Thursday, July 23, 2026
Home Blog Page 2740

Zareen Khan: अभिनेत्री जरीन खानवर फसवणुकीचा आरोप, अटक वॉरंट जारी

0
Zareen Khan: अभिनेत्री जरीन खानवर फसवणुकीचा आरोप, अटक वॉरंट जारी


जरीनने १३ वर्षांपूर्वी प्रदर्शित झालेल्या वीर या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. या चित्रपटानंतर ती फारशी बॉलिवूडमध्ये दिसली नाही. अनेकदा तिची तुलना कतरिना कैफशी करण्यात आली होती. चित्रपटसृष्टीपासून दूर असलेली जरीन सोशल मीडियावर मात्र प्रचंड सक्रिय असते. तिचा चाहता वर्ग देखील मोठा आहे.



Source link

अखेर मुंबईकरांची प्रतीक्षा संपली! पाच वर्षांनंतर लोअर परळचा पूल वाहतुकीसाठी खुला

0
अखेर मुंबईकरांची प्रतीक्षा संपली! पाच वर्षांनंतर लोअर परळचा पूल वाहतुकीसाठी खुला


मुंबई : लोअर परळचा (Lower Parel) पुलामुळे गेली अनेक वर्ष मुंबईकरांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. पण आता मुंबईकरांची प्रतीक्षा अखेर संपली आहे. कारण लोअर परळचा पूल (Lower Parel Bridge) हा मागील पाच वर्षांपासून वाहतूकीसाठी बंद होता. तर हाच पूल आता खुला करण्यात आला आहे. खरतर लोअर परळवरुन प्रभादेवीकडे जाणारी मार्गिका ही 3 जून रोजी सुरु करण्यात आली होती. तर लोअर परळहून करी रोडकडे जाणारी एक मार्गिका ही येत्या सोमवारी म्हणजेच (18 सप्टेंबर) रोजी सुरु करण्यात येणार होती. पण बाप्पाच्या आगमानाने ही मार्गिका रविवार (17 सप्टेंबर) पासून सुरु करण्यात आली. 

दोन्ही गटाकडून सामंजस्याची भूमिका

हा पूल गणेश आगमनावेळी खुला व्हायला हवा नाहीतर आमचे कार्यकर्ते याच पुलावरुन बाप्पाला घेऊन जातील असा ईशारा आदित्य ठाकरेंनी दिला होता. त्यानुसार रविवार (17 सप्टेंबर) रोजी ठाकरे गटाचे काही कार्यकर्ते बाप्पाची मूर्ती घेऊन पुलाजवळ पोहचले. मात्र यावेळी पोलिस प्रशासन आणि पालकमंत्री दिपक केसरकर यांच्या ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांसोबत चर्चा करण्यात आली. या चर्चेनंतर आजच म्हणजे रविवार (17 सप्टेंबर) रोजी पुलाचं उद्घाटन करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे बाप्पाच्या आगमनापासून हा पूल मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाला आहे. 

गणरायाचं आगमन हेच पुलाचं अधिकृत उद्घाटन – केसरकर

दरम्यान पुलाच्या उद्घाटनाकरता इतर कोणत्याही औपचारिक शासकिय कार्यक्रमाची आवश्यकता नसल्याचं मुंबई शहराचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. तर गणरायाच्या आगमनामुळेच या पुलाचं उद्घाटन करण्यात आले. त्यामुळे लोअर परळ  सार्वजनिक गणेशोत्सव डळाच्या गणेश मूर्तीची मिरवणूक या पुलावरुन काढण्यात आली. अगदी ढोलताशांच्या गजरात ही मिरवणूक काढण्यात आली असून त्यानिमित्तानेच या पुलाचे देखील उद्घाटन करण्यात आले. 

पाच वर्ष पूल का बंद होता?

वरळी, डिलाईल रोड,करी रोड आणि लोअर परळला जोडणारा डिलाईल रोडचा  उड्डाणपूल धोकादायक असल्याचा अहवाल  आयआयटी मुंबईनं 2018 मध्ये दिला होता. मात्र वेगवेगळी कारणं देऊन गेली पाच वर्ष जुना पूल पाडून नवीन पूल उभारण्याचे काम गेली पाच वर्ष रखडवण्यात आले. तर या पुलाच्या कामामध्ये खडी घोटाळा झाला असल्याचा आरोप आदित्य ठाकरेंनी केलाय. त्यामुळे 48 तासांच्या मुदतीशिवाय प्रशासनाकडून वाहतूकीसाठी हा पुल खुला झाला नाही तर आम्हीच या पुलावरुन गणेश आगमनाची मिरवणूक काढू असा इशारा आदित्य ठाकरेंनी दिला होता. 

लोअर परळचा पूल म्हणजे, लालबाग, परळ, वरळी, प्रभादेवी यांना जोडणारा दुवा. गणेशोत्सवात लालबाग, परळमध्ये मोठी गर्दी असते. या काळात लोअर परळचा पूल वाहतूकीसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरतो. पण गेल्या पाच वर्षांपासून पूलाचं बांधकाम सुरू असल्यानं हा रस्ता पूर्णपणे बंद होता. अशातच आता ऐन गणेशोत्सवात हा पूल सुरू होणार असल्यामुळे लालबाग-परळकरांना खरंच वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळणार आहे. 

हेही वाचा : 

Mumbai Pune Expressway : मुंबई – पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी, गणेशोत्सवासाठी मुंबईकर बाहेर पडल्याने गाड्यांची गर्दीच गर्दी



Source link

IND vs SL: “आमच्या पप्पांनी श्रीलंकेला हाणला”, सामना जिंकताच मराठमोळ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल

0
IND vs SL: “आमच्या पप्पांनी श्रीलंकेला हाणला”, सामना जिंकताच मराठमोळ्या अभिनेत्याची पोस्ट व्हायरल



Siddharth Jadhav: आशिया चषकात मोहम्मद सिराजची कामगिरी पाहून मराठमोळ्या अभिनेत्याने केलेल्या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधले आहे. त्याची ही पोस्ट सर्वांच्या पसंतीला उतरत आहे.



Source link

Spruha Joshi: ‘सूर नवा ध्यास नवा’तील मॉनिटर आठवतोय का? आता दिसतो असा

0
Spruha Joshi: ‘सूर नवा ध्यास नवा’तील मॉनिटर आठवतोय का? आता दिसतो असा



Harshad Naybal: ‘सूर नवा ध्यास नवा’ची सूत्रसंचालक स्पृहा जोशीने सोशल मीडियावर मॉनिटरसोबतचे फोटो शेअर केले आहेत.



Source link

Nashik : आ. सत्यजीत तांबे यांच्या २०० दिवसांच्या कामाचा ‘रिझल्ट’ जाहीर!

0
Nashik : आ. सत्यजीत तांबे यांच्या २०० दिवसांच्या कामाचा ‘रिझल्ट’ जाहीर!


 MLA Satyajit Tambe : नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांनी आपल्या सोशल मीडियाच्या फेसबूक लाइव्हवर २०० दिवसांच्या कामाच्या प्रगतीपुस्तकाची माहिती दिली.



Source link

Thane: सावकऱ्याच्या जाचाला कंटाळून महिलेची रेल्वेसमोर उडी, मृतदेहाजवळ पोलिसांना सापडली चिठ्ठी

0
Thane: सावकऱ्याच्या जाचाला कंटाळून महिलेची रेल्वेसमोर उडी, मृतदेहाजवळ पोलिसांना सापडली चिठ्ठी



Thane Woman Jumps In Front Of Train: ठाण्यातील एका महिलेने सावकाराच्या त्रासाला कंटाळून रेल्वेसमोर उडी घेत आत्महत्या केल्याने खळबळ माजली.



Source link

गुवाहाटीला गेलो म्हणून बदनाम, घराबाहेर पडलो की लोक ‘खोके’ घेतले म्हणतात; काय म्हणाले बच्चू कडू?

0
गुवाहाटीला गेलो म्हणून बदनाम, घराबाहेर पडलो की लोक ‘खोके’ घेतले म्हणतात; काय म्हणाले बच्चू कडू?


जळगाव: शिवसेनेत फुट पडली आणि एकनाथ शिंदे गट गुवाहाटीला (Eknath Shinde Guwahati Visit) गेला, तिथून परत आल्यानंतर शिंदे थेट मुख्यमंत्रीच झाले. त्यानंतर राज्याच्या राजकारणात सुरू झालेली गुवाहाटीची चर्चा आता वर्ष होऊन गेलं तरीही संपत नाही. त्याच गुवाहाटीच्या विषयावर आता प्रहार पक्षाचे आमदार बच्चू कडूंनी  (Bacchu Kadu) प्रतिक्रिया दिली आहे. गुवाहाटीला गेलो म्हणून बदनाम झालो, घराबाहेर पडलो की लोक खोके घेतले म्हणतात असं ते म्हणाले. जिकडे जातो तिकडे खोके घेऊन आलास असं लोक आम्हाला म्हणतात असंही ते म्हणाले. 

आज जळगाव दिव्यांग विभागाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमासाठी आमदार बच्चू कडू उपस्थित होते. यावेळी भाषणात बच्चू कडू यांनी त्यांचं मत मांडत भूमिका स्पष्ट केली.

… पण बदनामीची भीती नाही

आमदार बच्चू कडू म्हणाले की, गुवाहाटीला जाऊन आल्यानंतर बदनाम झालो. जिकडे जातो तिकडे लोक म्हणतात की खोके घेऊन आला. घराबाहेर पडलो की खोके घेऊन आला असं म्हणतात आणि आमची बदनामी करतात. पण मला बदनामीची फिकर नाही. आम्ही जर गुवाहाटीला गेलो नसतो तर आम्हाला दिव्यांग मंत्रालय मिळालं नसतं.

गुवाहाटीला गेलो म्हणून दिव्यांग मंत्रालय मिळालं

एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाण्याचा घटनाक्रम तसेच कारण देखील यावेळी आमदार बच्चू कडू यांनी सांगितलं. बच्चू कडू म्हणाले की, “उद्धव ठाकरे यांच्यासोबत दोन वर्षे राहिल्यानंतरही दिव्यांग मंत्रालय झालं नाही. म्हणून मी एकनाथ शिंदे यांना अट घातली होती जर तुम्ही मला दिव्यांग मंत्रालय देत असाल तरच मी तुमच्यासोबत येतो. नाहीतर गाडीतून खाली उतरतो. त्यांनी त्यांचा शब्द पाळला आणि आज दिव्यांग मंत्रालय आपल्याला मिळालं आहे.”

दुसऱ्या वेळी जेव्हा गुवाहाटीला गेलो त्यावेळी मी एकनाथ शिंदे यांना दिव्यांग मंत्रालयाबाबत आठवण करून दिली होती. त्यानंतर ते दिव्यांग मंत्रालय आपल्याला मिळालं असंही यावेळी आमदार बच्चू कडू यांनी सांगितलं.

ही बातमी वाचा: 

 

 



Source link

Jalgaon Crime: प्रेमसंबंध ठेऊन लग्नास टाळाटाळ; संतापलेल्या तरुणीचा प्रियकरावर प्राणघातक हल्ला

0
Jalgaon Crime: प्रेमसंबंध ठेऊन लग्नास टाळाटाळ; संतापलेल्या तरुणीचा प्रियकरावर प्राणघातक हल्ला


निलेश बोरसे असं जखमी झालेल्या तरुणाचं नाव असून तो पाचोरा शहरातील तलाठी कॉलनी भागात वास्तव्यास आहे. निलेश याचं गेल्या दोन-तीन वर्षांपासून आरोपी तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये विविध कारणांवरून वाद होत असे. तरुणीनं निलेशमागे लग्नाचा तगादा लावला होता. परंतु, निलेश उडवाउडवीचे उत्तर देत होता, असा तरुणीकडून आरोप करण्यात आला आहे. यामुळं तरुणीनं काही महिन्यांपूर्वी निलेशविरोधात पाचोरा पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, त्यानंतरही निलेश लग्नासाठी तयार होत नव्हता. आरोपी तरुणीनं शनिवारी रात्री निलेशचे घर गाठले आणि माझ्याशी लग्न कर, नाहीतर तुझ्या कुटुबियांना सोडणार नाही, अशी धमकी दिली. त्याचवेळी आरोपी तरुणीनं निलेशवर चाकूनं प्राणघातक हल्ला केला.



Source link

मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण; पाहा फोटो

0
मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण; पाहा फोटो



मराठवाडा मुक्तिसंग्राम दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण; पाहा फोटो



Source link

Monsoon Update : गणेशोत्सव वरुणराजाला घेवून येणार; महाराष्ट्रात आजपासून चार दिवस पावसाचा इशारा

0
Monsoon Update : गणेशोत्सव वरुणराजाला घेवून येणार; महाराष्ट्रात आजपासून चार दिवस पावसाचा इशारा


हवामान खात्याने उत्तर महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, अहमदनगर आणि कोकणातील ठाणे, मुंबई आणि पालघर या जिल्ह्यांना नारंगी अलर्ट जारी केला आहे. याशिवाय रायगड, पुणे, रत्नागिरी, सातारा, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, गडचिरोली, भंडारा, जालना, नांदेड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना पिवळा इशारा देण्यात आला आहे. येत्या २० सप्टेंबरपर्यंत या सर्व जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. त्यामुळं नदीकाठी राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भंडारा, गडचिरोली आणि जळगाव या जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांमध्ये प्रशासनाकडून मदत व बचावकार्य सुरू करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.



Source link