Wednesday, July 22, 2026
Home Blog Page 2757

Nava Gadi Nava Rajya: हतबल झालेला राघव अखेर मोठा निर्णय घेणार! ‘नवा गडी नवं राज्य’मध्ये पुढे काय घडणार?

0
Nava Gadi Nava Rajya: हतबल झालेला राघव अखेर मोठा निर्णय घेणार! ‘नवा गडी नवं राज्य’मध्ये पुढे काय घडणार?


राघव आणि आनंदी यांच्या सुखी संसाराला नुकतीच सुरुवात झाली होती. मात्र, त्यांच्या या संसाराला आधीच कुणाची तरी वाईट नजर लागली आहे. राघव आता एका मोठ्या संकटात अडकला आहे. राघव ज्या ऑफिसमध्ये काम करत होता, त्याच ऑफिसमध्ये काम करणारी एक मुलगी योजना हिने राघववर अनेक गंभीर आरोप लावले. राघवच्या ऑफिसमध्ये नव्यानेच रुजू झालेली योजना नावाची ही मुलगी राघवचा बदल घेण्यासाठी त्यांच्या आयुष्यात आली आहे. मात्र, राघवला याची तसूभरही कल्पना नव्हती. घरापासून दूर राहणाऱ्या योजनाला राघवने आपली लहान बहीण मानले होते. अगदी लहान बहिणीप्रमाणे त्याने योजनाची मदत केली होती.



Source link

Pusesavali Dangal : एकोप्याने राहणारी पुसेसावळी क्षणार्धात भयभीत; अख्ख्या गावाने रात्र काढली जागून | पुढारी

0









– विलास आपटे, पुसेसावळी

रविवार रात्री आठ ते नऊची वेळ. येथील दत्त चौकात अचानकपणे दंग्याचा आवाज…. ज्यूसचा गाडा रस्त्यावर… युवकांची धावपळ… आणि पुढचा काही काळ तणावाचा … दगडफेकीचा आणि गाड्या जाळपोळीतला… रस्त्यावर युवकांची धावपळ आणि ग्रामस्थांची घरे बंद… कोण कोठे जातो, काय करतो कोणाला समजायच्या आत हिंदू-मुस्लिम ऐक्याने राहणारी पुसेसावळी क्षणार्धात भयभीत व गर्भगळीत झाली. पुसेसावळीच्या ऐक्याला कोणाची तर नजर लागली… अशा विचारात सार्‍या गावाने रात्र जागून काढली.

गेल्या काही दिवसांपूर्वी पुसेसावळी येथे देवदेवतांच्याबद्दल आक्षेपार्ह पोस्ट केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर मोर्चा निघाला. पुसेसावळीतल्या जनतेला मात्र या घटनेचा धक्का बसला. या धक्क्यातून पुसेसावळीकर सावरतात न सावरतात तोच रविवारच्या सोशल मीडियावरच्या आक्षेपार्ह पोस्टमुळे पुन्हा एकदा पुसेसावळीकर हतबल झाले. रात्रीच्या वेळी अचानकपणे सुरू झालेला गोंधळ पाहून सगळे अचंबीत होऊन गेले होते. जमावाकडून वाहनांची जाळपोळ होत होती. तेव्हा एक गट भयभित झाला होता. सदरची घटना घडण्यापूर्वी अनेक दिवस पुसेसावळीत धुसपूस चालल्याची चर्चा होत होती. या ना त्या कोणत्याही कारणास्तव जणू एकमेकांना पाण्यातच पाहिले जात होते, असे काही दृश्य यावेळी दिसत होते. अधिक मास पारायण सोहळ्याच्या वेळी एक समाज दुसर्‍या समाजाच्या बांधवांच्या कार्यक्रमात सेवा करत होते. त्याच बांधवांकडून असा प्रकार घडेल का? सर्व समाज ऐक्यानं नांदणारे गाव या थरापर्यंत जाईल का? या विचारात पुसेसावळीकरांची रात्र कधी उजडली हे त्यांना कळलेच नाही. दिवस उजाडताच दिसला तो पोलिस बंदोबस्त.

पोलिस आपले कर्तव्य पार पडत होते. रस्त्यावर चिटपाखरुही फिरत नसल्याने घडलेल्या घटनेची दहशत प्रत्येकाच्या मनात घर करून बसली होती. पोलिस अधिकारी व कर्मचारी आपले कामचोखपणे बजावत होते. या घटनेत दुर्दैवाने बळी गेलेला नुरहसन हा मात्र नेहमी मराठी युवकांच्यात वावरणारा होता. तोच या घडलेल्या घटनेत हकनाक बळी पडला. याचे सर्वांना आश्चर्य वाटून राहिले. सोमवारी दिवसभर असलेली शांततादोन समाजाच्या ऐक्याला छेद तर देऊन गेली नाही ना? असा प्रश्न ग्रामस्थांच्या मनात अनुत्तरीतच राहून गेला.

 











Source link

Pusesavali Dangal : इंटरनेट सेवा बंद; ऑनलाईन व्यवहार ठप्प | पुढारी

0


सातारा; पुढारी वृत्तसेवा : जिल्ह्यातील पुसेसावळी, ता. खटाव येथे सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्टमुळे उद्भवलेल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील इंटरनेट सेवा तास बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे शासकीय, निमसरकारी, खासगी कार्यालयांसह बँकांचे दिवसभराचे कामकाज कोलमडून गेले. बँकांचे ऑनलाईन व्यवहारही ठप्प झाले. दरम्यान, 72 तास इंटरनेट सेवा बंद राहणार असून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हा पोलिस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

पुसेसावळी येथील काही समाज कंटकांनी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्टवरून पुसेसावळी येथे रविवारी रात्री उशिरा तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले. तसेच जाळपोळही करण्यात आली. परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाल्यानंतर स्थानिक पोलिस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रण आणली. मात्र, या घटनेचे पडसाद जिल्ह्यात उमटू नयेत, यासाठी जिल्हा प्रशासनाने खबरदारीसाठी या परिसरासह संपूर्ण जिल्ह्यातील इंटरनेट सेवा 72 तासांसाठी बंद ठेवली आहे.

सध्या बँकांसह सर्व शासकीय कार्यालये पेपरलेस झाली असून सर्वच कामकाज ऑनलाईन केले जाते. मात्र सोमवारी सकाळी अचानक इंटरनेट सेवा बंद झाल्याने सर्व शासकीय, निमशासकीय तसेच खासगी कार्यालयांमधील कामकाज विस्कळीत झाले. बँकांचे ऑनलाईन आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने नागरिकांना गैरसोयीला सामोरे जावे लागले. अचानक इंटरनेट बंद झाल्याने सर्वच कार्यालयांमध्ये गोंधळ उडाला. शासकीय कार्यालयांमध्ये कामासाठी आलेल्या नागरिकांना सर्व्हर बंदमुळे माघारी फिरावे लागले. दस्त नोंदणी, दाखले काढणे तसेच बँकेतील एनएफटी व चेक वटवणे ही कामेही बंदच राहिली.

ऑनलाईन पेमेंटही बंद असल्याने गैरसोय

कोरोना काळापासून नेट बँकिंग सुविधेचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असून चहाच्या टपरीवरदेखीलऑनलाईन पेमेंटला प्राधान्य दिले जात आहे. नेट बँकिंग अंगवळणी पडल्याने अनेकांची खिशात पैसे ठेवायची सवयच मोडली आहे. सोमवारी मात्र नेट बंद झाल्याने ऑनलाई पेमेंटही बंद पडले. त्यामुळे अनेकांना रोख व्यवहार करावे लागले. परिणामी अनेकांची पंचाईत झाली. नागरिकांना दैनंदिन व्यवहारामध्ये कुठे उधारीवर तर कुठे उसनवारीवर निभवावे लागले.

शाळांबाहेर पालकांची गर्दी…

पुसेसावळीतील घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बंदी होतोय की काय, अशी धास्ती पालकांमध्ये निर्माण झाली होती. शिक्षण अधिकार्‍यांनीही स्थानिक स्तरावर शाळा प्रशासनांना परिस्थितीनुसार शाळा बंद किंवा सुरू ठेवण्याचे निर्णय स्वातंत्र्य दिले. सातारा शहर व परिसरातील बहुतांश शाळांनी आपापल्या स्तरावर विद्यार्थ्यांना घेवून जाऊ शकता, असे पालकांना निरोप पाठवले होते. त्यामुळे दुपारपर्यंत शहरातील शाळांबाहेर पालकांची गर्दी झाली होती.

अस्वस्थ नेटकर्‍यांची त्रेधा

इंटरनेट जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनला आहे. अनेकांच्या दिनचर्येचा शुभारंभच सोशल मीडियाने होतो. सकाळी उठल्या उठल्या मोबाईलवर व्हॉट्सअ‍ॅप, इन्स्टा, फेसबुक उघडल्याशिवाय दिवसाची सुरुवातच होत नाही. महत्वाचे निरोप, कामाचे नियोजनही या माध्यमातून होत असते. मात्र सोमवारी अशा नेटकर्‍यांची त्रेधा उडाली. इंटरनेट गंडलंय म्हणत अनेकांनी फोन दोन-तीनदा रिस्टार्ट केले, कोणी सीम काढून पाहिले. रविवारी रात्री पासून एकही अपडेट न पडल्याने नेटकर्‍यांमध्ये अस्वस्थता होती. सकाळी 11 पर्यंत सर्व चित्र स्पष्ट झाले अन् पुढील दोन दिवस इंटरनेटशिवाय रहावे लागणार असल्याची नेटकर्‍यांना खात्री पटली.



Source link

Tuzech Mi Geet Gaat Aahe: मोनिकाच्या चुकीमुळे दोन्ही मुली मल्हारपासून दुरावणार? मालिकेत येणार ट्वीस्ट

0
Tuzech Mi Geet Gaat Aahe: मोनिकाच्या चुकीमुळे दोन्ही मुली मल्हारपासून दुरावणार? मालिकेत येणार ट्वीस्ट


Tuzech Mi Geet Gaat Aahe Latest Update 12 September 2023: एकीकडे स्वराजचं सत्य मल्हारसमोर आलं आहे. तर, आता त्याची दुसरी मुलगी पीहू देखील त्याच्यापासून दुरावणार आहे.



Source link

सातारा : पुसेसावळीत दंगल; एक ठार, कर्फ्यू | पुढारी

0


पुसेसावळी; पुढारी वृत्तसेवा : समाजमाध्यमावर प्रसिद्ध झालेल्या आक्षेपार्ह मेसेजवरून सातारा जिल्ह्यातील पुसेसावळीत दोन गटांत झालेल्या दंगलीत एकाचा मृत्यू झाला असून १० जण जखमी झाले आहेत. याप्रकरणी पोलिसांनी १९ जणांना अटक केली असून चौघांना ताब्यात घेतले आहे. नूरहसन लियाकत शिकलगार (वय ३२) असे ठार झालेल्याचे नाव आहे. संपूर्ण पुसेसावळी गावात कर्फ्यू लावण्यात आला आहे. जिल्ह्यातही १३ तारखेपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. घटनेचे पडसाद सातारा जिल्ह्यात उमटत असून सर्वत्र तणावपूर्ण शांतता आहे. इंटरनेट सेवा बंद करून पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे.

दंगलप्रकरणी ३९ जणांची नावे निष्पन्न झाली असून एकूण १०० संशयितांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यातील १९ जणांना अटक केली असून न्यायालयाने त्यांना ४ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. तर आणखी ४ जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

याबाबत घटनास्थळावरुन मिळालेल्या माहितीनुसार, पुसेसावळी गावात काही दिवसांपूर्वी समाजमाध्यमांवर देवदेवतांच्या आक्षेपार्ह पोस्ट ठेवण्यात आल्या होत्या. याप्रकरणावरुन गावात गेले काही दिवस धुसफूस सुरु होती. त्यातच रविवारी सायंकाळी दोन युवकांच्या इन्स्टाग्राम या समाजमाध्यमावर महापुरुषांसंदर्भात आक्षेपार्ह पोस्ट आढळून आली. त्याला उत्तर देणारी पोस्ट लगेचच सोशल मीडियावर व्हायरल झाली. तद्नंतर मोठ्या प्रमाणावर जमाव जमला आणि दंगलीला सुरुवात झाली. जमावाने मोठ्या प्रमाणात तोडफोड करुन वाहने जाळली. व्यावसायिकांच्या हातगाड्यांची मोडतोड केली. त्यानंतर संतप्त जमाव मशिदीकडे गेला. तेथे उपस्थित असणार्‍या नागरिकांना जमावाकडून मारहाण करण्यात आली. जाळपोळ करणारा जमाव कमालीचा हिंस्त्र बनला. आरडाओरडा ऐकून मशिदीमधून काहीजण बाहेर आले. तेथे मशिदीतून बाहेर आलेल्यांवर संतप्त जमाव अक्षरश: तुटून पडला आणि हाणामारीला सुरुवात झाली. प्राथमिक माहितीनुसार फरशी, दांडकी, दगडांनी मारहाण करण्यात आली. यात नूरहसन लियाकत शिकलगार (वय 32) यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. याशिवाय इतर दहाहून अधिक जण जखमी झाले. यामध्ये अब्दुल कादर जैलानी (वय 55), वसीम बालम मुल्ला (वय 30, दोघे रा. वाघेरी, ता. कराड), सरफराज ईलाही बागवान (वय 45), सोहेल नजीर बागवान (वय 22), अमन असिफ बागवान (वय 20), समीर ईलाही बागवान (वय 50), अस्लम बाबासाहेब शेख (वय 32), अकिल नजीर इनामदार (वय 40), इस्माईल बशिर बागवान (वय 33), सैफअली हारुण बागवान (वय 29, सर्व रा. पुसेसावळी, ता. खटाव) अशी जखमींची नावे आहेत. सर्व जखमींवर सातारा व कराड येथे उपचार सुरु आहेत.

या घटनेची माहिती मिळताच औंध पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन परिस्थिती नियंत्रणात आणली. मात्र, अचानक जमाव वाढल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली. त्यानंतर तातडीने सातारा जिल्हा पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर पोलिस कुमक पाठवण्यात आली. पोलिसांनी शांततेचे आवाहन करत जमाव पांगवला. रात्रभर पोलिसांनी गस्त केली. जिल्हा पोलिस अधिक्षक समीर शेख स्वत: घटनास्थळी राहिले. संपूर्ण रात्रभर ते ठाण मांडून होते. यावेळी त्यांच्यासोबत अप्पर पोलिस अधिक्षक बापू बांगर, डी. वाय. एस. पी. अश्विनी शेंडगे व अन्य अधिकारीही तळ ठोकून होते. विभागातील सर्व पोलिस ठाण्यांचे प्रभारी, राखीव फोर्सने परिस्थितीवर नियंत्रण ठेवले आहे. सद्यस्थितीला पुसेसावळीतील परिस्थिती नियंत्रणात असून सर्वत्र तणावपूर्ण शांतता आहे.

पुसेसावळीतले वातावरण तणावपूर्ण असून गावात कर्फ्यू लावण्यात आला आहे. अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • जिल्ह्यातील इंटरनेट सेवा ७२ तास बंद राहणार
  • छत्रपती उदयनराजे यांचे एकोप्याचे आवाहन
  • जिल्ह्यात १३ तारखेपर्यंत जमावबंदी आदेश
  • अफवांवर विश्वास न ठेवण्याचे पोलिसांचे आवाहन
  • अ‍ॅड. देशपांडे व सामाजिक संघटनांचा आज सातारा बंद



Source link

Prachi Desai Birthday: बॉयफ्रेंडला सरप्राईज द्यायला परदेशी पोहोचलेल्या प्राची देसाईला बसला होता जबरदस्त धक्का!

0
Prachi Desai Birthday: बॉयफ्रेंडला सरप्राईज द्यायला परदेशी पोहोचलेल्या प्राची देसाईला बसला होता जबरदस्त धक्का!


प्राची देसाई तिच्या चित्रपटांमुळे जितकी चर्चेत राहिली, तितकीच ती तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील प्रसिद्धी झोतात राहिली आहे. तिने एका मुलाखतीत आपल्या आयुष्यातील एका धक्कादायक घटनेचा खुलासा केला होता. अभिनेत्री प्राची देसाई एकेकाळी खास व्यक्तीच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. मात्र, याच व्यक्तीने प्राचीला आयुष्यात सगळ्यात मोठा धक्का दिला होता. प्राची देसाई एकदा तिच्या बॉयफ्रेंडला सरप्राईज देण्यासाठी थेट परदेशात पोहोचली होती. डेटिंग दरम्यान प्राची या खास व्यक्तीच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. मात्र, परदेशात गेल्यावर प्राचीला सगळ्यात मोठा धक्का बसला होता.



Source link

OBC Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असतानाच ओबीसी उतरणार रस्त्यावर

0
OBC Reservation : मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असतानाच ओबीसी उतरणार रस्त्यावर


औरंगाबाद : राज्यात एकीकडे मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा गाजत असतानाच दुसरीकडे आता ओबीसी (OBC) देखील रस्त्यावर उतरणार आहेत. ओबीसमधून मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध होत असून, ओबीसी समन्वय समितीने यासाठी औरंगाबादमध्ये (Aurangabad) अन्नत्याग आंदोलनाचा इशारा दिला. 13 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता शहरातील क्रांतीचौकात हे आंदोलन होणार आहे. या संदर्भातील आयोजन बैठक रविवारी औरंगपुऱ्यातील संत सावता महाराज मंदिरात पार पडली. यावेळी या बैठकीत अन्नत्याग आंदोलनाचा एकमुखी निर्णय घेण्यात आला.

ओबीसी समन्वय समितीच्या वतीने माजी आमदार नारायणराव मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली ओबीसी आणि भटक्या विमुक्त जाती जमातीमधील समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांची रविवारी बैठक झाली. ओबीसींच्या विविध मागण्या आणि ओबीसींवर होणाऱ्या अन्यायासंदर्भात चर्चा झाली. या चर्चेदरम्यान जनआंदोलनाची रूपरेषा ठरविण्यात आली. 13 सप्टेंबर रोजी सकाळी दहा वाजता क्रांती चौकात धरणे आंदोलन, निदर्शने करून अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात होणार आहे. या अन्नत्याग आंदोलनात ओबीसींनी सहभागी होण्याचे आवाहन देखील समन्वय समितीच्या वतीने करण्यात आले आहेत. 

‘या’ आहेत मागण्या…

  • मराठा समाजाला सरसकट कुणबी संबोधून ओबीसी प्रमाणपत्र देऊ नये.
  • सर्व जातीची जातनिहाय जन- गणना त्वरित करावी
  • आजतागायत मराठा समाजाला कुणबी (ओबीसी) म्हणून दिलेली जातींची प्रमाणपत्रे रद्द करून संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी
  • ओबीसी, (व्हिजेएनटी, एसबीसी) विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत महागाई निर्देशांकानुसार वाढ करण्यात यावी
  • ज्या व्यावसायिक अभ्यासक्रमांची शिष्यवृत्ती बंद करण्यात आली आहे. ती त्वरित चालू करावी
  • सरकारी उद्योगांचे खासगीकरण थांबून सरकारी नोकऱ्यांच्या खासगीकरणाचा अध्यादेश तत्काळ रद्द करण्यात यावा, अशा मागण्या समन्वय समितीच्या आहेत.

मुख्यंमत्री शिंदेंनी केली भूमिका स्पष्ट…

दरम्यान राज्यभरात मराठा आरक्षणाचा मुद्दा तापला असतांना सोमवारी मुंबईत मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय बैठक बोलावली होती. दरम्यान, त्यानंतर माध्यमांशी बोलतांना मुख्यंमत्री शिंदे यांनी ओबीस आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडली. मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहे. मात्र, इतर कोणत्याही समाजाचा आरक्षण कमी न करता हे आरक्षण दिले जाणार आहे. मात्र, दोन समाजात वाद होईल असे कोणतेही निर्णय घेतले जाणार नाही. त्यामुळे ओबीसी समाजाने आंदोलन करण्याची गरज नाही, कारण त्यांच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागणार नाही असे मुख्यंमत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Jalna Protest : जालना आंदोलनात दाखल झालेले सर्व गुन्हे त्वरित मागे घेणार, जरांगे यांनी आंदोलन मागे घ्यावं; सर्वपक्षीय बैठकीत ठराव संमत



Source link

Rasika Joshi Birth Anniversary: रंगभूमी ते बॉलिवूड गाजवणाऱ्या रसिका जोशी! ‘या’ आजाराने घेतले होते अभिनेत्रीचे प्राण

0
Rasika Joshi Birth Anniversary: रंगभूमी ते बॉलिवूड गाजवणाऱ्या रसिका जोशी! ‘या’ आजाराने घेतले होते अभिनेत्रीचे प्राण


Rasika Joshi Birth Anniversary: गंभीर भूमिकांसोबतच रसिका जोशी आपल्या कॉमेडीने लोकांच्या चेहऱ्यावर हसू आणण्यात माहिर होत्या.



Source link

देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News

0
देश विदेशातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर, वाचा Morning News


देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील… 

Shanti Swarup Bhatnagar Award : शांती स्वरूप भटनागर पुरस्कारांची घोषणा, देशातील 12 शास्त्रज्ञांचा होणार गौरव

Shanti Swarup Bhatnagar Award : शांती स्वरूप भटनागर पुरस्कारांची (Shanti Swarup Bhatnagar Award) घोषणा झाली आहे. देशातील 12 तरुण शास्त्रज्ञांना शांती स्वरूप भटनागर पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेने (CSIR) वर्ष 2022 साठी शांती स्वरूप भटनागर पुरस्कारांची घोषणा केली आहे. हा पुरस्कार दरवर्षी ४५ वर्षांखालील शास्त्रज्ञांना दिला जातो. यामध्ये पाच लाख रुपयांचे पारितोषिक आणि सन्मानपत्र देण्यात येणार आहे. वाचा सविस्तर 

Shanti Swarup Bhatnagar Award : देशाला विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात स्वावलंबी बनवण्यात महत्त्वाचे योगदान, कोण होते डॉ.शांती स्वरूप भटनागर?

Shanti Swarup Bhatnagar Award : आज भारत विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात रोज नवनवीन विक्रम प्रस्थापित करत आहे. त्यात अनेक शास्त्रज्ञांचे मोठे योगदान आहे. ज्यांनी स्वातंत्र्यानंतर देशाला केवळ स्वावलंबी बनवण्याचे स्वप्न पाहिलेच नाही तर ते प्रत्यक्षातही आणले. डॉ.शांती स्वरूप भटनागर (Dr Shanti Swarup Bhatnagar) यांनी देशाला विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात स्वावलंबी बनवण्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे. होमी जहांगीर भाभा, प्रशांत चंद्र महालनोबिस, विक्रम अंबालाल साराभाई यांसारख्या महान शास्त्रज्ञांसोबत त्यांनी काम केले. वाचा सविस्तर 

Apple iPhone 15 : Apple ‘हा’ फोन कायमचा करणार बंद, iPhone 15 सीरीज आज लॉंच होणार, Apple इव्हेंट असेल अधिक खास!

Apple iPhone 15 : Apple आज Apple iPhone 15 मालिका लॉंच करणार आहे. या इव्हेंटमध्ये Apple कडून 4 नवीन iPhone लाँच करण्यात येतील, ज्यात iPhone 15, iPhone 15 Plus, iPhone 15 Pro आणि iPhone 15 Pro Max यांचा समावेश असेल. यासोबतच ॲपलचा हा वार्षिक कार्यक्रम अधिक खास असणार आहे, कारण यावेळी अॅपल आपला एक जुना आयफोन कायमचा बंद करणार आहे. तुम्ही देखील ॲपलप्रेमी असाल तर तुम्हाला हे नक्कीच माहित असले पाहिजे. Apple लॉन्च इव्हेंट आणि बंद झालेल्या iPhone बद्दल सविस्तर जाणून घ्या, वाचा सविस्तर 

Apple Event 2023: iPhone 15 सीरीज आज लाँच होणार, Apple इव्हेंट कोठे आणि कसे पाहाल? ‘हे’ गॅजेट्सही लाँच होणार, जाणून घ्या

Apple Event 2023 : Apple आज Wanderlust इव्हेंट आयोजित करणार आहे. या इव्हेंटमध्ये कंपनी Apple iPhone 15 सीरीजचे चार फोन लॉन्च करणार आहे. यासोबतच या इव्हेंटमध्ये आणखी काही गॅजेट्स लॉंच केले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच Apple इव्हेंट कोठे आणि कसे पाहाल? Apple Wanderlust इव्हेंटबद्दल जाणून घेऊया. वाचा सविस्तर 

12 September In History : शिवाजी महाराज आग्र्याहून सुखरुप राजगडावर पोहचले, भारतीय सैन्य हैदराबाद संस्थानच्या हद्दीत शिरले; आज इतिहासात

जगाच्या आणि भारताच्या इतिहासात आजच्या दिवशी काही महत्त्वपूर्ण घटना घडल्या आहेत. या घटनांना ऐतिहासिक दृष्ट्या विशेष महत्त्व आहेत. आजच्याच दिवशी आग्र्याहून सुटका झाल्यानंतर शिवाजी महाराज हे सुखरुप राजगडावर पोहचले होते. तर हैदराबाद मुक्तिसंग्रामच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्य हे हैदराबादच्या हद्दीत शिरले होते. आजच्याच दिवशी  कॅलिफोर्निया गोल्ड रश मध्ये सापडलेले 12 ते 15 टन सोने घेऊन जाणारे एस.एस. सेंट्रल अमेरिका हे जहाज सोने व 426 प्रवाशांसह बुडाले होते. शास्त्रीय गायक रामचंद्र कुंदगोळकर तथा सवाई गंधर्व यांचे निधन झाले. वाचा सविस्तर 

Horoscope Today : मिथुन, सिंह आणि वृश्चिक राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस खास, वाचा आजचं राशीभविष्य

Horoscope Today 12 September 2023 : आज वार मंगळवार दिनांक 12 सप्टेंबर 2023. आजचा दिवस काही राशींच्या लोकांसाठी खास असणार आहे. मिथुन, सिंह आणि वृश्चिक राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायी ठरणार आहे. पाहुयात आजचा दिवस मेष ते मीन या राशींच्या लोकांसाठी कसा राहील. वाचा सविस्तर 



Source link

Jawan Day 5: पाचव्या दिवशी जवानची बॉक्स ऑफिसवर छप्पर फाड कमाई

0
Jawan Day 5: पाचव्या दिवशी जवानची बॉक्स ऑफिसवर छप्पर फाड कमाई



Jawan Box Office Collection: जवान प्रदर्शित झाल्यापासून चित्रपट बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करताना दिसत आहे. आता पाचव्या दिवशी चित्रपटाने किती कमाई केली आहे जाणून घेऊया…



Source link