Wednesday, July 22, 2026
Home Blog Page 2759

Satara Pusesavali Dangal :साताऱ्यात घटनेनंतर काही वाहनं पेटवण्यात आली, तर प्रार्थनास्थळांचीही जाळपोळ

0



<p>&nbsp;साताऱ्याच्या पुसेसावळीमध्ये सोशल मीडियाच्या पोस्टवरुन दोन गट आपापसांत भिडले. या घटनेमध्ये दोघांचा मृत्यू झाला तर पंधराहून अधिकजण जखमी झाले आहेत. &nbsp;त्यामधल्या दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेनंतर काही वाहनं पेटवण्यात आली, तर प्रार्थनास्थळांचीही जाळपोळ करण्यात आली. हा तणाव निवळण्यासाठी आणि शांततेसाठी पुसेसावळी आणि आसपासच्या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी सातारा जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. पोलिसांनी या प्रकरणात १०० अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.&nbsp;</p>



Source link

Satara Pusesavali : सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी सध्या धुमसतेय, झालेल्या दंगलीत दोघांचा जीवही गेला

0



<p>पाचवीला पुजलेला दुष्काळ… तरीही घाम गाळत शेती करणारे शेतकरी… पिकेल त्यावर गुजरान करणारे ग्रामस्थ आणि आजूबाजूला धार्मिक स्थळांचं अध्यात्मिक वातावरण… सातारा जिल्ह्यातील हीच पुसेसावळी सध्या धुमसतेय… इथं झालेल्या दंगलीत दोघांचा जीवही गेलाय… आणि हे सगळं होण्यामागे काडी टाकलीय, सोशल मीडियावरील एका पोस्टने… पाहूयात… एक पोस्ट आणि संपूर्ण सातारा जिल्हाच कसा वेठीला धरला गेलाय.</p>



Source link

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील कुपोषित बालकांची धक्कादायक आकडेवारी, बालमृत्यूही वाढले

0
Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील कुपोषित बालकांची धक्कादायक आकडेवारी, बालमृत्यूही वाढले


नंदुरबार जिल्हा रुग्णालयातील सुविधा अपूर्ण आहेत तसेच अनेक पदे रिक्त आहेत. जिल्हा रुग्णालयात असलेल्या लहान मुलांच्या अतिदक्षता विभागात २० जागांची क्षमता असताना ८४ बालके उपचार घेत असल्याचा प्रकार आमदार पाडवी यांनी समोर आणला आहे. बालकांच्या अतिदक्षता विभागात एका पेटीत एक बालक ठेवलं जातं, मात्र तिथं चार ते पाच बालके अॅडमिट केले जात आहेत.जिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे आणि अपूर्ण सुविधा यामुळे जिल्ह्यातील बालमृत्यूचे प्रमाण वाढले असल्याचा आरोपही पाडवी यांनी केला आहे.



Source link

चंद्रपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यात सोयाबीन संकटात, पिकांना पिवळ्या मोझेक रोगाची लागण

0
चंद्रपूरसह विदर्भातील अनेक जिल्ह्यात सोयाबीन संकटात, पिकांना पिवळ्या मोझेक रोगाची लागण


चंद्रपूर : चंद्रपूरसह (Chandrapur) विदर्भातील (Vidarbha) अनेक जिल्ह्यात सध्या सोयाबीन (Soyabean) पिकावर पिवळ्या मोझेक रोगाचे संक्रमण झाल्याचं पाहायला मिळत आहे. आधी मुसळधार पाऊस त्यानंतर जवळपास दीड महिना पावसाची विश्रांती यामुळे आधीच शेतपिकं धोक्यात आली आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील  वरोरा आणि चिमूर तालुक्यात या रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचं दिसून आलं. याविषयी माहिती मिळताच  कृषी विभागाने तातडीने नियंत्रण पथकासह शेतशिवारांना भेटी दिल्या. हा विषाणूजन्य रोग असल्याचं यावेळी कृषी विभागाने माहिती दिली. तर सध्याचा काळ हा सोयाबिन पिकांचा वाढीचा असून या हा फुलोरा आणि शेंगाधरणीचा काळ आहे. त्यामुळे नेमकं याच कालावधी हा रोग फोफावत असल्यामुळे पिकांचे मोठं नुकसान होतंय. 

शेतकऱ्यांना काळजी घेण्याचे आवाहन

या पिवळ्या रोगाचे समूळ उच्चाटन करण्यासाठी रोगग्रस्त झाडे मुळातून उखडून जमिनीखाली पुरण्याचा उपाय सांगण्यात आला आहे. तसेच पिकांभोवती निळे किंवा पिवळे सापळे लावण्याचा उपाय देखील कृषी विभागाने सांगितला आहे. या रोगामुळे पिकांची उत्पादन क्षमता जवळपास  30 ते 90 टक्क्यांपर्यंत घटत असल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे शेतकऱ्यांनी काळजी घेण्याचं आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आलं आहे. तर शेतकऱ्यांकडून देखील या रोगाचा नायनाट करण्यासाठी योग्य काळजी घेतली जात असल्याचं सांगितलं जातंय. 

काय आहेत रोगाची लक्षणं?

पण आता या रोगांची लागण पिकांना कशी झाली हे ओळखणं कठीण होऊ शकतं. अशावेळी सोयाबीनच्या पानांच्या मुख्य शिरा तपासाव्यात. जर या पानांच्या मुख्य शिरांवर पिवळ्या रंगाचे किंवा अनियमित चट्टे दिसले तर पिकांना या रोगाची लागण झालेली असून शकते. तसेच पानं जशी परिपक्व होत जातात तसं त्यावर तांबूस रंगाचे चट्टे दिसतात. जर या रोगाचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाला असेल तर सोयाबिनची पानं ही अरुंद होत जातात. पिकाच्या सुरुवातीलाच जर हा रोग झाला तर अशावेळी झाडं पूर्णपणे पिवळी पडतात. त्यामुळे अशा झाडांना कमी शेंगा येतात. 

चंद्रपूर जिल्ह्यात शेतकरी  धान आणि सोयाबीन पिकांमुळे आपला प्रपंच कसाबसा चालवतो. पण जर सोयाबिनसारख्या नगदी पिकांवरच अशा रोगांचा प्रादुर्भाव झाला तर काय करायचं असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. तसेच यामुळे आर्थिक परिस्थिती बिघडण्याची भिती देखील शेतकऱ्यांना वाटू लागलीये. त्यामुळेच या रोगावर वेळीच नियंत्रण मिळवणे महत्त्वाचे असल्याचं सांगण्यात येत आहे. 

हेही वाचा : 

Agriculture News : सोयाबीनच्या अग्रीम पीक विम्याचा प्रश्न मार्गी, बीड जिल्ह्यातील सर्व 86 मंडळांना 25 टक्के पीक विमा लागू



Source link

Pushpa The Rule: चित्रपटाचा मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’

0
Pushpa The Rule: चित्रपटाचा मुहूर्त ठरला! ‘या’ दिवशी प्रेक्षकांच्या भेटीला येणार अल्लू अर्जुनचा ‘पुष्पा २’


Pushpa 2 Release Date: गेल्या काही महिन्यांपासून चाहते आतुरतेने वाट बघत असलेल्या अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा २’ या चित्रपटाची रिलीज डेट अखेर जाहीर करण्यात आली आहे.



Source link

OTT Release: घरबसल्या बघता येणार रणवीर सिंहचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’; पण ‘ही’ अट ऐकलीत का?

0
OTT Release: घरबसल्या बघता येणार रणवीर सिंहचा ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’; पण ‘ही’ अट ऐकलीत का?


‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ हा चित्रपट प्राईम व्हिडीओवर स्ट्रीम होत आहे. परंतु, सध्या हा चित्रपट ‘रेंट’ अर्थात एक रक्कम भरून पाहू शकणार आहेत. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षकांना ३४९ रुपये मोजावे लागणार आहेत. जर, तुम्ही ही रक्कम भरून चित्रपट रेंटने घेतला, तर तुम्हाला हा चित्रपट घरबसल्या बघायला मिळणार आहे. मात्र, जर काही दिवसांनी हा चित्रपट ओटीटीवर मोफत पाहता येणार आहे. म्हणजेच तुमच्याकडे प्राईम व्हिडीओचे सबस्क्रिप्शन असल्यास, तुम्ही कोणतेही अतिरिक्त शुल्क न भरता हा चित्रपट पाहू शकता. मात्र, त्यासाठी काही दिवस वाट बघावी लागणार आहे.



Source link

Bollywood Nostalgia: अधुरीच राहिली दिलीप कुमार-मधुबाला यांची प्रेमकहाणी! ‘या’ व्यक्तीमुळे आलेला दुरावा

0
Bollywood Nostalgia: अधुरीच राहिली दिलीप कुमार-मधुबाला यांची प्रेमकहाणी! ‘या’ व्यक्तीमुळे आलेला दुरावा


दिलीप कुमार यांना मधुबाला यांच्याशी लग्न करायचे होते. पण, मधुबाला यांनी त्यांच्या वडिलांसोबतचे सगळे संबंध तोडावे अशी त्यांची इच्छा होती. ‘नया दौर’ चित्रपटातून मधुबाला यांना काढून टाकल्यानंतर मधुबाला यांचे वडील अताउल्ला यांनी बीआर चोप्रा यांच्याविरोधात खटला दाखल केला होता. याला प्रत्युत्तर म्हणून बीआर चोप्रा यांनीही कायद्याची मदत घेतली होती. त्यावेळी दिलीप कुमार यांनी कोर्टासमोर मधुबालावरचे प्रेम व्यक्त केले होते आणि त्यांचे तिच्यावर किती प्रेम आहे, हे सर्वांना मनोभावे सांगितले होते. मात्र, या कोर्ट केसनंतर त्यांचे नाते तुटले. दिलीप कुमार यांनीच मधुबालाला साथ दिली नाही, असे म्हटले जाते. यानंतर ‘मुगल-ए-आझम’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान दोघेही एकमेकांसाठी अनोळखी असल्यासारखे वागत होते.



Source link

Vasai Virar water issue : वसई, विरारकरांच्या पाण्यासाठी एमएमआरडीएवर धडकली ठाकरेंची शिवसेना

0
Vasai Virar water issue : वसई, विरारकरांच्या पाण्यासाठी एमएमआरडीएवर धडकली ठाकरेंची शिवसेना


Shiv Sena UBT Morcha on MMRDA : मुंबईला लागून असलेल्या वसई, विरारमधील नागरिकांना अजूनही पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. वसई, विरारकरांच्या या त्रासाकडं लक्ष वेधण्यासाठी ठाकरे यांच्या शिवसेनेनं आज एमएमआरडीएवर विशाल मोर्चा काढला. वसई, विरारकरांच्या हक्काचं पाणी दिवाळीपर्यंत आलंच पाहिजे, अशी आग्रही मागणी या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात आली.



Source link

Tharla Tar Mag: अर्जुनला लागलीये सायलीची ओढ; ‘ठरलं तर मग’ मालिकेत येणार प्रेमाचा बहर!

0
Tharla Tar Mag: अर्जुनला लागलीये सायलीची ओढ; ‘ठरलं तर मग’ मालिकेत येणार प्रेमाचा बहर!


सुभेदारांच्या घरात सध्या कृष्ण जन्माष्टमीचा उत्सव सुरू आहे. मात्र, या दरम्यान घरात सायली दिसलेली नाही. घरातील वादांमुळे सायलीला घरातून थेट बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. सायली जरी सुभेदारांच्या घरापासून दूर असली, तरी मनाने मात्र ती घरातच रमली आहे. घरातील कृष्ण पूजेत कुणालाच पाळणा गाता न आल्याने अर्जुनने थेट सायलीला व्हिडीओ कॉल केला. यानंतर सायलीने व्हिडीओ कॉलवरून बाळकृष्णाचा पाळणा म्हटला. यानंतर आता मालिकेच्या विशेष भागात दहीहंडीची धूम पाहायला मिळणार आहे. या दरम्यान अर्जुन आणि सायलीमध्ये प्रेम फुलताना दिसणार आहे.



Source link

Satara: औंध पुसेसावळी गावात दोन गट आपापसांत भिडले

0



<p>Satara: औंध पुसेसावळी गावात दोन गट आपापसांत भिडले</p>



Source link