Wednesday, July 22, 2026
Home Blog Page 2756

OTT Binge Watch: हॉरर चित्रपटांचे चाहते आहात? मग, ओटीटीवर असलेले ‘हे’ चित्रपट आवर्जून बघाच!

0
OTT Binge Watch: हॉरर चित्रपटांचे चाहते आहात? मग, ओटीटीवर असलेले ‘हे’ चित्रपट आवर्जून बघाच!


वीराना

‘वीराना’ हा चित्रपट बॉलिवूडचा एक कल्ट हॉरर चित्रपट मानला जातो. १९८८मध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर यशस्वी झाला होता. भयपट आवडणाऱ्या चित्रपट प्रेमींना हा चित्रपट पुन्हा पहायला नक्कीच आवडेल. या चित्रपटात जास्मिन, साहिल चड्ढा, कुलभूषण खरबंदा, गुलशन ग्रोवर यांच्या मुख्य भूमिका होत्या. हा चित्रपट आजही युट्यूबवर पाहू शकता.



Source link

Thane: ठाण्यातील मासुंदा तलावात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात खळबळ

0
Thane: ठाण्यातील मासुंदा तलावात आढळला महिलेचा मृतदेह; परिसरात खळबळ


पुणे: दाजीचा हत्या करून मेहुण्याची आत्महत्या

पुण्यातील बाणेर परिसरात दाजीची हत्या करून मेहुण्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज (१२ सप्टेंबर) उघडकीस आली. धनंजय साडेकर (वय, ३८) असे खून झालेल्या दाजीचे नाव आहे. तर, हेमंत काजळे (वय, ४०) असे गळफास घेऊन आत्महत्या करण्याऱ्या मेहुण्याचे नाव आहे. ही घटना बाणेर येथील श्री समृद्धी सोसायटी मधील फ्लॅट नं. २०१ येथे घडली. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.



Source link

Bollywood Nostalgia: बोनी कपूर यांना राखी बांधायची सुपरस्टार श्रीदेवी! तुम्हाला माहितीय का ‘हे’ कारण?

0
Bollywood Nostalgia: बोनी कपूर यांना राखी बांधायची सुपरस्टार श्रीदेवी! तुम्हाला माहितीय का ‘हे’ कारण?


‘मिस्टर इंडिया’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान निर्माता बोनी कपूर यांनी श्रीदेवीवरील आपले प्रेम व्यक्त केले होते. श्रीदेवीने एका मुलाखतीत म्हटले होते की, जेव्हा ती बोनी कपूर यांना फार जवळून ओळखू लागली, तेव्हा ती देखील त्यांच्या प्रेमात पडली होती. मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रीदेवी लग्नाआधीच प्रेग्नंट झाली होती, त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता.



Source link

Tharla Tar Mag: सायलीला होईल का अर्जुनच्या प्रेमाची जाणीव? ‘ठरलं तर मग’ मालिकेत येणार नवं वळण

0
Tharla Tar Mag: सायलीला होईल का अर्जुनच्या प्रेमाची जाणीव? ‘ठरलं तर मग’ मालिकेत येणार नवं वळण


सायली आणि अर्जुनचे लग्न हे एका अटीमुळे झाले होते. सायलीची केस लढण्याची फी म्हणून त्याने तिला लग्न करण्याची अट घातली होती. सायली ज्या आश्रमात लहानाची मोठी झाली, त्या आश्रमातील मुलांचा सांभाळ करणारे मधुभाऊ तिथल्या सगळ्याच मुलांचे बाबा बनले होते. मात्र, त्यांच्या या छोट्याशा आश्रमाच्या जमिनीवर काही वाईट लोकांची नजर पडली. आश्रमाची जमीन मिळवण्यासाठी रचलेल्या कटात एक खून झाला आणि या खुनाचा आळ मधुभाऊ यांच्यावर आला. याच आरोपात मधु भाऊ यांना अटक झाली. या खोट्या आरोपातून त्यांना बाहेर काढण्यासाठी सायलीने अर्जुनची मदत घेण्याचा निर्णय घेतला होता.



Source link

Thackeray and Raut Meet Sharad Pawar : सिल्वर ओकवर इंडिया समन्वय बैठकीवर चर्चा

0
Thackeray and Raut Meet Sharad Pawar : सिल्वर ओकवर इंडिया समन्वय बैठकीवर चर्चा



<p>Thackeray and Raut Meet Sharad Pawar : सिल्वर ओकवर इंडिया समन्वय बैठकीवर चर्चा</p>



Source link

Aundh Pusesawali : पुसेसावळी हिंसाचार प्रकरणात 23 जणांना अटक

0



<p>Aundh Pusesawali : पुसेसावळी हिंसाचार प्रकरणात 23 जणांना अटक</p>



Source link

AR Rahman Concert: एआर रहमानच्या कॉन्सर्टमध्ये चिक्कार गोंधळ; थेट तीन आयपीएस अधिकाऱ्यांची बदली

0
AR Rahman Concert: एआर रहमानच्या कॉन्सर्टमध्ये चिक्कार गोंधळ; थेट तीन आयपीएस अधिकाऱ्यांची बदली


एआर रहमानच्या रविवारी चेन्नईमध्ये झालेल्या शोमध्ये जो गदारोळ झाला, त्याची बातमी सोशल मीडियावर आगीसारखी पसरली आहे. मुलांना धक्काबुक्की, महिलांची छेडछाड, चेंगराचेंगरी अशा अनेक घटनांमुळे ही कॉन्सर्ट चर्चेत आली आहे. या म्युझिक कॉन्सर्टमध्ये सामील झालेल्या लोकांनी तक्रार करताना म्हटले की, यावेळी आवाज इतका कमी होता की, काहीही ऐकू देखील येत नव्हते. अनेकांनी पॅनीक अटॅक, नर्व्हसनेस, खुर्च्यांचा अभाव अशा अनेक तक्रारी केल्या आहेत. मात्र, नंतर एआर रहमान यांनी शोच्या या खराब व्यवस्थापनाची जबाबदारी घेत एक ट्विट करून चाहत्यांची माफी मागितली आहे.



Source link

Dharmendra Health Update: आजारी धर्मेंद्र यांच्यावर अमेरिकेत होणार उपचार; आता कशी आहे तब्येत? वाचा…

0
Dharmendra Health Update: आजारी धर्मेंद्र यांच्यावर अमेरिकेत होणार उपचार; आता कशी आहे तब्येत? वाचा…


सनी देओलने त्याच्या आई-वडिलांसोबत वेळ घालवण्यासाठी ब्रेक घेतला आहे. ‘गदर २’च्या यशानंतर त्याला आता कुटुंबासोबत वेळ घालवायचा आहे. मीडिया रिपोर्टनुसार सनी देओल आपल्या बहिणींना अर्थात विजया आणि अजिता यांना भेटण्यासाठी १५-२० दिवसांचा ब्रेक घेऊन अमेरिकेला गेला आहे. यावेळी त्याच्यासोबत त्याची आई प्रकाश कौर आणि वडील धर्मेंद्र देखील आहेत. या फॅमिली ट्रीपला अभिनेता बॉबी देओलही सोबत जाणार होता. पण, सध्या शूटिंगच्या वेळापत्रकात व्यस्त असल्याने, त्याला या ट्रीपसाठी वेळ मिळालेला नाही. मात्र, यातून थोडासा मोकळा वेळ मिळाला की, बॉबी देओल देखील अमेरिकेत जाणार असल्याचे म्हटले जात आहे. तर, धर्मेंद्र यांना देखील आपल्या कुटुंबासोबत मोकळा वेळ घालवायला मिळणार आहे.



Source link

Pusesavali Dangal : दंगलीत कुणाला मारताय? जातीला? धर्माला?? की माणसांना??? | पुढारी

0


– हरीष पाटणे

छत्रपती शिवाजी महाराजांचा सर्वधर्म समभावाचा विचार जोपासणारा, सर्व जातीधर्मांना बरोबर घेऊन जाणारा पुरोगामी विचारांचा सातारा जिल्हा म्हणून उभ्या जगात ज्या सातार्‍याला नावाजले जाते. त्याच सातार्‍याच्या नावलौकिकाला गालबोट लागणार्‍या घटना अलिकडच्या काळात घडू लागल्या आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी असलेला, छत्रपती शाहूंचा पुरोगामित्वाचा वारसा जोपासणारा, छत्रपती प्रतापसिंह महाराजांची विचारधारा घेऊन पुढे जाणारा, शाहू-फुले-आंबेडकर यांच्या वैचारिक वारशाला समृद्ध करणारा, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या कृतीयुक्त विचारधारेला जोपासणारा सातारा जिल्हा, ही अखंड भारतात सातारा जिल्ह्याची ओळख आहे. उभ्या भारतात कुठेही दंगे फसाद झाले तरी सातार्‍याने नेहमीच शांततेचा पुरस्कार केला आहे. माथी भडकवणार्‍यांना, जातीय विद्वेष पसरवणार्‍यांना, धर्मांधतेचे विष कालवणार्‍यांना सातार्‍याने कधी स्वीकारले नाही. सातारा जिल्ह्यातील गावागावांमध्ये, गावगाड्यांमध्ये सर्वधर्म समभावाचा वारंगुळा चालत आला आहे. हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन असा कोणत्याही धर्माचा अभिनिवेष न बाळगता अखंड शेतकरी समाज एकमेकांच्या सुख-दु:खात धावून जाताना पूर्वांपार दिसला आहे. महाभयानक आपत्तीच्या काळात हिंदू-मुस्लिमांचा भाईचारा जिल्ह्याने अनुभवला आहे. महापूर असू दे अथवा दुष्काळ, संकट निसर्गनिर्मित असो अथवा मानवनिर्मित प्रत्येकवेळी हिंदू मुस्लिमांसाठी व मुस्लिम हिंदूंसाठी धावून गेला आहे. हिंदूंचे पवित्र सण साजरे करताना मुस्लिम बांधव दिसतात तर मुस्लिमांच्या सणांमध्ये हिंदू बांधव सामील झालेले दिसतात. सातार्‍याची ही भाईचार्‍याची परंपरा अलौकिक राहिली आहे. त्यामुळेच हिंदूंची दिवाळी आणि मुस्लिमांची ईद दोन्ही धर्मिंयांसाठी सण म्हणूनच साजरी होते. शहरांमध्येही कुठेही जातीय तणावाच्या घटना कित्येक वर्षे घडल्या नाहीत. गावगाड्याला तर जातीय मतभेदांचा स्पर्शच झालेला नव्हता.

सातारा जिल्ह्यात गेल्या कित्येक वर्षांत असे गुण्यागोविंदाचे वातावरण असताना अलिकडच्या काही वर्षांमध्ये मात्र ठिणगीचा वणवा पेटवला जात आहे. सोशल मीडियाचा वाढलेला अतिरेक माथी भडकवत आहे. फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅप, इन्स्टाग्रामचे भिकार नाद वयात आलेल्या पोरांना देशोधडीला लावत आहेत. त्यातून देवदेवता, महापुरुष, स्वातंत्र्यासाठी लढलेली पिढी यावर खालच्या स्तरावर जाऊन टिकाटिप्पणी करणारी टाळकी सामाजिक वातावरण प्रदूषित करु लागली आहेत. कामधंदा करण्याऐवजी सोशल मीडियाच्या मोहजालात अडकून संपूर्ण समाजाला वेठीस धरणार्‍या चारदोन टुकार टाळक्यांमुळे संपूर्ण समाजयंत्रणा अडचणीत येत आहे. रात्री अपरात्री व्हॉटस्अ‍ॅप स्टेटस्, इन्स्टाग्रामवर हरामखोरी करत बसायचे आणि त्यातून भावना भडकवायचे उद्योग करणारी ही साखळी दिवसेंदिवस वाढू लागली आहे. असे मेसेज व्हायरल झाल्यानंतर त्यातून चिथावणी देणारे, या व्हायरल मेसेजचा आधार घेऊन जाती धर्मांमध्ये तेढ निर्माण करणारे तेवढ्याच वेगाने वाढू लागले आहेत. इन्स्टा आणि स्टेटस्च्या विषारी मार्‍याला तेवढ्याच विषारी मार्‍याने प्रतिकार होऊ लागला आहे. त्यातून दंगली घडवण्याची कारस्थाने होत आहेत. गेल्या वर्षभरात अनेकदा अशा घटना कानावरुन गेल्या. या एक-दोन वर्षातच या घटनांमध्ये वाढ का झाली आहे? औरंग्याची आठवण आत्ताच का येत आहे? सुमारे पावणेचारशे वर्षांनंतरही छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह लिखाण का केले जात आहे? माथी भडकवणार्‍या लिखाणानंतर पेटवापेटवी व जाळपोळ करून ठिणगीचा वणवा का केला जात आहे?

पुसेसावळी हे सातारा जिल्ह्याचे टोकच. सर्व समाज इथे पूर्वांपार गुण्यागोविंदाने नांदतो. याच पुसेसावळीत होणारा पारायण सोहळा हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक आहे. एक महिन्यापूर्वी हिंदू-मुस्लिम समाजबांधवांनी एकत्र येऊन पारायण सोहळा केला. सर्व धर्म समभावाची पताका घेऊन पुढे जाणार्‍या पुसेसावळीत दोन समाजबांधवांमध्ये एवढी विषारी तेढ निर्माण होण्याचे कारण काय? इन्स्टा व व्हॉटस्अ‍ॅपवरुन फिरलेले मेसेज, पेटवलेल्या गाड्या, झालेली जाळपोळ पुसेसावळीच्या आजवरच्या परंपरेला गालबोट लावून गेली. सोशल मीडियावर विखारी मेसेज करणारे नामानिराळे राहिले आणि एका निरपराध युवकाचा बळी गेला. महापुरुषांविषयी खालच्या भाषेत गरळ ओकणे जेवढे चुकीचे; तेवढेच जाळपोळ करुन निरपराधाचा बळी घेणेही चुकीचे. दोन्ही कृत्यांचे समर्थन होणार नाही. सातारा जिल्हा अशा कृत्यांना स्वीकारणार नाही.

अलिकडच्या काळात वाढू लागलेल्या या घटनांवरुन व जिल्ह्यात सुरु असलेल्या गुन्हेगारीच्या घटनांवरुन एक बाब प्रकर्षाने पुढे आली आहे ती म्हणजे सोशल मीडियाचा अतिरेक. फोफावलेली बालगुन्हेगारी सोशल मीडियाचेच अपत्य आहे आणि वाढू लागलेली जातीय धार्मिक तेढही सोशल मीडियाचेच पाप आहे याची पोलिस यंत्रणेने व शासनानेही नोंद घेतली पाहिजे. पोलिस दलाचा सायबर सेल केवळ गाजावाजा करण्यापुरता मर्यादित राहिला आहे. पुसेसावळीत रविवारी रात्री घडलेल्या प्रकारापूर्वी 15 दिवस अगोदर अशीच धुसफूस झाली होती. मात्र, त्यानंतर ज्या उपाययोजना करायला हव्या होत्या त्यात स्थानिक पोलिस दल कमी पडले. सायबरची यंत्रणा तर पूर्णपणे फेल आहे. मध्यंतरी सातार्‍यातही अकाऊंट हॅक करून मेसेज केले गेले, राजकीय नेत्यांची, पत्रकारांची, सामाजिक कार्यकर्त्यांची अकाऊंट हॅक केली जात आहेत. मात्र, सायबरच्या यंत्रणेला आरोपीपर्यंत पोहोचायला एवढा वेळ लागतो की तोपर्यंत ही विषवल्ली गावोगावी पोहोचलेली असते. त्यामुळे जिल्हा पोलिस दलाने सायबरची यंत्रणा अधिक अ‍ॅक्टिव्ह केली पाहिजे. व्हॉटस्अ‍ॅप, फेसबुक, इन्स्टावर जातीय व धार्मिक ग्रुप आहेत. या ग्रुपवर जाती धर्माच्या पोस्ट सातत्याने पडत असतात, त्यावर सायबरची नजर असायला हवी. घटना घडल्यानंतर उपाययोजना करताना पोलिस दल घामाघूम होत आहे. मात्र, घटनांपूर्वीच पोलिस दलाने खबरदारी बाळगली तर अशा घटनांना आळा बसेल. रात्री अपरात्री सामाजिक विद्वेष पसरवणारे, व्यक्तीगत रागापोटी बोलटाबोलटी करणारे चिंतातूर जंतू पोलिसांनी हेरुन, चाळून, पिंजून उचलले पाहिजेत. गावोगावी निर्माण झालेल्या या विषवल्लींना लागलीच कायद्याचा उतारा दिला नाही तर सामाजिक विद्वेषाचा हा डोह हा विशाल समुद्र प्रदूषित केल्याशिवाय राहणार नाही.

महापुरुषांची बदनामी करणारा एखादा नग रात्री अपरात्री एखादा मेसेज टाकून परागंदा होतो. कधी कधी दुसर्‍याचे अकाऊंट हॅक करुन तिसराच ओकार्‍या करुन जातो. कुठे कुठे एखादा विकृत ‘व्यक्त व्हा, व्यक्त व्हा’ अशा उलट्या करुन गावगन्ना डरंगाळत असतो. अशा नगांच्या उचापतींना बळी पडून माथी भडकावली जातात. जातीजातीमध्ये विष कालवले जाते, वस्त्या उठवल्या जातात, धर्म मारला, जात मारली अशा आरोळ्या ठोकत झोपड्या, घरे पेटवल्या जातात. पण खरं सांगा बाबांनो, खरंच धर्म मारला जातो का? खरंच जात मारली जाते का? खरंच धर्म पेटवला जातो का? खरंच जाती जाळल्या जातात का? मारला जातो तो माणूस! राखरांगोळी होतेय ती माणसांची! आयुष्ये बरबादी होताहे ती माणसांची! मग का दंगली घडवताय? का शांतताप्रिय असलेल्या सातारा जिल्ह्याचे समाजमन पेटवताय? का अस्तनीतले निखारे होताय? थांबवा हे सगळं. लेकरं बाळं गोंधळलीत, माणूसमेळ बिथरलाय, शाळांमध्ये जाणारी मुलं कावरीबावरी झालीत, नोकरी धंद्यावर असणार्‍या लेकरांच्या काळजीने आयाबाया घाबर्‍यागुबर्‍या झाल्यात, मायमाऊल्या रडवेल्या झाल्यात. दंगली आपल्याला परवडणार्‍या नाहीत. होरपळणार्‍या जीवांचा आक्रोश ऐका… महापुरुषांचे विचार ऐका… आणि थांबवा हे सारं!

हेही वाचा : 



Source link

Nashik Protest: नाशिककरांचे मोठे हाल, सकाळपासून रिक्षा-टॅक्सी सेवा बंद!

0
Nashik Protest: नाशिककरांचे मोठे हाल, सकाळपासून रिक्षा-टॅक्सी सेवा बंद!


Nashik News: नाशिकमध्ये आज सकाळपासून रिक्षा आणि टॅक्सी सेवा बंद असल्यानं नागरिकांचे हाल होत आहेत. नाशिक शहर आणि जिल्ह्यातील रिक्षा, टॅक्सी चालकांनी विविध मागण्यांसाठी प्रादेशिक परिवहन विभाग, पोलीस आणि महापालिकेला निवेदन दिले होते. पंरतु, याची दखल घेतली जात नसल्यानं संतापलेल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांनी आज सेवा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.



Source link