Thursday, July 16, 2026
Home Blog Page 2833

सातारा : खांबाटकी बोगदा अडीच तास बंद; लोखंडी अँगल टेम्पोवर कोसळला | पुढारी

0









सातारा ; पुढारी वृत्‍तसेवा खांबाटकी बोगद्यात लाईटचा अँगल टेम्पो क्रमांक KA/44/A/0525 वर तुटून पडल्याने टेम्पो चालक व्यंकटेश रंगाप्पा (वय 38) राहणार बेंगलोर, कर्नाटक हा जखमी झाला. टेम्पो रस्त्याच्या मधोमध अडकल्याने बोगद्यातील वाहतूक ठप्प झाली. सकाळी साडेसहा वाजल्‍यापासून नऊ वाजेपर्यंत बोगदा मार्गे वाहतूक बंद झाली. यामुळे ही वाहतूक खंबाटकी घाटातून पुणे बाजुकडे वळवण्यात आली. त्यामुळे सुमारे तीन तास वाहतुकीची कोंडी झाली.

अपघातग्रस्त टेम्पोवर पडलेला अँगल व टेम्पो क्रेनच्या साह्याने बोगद्यातून बाहेर काढल्यानंतर सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास वाहतूक सुरळीतपणे चालू झाली. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस टॅबचे अधिकारी, कर्मचारी व खंडाळा पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सातारा बाजुकडून पुणे बाजुकडे जाणारी वाहतूक खांबाटकी घाटातून वळवण्यात आली. क्रेनच्या मदतीने टेम्पोच्या केबीनमध्ये अडकलेला अवजड अँगल बाजुला काढण्यात आला. अपघातग्रस्त टेम्पो बोगद्‍यातून बाहेर काढल्यानंतर वाहतूक बोगदामार्गे सुरु झाली.

खांबाटकी घाटातून पुण्याहून सातारा बाजुकडे जाणारी वाहतूक व विरुद्ध दिशेने येणारी (सातारा – पुणे) वाहतूक यामुळे खांबाटकी घाटात वाहतुकीची कोंडी झाली होती. त्यामुळे वाहतूक धीम्या गतीने सुरु होती. दोन्ही बाजूला सुमारे पाच ते सहा किलोमीटर अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. महामार्ग पोलीस एपीआय हर्षद गालींदे व त्यांचे सहकारी, खंडाळा पोलीस ठाण्याचे वाहतूक पोलीस फरांदे व हवालदार वरे यांनी वाहतूक सुरळीत केली.

हेही वाचा :  











Source link

Satara Accident : साताऱ्यातील खंबाटकी बोगद्यातील लाईटचा मोठा लोखंडी रॉड ट्रकवर कोसळला : ABP Majha

0



<p>साताऱ्यातील खंबाटकी बोगद्यातील लाईटचा मोठा लोखंडी रॉड ट्रकवर कोसळला, अपघातात कोणत्याही प्रकारची जीवितहानी नाही, खंबाटकी बोगद्यामध्ये &nbsp;काही काळासाठी वाहतूक विस्कळीत.&nbsp;</p>



Source link

TOP 90 : 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 16 ऑगस्ट 2023: ABP Majha

0
TOP 90 : 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 16 ऑगस्ट 2023: ABP Majha



<p>TOP 90 : 9 च्या 90 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 90 न्यूज : 16 ऑगस्ट 2023: ABP Majha</p>



Source link

Satara Earthquake : सातारा जिल्ह्यातील पाटण शहरासह काही गावांमध्ये भूकंपाचे धक्के : ABP Majha

0



<p>&nbsp;सातारा जिल्ह्यातील पाटण शहरासह काही गावांमध्ये भूकंपाचे धक्के, पहाटे 6.40 मिनिटांनी भूकंपाचा धक्का, मॉर्निग वॉक साठी बाहेर पडलेल्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण.&nbsp;</p>



Source link

Box Office Collection : १५ ऑगस्टला चाहत्यांची तुडुंब गर्दी, ‘जेलर’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

0
Box Office Collection : १५ ऑगस्टला चाहत्यांची तुडुंब गर्दी, ‘जेलर’चा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ


भारतीय चित्रपटसृष्टीसाठी १५ ऑगस्ट हा दिवस दरवर्षी खास ठरतो. या दिवशी प्रदर्शित होणारे चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई करतात. यावेळी दाक्षिणात्य सुपरस्टार अभिनेता रजनीकांतचा ‘जेलर’ हा चित्रपट स्वातंत्र्यदिनापूर्वीच प्रदर्शित झाला आहे. मात्र, १५ ऑगस्टला या चित्रपटाला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला.



Source link

Ricky Kej: ग्रॅमी पुरस्कार विजेत्या रिकी केजने भारताला दिलेले राष्ट्रगीताचे नवे व्हर्जन तुम्ही पाहिले का?

0
Ricky Kej: ग्रॅमी पुरस्कार विजेत्या रिकी केजने भारताला दिलेले राष्ट्रगीताचे नवे व्हर्जन तुम्ही पाहिले का?


रिकीने स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला जगातील भारतीयांसाठी ६० सेकंदाचा व्हिडीओ भेट म्हणून दिला आहे. त्याने हा व्हिडीओ लंडनमधील अतिशय प्रसिद्ध अॅबे रोड स्टुडीओमध्ये जगातील सर्वात मोठ्या सिम्फनी ऑर्केस्ट्राद्वारे रेकॉर्ड केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत रिकीने, “काही दिवसांपूर्वी, मी लंडनच्या प्रसिद्ध अॅबे रोड स्टुडिओमध्ये भारताचे राष्ट्रगीत सादर करण्यासाठी १०० जणांचा ब्रिटिश ऑर्केस्ट्रा, द रॉयल फिलहारमोनिक ऑर्केस्ट्रा आयोजित केला होता. भारताचे राष्ट्रगीत रेकॉर्ड करणारा हा सर्वात मोठा ऑर्केस्ट्रा होता. शेवटच्या ‘जय हे…’ ने माझ्या अंगावर अक्षरश: शहारे आले होते. भारतीय संगीतकार असल्याचा आनंद होतो. या स्वातंत्र्यदिनी मी हे ऐतिहासिक रेकॉर्डिंग तुम्हा सर्वांसोबत शेअर करत आहे. आदराने वापरा, शेअर करा आणि पहा. ते आता तुमचे आहे. जय हिंद. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा” या आशयाचे कॅप्शन दिले आहे.



Source link

कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; कोयना धरणापासून 20 किमी अंतरावर धक्के

0


कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यासह आज सांगली आणि सातारा जिल्ह्यात (earthquake tremors in Kolhapur Sangli Satara districts) आज (16 ऑगस्ट) सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. 3.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाला. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीपासून 5 किमी खाली होता. कोल्हापूरपासून 76 किमी अंतरावर चांदोली अभयारण्य परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले. आज (16 ऑगस्ट) सकाळी 6 वाजून 45 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले.

सातारा जिल्ह्यातील पाटण शहरासह लगतच्या गावांमध्ये भूकंपाचा धक्का

दरम्यान, सातारा जिल्ह्यातील पाटण शहरासह लगतच्या गावांमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. पहाटे 6.40 मिनिटांनी भूकंपाचा धक्का बसला. मॉर्निग वाॅकसाठी बाहेर पडलेल्या नागरिकांमध्ये त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले. कोयना धरणापासून 20 किलोमीटर अंतरावर भूकंप धक्के जाणवले असून धरण सुरक्षित आहे. भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी झालेली नाही. कोल्हापूर सातारासह सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील चांदोली अभयारण्य परिसरापासून 15 किमी परिसरात  भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. 3.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप सकाळी झाला. सकाळी 6 वाजून 55 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले.

गेल्या महिन्यात सिंधुदुर्गमध्ये भूकंपाचे धक्के 

दरम्यान, गेल्या महिन्यात सिंधुदुर्ग जिल्ह्यातही भूकंपाचे धक्के जाणवले होते. 29 जुलै रोजी सावंतवाडी तालुक्यात भूकंपाचे धक्के जाणवले होते. माडखोल, कलंबिस्त, सरमळे, ओटवणे, कारिवडे, कोनशी, भालावल, ओवळीये, धवडकी, विलवडे आदी गावांमध्ये मोठा आवाज होऊन सौम्य धक्के जाणवले आणि जमीनही हादरली होती. तीन वर्षांपूर्वी असाच काहीसा धक्का सावंतवाडी शहरासह परिसरात बसला होता. यावेळी माडखोलसह दाणोली, सातोळी, बावळट, अगदी बांद्यापर्यंत जमीन हादरल्याचे अनेकांकडून सांगण्यात आले होते. 

इतर महत्वाच्या बातम्या



Source link

Shilpa Shetty: चप्पल घालून ध्वजारोहण केल्यामुळे शिल्पा शेट्टी झाली ट्रोल

0
Shilpa Shetty: चप्पल घालून ध्वजारोहण केल्यामुळे शिल्पा शेट्टी झाली ट्रोल


एका यूजरने शिल्पाला ‘चप्पल काढून ध्वज फडकवला असता तर बरे झाले असते. का काढली नाही चप्पल’ असा प्रश्न विचारला. त्यावर शिल्पाने, ‘झेंडा फडकवतानाचे सर्व नियम मला माहित आहेत, माझ्या देशाचा आणि ध्वजाचा आदर माझ्या मनातून येतो, प्रश्न मांडण्यासाठी नाही. मी अभिमानास्पद भारतीय आहे. आजची पोस्ट त्या भावना शेअर करण्यासाठी होती. सर्व ट्रोलर्ससाठी ज्यांना मी सहसा दुर्लक्ष करते, मी या दिवशी दुर्लक्ष करू शकत नाही. त्यामुळे तुमचे तथ्य बरोबर करा’ असे म्हटले आहे.



Source link

Pune Bhatghar Dam : पर्यटनासाठी गेलेल्या बाप लेकीचा भाटघर धरणात बुडून मृत्यू; मुलीचा मृतदेह मिळाला तर वडील बेपत्ता

0
Pune Bhatghar Dam : पर्यटनासाठी गेलेल्या बाप लेकीचा भाटघर धरणात बुडून मृत्यू; मुलीचा मृतदेह मिळाला तर वडील बेपत्ता



father and daughter died in bhor bhatghar dam: स्वातंत्रदिनानिमित्त सुट्टी आल्याने कुटुंबासोबत पर्यटनासाठी गेलेल्या बाप लेकीचा भाटघर धरणात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना मंगळवारी घडली.



Source link

Mahesh Manjrekar: अभिनेता नाही तर ‘या’ क्षेत्रात करायचे होते महेश मांजरेकर यांना करिअर

0
Mahesh Manjrekar: अभिनेता नाही तर ‘या’ क्षेत्रात करायचे होते महेश मांजरेकर यांना करिअर


प्रसिद्ध अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक म्हणून महेश मांजरेकर ओळखले जातात. त्यांनी अभिनय आणि उत्तम दिगदर्शनाच्या जोरावर मराठीसह बॉलिवूडमध्येही स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण तुम्हाला माहिती आहे का महेश मांजरेकर यांना अभिनेता व्हायचे नव्हते. त्यांना एका वेगळ्या क्षेत्रात करिअर करायचे होते. आज १६ ऑगस्ट रोजी त्यांच्या वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याविषयी काही खास गोष्टी…



Source link