Tuesday, July 21, 2026
Home Blog Page 2777

Fukrey 3 Trailer: दिल्लीत भूकंप होणार; ‘फुकरे ३’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित

0
Fukrey 3 Trailer: दिल्लीत भूकंप होणार; ‘फुकरे ३’चा धमाकेदार ट्रेलर प्रदर्शित


बॉलिवूडमधील हिट चित्रपटांच्या यादीमधील एक चित्रपट म्हणजे ‘फुकरे.’ या चित्रपटाच्या दोन्ही भागांनी प्रेक्षकांची मने जिंकली होती. आता या चित्रपटाचा तिसरा भाग म्हणजेच ‘फुकरे ३’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या भागात पुलकित सम्राट, वरुण शर्मा, मनजोत सिंह, पंकज त्रिपाठी आणि ऋचा चड्ढा हे महत्त्वाच्या भूमिकेते दिसणार आहेत. आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सोशल मीडियावर चर्चेत आहे.



Source link

मोबाईल वापरत गाडी चालवणं दोन शाळकरी मुलांच्या जीवावर बेतलं…

0
मोबाईल वापरत गाडी चालवणं दोन शाळकरी मुलांच्या जीवावर बेतलं…


बारामती, पुणे : मोबाईल वापरत गाडी चालवणं (Accident) हे दोन शाळकरी मुलांच्या जीवावर बेतलं आहे. बारामतीमधील चोरमंडलम फायनान्समधे मॅनेजर पदावर असलेला धायगुडे नावाचा व्यक्ती मोबाईल पहात कार  चालवत होता.  मोबाईलच्या नादात त्याने शाळेत चाललेल्या तीन मुलांना उडवलं. त्यात दोन सख्खे भाऊ होते तर एक त्यांचा चुलतभाऊ होते. त्यातील दोघांचा मृत्यू झाला आहे तर एक गंभीर आहे. त्यामुळे आजच्या युगात मोबाईल वापरणे हे महत्त्वाचे असले तरी कधी मोबाईल वापरावा याची जाण असणं महत्वाचं आहे. 

मोबाईल वापरत गाडी चालवल्याने बारामती तालुक्यातील जळगाव कडेपठार येथील खांडेकर कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे. संतोष खांडेकर आणि ताई खांडेकर यांच्या डोळ्यातले पाणी कमी होत नाही. खांडेकर यांची दोन मुले आणि त्यांचा पुतण्या शाळेत जात असताना या तिघांना चारचाकीने धडक दिली. त्यात दोघांचा मृत्यू झाला तर एक दवाखान्यात उपचार घेत आहे. दोन्ही मुलांच्या अचानक जाण्याने खांडेकर कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी ओमकार (16 वर्ष), रुपेश (15 वर्ष) आणि संस्कार खांडेकर (13 वर्ष) हे तिघे भाऊ जळगाव सुपे येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश मीडियम स्कुल शाळेत निघाले असताना ही घटना घडली. यात रुपेश आणि ओमकार यांचा जागीच मृत्यू झाला आणि याच घटनेने खांडेकर  कुटुंबीयांचा आनंद हिरावून घेतला आहे. खांडेकर हे मोलमजुरी करून  पोट भारतात. गंभीर जखमी असलेल्या मुलावर उपचार करण्यारखी त्यांची आर्थिक स्थिती नाही. त्यामुळे त्यांना काहीतरी सरकारने मदत करावी अशी मागणी खांडेकर यांचे नातेवाईक करत आहेत.

आपल्या आजुबाजुला शिकले- सवरलेले अनेकजण मोबाईलचा वापर करत गाडी चालवताना आपण बघत असतो. कारण मोबाईल विकत घेण्याची ऐपत असली तरी तो कसा वापरायचा याची जाण वापरणाऱ्याला असतेच असं नाही. एका फायनान्स कंपनीत मॅनेजर पदावर असलेल्या व्यक्तीलाही ती नव्हती आणि त्यामुळे आख्खं खांडेकर कुटुंब उद्वस्थ झालं आहे. या दुर्दैवी घटनेनंतर तरी गाडी चालवताना मोबाईल वापर टाळायला हवा.

मोबाईलचा वापर अन् तरुणाई

सध्या सगळीकडेच मोबाईलचा वापर वाढला आहे. मोबाईलच्या वापराचे जेवढे फायदे आहेत तेवढे तोटेदेखील आहेत. मोबाईल बघत किंवा मोबाईलवर बोलत वाहन चालवू नये, असं लिहिलं असतं मात्र त्याकडे दुर्लक्ष करुन तरुण मुलं अनेकांच्या जीवाला धोका निर्माण करतात. आज दोघांचा या मोबाईल वापरामुळे जीव गेला आहे. मात्र हे थांबलं नाही तर याची संख्या वाढायला वेळ लागणार नाही.

 

 

 

 



Source link

Esha Deol: ईशा देओलचा अलिशान बंगला पाहिलात का? हेमा मालिनी-धर्मेंद्रच्या फोटोंनी आहे सजवलेला

0
Esha Deol: ईशा देओलचा अलिशान बंगला पाहिलात का? हेमा मालिनी-धर्मेंद्रच्या फोटोंनी आहे सजवलेला


ईशाचा वांद्रे येथे देखील एक बंगला आहे. ईशाने एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की ती कुटुंबातील इतर सदस्यांसोबत जुहूस्थित एका बंगल्यात राहाते. ईशाने घराचे इंटिरिअर करुन घेताना खूप काळजी घेतली आहे. तिच्या घरात डान्सची तालिम करण्यासाठी एक खोली आहे. तसेच लिविंग रुम देखील आहे. या भागात भगव्या आणि पिवळ्या रंगाचे फर्निचर करण्यात आले आहे. ईशाने व्हिडीओमध्ये खुलासा केला आहे की तिला आणि धर्मेंद्र यांना घरात वेगवेगळ्या वस्तू ठेवणे आवडते.



Source link

Khuni River Flood : अर्धा महाराष्ट्र कोरडा असताना यवतमाळमध्ये पूर, खुनी नदीत अडकला गावकरी

0
Khuni River Flood : अर्धा महाराष्ट्र कोरडा असताना यवतमाळमध्ये पूर, खुनी नदीत अडकला गावकरी


मराठवाडा, विदर्भ, कोकण, पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांमध्ये गेल्या महिन्याभरापासून पावसाने दडी मारली आहे. परिणामी पीकं करपण्यास सुरुवात झाली आहे. त्यानंतर आता महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे. त्यातच आता यवतमाळ जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंद व्यक्त केला जात आहे. खुनी नदीला आलेल्या पुरामुळं अनेक ठिकाणी नुकसान झाल्याची माहिती आहे. तसेच पुरामध्ये अडकलेल्या तरुणाला वाचवण्यात आल्याने लोकांनी प्रशासनाचे आभार मानले आहे.



Source link

Leopard on Set: लोकप्रिय मालिकेच्या सेटवर शिरला बिबट्या, टीमची उडाली तारांबळ!

0
Leopard on Set: लोकप्रिय मालिकेच्या सेटवर शिरला बिबट्या, टीमची उडाली तारांबळ!


यापूर्वी अभिनेता शोएब इब्राहिम महत्त्वाच्या भूमिकेत असणाऱ्या ‘अजूनी’ मालिकेच्या सेटवर बिबट्या दिसला होता. त्यानंतर जवळपास चार ते पाच दिवस मालिकेचे चित्रीकरण थांबवण्यात आले होते. त्यावेळी त्या बिबट्याने एका कुत्र्यावर हल्ला केला होता. त्यानंतर ‘गुम है किसी के प्यार में’, ‘नागिन 6’ आणि मराठी मालिका ‘सुख म्हणजे नक्की काय असते’ मालिकांच्या सेटवर देखील बिबट्या अढळला होता.



Source link

Jaane Jaan Trailer: करीना कपूर आणि विजय वर्माच्या ‘जाने जान’चा ट्रेलर प्रदर्शित

0
Jaane Jaan Trailer: करीना कपूर आणि विजय वर्माच्या ‘जाने जान’चा ट्रेलर प्रदर्शित



Kareena Kapoor Khan: ‘जाने जान’ हा चित्रपट एक मर्डर मिस्ट्री आहे. या चित्रपटात करीनासोबत अभिनेता विजय वर्मा महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. सध्या सोशल मीडियावर चित्रपटाचा ट्रेलर चर्चेत आहे.



Source link

Sunny Deol: सनी देओलचे होते अमृता सिंहसोबत अफेअर, पत्नीला कळताच….

0
Sunny Deol: सनी देओलचे होते अमृता सिंहसोबत अफेअर, पत्नीला कळताच….



Sunny Deol and Amrita Singh: सनी देओलने नुकताच एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने अभिनेत्री अमृता सिंहसोबतच्या अफेअरवर प्रतिक्रिया दिली.



Source link

Tharla Tar Mag: प्रियाच्या मनसुब्यामुळे सायलीला होणार का अर्जुनवरच्या प्रेमाची जाणीव? मालिकेत पुढे काय घडणार वाचा…

0
Tharla Tar Mag: प्रियाच्या मनसुब्यामुळे सायलीला होणार का अर्जुनवरच्या प्रेमाची जाणीव? मालिकेत पुढे काय घडणार वाचा…


सायली ही एका अनाथ आश्रमात लहानाची मोठी झाली आहे. मात्र, तिच्या याच आश्रमावर बिल्डरचा डोळा असतो. यातूनच या आश्रमात एक खून होतो. मात्र, या सगळ्या खुनाचा आरोप इथल्या मुलांचा सांभाळ करणाऱ्या मधु भाऊंवर लावला जातो. यानंतर पोलीस मधु भाऊंना पकडून घेऊन जातात. तर, आता मधु भाऊंना या संकटातून बाहेर काढण्यासाठी सायलीने अर्जुनची मदत मागितली होती. तर, अर्जुनने मधु भाऊंना यातून सुखरूप बाहेर काढण्यासाठी आणि मदत करण्यासाठी एक अट ठेवली. या अटीनुसार सायलीला अर्जुनशी लग्न करावे लागणार होते. मधु भाऊंना सोडवण्यासाठी सायलीने लग्न गाठ देखील बांधली.



Source link

Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण कसं मिळणार?

0
Maratha Reservation : मराठा समाजाला आरक्षण कसं मिळणार?


Maratha Reservation : मराठा आरक्षण प्रकरणात राज्य सरकार समोर संकटाचा डोंगर उभा राहिलाय. दरम्यान, मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिले म्हणजे ओबीसी आरक्षण लागू होईल, असा एक पर्याय समोर आलाय. उद्या तसा निर्णय सरकारने घेतला तरी तो न्यायालयाच्या कचाट्यात अडकण्याची शक्यता आहे. निजामाच्या माहिती आधारे किशोर चव्हाण यांनी २०१५ मध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली होती. मात्र ही मागणी तब्बल पाच दशकावून अधिक काळानंतर केली जात असल्याचे कारण देत आणि यांनी काही बाबी नमूद करत औरंगाबाद खंडपीठाने चव्हाणांची याचिका फेटाळली. म्हणजेच आता मराठा समाजाला कायद्यांच्या निकषांवर टिकणारं कायमस्वरुपी आरक्षण देण्याची जबाबदारी सरकारची आहे.



Source link

Kanadgaon Gram Sabha : पाणी प्रश्नावरून ग्रामसभेत तुफान राडा; गावकऱ्यांनी ग्रामसेवकांना धरलं धारेवर, पाहा VIDEO

0
Kanadgaon Gram Sabha : पाणी प्रश्नावरून ग्रामसभेत तुफान राडा; गावकऱ्यांनी ग्रामसेवकांना धरलं धारेवर, पाहा VIDEO


कानडगाव हे गोदावरी खोऱ्यातील पुनर्वसित गाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून गावातील मूलभूत प्रश्न सुटलेले नाहीत. दोन हजारांवर लोकसंख्या असलेल्या गावात अद्यापही एसटी बस येत नसल्याने ग्रामसभेत नागरिकांनी संताप व्यक्त करत तातडीने या समस्यांवर तोडगा काढण्याची मागणी केली आहे. याशिवाय गावातील ड्रेनेज, अंतर्गत रस्ते, मुख्य रस्ता, शेतरस्ते आणि वीजेच्या प्रश्नावरूनही ग्रामस्थांनी ग्रामसेवक, सरपंचांना खडेबोल सुनावले. पुनर्वसित गाव असल्याने विविध विकासकामं होण्यास वेळ लागतो, ग्रामपंचायतीच्या माध्यमातून आम्ही प्रत्येक समस्येवर मात करण्याचा प्रयत्न करत असल्याचं ग्रामसेवक विजय रावते यांनी म्हटलं आहे.



Source link