. पनवेल इथे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) कोकणातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेणार आहेत. 
 

काँग्रेसच्या कोअर समितीची बैठक

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस पक्षाच्या कोअर कमिटीची बैठक एमसीए क्लब वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स(BKC) येथे होणार आहे. या बैठकीत लोकसभा निवडणूक संदर्भात आढावा, राष्ट्रवादी पक्षाची भुमिका आणि विरोधकांची आघाडी ‘इंडिया’च्या बैठकी संदर्भात चर्चा होणार आहे.
 

राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची बैठक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार (Ajit Pawar) गटाच्यावतीने पक्षांतर्गत आढावा घेण्यासाठी ‘देवगिरी’ बंगल्यावर बैठक बोलावण्यात आली आहे. बैठकीमध्ये संघटनात्मक आढावा घेण्यात येणार आहे. 

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ घेणार ससून रुग्णालयात बैठक

पुणे – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ हे ससून रुग्णालयात बैठक घेऊन रुग्णालयाच्या परिस्थितीचा आढावा घेणार



Source link

VIDEO : पुण्यात यूक्रेनी गायिकेकडून Live Show मध्ये तिरंग्याचा अपमान, गुन्हा दाखल

0
VIDEO : पुण्यात यूक्रेनी गायिकेकडून Live Show मध्ये तिरंग्याचा अपमान, गुन्हा दाखल


Insulting the Tricolour :यूक्रेनची गायिका उमा शांती हिच्यावर तिरंग्याचा अपमान केल्याचा आरोप केला जात आहे. पुणे पोलिसांनी उमा शांती आणि अन्य एका व्यक्तीविरोधात एफआयआर दाखल केला आहे. 



Source link

Grampanchayat Election : गावच्या कारभाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, निवडणुकीबाबत उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

0
Grampanchayat Election : गावच्या कारभाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, निवडणुकीबाबत उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय


Sarpanch Election : न्यायालयाने म्हटले आहे की, ग्रामपंचायत कायदा संबंधित उमेदवारांना पोटनिवडणूक लढण्यास अपात्र ठरवत नाही. निवडणूक लढणे, हा पूर्णतः कायदेशीर अधिकार आहे.



Source link

अविश्वास ठरावाने हटवलेल्या संरपंचाला पुन्हा पोटनिवडणूक लढवता येणार; उच्च न्यायालयाचा निर्णय

0
अविश्वास ठरावाने हटवलेल्या संरपंचाला पुन्हा पोटनिवडणूक लढवता येणार; उच्च न्यायालयाचा निर्णय


मुंबई: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. अविश्वास ठराव बहुमताने पारीत झाल्यामुळे सरपंच किंवा उपसरपंच पदावरून हटलेल्या उमेदवारांना समान पदाची पोटनिवडणूक लढवता येते, असा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. न्यायमूर्ती अतुल चांदूरकर आणि न्यायमूर्ती वृषाली जोशी यांनी एका प्रकरणात हा निकाल दिला आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत कायदा संबंधित उमेदवारांना पोटनिवडणूक लढण्यास अपात्र ठरवत नाही, असे निर्णयात स्पष्ट करण्यात आले आहे.

निवडणूक लढणे, हा पूर्णतः कायदेशीर अधिकार आहे. त्यामुळे संबंधित कायदा एखाद्या उमेदवाराला निवडणूक लढण्यास अपात्र ठरवत  नाही असे न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे.

अमरावतीमधील वाठोडा ग्रामपंचायतीचे सरपंचपद अनुसूचित जमाती महिलेसाठी आरक्षित आहे. 28 जानेवारी 2021 रोजी सुजाता गायकी यांनी या पदाची निवडणूक जिंकली. त्यानंतर गायकी यांच्याविरूद्ध 8 जून 2023 रोजी अविश्वास ठराव बहुमताने पारीत झाला. त्यामुळे गायकी सरपंचपदावरून पायउतार झाल्या. 

पुढे या पदाची पोटनिवडणूक घेण्यासाठी 30 जून 2023 रोजी नोटीस जारी करण्यात आली. गायकी या अनुसूचित जमाती प्रवर्गातील एकमेव महिला उमेदवार आहेत. त्यामुळे त्या पोटनिवडणूक लढल्यास जिंकून येतील, म्हणून याचिकाकर्त्यांनी उच्च न्यायालयात धाव घेऊन गायकी यांना सरपंचपदाची पोटनिवडणूक लढण्यास प्रतिबंध करण्याची मागणी केली होती. त्यावर न्यायालयाने हा महत्वपूर्ण निर्णय दिला आहे. 

दरम्यान लातूर जिल्ह्यातील सहा तालुक्यातील 410 ग्रामपंचायत सदस्यांना जात वैधता प्रमाणपत्र वेळेत सादर केले नसल्यामुळे जिल्हा प्रशासनाने त्यांना अपात्र केले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार रेणापूर, निलंगा, देवणी, उदगीर, जळकोट व अहमदपूर तालुक्यांतील राखीव जागांवर निवडून आलेल्या व मुदतीत वैधता प्रमाणपत्र न देणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांना जानेवारी 2023 अखेर सादर केली. सदस्यांची माहिती तहसीलदारांनी माहितीची छाननी झाल्यानंतर जिल्हाधिकारी पृथ्वीराज यांनी सहा तालुक्यांतील 410 सदस्यांना मुदतीत जात वैधता प्रमाणपत्र न दिल्याप्रकरणी अपात्र करून त्यांचे पद रिक्त झाले आहे 

तालुकानिहाय अपात्र सदस्य

रेणापूर 42, निलंगा 109, देवणी 78, उदगीर 109, जळकोट 13, अहमदपूर 59 असे एकूण 410.

यात मोठ्या संख्येने सरपंच आणि उपसरपंचांचाही समावेश असल्याने गावागावांमधील राजकारण चांगलेच तापले आहे. उर्वरित चार तालुक्यांतील सदस्यांबाबतही लवकरच निर्णय घेण्याचे संकेत जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहेत.

ही बातमी वाचा: 

 

 



Source link

Zero Hour ABP Majha:पंतप्रधान मोदींचं लाल किल्ल्यावरील भाषण ते मविआचा प्लॅन बी, झीरो अवरमध्ये चर्चा

0
Zero Hour ABP Majha:पंतप्रधान मोदींचं लाल किल्ल्यावरील भाषण ते मविआचा प्लॅन बी, झीरो अवरमध्ये चर्चा



<p>Zero Hour ABP Majha:पंतप्रधान मोदींचं लाल किल्ल्यावरील भाषण ते मविआचा प्लॅन बी, झीरो अवरमध्ये चर्चा&nbsp;</p>



Source link

स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण सुरू असतानाच बहीण-भावाचा आत्मदहनाचा प्रयत्न; वेळीच रोखल्याने मोठा अनर्थ टळला

0
स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहण सुरू असतानाच बहीण-भावाचा आत्मदहनाचा प्रयत्न; वेळीच रोखल्याने मोठा अनर्थ टळला


नाशिक – स्वातंत्र्यदिनानिमित्त नाशिक रोड येथील विभागीय आयुक्तालय येथे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्याहस्ते ध्वजारोहण होणार होते. त्यापूर्वी बहीण-भावाने केलेल्या आत्मदहनाच्या प्रयत्नामुळे खळबळ माजली. भूमिअभिलेख कार्यालयाच्या कारभाराच्या निषेधार्थ नाशिकच्या विभागीय आयुक्तालयासमोर उपोषण करणाऱ्या बहीण भावाने आज स्वातंत्र्यदिनी आत्महदहनाची तयारी केली होती. मात्र, वेळीच पोलिसांनी हस्तक्षेप करून दोघांना ताब्यात घेतल्याने मोठा अनर्थ टळला. 



Source link

KBC: सीझन १पासून ते १४पर्यंत किती लोकांनी जिकलं ‘केबीसी’मधून कोट्यवधींचं बक्षीस? ‘ही’ यादी बघाच…

0
KBC: सीझन १पासून ते १४पर्यंत किती लोकांनी जिकलं ‘केबीसी’मधून कोट्यवधींचं बक्षीस? ‘ही’ यादी बघाच…


KBC Top Prize Winners: केबीसीमध्ये अनेक लोकांनी प्रश्नांची बरोबर उत्तरे देऊन कोट्यवधी रुपयांचे बक्षीस जिंकले आहे. चला तर, गेल्या चौदा सीझन्समध्ये कोट्यवधी जिंकणाऱ्या स्पर्धकांवर एक कटाक्ष टाकूया…



Source link

TOP 25 : दिवसभरातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 15 ऑगस्ट 2023 : ABP Majha

0
TOP 25 : दिवसभरातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 15 ऑगस्ट 2023 : ABP Majha



<p>TOP 25 : दिवसभरातील 25 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 25 न्यूज : 15 ऑगस्ट 2023 : ABP Majha</p>



Source link

माण, खटाव तालुक्यात चारा छावण्या सुरु करा: पृथ्वीराज चव्हाण | पुढारी

0









कराड: पुढारी वृत्तसेवा : सातारा जिल्ह्यातील माण व खटाव तालुक्यातील बहुतांश भागामध्ये कमी पाऊस पडल्यामुळे तिथे दुष्काळजन्य परिस्थिती उदभवली आहे. या गावांमध्ये जनावरांना चारा व पिण्याच्या पाण्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली असल्याने या भागात तत्काळ चारा छावण्या सुरु करण्यात याव्यात, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री व मदत-पुनर्वसन मंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

सातारा जिल्ह्यात सर्वत्र सरासरी पाऊस पडला असला तरी माण व खटाव तालुक्यातील बहुतांश भागामध्ये पुरेसा पाऊस न झाल्याने या भागात दुष्काळजन्य परिस्थिती उद्भवली आहे. माण व खटाव तालुक्यातील दुष्काळजन्य गावातील ग्रामस्थांच्या मागणीनुसार सदर गावांमध्ये तत्काळ चारा छावण्या सुरु करण्याची मागणी होत आहे. तसेच पशुधन वाचविण्यासाठी या दुष्काळग्रस्त भागात त्वरित चारा छावण्या सुरु करण्याकरिता चव्हाण यांनी मुख्यमंत्र्यांना पत्राद्वारे कळवले आहे.

हेही वाचा 











Source link