Wednesday, July 22, 2026
Home Blog Page 2758

Zilla Parishad Recruitment: जिल्हा परिषद भरतीसाठी ९ वर्षांपूर्वी भरलेली फी परत मिळणार; असा करा अर्ज

0
Zilla Parishad Recruitment: जिल्हा परिषद भरतीसाठी ९ वर्षांपूर्वी भरलेली फी परत मिळणार; असा करा अर्ज

दरम्यान, जिल्हा परिषद भरती २०२३ साठी देखील मोठ्या प्रमाणात उमेदवारांनी अर्ज केला आहे. राज्यात उमेदवारांनी पसंती दिली आहे ती पुणे जिल्हा परिषदेच्या भरतीला, २१ हजारांहून अधिक अर्ज विविध सवर्गातील पदासाठी आले आहेत. यातुन जिल्हा परिषदेला पाच कोटीहून अधिक नफा झाला आहे.

Source link

Amravati news : आमदार रवी राणांवर चाकू हल्ल्याचा प्रयत्न, ८ ते १० शिवसैनिक ताब्यात!

0
Amravati news : आमदार रवी राणांवर चाकू हल्ल्याचा प्रयत्न, ८ ते १० शिवसैनिक ताब्यात!

अमरावती जिल्ह्यातील बडनेराचे आमदार रवी राणा यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचे सांगण्यात येत आहे. अंजनगाव सुर्जी येथे ही घटना घडली. दहीहंडीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची पाहणी करत असताना त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला. राणा यांचे माध्यम समन्वयकांनी या घटनेला दुजोरा दिला आहे. काही शिवसैनिकांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, ठाकरे गटाच्या सुनील खराडे यांनी हे सर्व आरोप फेटाळले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी रविवारी अमरावती शहरात दहीहंडी स्पर्धा आयोजित केली होती. त्यानंतर सोमवारी दुपारच्या सुमारास ते दर्यापूर येथील कावड यात्रेत सहभागी झाले होते. सायंकाळीच्या सुमारास अंजनगाव सुर्जी तालुक्यात त्यांनी दहीहंडी स्पर्धेचे आयोजन केले होते. युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने आयोजित या दहीहंडी स्पर्धेत आमदार रवी राणा, खासदार नवनीत राणा, अभिनेत्री अमिषा पटेल, चंकी पांडे यांच्यासह अनेक महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.

Source link

Maharashtra Live Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर…

0
Maharashtra Live Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर…

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये…

केंद्र सरकारकडून संसदेचे पाच दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्यात आले आहे. मोदी सरकारच्या या निर्णयानंतर अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. विशेष म्हणजे 18 ते 22 सप्टेंबर या काळात केंद्र सरकारने संसदेचे हे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या अधिवेशनात 5 सत्र होणार आहेत.केंद्र सरकारने बोलावलेल्या विशेष अधिवेशनात सरकार एक देश, एक निवडणूक विधेयक आणू शकते अशी माहिती राजकीय वर्तुळात रंगली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून वन नेशन वन इलेक्शन यावर चर्चा सुरू आहे. सरकार हे विधेयक मंजूर करण्याच्या मानसिकतेत आहे, तर राजकीय पक्ष त्याचा विरोध करत आहेत.

राज्यात आता अमंली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची स्थापना

महाराष्ट्र राज्यात अमंली पदार्थांची विक्री, तस्करी आणि सेवन करण्याचे प्रमाण वाढत असल्याने ड्रग्जला रोखण्यासाठी राज्यात आता अमंली पदार्थ विरोधी टास्क फोर्सची स्थापना करण्यास मान्यता देण्यात आली आहे.पोलीस महासंचालकांचे मार्गदर्शन आणि गुन्हे अन्वेषण विभागाच्या अपर पोलीस महासंचालकांच्या नियंत्रण याचा देखरेखीखाली विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या अधिपत्याखाली ही टास्क फोर्स काम करेल

इंडिया आघाडीच्या बैठकीचा आज दुसरा दिवस

मुंबई मध्ये सुरू असलेल्या इंडिया आघाडीचा आज दुसरा आणि महत्वाचा दिवस आहे.या बैठकीसाठी 28 पक्षांचे 63 प्रतिनिधी म्हणजे नेते मुंबईत उपस्थित आहेत. इंडिया आघाडीतील विविध पक्षांच्या प्रतिनिधींचा ग्रुप फोटोसेशन.. सकाळी 10 ते दुपारी 2 वाजेपर्यंत इंडिया आघाडीतील सर्व पक्षातील प्रतिनिधींची महत्त्वाची बैठक

महायुतीच्या बैठकीचा दुसरा दिवस

महायुतीच्या आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांच्या बैठकीचा आज दुसरा दिवस आहे.सकाळी 9 वाजता, एनएससीआय येथे विभागवार बैठकीतून लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यावेळी महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करतील.

आजपासून मुंबईत दुधाला प्रतिलिटर दोन रुपये जास्तीचे

आजपासून मुंबईत दुधाला प्रतिलिटर दोन रुपये जास्तीचे मोजावे लागणार आहेत. मुंबई दूध उत्पादक संघाने म्हशीच्या दुधाच्या दरात एकाच वेळी दोन रुपयांनी वाढ केली आहे. आजपासून नवीन दर लागू होतील. 85 रुपयांऐवजी आता 87 रुपये लिटरने दूध मिळणार आहे. चारा आणि जनावरांच्या चाऱ्याच्या दरात 20 टक्के वाढ झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.

आजपासून सर्वसामान्यांच्या आयुष्यावर परिणाम करणारे काही महत्वाचे बदल

देशातील ऑईल आणि गॅस वितरण कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या दिवशी गॅसच्या किमतींत बदल करतात. अशा परिस्थितीत 1 सप्टेंबरपासून LPG सिलेंडर्सच्या किमतींमध्ये बदल पाहायला मिळणार आहे.तेल कंपन्या दर महिन्याच्या पहिल्या तारखेला हवाई इंधनाच्या (ATF) किमती बदल करतात, त्यामुळे यावेळेस सप्टेंबरच्या पहिल्या तारखेलाही CNG-PNG च्या दरांत बदल केला जाऊ शकतो.

उपराष्ट्रपती जगदीप धनखर आज मुंबई दौऱ्यावर

उपराष्ट्रपती जगदीप धनखर आज मुंबई दौऱ्यावर आहेत. सकाळी 10 वाजता माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड (MDL) येथे बांधण्यात येत असलेल्या ‘महेंद्रगिरी’ या युद्धनौकेच्या कार्यान्वित समारंभाला उपस्थित रहाणार आहेत. ‘महेंद्रगिरी’ ही MDL ने बांधलेली चौथी युद्धनौका आणि भारतीय नौदलाच्या प्रोजेक्ट 17A अंतर्गत सातवी स्टेल्थ फ्रिगेट आहे.

Source link

डेंग्यूचा धोका वाढला…! नवी मुंबईत १७ वर्षीय मुलीचा मृत्यूने खळबळ

0
डेंग्यूचा धोका वाढला…! नवी मुंबईत १७ वर्षीय मुलीचा मृत्यूने खळबळ

Navi Mumbai : कामोठे परिसरात एका १७ वर्षीय मुलीचा डेंग्युने मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामुळे परिसरात खळबळ माजली असून पालिका यंत्रणाही सतर्क झाली आहे.

Source link

आमदार रवी राणा यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न; हल्लेखोर ठाकरे गटाचा असल्याचा राणांचा दावा

0
आमदार रवी राणा यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न; हल्लेखोर ठाकरे गटाचा असल्याचा राणांचा दावा

अमरावती : आमदार रवी राणा यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला असून या प्रकरणी पोलिसांनी महेंद्र दिपटे या व्यक्तीला ताब्यात घेतलं आहे. हल्ला करणारा व्यक्ती हा ठाकरे गटाचा असल्याचा आरोप रवी राणा यांनी केला आहे. आमदार रवी राणा हे दहीहंडीचा कार्यक्रम संपवून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी गेले असताना महेंद्र दिपटे यांनी राणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला.अंजनगाव सुर्जी पोलिसांनी हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्याला ताब्यात घेतलं आहे.

आमदार रवी राणा हे सोमवारी दुपारी युवा स्वाभिमान पार्टीच्या दहीहंडीच्या कार्यक्रमात गेले होते. दहीहंडीचा कार्यक्रम संपल्यावर सायंकाळी रवी राणा हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची पाहणी करण्यासाठी गेले. त्यावेळी अचानक एक व्यक्ती त्यांच्यासमोर येऊन त्याने रवी राणा यांच्या अंगावर जाण्याचा प्रयत्न केला. रवी राणा यांच्यावर हल्ला करणाऱ्याचं नाव महेंद्र दिपटे असून तो शिवसेना ठाकरे गटाचा माजी तालुका प्रमुख असल्याची माहिती समोर येत आहे.

यावेळी रवी राणा यांच्या कार्यकर्त्यांनी अंगावर येणाऱ्या व्यक्तीला पकडून चांगलाच चोप दिला आणि पोलिसांच्या हवाली केले. अंजनगाव सुर्जी पोलीसांनी त्याला ताब्यात घेतले असून पुढील कारवाई सुरू आहे.  हल्ला करणारा व्यक्ती ठाकरे गटाचा असल्याचा आरोप रवी राणा यांनी केला असून चाकूने हल्ला करण्याचा प्रयत्न केला असल्याचा ही दावा रवी राणा यांनी केला आहे.

गेल्या वर्षी 25 सप्टेंबर 2022 ला हिंगोलीचे आमदार संतोष बांगर हे अंजनगाव सुर्जीला आले असता तेव्हा बांगर यांच्या वाहनावर ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी हल्ला केला होता. त्यात महेंद्र दिपटे याचाही समावेश होता.

नवनीत राणांना धमकी देणारा तरूण गजाआड

काही दिवसांपूर्वीच खासदार नवनीत राणा यांना धमकी देणाऱ्या तरूणाला पोलिसांनी अटक केली होती. अमरावतीच्या नेरपिंगळाई भागातून त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलं होतं. श्याम तायवाडे असं त्याचं नाव आहे. या व्यक्तीने खासदार नवनीत राणा यांना धमकी देत शिवीगाळ केली होती.

श्याम तायवाडे या तरूणाने खासदार नवनीत राणा यांना कॉल करून धमकी दिली. त्यामध्ये त्याने तिवसामधून बोलत असल्याचं सांगितलं. तू गर्दीच्या ठिकाणी जातेस, त्या ठिकाणी तुझ्यावर कधी धारधार चाकूने वार करणार ते तुला माहितीही पडणार नाही असं त्याने म्हटलं. तसेच या तरूणाने खासदार नवनीत राणा यांच्याबद्दल अश्लील उद्गार काढत शिवीगाळ केली होती.

ही बातमी वाचा:

Source link

Maratha Reservation: मुख्यमंत्री शिंदेंनी जरांगे पाटलांना दिली ऑफर; यावर जरांगे पाटलांचं उत्तर आलं

0
Maratha Reservation: मुख्यमंत्री शिंदेंनी जरांगे पाटलांना दिली ऑफर; यावर जरांगे पाटलांचं उत्तर आलं

Maratha Reservation- जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घ्यावं अशी विनंती या सर्वपक्षीय बैठकीच्या माध्यमातून करण्यात आली आहे. परंतु अशा कोणत्याही सरकारी समितीचं सदस्यत्व स्वीकारण्यास मनोज जरांगे पाटील यांनी थेट नकार दिला आहे.

Source link

Nagarjuna Wife: नागार्जुनची दुसरी पत्नी आमलाकडे किती आहे संपत्ती?

0
Nagarjuna Wife: नागार्जुनची दुसरी पत्नी आमलाकडे किती आहे संपत्ती?

१९८७ साली आमलाने पुष्पका विमाना या तेलुगू चित्रपटात काम केले. त्यानंतर ती याच चित्रपटाच्या कन्नड रिमेकमध्ये दिसली. १९८८ साली आमलाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिने दयावान या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारली. १९९१ साली तिने मल्याळम सिनेमा ‘इथे सूर्या पूथ्रिक्कू’मध्ये काम केले. त्यानंतर २०१० साली ती छोट्या पडद्यावरील सुपर मॉम या कार्यक्रमात दिसली. आज आमलाकडे घर, बंगला, गाड्या आहेत. तिच्याकडे ४१ कोटी रुपयांची संपत्ती आहे.

Source link

सातारा : खटाव तालुक्यात इंस्टाग्रामवरील आक्षेपार्ह पोस्टमुळे तणाव; दोन स्वतंत्र गुन्हे दाखल

0

सातारा : सातारा जिल्ह्यातील (Satara News) खटाव तालुक्यातील पुसेसावळीमध्ये इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह पोस्टवरून तणाव निर्माण झाल्याने रविवारी जाळपोळ झाल्याची घटना घडली. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या प्रकरणात सातारा पोलिसांकडून दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान, कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी औंध विश्रामगृहात घडलेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकरी जितेंद्र डुडी आणि जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख उपस्थित होते.

तणाव निवळण्यासाठी आणि शांततेसाठी पुसेसावळी आणि आसपासच्या परिसरात जमावबंदी लागू करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी सातारा जिल्ह्यात इंटरनेट सेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलिसांनी या प्रकरणात १०० अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

औंध पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल

यावेळी फुलारी यांनी पुसेसावळी घटनेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये. सोशल मीडियावर कोणतीही चूकीची पोस्ट न करता सामाजिक सलोखा व शांतता राखावी आणि पोलीस व प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन केले. दरम्यान, औंध पोलिस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आक्षेपार्ह मजकुराच्या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक वाळवेकर करत आहेत.घटनेतील खुनाच्या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखेकडून करण्यात येत आहे. गुन्ह्याच्या तपासात आतापर्यंत 23 आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याचे सुनील फुलारी यांनी सांगितले.

नेमका प्रसंग काय घडला?

औंध पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी 10 सप्टेंबर रोजी इन्स्टाग्रामवर पोस्टवर दोन मुलांच्या अकाऊंटवरून आक्षेपार्ह कमेंट करण्यात आल्याचे निदर्शनास आले होते. त्या अनुषंगाने संबंधित दोन्ही मुलांकडे विचारपूस करण्यात येत असतानाच्या काळात सदर आक्षेपार्ह कमेंटला दुसऱ्या गटाकडून आक्रमक प्रतिक्रिया देण्यात आल्यानंतर तणाव निर्माण झाला. रात्री साडे नऊच्या सुमारास जमलेल्या जमावाकडून दुचाकी व चार चाकी वाहने पेटवून देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमावस पांगवले होते. यावेळी अतिरिक्त   कुमक मागवण्यात आली होती. सदर मारहाणीमध्ये एकूण दहा व्यक्ती जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. त्या सर्वांची प्रकृती चांगली असून दोघांचा मृत्यू झाला आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

Source link

एसटी कर्मचारी बॅंकेच्या संचालक मंडळाविरोधात बॅंक कर्मचाऱ्यांचे आंदोलन

0
एसटी कर्मचारी बॅंकेच्या संचालक मंडळाविरोधात बॅंक कर्मचाऱ्यांचे आंदोलन

मुंबई : गुणरत्न सदावर्तेंच्या संघटनेच्या स्टेट ट्रान्सपोर्ट को-आॅपरेटिव्ह बॅंकेच्या संचालक मंडळाविरोधात बॅंक कर्मचाऱ्यांनी आंदोलन पुकारले आहे. मागील सात दिवसांपासून एसटी महामंडळाच्या कर्मचाऱ्यांची बँक (ST Workers Bank) असलेल्या स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बॅंकेच्या कर्मचाऱ्यांकडून आंदोलन सुरू आहे. कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनाची तीव्रता वाढल्याने मागील 3 ते 4  दिवसांपासून स्टेट ट्रान्सपोर्ट को-आॅप बॅंकेचे कामकाज ठप्प झाले आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून एसटी बॅंकेचे कर्मचारी मुंबईत दाखल झाले.

शिवसेना शिंदे गटात सामिल झालेले आनंदराव अडसूळ यांच्या नेतृत्वातील को-आॅपरेटिव्ह बॅंक एम्प्लाॅईज युनियन या संघटनेचे वर्चस्व आहे. स्टेट ट्रान्सपोर्ट को-आॅप बॅंक एम्प्लाॅईज युनियनचे 250 बॅंक कर्मचारी दादरमधल्या आनंदराव अडसूळ यांच्या कार्यालयात दाखल झाले. या कर्मचाऱ्यांनी अडसूळ यांच्यासमोर आपले गाऱ्हाणे मांडले.

बँक कर्मचाऱ्यांचे आंदोलन का?

सदावर्तेंच्या संघटनेचे वर्चस्व असलेल्या एसटी बॅंकेच्या संचालक मंडळाविरोधात कर्मचारी एकवटले आहेत. संचालक मंडळाकडून घेतलेले चुकीचे आर्थिक निर्णय, कर्मचाऱ्यांची सुरु असलेली छळवणुकीमुळे बॅंक कर्मचाऱ्यांमध्ये नाराजी असल्याचे कर्मचाऱ्यांनी म्हटले. सदावर्तेंच्या यांच्या संघटनेच्या संचालक मंडळाने व्याजदर 7.50 टक्के इतके खाली आणल्यानंतर आरबीआयकडून यासंदर्भात बॅंकेकडून स्पष्टीकरण  मागवले आहेत. त्यासोबतच सहकार आयुक्तांकडे देखील यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

संचालक मंडळाकडून बॅंक डबघाईस आणण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप काही सभासदांकडून करण्यात आला होता. त्या भीतीपोटी काही सभासदांकडून ठेवी काढण्यास सुरुवात करण्यात आली होती. जवळपास 150 कोटी रुपयांच्या ठेवी काढण्यात आल्याची माहिती आहे.

एसटी कर्मचारी बँक महत्त्वाची का?

स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेत जवळपास दोन हजार 300 कोटी रुपयांच्या ठेवी आहेत. सर्वच एसटी महामंडळातील कर्मचारी ह्या स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बॅंकेचे सभासद आहेत. स्टेट बॅंक ऑफ इंडियासोबतच काही
कर्मचाऱ्यांचे पगार एसटी बॅंकेतून होतात. एसटी महामंडळाच्या आजी-माजी एसटी कर्मचाऱ्यांच्या आयुष्यभराच्या ठेवी स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बॅंकेत आहेत.

स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बँकेत 2023 आधी मान्यता प्राप्त एसटी कामगार संघटनेचे वर्चस्व होते. मात्र, सदावर्ते यांच्या संघटनेच्या पॅनलचे दोन महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत संपूर्ण संचालक मंडळ निवडून आलं. एसटी कर्मचारी संघटनेत जवळपास सर्वच राजकीय पक्षांच्या संघटना आहेत. सहकार क्षेत्रातील महत्त्वाच्या बॅंकांपैकी स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑपरेटिव्ह बॅंक ही मोठी बॅंक आहे.  एसटी कर्मचाऱ्यांवर थेट प्रभावही या बँकेच्या माध्यमातून टाकता येतो.

ST Bank Worker Protest: मुंबई सेंट्रलच्या मुख्य कार्यालयावर एसटी बँक कर्मचाऱ्यांचा मोर्चा

Source link

Milind Gunaji Son: मिलिंद गुणाजीचा मुलगा सध्या काय करतो?

0
Milind Gunaji Son: मिलिंद गुणाजीचा मुलगा सध्या काय करतो?

दिग्दर्शक म्हणून ‘रावण कॉलिंग’ हा त्याचा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमित राज ठाकरे यांनी चित्रपटाच्या मुहूर्ताचा पहिला क्लॅप दिला.‘रावण कॅालिंग’मध्ये सचित पाटील, पूजा सावंत, वंदना गुप्ते, गौरव घाटणेकर, रवी काळे, बिपीन नाडकर्णी राजू शिसाटकर आणि सोनाली कुलकर्णी, मिलिंद गुणाजी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सध्या तरी हा चित्रपट कशावर आधारित आहे, याबाबत गोपनीयता असली तरी लवकरच या गोष्टी उलगडतील. या चित्रपटाच्या निमित्ताने नामवंत अभिनेते मिलिंद गुणाजी यांचा मुलगा अभिषेक गुणाजी दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहे.

Source link