
<p>Refinery Project : बारसू प्रकल्पावर देखरेख ठेवण्यासाठी समिती स्थापन ABP Majha</p>
Source link

<p>Refinery Project : बारसू प्रकल्पावर देखरेख ठेवण्यासाठी समिती स्थापन ABP Majha</p>
Source link

Amruta Khanvilkar Video: अमृताने निर्मिती केलेल्या या पहिल्यावहिल्या गाण्याचे नाव ‘गणराज गजानन’ असे असून गणेशाला वंदन करणाऱ्या या आल्हाददायी गाण्याला राहुल देशपांडेने आवाज दिला आहे.
Source link

The vaccine War Trailer : गेल्या काही दिवसांपासून ‘द व्हॅक्सिन वॉर’ हा चित्रपट चर्चेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला असून सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. या चित्रपटात आता मराठी चित्रपटसृष्टीमधील लोकप्रिय अभिनेते नाना पाटेकर यांची एण्ट्री झाली आहे.
Source link

Mukesh Udeshi Death: मुकेश उदेशी यांचे किडनी ट्रांसप्लांटचे ऑपरेशन होते. मात्र, त्यापूर्वीच त्यांचे निधन झाले आहे.
Source link

अहमदनगर : राज्यातील भरती प्रक्रियेवरून राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी (Rohit Pawar) राज्य सरकारवर टीका केली आहे. राज्य शासनाच्या मार्फत कायम स्वरुपी भरती जर केली तर त्याचा खर्च जास्त असतो असं सरकार म्हणतंय. त्यामुळे कंत्राटी भरतीबाबत शासन विचार करत असेल तर कंत्राटी भरतीच्या कंपन्या कुणाच्या आहेत याचाही विचार करायला हवा, असं रोहित पवार यांनी म्हटले. जर सरकारला कंत्राटदार एवढेच आवडत असतील तर शासनच प्रायव्हेट कंपनीच्या हातात देऊन टाका असा खोचक टोला रोहित पवारांनी लगावला आहे.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कायमस्वरुपी शासकीय कर्मचाऱ्याच्या वेतनात कंत्राटदाराच्या माध्यमातून भरती केल्यास तिघांना नोकरी मिळेल असे म्हटले होते. त्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी त्यावर नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की, एका बाजूला सरकार नको तेवढा खर्च करतंय. मग ते माजी खासदारांच्या सुरक्षेसाठी असो की इतर कारणांसाठी असो…सरकार करोडो रूपयांचा खर्च करत आहे. तर, दुसरीकडे सामान्य मुलांकडून हजार हजार रुपयाची वसुली स्पर्धा परीक्षेसाठी करत आहे. त्यामुळे सामान्य मुलांकडून हा खर्च वसूल केला जातोय तो बंद करायला हवा, अशी मागणी रोहित पवार यांनी केली. जर कंत्राटदाराच्या माध्यमातून भरती करणार असाल आणि जर सरकारला कंत्राटदार एवढे आवडत असतील तर सरकारच खासगी कंपनीच्या हातात देऊन टाका असा खोचक टोला रोहित पवारांनी लगावला आहे.
ओबीसी आरक्षणावरून आमदार रोहित पवार यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे. भाजपचे अनेक नेते थोर व्यक्तींच्या विरोधात बोलतात त्यात मनोहर भिडे देखील आहे. तसेच मराठा आरक्षणाचा प्रश्न होता तेव्हा भाजपचे काही पदाधिकारी गुणरत्न सदावर्ते मराठा आरक्षणाच्या विरोधात कोर्टात गेले. तर ओबीसींना राजकीय आरक्षण देण्याचा आपण प्रयत्न करत होतो तेव्हा भाजपचे काही पदाधिकारी ओबीसींना राजकीय आरक्षण दिलं नाही पाहिजे यासाठी कोर्टात गेले असल्याचे रोहित पवारांनी म्हटले. तसेच इथं गोड बोलायचं राजकीय मोठी मोठी भाषणे करायची मराठा धनगर आरक्षण पहिल्याच कॅबिनेटमध्ये देऊ बोलायचं तर सत्ता हातात येते तेव्हा तुम्ही कोर्टावर ढकलून मोकळे होतात आणि कोर्टातही तुमचेच कार्यकर्ते विषय घेऊन जातात असं म्हणत रोहित पवारांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
एकीकडे राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आंदोलनं सुरु आहेत तर त्याचवेळी राज्य सरकारने एक अध्यादेश काढून वेगवेगळ्या खात्यांमधील हजारो पदे भरण्यासाठी नऊ खाजगी कंपन्यांची निवड केली आहे. या खाजगी कंपन्या राज्य शासनाचे शासकीय विभाग, निमशासकीय विभाग, महामंडळे, स्थानिक स्वराज्य संस्था, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि इतर आस्थापनांना मनुष्यबळ पुरवणार आहेत. राज्य सरकारच्या वेगवगेळ्या खात्यांमधील दोन लाख अकरा हजार पदे सध्या रिक्त आहेत. तर स्थानिक स्वराज्य संस्था, महामंडळे, निमशासकीय संस्था आणि आस्थापनांमधील मिळून अडीच लाख पदे सध्या रिक्त आहेत.

maratha reservation hunger strike : बीडच्या गेवराई तालुक्यातील जातेगाव येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथे पती-पत्नीने आरक्षण आंदोलनातून येऊन गळफास घेत आपले जीवन संपवले आहे.

आरोपींनी शस्त्रांचा धाक दाखवून १४ वर्षीय मुलाचे अपहरण करण्यात आले. तेजस ज्ञानोबा लोखंडे, अर्जुन सुरेश राठोड, विलास संजय म्हस्के अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपीने ज्या मोबाईलवरून फोन केला होता, त्याचे कॉल डिटेल तपासून पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. त्यांच्याकडे एक पिस्तूल, १ लांब पात्याचा कोयता, १ सत्तूर, १ कटावणी आणि ३ मोबाईल मिळून आले आहेत.
कराड : पुढारी वृत्तसेवा : ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी कराड तालुक्यातील २०० गावांचे चक्री उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.
बुधवारी (दि. १३ सप्टेंबर ) रोजी ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी कराड तालुक्यातील सर्व २०० गावे चक्री उपोषणास बसणार असल्याचे कराड तालुका मराठा क्रांती मोर्चाकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र, ते तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे.
सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी येथील दुर्दैवी घटनेच्या पार्श्वभूमीवर कराड शहरात मागील दोन दिवसांपासून तणावपूर्ण शांतता आहे. त्याचबरोबर पुसेसावळी घटनेच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात जमावबंदी आदेश लागू करण्यात आली आहे.
पुसेसावळी घटनेच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ नये, त्याचबरोबर मराठा क्रांती मोर्चाच्या लोकशाही मार्गाने सुरू असणाऱ्या आंदोलनास गालबोट लागू नये या हेतूने बुधवारपासून सुरू होणारे चक्री उपोषण तात्पुरत्या स्वरूपात स्थगित करण्यात आल्याचे कराड तालुका मराठा क्रांती मोर्चाकडून जाहीर करण्यात आले आहे.
हेही वाचा :

<p>मुंबई विद्यापीठ सिनेट निवडणूक स्थगितीविरोधात हायकोर्टात याचिका. ३ आठवड्यांत प्रतिज्ञापत्र सादर करा, हायकोर्टाचे राज्य सरकार, विद्यापीठाला निर्देश. राजकीय दबावातून निवडणूक स्थगित केल्याचा याचिकेत आरोप</p>
Source link